पशुसंवर्धन पदविका धारकांना शासनाने नोंदणीकृत करून स्वतंत्र पशुवैद्यकीय व्यवसायास परवानगी द्यावी !

बीड दि.०४ ऑगस्ट २०२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत करून त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून वाड्या-वस्त्यांवर पशुसेवा अगदी कमी वेळात पोहचेल व गाई-म्हशीचे प्राण वाचेल.शासन दुधाचा महापूर आणण्यासाठी प्रयत्न करते योजना आखते परंतु त्यात मोलाचा वाटा असणारे पशुसंवर्धन पदविकाधारकांच्या नोंदणीच्या वेळी मात्र काणाडोळा करते.असे न करता शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून प्रथमतः पशुसंवर्धन पदविका धारकांना कायदेशीर पशुवैद्यक म्हणून घोषित करावे व त्यांची नोंदणी करून त्यांना नोंदणीक्रमांक द्यावा अशी मागणी जोर धरून आहे. १९८४ च्या कायद्यात बदल करावा, पशुसंवर्धन पदवीकाधारकांना व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे मात्र शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसून कृषीप्रधान देशातच पशूंकडे शासनाचे लक्ष नसल्याचे समोर येत आहे.

पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ कलमाअंतर्गत व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीमधून पशुसंवर्धन पदवीधारकांच्या राज्यव्यापी परिषदेची नियुक्ती करून स्वतंत्ररीत्या औषधे बाळगणे व नोंदणीकृत व्यवसाय परवाना उपलब्ध करून द्यावा.राज्यातील रिक्त पशुधन पर्यवेक्षक पदांची तत्काळ भरती करण्यात यावी.खासगीरीत्या असंघटित क्षेत्रात भारतीय पशुचिकित्सक परिषद कायद्यान्वये किरकोळ व प्राथमिक स्वरूपाच्या पशुवैद्यकीय उपचार सेवा पदवीधारक डॉक्‍टरच्या सुपरव्हिजन व माध्यमांचा वापर करून आपले कार्य पार पाडतात अशा सर्व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीप्रमाणपत्र व ओळखपत्र देऊन पशुसेवेचे कार्य सुरू ठेवण्यासाठी बळ द्यावे.

बीड: शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे उगवणीबाबतच्या तक्रारी दाखल करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

बीड, दि.२९:आठवडा विशेष टीम― जिल्ह्यात खरीप हंगाम २०२० सुरु झाला असून सर्वत्र पेरणी योग्य पाऊस झाला आहे. या हंगामामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयबीनची पेरणी केलेली आहे परंतु सोयाबीन बियाणे उगवणीबाबत तक्रारी येत आहेत. तरी ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे उगवणी बाबत तक्रार असेल अशा सर्व शेतकऱ्यांनी त्यांची लेखी तक्रार संबंधित कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांचेमार्फत तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांचेकडे सादर करावी. सोबत आपल्या बिलाची साक्षांकित प्रत अर्जासोबत कार्यालयात जमा करावी. अशा प्राप्त तक्रारीवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल याची नोंद सर्व शेतकऱ्यानी घ्यावी. त्यामुळे कोणीही कायदा सुव्यवस्थेला बाधा येईल अशा प्रकारचे कृत्य करू नये. दोषी आढळलेल्या बियाणे कंपनी तसेच इतर दोषींवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्याना न्याय मिळेल यासाठी प्रयत्न करण्यात येईल. तरी अजूनही ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी घरचे सोयाबीन योग्य उगवण क्षमता तपासूनच व बीज प्रक्रिया करून पेरणी करावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,बीड यांनी केले आहे.


#Coronavirus बीड: परजिल्ह्यातून आलेल्यांना वडवणी तालुक्यातील मजुरांना मिळाला निवारा

बीड:आठवडा विशेष टीम― कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी किंबहुना प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार बीड जिल्हा प्रशासन कार्यरत आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांची टीम विविध विभागांच्या अधिकारी, … Read more