पशुसंवर्धन पदविका धारकांना शासनाने नोंदणीकृत करून स्वतंत्र पशुवैद्यकीय व्यवसायास परवानगी द्यावी !

बीड दि.०४ ऑगस्ट २०२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत करून त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून वाड्या-वस्त्यांवर पशुसेवा अगदी कमी वेळात पोहचेल व गाई-म्हशीचे प्राण वाचेल.शासन दुधाचा महापूर आणण्यासाठी प्रयत्न करते योजना आखते परंतु त्यात मोलाचा वाटा असणारे पशुसंवर्धन पदविकाधारकांच्या नोंदणीच्या वेळी मात्र काणाडोळा करते.असे न करता शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून प्रथमतः पशुसंवर्धन पदविका धारकांना कायदेशीर पशुवैद्यक म्हणून घोषित करावे व त्यांची नोंदणी करून त्यांना नोंदणीक्रमांक द्यावा अशी मागणी जोर धरून आहे. १९८४ च्या कायद्यात बदल करावा, पशुसंवर्धन पदवीकाधारकांना व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे मात्र शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसून कृषीप्रधान देशातच पशूंकडे शासनाचे लक्ष नसल्याचे समोर येत आहे.

पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ कलमाअंतर्गत व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीमधून पशुसंवर्धन पदवीधारकांच्या राज्यव्यापी परिषदेची नियुक्ती करून स्वतंत्ररीत्या औषधे बाळगणे व नोंदणीकृत व्यवसाय परवाना उपलब्ध करून द्यावा.राज्यातील रिक्त पशुधन पर्यवेक्षक पदांची तत्काळ भरती करण्यात यावी.खासगीरीत्या असंघटित क्षेत्रात भारतीय पशुचिकित्सक परिषद कायद्यान्वये किरकोळ व प्राथमिक स्वरूपाच्या पशुवैद्यकीय उपचार सेवा पदवीधारक डॉक्‍टरच्या सुपरव्हिजन व माध्यमांचा वापर करून आपले कार्य पार पाडतात अशा सर्व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीप्रमाणपत्र व ओळखपत्र देऊन पशुसेवेचे कार्य सुरू ठेवण्यासाठी बळ द्यावे.

बीड जिल्ह्यात ३ ऑगस्ट रोजी ५६ जण कोरोना पॉझिटिव्ह ; पाटोदा तालुक्यातील अंमळनेरचा १ पॉझिटिव्ह

बीड दि.०३ ऑगस्ट:आठवडा विशेष टीम― आज (दि.०३ ऑगस्ट २०२०) रोजी सायंकाळी ०९.४५ वाजता आलेल्या कोविड-१९ चाचणी अहवालात बीड जिल्ह्यातील ५६ जण कोरोना संसर्ग पॉझिटिव्ह निघाले आहेत.आज एकूण ३४८ अहवाल प्राप्त झाले त्यापैकी २८४ जणांचे अहवाल निगेटिव्ह स्वरूपाचे आहेत.तसेच ०८ जणांचे अहवाल अनिर्णित स्वरूपात आहेत.

