पशुसंवर्धन पदविका धारकांना शासनाने नोंदणीकृत करून स्वतंत्र पशुवैद्यकीय व्यवसायास परवानगी द्यावी !

बीड दि.०४ ऑगस्ट २०२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत करून त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून वाड्या-वस्त्यांवर पशुसेवा अगदी कमी वेळात पोहचेल व गाई-म्हशीचे प्राण वाचेल.शासन दुधाचा महापूर आणण्यासाठी प्रयत्न करते योजना आखते परंतु त्यात मोलाचा वाटा असणारे पशुसंवर्धन पदविकाधारकांच्या नोंदणीच्या वेळी मात्र काणाडोळा करते.असे न करता शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून प्रथमतः पशुसंवर्धन पदविका धारकांना कायदेशीर पशुवैद्यक म्हणून घोषित करावे व त्यांची नोंदणी करून त्यांना नोंदणीक्रमांक द्यावा अशी मागणी जोर धरून आहे. १९८४ च्या कायद्यात बदल करावा, पशुसंवर्धन पदवीकाधारकांना व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे मात्र शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसून कृषीप्रधान देशातच पशूंकडे शासनाचे लक्ष नसल्याचे समोर येत आहे.

पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ कलमाअंतर्गत व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीमधून पशुसंवर्धन पदवीधारकांच्या राज्यव्यापी परिषदेची नियुक्ती करून स्वतंत्ररीत्या औषधे बाळगणे व नोंदणीकृत व्यवसाय परवाना उपलब्ध करून द्यावा.राज्यातील रिक्त पशुधन पर्यवेक्षक पदांची तत्काळ भरती करण्यात यावी.खासगीरीत्या असंघटित क्षेत्रात भारतीय पशुचिकित्सक परिषद कायद्यान्वये किरकोळ व प्राथमिक स्वरूपाच्या पशुवैद्यकीय उपचार सेवा पदवीधारक डॉक्‍टरच्या सुपरव्हिजन व माध्यमांचा वापर करून आपले कार्य पार पाडतात अशा सर्व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीप्रमाणपत्र व ओळखपत्र देऊन पशुसेवेचे कार्य सुरू ठेवण्यासाठी बळ द्यावे.

देवस्थान व इनामी क्षेत्र धारक शासकीय मदतीपासून वंचित; लढा उभारणार – समीर शेख (राजुभाई)

बीड:आठवडा विशेष टीम― देवस्थान आणि इनामी जमिनीचे क्षेत्र धारक शासकीय मदतीपासून वंचित आहेत. यापैकी शेती कसणाऱ्यांना इतर शेतकऱ्यांसारख्या सोयी सवलती का मिळत नाही ? असा प्रश्न जाटनांदुर शिरुरतील शेख समीर राजूभाई यांनी दिलेल्या पत्रकातून उपस्थित केला असून वर्षानुवर्षांपासून इनामी आणि जहागीरी च्या जमिनी कसणाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळविण्यासाठी आपण लवकरच लढा उभारणार असल्याचे म्हटले आहे.
दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, जिल्ह्यात हजारो एकर शेतजमीन देवस्थान व इनामी क्षेत्र आहे. मात्र संबंधित शेत्र धारक कुठल्याही शासकीय मदती शिवाय या जमीनी कसत आहे. इतर शेतकऱ्यांना शेतीवर कर्ज, सोसायटी, कृषी विभागाकडून देण्यात येणारे फळबागा असे काही ना काही लाभ मिळत आहे. मात्र इनामी आणि जागिरीच्या जमिनीवरील शेतात घेतलेल्या पिकांना साधा पिक विमा दिला जात नाही. काही देवस्थान व इनामी क्षेत्राचे रजिस्ट्रेशन व कमेटी असलेल्यांना 2019 पर्यत पिक विमा दिला गेला, मात्र 2020 खरीप हंगाम पिक विमा योजनेपासून वंचित का ठेवले गेले ? हे समजले पाहिजे.
याकडे पालकमंत्री, खासदार, अामदार यांनी लक्ष घालुन देवस्थान व इनामी क्षेत्र धारकांना न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी करून मोतीसहाब ट्रस्ट कमेटी जाटनांदुर ता. शिरुरचे अध्यक्ष समीर शेख (राजुभाई) यांनी याविषयी इनामी व जागिरी च्या जमिनी कसणाऱ्यांवर होत असलेला अन्याय दूर करून न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच लढा उभारणार असल्याचे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.


