लिंबागणेश(डॉ गणेश ढवळे):कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजीवन पुर्वपदावर आल्यामुळे यावर्षी मोठ्याप्रमाणात उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जाणार असल्याचे सुतोवाच असुन गणेशोत्सवात सामाजिक,धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करावेत मात्र याचवेळी लिंबागणेशकरांनी शांततेची परंपरा कायम राखावी कुठलेही गालबोट लागु देऊ नये उत्सव शांततेत साजरा करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नेकनुर पोलीस स्टेशनचे स.पो. नि.शेख मुस्तफा यांनी आज दि.२५ ऑगस्ट गुरूवार रोजी लिंबागणेश येथील हनुमान मंदिरात आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नेकनुर पोलीस स्टेशनचे स.पो.नि.शेख मुस्तफा यांनी लिंबागणेश येथे शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी……उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना शेख मुस्तफा बोलत होते,गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरीता पोलीस अधिक्षक बीड यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विविध सुचना करताना जबरदस्तीने कोणाकडुनही वर्गणी मागु नये,सर्व नियम कायद्यांची माहिती देऊन सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोष्ट दिसुन आल्यास कायदा हातात न घेता पोलिसांकडे संपर्क साधावा,महिलांना सन्मानाची वागणूक द्यावी, ईतर स्वच्छतेबाबत काळजी घेतानाच ध्वनी प्रदुषणाबाबतही काळजी घ्यावी तसेच मंडळाचे ठिकाणी दाखविण्यात येणारे देखावे आक्षेपार्ह अगर सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच गणेशमंडपामुळे रहदारीस अडथळा होणार नाही,गणेश मंडळाचे ठिकाणी स्वयंसेवक नेमुन मंडळांच्या पदाधिका-यांनी त्यावर नियंत्रण ठेवावे. आदि सुचना करण्यात आल्या याचवेळी पदाधिका-यांनी मांडलेल्या समस्या संदर्भात माहिती घेऊन आवश्यक उपाययोजना बाबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी बैठकीत नेकनुर पोलीस स्टेशनचे सफौ. निकाळजे,पो.हे.राऊत,पोलीस नाईक मुंढे,पोलीस अंमलदार ढाकणे,ग्रामसेवक राठोड,उपसरपंच शंकर वाणी,माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ आप्पा गिरे ,सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे,माजी सरपंच बाळासाहेब मुळे, विक्की आप्पा वाणी,गणपति मंदिर विश्वस्त,चिंतामण जोशी, पुजारी श्रीकांत जोशी,जीवन मुळे,श्रीकृष्ण कानिटकर,गणेश थोरात,बाळकृष्ण थोरात ,बाळासाहेब जाधव,दादासाहेब गायकवाड,संतोष भोसले,विठ्ठल कदम,मोहन कोटुळे,विनायक मोरे,संतोष वाणी,सुरज कदम,औदुंबर नाईकवाडे,सौरभ कानिटकर,चेतन कानिटकर,गणपत दाभाडे,कचरू थोरात आदि उपस्थित होते.
लिंबागणेश सर्कल
भ्रष्टाचाऱ्यांची संरक्षक कवच – बोगस क्रिडा प्रमाणपत्र अभय योजना रद्दबातल करा अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार: डॉ गणेश ढवळे
लिंबागणेश(वार्ताहर):
बोगस प्रमाणपत्र वितरीत करणारी टोळी महाराष्ट्र राज्यात कार्यरत असुन कोट्यावधी रूपयांची उलाढाल करत प्रामाणिकपणे कष्टकरणारांच्या हक्कावर गदा आणत केवळ आर्थिक गैरव्यवहार करत मोठ्याप्रमाणात पैसा कमावणे उद्दीष्ट्य असणारांवर कठोर कारवाई करण्याऐवजी महाराष्ट्र शासन भ्रष्टाचार करणारांचे संरक्षक कवच बनत असुन त्याचाच भाग म्हणून बोगस क्रिडा प्रमाणपत्र अभय योजना लागु केली असून ही योजना तात्काळ मागे घेण्यात यावी अन्यथा उच्च न्यायालयात संबधित प्रकरणात जनहीत याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे निवेदन ईमेलद्वारे सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी मुख्यमंत्री, प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य यांना दिले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय क्रिडा विभागाने बोगस क्रिडा प्रमाणपत्र प्रकरणात “अभय योजना “लागु केली असून सदर प्रमाणपत्र शासनाकडे प्रमाणपत्र धारक विद्यार्थ्याने जमा केली तर त्यांच्या विरोधात कसलीही कारवाई केली जाणार नाही शिवाय त्यांच्याकडे कसलीही चौकशी देखील केली जाणार नाही असे आदेशात नमुद केले असून बोगस प्रमाणपत्र वितरीत करणा-या राज्यभरातील टोळीचे संरक्षण करण्यासाठी व भ्रष्टाचार प्रकरणात पाठराखण करण्यासाठीच ही योजना लागु केली असून याचप्रकारे,बोगस हिवताप प्रमाणपत्र, तसेच बोगस टीईटी प्रमाणपत्र तसेच अन्य कोणत्याही बोगस प्रमाणपत्र आधारे कोट्यावधी रूपये कमावणा-या व हक्काच्या उमेदवारांवर अन्याय करणा-या टोळीचे संरक्षण कवच असुन संबधित आदेश तात्काळ मागे न घेतल्यास आपणाविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल असे निवेदन ईमेलद्वारे मुख्यमंत्री, प्रधान सचिव, शिक्षण मंत्री, प्रधान सचिव, क्रिडा मंत्री, प्रधान सचिव यांना पाठवले असल्याचे डॉ ढवळे यांनी सांगितले आहे.
मांजरसुंभा-पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर महाजनवाडी फाट्यावर अपघात,४ जखमी १ गंभीर
लिंबागणेश: आज दि.१२ फेब्रुवारी २०२२ वार शनिवार रोजी सकाळी ८ वाजता तुळजापुर येथे दर्शन घेऊन जामखेड कडे जाणारी स्विफ्ट डिझायर लाल रंगाची गाडी (गाडी क्रमांक एम. एच.१३ टीसी २४६ )गाडीवर नियंत्रण सुटल्याने खोल खड्ड्यात पालटली.अपघातात जामखेड येथील अभिषेक अधारे वय २२ वर्षे ,गौरव जाधव वय २४ वर्षे, अक्षय पवार वय २३ वर्षे, अक्षय जाधव वय २३ वर्षे असून त्यातील एकजण गंभीर जखमी झालेला असून गाडीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
उपघातस्थळी महाजनवाडी येथील शिवाजी घरत लिंबागणेश येथिल विक्की वाणी व त्यांच्या सहका-यांनी जखमीला गाडीच्या बाहेर काढण्यास मदत केली .