पाटोदा तालुक्यातील ०१ जण – ३७ वर्षीय पुरुष (रा.अंमळनेर ता.पाटोदा) पॉझिटिव्ह आहे. बीड तालुक्यातील ११ जण – ४९ वर्षीय पुरुष (रा पंडीत नगर ,ग्रामसेवक कॉलनी,नगररोड,बीड शहर) ८२ वर्षीय महिला (रा.राष्ट्रवादी भवन समोर,बीड शहर) १० वर्षीय महिला (रा.कृष्णमंदीर परिसर,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत) २० वर्षीय पुरुष (रा शाहशाह नगर,लेंडी रोड,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ४५ वर्षीय पुरुष (रा.कामखेडा ता.बीड पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत) ६९ वर्षीय महिला (रा.शहंशाह वली दरगाह रोड,बीड शहर) ३१ वर्षीय महिला (रा .सोमेश्वर नगर, बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत) ४० वर्षीय पुरुष (रा.तेलगाव नाका,बीड शहर ,पत्त्याबाबत खात्री करणे सुरु आहे) ५३ वर्षीय पुरुष (रा.चौसाळा ता.बीड) ६२ वर्षीय पुरुष (रा.पालवण ता बीड पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत) २५ वर्षीय पुरुष (रा.सम्राट चौक, शाहुनगर,बीड शहर). परळी तालुक्यातील १६ जण पॉझिटिव्ह आहेत– ३५ वर्षीय महिला (रा.लक्ष्मी मार्केट,परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत) ५८ बर्षीय महिला (रा. लक्ष्मी मार्केट, परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत) ४५ वर्षीय महिला (रा.प्रेमप्रज्ञा नगर,मोंढा मार्केट परळी शहर) १८ वर्षीय पुरुष (रा.गांधी मार्केट,परळी शहर) ३५ वर्षीय महिला (रा.पदमावती कॉलनी,परळी शहर) ३८ वर्षीय पुरुष (रा.लटपटे हॉस्पिटल जवळी ,परळी शहर) ३६ वर्षीय पुरुष (रा. पदमावती कॉलनी परळी शहर) ३२ वर्षीय महिला (रा.भिमवाडी ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत) २७ वर्षीय पुरुष (रा भिमवाडी ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत) ४० वर्षीय पुरुष (रा.कन्हेरवाडी ता.परळी) २६ वर्षीय पुरुष (रा.नाथनगर,परळी शहर) ३५ वर्षीय महिला (रा.धर्मापुरी ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) १७ वर्षीय महिला (रा धर्मापुरी ता .परळी पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत) २२ वर्षीय महिला (रा.विद्यानगर परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत) ४५ वर्षीय पुरुष (रा.स्वातीनगर,परळी शहर) ५० वर्षीय पुरुष (रा हमालवाडी ता.परळी). अंबाजोगाई तालुक्यातील ०७ जण पॉझिटिव्ह आहेत– ४५ वर्षीय पुरुष (रा.रमाई नगर,अंबाजोगाई शहर) ५१ वर्षीय पुरुष (रा.पारीजात कॉलनी,अंबाजोगाई शहर) ३४ वर्षीय पुरुष (रा.सावरकर चौक, मंगळवारपेठ,अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत) २५ वर्षीय महिला (रा.सदर बाजार, अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत) ०५ वर्षीय पुरुष (रा ,प्रशांतनगर,अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ०७ वर्षीय महिला (रा.प्रशांतनगर,अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत) ५३ वर्षीय पुरुष (रा मोदीशाळे जवळ,अंबाजोगाई शहर).केज तालुक्यातील ०६ जण पॉझिटिव्ह आहेत– ३९ वर्षीय पुरुष (रा ढाकेफळ ता.केज पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) २२ वर्षीय पुरुष (रा.आरणगाव ता.केज पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत) ३५ वर्षीय पुरुष ( रा .आनंदनगर,धारुर चौक,अंबाजोगाई रोड,केज शहर पॉझिटिव्ह रुग्णाच्या सहवासीत) ४८ वर्षीय पुरुष (रा.समर्थ मठ, देशपांडे गल्ली,केज शहर, पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत) ६२ वर्षीय पुरुष (रा.माधवनगर केज शहर) ६० वर्षीय पुरुष( रा गांजी (शेलगाव) ता केज.).धारूर तालुक्यातील ०५ जण पॉझिटिव्ह आहेत– ०३ वर्षीय पुरुष (रा.स्वाराज्य नगर,धारुर शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत) ३१ वर्षीय महिला (रा. स्वाराज्य नगर,धारुर शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत) ३० वर्षीय पुरुष (रा.मठ गल्ली ,कसबा,धारुर शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत) २१ वर्षीय पुरुष (रा घागरवाडा ता.धारुर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत) ७६ वर्षीय पुरुष (रा आर्यसमाज मंदीरच्या जवळ,काशीनाथ चौक).अशी बीड जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आलेल्या ५६ जणांची माहिती आहे.

