पशुसंवर्धन पदविका धारकांना शासनाने नोंदणीकृत करून स्वतंत्र पशुवैद्यकीय व्यवसायास परवानगी द्यावी !

बीड दि.०४ ऑगस्ट २०२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत करून त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून वाड्या-वस्त्यांवर पशुसेवा अगदी कमी वेळात पोहचेल व गाई-म्हशीचे प्राण वाचेल.शासन दुधाचा महापूर आणण्यासाठी प्रयत्न करते योजना आखते परंतु त्यात मोलाचा वाटा असणारे पशुसंवर्धन पदविकाधारकांच्या नोंदणीच्या वेळी मात्र काणाडोळा करते.असे न करता शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून प्रथमतः पशुसंवर्धन पदविका धारकांना कायदेशीर पशुवैद्यक म्हणून घोषित करावे व त्यांची नोंदणी करून त्यांना नोंदणीक्रमांक द्यावा अशी मागणी जोर धरून आहे. १९८४ च्या कायद्यात बदल करावा, पशुसंवर्धन पदवीकाधारकांना व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे मात्र शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसून कृषीप्रधान देशातच पशूंकडे शासनाचे लक्ष नसल्याचे समोर येत आहे.

पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ कलमाअंतर्गत व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीमधून पशुसंवर्धन पदवीधारकांच्या राज्यव्यापी परिषदेची नियुक्ती करून स्वतंत्ररीत्या औषधे बाळगणे व नोंदणीकृत व्यवसाय परवाना उपलब्ध करून द्यावा.राज्यातील रिक्त पशुधन पर्यवेक्षक पदांची तत्काळ भरती करण्यात यावी.खासगीरीत्या असंघटित क्षेत्रात भारतीय पशुचिकित्सक परिषद कायद्यान्वये किरकोळ व प्राथमिक स्वरूपाच्या पशुवैद्यकीय उपचार सेवा पदवीधारक डॉक्‍टरच्या सुपरव्हिजन व माध्यमांचा वापर करून आपले कार्य पार पाडतात अशा सर्व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीप्रमाणपत्र व ओळखपत्र देऊन पशुसेवेचे कार्य सुरू ठेवण्यासाठी बळ द्यावे.

मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते डबेवाल्यांना अडीच हजार रेशन किटचे वितरण

मुंबई दि. ०८:आठवडा विशेष टीम― मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते सोमवारी डबेवाल्यांना २,५०० रेशन किटचे वितरण करण्यात आले.
मुंबई महानगरपालिकेच्या पी- उत्तर विभागाच्या कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुंबई डबेवाले संघटनेचे अध्यक्ष रमेश करोंदे, सहाय्यक प्रवक्ता विनोद शेटे , मेक अर्थ ग्रीन अगेन मेगा फाऊंडेशनच्या श्रीमती अनुशा श्रीनिवासन अय्यर व महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. शेख म्हणाले, डबेवाले हे मुंबईची दुसरी जीवनवाहिनी आहेत. डबेवाले १३० वर्षांपासून प्रामाणिकपणे व सचोटीने कार्यालयांमध्ये वेळेवर जेवणाचे डबे पोहोचविण्याचे काम करीत आहेत. लॉकडाऊन संपेपर्यंत डबेवाल्यांच्या रेशनची व्यवस्था करण्याची व डबेवाल्यांचे सर्व प्रश्न येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्याची ग्वाही श्री. शेख यांनी यावेळी दिली. तसेच चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या पुण्यातील डबेवाल्यांच्या घरांचे पंचनामे त्वरित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती श्री.अस्लम शेख यांनी दिली.

टाळेबंदीमुळे डबेवाल्यांसमोर उभं राहिलेलं आर्थिक संकट, भविष्यातील या व्यवसायाशी निगडित आव्हाने व प्रश्न आदींविषयी मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष रामदास करोंदे यांनी मंत्री श्री. शेख यांच्यासमोर मांडले. बांधकाम मजुरांना केल्या जाणाऱ्या मदतीच्या धर्तीवर डबेवाल्यांनाही दोन हजार रुपयांची मदत करण्याची व चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या पुणे जिल्ह्याचे मूळ निवासी असणाऱ्या डबेवाल्यांना त्वरित पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी संघटनेचे प्रवक्ते श्री. विनोद शेटे यांनी केली.