घटनास्थळी मांजरसुंभा येथील राष्ट्रीय महामार्ग पोलीस केंद्रातील कर्मचारी ठोंबरे, मेह्त्रे, राठोड पोलीस नाईक व थोरात, उबे काॅन्स्टेबल पोहचले त्यांनी सविस्तर माहीती घेतली. जखमींना रूग्णवाहीके द्वारे बीड जिल्हारूग्णालयात पाठवण्यात आले.
बोगस जाॅबकार्ड प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत ―डाॅ.गणेश ढवळे
बीड:नानासाहेब डिडुळ(उपसंपादक)― बीड जिल्ह्य़ातील नरेगा गैरव्यवहार प्रकरणात उच्च न्यायालयाने घोटाळा प्रकरणात चौकशीकडे दुर्लक्ष केल्याने बदली करण्याचे आदेश दिले होते. त्यातच बीड जिल्ह्य़ातील कोरोना कालावधीत बोगस कुटुंब दाखवुन त्यांच्या नावाने कागदोपत्रीच कामे दाखवुन कोट्यावधी रूपयांचा अपहार सरपंच, ग्रामसेवक, तसेच प्रशासकीय आधिकारी यांनी संगनमतानेच केला असून संबधित प्रकरणात गुन्हे दाखल करून फौजदारी कारवाई करण्यात यावी.
केज तालुक्यातील लहुरी नरेगा गैरव्यवहार प्रकरणात फौजदारी कारवाई करावी
केज तालुक्यातील लहुरी ग्रामपंचायत अंतर्गत मनरेगा कामात मोठ्याप्रमाणात गैरव्यवहार करण्यात आला असून संबधित प्रकरणात सरपंच, ग्रामसेवक, तसेच पंचायत समिती गटविकास आधिकारी यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष बीड यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड यांच्यामार्फत रोहयो मंत्री, प्रधान सचिव रोहयो मंत्रालय, विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना केली आहे.
पशुसंवर्धन पदविका धारकांना शासनाने नोंदणीकृत करून स्वतंत्र पशुवैद्यकीय व्यवसायास परवानगी द्यावी !
बीड दि.०४ ऑगस्ट २०२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत करून त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून वाड्या-वस्त्यांवर पशुसेवा अगदी कमी वेळात पोहचेल व गाई-म्हशीचे प्राण वाचेल.शासन दुधाचा महापूर आणण्यासाठी प्रयत्न करते योजना आखते परंतु त्यात मोलाचा वाटा असणारे पशुसंवर्धन पदविकाधारकांच्या नोंदणीच्या वेळी मात्र काणाडोळा करते.असे न करता शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून प्रथमतः पशुसंवर्धन पदविका धारकांना कायदेशीर पशुवैद्यक म्हणून घोषित करावे व त्यांची नोंदणी करून त्यांना नोंदणीक्रमांक द्यावा अशी मागणी जोर धरून आहे. १९८४ च्या कायद्यात बदल करावा, पशुसंवर्धन पदवीकाधारकांना व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे मात्र शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसून कृषीप्रधान देशातच पशूंकडे शासनाचे लक्ष नसल्याचे समोर येत आहे.
पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ कलमाअंतर्गत व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीमधून पशुसंवर्धन पदवीधारकांच्या राज्यव्यापी परिषदेची नियुक्ती करून स्वतंत्ररीत्या औषधे बाळगणे व नोंदणीकृत व्यवसाय परवाना उपलब्ध करून द्यावा.राज्यातील रिक्त पशुधन पर्यवेक्षक पदांची तत्काळ भरती करण्यात यावी.खासगीरीत्या असंघटित क्षेत्रात भारतीय पशुचिकित्सक परिषद कायद्यान्वये किरकोळ व प्राथमिक स्वरूपाच्या पशुवैद्यकीय उपचार सेवा पदवीधारक डॉक्टरच्या सुपरव्हिजन व माध्यमांचा वापर करून आपले कार्य पार पाडतात अशा सर्व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीप्रमाणपत्र व ओळखपत्र देऊन पशुसेवेचे कार्य सुरू ठेवण्यासाठी बळ द्यावे.
अंजनवती येथिल नि:शुल्क वैद्यकीय शिबिरात कोविड अन्टीजेन तपासणी – डाॅ.गणेश ढवळे
बीड:आठवडा विशेष टीम― आम आदमी पार्टी व जिओ जिंदगी संयुक्त विद्यमाने अंजनवती येथिल नि:शुल्क वैद्यकीय तपासणी शिबिरात आज रविवारी डाॅ.खाकरे के.डी.वैद्यकीय आधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र चौसाळा यांच्या मार्गदर्शनाखाली अन्टीजेन तपासणी करण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, बाळासाहेब मोरे ,भाजपा किसान मोर्चा तालुकाध्यक्ष बीड.
अंजनवती पंचक्रोशीतील ग्रामस्थांना निःशुल्क वैद्यकीय सेवा शिबिर आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष अशोक येडे, सचिव रामधन जमाले, संघटक ज्ञानेश्वर राउत, तसेच आखिल भारतीय पॅथर सेनेचे मराठवाडा उपाध्यक्ष नितिन सोनावणे, बाळासाहेब मोरे, भाजपा किसान मोर्चा तालुकाध्यक्ष बीड, सरपंच सुनिल येडे, दादाराव येडे, उपसरपंच, वैभव येडे, फुलचंद येडे, समस्त गावकरी यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या आरोग्य शिबिरात आज डाॅ.खाकरे के.डी.वैद्यकीय आधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र चौसाळा या रविवारी 50 आजारी ग्रामस्थांच्या अन्टीजेन तपासणी करण्यात आल्या त्यापैकी 6 कोरोनाबाधित आढळून आले असून त्यांना पुढील उपचारासाठी बीड येथिल कोविड सेंटरला पुढील उपचारांसाठी पाठवण्यात आले, अन्टीजेन तपासणीत लॅब टेक्निशियन संतोष खाकरे, आरोग्य सेवक अशोक ठोसर, सहाय्यक बाबुराव देशमुख यांनी सहकार्य केले.
लक्षणे आढळताच कोरोना अन्टीजेन तपासणी करून घ्यावी:-अशोक येडे आप जिल्हाध्यक्ष बीड
कोरोनाच्या संकटात अंगावरती कोणतेही दुखणे काढु नका, लवकर निदान झाल्यास त्यावर उपचार करून कोरोनावरील मात करता येते त्यामुळे ग्रामस्थांनी भिती न बाळगता अन्टीजेन तपासणी करून घेण्याचे आवाहन केले
बंकट स्वामी संस्थानचे ह.भ.प. नाना महाराज कदम यांनी अंजनवती गावातील ग्रामस्थांना कोविड अन्टीजेन तपासणी संदर्भात जनजागृती करून निर्भय वातावरणात तपासणीसाठी प्रोत्साहीत केले.