बीड: शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे उगवणीबाबतच्या तक्रारी दाखल करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

बीड, दि.२९:आठवडा विशेष टीम― जिल्ह्यात खरीप हंगाम २०२० सुरु झाला असून सर्वत्र पेरणी योग्य पाऊस झाला आहे. या हंगामामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयबीनची पेरणी केलेली आहे परंतु सोयाबीन बियाणे उगवणीबाबत तक्रारी येत आहेत. तरी ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे उगवणी बाबत तक्रार असेल अशा सर्व शेतकऱ्यांनी त्यांची लेखी तक्रार संबंधित कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांचेमार्फत तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांचेकडे सादर करावी. सोबत आपल्या बिलाची साक्षांकित प्रत अर्जासोबत कार्यालयात जमा करावी. अशा प्राप्त तक्रारीवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल याची नोंद सर्व शेतकऱ्यानी घ्यावी. त्यामुळे कोणीही कायदा सुव्यवस्थेला बाधा येईल अशा प्रकारचे कृत्य करू नये. दोषी आढळलेल्या बियाणे कंपनी तसेच इतर दोषींवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्याना न्याय मिळेल यासाठी प्रयत्न करण्यात येईल. तरी अजूनही ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी घरचे सोयाबीन योग्य उगवण क्षमता तपासूनच व बीज प्रक्रिया करून पेरणी करावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,बीड यांनी केले आहे.


अधिकाऱ्यांना मॅनेज करून पीकविमा कंपनीने माजलगाव तालुक्याला पिकविम्यापासून वंचित ठेवले―अक्षय शिंदे

माजलगाव:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यासह माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पीकविमा कंपनीने अधिकाऱ्यांना मॅनेज करून कापूस अाणी तुरीच्या पिकविम्यापासून वंचित ठेवले असा आरोप शिवसंग्रामचे युवा नेते इंजि. अक्षय शिंदे यांनी केला आहे.
बीड जिल्ह्यासह माजलगाव तालुक्यात मागच्या वर्षी कापूस आणी तूर या पिकाची भरपूर प्रमाणात लागवड करून शेतकऱ्यांनी कापूस आणि तुर या पिकांचा पीकविमा भरलेला होता. अगदी जोमाने आलेलं पीक परतीच्या आवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातून गेले. यामुळे शेतकऱ्यांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले यामुळे शेतकऱ्यांना आशा होती की आपला नुकसान झालेल्या कापूस आणी तूर या पिकांचा पीकविमा मिळू शकतो पण पीकविमा कंपनीने फक्त तीळ या पिकाचा पीकविमा मंजूर करून जिल्ह्यासह माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस आणी तूर या पिकविम्यापसून वंचित ठेवले. यात अग्रिकल्चरल इन्शुरन्स कंपनीचे बीड जिल्हा प्रतिनिधी दराडे यांच्याकडे विचारणा केली असता उंबरठा उत्पन्न पेक्षा जास्त उत्पन्न आल्यामुळे पीकविमा मंजूर झाला नाही अशी उत्तरे पीकविमा कंपनीचे प्रतिनिधी देत आहेत. पण यात अग्रिकल्चरल इन्शुरन्स कंपनीने जिल्ह्यासह माजलगाव तालुक्यातील अधिकारी आणि पीकविमा कंपनीचे प्रतिनिधी यांना मॅनेज करून खोटे अवहाल देऊन माजलगाव तालुका पिकविम्यापासून वंचित ठेवला आहे. लवकरात लवकर मा. जिल्हाधिकारी साहेबांनी या प्रकरणाची चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा शिवसंग्राम संघटनेच्या वतीने अा.विनायकराव मेटे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसंग्रामचे युवा नेते इंजि.अक्षय शिंदे तसेच उत्तम बप्पा पवार, रामेश्वर गवळी, गोविंद शिंदे यांनी दिला आहे

बीड : आता धारूरमध्ये देखील कोरोना रुग्ण ,आज जिल्ह्यात १३ अहवाल पॉझिटिव्ह

बीड दि.२१:आठवडा विशेष टीम काल बुधवारी (दि.२०) रोजी पाठलिलेल्या संशयितांच्या स्वॅबपैकी प्रलंबित असलेल्या १३ जणांचे कोविड-१९ अहवाल पाॅझिटीव्ह आल्याने बीड जिल्ह्यातील जनतेला मोठा धक्का बसला आहे. आज आलेल्या अहवालात १२ कोरोनाग्रस्त माजलगाव तालुक्यातील असून १ जण धारूर तालुक्यातील आहे.

