वारकरी सांप्रदायात काम करणाऱ्या लोकांना सरकारने आर्थिक मदत करावी – भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी यांची मागणी

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
समस्त मानवी जिवावर उठलेल्या कोरोना संकटात राज्य सरकारने साधी एक दमडी,रूपया,कुणाला मदत केली नाही.मात्र जो वारकरी सांप्रदाय हा महाराष्ट्राचा आत्मा आहे.त्या सांप्रदायात सध्या किर्तनकार, मृदंगाचार्य,गायनाचार्य विणेकरी तथा गांव पातळीवरचे भजनी मंडळ आर्थीक संकटात सापडले असून त्यांना सरकारने तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी भाजपा राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली असून पांडूरंगाच्या पुजेचा मान असणा-या मुख्यमंत्र्यांनी पांडुरंगाच्या लेकराकडे ही लक्ष द्यावे असे त्यांनी म्हटले आहे.

प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात राम कुलकर्णी यांनी म्हटले आहे की,कोरोना संकटाचा समाजातील सर्व व्यवस्थांवर आर्थिक परिणाम झाला.हातावर पोट असलेल्या विविध जाती-धर्माच्या लोकांना तर संकटामुळे उपाशी राहण्याची वेळ आली.तरी पण, महाराष्ट्र सरकारने अद्यापही स्वःता कवडीची आर्थिक मदत राज्यात कुणालाच दिलेली नाही.हे दुर्देव असल्याचे त्यांनी म्हटले आहे.महाराष्ट्र हि संतांची भुमी असून राज्यात वारकरी सांप्रदाय मोठा आहे.किर्तन,भजन,हरिनाम सप्ताहात.भागवत कथा,रामायण,महाभारत,दिंडी,पताकांच्या माध्यमातून फार मोठी उलाढाल सुरू असते.ज्यामधून वारकरी संसार जीवन जगतात.मात्र या संकटामुळे राज्यातील अध्यात्माची दारे आणि विविध मंदिरे बंदच आहेत. किर्तनकारांना किर्तन करता येत नाही.तर त्यावर आधारित इतर सर्व सोपस्कार बंद आहेत.मोठे-मोठे किर्तनकार सध्या आपापल्या घरात आहेत.त्यामुळे सध्या एकूणच वारकरी सांप्रदायाची आर्थिक परवड सुरू आहे.राज्य सरकारने पंढरीचा पांडुरंग जो महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे.त्या पांडुरंग ला डोळ्यांसमोर साक्षी ठेवून,त्याच्या या लेकरांसाठी आर्थिक मदत करावी.ज्याअर्थी पांडुरंगाची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते.त्याअर्थी तेवढ्या अधिकारात वारकरी सांप्रदायाला मदत करण्याचा हक्क आणि अधिकार हा मुख्यमंत्र्यांचाच आहे. तेव्हा राज्याच्या माय-बाप सरकारने वारकरी क्षेत्रातील या लोकांना तात्काळ आर्थिक मदत करावी. अशा प्रकारची मागणी भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे.जर सरकारने यांना मदत केली नाही.तर पांडुरंगाची ही लेकरं कोरोना संकटात उपाशीपोटीच राहतील हे मात्र नक्की.


दुधाला सरसकट १० रूपये अनुदान मागणीसाठी परळी भाजपाच्या वतीने आंदोलन

परळी वैजनाथ: आर्थिक संकटात सापडलेल्या दुध उत्पादक शेतकरी यांना दुधाला सरसकट 10 रूपये अनुदान व दुध पावडरला प्रति किलो 50 रूपये अनुदान या मागणीसाठी माजी ग्रामविकासमंत्री लोकनेत्या पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी भाजपाच्या वतीने आज 1 आँगस्ट रोजी रस्त्यावर दुध ओतून तीव्र आंदोलन केले. तसेच आंदोलना नंतर परळी तहसील मार्फत मुख्यमंत्र्यांना मागणी बाबत निवेदन देण्यात आले.

याबाबत मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दुग्धव्यवसाय हा शेतकऱ्यांचा जोडधंदा आहे. कोरोना लाॅक डाउनमुळे मोठी घट झाली आहे. तर सरकी पेंड व सुग्रास खाद्य यांचे वाढलेले भाव, आणि दुधाचे घसरलेले भाव लक्षात घेता झालेला खर्च ही दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे हा व्यवसाय आज अडचणीत सापडला आहे. बिसलरी पाण्याची बॉटल 20 रुपयाला आणि दूध मात्र 17रू. या बेताल परिस्थितीमुळे दूध व्यवसाय मोडकळीस निघण्याची वेळ आली आहे. दुध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटली. आजच्या घडीला खाजगी संस्था व सहकारी दुध संघाकडून दुध २० ते २२ रु. दराने खरेदी केल्या जात आहे. त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्च सुद्धा निघू शकत नाही. शासनाने १० लाख लिटर दुध २५ रु. प्रती लिटर या भावाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात ७ लाख लिटर दुध खरेदी केल्या जात आहे. गायीच्या दुधाला प्रती लिटर १० रु. अनुदान, दुध भुकटी करिता प्रती किलो ५० रु अनुदान, शासनाकडून ३० रु. प्रती लिटरने दुधाची खरेदी,सर्व दुधाळ जनावरांचा शासनामार्फत विमा काढण्यात यावा, दूध उत्पादक शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे कर्ज पुरवठा करण्यात यावा आदी मागण्यांसाठी परळीत भाजपच्यावतीने लोकनेत्या पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 1 आॅगस्ट आंदोलन करण्यात आले. यावेळी दुध रस्तावर सांडून शासनाचा निषेध करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी सकाळी 10 वाजता ईटके काॅर्नर येथे हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी रासपाचे महासचिव बाळासाहेब दौडतले, तालुकाध्यक्ष सतिष मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, रासपाचे युवा प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ फड, ज्येष्ठ नेते श्रीराम मुंडे, रिपाई राज्य सचिव भास्करराव रोडे, ज्येष्ठ नेते उत्तमराव माने, युवा नेते निळकंट चाटे, दिलीप आबा बिडगर, भिमराव मुंडे, युवा मोर्चा अध्यक्ष सुरेश माने, सरचिटणीस रवी कांदे, पंचायत समिती सदस्य भरत सोनवणे, बीड जिल्हा बँकेचे संचालक नितीन ढाकणे, मा.सभापती प्रभाकर फड, अरुण पाठक, नितीन समशेट्टे, मा.सभापती बळीराम गडदे, युवा नेते संजय मुंडे, संतोष सोळंके, धनराज गित्ते चांदापुर, सतिश फड, पप्पू चव्हाण, सरपंच नवनाथ गित्ते, सुंदर मुंडे, तानाजी व्हावळे, फुलचंद मुंडे, धनराज गित्ते , भुराज बदने, नारायण तांबडे, भगवान राजे कदम, शहाजी चव्हाण, माऊली साबळे, योगेश पांडकर, गोविंद मोहेकर, शाम गित्ते, गोविंद चौरे, पिंटू कोपनर, गणेश होळंबे, नितीन मुंडे, चैतन्य मुंडे, बाळासाहेब शिंदे, श्रीहरी मुंडे, अमोल वाघमारे, महादेव मुंडे, भिमराव हाके, बहुसंख्येने दुध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. दरम्यान रासपाचे महासचिव बाळासाहेब दौडतले, तालुकाध्यक्ष सतिष मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, ज्येष्ठ नेते श्रीराम मुंडे, रिपाई राज्य सचिव भास्करराव रोडे, ज्येष्ठ नेते उत्तमराव माने यांनी महाविकास आघाडी सरकारवर कडाडून टिका करत निषेध व्यक्त केला. प्रास्ताविक भाजपाचे तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत देवकते यांनी केले आहे.