माणगाव MIDC मध्ये १ लाख कोटींची गुंतवणूक – हजारोंना मिळणार रोजगारांची संधी

मुंबई दि.०३:आठवडा विशेष टीम―दिल्ली-मुंबई- इंडस्ट्रिअल कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत दिघी औद्योगिक क्षेत्रासाठी अधिसूचित करण्यात आलेल्या क्षेत्रांपैकी ६ हजार हेक्टर क्षेत्रावर माणगाव एमआयडीसी स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे सुमारे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दक्षिण रायगड जिल्ह्यात डीएमआयसीसाठी एकूण १२,१४० हेक्टर क्षेत्र २०११ मध्ये अधिसूचित करण्यात आले. त्यापैकी ३२७७ हेक्टर क्षेत्राचा ताबा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास प्राप्त झाला आहे. शेतकऱ्यांनी संमती न दिलेली व वन विभागाच्या ताब्यातील क्षेत्रे यापूर्वीच वगळण्यात आलेली आहेत.

यापूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्रात डीएमआयसीअंतर्गंत उद्योगनगरी स्थापन केली आहे. परंतु केंद्र सरकारने मान्य केलेले सहाय्यक अनुदान प्राप्त न झाल्याने विकासाची गती काहीशी धीमी झाली. दरम्यान, रायगड जिल्ह्यात थेट परकीय गुंतवणुकीतून व देशांतर्गंत उद्योग समूहांकडून विशाल प्रकल्प उभारण्यासाठी भूखंडांची मागणी होत आहे. माणगाव तालुक्यात ३२७७ हेक्टर इतक्या क्षेत्राचा ताबा एमआयडीसीला प्राप्त झाला असून महामंडळ स्वतःच्या व खाजगी सहभागातून या क्षेत्रावर पायाभूत सुविधा निर्माण करू शकते. राज्याची स्वतःची क्षमता, गुंतवणुकदारांची मागणी व कोकणात रोजगार निर्मितीची निकड लक्षात घेऊन राज्य शासनाने या प्रस्तावास हिरवा कंदील दाखविला आहे, असे उद्योगमंत्री श्री. देसाई म्हणाले.

भूखंड मागणीसाठी दहा गुंतवणुकदारांनी एमआयडीसीकडे विचारणा व मागणी केली आहे. सदर चर्चा प्रगत अवस्थेत असल्यामुळे माणगाव एमआयडीसी स्थापन करण्याच्या विषयचा उद्योग विभागाने पाठपुरावा केला. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या प्रस्तावाची माहिती दिली व मंगळवारी मंत्रिमंडळाने सहा हजार हेक्टर क्षेत्रावर माणगाव एमआयडीसी स्थापन करण्यास मंजुरी दिली.

दरम्यान, नुकतेच देशातील प्रमुख औषध उत्पादकांना उद्योगमंत्र्यांनी वेबिनारच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले असता उद्योगपतींनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. परदेशी व देशातंर्गत गुंतवणुकीतून विशाल प्रकल्प उभे राहिल्यास फार मोठ्या संख्येने लघु व मध्यम उद्योगांचे जाळे या क्षेत्रावर विकसित होऊन सुमारे एक लाख कोटींची गुंतवणूक आकर्षित होईल, शिवाय हजारोंच्या संख्येने नोकऱ्या व अप्रत्यक्ष रोजगारास चालना मिळेल, असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

दरम्यान, राज्यात सध्या ५५ हजार उद्योग सुरू झाले असून त्यात साडेतेरा लाख कामगार रुजू झाले आहेत. येत्या काही दिवसांत इतर ठिकाणीचे उद्योग टप्प्याटप्प्याने सुरू केले जातील. त्याबाबतचा प्रस्ताव मुख्य सचिवांना पाठविण्यात येईल, असेही उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी स्पष्ट केले.