आजच्या कोविड-१९ चाचणी अहवालानुसार माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथील ११, सुर्डी येथील एक आणि धारूर तालुक्यातील कुंडी येथील एकास कोरोनाची लागण झाल्याचे आज निष्पन्न झाले आहे. हे सर्वजण मुंबईहून बीड जिल्ह्यात आले होते.आजच्या अहवाला नुसार धारूर तालुक्यात आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोरोग्रस्तांची संख्येचा विचार केला असता माजलगाव तालुका बीड जिल्ह्यातील हाॅटस्पाॅट केंद्र बनला आहे.

कोरोना कोव्हीड 19 – बीड जिल्हा अपडेट
दिनांक21/05/2020
विदेशातून आलेले – 124
होम क्वारंटाईन – 06
होम क्वांरटाईनमधून मुक्त – 118

परजिल्ह्यातून आलेले व होम क्वारंटाईन असलेले – 9399
इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन – 20

एकूण पाठविलेले स्वॅब – 719
एकूण निगेटिव्ह स्वॅब – 643
एकूण पॉझिटिव्ह स्वॅब – 37
आज पाठविलेले स्वॅब – 32
प्रलंबित रिपोर्ट – 32
Inconclusive sample_07
———
ऊसतोड मजूरांचे प्रवेश – 47136

कंटेन्मेंट झोन

1) इटकुर ता गेवराई येथील कंटेन्मेंट झोन मध्ये 07 गावांचा समावेश असून 1275 घरामधील 4740 नागरिकांचा सर्वे 14 टीम मार्फत करण्यात आला आहे.
2) हिवरा ता माजलगाव येथील कंटेन्मेंट झोन मध्ये 05 गावांचा समावेश असून 818 घरामधील 3397 नागरिकांचा सर्वे 7 टीम मार्फत करण्यात आला आहे.
3) पाटण सांगवी ता. आष्टी येथील कंटेन्मेंट झोन मध्ये05 गावांचा समावेश असून 1276 घरामधील 6271 नागरिकांचा सर्वे 13 टीम मार्फत करण्यात आला आहे.
4) कवडगावथडी ता. माजलगाव येथील कंटेन्मेंट झोन मध्ये 07 गावांचा समावेश असून 1076 घरांमधील 5096 नागरिकांचा सर्वे 07 टीम मार्फत करण्यात आला आहे.
5)चंदन सावरगाव ता कैज येथील कंटनमेंट झोन मध्ये 04 गावांचा समावेश असून 1349 घरामधील 8730 नागरिकांचा सर्वे 04 टीम मार्फत करण्यात आला आहे.
6) केळगाव ता केज येथील कंटेन्मेंट झोनमध्ये 05 गावाचा समावेश असून 1276 घरामधील 6835 नागरिकांचा सर्वे 05 टीम मार्फत करण्यात आला आहे.
7) मोमीनपुरा,बीड शहर,येथील कंटेन्मेंट झोनमध्ये 173 घरांमधील 1028 नागरिकांचा आरोग्य टीम मार्फत सर्वे करण्यात आला आहे
8)जयभवानी नगर ,बीड शहर 98 घरांमध्ये 455 नागरिकांचा आरोग्य टीम मार्फत सर्वे करण्यात आला आहे.
9) वडवणी शहर येथील कंटेन्मेंट झोन मध्ये 388 घरांमध्ये 2853 नागरिकांचा आरोग्य टीम मार्फत करण्यात आला आहे.
10) पाटोदा शहर येथील कंटेन्मेंट झोन मध्ये 2710 घरांमध्ये 19700 नागरिकांचा सर्वे 30 टीम मार्फत करण्यात आला आहे.
11) वहाली येथील कंटेन्मेंट झोन मध्ये 05 गावांचा समावेश असून 804 घरामध्ये 3560 नागरिकांचा सर्वे 08 टीम मार्फत करण्यात आला आहे.


#CoronaVirus: बीड जिल्ह्यात उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२

बीड,दि.२०:जिल्हा माहिती कार्यालय― बीड जिल्ह्यात गेवराई, माजलगाव,आष्टी पाठोपाठ बीड आणि केज तालुक्यातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १९ इतकी असून जिल्ह्यातून स्थलांतरित झालेले ६ व उपचारा दरम्यान मृत झालेली १ रुग्ण वगळता सध्या उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या एकूण १२ झाली आहे.