पिंपळनेर जि.प गटातील शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळेना ,मंगळवारी बँकेच्या दारात घंटानाद आंदोलन ― रामदास बडे

शिरूर:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यातील शिरूरकासार तालुक्यातील पिंपळनेर जि. प च्या अनेक गावांमध्ये भारतीय स्टेट बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँक या दोन शिरूरच्या शाखेंनी शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ केल्याने शेतकरी राजा
संतापला असुन कर्ज मिळण्यासाठी दि.15सप्टेंबर मंगळवार रोजी दोन्ही बँकेच्या दारात घंटानाद आंदोलन होणार असल्याची माहिती जि प सदस्य
रामदास बडे यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिली आहे.

या बाबत मिळालेली माहिती अशी की,शिरूरकासार तालुक्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये बँकेचे अधिकारी कर्जाबाबतीत हिटलर सारखे वागत आहेत.कर्जाची मागणी केली तर कुत्र्यासारखे धावतात त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीला शेतकरी वैतागला आहे. पिंपळनेर जिल्हा परिषद गटातील अनेक गावांमध्ये शिरूरकासार च्या स्टेट बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँक या दोन्ही शाखेच्या कर्मचारी यांनी अनेक कर्ज मागणीसाठी शेतकरी गेले असता हकलुच लावले त्यामुळे शेतकरी राजा संतापला असुन कर्जासाठी नाविलाजास्तव घंटानाद आंदोलन करित आहे. दि.१५ सप्टेंबर, मंगळवार रोजी दोन्ही बँकेच्या दारात घंटानाद आंदोलन होणार असून
तिव्र स्वरूपाचे असणार असल्याचेही पिंपळनेर जि प गटाचे सदस्य तथा पंकजाताई समर्थक रामदास बडे यांनी तहसीलदार श्रीराम बेंडे यांच्या कडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

शासनाने हमी भाव खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे – भाजपा नेते अजय धोंडे

आष्टी:आठवडा विशेष टीम― यंदा पावसाळ्याच्या प्रारंभीच चांगला पाऊस झाल्याने मुग , उडीदाचे पिक चांगले आले आहे परंतु व्यापारीवर्ग शेतकऱ्यांकडून कमी किमतीत उडीद ,मुगाची खरेदी करुन शेतकऱ्यांची अर्थिक लुट करीत आहेत.शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या उडीद, मूग आणि नंतर येणाऱ्या तुरीला शासनाचा हमी भाव मिळावा यासाठी शासनाने हमी भाव खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजयदादा भीमराव धोंडे यांनी केली आहे.

प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सध्या शेतकरी कडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उडीद , मूग विक्रीसाठी आणत आहेत परंतु व्यापारी वर्गाकडून हमी भावापेक्षा एक हजारांहुन अधिक कमी भावाने शेतकऱ्यांकडून खरेदी करीत आहेत.शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे.शासनाने फेडरेशनसाठी अद्यापपर्यंत परवानगी दिलेली नाही. ही परवानगी तात्काळ देऊन फेडरेशन सुरू करावे.अनेक व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे अशा अनेक तक्रारी आहेत.शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याला माल विकल्यावर त्याची रीतसर पावती घ्यावी.कृषि उत्पन्न बाजार समिती आवारातील जे व्यापारी शेतकऱ्यांचा कमी भावात माल घेत असतील असे निदर्शनात आल्यास संबंधित व्यापाऱ्यावर दंडात्मक कारवाई करावी अशीही मागणी अजयदादा धोंडे यांनी निवेदनाव्दारे केली आहे

बीड जिल्ह्यात ४४ जण कोरोना पॉझिटिव्ह ; २२ जुलैच्या अहवालात बीड तालुक्यातील सर्वात जास्त रुग्ण

बीड दि.२२ जुलै:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यात आज प्रशासनाने दिलेल्या अहवालात ४४ जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.सर्वात जास्त रुग्ण बीड तालुक्यातील आहेत.पाटोदा व शिरूर तालुक्यातील रुग्णांचा देखील समावेश आहे.बीड जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढतच चालली आहे.सर्वांनी सोशल डिस्टन्स चे पालन करणे तसेच मास्क वापरून प्रशासनाला व स्वतःच्या आरोग्य व्यवस्थित राहावे यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे.