महाराष्ट्र शासनाची मोफत गहु-तांदुळ योजना कागदावरच ग्रामस्थांची उपासमार – डाॅ.गणेश ढवळे
बीड:नानासाहेब डिडुळ― महाराष्ट्र शासनाने गरीब व गरजु लोकांना लाॅकडाऊन कालावधीत जाहीर केलेले धान्य स्वस्त धान्य दुकानावर उपलब्ध करून गरीब जनतेची उपासमार होऊ नये यासाठी केलेली घोषणा आठवडा उलटला तरी कागदावरच असून गोडाऊन मधुन धान्यच आले नसल्यामुळेच वाटप करण्यात आले नसल्याचे स्वस्त धान्य दुकानदारांनी बोलुन दाखवले, गोडाऊन किपर आज-ऊद्या करत लांबन लावत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली असून तात्काळ गोडाऊन मधूनच धान्य वितरीत करण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा आधिकारी बीड यांना तालुका पुरवठा आधिकारी, तहसिलदार बीड यांच्या मार्फत डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे.
कोरोना संकटामुळे लाॅकडाऊन झालेल्या जनतेला राज्यातील महाविकास आघाडी सरकारने रेशन दुकानावर 3 किलो गहु व 2 किलो तांदुळ प्रतिव्यक्ती देण्याचे जाहीर करून आठवड्यापेक्षा जास्त कालावधी उलटुन गेला आहे तरी सुद्धा अद्याप ग्रामिण भागामध्ये धान्य रेशन दुकानावर आलेले नाही, रेशन दुकानदारांच्या मते अजून गोडाऊन मधूनच धान्य आले नाही, आल्यानंतर वाटप करू.
बीड तालुक्यातील मौजै लिंबागणेश येथे एकुण 3 स्वस्तधान्या दुकाने असून एकुण 700 च्या आसपास राशनकार्ड आहेत. चौसाळा येथील गोडाऊन मधून त्यांना धान्य वाटप होते, परंतु चौसाळा गोडाऊन किपर आज ऊद्या वाटप करू म्हणत आठवडा उलटून गेला असुन सध्या संचारबंदीच्या काळात ग्रामस्थांची उपासमार होत असून तात्काळ पुरवठा स्वस्त धान्य दुकानदारांना करण्यात यावा,अशी मागणी डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी ईमेलद्वारे केली आहे.
डॉ.ढवळेंच्या वाढदिवसानिमित्त देवराई ट्रेकिंग ग्रुपच्या वतीने लिंबागणेश भालचंद्र गणपती मंदिर परिसरात वृक्षारोपण, खाकी वर्दीतील वृक्षप्रेमी लक्ष्मण केंद्रेंची प्रमुख उपस्थिती
बीड:आठवडा विशेष टीम― सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांच्या वाढदिवसानिमित्त देवराई ट्रेकिंग ग्रुपच्या वतीने लिंबागणेश येथील भालचंद्र गणपती मंदिर परिसरात वड, पिंपळ, कडुनिंब, आदि, वृक्षारोपण करण्यात आले यावेळी खाकीवर्दीतील वृक्षप्रेमी लक्ष्मण केंद्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेकनूर पोलीस ठाणे यांची त्यांच्या सहकाऱ्यांसह प्रमुख उपस्थिती होती.
देवराई ट्रेकिंग ग्रुप बीड व्यावसायाने बहुतांश शिक्षक असलेल्या या ग्रुप पर्यावरणप्रेमी सदस्यांच्या वतीने बीड शहराच्या आसपास डोंगररांगात नित्यनेमाने वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, तसेच विविध वनस्पतींच्या औषधीय गुणधर्म यांच्या विषयी समाजामध्ये जनजागृती करण्यात येते, देवराई ट्रेकिंग ग्रुप मधिल सदस्य डॉ, गणेश ढवळे लिंबागणेशकर सामाजिक कार्यकर्ते यांच्या वाढदिवसानिमित्त भालचंद्र गणपती मंदिरात वड, पिंपळ, आदि, वृक्षारोपण करण्यात आले,
खाकीवर्दीतील वृक्षप्रेमी लक्ष्मण केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती –डॉ.गणेश ढवळे
जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी मांडवखेल येथे पाणी फाऊंडेशनच्या शिवारफेरीत बीजरोपन, वृक्ष लागवडीची पाहणी करताना वृक्षप्रेमी लक्ष्मण केंद्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेकनूर पोलीस ठाणे यांनीयांनी नेकनूरसह रत्नागिरी, भंडारवाडी, कपिलधार,मांजरसुंभा, , चाकरवाडी, येथील ओसाड डोंगरावर ” बिजांकुर” वृक्षप्रेमी ग्रुप ऊभारून ग्रामस्थांसह १ लाख बिजांचे रोपन, पार पाडत नेकनूर येथील बाजारतळ, ईदगाह मैदान, चाकरवाडी रस्त्यावरील वृक्षारोपण, कपिलधार कडे जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा तसेच सीतादेवी मंदिर परिसरात वडाच्या फांद्यासह, पिंपळ, चिंच या झाडाची लागवड केली आहे, डॉ, गणेश ढवळे यांच्या वाढदिवसानिमित्त देवराई ग्रुप च्या वतीने करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात खाकीवर्दीतील वृक्षप्रेमी लक्ष्मण केंद्रे व त्यांचे सहकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
बीड: ऑनलाईन मतदार नोंदणीचा गैरफायदा घेत बेलवाडीत अनेकांची नावे मतदान यादीत
बेलवाडी ग्रामपंचायत निवडणूकीत झालेला प्रकार, लोक प्रतिनिधित्व कायदा नुसार गुन्हे दाखल असताना जिल्हा प्रशासनाकडुन, निवडणूक विभागाकडून पाठराखण, विभागीय चौकशी व कारवाईसाठी आयुक्तालयासमोर आंदोलन – डॉ.गणेश ढवळे
बीड:आठवडा विशेष टीम― बीड तालुक्यातील बेलवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत बेकायदेशीर रित्या ऑनलाईन मतदार नोंदणीचा गैरफायदा घेऊन २७ मे २०१८च्या निवडणुकीत बोगस मतदारांचा समावेश उदाहरणार्थ ६ मयत, बेपत्ता व्यक्ती, ११अल्पवयीन शाळकरी मुलं,४ दुबार मतदान, पुणे येथील नोकरीवर असलेले सैनिक जवान, कोकणातील मतदान ड्युटीवर कार्यरत असलेले ग्रामसेवक, ७ लग्न होऊन सासरी गेलेल्या व तिथे नांव नोंदणी करून मतदान केलेल्या मुली, २३बाहेरील गावातील लोकांचे बोगस पद्धतीने केले मतदान आदी प्रकरणात दि, २०/१०/२०१८ रोजी पिंपळनेर पोलीस ठाण्यात फौ.अ.क्र.७३२/२०१८, कलम ४१६,४६५,४६८,४७३,सह १०९ भादवि प्रमाणे कलम १७,१८,३१ लोक कृत्य प्रतिनिधित्व कायदा (Represention of the people act 1950) प्रमाने सरपंच, सरपंच पती,व ईतर संबधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, याप्रकरणी जिल्हाधिकारी, राज्य निवडणूक आयुक्त, जिल्हा परिषद प्रशासन यांना लेखी तक्रार करून सुद्धा कारवाई न केल्यामुळे संबधितांवर प्रशासकीय कारवाई करण्यासाठी व ग्रामपंचायत बरखास्तीसाठी विभागीय आयुक्त कार्यालय समोर धरणे आंदोलनाचा ईशारा डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी दिला आहे.
