पशुसंवर्धन पदविका धारकांना शासनाने नोंदणीकृत करून स्वतंत्र पशुवैद्यकीय व्यवसायास परवानगी द्यावी !

बीड दि.०४ ऑगस्ट २०२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत करून त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून वाड्या-वस्त्यांवर पशुसेवा अगदी कमी वेळात पोहचेल व गाई-म्हशीचे प्राण वाचेल.शासन दुधाचा महापूर आणण्यासाठी प्रयत्न करते योजना आखते परंतु त्यात मोलाचा वाटा असणारे पशुसंवर्धन पदविकाधारकांच्या नोंदणीच्या वेळी मात्र काणाडोळा करते.असे न करता शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून प्रथमतः पशुसंवर्धन पदविका धारकांना कायदेशीर पशुवैद्यक म्हणून घोषित करावे व त्यांची नोंदणी करून त्यांना नोंदणीक्रमांक द्यावा अशी मागणी जोर धरून आहे. १९८४ च्या कायद्यात बदल करावा, पशुसंवर्धन पदवीकाधारकांना व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे मात्र शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसून कृषीप्रधान देशातच पशूंकडे शासनाचे लक्ष नसल्याचे समोर येत आहे.

पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ कलमाअंतर्गत व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीमधून पशुसंवर्धन पदवीधारकांच्या राज्यव्यापी परिषदेची नियुक्ती करून स्वतंत्ररीत्या औषधे बाळगणे व नोंदणीकृत व्यवसाय परवाना उपलब्ध करून द्यावा.राज्यातील रिक्त पशुधन पर्यवेक्षक पदांची तत्काळ भरती करण्यात यावी.खासगीरीत्या असंघटित क्षेत्रात भारतीय पशुचिकित्सक परिषद कायद्यान्वये किरकोळ व प्राथमिक स्वरूपाच्या पशुवैद्यकीय उपचार सेवा पदवीधारक डॉक्‍टरच्या सुपरव्हिजन व माध्यमांचा वापर करून आपले कार्य पार पाडतात अशा सर्व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीप्रमाणपत्र व ओळखपत्र देऊन पशुसेवेचे कार्य सुरू ठेवण्यासाठी बळ द्यावे.

वर्धा: बँकांनी किरकोळ कागदपत्रांसाठी पीक कर्जप्रकरणे नामंजूर करू नये – पालकमंत्री

शेतीपूरक व्यवसायासाठी प्राधान्याने कर्जपुरवठा करा

वर्धा, दि.१५:आठवडा विशेष टीम― बँकांनी किरकोळ कागदपत्राच्या पुर्ततेसाठी शेतक-यांची कर्जप्रकरणे नामंजूर करु नये. 1 लाख 60 हजार रुपये पर्यंतच्या खरीप कर्जासाठी केवळ सात बारा, आठ-अ उतारा, आखीव प्रमाणपत्र, चालू फेरफारपंजी या कागदपत्रांचीच आवश्यकता आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची यादी व पीक कर्ज मिळण्यास पात्र शेतक-यांची यादी बँकेंच्या दर्शनी भागातील सूचना फलकावर लावण्याच्या सूचना पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी सर्व बँकांना दिल्यात.
कोविड 19 मुळे देशासह राज्याची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शेतक-यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अर्थचक्र फिरु शकेल. यासाठी शेतकरी हा विकासाचा केंद्र बिंदू समजून त्याला प्राधान्याने विविध शेतीपूरक व्यवसायांसाठी बँकांनी कर्जपुरवठा करावा असे निर्देशही श्री केदार यांनी दिलेत.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात आज शेतक-यांना खरीप पीक कर्ज वितरण संबंधित आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी त्यांनी बँकर्स प्रतिनिधींना निर्देश दिलेत. बैठकिला आमदार रणजित कांबळे, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल कोरडे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक बिरेंद्रकुमार व बॅकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पीक कर्ज वाटप प्रक्रिया एक महिन्यात पूर्ण करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने तलाठी, सहकार विभागाचे कर्मचारी, कृषि सेवक व बँक सखी यांची नोडल अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नोडल अधिका-यामार्फत शेतक-याची कर्जप्रकरणे तपासूनच बँकेत जमा करण्यात येत आहे, तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी महसुल विभागाने स्वतंत्र व्यवस्था केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी दिली. यासाठी शेतक-यांनी संबधित नोडल अधिका-यांकडे कर्जकरणे सादर करण्याचे आवाहन पालकमंत्री यांनी केले.