आ.सुरेश धसांचे तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकांसमोर शेतकर्‍यांच्या पिककर्जासाठी संबुळ आंदोलन

आष्टी दि.१३:आठवडा विशेष टीम― शेतकर्‍यांना पिक कर्ज मिळालच पाहिजे, अशा घोषणा देत भाजपा नेते तथा आमदार सुरेश धस यांनी आज सकाळी बैलगाडीतून एसबीआय बँकेत जात घोषणाबाजी करत संबुळवादन आंदोलन केले. यावेळी शेतकरी उपस्थित होते.
राष्ट्रीयकृत बँका शेतकर्‍यांची थट्टा करत असल्याचा आरोप करत बँक अधिकारी शेतकर्‍यांची हेळसांड करत असल्याच्या निषेधार्थ सुरेश धसांचे हे संबुळ आंदोलन आज पार पडले.याबबत अधिक असे की, गेल्या दोन दिवसांपूर्वी आ. सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रीयकृत बँकांना शेतकर्‍यांना कर्ज देण्याची मानसिकता नाही. त्यामुळे ज्या बँकांनी पीक कर्जाचे अर्ज स्वीकारलेले आहे.परंतु शेतकर्‍यांना कर्ज दिले नाही, अशा सर्व बँकांसमोर संबुळ आंदोलन करणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार आज आ. सुरेश धसांनी आष्टी येथील एसबीआयच्या बँकेसमोर जाऊन आंदोलन केले. बैलगाडीतून संबुळ वाजवत सुरेश धसांचा काफिला बँकेवर जावून धडकला. दुधाला 10 रुपयांप्रमाणे अनुदान मिळाले पाहिजे, अतिव्रष्टीत फळबागा वाल्यांचे झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ द्या, राजगृहावर तोडफोड करणार्‍या माथेफिरूवर कडक कारवाई करा,अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत मंजूर झालेले कर्ज प्रकरण तात्काळ वाटप करा.यासह आदी मागण्यांसाठी सुरेश धसांनी बँकेसमोर संबुळ आंदोलन केले.शेतकर्‍यांना पीक कर्ज मिळालेच पाहिजे या घोषणांनी धसांनी परिसर दणाणून सोडलं. आष्टी,कडा कृषी कार्यालय, जळगाव,दौलावडगाव, धामनगाव, पिंपळा आदी ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकांसमोर संबुळ आंदोलन झाले.

बीड जिल्ह्यात आज ९ कोरोना संक्रमित रुग्ण आढळले

बीड जिल्हा कोरोना अपडेट

बीड दि.०४:आठवडा विशेष टीम―आज जिल्ह्यातुन २५१ स्वॅब कोविड-१९ RT-PCR चाचणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी ९ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.तर २४२ जणांचे अहवाल निगेटिव्ह स्वरूपाचे आले आहेत.

आजच्या अहवालात बागझरी तालुका अंबाजोगाई येथील ६५ वर्षीय महिला ,राळेसांगवी तालुका शिरूर येथील ४५ वर्षीय पुरुष ,बीड शहरातील २ महिला व अन्य परळीच्या ५ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

परळी शहरातील टॉवर परिसरात असलेल्या एसबीआय बँकेच्या शाखेतील सहा जणांना काल अस्वस्थ वाटत असल्याने त्यांच्या स्वॅबचे नमुने आरोग्य प्रशासनाने घेऊन अंबाजोगाई येथील कोविड-१९ सेंटरला पाठवण्यात आले होते त्याचा अहवाल आता नुकताच प्राप्त झाला असून ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. एसबीआय बँकेची शाखा तालुक्यातील एक मोठी व्यवहार असणारी बँक आहे. यामुळे कर्मचाऱ्या पासून अनेक लोकांचा संपर्क आल्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे ह्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांकडून अजून किती लोकांना संसर्ग झाला असेल हे आरोग्य प्रशासनापुढे मोठे आव्हान असणार आहे.