  • गेवराई-२
  • माजलगाव-३
  • आष्टी-७ ( १मृत, ६ स्थलांतरित )
  • बीड -५
  • केज-२

जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णापैकी आष्टी तालुक्यातील एका वृद्धेचा मृत्यू झाला व सहा जणांना पुण्याला हलविण्यात आले आहे.
उर्वरित रुग्णांवर जिल्हयात उपचार सुरु असून उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या एकूण १२ झाली आहे.


#CoronaVirus बीड: आणखी ८ जण कोविड-१९ पॉझिटीव्ह

बीड दि.१९:आठवडा विशेष टीम― आज मंगळवारी बीड जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या ६७ नमुन्यातील ८ व्यक्तीचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले आहेत. तसेच अन्य ३ व्यक्तींबाबत निष्कर्ष निघाला नसल्याची माहिती समोर येत आहे.आज पाठवलेल्या स्वॅब मध्ये केळगाव, चंदन सावरगाव ता. केज, इटकुर ता. गेवराई आणि बीड शहरातील स्वॅब नमुन्यांचा समावेश आहे.

एकूणच पाहता बीड जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे.ग्रामीण व शहरी भागातील लोकांनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे.मास्क घालूनच खूपच अत्यावश्यक असल्यास बाहेर पडावे.बाहेरजिल्ह्यातून तसेच कंटेन्मेंट झोन मधून आलेल्या व्यक्तींची माहिती तात्काळ प्रशासनाला द्यावी.

कंटेन्मेंट झोन मधील कुठे व किती घरांचा सर्व्हे करण्यात आला ?

  • इटकुर ता गेवराई येथील कंटेन्मेंट झोन मध्ये 07 गावांचा समावेश असून 1275 घरामधील 4740 नागरिकांचा सर्वे 14 टीम मार्फत करण्यात आला आहे.
  • हिवरा ता माजलगाव येथील कंटेन्मेंट झोन मध्ये 05 गावांचा समावेश असून 818 घरामधील 3397 नागरिकांचा सर्वे 7 टीम मार्फत करण्यात आला आहे.
  • पाटण सांगवी ता. आष्टी येथील कंटेन्मेंट झोन मध्ये05 गावांचा समावेश असून 1276 घरामधील 6271 नागरिकांचा सर्वे 13 टीम मार्फत करण्यात आला आहे.
  • कवडगावथडी ता. माजलगाव येथील कंटेन्मेंट झोन मध्ये 07 गावांचा समावेश असून 1076 घरांमधील 5096 नागरिकांचा सर्वे 07 टीम मार्फत करण्यात आला आहे.

बीड: कवडगांव थडी येथे 2 कोरोना विषाणू बाधित रुग्ण ; 3 km परिसरात कन्टेनमेंट झोन तर त्यापुढील 4 km परिसरात बफर झोन घोषित

बीड, दि.१८:आठवडा विशेष टीम― माजलगांव तालुक्यातील कवडगांवथडी येथे कोरोना विषाणूचे लागण (COVID-१९ Positive) झालेले २ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे बीड जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन पुढील प्रमाणे फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार माजलगांव तालुक्यातील कवडगांव थडी या गावापासून ३ कि.मी. परिसरातील ( कवडगांवथडी, शेलगांवथडी,रिधोरी, भगवाननगर, रामनगर, गव्हाणथडी व सुर्डी नजीक) हा परिसर कन्टेनमेंट झोन (Containment zone) म्हणून घोषित करण्यात येत आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

त्या पुढील ०४ कि.मी. परिसरातील माजलगांव तालुक्यातील वारोळा, टाकरवण, राजेगांव व गेवराई तालूक्यातील तपे निमगांव हि गांवे बफर झोन (Buffer zone ) म्हणून घोषित करण्यात येत आहेत.वरील सर्व गांवे व परिसर पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचारबंदी लागू करण्यात येत आहे.

जिल्ह्यात दिनांक ३१ में २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१)(३) लागू करण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश, सुधारणा आदेश या आदेशासह अंमलात राहतील.


#CoronaVirus बीड जिल्हा : कालचे दोन आणि आज ७ असे ९ जण जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह

बीड:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यातून आज पाठविण्यात आलेले व प्रलंबीत राहीलेले ७ स्वॅब पॉझिटीव्ह आले आहेत.अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी दिली आहे. काही वेळापुर्वीच बाकीचे २२ स्वॅब निगेटीव्ह आले होते. स्वॅब उशीरा येण्यामागे काहीतरी धाकधूक होतीच ती अखेर खरी ठरली. आता बीड जिल्ह्यात एकूण ९ जण पॉझिटीव्ह झाले आहेत.