दुध अनुदानासाठी उद्या भाजपाचा रास्ता रोको

कार्यकर्ते, दूध उत्पादकांनी सहभागी व्हावे – सतीश मुंडे, जुगलकिशोर लोहिया

परळी वैजनाथ दि.३१:आठवडा विशेष टीम―
राज्यातील दुध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आला असुन त्यांना शासनाच्या मदतीची गरज आहे. दुधाला 30 रूपये भाव देण्यात यावा, प्रति लिटर 10 रूपयाचे अनुदान जाहीर करून थेट दुध उत्पादकांच्या खात्यात जमा करावे, दुध भुकटी करीता प्रति किलो 50 रूपये अनुदान द्यावे, शासनाने 30 रूपये प्रति लिटरप्रमाणे दुध खरेदी करावे, सर्व दुधाळ जनावरांचा शासनामार्फत वीमा काढण्यात यावा, मागणीप्रमाणे दुध उत्पादक शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला जावा आदी मागण्यांसाठी भाजपच्यावतीने लोकनेत्या पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या 1 आॅगस्ट रोजी परळीत आंदोलन करण्यात येणार असून यात कार्यकर्ते व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे व शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी केले आहे.
दुग्धव्यवसाय हा शेतकऱ्यांचा जोडधंदा आहे. कोरोना लाॅक डाउनमुळे मोठी घट झाली आहे. तर सरकी पेंड व सुग्रास खाद्य यांचे वाढलेले भाव, आणि दुधाचे घसरलेले भाव लक्षात घेता झालेला खर्च ही दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे हा व्यवसाय आज अडचणीत सापडला आहे. बिसलरी पाण्याची बॉटल 20 रुपयाला आणि दूध मात्र 17रू. या बेताल परिस्थितीमुळे दूध व्यवसाय मोडकळीस निघण्याची वेळ आली आहे. दुध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे.
शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटली. आजच्या घडीला खाजगी संस्था व सहकारी दुध संघाकडून दुध २० ते २२ रु. दराने खरेदी केल्या जात आहे. त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्च सुद्धा निघू शकत नाही. शासनाने १० लाख लिटर दुध २५ रु. प्रती लिटर या भावाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात ७ लाख लिटर दुध खरेदी केल्या जात आहे.
गायीच्या दुधाला प्रती लिटर १० रु. अनुदान, दुध भुकटी करिता प्रती किलो ५० रु अनुदान, शासनाकडून ३० रु. प्रती लिटरने दुधाची खरेदी,सर्व दुधाळ जनावरांचा शासनामार्फत विमा काढण्यात यावा, दूध उत्पादक शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे कर्ज पुरवठा करण्यात यावा आदी मागण्यांसाठी परळीत भाजपच्यावतीने लोकनेत्या पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या दि. 1 आॅगस्ट आंदोलन करण्यात येणार आहे.
शनिवारी सकाळी सकाळी 10 वाजता ईटके काॅर्नर येथे हे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून यात कार्यकर्ते व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपाचे तालुकाध्यक्ष सतिश मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी केले आहे.

कोरोना संकटाला रोखण्यासाठी बीड जिल्ह्यात अॅन्टीजन टेस्ट वाढवा ―भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―कोरोना संकटाने आता संपूर्ण बीड जिल्हाला घेरले असून बीड,परळी,गेवराई पाठोपाठ अंबाजोगाई शहरात ही उद्रेक सुरू झाला आहे.समुह संसर्ग सुरू झाला असून या संकटाला रोखायचे असेल तर अॅन्टीजन चाचण्यांची गती वाढवावी तसेच राज्य सरकारने त्यासाठी लागणारा निधी आणि मनुष्यबळ तात्काळ उपलब्ध करून द्यावे अशी मागणी भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे.