#Philippines महाराष्ट्रातील जवळपास 200+ MBBSचे विध्यार्थी अडकलेत फिलिपीन्स देशामध्ये ; लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन त्यांना मायदेशी परत आणावं !

पुणे:आठवडा विशेष टीम― एमबीबीएस (परदेशातील एमडी-डॉक्टर ऑफ मेडिसिन) या डिग्री कोर्स साठी फिलिपीन्स या देशातील दवावो,मनिला आणि सेबु या ठिकाणी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील वेगवेगळ्या राज्यातील विध्यार्थी वैदयकीय शिक्षण घेत आहे. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव संपुर्ण जगावर होत आहे.अद्यापपर्यंत कसल्याही प्रकारचा उपचार निघालेला नाही.फिलिपीन्स मध्ये आजच्या डीओएच च्या माहितीनुसार 2633 पॉसिटीव्ह केसेस आहेत तर 107 जणांचा मृत्यू … Read more

जमीन कशाला विकता,चिक्की खाण्यातून आलेल्या पैशातून शेतकऱ्यांचे उसाचे पैसे द्या―धनंजय मुंडे

वर्धा/हिंगोली: विरोधी पक्ष नेता तोडपाणी करणारा असता तर तुमचे घोटाळे बाहेर काढले नसते. शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे देण्यासाठी आईची जमीन गहाण ठेवण्यापेक्षा चिक्की खाल्लेले पैसे दिले तर बरं होईल, असा टोला विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंत्री पंकजा मुंडे यांना लगावला आहे. धनंजय मुंडे वर्ध्याच्या आघाडीच्या उमेदवार चारुलता टोकस यांच्या प्रचारसभेत आष्टी येथे ते बोलत … Read more

किसानपुत्र अन्नत्याग आंदोलन ; आर्वीतील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित

वर्धा दि.१९: आर्वी येथे लाक्षणिक किसानपुत्र आंदोलनाची सुरवात स्मृतिशेष साहेबराव करपे आणि त्यांचे कुटुंबीय यांना विनम्र शिवांजली अर्पण करून झाली. शिवाजी चौक येथे संपन्न झालेल्या सदर आंदोलनाला आर्वी येथील अनेक मान्यवरांनी भेट देवून शेतकर्यांविषयी सदभावना व्यक्त केल्या.
प्रा.संजय वानखेडे यांचे सह आर्वी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष वीरेंद्र कडू, अनिलजी गोहाड सुरेंद्रजी जाणे, सचिव प्रशांत ढवळे तथा राजेश सोळंकी, संतोष डंभारे, प्रशांत नेपटे, धनराज मांगे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संघटक प्रफुल्ल क्षीरसागर, शुभम राजे, जिजाऊ ब्रिगेडच्या सुनिता जाणे, शुभांगी डंभारे, सीमा साळुंखे, मृदुल जाणे सखी मंचच्या अलका कहारे, शुभांगी गाठे, काळमोरे, माजी जि.प.सदस्य गजानन गावंडे, राम निस्ताने, विशाल चौधरी उपस्थित होते.
बाळा जगताप,आर्वी विधानसभा क्षेत्रातील विद्यमान आमदार अमरबाबु काळे, पत्रकार दशरथ जाधव, परवेज साबीर तसेच आर्वीतील जनमान्य नागरीक एक दिवसीय अन्नत्याग आंदोलनात उत्स्फूर्त पणे सहभागी झालेत. या मान्यवरांसह अनेक शेतकरी बांधवांनी उपोषण मंडपाला भेटी देवून उपोषणकर्ते व आयोजक यांच्याप्रती संवेदना व्यक्त केल्यात. सुत्रसंचालन वीरेंद्र कडू यांनी केले.