पाहुण्यांचा वानवळा आज जे ७ पॉझिटीव्ह आढळून आले आहेत ते बीड जिल्ह्याचे रहीवाशी नाहीत. नगर जिल्ह्यातील पिंपळगाव खु. चे ते रहीवाशी आहेत. परंतु त्यांनी मुंबईहून येताना सुरक्षित जागी यायचे म्हणून सुनेचं माहेर असलेलं आष्टी तालुक्यातील सांगवी पठाण येथील पत्त्यावर पास मिळवला होता. १३ तारखेला त्यांनी जिल्ह्यात प्रवेश केला.जिल्ह्यात आल्यापासून ते शेतात वस्तीवर क्वारंटाईन होते. आशाप्रकारे बीड जिल्ह्याला पाहुण्यांकडून कोरोनाचा वानवळा मिळाल्याने बीडची कोरोनाग्रस्थ संख्या 9 वर जाऊन पोहोचली आहे. आज आढळलेल्या रुग्णात यात ६६, ६५, ४३, ३८, ३६, १०, ६ अशी त्यांचे वय असून पाच पुरूष व दोन महिलांचा समावेश आहे.एकंदरीत यात वरील माहितीनुसार १० व ६ वयाच्या दोन बालकांचाही समावेश असल्याने चिंता वाढली आहे.

मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव खुडा येथील रहिवासी असलेले हे सातजण १३ मे रोजी मुंबईहून निघाले होते. १४ मे रोजी ते आष्टी तालुक्यातील सांगवी पठाण या गावी नातेवाईकांकडे आले होते. त्यांच्यात कोविड-१९ सारखी लक्षणे दिसून येऊ लागल्याने त्यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे आज रविवारी त्यांचे स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. सायंकाळी आलेल्या अहवालात या सातही जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्ह्यात आणखी खळबळ उडाली आहे.

आजचे कोविड-१९ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बीड जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधक उपाययोजना सुरु केलेल्या आहेत.बीड जिल्हाला पुणे, मुंबई या मोठ्या लोकसंख्येच्या व कोरोना बधितांची संख्या जास्त असलेल्या शहरातून आलेल्या लोकांकडून मोठा धोका असल्याचे समोर येत आहे. आपल्या गावात ,वस्तीवर मुंबई, पुणे सह बाहेरजिल्ह्यातुन आलेल्या लोकांची माहिती प्रशासनानाला तात्काळ द्या.


#CoronaVirus बीड जिल्हा : कोरोनाचे दोन अहवाल पॉझिटिव्ह

बीड दि.१६:आठवडा विशेष टीम― कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात झपाट्याने वाढत असताना बीड जिल्ह्याने इतके दिवस कोरोना विरोधात लढविलेली खिंड अखेर पडली. मुंबई आणि पुण्याहून विना परवाना बीड जिल्ह्यात आलेल्या गेवराई आणि माजलगाव मधील प्रत्येकी एक अशा दोन व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे आता बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दोन वर गेली आहे. बीड जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. मागील महिन्यात सापडलेला रुग्ण नगर जिल्ह्याच्या जवळ असलेल्या आष्टी (जि.बीड) या तालुक्यातील होता. तसेच त्याच्यावर अहमदनगरमध्येच उपचार सुरु होते आता मात्र बीड जिल्ह्यातील गेवराई आणि माजलगाव या तालुक्यातील कोरोनाचा प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.गेवराई येथील रुग्ण पुण्याहून तर माजलगाव येथील रुग्ण मुंबईवरून विना परवाना बीड जिल्ह्यात दाखल झाल्याची माहिती आहे. या दोन रुग्णांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची पुष्टी बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी केली आहे.आता या दोघांच्याही संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्याची कारवाई आरोग्य विभागाकडून सुरु झाली आहे.यामुळे आता बीड जिल्ह्याला अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