बीड तालुक्यातील बेलवाडी ग्रामपंचायत २७ मे २०१८ मध्ये निवडणुकीत बोगस मतदार खालिलप्रमाणे आहेत
६ मयत मतदारांची नावे समाविष्ट
———————————————
१) चव्हाण अंकुश किसन
अनुक्रमांक १३६
मृत्यू दिनांक २०/०२/२०१८
२) विश्वांभर रामभाऊ यादव
अनुक्रमांक ४०४
मृत्यू दिनांक १३/०२/२०१८
३) निवृत्ती बाबुराव कदम
अनुक्रमांक ३४६
मृत्यू दिनांक १९/०३/२०१७
४) अर्चना भिमराव चव्हाण
अनुक्रमांक ८६
मृत्यू दिनांक २३/०५/२०१८
५) काशीबाई रामा यादव
अनुक्रमांक ४०३
मृत्यू दिनांक १६/१०/२०१७
६) अर्जुन बाबुराव चव्हाण
अनुक्रमांक ७६
मृत्यू दिनांक १३/११/२०१७
पोलीस डायरीवरती बेपत्ता नोंद असलेला–
————————————————–
मस्कर भागवत उत्तम
अनुक्रमांक २५२
दोनदा मतदान केलेले ४ मतदार
————————————-
१) कदम हनुमंत नवनाथ
अनुक्रमांक २९३ & ५३२
२) यादव वर्षा रावण
अनुक्रमांक ५१७ & ५२८
३) कदम अशोक मोहन
अनुक्रमांक ४७९ & ५११
४) खिंडकर अवधूत अर्जुन
अनुक्रमांक ५१० & ५३१
या सर्वांनी दोनदा मतदान केलेले आहे
अल्पवयीन शाळेतील मुलांचे मतदान
—————————————
१) चि, दळवे विठ्ठल नामदेव
जन्मदिनांक २५/०५/२००३
२) चि, चव्हाण हरिभाऊ कल्याण
जन्मदिनांक १४/११/२००२
३) चि, चव्हाण राहुल भिमराव
जन्मदिनांक १०/०६/२००२
४) चि, यादव समाधान रमेश
जन्मदिनांक १८/०८/२००१
५) चि, थापडे सखाराम सुखदेव
जन्मदिनांक १७/०३/२००२
६) चि, चव्हाण ऋषिकेश अंकुश
जन्मदिनांक १९/०५/२००२
७) चि, मुळे जयवंता कारभारी
जन्मदिनांक १६/०६/२००२
८) चव्हाण पवन कारभारी
जन्मदिनांक ३०/०७/२००१
९) चव्हाण पुजा कल्याण
जन्मदिनांक १२/०३/२००१
१०) खिंडकर सुदाम लक्ष्मण
जन्मदिनांक २०/०६/२००१
११) खिंडकर मुक्ता भारत
जन्मदिनांक २०/०३/२०००
कोकणातील मतदान ड्युटीवरील ग्रामसेवकाचे मतदान
———————————————–
यादव भरत विठ्ठलराव
अनुक्रमांक ४७३ , हे ग्रामसेवक असुन कोकणात मतदान ड्युटीवर कार्यरत असताना बेलवाडी ग्रामपंचायत मध्ये परस्पर बोगस मतदान केलेले आहे
पुणे येथे सैन्यदलात नोकरीवर असताना मतदान
———————————————–
पडघन आनिल मारोती हे पुणे येथे सैन्यदलात नोकरीवर असताना त्यांच्या परस्पर त्यांच्यानावे बेलवाडी मध्ये बोगस मतदान केलेले आहे.
बाहेरील गावातील स्थायिक लोकांच्या नावाने बेलवाडीतील रहिवासी दाखवून बोगस मतदान केलेले
———————————————–
१) बागडे गजानन मच्छिंद्र :– ईस्लामपुर बीड
२) बन्सड बन्सी देवराव :- मौजवाडी
३) चव्हाण बाबुराव सुखदेव :- इमामपुर
४) चव्हाण भिमराव शंकर:- घाटसावळी
५) चव्हाण कल्याण सुखदेव:- इमामपुर
६) चव्हाण निलावती बाबुराव:- इमामपुर
७) चव्हाण रामभाऊ सूर्यभान:- घाटसावळी
८) चव्हाण रूक्मिण सूर्यभान:- घाटसावळी
९) चव्हाण सुखदेव किसन:- नाळवंडी तांडा
१०) चव्हाण कविता अंकुश:- नाळवंडी तांडा
११) चव्हाण लक्ष्मण सूर्यभान:- पिंपळगाव घाट
१२) दळवे प्रकाश दादाराव:- कोळवाडी
१३) इंगोले सीताबाई रामभाऊ:- पाडळी
१४) जाधव सुरेश बापुराव:- बांभुळखुटा
१५) कदम गणपती मारोती:- रत्नागिरी
१६) कदम केसरबाई गणपत:- शाहूनगर बीड
१७) कुटे अभिमान राम:- बोर्ड
१८) सातपुते अर्चना सतिश:- बाभूळवाडी
१९) थापाडे गंगासागर सुखदेव:- ढेकणमोह
२०) थापाडे सुखदेव राजाराम:-ढेकणमोह
२१) वाणी बाजीराव लक्ष्मण:- आंबेसावळी
२२) यादव ज्ञानदेव निवृत्ती:- वांगी
२३) यादव शहादेव तुकाराम:- वांगी
वरील प्रकरणी जिल्हाधिकारी बीड, राज्य निवडणूक आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समिती जिल्हा परिषद बीड, तहसीलदार बीड यांना लेखी तक्रार दाखल करण्यात येऊन सुद्धा अद्याप कारवाई न केल्यामुळे दि, २ नोव्हेंबर २०२० रोजी विभागीय आयुक्त कार्यालय समोर सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
बेलवाडी ‘मनरेगा अपहार’ प्रकरण ; सोशल मिडियावर डॉ गणेश ढवळेंची नाहक बदनामी करणाऱ्या पोस्ट ,पोलीस प्रशासनाच्या कारवाई कडे लक्ष
बेलवाडी ग्रामपंचायतमध्ये मनरेगा अंतर्गत कामात ६० लाखांचा अपहार, विभागीय आयुक्त कार्यालय समोर धरणे आंदोलन करणार , सोशल मीडियावर बदनामी केली,पोलीस अधीक्षकांकडे तक्रार , अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार – डॉ गणेश ढवळे
बीड:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्र शासनाने रोजगार हमी योजना मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी सुरू करण्यात आली मात्र स्थानिक पुढारी यांनी वरिष्ठांच्या वरदहस्ताने शासकीय आधिकारी, कर्मचारी यांच्याशी संगनमताने बोगस मजुर दाखवून व बनावट दस्तऐवज तयार करुन लाखो रूपयांचा अपहार केल्यामुळे संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत मोक्का लावण्यात यावा अशी मागणी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी रोहयो, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, रोहयो मंत्री, ग्रामविकास मंत्री, विभागीय आयुक्त यांना केली असून संबंधित प्रकरणी कारवाई करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे डॉ गणेश ढवळे यांनी सांगितले आहे.
