पशुसंवर्धन पदविका धारकांना शासनाने नोंदणीकृत करून स्वतंत्र पशुवैद्यकीय व्यवसायास परवानगी द्यावी !

बीड दि.०४ ऑगस्ट २०२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत करून त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून वाड्या-वस्त्यांवर पशुसेवा अगदी कमी वेळात पोहचेल व गाई-म्हशीचे प्राण वाचेल.शासन दुधाचा महापूर आणण्यासाठी प्रयत्न करते योजना आखते परंतु त्यात मोलाचा वाटा असणारे पशुसंवर्धन पदविकाधारकांच्या नोंदणीच्या वेळी मात्र काणाडोळा करते.असे न करता शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून प्रथमतः पशुसंवर्धन पदविका धारकांना कायदेशीर पशुवैद्यक म्हणून घोषित करावे व त्यांची नोंदणी करून त्यांना नोंदणीक्रमांक द्यावा अशी मागणी जोर धरून आहे. १९८४ च्या कायद्यात बदल करावा, पशुसंवर्धन पदवीकाधारकांना व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे मात्र शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसून कृषीप्रधान देशातच पशूंकडे शासनाचे लक्ष नसल्याचे समोर येत आहे.

पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ कलमाअंतर्गत व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीमधून पशुसंवर्धन पदवीधारकांच्या राज्यव्यापी परिषदेची नियुक्ती करून स्वतंत्ररीत्या औषधे बाळगणे व नोंदणीकृत व्यवसाय परवाना उपलब्ध करून द्यावा.राज्यातील रिक्त पशुधन पर्यवेक्षक पदांची तत्काळ भरती करण्यात यावी.खासगीरीत्या असंघटित क्षेत्रात भारतीय पशुचिकित्सक परिषद कायद्यान्वये किरकोळ व प्राथमिक स्वरूपाच्या पशुवैद्यकीय उपचार सेवा पदवीधारक डॉक्‍टरच्या सुपरव्हिजन व माध्यमांचा वापर करून आपले कार्य पार पाडतात अशा सर्व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीप्रमाणपत्र व ओळखपत्र देऊन पशुसेवेचे कार्य सुरू ठेवण्यासाठी बळ द्यावे.

घरच्यापेक्षाही चांगलं जेवण मिळतयं ; बार्शीतील रूग्णांची कोविड केअर सेंटरमधील सुविधांबाबत पालकमंत्री भरणे यांना पोचपावती

सोलापूर, दि.२७:आठवडा विशेष टीम― जेवण चांगलं मिळतंय का?….वेळेवर साफ-सफाई होते का?….उपचार व्यवस्थित मिळतात का?…. हो घरच्यापेक्षा जेवण चांगलं आहे….इथं चांगली काळजी घेतली जात आहे…..हा संवाद आहे बार्शीतील छत्रपती शिवाजी महाविद्यालय पॉलिटेक्निक कॉलेजच्या कोविड केअर सेंटरमधील पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि कोरोना रुग्णांमधील. यावेळी आमदार यशवंत माने, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, प्रांताधिकारी हेमंत निकम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल … Read more

सोलापूर: कोरोनाबाधित रूग्णांच्या अंत्यविधीसाठी सामाजिक सेवाभावी संस्थांची मदत

सोलापूर दि.१५:आठवडा विशेष टीम― कोरोना विषाणूची बाधा होऊन मृत झालेल्या व्यक्तींवर अंत्यविधी करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने विहित पद्धती (प्रोटोकॉल) तयार केली आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सामाजिक संस्था, कर्मचारी यांच्यासमवेत बैठक घेऊन महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी नियंत्रण कक्षात निश्चिती केली, अशी माहिती कोविड-19 संनियंत्रण अधिकारी धनराज पांडे यांनी आज दिली. मृतदेहावर अंत्यसंस्कार संबंधितांच्या धार्मिक रितीरिवाजानुसारच केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मृतदेहाची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने काही सामाजिक संस्था, व्यक्ती, विद्युत दाहिनी, औषध फवारणी संस्था नेमून दिल्या आहेत. सामाजिक संस्था आणि व्यक्तींनी कोरोनाचा रूग्ण मयत झाला की अंत्यविधीबाबत मृताच्या नातेवाईकांकडून संमतीपत्र घेतल्यानंतर, पुढील कार्यवाही करावयाची आहे असे त्यांनी सांगितले.