विजेची तार तुटून बैल, म्हैस जागीच ठार

माजलगाव दि १७:आठवडा विशेष टीम― इरला येथे गोठ्यावर विजेची तार तुटून वाडल्याने गोठ्यातील बैल व म्हैस जागीच तडफडून मेल्याची घटना घडल्याने शेतकयांचे जवळ पास लाखाच्या वर आर्थिक नुकसान झाले आहे इरला येथील मनोहर राधाकिसन काठवडे हे शेतकरी राहतात काल दि १७ रोजी सकाळी अचानक त्यांच्या दारासमोरील गोठ्यावर विजेची तार तुटून पडली यात गोठ्यात बांधलेला बैल … Read more

#CoronaVirus बीड: बेफिकीर नागरिकांवर प्रशासनाची कृपा, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

बीड:आठवडा विशेष टीम― जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून वसूल केला मात्र माजलगाव नगरपरिषद व तहसील प्रशासन मात्र सरळ सरळ कानाडोळा करत असून कोरोना प्रभाव होण्यास अप्रत्यक्ष सहकार्य करत आहे त शहरात नागरिक जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करत असताना प्रशासन तोंडवर बोट ठेऊन असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करत आहेत . कोरोना व्हायरस ने जगभरात थैमान घातल्यामुळे केंद्र व राज्य … Read more

रस्त्यावर भांडण ,पोलीसांनी सगळ्यांवर केला गुन्हा दाखल ;पोलीसाची गाडी येताच भांडण करणारे रानावनात

माजलगाव:आठवडा विशेष टीम― किरकोळ कारणावरुन दोन गटात वाद सुरु झाला. रस्त्यावर येवून दोन्ही गटातील पंधरा ते वीस जण एकमेकांना शिवीगाळ करु लागले. याची माहिती पोलीसांना झाल्यानंतर त्यांनी गावात धाव घेतली. पोलीसाची गाडी पाहताच भांडण करणाऱ्यांना कुठे पळावे ते कळेना.पोलीसांनी अकरा जणांना पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. हा प्रकार बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील हिवरा येथे घडला. … Read more

रिक्षाचालक हवालदिल – रिक्षाचालकांना तातडीने आर्थिक मदत करा ;बीड जिल्हाधिकाऱ्यांकडे मदतीची मागणी

सीटू सलंग्न रिक्षाचालक मालक संघटना बीड:आठवडा विशेष टीम― रिक्षाचालकांची स्वत:च्या मालकीची रिक्षा असूनही त्यावर नियंत्रण ठेवणारया सरकारने आता रिक्षाचालकांच्या निर्वाहाची जबाबदारी घेऊन किमान कोरोना काळात तरी त्यांना मोफत धान्य व तातडीने १५००० रुपये आर्थिक मदत त्यांच्या खात्यात जमा करा, अशी मागणी सीटू सलन ऑटोरिक्षाचालक मालक संघटना लाल बावटाने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाला निवेदनाद्वारे केली आहे. … Read more

सांडपाण्याच्या घाणीला राष्ट्रीय महामार्ग वैतागला रस्त्यावर पाणीच पाणी, कायम तोडगा काढण्याची नागरीकांची मागणी

माजलगाव:आठवडा विशेष टीम― शहरातुन खामगांव पंढरपुर राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे. शहरातील आझाद नगर मधील सर्व सांडपाणी या रस्त्याच्या कडेने व्यवस्थित काढुन न दिलयामुळे वारंवार सांडपाणी हे या रस्त्यावर येत असून आझादनगरच्या कॉर्नरला मोठया प्रमाणात हे पाणी जमा होत असल्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे तर दुसरीकडे हे पाणी रस्त्यावरुन बाहात असल्याने रस्त्याचे देखील नुकसान होत आहे … Read more

पंकजाताई मुंडे यांनी आणलेली ग्रामीण रस्त्याची १०८ कोटीची कामे रद्द ,हे तर बीडच्या पालकमंत्र्यांचे अपयश―राजेंद्र मस्के

बीड दि. ०२:आठवडा विशेष टीम― पंकजाताई मुंडे ग्रामविकास मंत्री असतांना त्यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत बीड जिल्हयासाठी मंजूर केलेली १०८ कोटीची ग्रामीण रस्त्यांची कामे रद्द करण्यात येत असल्याचा आदेश शासनाने काढला आहे. विद्यमान पालकमंत्र्यांचे हे अपयश असून स्वतःची खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी ते जिल्हयाला विकासा पासून वंचित ठेवण्याचे पाप करत आहेत अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र … Read more