या विषयावर आमच्या प्रतिनिधीशी बोलताना भाजपा राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी म्हटले आहे.की,या संकटात जो बीड जिल्हा सुरूवातीला ग्रीन झोन अर्थात मागे होता.तोच बीड जिल्हा आता रेडझोन झाला असून मोठ्या प्रमाणावर रूग्णांची दररोज वाढ होत आहे.600 पेक्षा अधिक रूग्ण निघाले असून 30 च्या जवळपास रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.जिल्हा प्रशासनाने बीड,परळी,गेवराई शहरात लॉकडाऊन प्रयोग करून देखिल बीड परळी शहरात रोज रूग्णांची संख्या वाढतच आहे.ग्रामीण भागात पण,या संकटाने पाय पसरले आहे.समुह संसर्ग बीड जिल्ह्यात सुरू झाला असून आता अॅन्टीजन चाचण्या वाढवण्याची गरज आहे.मुंबई,पुणे आणि औरंगाबाद आदी ठिकाणी टेस्टींग वाढवल्यामुळे रिकव्हरी रेट वाढल्याचे लक्षात येते ? तर मग बीड जिल्ह्यात का होत नाही हा सवाल त्यांनी केला.सध्या चाचण्या ज्या सुरू आहेत.त्या दिवसाला केवळ 400 प्रमाणे आहेत.जिल्ह्यात लोकसंख्या 25 लाखांपेक्षा जास्त असून रोज किमान पाच हजार टेस्टींग होणे गरजेचे आहे.शिवाय या टेस्ट तालुका पातळीवर करणे महत्वाचे आहे.राज्य सरकारने या कामासाठी निधी आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी पण, त्यांनी केली आहे.खरे तर अशावेळी जिल्हा प्रशासनाने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांची एखादी बैठक बोलावून विचारविनिमय करायला हवा.कारण,कोरोना विषाणु साथ आजाराचे संकट हे गंभीर होत चालले असून टेस्टींग गती वाढवणे हाच चांगला पर्याय असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.


मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाईत आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार,दिनांक 27 जुलै रोजी अंबाजोगाईत विनोद पोखरकर यांनी आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन केले होते.

कोरोना संकटकाळात आपण वाढदिवस साजरा करणार नसून सध्याच्या कोरोना परिस्थितीत कुणीही कार्यालयात किंवा निवासस्थानी भेटून शुभेच्छा देण्याचा आग्रह धरू नये.तसेच हार तु-यांऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीस सढळ हस्ते देणगी द्यावी.नियम पाळून आरोग्य तपासणी शिबिरे,उपक्रम आयोजित करावीत असे आवाहन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी राज्याच्या जनतेस केले होते.27 जुलै रोजी आपल्या वाढदिवशी कुणीही जाहिरात फलक,भित्तीपत्रके लाऊ नयेत किंवा गर्दी करण्याचा प्रयत्न करू नये असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले होते.त्यांचा आदेश शिरसावंद्य मानून शिवसैनिक तथा उद्योजक विनोद सिद्रामआप्पा पोखरकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख सचिनजी मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाईत 27 जुलै रोजी आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन केले होते.यात स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालयातील रक्तपेढी व रूग्णालय परिसरात कोरोना प्रादुर्भाव होवु नये म्हणून औषध फवारणी (सॅनिटायझेशन)केली.अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यातील कोरोना योद्धे पोलिस बांधवांना रोगप्रतिकार क्षमता वाढविणा-या “आर्सेनिक अल्बम” या होमिओपॅथीक औषधी गोळ्या व सॅनिटायझर,स्प्रे आदींचे वाटप करण्यात आले.यावेळी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सिध्दार्थ गाडे हे उपस्थित होते.यासोबतच अंबाजोगाई नगरपरिषदेच्या स्वच्छता आणि विद्युत विभागातील कंञाटी कर्मचारी यांना मास्क(एन-95) वाटप करण्यात आले.तसेच ग्रामदेवता माता योगेश्वरी देवी मंदिर प्रवेशद्वारासमोर राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी प्रार्थना करण्यात आली.यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक अशोकराव गाढवे,गणेश जाधव,अर्जुन जाधव,आयोजक विनोद पोखरकर,डाॅ.विकास सत्वधर,पंकज परदेशी,कल्याण गायके हे उपस्थित होते.विनोद पोखरकर हे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते असून ते ज्येष्ठ नेते माजी मंञी जयदत्तआण्णा क्षीरसागर यांचे कट्टर समर्थक म्हणून सर्वञ ओळखले जातात.दिवंगत शिवसैनिक वसंतआप्पा पोखरकर यांचा वारसा जोपासत लॉकडाऊन काळामध्ये विनोद यांनी अनेक सामाजिक उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जोपासली.गरजूंना मोफत जेवण, अन्नधान्याचे कीट, मास्क, सॅनिटायझर वाटप,सॅनिटायझेशन फवारणी ही केली.तसेच लॉकडाऊन काळात हिंगोली जिल्ह्यातील मजुर हे अंबाजोगाई व परळी तालुक्याच्या सिमेवर जंगलात अडकून पडले होते त्यांना सर्वोतोपरी सहकार्य केले.फेसबुकद्वारे कोरोना विषयक जनजागृती करून सुरक्षित कसे राहता येईल हे सांगितले.आज सर्वांनी मिळून कोरोनाला हरवण्यासाठी एकत्र यायला हवे.अंबाजोगाई नगरपरिषद परिसरामध्ये दररोज शेकडो लोक ये-जा करतात.तसेच कर्मचारी यांच्यासाठी 2 सॅनिटायझर मशीन सुरू करून यामुळे रोज शेकडो लोकांचा फायदा होवून ते सुरक्षित राहतील हा विचार हॉटेल साई सुरभीच्या माध्यमातून पुढे आणला आहे.