संसर्गजन्य दवाखान्यामधील सूचनेनुसार आरोग्यसेविका, जहाँगिर शेख आणि कविता चव्हाण यांनी पुढील कारवाई करणे अपेक्षित आहे. विद्युत दाहिनीची उपलब्धता पाहणे, पावती घेणे गरजेचे आहे. मृतदेह दफन करण्यासाठी जेसीबी चालकाला सूचना करणे, औषध फवारणी करणाऱ्यांना वेळेची व स्थळाची माहिती देणे, पीपीई कीट, मृतदेहासाठी बॅगची व्यवस्था सिव्हील हॉस्पिटलमधून किंवा संसर्गजन्य दवाखान्यातून करून घेणे महत्वाचे आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

संसर्गजन्य दवाखान्यातील तयारी झाल्यानंतर पीपीई कीट घालून संबंधित रूग्णालयात जाऊन मृतदेह ताब्यात घ्यावा. मृतदेह दफन करायचा असल्यास औषधांची फवारणी करणे महत्वाचे आहे. प्रत्येकाच्या धार्मिक विधीनुसार अंत्यविधी करण्यात येणार असून अंत्यविधीनंतर पीपीई कीटची व्यवस्थित विल्हेवाट लावण्यात येणार आहे.

मृतदेहाच्या अंत्यविधीबाबत आवश्यक संपर्क क्रमांक

संसर्गजन्य दवाखाना (आयडी हॉस्पिटल)- 0217-2323700, बाबा मिस्त्री-9890374242, जहाँगिर शेख (लादेन)-8421502668, कविता चव्हाण (सामाजिक संस्थेचे)-8329260974, बाबा (सामाजिक संस्था)-9423326624, श्री.परदेशी (मोदी विद्युतदाहिनी)- 9422457924, कल्याणी (मोदी विद्युतदाहिनी)-9518598125, श्री. लिंगराज (जेसीबी)-8329260974, आलिशा काळे (औषध फवारणी)-8329260974, श्री. मेंडगुळे (औषध फवारणी प्रमुख)-9423993904, शववाहिका चालक-सकाळी 8 ते 4 श्री. चंदनशिवे (9822355473) आणि श्री. लांबतुरे (9503961800), दुपारी 4 ते रात्री 12 श्री. कैयावाले (9822760831) आणि श्री. देवडे (9763740317), रात्री 12 ते सकाळी 8 श्री. लवटे (9767316428) आणि श्री. हणमशेट्टी (8806778405).

नोकरी हवीय.. मग ‘महास्वयंम’ वर नोंदणी करा – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन

सोलापूर, दि.१५:आठवडा विशेष टीम― लॉकडाऊनमुळे स्थलांतरित झालेल्या कामगारांमुळे उद्योगांना मनुष्यबळाची आवश्यकता आहे. ही आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणि गरजूंना रोजगार मिळावा यासाठी राज्य शासनाने ‘महास्वयंम’ वेबपोर्टल सुरु केले आहे. रोजगार देणारे आणि रोजगार मागणारे यांच्यासाठी कॉमन प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला आहे. गरजूंनी ‘महास्वयंम’ वेबपोर्टलच्या माध्यमातून नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे सोलापूर जिल्ह्यातील विविध उद्योग क्षेत्रामधील कामगार स्थलांतरित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्योगांना चालना देण्यासाठी तसेच बळकटी देण्यासाठी ‘महास्वयंम’ https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलच्या माध्यमातून रिक्त पदे, उमेदवारांची यादी, नियुक्तीबाबतची प्रक्रिया पूर्ण करता येते, असे श्री. शंभरकर यांनी सांगितले.

या वेबपोर्टलच्या वापरातून सूक्ष्म, लघु ,मध्यम आणि मोठे उद्योग सर्व शासकीय व खाजगी आस्थापना निशुल्क कुशल/अकूशल मनुष्यबळ उपलब्ध करून देत आहे. अधिकच्या माहितीसाठी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी ‘महास्वयंम’ वेबपोर्टलचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता मार्गदर्शन केंद्र, सोलापूरच्या वतीने करण्यात आले आहे.

याबाबत काही अडचण असल्यास, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर, ड्राईंग हॉल इमारत, महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला, पार्क चौक, (नॉर्थकोट) सोलापूर, येथे प्रत्यक्ष अथवा 0217-2622113 या क्रमांकावर अथवा [email protected] या ईमेलदवारे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

सोलापूर: कंटेन्मेंट झोन नीलम नगरला पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट

सोलापूर:आठवडा विशेष टीम― पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कंटेन्मेंट झेान नीलम नगर येथील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांच्या आरोग्याची विचारपूस केली.

तसेच त्या भागात कोविड सर्व्हे झाला आहे का, सर्व्हे मध्ये काय-काय विचारण्यात आले होते, तपासणी केली का याची विचारपूस केली. शासनाकडून कोणती अडचण आहे का हे जाणून घेतले. नागरिकांनी वृद्ध माणसांची आणि लहान मुलांची काळजी घ्या, कोरोनाला घाबरु नका, कोरोनाशी आपण लढू शकतो आणि हारवू या असा संवाद साधला.

नीलम नगर येथील स्थानिक डॉक्टर व नगरसेवक यांच्याशी चर्चा केली. नागरिकांशी संवाद साधत असताना शासकीय नियमाचे पालन करावे, तसेच आरोग्याची योग्य काळजी घ्यावी असे आवाहन पालकमंत्री श्री.भरणे यांनी केले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पालिका आयुक्त पी. शिवशंकर होते.