आज दि.०४ जुलै २०२० रोजीच्या अहवालातील सविस्तर माहिती―

  • 5 -परळी – 28 वर्षीय पुरुष,32 वर्षीय पुरुष,29 वर्षीय पुरुष,35 वर्षीय पुरुष,55 वर्षीय पुरुष
  • 1 -राळेसांगवी ता शिरूर- 45 वर्षीय पुरुष (भिवंडीहुन आलेले)
  • 1-अजीज पुरा ,बीड- 40 वर्षीय महिला
  • 1-डीपी रोड,बीड- 45 वर्षीय महिला
  • 1- बागझरी ता अंबाजोगाई-65 वर्षीय महिला (पुण्याहून आलेले)

बीड: शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे उगवणीबाबतच्या तक्रारी दाखल करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

बीड, दि.२९:आठवडा विशेष टीम― जिल्ह्यात खरीप हंगाम २०२० सुरु झाला असून सर्वत्र पेरणी योग्य पाऊस झाला आहे. या हंगामामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयबीनची पेरणी केलेली आहे परंतु सोयाबीन बियाणे उगवणीबाबत तक्रारी येत आहेत. तरी ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे उगवणी बाबत तक्रार असेल अशा सर्व शेतकऱ्यांनी त्यांची लेखी तक्रार संबंधित कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांचेमार्फत तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांचेकडे सादर करावी. सोबत आपल्या बिलाची साक्षांकित प्रत अर्जासोबत कार्यालयात जमा करावी. अशा प्राप्त तक्रारीवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल याची नोंद सर्व शेतकऱ्यानी घ्यावी. त्यामुळे कोणीही कायदा सुव्यवस्थेला बाधा येईल अशा प्रकारचे कृत्य करू नये. दोषी आढळलेल्या बियाणे कंपनी तसेच इतर दोषींवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्याना न्याय मिळेल यासाठी प्रयत्न करण्यात येईल. तरी अजूनही ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी घरचे सोयाबीन योग्य उगवण क्षमता तपासूनच व बीज प्रक्रिया करून पेरणी करावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,बीड यांनी केले आहे.


जलकुंभा जवळील अतिक्रमणे हटवुन नवीन जलकुंभाची निर्मिती करणार― आ.सुरेश धस

शिरुर कासार:आठवडा विषेश टीम― शहराला अविरतपणे पाणीपुरवठा करत असलेला आणि जवळपास चाळीस वर्षापूर्वी तयार करण्यात आलेला जलकुंभ अखेरच्या घटका मोजत असून त्याचा स्लॅप पूर्णपणे कुचकामी झाला असं कधी कोसळेल सांगता येणार नसल्याने नविन जलकुंभाची निर्मिती करणार असल्याचे आमदार सुरेश धस यांनी सांगितले आहे. शिवाय जलकुंभाजवळील अतिक्रमणे तात्काळ हटवून त्या ठिकाणी व्यापाऱ्यांसाठी अद्ययावत स्वरूपाचे शॉपिंग कॉम्प्लेक्स तयार होणार असून या कॉम्प्लेक्समुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे.तत्कालीन सरपंच कांतीलाल देसारडा यांच्या काळात जवळपास चाळीस वर्षापूर्वी गावाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अंशी हजार लिटर साठवण क्षमतेचा जलकुंभ तयार करण्यात आला होता.आजघडीला गावाचे रूपांतर शहरात झाले असून तेरा हजार लोकसंख्येला सदरील जलकुंभाचा आजही आधार असलेला दिसत आहे.नव्याने तयार करण्यात येणाऱ्या जलकुंभाची पाणी क्षमता दोन लक्ष लिटर असून या जलकुंभामुळे शहरवासीयांचा पाणीप्रश्न कायमचा मिटण्यास मदत होणार आहे.

जलकुंभाचे आयुष्य संपले!

चाळीस वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या जलकुंभाचे आयुष्य संपले आहे.आजघडीला हा जलकुंभ शेवटच्या घटका मोजत असून ठिकठिकाणी तडे गेले आहेत.शिवाय टाकीमध्ये वापरलेले गज,लोखंड पूर्णपणे गंजून उघडे पडले आहे.सदरील जलकुंभ कधीही खाली येऊ शकतो त्यामुळे हा जलकुंभ जमीनदोस्त करून नवीन जलकुंभ प्रस्तावित करण्यात आला आहे.