ऑनलाईन संवादात शिक्षक प्रतिनिधींनी केला सरकारच्या ऑफलाईन बदल्यांना तीव्र विरोध

पंकजाताई मुंडे यांनी मराठवाडयातील शिक्षकांना दिले बळ

शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईनच हव्यात ; सरकारला जाब विचारण्यासाठी तयार रहा

बीड दि.२४:आठवडा विशेष टीम―
कोरोना महामारीमुळे राज्यातील सर्व शाळा सध्या बंद आहेत, शिवाय सरकार सर्व व्यवहार ऑनलाईन करत आहे, मग शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईनच का ? हा घाट कुणासाठी घातला जातोय असा थेट सवाल करत याचा जाब विचारण्यासाठी तयार रहा असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी आज मराठवाडयातील शिक्षकांशी संवाद साधताना केले. सरकारच्या ऑफलाईन बदलीच्या निर्णयामुळे चिंतेत असलेल्या तमाम शिक्षकांना या आवाहनामुळे बळ मिळाले आहे. दरम्यान, पंकजाताई मुंडे यांनी मंत्री असताना घेतलेल्या ऑनलाईन बदली धोरणाचे स्वागत करून उपस्थित शिक्षक प्रतिनिधींनी सरकारच्या ऑफलाईन धोरणाचा या संवादात तीव्र विरोध केला.

मराठवाडा शैक्षणिक विकास परिषदेचे अध्यक्ष तथा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे स्थायी समितीचे चेअरमन रमेश पोकळे यांच्या पुढाकाराने मराठवाडयातील शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते व लोक प्रतिनिधी यांच्याशी पंकजाताई मुंडे यांनी आज ऑनलाईन संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर, आ. सुरेश धस, आ. तानाजी मुटकूळे, आ. सुजितसिंह ठाकूर, आ. तुषार राठोड, आ. राजेश पवार, आ. सौतोष दानवे, आ. मेघनाताई बोर्डीकर हे मराठवाडयातील आमदार तसेच
माजी आमदार गोविंदराव केंद्रे, देविदास राठोड हे सहभागी झाले होते.

शिक्षक हे लाभाचं पद नाही, भावी पिढी घडविण्याचे काम ते करतात,त्यामुळं त्यांना मनासारख्या नेमणूका मिळाल्याच हव्यात. मुळात यासाठी राज्याचं रोस्टर करण्याची गरज आहे. दुर्गम भागाची व्याख्या व्हायला हवी तसेच दिव्यांगांचे प्रमाणपत्रही तपासावे असे त्या म्हणाल्या. आम्ही सरकारमध्ये असताना सचिव, सर्व संबंधित अधिकारी व विविध संघटनांचे प्रतिनिधी या सर्वाना विश्वासात घेऊन ऑनलाईन बदल्यांचा निर्णय घेतला होता.ज्यामुळे सर्व सामान्य शिक्षक, ज्यांना कुणी वाली नव्हत, ज्यांचा कुठला वशीला नव्हता अशांना भ्रष्टाचारमुक्त धोरणाचा लाभ झाला परंतू विद्यमान सरकारने मात्र ऑफलाईनचा निर्णय कशासाठी घेतलाय ? असा सवाल त्यांनी केला. हा निर्णय हास्यापद असून ‘खाली डोकं वर पाय’ असा आहे असे त्या म्हणाल्या. बदल्या हया ऑनलाईनच असाव्यात अशी तमाम शिक्षकांची इच्छा आहे. त्यासाठी मी स्वतः आग्रही आहे. माझे आजोबा तसेच मामा प्रमोद महाजन हे तर स्वतः शिक्षक होते आणि गुरू म्हणून माझे पिता मुंडे साहेब हे ही याच वातावरणात वाढले, त्यामुळे या लढाईत मी तुमच्यासोबत आहे. मी ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांना निवेदन दिली आहेत. सरकारने बैठक बोलवावी हा प्रश्न तात्काळ निकाली काढावा अन्यथा हा निर्णय बदलण्यासाठी आम्हाला सरकारला भाग पाडावे लागेल असा इशारा पंकजाताई मुंडे यांनी दिला.

शिक्षकांच्या विरोधाची धार तीव्र

या संवादात विकास गवते, मंगेश जैवाल, सुरेखा खेडकर, राहूल उंडाळे, श्रीराम बोचरे, शेख जलील, राजेंद्र लाड, अशोक बांगर, धसे, प्रताप देशमुख, अजित मगर, पुरूषोत्तम काळे, मदन मुंडे आदीसह सुमारे दिडशेहून अधिक शिक्षकांनी सहभाग घेतला.या सर्वानी सरकारच्या ऑफलाईन बदली धोरणाला कडाडून विरोध केला. हा निर्णय आर्थिक लोभासाठी घेतला असल्याचा आरोप त्यांनी केला. या लढ्यात आम्ही पंकजाताई मुंडे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहोत असा विश्वासही त्यांनी दिला.
या संवादात सहभागी झालेल्या सर्वाचे राम कुलकर्णी यांनी आभार मानले.


राज्याच्या उपराष्ट्रपतीच्या विरोधात सोयगावात निदर्शने ,जोडे मारो आंदोलन छेडणार – शिवसेनेची भूमिका

सोयगाव,दि.२३:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
राज्याचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी उद्गारलेल्या अपशब्दाचा तीव्र निषेध करत गुरुवारी सोयगावात निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी संबंधितावर कारवाई न झाल्यास आगस्ट महिन्यात जोडेमारो आंदोलन छेडण्याचा इशारा तालुका प्रमुख दिलीप माचे यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
सोयगाव शहरात विविध ठिकाणी उपराष्ट्रपती यांच्या वक्तव्याच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात येवून तहसीलदार प्रवीण पांडे यांना निदर्शनाचे निवेदन देण्यात आले.दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे,शिवरायांच्या बाबतीत अपशब्द वापरणाऱ्या या उपराष्ट्रपतीवर तातडीने कारवाई न झाल्यास जिल्हाभर शिवसेनेच्या वतीने त्या उपराष्ट्रपती प्रतिमेला जोडेमारो आंदोलन छेडण्यात येईल,निवेदनावर तालुका प्रमुख दिलीप मचे,शहर प्रमुख गजानन चौधरी,उपशहर प्रमुख विनोद मिसाळ,किसान सेनेचे चंद्रास रोकडे,शेख मुन्ना आदींसह पदाधीकायांच्या स्वाक्षर्या आहे.