सोलापूर: रुग्णसेवा न देणाऱ्या दवाखान्यांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

सोलापूर:आठवडा विशेष टीम― रुग्णसेवा न देणाऱ्या खासगी दवाखान्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा, असे आदेश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी खासगी दवाखान्यांना भेट देऊन रुग्ण सेवा देतात की नाही याची पाहणी केली. तसेच रुग्ण व डॉक्टरांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पालिका आयुक्त पी. शिवशंकर होते.
कोविड-नॉन कोविड रुग्णांची सोय व्हावी, यासाठी खासगी दवाखान्यांना पालकमंत्री भरणे यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या. तसेच ज्या दवाखान्यामध्ये अधिसूचित नियमानुसार डॉक्टर, नर्सिंग स्टाफ व जीवरक्षक प्रणाली उपलब्ध नाही अशा दवाखान्यांविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करु, असे आदेश श्री.भरणे यांनी दिले. या भेटीदरम्यान उपस्थित डॉक्टर, त्यांच्या वेळा व ओपीडी रजिस्टर याबाबत चौकशी केली. हॉस्पिटलच्या अडचणी समजून घेतल्या. काही खासगी दवाखान्यांनी उत्तम काम केल्याबद्दल अभिनंदनही केले. सर्व खासगी दवाखान्यातील डॉक्टरांचे सहकार्य अपेक्षित असून सोलापूर कोरोना मुक्त करण्यासाठी सर्व दवाखान्यांची मदत लागणार आहे. त्यामुळे आपण दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास दवाखान्यावर कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्री श्री.भरणे यांनी सांगितले.

पालकमंत्री श्री.भरणे यांनी शहरातील जोशी हॉस्पिटल व लॅब, केळकर हॉस्पिटल, मोनार्क हॉस्पिटल, यश क्लिनीक, धांडोरे हॉस्पिटल, उत्कर्ष हॉस्पिटल, सिटी हॉस्पिटल, युनिक हॉस्पिटल, सोलापूर सहकारी रुग्णालय व आश्वनी हॉस्पिटलना भेटी दिल्या.

#Philippines महाराष्ट्रातील जवळपास 200+ MBBSचे विध्यार्थी अडकलेत फिलिपीन्स देशामध्ये ; लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन त्यांना मायदेशी परत आणावं !

पुणे:आठवडा विशेष टीम― एमबीबीएस (परदेशातील एमडी-डॉक्टर ऑफ मेडिसिन) या डिग्री कोर्स साठी फिलिपीन्स या देशातील दवावो,मनिला आणि सेबु या ठिकाणी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील वेगवेगळ्या राज्यातील विध्यार्थी वैदयकीय शिक्षण घेत आहे. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव संपुर्ण जगावर होत आहे.अद्यापपर्यंत कसल्याही प्रकारचा उपचार निघालेला नाही.फिलिपीन्स मध्ये आजच्या डीओएच च्या माहितीनुसार 2633 पॉसिटीव्ह केसेस आहेत तर 107 जणांचा मृत्यू … Read more

वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरांची उमेदवारी दाखल करण्यासाठी मिरवणुक मार्गस्थ

सोलापूर दि.२५: आज सोलापूरात रंगपंचमी उत्साहात सुरु असून सोबतच लोकसभेच्या उमेदवारांची अर्ज दाखल करण्याचा उत्साह ही तितकाच आहे. बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मिरवणुकीने मार्गस्थ झाले आहे. या मिरवणुकीत वंचित बहुजन आघडीच्या सर्व पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले … Read more

लोकसभेची उमेदवारी दाखल करण्यासाठी सुशीलकुमार शिंदे गटाची मिरवणुक मार्गस्थ

सोलापूर दि.२५(प्रतिनिधी): सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मिरवणुकीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाले आहेत. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांचे दर्शन घेतल्या नंतर चार हुतात्मा पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या मिरवणूक प्रारंभ करण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते याचबरोबर शिंदे समर्थक तसेच काँग्रेसचे सर्व विभागांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या … Read more

सोलापूर लोकसभा – “अभिमन्यू चक्रव्यूह में फस गया तू…!”

सोलापूर लोकसभा निवडणुकीत रंगत येऊ लागली आहे. एकेकाळी काॅग्रेसला सहज व सुकर असलेला मतदार संघ आता अवघड झाला आहे. काॅग्रेसचा उमेदवार मीच असे ठाम सांगणारे सुशीलकुमार शिंदे यांनी उमेदवारी बाबत घुमजाव करण्यास सुरुवात केली आहे.सुशीलकुमार शिंदे यांची विधाने संभ्रमात टाकणारी असली तरी शिंदे हेच उमेदवार असतील.२००४ लोकसभा निवङणूक नंतर अनेकजण शिंदे (काॅग्रेस नाही)पासून दुरावले गेले … Read more