माणगाव MIDC मध्ये १ लाख कोटींची गुंतवणूक – हजारोंना मिळणार रोजगारांची संधी

मुंबई दि.०३:आठवडा विशेष टीम―दिल्ली-मुंबई- इंडस्ट्रिअल कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत दिघी औद्योगिक क्षेत्रासाठी अधिसूचित करण्यात आलेल्या क्षेत्रांपैकी ६ हजार हेक्टर क्षेत्रावर माणगाव एमआयडीसी स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे सुमारे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.दक्षिण रायगड जिल्ह्यात डीएमआयसीसाठी एकूण १२,१४० हेक्टर क्षेत्र २०११ मध्ये अधिसूचित करण्यात आले. त्यापैकी ३२७७ हेक्टर क्षेत्राचा ताबा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास प्राप्त झाला आहे. शेतकऱ्यांनी संमती न दिलेली व वन विभागाच्या ताब्यातील क्षेत्रे यापूर्वीच वगळण्यात आलेली आहेत.यापूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्रात डीएमआयसीअंतर्गंत उद्योगनगरी स्थापन केली आहे. परंतु केंद्र सरकारने मान्य केलेले सहाय्यक अनुदान प्राप्त न झाल्याने विकासाची गती काहीशी धीमी झाली. दरम्यान, रायगड जिल्ह्यात थेट परकीय गुंतवणुकीतून व देशांतर्गंत उद्योग समूहांकडून विशाल प्रकल्प उभारण्यासाठी भूखंडांची मागणी होत आहे. माणगाव तालुक्यात ३२७७ हेक्टर इतक्या क्षेत्राचा ताबा एमआयडीसीला प्राप्त झाला असून महामंडळ स्वतःच्या व खाजगी सहभागातून या क्षेत्रावर पायाभूत सुविधा निर्माण करू शकते. राज्याची स्वतःची क्षमता, गुंतवणुकदारांची मागणी व कोकणात रोजगार निर्मितीची निकड लक्षात घेऊन राज्य शासनाने या प्रस्तावास हिरवा कंदील दाखविला आहे, असे उद्योगमंत्री श्री. देसाई म्हणाले.भूखंड मागणीसाठी दहा गुंतवणुकदारांनी एमआयडीसीकडे विचारणा व मागणी केली आहे. सदर चर्चा प्रगत अवस्थेत असल्यामुळे माणगाव एमआयडीसी स्थापन करण्याच्या विषयचा उद्योग विभागाने पाठपुरावा केला. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या प्रस्तावाची माहिती दिली व मंगळवारी मंत्रिमंडळाने सहा हजार हेक्टर क्षेत्रावर माणगाव एमआयडीसी स्थापन करण्यास मंजुरी दिली.दरम्यान, नुकतेच देशातील प्रमुख औषध उत्पादकांना उद्योगमंत्र्यांनी वेबिनारच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले असता उद्योगपतींनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. परदेशी व देशातंर्गत गुंतवणुकीतून विशाल प्रकल्प उभे राहिल्यास फार मोठ्या संख्येने लघु व मध्यम उद्योगांचे जाळे या क्षेत्रावर विकसित होऊन सुमारे एक लाख कोटींची गुंतवणूक आकर्षित होईल, शिवाय हजारोंच्या संख्येने नोकऱ्या व अप्रत्यक्ष रोजगारास चालना मिळेल, असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.दरम्यान, राज्यात सध्या ५५ हजार उद्योग सुरू झाले असून त्यात साडेतेरा लाख कामगार रुजू झाले आहेत. येत्या काही दिवसांत इतर ठिकाणीचे उद्योग टप्प्याटप्प्याने सुरू केले जातील. त्याबाबतचा प्रस्ताव मुख्य सचिवांना पाठविण्यात येईल, असेही उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी स्पष्ट केले.

कोरोनाविरूद्धच्या लढ्यासाठी हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीकडून १० कोटी रूपयांहून अधिक किंमतीच्या वैद्यकीय संसाधनांची मदत

मुंबई दि.३:आठवडा विशेष टीम― कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्यात हिंदुस्थान युनिलिव्हर लि. कंपनीकडून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागाला १० कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या वैद्यकीय संसाधनांची मदत प्राप्त झाली आहे. २८ हजार ८०० टेस्टिंग किटसह, व्हेंटिलेटर्स, पीपीई किटस, मास्क, हातमोजे, पल्स ऑक्सीमिटर, आदी संसाधनांचा यात समावेश आहे. या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंपनीचे आभार मानले.
हिंदुस्थान युनिलिव्हर लि. कंपनीने राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागाला १० कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या वैद्यकीय संसाधनांची मदत केली असून यात ५.०४ कोटी रुपयांच्या २८ हजार ८०० टेस्टिंग किटस, तसेच ५ कोटी रुपये किंमतीचे व्हेंटिलेटर्स, पीपीई किटस, मास्क, हातमोजे, पल्स ऑक्सीमिटर, ऑक्सिजन सकेंद्रक (oxygen concentrators) यांचा समावेश असलेली वैद्यकीय संसाधने उपलब्ध करून दिली आहेत. कंपनीचे बिझिनेस ॲन्ड कम्युनिकेशन हेड श्री. प्रसाद प्रधान यांनी पत्र पाठवून ही माहिती कळवली आहे. याव्यतिरिक्त त्यांनी महापालिका आणि खासगी रुग्णालयांना ही स्वछता आणि आरोग्यविषयक साधने मदतीच्या स्वरूपात उपलब्ध करून दिल्याचे म्हटले आहे.