मालेवाडी, खामगांव येथील शेतकऱ्यांच्या मदतीला पंकजाताई मुंडे धावल्या

प्रधानमंत्री विमा पोर्टलवर गांवे दिसत नसल्याने विमा भरण्यास अडचणी ; पर्यायी व्यवस्था करण्याची जिल्हाधिका-यांकडे केली मागणी

परळी दि.२१:आठवडा विशेष टीम― तालुक्यातील मालेवाडी, खामगांव यासह अन्य काही गांवे प्रधानमंत्री विमा पोर्टलवर दिसत नसल्याने शेतक-यांना विमा भरण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे, शेतक-यांना होणा-या या त्रासाची तात्काळ दखल घेत पंकजाताई मुंडे यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना थेट फोन करून विमा भरण्यापासून एकही शेतकरी वंचित राहता कामा नये, त्यासाठी पर्यायी व्यवस्था करा अशी मागणी केली.

मालेवाडी व खामगांव ही गांवे पूर्वी अनुक्रमे अंबाजोगाई व धारूर तालुक्यात होती. प्रशासकीय व इतर कामे करताना प्रचंड गैरसोय होत असल्याने ग्रामस्थांच्या मागणीवरून पंकजाताई मुंडे यांनी मंत्री असताना ही गांवे परळी तालुक्यात समाविष्ट करून घेतली. पीक विमा भरण्याची सध्या सर्वत्र धावपळ सुरू आहे. प्रधानमंत्री पीक योजनेतंर्गत विमा भरण्यासाठी या गावातील शेतक-यांना मात्र मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे प्रधानमंत्री विमा पोर्टलवर या दोन्ही गावच्या जमिनीचे ऑनलाईन रेकाॅर्ड सध्या दिसत नाही, त्यामुळे शेतक-यांना विमा भरण्यास मोठया अडचणी निर्माण झाल्या आहेत. मागील दोन वर्षातही अशाच अडचणी आल्या होत्या. पीक विमा भरण्याची अंतिम तारीख जवळ येत असल्याने शेतक-यांची घालमेल अधिकच वाढली आहे.

प्रशासनाच्या या निष्काळजीपणाची बाब दोन्ही गावातील शेतक-यांनी पंकजाताई मुंडे यांना संपर्क साधून त्यांच्या कानावर घातली, त्यांनी याची तातडीने दखल घेत लगेच जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्याशी संपर्क केला व चर्चा केली. प्रधानमंत्री विमा पोर्टलवर या दोन्ही गावचा समावेश करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी व एकही शेतकरी पीक विमा भरण्यापासून वंचित राहू नये यासाठी पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी केली. जिल्हाधिका-यांनी देखील सकारात्मकता दाखवत लवकरच याबाबत कार्यवाही करणार असल्याचे सांगितले.


परळीत भाजपचे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन ; लाॅकडाऊन काळातील व्यापाऱ्यांचे वीज बिल, कृषी पंपाचे वीज बिल माफ करण्याची केली मागणी

परळी दि.२०:आठवडा विशेष टीम– पंकजाताई मुंडे आणि भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा खासदार डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या वतीने बीड जिल्हयात वाढीव वीज बिलाच्या विरोधात आज झालेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून परळीत संचारबंदी असल्याने वीज वितरण कंपनीच्या अधिका-यांना निवेदन देण्यात आले, लाॅकडाऊन काळातील शेतकरी आणि व्यापा-यांचे वीज बिल माफ करावे तसेच सर्वसामान्य ग्राहकांचे वाढीव वीजेची बिले कमी करावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली.

महावितरण वीज कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे शहर व ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना मिटर रिडिंग न घेता अवाजवी बिलाची आकारणी होत आहे. कोरोना महामारीमुळे शेतकरी, व्यापारी आणि सर्व सामान्य जनता आर्थिक कोंडीत सापडली असताना वीज कंपनी मात्र जाणूनबूजून अन्याय करत आहे. या अनागोंदी कारभाराकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच ग्राहकांच्या न्याय हक्कासाठी पंकजाताई मुंडे व खासदार डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज भाजपच्या वतीने वीज कंपनीला निवेदन देण्यात आले. लाॅकडाऊनच्या काळात व्यापा-यांची दुकाने बंद होती, त्या बंद काळातील वीज बिल माफ करावे, कृषी पंपाचे वीज बिल माफ करावे, घरगुती वापराच्या मीटरचे रिडिंग न घेता लावलेले वाढीव बिले कमी करून द्यावे अशी मागणी करणारे निवेदन वीज कंपनीला तर नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन लाॅकडाऊन कालावधी आता वाढवू नये अशा मागणीचे निवेदन उप जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. निवेदन देण्यास गेलेल्या शिष्टमंडळात भाजपचे ज्येष्ठ नेते राजेश देशमुख्, जीवराज ढाकणे, तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, नीळकंठ चाटे, रवि कांदे, उमेश खाडे, पवन मुंडे, राजेंद्र ओझा, नितीन समशेट्टे, योगेश पांडकर, श्रीराम मुंडे, अरूण पाठक विजयकुमार खोसे, गोविंद चौरे,रमेश गायकवाड आदी उपस्थित होते.