कामाचे नाव वर्क कोड नंबर रक्कम
१)बांधबंदिस्ती १ते ३९ वर्क कोड नंबर १७६८४३, रक्कम २२ लाख ५७ हजार ९९८ रूपये
२) बांधबंदिस्ती ५५ ते १४० वर्क कोड नंबर १७६८४२, रक्कम २२ लाख, ४९ हजार, ७७३ रूपये
३) बांधबंदिस्ती नविन वर्क कोड नंबर १२३४८३७१०५, रक्कम ७ लाख रुपये ६७ हजार १४४ रूपये
४) वृक्षसंगोपन बेलवाडी कोड नंबर १२३४८३७१०५ रक्कम ३ लाख ३५ हजार ५५० रूपये
५) वृक्षसंगोपन वर्क कोड नंबर १२३४८३७१०६ रक्कम २ लाख ३९ हजार ९१५ रूपये
६) शोषखड्डे बेलवाडी वर्क कोड नंबर ४७३४११२३८/४७३४११२३९/४७३४११२४८ रक्कम २ लाख १९ हजार रुपये
७) जलसिंचन विहीर बेलवाडी, वर्क कोड नंबर ४७३४४६९७१ रक्कम १ लाख ८७ हजार रुपये, अशाप्रकारे एकुण ६० लाख ३७ हजार ३८० रुपयांचा अपहार बोगस मजुर व दस्तऐवज दाखवून संगनमताने शासनाची फसवणूक करण्यात आली असल्याचा डॉ गणेश ढवळे यांचा आरोप आहे.
बांधबंदिस्ती एकाच कामाचे एकाच आठवड्यात ४ मस्टर, एकही मजुर उपस्थित नसताना ३८७ बोगस मजुर दाखवले
बेलवाडी गावामध्ये गट क्रमांक १ ते ३९ व गट क्रमांक ५५ ते १४० अशी दोन बोगस कामे कागदोपत्री केल्याचे दाखवले आहे व दोन्ही कामावर दिनांक २६/०४/२०१९ ते ०१/०५/२०१९ या आठवड्यात गट क्रमांक १ते ३९ वरती एकाच कामावर ४ मस्टर काढलेले आहेत.
१) मस्टर क्रमांक २०९९-५० मजुर
२) मस्टर क्रमांक २१००-५० मजुर
३) मस्टर क्रमांक-२१०१-५० मजुर
४) मस्टर क्रमांक-२१०२-४३ मजुर या कालावधीत एकुण १९३ मजुर दाखवले आहेत.
२) बांधबंदिस्ती गट क्रमांक ५५ते १४० या कामावरती दि, २६/०४/२०१९ते ०१/०५/२०१९ या कालावधीत एकाच कामावर ४ मस्टर काढलेले आहेत
१) मस्टर क्रमांक २०९२-५० मजुर
२) मस्टर क्रमांक-२०९३-५० मजुर
३) मस्टर क्रमांक-२०९४-५० मजुर
४) मस्टर क्रमांक-२०९५- ४४ मजुर असे एकूण १९४ मजुर दाखवले असल्याचा डॉ ढवळे यांचा आरोप आहे.
एकाच कामावर व एकाच आठवड्यात ४ मस्टर कसे काय काढले? प्रत्यक्षात एकही मजुर उपस्थित नसताना या आठवड्यात एकुण ३८७ बोगस मजुर दाखवून लाखो रुपये हडप केले आहेत.
२० वर्षापुर्वीची जलसिंचन विहीर नविन खोदल्याचे दाखवून अपहार
२० वर्षापुर्वीची विहीर नविन जलसिंचन विहीर खोदल्याचे दाखवून १ लाख ८७ हजार रूपये निधीचा अपहार करण्यात आला आहे.
मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी – डॉ.गणेश ढवळे
संबंधित प्रकरणात चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन अपहारीत रक्कम शासन दरबारी जमा करण्यात यावी, बोगस मजुरांची नावे यादीत असून बंदिस्त जागेत वैयक्तिक रित्या रोहयो मजुरांचे जवाब नोंदवावेत म्हणजे खाते कोणी उघडले, मजुरांच्या नावावरील पैसे कोणी परस्पर उचलले याचा उलगडा होऊल, याप्रकरणात स्थानिक सरपंच, ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक, आणि पंचायत समिती मधिल गटविकास आधिकारी, विस्तार आधिकारी, इंजिनिअर, एपीओ, डाटा एंट्री ऑपरेटर यांनी संगनमताने अपहार केल्यामुळे संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी
सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी संबंधितांची डॉ गणेश ढवळे पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करणार तसेच अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार
बेलवाडी नरेगाच्या कामातील अपहार प्रकरणात कारवाई करण्यासाठी डॉ गणेश ढवळे यांनी लेखी तक्रार केल्यामुळे सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी सरपंचपती व त्यांच्या सहकाऱ्यां विरोधात पोलीस अधीक्षक यांना लेखी तक्रार केली असून अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहेत.
डॉ राधाकिसन पवार यांची सूडबुद्धीने कारवाई ; कोविड कक्ष स्थापन करण्याचे लेखी आदेश दिले त्याच दवाखान्याला अनधिकृत म्हणून चौकशी – डॉ ढवळे
डॉ राधाकिसन पवार यांची सूडबुद्धीने कारवाई, कोविड कक्ष स्थापन करण्याचे लेखी आदेश दिले त्याच दवाखान्याला अनधिकृत म्हणून चौकशी, मुख्यमंत्री आरोग्यमंत्री आयुक्तांना लेखी तक्रार ― डॉ. गणेश ढवळे
बीड दि.१०:आठवडा विशेष टीम― डॉ.राधाकिसन पवार जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी ज्या क्लिनिक मध्ये कोविड-१९ संभाव्य रूग्ण तपासणी कक्ष स्थापन करणायाचे लेखी पत्रक आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत दिले होते त्याच दवाखान्याची अनधिकृतपणे चालवत असल्याबद्दल पोलीस यंत्रणा व वैद्यकीय यंत्रणेमार्फत चौकशी करून बदनामीचे षडयंत्र डॉ.अशोक थोरात (जिल्हा शल्य चिकित्सक) , डॉ. राधाकिसन पवार (जिल्हा आरोग्य अधिकारी) व डॉ.प्रतिभा रकटे (वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र लिंबागणेश) यांनी रचले असल्याचे डॉ गणेश ढवळे यांनी म्हटले आहे.