अद्ययावत शॉपिंग कॉम्प्लेक्सची उभारणी

जलकुंभ परिसरात असलेली अतिक्रमणे हटवून व्यापारी लोकांसाठी नव्याने शॉपिंग कॉम्प्लेक्स तयार करण्यात येणार आहे.सदरील काम बीओटी तत्वावर होणार असून या कॉम्प्लेक्समुळे शहराच्या वैभवात भर पडणार असल्याचे उपनगराध्यक्ष प्रकाश देसारडा यांनी सांगितले आहे.

#CoronaVirus घाबरू नका परंतु काळजी घ्या,आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातील नागरिकांना आ.बाळासाहेब आजबे यांचे आवाहन

पाटोदा दि.१८:गणेश शेवाळे बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघात सात रुग्ण कोविड१९ पॉझीटिव्ह आढळले आहेत. विशेष म्हणजे सात ही रुग्ण बाहेर जिल्हातून आपल्या भागात आले आहेत या आधी बीड जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नसतांना परवा गेवराई (एक) व माजलगाव (एक) असे दोन तर आष्टी तालुक्यात आज सात रुग्ण आढळल्याने साहाजिकच लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
आपल्या भागातील असंख्य लोक औरंगाबाद, पुणे, मुंबई यासारख्या अनेक ठिकाणी नौकरी – व्यवसाय, उपजीविकेसाठी वास्तव्यास आहेत. गेली बरेच दिवस लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झाले असल्याने बाहेरील लोक जस जमेल तस आपल्या घरी, गावी येण्यासाठी प्रयत्न करतात.बीड जिल्हा प्रशासन दक्ष आणि सतर्क आहे, परंतु काही लोक गैरमार्गाने प्रवेश करत आहेत. यामुळे असे प्रकार घडत आहेत यापार्श्वभूमीवर आष्टी पाटोदा शिरूर चे आमदार बाळासाहेब आजबे यांनी आवाहन केले आहे की आपल्या बाहेरगावी नातेवाईकांना, हितसंबंधीत लोकांना आवर्जून सांगा कोणीही अनधिकृतरित्या जिल्ह्यामध्ये प्रवेश करू नये किंवा कोणी प्रवेश करत असताना तुम्ही देखील कोणाला मदत करू नये आणि असं कोणी आढळले तर ग्रामस्थांनी तात्काळ ग्रामसेवक, तहसीलदार किंवा जिल्हा प्रशासनाशी संपर्क करावा. याऊपर काही अडचण आल्या तर तात्काळ मला संपर्क करा व आपल्या मतदारसंघात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास सहकार्य करा. मतदारसंघातील नागरिकांनी कोरोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी घरी रहा सुरक्षित रहा व घाबरू नका परंतु काळजी घ्या.आता आपली जबाबदारी आधिक वाढली आहे. असे आवाहन आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बाळासाहेब आजबे यांनी केले आहे.

बीड : गोमळवाड्यात परजिल्ह्यातून  आलेल्या नागरिकांची तपासणी

शिरूर:आठवडा विशेष टीम― कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील गोमळ वाडा ग्रामपंचायत पुढे सरसावली असून मुंबई, पुणे आणि इतर जिल्ह्यातून गावात आलेल्या सुमारे ३०० नागरिकांची आरोग्य तपासणी केली आहेगावात औषधांची फवारणी करून परिसरचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गोमळवाडा ग्रामपंचायत विविध उपक्रम राबवत आहेकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या पूर्वी त्यांनी गावात येणारे सर्व रस्ते पत्रे, … Read more

सर्पराज्ञीत ऐश्वर्या माकडावर यशस्वी शस्त्रक्रिया ;निकामी झालेला हात काढून टाकला

शिरूर:आठवडा विशेष टीम― विद्युत तारेचा शॉक लागून उजवा हात निकामी झालेल्या ऐश्वर्या (नामकरण) माकडावर सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात निकामी झालेल्या हात काढून टाकण्याची शझाक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. काल जिल्हा पशुधन आयुक्त डॉक्टर रविकुमार सुरेवाड व पशुधन विकास अधिकारी डॉ. विजय चौरे यांना या कामी यश आले आहे. सध्या ऐश्वर्याच्या तब्बेतीत सुधारणा हात असल्याची माहिती सर्पराज्ञीच्या … Read more