कोविड विषाणूच्या विरोधात लढतांना आतापर्यंत राज्यातील जनतेने तसेच राज्यातील उद्योजक, व्यापारी वर्ग, स्वंयसेवी संस्था, कॉर्पोरेट हाऊसेस आणि सर्वच क्षेत्रातील व्यक्ती-संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. सहकार्याच्या या हजारो हातांमुळे कोरोना विषाणू विरोधात लढतांना शासनाला अधिक बळ प्राप्त झाले आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर लि. ने राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभागास आरोग्य विषयक संसाधने उपलब्ध करून दिल्याने कोविड योद्धे म्हणून लढणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना नक्कीच मदत होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले असून हिंदुस्थान युनिलिव्हर लि. ला त्यांनी मनापासून धन्यवाद दिले आहेत.

चक्रीवादळ : मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व विभागांनी दक्ष राहा – जिल्हाधिकारी

मुंबई दि.२:आठवडा विशेष टीम― दि. ३ जून रोजी येणाऱ्या संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील महसूल व अन्य महत्त्वाच्या विभागांनी आपत्कालीन व्यवस्थेसह दक्ष राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिल्या आहेत.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वे, बेस्ट, महसूल, आरोग्य आदी महत्त्वाच्या विभागासोबत संभाव्य वादळाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. त्यावेळी त्यांनी उपरोक्त सूचना दिल्या.

रेल्वेची वाहतूक ही उद्या असणाऱ्या वाऱ्याचा वेग तसेच त्या अनुषंगाने इतर सूचनांवर अवलंबून असेल. त्याचप्रमाणे कोविडच्या प्रादुर्भावाच्या काळात तात्पुरत्या स्वरुपात उभ्या केलेल्या रुग्णालयातील विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या. संभाव्य वादळाने होणाऱ्या नुकसानीची मोजणी तसेच मदत कार्यासाठी उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार यांचे नऊ गट तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीत अपर जिल्हाधिकारी श्री.अभंग,निवासी उपजिल्हाधिकारी संपत डावखर तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

धारावीतील ऑक्सिजन सुविधायुक्त २०० खाटांचे विशेष रुग्णालय उद्यापासून होणार कार्यान्वित ―राजेश टोपे

मुंबई दि.१:आठवडा विशेष टीम― मुंबईतल्या घनदाट लोकवस्तीचा भाग असलेल्या धारावी येथील महाराष्ट्र नेचर पार्कजवळ ऑक्सिजन सुविधायुक्त २०० खाटांचे कोरोना रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयाला आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भेट दिली. अवघ्या १५ दिवसांच्या कालावधीत हे रुग्णालय उभे राहिल्यामुळे या भागातील रुग्णांना आहे तेथेच उपचाराची सुविधा मिळणार आहे. उद्यापासून हे रुग्णालय कार्यान्वित होणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे बऱ्याचदा श्वास रोखण्याच्या तक्रारींना सामोरे जावे लागते अशा वेळी या रुग्णांना वेळीच ऑक्सिजनचा पुरवठा झाला तर त्यांचे प्राण वाचू शकतात. स्थानिकांना आहे त्या भागातच उपचाराची सोय व्हावी यासाठी मुंबई महापालिकेमार्फत धारावीतील बस डेपो जवळ हे कोरोना आरोग्य सेंटर सुरू करण्यात आले आहे. केवळ १५ दिवसांमध्ये २०० खाटांच्या या रुग्णालयाची उभारणी झाली असून तेथे प्रत्येक बेडला ऑक्सिजनची सोय आहे. त्यामुळे ज्या कोरोनाबाधित रुग्णाला श्वास घेण्याचा त्रास जाणवू लागला त्याला तत्काळ या सेंटरमध्ये आणून ऑक्सिजन देऊन उपचार केले जातील.

या रुग्णालयासाठी १० डॉक्टर्स, १५ नर्स, वॉर्डबॉय तसेच पूर्णवेळ रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. या रुग्णालात सीसीटीव्ही यंत्रणा देखील बसविण्यात आली आहे. त्याचबरोबर थर्मल सेंसर यंत्रणा देखील असून त्याद्वारे तापाच्या रुग्णांची वेळीच तपासणी होणे शक्य होईल. कोरोनाशिवाय अन्य संशयित रुग्णांवर याठिकाणी मोफत उपचार करण्यात येतील.

आज आरोग्यमंत्र्यांनी या रुग्णालयाला भेट देऊन त्याची पाहणी केली. अल्पावधित रुग्णालय उभे राहिले याबद्दल त्यांनी यंत्रणेनेचे कौतुकही केले. यावेळी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल, सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर आदी उपस्थित होते. श्री. दिघावकर यांनी रुग्णालयाबाबत आरोग्यमंत्र्यांना माहिती दिली.