आरोग्य यंत्रणेतील या अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधातील तक्रार मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आयुक्त आरोग्य सेवा संचनालय मुंबई यांना केल्यामुळे षड्यंत्र सूडबुद्धीने रचले याविषयी चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ लातूर यांच्या मार्फत मुख्यमंत्री आरोग्यमंत्री आयुक्त आरोग्य सेवा संचनालय मुंबई यांना डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, दि. ०८/०९/२०२० रोजी डॉ. प्रतिभा रकटे (वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र लिंबागणेश) यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिसन पवार यांनी डॉ.कासट एन.डी. यांना जा क्र/जिआअकाबी/आस्था/९५७/२०२० जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय बीड दिनांक ०८/०९/२०२० रोजीच्या पत्रावरून डॉ. गणेश ढवळे अनाधिकृत दवाखाना चालवत असल्याबद्दल तात्काळ चौकशी करून कार्यवाही करणेबाबत सांगितले होते. त्यामध्ये डॉ.गणेश ढवळे यांच्या नर्सिंग होम मध्ये अनाधिकृत औषधसाठा आहे व अनाधिकृत दवाखाना चालवत असल्याचे म्हटले आहे.
दवाखाना अनधिकृत असेल तर कोविड कक्ष स्थापन करण्यासाठी लेखी पत्रक दिले कसे?
सर्वात प्रथम डॉ.गणेश ढवळे यांचे “दिपक क्लिनिक” आहे.नर्सिंग होम नाही दुसरी गोष्ट जर डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांचे क्लिनिक अनाधिकृत असेल तर डॉ.राधाकिसन पवार जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी स्वतः च्या सहीनिशी कोविड कक्ष स्थापन करण्यात यावे असे लेखी पत्रक प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी यांना डॉ.गणेश ढवळे यांच्या क्लिनिक मध्ये का पाठवले? असा प्रश्न निर्माण होतो.
डॉ.गणेश ढवळे यांच्या दिपक क्लिनिक मध्ये अनाधिकृत औषधीसाठा असेल तर औषध निरीक्षक रामेश्वर डोईफोडे यांनी जप्त करून गुन्हा दाखल का केला नाही???
डॉ.गणेश ढवळे यांची पदवी बी.ए.एम.एस. (Bachelor of Ayurveda, Medicine, and Surgery) असुन रजिस्ट्रेशन नं I-36149-A-1 आहे. त्यांच्या रजिस्ट्रेशन दिनांक ०६/०५/२०२४ पर्यंत आहे.दिनांक ०२/०९/२०२० पासुन १५/०९/२०२० पर्यंत लिंबागणेश संपूर्ण गावात संचारबंदी होती.त्यामुळे बीडवरून आवक-जावक करणारे लिंबागणेश येथिल औषध दुकानदार व खाजगी डॉक्टर यांचे येण्या-जाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे व स्वतः डॉ ढवळे स्थानिक असल्याने आवश्यक औषधीसाठा ठेवला होता.ज्यामध्ये आक्षेपार्ह गर्भपातासारखी कुठलीही औषधे नव्हती. त्यामुळे रामेश्वर डोईफोडे यांनी कोणतेही औषध जप्त न करता गुन्हा दाखल करण्यात आला नाही.खाजगी डॉक्टर रूग्ण तपासण्यात कुचराई करत असताना डॉ गणेश ढवळे यांनी रुग्णसेवा देत कर्तव्य बजावले आहे.
सूडबुद्धीने कारवाई करण्याचे कारण ‘वरीष्ठांना केलेली लेखी तक्रार’ ―डॉ.गणेश ढवळे
‘डॉ.रकटे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र लिंबागणेश या लिंबागणेश येथील आरोग्य केंद्रात वारंवार गैरहजर असतात, परिचारिका कडून रूग्णांना उपचार घ्यावे लागतात’ याविषयी डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी दि, १८/०३/२०२० रोजी मुख्यमंत्री ,आरोग्यमंत्री ,आयुक्त यांना जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत लेखी तक्रार केली होती. त्यावरून जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जिल्हा परिषद बीड जाक्रजिपबी/आदि/आस्था/-१/कावि-/ ६७९/१९ पत्रक दि. २०/०३/२०२० अन्वये दि. २०/०३/२०२० रोजी मुख्यालयी राहात नसल्याबद्दल महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ चे नियम ३(१) (दोन) चा भंग केला आहे म्हणून आपणाविरूद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ नुसार प्रशासकीय कारवाई का करण्यात येऊ नये या बाबत ७ दिवसाच्या आत खुलासा मागवला होता.त्यामुळे सूडबुद्धीने सर्व कागदपत्रे असताना केवळ मनस्ताप व दबाव आणण्यासाठी खोटी तक्रार नेकनूर पोलीस ठाण्यात केली गेली असल्याचे डॉ ढवळे यांनी म्हटले आहे.
डॉ. राधाकिसन पवार जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांची तक्रार–
दि, ३०/०९/२०२० रोजी डॉ. राधाकिसन पवार जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत जिल्हाधिकारी बीड यांनी गावातील ३२७ लोकांची संभाव्य कोरोना संशयितांची यादी तयार केली होती. त्यामध्ये बोगस लोकांची नावे दाखल करण्यात आली असून या गैरकारभारास डॉ. राधाकिसन पवार मुख्य सुत्रधार असल्याची लेखी तक्रार पंतप्रधान, केंद्रीय आरोग्य मंत्री, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री ,आयुक्त आरोग्य सेवा संचनालय मुंबई यांना केली होती या गोष्टीचा राग मनात धरून कारवाई केली गेली असल्याचे डॉ ढवळे यांनी म्हटले आहे.
१२ घंटे कोरोना रूग्ण ताटकळत असल्याची तक्रार जिव्हारी लागली
———————————————-
आरोग्य विभागाचा ग्रामिण भागातील ढिसाळ कारभार, त्यातच दि ०५/०९/२०२० रोजी लिंबागणेश येथील ५ कोरोना बाधित रुग्णांना नेण्यासाठी रूग्णवाहिका न आल्यामुळे रात्रभर १२ घंटे रुग्णांची हेळसांड केल्याप्रकरणी विविध दैनिकात, ईलेक्ट्रॉनिक मिडीयावर पोलखोल केल्यामुळे मनामध्ये राग होता, तो सूडबुद्धीने खोटी कारवाई करुन काढण्यात आला याविषयी मुख्यमंत्री ,आरोग्यमंत्री, आयुक्त आरोग्य सेवा संचनालय मुंबई यांना जिल्हाधिकारी बीड, उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ लातूर यांच्या मार्फत लेखी तक्रार डॉ गणेश ढवळे यांनी केली आहे.