महावितरण करतंय ग्राहकांची लूट ; पाटोदा भाजपने केला आंदोलन करून निषेध व्यक्त

पाटोदा:आठवडा विशेष टीम―
भारतीय जनता पक्षाच्या वतीने मांजरसुभा रोड वरील विद्युत महावितरण कार्यालयासमोर महावितरण कंपनीने वीज ग्राहकांना केलेल्या अवाजवी वीज बीलाच्या विरोधात वीज बिलाची होळी करून झोपचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी पाटोदा भाजपच्या वतिने हालगी बजाओ आंदोलन भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा लोकप्रिय खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या आदेशावरून व भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी बीड जिल्हाध्यक्ष मा.रमेश भाऊ पोकळे, भाजपा बीड जिल्हाध्यक्ष मा.राजेंद्र मस्के, मा.आ.भीमरावजी धोंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले यावेळी भाजपाच्या कार्यक्रत्यानी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणा बाजी करीत सरकारचा निषेध नोदून आवाजवी बील आकारणार्या सरकारचा धिक्कार असो,वीज बिल माफ झालेच पाहिजे जास्त बील देऊन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या सरकारचा निषेध वीज बिलाची होळी केली यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर घुमरे,भाजपा जेष्ठ नेते मधुकर गर्जे,अनुरथ सानप,पचायत समिती सभापती पत्ती काकासाहेब लाबरुड,देविदास शेडगे,अनिल जायभाये,गणेश कोकाटे,शामराव हुले,नवनाथ सानप,डॉ नरेद्र जावळे,दादाराव बांगर,विनोद बांगर, प्रफुल्ल सानप,प्रदिप नागरगोजे,संपत नागरगोजे,रावसाहेब बांगर,सुरेश पवार,महादेव जरे,बर्दीनाथ पवार, भाजपा तालुका पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य सभापती, उपसभापती, बुथ प्रमुख ,शक्तीकेंद्र प्रमुख, गट प्रमुख, गण प्रमुख तसेच विधुत ग्राहक उपस्थित होते.

संघर्षयोद्ध्याच्या वाढदिवस सेवा सप्ताहानिमित्त संस्कार शाळेची विद्यार्थ्यांना अनोखी भेट ; नवनीत पब्लिकेशनचे TOP SCORER सॉफ्टवेअर विद्यार्थ्यांना मिळणार वर्षभरासाठी विनामूल्य

परळी:आठवडा विशेष टीम― शहरातील पद्मावती शिक्षण संस्थेची संस्कार शाळा नेहमीच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगिन विकासाला केंद्रबिंदू मानत नाविन्यपूर्ण असे शैक्षणिक संस्कृतिक तथा विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवत असते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार व संघर्षयोद्धा तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत वाढदिवस सेवा सप्ताहानिमित्त शाळेच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या नवनीत पब्लिकेशन चे अतिशय महागडे असणारे TOP SCORER हे सॉफ्टवेअर शाळेतील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी अगदी मोफत देणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव दीपक तांदळे यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दि 15 जुलै ते 22 जुलै दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री ना अजित दादा पवार व सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आधार महोत्सव साजरा करण्यात येतो. या महोत्सवादरम्यान सामाजिक जाणिवेतून विविध लोकोपयोगी कार्यक्रम घेतले जातात परंतु यावर्षी कोरोनाच्या संकटाने अख्खे जग ग्रासले असून सर्वच ठिकाणी व परळीत देखील कोरोना चे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर येथे आधार महोत्सवाच्या ऐवजी या दोन्ही लाडक्या नेत्यांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे या सेवा सप्ताहात देखील विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत

आज मितीस सर्वत्र कोविड 19 संक्रमणाचे संकट असून सर्व जग जणू ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे याचा शैक्षणिक क्षेत्रासही मोठा फटका बसला असून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक संस्था तात्पुरत्या स्वरूपात सध्याच्या घडीला तरी बंदच आहेत. दरम्यान सर्वत्र ऑनलाइन शिक्षणपद्धतीचा अवलंब केला जात असून हीच बाब लक्षात घेऊन आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या काळजी पोटी परळी शहरातील नावाजलेल्या पद्मावती शिक्षण संस्थेच्या संस्कार शाळेच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार व सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवस सेवा सप्ताहानिमित्त संस्थेचे सचिव दीपक तांदळे यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणाऱ्या नवनीत पब्लिकेशन चे अतिशय महागडे असणारे TOP SCORER सॉफ्टवेअर आपल्या शाळेतील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी वर्षभरासाठी पूर्णतः मोफत देण्याचे ठरविले असून ही या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक विकासाच्या दृष्टिकोनातून एक अनमोल भेट ठरणार आहे या सॉफ्टवेअरमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा मार्ग अधिक सुखकर होण्यास मदत मिळणार असून घरबसल्या शिक्षण प्राप्त करण्यास ही मदत मिळणार असल्याची माहिती शाळेच्या व्यवस्थापनाने दिली आहे

दरम्यान नेहमीच आपल्या शालेय विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सांस्कृतिक तथा सामाजिक उन्नतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या संस्कार शाळेमध्ये सदैव विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीकोनातून नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबविले जातात याअगोदरही शाळेच्या व्यवस्थापनाने ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करत व्हिडिओ टिचिंग व व्हाट्सअप चा वापर करत आधुनिक पद्धतीने ऑनलाइन शिक्षण दिले आहे. परंतु आता आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब केलेल्या नाविन्यपूर्ण असणाऱ्या नवनीत च्या या TOP SCORER सॉफ्टवेअरमुळे व्हिडिओच्या माध्यमातून विविध शैक्षणिक संकल्पना तथा प्रश्नावली समजून घेण्यास मदत मिळणार असून यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची रुची निर्माण होण्यासही मदत मिळणार आहे आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या संस्कार शाळेच्या व्यवस्थापन समिती शिक्षक वृंद इतर स्टाफ व मुख्यत्वे संस्थेचे सचिव दीपक तांदळे यांचे पालक वर्गातून आभार व्यक्त केले जात आहेत या उपक्रमामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

१५०० विद्यार्थ्यांना मिळणार लाभ–

शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या नवनीत पब्लिकेशन चे हे TOP SCORER सॉफ्टवेअर अतिशय उच्च दर्जाची शिक्षण प्रणाली राबवते. यामुळे विद्यार्थ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या शैक्षणिक संकल्पना समजून घेण्यात मदत मिळेल व अभ्यासही अधिक सुकर होईल व अभ्यासातील रुची ही वृद्धिंगत होईल या सर्वच बाबींचा विचार करून हे सॉफ्टवेअर आम्ही आमच्या विद्यार्थ्यांकरीता आगामी वर्षभरात करिता अगदी मोफत देत असून पहिली ते सातवी च्या जवळपास 1500 विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
– दिपक तांदळे, सचिव संस्कार शाळा परळी वै