सर्वसामान्यासह पोलिसाचीही काळजी घेणारा आमदार ; आ.सुरेश अण्णा धस यांच्याकडून पोलिस कर्मचाऱ्यांना गॉगल वाटप

आष्टी:आठवडा विशेष टीम― अगदी सुरूवातीपासुन आ.सुरेश धस हे रस्त्यावर दिसत आहेतलॉकडाऊन सुरू झाल्यापासुन जिल्ह्यातले एकमेव आमदार लोकांसाठी धडपड करत आहेतमतदारसंघातील विविध गावांमध्ये कर्मचारी, व्यवसायीकदुध उत्पादक, शेतकऱ्यांना मास्क वाटप करण्यापासुन ते पोलिस कर्मचाऱ्यांना सन गॉगल वाटप करण्यापर्यंत आ.सुरेश धस झटत आहेत. आष्टी येथील पोलिस ठाण्यात आ.सुरेश धस यांनी कर्तव्यावर असणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या डोळ्याच्या सुरक्षिततेसाठी चांगल्या दर्जाचे सन गॉगल्स् आज सकाळी वाटप केले आहेत. मतदारसंघातील सोलापुरवाडी, सुरडी यासह इतर गावांमध्ये व्यवसायीक, दुध उत्पादक शेतकरी आणि इतर कर्मचाऱ्यांनाही मास्कचे वाटप त्यांच्यावतीने करण्यात आले. सर्वसामान्यांसह पोलिसांचीही काळजी घेणारा आमदार म्हणुन सुरेश धस यांचे नाव घेतले जात आहे. उसतोड कामगारांसाठीही आ.सुरेश धस अर्ध्या रात्री धावून गेले होते.

पंकजाताई मुंडे यांनी आणलेली ग्रामीण रस्त्याची १०८ कोटीची कामे रद्द ,हे तर बीडच्या पालकमंत्र्यांचे अपयश―राजेंद्र मस्के

बीड दि. ०२:आठवडा विशेष टीम― पंकजाताई मुंडे ग्रामविकास मंत्री असतांना त्यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत बीड जिल्हयासाठी मंजूर केलेली १०८ कोटीची ग्रामीण रस्त्यांची कामे रद्द करण्यात येत असल्याचा आदेश शासनाने काढला आहे. विद्यमान पालकमंत्र्यांचे हे अपयश असून स्वतःची खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी ते जिल्हयाला विकासा पासून वंचित ठेवण्याचे पाप करत आहेत अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र … Read more

संपूर्ण देश लाॅकडाऊन असताना कारखान्यांनी कामगारांना वेठीस धरणे, हा कुठला न्याय? – ऊसतोड कामगारांना झालेल्या मारहाणीवर पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केली तीव्र नापसंती

ऊसतोड कामगारांविषयी सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा मुंबई दि.०२:आठवडा विशेष टीम― भिगवण व खेड येथे ऊसतोड कामगारांना झालेल्या मारहाणीवर पंकजाताई मुंडे यांनी तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली आहे. ऊसतोड कामगार हे रस्त्यावर विनाकारण फिरणारी मंडळी नाहीत, हे प्रशासनाने ध्यानात घ्यावे असे सांगत सरकारने ऊसतोड कामगारांच्या बाबतीत तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे केली आहे. … Read more

बीड: शासनाच्यावतीने विविध अनुदान शेतकरी नागरिकांच्या बँक खात्यांमध्ये जमा करणार –जिल्हाधिकारी राहुल रेखावार

रक्कम काढण्यासाठी संदेश प्राप्त झाल्यानंतर उद्यापासूनच्या तारखा करण्यात आल्या घोषित खातेदारास एसएमएस’द्वारे पैसे संबंधित खात्यात जमा झाल्याची दिली जाणार माहिती बीड:आठवडा विशेष टीम―शासनाच्या वतीने शेतकरी नागरिकांच्या खात्यांमध्ये विविध अनुदान जमा करण्यात येत असून एस एम एस संदेशाद्वारे खातेदारास याची माहिती कळविले जाईल. स्टेट बँकेच्या वतीने ही रक्कम काढण्यासाठी प्रत्येक खातेदारास साधारणता वेगवेगळी तारीख निश्चित करण्यात … Read more