#Philippines महाराष्ट्रातील जवळपास 200+ MBBSचे विध्यार्थी अडकलेत फिलिपीन्स देशामध्ये ; लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन त्यांना मायदेशी परत आणावं !

पुणे:आठवडा विशेष टीम― एमबीबीएस (परदेशातील एमडी-डॉक्टर ऑफ मेडिसिन) या डिग्री कोर्स साठी फिलिपीन्स या देशातील दवावो,मनिला आणि सेबु या ठिकाणी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील वेगवेगळ्या राज्यातील विध्यार्थी वैदयकीय शिक्षण घेत आहे. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव संपुर्ण जगावर होत आहे.अद्यापपर्यंत कसल्याही प्रकारचा उपचार निघालेला नाही.फिलिपीन्स मध्ये आजच्या डीओएच च्या माहितीनुसार 2633 पॉसिटीव्ह केसेस आहेत तर 107 जणांचा मृत्यू … Read more

राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी यांच्या अकाली निधनाने बीड जिल्ह्यासह राज्याच्या अध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली – धनंजय मुंडे

मुंबई/बीड (दि.२९):आठवडा विशेष टीम― राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी (वय – ५७) यांचे आज दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने अकाली निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने बीड जिल्ह्यासह राज्यातील अध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत. बीड जिल्ह्याच्या संत परंपरेतील अत्यंत … Read more

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष आम्हीच साकार करणार―केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ असून संविधानाचा घराघरात प्रचार करणार मुंबई दि.6:आठवडा विशेष टीम― महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान हे लोकशाहीचा प्राण आहे. भारतीय संविधान जगात सर्वश्रेष्ठ आहे .त्यामुळे देशभर घराघरात संविधानाचा प्रचार करणार असे सांगत संविधानिक मूल्यांच्या आधारावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी व्यापक रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली आहे. रिपाइं चे गट अनेक लोक स्थापन करतात मात्र … Read more

#RPI(A): रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पक्षाचे नेते दयाल बहादूरे यांनी दिल्या महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला शुभेच्छा

मुंबई:आठवडा विषेश टीम― एनडीए सरकार मध्ये सामील असलेल्या आठवले गटाच्या रिपब्लिकन पक्षाचे नेते दयालजी बहादूरे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक वर लाईव्ह करून महाशिवआघाडी च्या महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत. https://m.facebook.com/story.php?story_fbid=2513194198799643&id=100003272633038

#Accident: मुंबई पुणे मार्गावर बसच्या भिषण अपघातात ५ ठार तर ४० जण जखमी

आठवडा विशेष टीम―मुंबई-पुणे मार्गावर बोरघाटात बसचा अपघात झाला आहे. या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे तर ४० जण जखमी झाले आहेत.कराड-मुंबई खासगी बसचा अपघात झाला आहे. बसच्या ड्रायव्हरचा बसवरचा ताबा सुटल्यामुळे ही बस दरीत कोसळली.या अपघातात दोन वर्षांचा एक मुलगा, एक युवती, एक पुरुष आणि एक महिला असे चारजण जागीच ठार झाले. या ठिकाणी महामार्ग पोलीस,खोपोली पोलीस यांच्या साथीने बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.

बोरघाटातील गारमाळ पॉईंटजवळ चालकाचा बसवरचा ताबा सुटल्यानंतर हा अपघात झाला. सर्वज्ञा सचिन थोरात (वय ३- रा.कराड), स्नेहा पाटील (१५वर्ष,रा. घाटकोपर), जनार्दन पाटील (४५ वर्ष), संजय शिवाजी राक्षे (५० वर्ष, पवई), आणि एका महिलेची ओळख पटलेली नाही. मात्र या ५ जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती मिळते आहे.

सायवन हत्याप्रकरणातील आरोपीच्या अखेर मुसक्या आवळल्या ; शरीर सुखाची मागणी धुडकावून लावल्याने महिलेची निर्घृण हत्या केल्याची आरोपीची कबुली

वसई:आठवडा विशेष टीम― मंगळवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास सायवन गावातील जंगलात ४० वर्षीय महिलेची अज्ञात आरोपीने निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती. विरार पोलिसांनी याप्रकरणी विशेष पथक स्थापन करून ३६ तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या. राजेश बाळू पवार (वय ३० वर्ष) असे आरोपीचे नाव आहे. त्याने केलेली शरिरसुखाची मागणी मयत महीलेनी धुडकावून लावली होती. … Read more