विजबील अवास्तव देऊन ग्राहकांची फसवणुक करणार्‍या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी भाजपचे पाटोदा येथे आंदोलन – तालुकाध्यक्ष सुधीर घुमरे

[the_ad id=”10155″] पाटोदा दि.१९:आठवडा विशेष टीमभारतीय जनता पक्षाच्या वतीने उद्या दिनांक 20 जुलै रोजी मांजरसुंबा रोड वरील विधुत महावितरण कार्यालयासमोर महावितरण कंपनीने वीज ग्राहकांना केलेल्या अवाजवी वीज बीलाच्या विरोधात वीज बिलाची होळी करून झोपचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी हालगी बजाओ आंदोलन करण्यात येणार आहे हे आंदोलन भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा लोकप्रिय खासदार डॉ प्रितमताई मुंडे ताईसाहेब यांच्या आदेशावरून व भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य माजी बीड जिल्हाध्यक्ष मा. रमेश भाऊ पोकळे, भाजपा बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब, आमदार सुरेश आण्णा धस यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होणार आहे, भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य सभापती, उपसभापती, बुथ प्रमुख ,शक्तीकेंद्र प्रमुख, गट प्रमुख, गण प्रमुख नागरिक यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे अशी विनंती भाजपा पाटोदा तालुकाध्यक्ष ऍडव्हाकेट सुधीर घुमरे यांनी केली आहे.

दलित शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या माध्यप्रदेश पोलिसांवर कठोर कारवाई करा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि. 19:आठवडा विशेष टीम― मध्यप्रदेश मधील गुणा शहराजवळ शेती करणाऱ्या दलित शेतकऱ्याला तो कसत असलेली जमीन खाली करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधिकऱ्यांनी कारवाई करून पोलिसांनी दलित शेतकरी राजकुमार अहिरवार यांस बेदम मारहाण केली. त्या प्रकरणाचा रिपब्लिकन पक्षातर्फ़े तीव्र निषेध करून या दलित शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या पोलिसांवर तसेच जिल्हा प्रशासनाच्या जबाबदार अधिकऱ्यांवर निलंबनाची कठोर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे. या प्रकरणी ना रामदास आठवले यांनी मध्यप्रदेश चे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस ( डीजीपी) यांच्या शी संपर्क साधून या प्रकरणी जबाबदार पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी ना रामदास आठवले यांनी केली.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या राज्य सरकार ने या प्रकरणी जबाबदार जिल्हा अधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांची बदली केली आहे मात्र केवळ बदली न करता जबाबदार अधिकऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे.
राजकुमार अहिरवार या दलित शेतकऱ्याने कसलेल्या जमिनीचा ताबा सोडण्याची तयारी दाखविताना आलेले पीक काढून घेतल्यानंतर जमीन खाली करून देण्याची विनवणी केली मात्र प्रशासनाच्या मुजोर अधिकाऱ्यांनी गरीब दलित शेतकऱ्याची विनंती धुडकावून लावून त्यास जबर मारहाण केली. या अपमानाने व्यथित झलेल्या शेतकरी दाम्पत्याने पोलीस आणि प्रशासनाच्या अन्यायाच्या निषेधार्थ विष प्राशन केले. राजकुमार अहिरवार आणि त्यांची पत्नी रेखा अहिरवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती आपणास मध्यप्रदेश चे डिजीपिंनी दिली असल्याचे ना रामदास आठवले यांनी सांगितले.


#मोठी बातमी…पंकजा मुंडेंची केंद्रीय कार्यकारिणीत वर्णी लागणार ?

दिल्ली/वृत्तसंस्था:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्रातील विधानसभेचे सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या भारताची राजधानी असलेल्या दिल्लीत आहेत. शुक्रवारी दिल्लीत दाखल झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मंत्र्यांच्या भेटी घेतल्या असल्याचे सूत्रांकडून समजते. दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये पंकजा मुंडे ,विनोद तावडे या दिग्गज नेत्यांसह शेलार व निलंगेकर यांना देखील स्थान मिळण्याचं निश्चित झाले आहे. याबाबत सूत्रांकडून विशेष माहिती मिळत आहे. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत आज देवेंद्र फडणवीस यांची भेट होणार असल्याची देखील चर्चा आहे.

दरम्यान , एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता या नेत्यांना कार्यकारणीत फक्त विशेष निमंत्रित म्हणून स्थान देण्यात आले आहे. तर महाराष्ट्र राज्याच्या रणरागिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंकजा गोपिनाथ मुंडे यांना केंद्रात संधी मिळणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. त्यानंतर आता पंकजाताई मुंडे यांची भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत निवड होत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

औरंगाबाद: पालकमंत्र्यांनी घेतली घोसला गावाच्या शेती नुकसानीची दखल ,कन्नडच्या आमदाराकडून पाहणी

सोयगाव,दि.१७:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
धरणाचा सांडवा चुकीच्या दिशेने काढल्यामुळे घोसला गावात ढगफुटी होवून गुरुवारी आलेल्या पुराच्या प्रलयाबाबत मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोपान गव्हांडे यांनी शुक्रवारी पालकमंत्री सुभाष देसाई यांचेशी नुकसानीबाबत फोनवरून चर्चा करताच कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी शुक्रवारी घोसला गावाच्या नुकसानीबाबत पाहणी करून शेतकऱ्यांना शासन पातळीवरून नुकसान भरपाई देण्याबाबत आश्वासन देवून तालुका प्रशासनाच्या पथकाला पंचनामे करण्याबाबत सूचना दिल्या आहे.
घोसला गावावर गुरुवारी झालेल्या ढग फुटीच्या पावसाने धरण ओव्हरफ्लो होवून धरणाचा सांडव्याची दिशा चुकीच्या पद्धतीने काढल्याने या धरणाच्या पुराचे पाणी नदीचा प्रवाह शेतात शिरून पिकांना पाण्यासोबत वाहून गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या पुरात तब्बल ८० एकर क्षेत्र बाधित झाले असून शंभर टक्के नुकसान झाल्याची माहिती आमदार उदयसिंग राजपूत यांनी दिली.मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोपान गव्हांडे यांनी ग्रामस्थांच्या वतीने नुकसान भरपाई बाबत निवेदन दिले.यावेळी बाधित शेतकऱ्यांसमवेत उपजिल्हा प्रमुख राजू राठोड,चंद्रकांत पाटील,तहसीलदार प्रवीण पांडे,नायब तहसीलदार सतीश देशमुख,तलाठी ललित पाटील,आप्पा वाघ,निलेश सोनार,श्रावण युवरे,समाधान सोनवणे,एकनाथ गव्हांडे,आदींसह शंभर शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