बालाघाटावरील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ स्थळपंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी – डॉ.गणेश ढवळे
बीड/लिंबागणेश:आठवडा विशेष टीम― बीड तालुक्यातील बालाघाटावरील अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ तहसिल प्रशासनाने स्थळपंचनामे करावेत व नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणी बरोबरच ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, कृषीमंत्री, ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड, विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे
बीड तालुक्यातील बालाघाटावरील मौजे लिंबागणेश या गावासह पंचक्रोशीतील ईतर गावांमध्ये अतिवृष्टी मुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे, सोयाबीन, मका, बाजरी, कोबी फळभाज्या, आदि, पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे, परंतु जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊन सुद्धा तहसिल प्रशासन स्थलपंचनामे करण्याबाबत उदासीन दिसुन येते, त्यामुळे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी.
ओला दुष्काळ जाहीर करावा, मुख्यमंत्री , कृषीमंत्री , ग्रामविकास मंत्री, पालकमंत्री बीड, विभागीय आयुक्तांना निवेदन
अतिवृष्टी मुळे झालेले नुकसान पाहता, ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, कृषीमंत्री, ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड, विभागीय आयुक्त यांना करण्यात आली असल्याचे डॉ.गणेश ढवळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.
बीड: लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत नविन ३ कोरोना पाझिटीव्ह
लिंबागणेश:डॉ गणेश ढवळे― लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत एकुण २९ गावे येतात,त्या अंतर्गत ८ उपकेंद्र आहेत, काल डॉ. रकटे आणि डॉ. राऊत यांनी एकुण ६८ जणांची नावे स्वाब तपासणीसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कासट यांना पाठवले होते.
८ उपकेंद्र पैकी ३ उपकेंद्रात नविन १ रुग्ण कोरोना बाधित
बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथिल प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत एकुण ८ उपकेंद्र आहेत, लिंबागणेश,बोरखेड, बेलखंडी, मोरगाव, खंडाळा, पाली, मंत्री, पिंपळवाडी वरील उपकेंद्र आहेत.
आज दिनांक ०६/०९/२०२० रोजी सायंकाळी ७ वाजता आरोग्य विभागाने दिलेल्या अहवालानुसार ३ उपकेंद्रात नविन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे.१) बोरखेड उपकेंद्र अंतर्गत ६० वर्षीय पुरूष २) बेलखंडी अंतर्गत ३८ वर्षीय पुरूष ३) लिंबागणेश उपकेंद्र अंतर्गत ३२ वर्षीय पुरूष
या विषयी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी संबंधित गावच्या ग्रामसुरक्षा समिती सदस्यांना कळवले असुन पुढील दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कंत्राटदार मदन मस्के आणि कार्यकारी अभियंता बेदरे यांच्यावर ठाकरे सरकारच्या नविन धोरणानुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा – डॉ.गणेश ढवळे
बीड:आठवडा विशेष टीम― कंत्राटदार मदन मस्के यांनी अंदाजपत्रकातील लिंबागणेश ते काटवटेवस्ती ते अंजनवतीते घारगांव रस्ता परस्पर वळवुन ढवळे वस्ती, वाणी वस्ती, नाईगडे वस्ती, घोलप वस्ती यांना रस्त्यापासून वंचित ठेवल्यानंतर करणी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली दि.३ सप्टेंबर २०२० वार गुरूवार रोजी सकाळी १० वाजता लिंबागणेश बसस्थानक येथे मांजरसुबा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
अंजनवती सरपंच सुनिल येडे यांचे ठेकेदार मदन मस्के आणि अभियंता जोगदंड यांच्याशी चर्चेनंतर घुमजाव
अंजनवतीचे सरपंच सुनील येडे यांनी दि. २६ जानेवारी २०२०रोजी घेतलेल्या सर्वसाधारण ग्रामसभेत मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत राज्यमार्ग-५६-लिंबागणेश-काटवटेवस्ती-अंजनवती-घारगांव हा टेंडर प्रमाणे रस्ता असुन रस्त्याच्या पुर्वेस काटवटेवस्ती दर्शविली आहे, मात्र सध्या चालू रस्त्तेकामात पश्चिम बाजूस आहे. त्यामुळे काम बंद पाडले आहे. सुचक काटवटे राजेंद्र व अनुमोदक काटवटे कैलास आहेत. त्यांनी दि. २६/०१/२०२० रोजी पालकमंत्री धनंजय मुंडे,आ.संदिप क्षीरसागर, जिल्हाधिकारी बीड, कार्यकारी अभियंता (सीएमजीएसवाय) यांना निवेदन दिले आहे. दि. १२ मार्च २०२० रोजी लिंबागणेश येथे डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.यावेळी सरपंच सुनिल येडे आंदोलनात सामिल होते, मात्र नंतर ठेकेदार मदन मस्के आणि अभियंता जोगदंड यांच्याशी सल्ला-मसलत केल्यानंतर त्यांची भुमिका बदलली असुन रस्ता वळवला काय एवढेच नव्हे तर जुने पुल तसेच ठेवुन रस्ता काम सुरू आहे, याविषयी त्यांची काहीही तक्रार नाही.
लिंबागणेश सरपंच,उपसरपंचाची लेखी तक्रार, टेंडरप्रमाणेच रस्ता करावा–
दि.२८/०७/२०२० रोजी कार्यकारी अभियंता वाघ तसेच यांना दिलेल्या लेखी तक्रार मध्ये सरपंच आणि उपसरपंच यांनी लिंबागणेश बसस्थानक ते गणपती मंदिर व परिसरातील राज्यमार्ग ५६ लिंबागणेश ते काटवटे वस्ती ते अंजनवती ते घारगांव रस्ता मुळ अंदाजपत्रकाप्रमाणे करण्यात यावा असे लेखी निवेदन दिले आहे.सदरील रस्ता मुळ अंदाजपत्रकाप्रमाणे सिमेंट रस्ता आहे, त्यामध्ये कोणताही बदल होऊ नये, सदरील रस्त्यावर भालचंद्र गणपती मंदिर तिर्थक्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी येणा-या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून सदरील रस्त्याचे काम दर्जेदार व मुळ अंदाजपत्रकाप्रमाणे करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
मुख्यमंत्री यांनी नविन जाहीर धोरणाप्रमाणे निकृष्ट दर्जाचे रस्ताकाम प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा ठेकेदार आणि अभियंता ग्रा.र.वि.सं.बीड यांच्यावर दाखल करण्यात यावा–डॉ गणेश ढवळे
– मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या बीड- वरवटी-भाळवणी-बेलेश्वर रस्ता निकृष्ट दर्जाचा केल्याप्रकरणी तसेच लिंबागणेश ते काटवटेवस्ती ते अंजनवतीते घारगांव रस्ता परस्पर वळवुन ढवळे वस्ती, वाणी वस्ती, नाईगडे वस्ती, घोलप वस्ती यांना रस्त्यापासून वंचित ठेवल्यानंतर करणी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी डॉ.गणेश ढवळें लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि. ३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाई. लिंबागणेश बसस्थानक येथे मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
बीड: लिंबागणेश बसस्थानकासमोर केळीचा ट्रक पलटला ,जिवितहानी नाही
दुभाजकाचे रखडलेले काम , पथदिवे नसणे,अपघातास निमंत्रण ठरत आहे, केळी भरलेला ट्रक उलटला ,केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना लेखी तक्रार,रास्ता रोकोचा ईशारा – डॉ.गणेश ढवळे
लिंबागणेश दि.१२: आज दि. १२/०८/२०२० वार बुधवार रोजी सकाळी ४ वा.लिंबागणेश बसस्थानक येथे ड्रायव्हर अफसर आली महाराष्ट्र बारामती येथुन केळींनी भरलेला ट्रक. गाडी नंबर यु.पी. ७२टी ९१३२ उत्तरप्रदेश-बिहार याठीकाणी जात असताना पहाटे ४ वा. लिंबागणेश बसस्थानक येथे दुभाजकासाठी खोदलेल्या खड्ड्यात चाक गुंतुन पलटला.सुदैवाने जिवितहानी झाली नाही. ड्रायव्हरला किरकोळ मार लागला आहे.
दुभाजकाचे रखडलेले काम , पथदिवे नसणे, अपघातास निमंत्रण मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक ५४८-डी या रसत्याचे काम ३ वर्षांपासून रखडलेले आहे. लिंबागणेश या ठिकाणी दुभाजकाचे काम अपुर्ण असुन आणि पथदिवे सुद्धा न लावल्यामुळे दुभाजकासाठी खोदलेला खड्डा दिसतच नाही, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
मांजरसुंभा-पाटोदा रस्ता , दुभाजक, पथदिवे, गतिरोधक आदिसाठी मा.नितिन गडकरी यांना लेखी निवेदन – डॉ.गणेश ढवळे
मांजरसुंभा ते चुंभळी फाटा या ३३ कीलोमीटर रस्त्याचे १६० कोटी रुपये किंमतीच्या रस्त्याचे काम हुले कन्स्ट्क्शन मार्फत दोन वर्षांमध्ये बंधनकारक असताना साडे ३ वर्षांपासून रखडलेले आहे. लिंबागणेश , मुळुक, वैद्यकिन्ही या गावात गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच मौजे लिंबागणेश,वैद्यकिन्ही, पाटोदा याठिकाणी दुभाजकाचे काम रखडलेले , असुन अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. याविषयी रखडलेले काम तात्काळ पुर्ण करण्यात यावे यासाठी दि.२७/०८/२०२० रोजी डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली लिंबागणेश बसस्थानक येथे मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
उपचाराविना रुग्णाचा मृत्यू ,मृत्यूनंतर स्वॅब घेऊन कोरोना निगेटिव्ह चा दिला अहवाल ;सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
बीड:आठवडा विशेष टीम―
दि. ०६/०८/२०२० रोजी कांग्रेस गवताची ऍलर्जी झाल्यामुळे श्री सखाराम श्रीहरी जगदाळे यांना सायंकाळी कोकाटे यांच्या खाजगी दवाखान्यात नेले. तेथे त्यांनी जिल्हा रूग्णालयातून कोव्हीड निगेटिव्ह रिपोर्ट आणा मी तुमच्या पेशंटला दाखल करतो असे सांगितले.
जिल्हा रुग्णालयात रूग्ण दाखल करायला, ३ घंटे लागले तर आक्सिजन खाजगी डॉ.अभिजित गिरे यांनी लावला : सोमीनाथ सखाराम जगदाळे( मयताचा मुलगा)
– आम्ही सायं.७ वा. जिल्हा रुग्णालय येथे पोहोचलो, अडमिट करावयाचे आहे महणालो तर त्यांनी गेट उघडलेच नाही. आणि परिचारिकेने डॉ. हजर नाहीत, असे सांगितले. रूग्णाला श्वास घ्यायला त्रास होत होता.त्यानंतर खाजगी डॉ.अभिजित गिरे यांनी आक्सिजन लावले. त्यानंतर परीचारीकेने इंजेक्शन व ४ गोळ्या दिल्या.मात्र सरकारी डॉ.आलेच नाहीत. दुस-या दिवशी सुद्धा सायंकाळी ४ वाजेपर्यंत डॉ.आलेच नाहीत.
बंकट सखाराम जगदाळे : रुग्णाचा स्वॅब तपासणीसाठी घेतलाच नाही, मेल्यानंतर स्वाब घेऊन निगेटिव्ह रिपोर्ट दिला
– दुस-या दिवशी कोणीही तपासणीसाठी अथवा स्वाब घेण्यासाठी आले नाहीत म्हणुन डॉ.देशमुख यांना तपासणी करण्याची विनंती केली परंतु त्यांनी तपासणीसाठी नाकारत, रिपोर्ट आल्यावर तपासणी करु, त्याशिवाय काहीच करणार नाही असे सांगितले. स्वाब तपासणीसाठी पाठवा म्हणल्यावर माझ्यावरच रागावले. ईकडे यायचं नाही,जागेवरच बसायचं म्हणाले. त्यांनी स्वाब घेतलाच नाही,त्यांचा त्रास वाढत गेला तरी कोणीही लक्ष दिले नाही.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी रास्ता रोको आंदोलन : डॉ.गणेश ढवळे
श्री सखाराम श्रीहरी जगदाळे यांच्या प्रमाणेच यापुर्वीही विद्युत पुरवठा खंडित झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाला होता तर दुसरा आक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाला,तर आष्टी येथील रूग्णाचा मृत्यू जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सुविधे अभावी झाला होता.आणि त्याविरोधात त्यांच्या मुलाने लेखी तक्रार पोलीस अधीक्षक यांना केली होती.आरोग्य विभागाकडुन आलेल्या ३३ कोटी खरेदी मध्ये अपहार तसेच कोव्हीड जिल्हा रुग्णालयात अस्वच्छता आदिमुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे.जिल्हा रुग्णालयातील असुविधा, वाढते मृत्युचे प्रमाण यासह ईतर असुविधा विषयी वारंवार तक्रारी करूनही कारवाई न करणाच्या निषेधार्थ मयत सखाराम जगदाळे यांचे दोन्ही मुले नातेवाईकासह रास्ता रोको आंदोलन डॉ.गणेश ढवळें लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली करणार आहेत.
मुलगा सोमीनाथ सखाराम जगदाळे, बंकट सखाराम जगदाळे व भाऊ रमेश श्रीहरी जगदाळे आदिंची मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड गृहमंत्री, आयुक्त आरोग्य सेवा संचालनालय, यांना जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक बीड, डॉ.एकनाथ माले, उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ लातुर यांच्यातर्फे लेखी तक्रार, करण्यात आली आहे.