शेतकऱ्यांना अपशब्द बोलणाऱ्या तलाठ्याला धारेवर धरले –

नुकसानीची माहिती देतांना घोसला सज्जेच्या तलाठ्याने शेतकऱ्यांना अपशब्द वापरून बोलाल्याप्रकारणी केलेल्या तक्रारीवरून आमदार उदयसिंग राजपूत यांनी संबंधित तलाठ्याला धारेवर धरून शेतकऱ्यांना अपशब्द बोलणाऱ्या या तलाठ्यावर जिल्हाधिकारी औरंगाबाद यांची भेट घेवून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

आमदाराच्या दौऱ्यात कृषी विभाग आणि गावपातळीवरील ग्रामसेवक गैरहजर असल्याबाबत शेताकायांनी आमदार उदयसिंग राजपूत यांचेजवळ रोष व्यक्त करून थेट तालुका प्रशासनाच्या आणि आमदार उदयसिंग राजपूत यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान गैरहजर ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

घोसला गावाजवळ जिल्हा परिषद सिंचन विभागाचे धरण आहे,या धरणाला ढग फुटीच्या पावसात ओव्हरफ्लो झाल्याने सांडवा चुकीच्या दिशेने काढल्यामुळे पाण्याचा प्रवाह शेतात उतरल्याने तब्बल ५० शेतकऱ्यांचे ८० एकरवरील पिके पुराच्या तडाख्यात वाहून गेल्या प्रकरणी संबंधित धरणाच्या मुख अभियंत्यास दूरध्वनीवरून धारेवर धरून सांडवाचे काम करण्याच्या सूचना आमदार उदयसिंग राजपूत यांनी दिल्या आहे.

महाविकास आघाडी सरकारकडून बीड जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री पिक योजनेत न्याय – वसंत मुंडे

परळी:आठवडा विशेष टीम― महा विकास आघाडी सरकार तर्फे बीड जिल्ह्यासाठी “खास बाब” म्हणून प्रधानमंत्री पिक विमा योजना उद्यापासून शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी आदेश प्राप्त झाल्याची माहिती काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार यांनी दिली आहे. महाराष्ट्र शासनाकडून “खास बाब”म्हणून प्रस्ताव तयार करून व त्यास मंत्रिमंडळ उपसमितीची मान्यता घेऊन कृषिमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शासन निर्णय क्र. प्रपिवियो_2019/ प्र.क्र.184/11-अ, दिनांक 30 जानेवारी 2020 ला मंत्री उपसमिती गठीत करण्यात आलेली होती. त्यावर केंद्र सरकारकडे रब्बी व खरीप पीक विमा संदर्भात महाराष्ट्र शासन व कृषी विभागामार्फत बीड जिल्ह्याचा “खास बाब” म्हणून समाविष्ट करण्यासंदर्भात दिनांक 7 जुलै 2020 ला आदेश देण्याची विनंती भारत सरकार कृषी विभाग नवी दिल्ली यांना केली होती. त्यावर भारत सरकार कृषी विभागाकडून दि 14 जुलै 2020 ला डॉ .आशिष कुमार भूतानि सहसचिव कृषी विभाग कृषी भवन नवी दिल्ली पत्र नं.13012/10/2016 क्रेडिट 2 एफ टी एस नं39468 ने आदेश मा. एकनाथ डवले प्रधान सचिव कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांना केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे आदेश प्राप्त झाले त्यावर राज्य सरकार कडून दि 16/7/ 2020 ला वित्त विभाग अ नौ सं.क्र 113/2020 यय-1ने मान्यता प्राप्त झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या उपसमितीने आज दि 17 जुलै 2020 ला तातडीची बैठकीत मान्यता देऊन कृषी विभाग शासन निर्णय क्रमांक प्रपिवियो2020/ 40/11अ दि 17 /7 /2020 अशी बीड जिल्ह्यासाठी “खास बाब “म्हणून प्रधानमंत्री पिक विमा योजना समावेश चालू हंगाम 2020 ते 2023 पर्यंत खरीप रब्बी पीक विम्यासाठी मान्यता देण्यात तीन वर्षाकरिता आलेली आहे . प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत बीड जिल्ह्यासाठी “खास बाब “शेतकऱ्यांनी पीक संरक्षित रक्कम विमा हप्ता रक्कम कर्जदार शेतकरी बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा हप्ता सबसिडी विमा संरक्षित रकमेचे 2% टक्के नगदी व्यापारी पिकासाठी 5% टक्के रक्कम भरायची आहे. त्यासाठी 7/12, 8अ चा उतारा ,आधार कार्ड, पीक पेरा प्रमाणपत्र व बँकेचे खाते पासबुक कागदपत्रे देणे बंधनकारक आहे .नियमानुसार विमा भरावा भारत सरकारची एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीने बीड जिल्ह्यासाठी “खास बाब” म्हणून महा विकास आघाडी सरकारने सर्व नियमांतर्गत 70% जोखीम स्तर संदर्भात हमी आहे करिता सर्व शेतकऱ्यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभाग घेण्याचे आव्हान काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केले आहे.