पशुसंवर्धन पदविका धारकांना शासनाने नोंदणीकृत करून स्वतंत्र पशुवैद्यकीय व्यवसायास परवानगी द्यावी !

बीड दि.०४ ऑगस्ट २०२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत करून त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून वाड्या-वस्त्यांवर पशुसेवा अगदी कमी वेळात पोहचेल व गाई-म्हशीचे प्राण वाचेल.शासन दुधाचा महापूर आणण्यासाठी प्रयत्न करते योजना आखते परंतु त्यात मोलाचा वाटा असणारे पशुसंवर्धन पदविकाधारकांच्या नोंदणीच्या वेळी मात्र काणाडोळा करते.असे न करता शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून प्रथमतः पशुसंवर्धन पदविका धारकांना कायदेशीर पशुवैद्यक म्हणून घोषित करावे व त्यांची नोंदणी करून त्यांना नोंदणीक्रमांक द्यावा अशी मागणी जोर धरून आहे. १९८४ च्या कायद्यात बदल करावा, पशुसंवर्धन पदवीकाधारकांना व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे मात्र शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसून कृषीप्रधान देशातच पशूंकडे शासनाचे लक्ष नसल्याचे समोर येत आहे.

पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ कलमाअंतर्गत व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीमधून पशुसंवर्धन पदवीधारकांच्या राज्यव्यापी परिषदेची नियुक्ती करून स्वतंत्ररीत्या औषधे बाळगणे व नोंदणीकृत व्यवसाय परवाना उपलब्ध करून द्यावा.राज्यातील रिक्त पशुधन पर्यवेक्षक पदांची तत्काळ भरती करण्यात यावी.खासगीरीत्या असंघटित क्षेत्रात भारतीय पशुचिकित्सक परिषद कायद्यान्वये किरकोळ व प्राथमिक स्वरूपाच्या पशुवैद्यकीय उपचार सेवा पदवीधारक डॉक्‍टरच्या सुपरव्हिजन व माध्यमांचा वापर करून आपले कार्य पार पाडतात अशा सर्व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीप्रमाणपत्र व ओळखपत्र देऊन पशुसेवेचे कार्य सुरू ठेवण्यासाठी बळ द्यावे.

करीना कपुर वर बीड मध्ये गुन्हा दाखल

बीड:नानासाहेब डिडुळ― अभिनेत्री करीना कपूरने ख्रिश्चन धर्मियांच्या पवित्र ग्रंथ बायबलचे नाव ‘प्रेग्नसी बायबल’ या पुस्तकात वापरले आहे. यामुळे ख्रिश्चन धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे याप्रकरणी बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करीना कपूर विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अभिनेत्री करीना कपूर विरोधात अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष आशिष शिंदे, जिल्हाध्यक्ष मॅथ्यू जोसेफ, नितीन शिंदे, ब्रदर अरूण गायकवाड, मरियन रेड्डी व किशोर पाटील यांनी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली होती. तसेच या संदर्भात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलीक व अल्पसंख्यांक आयोगाकडे तक्रार केलेली आहे.

#Nivar Cyclone – निवार चक्रीवादळाच्या तडाक्यात सापडलेल्या अनेकांना डॉ राजा थंगप्पन यांच्यासह टीमचा मदतीचा हात

चेन्नई दि.२६:आठवडा विशेष टीम निवार चक्रीवादळ गुरुवारी पहाटे अंधारातच तमिळनाडू मधील महाबलीपुरम येथे आले होते.त्यात अनेक कुटुंबांना अन्नपुरवठयाची गरज होती.त्यात एक खारीचा वाटा म्हणून डॉ राजा थंगप्पन (Dr. Raja Thangappan , Transworld Educare Pvt Ltd.) ,राजेश पिलाई (Mr. Rajesh Pillai) सह टीम ने गरिबांना मदत केली आहे.भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, या चक्रीवादळाचा धोका आता कमी झाला आहे. परंतु, तटीय भागांत जोराच्या वाऱ्यासोबत मुसळधार पाऊस सुरू आहे. पद्दुच्चेरी, तमिळनाडू कराईकल, नागापट्टनम आणि चेन्नईमध्ये कालपासून पाऊस सुरू आहे.पावसामुळे अधिकांश भागात पाणी भरल आहे.

अतितीव्र शक्तिशाली ‘निवार’ चक्रीवादळ किनाऱ्याला धडकण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती हवामान खात्याकडून बुधवारी रात्री उशिरा देण्यात आली होती.

ह्या चक्रीवादळाच्या तडाक्यात सापडलेल्या गोरगरिबांना अन्न वाटप डॉ राजा थंगप्पन सर ,
राजेश पिलाई ,किंग्स इंटरनॅशनल मेडिकल अकॅडमी ,दवाओ मेडिकल स्कुल फौंडेशन फिलिपीन्स सह डॉ डेविड पिलाई सर यांच्या संपूर्ण टीम ने तामिळनाडू येथील महाबलीपुरं येथे निवार चक्रीवादळग्रस्थांना जेवण वाटप केले आहे.त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे अनेक जणांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला आहे.

पंकजाताई मुंडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सचिव पदी निवड ; जगत प्रकाश नड्डा यांच्या ‘टीम’ मधील समावेशाने राष्ट्रीय राजकारणातही पाडणार छाप !

मुंबई दि.२७:ऋषिकेश विघ्ने― भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या ‘टीम’ मध्ये पंकजाताई मुंडे यांचा समावेश झाला असून त्यांच्यावर राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या समावेशाने आता राष्ट्रीय राजकारणातही त्यांचे नेतृत्व अधिक झळाळून निघणार आहे. दरम्यान, या निवडीबद्दल पंकजाताई मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष नड्डा यांचे आभार मानले आहेत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी आज पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. या नव्या कार्यकारिणीत पंकजाताई मुंडे यांच्यावर राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

पंकजाताई मुंडे यांच्याकडे महाराष्ट्रातील एक धडाडीच्या व आक्रमक नेत्या म्हणून पाहिले जाते. उत्कृष्ट वक्त्या, संघटन कौशल्य व काम करण्याची हातोटी या गुणांमुळे समाजातील सर्व जाती धर्मात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. सन २०१३ मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्राचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. या काळात तत्कालिन काॅग्रेस – राष्ट्रवादी सरकारच्या विरोधात त्यांनी काढलेली ‘एल्गार’ यात्रा चांगलीच गाजली होती. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनानंतर २०१४ मध्ये ‘पुन्हा संघर्ष यात्रा’ काढून त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता आणि याचाच परिणाम म्हणून २०१४ मध्ये महाराष्ट्रात भाजपला सत्ता मिळाली. दोन वेळा आमदार राहिलेल्या पंकजाताई मुंडे यांनी भाजप सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून अतिशय उत्कृष्ट काम केले. ग्रामविकास, जलसंधारण, महिला बालविकास व रोजगार हमी योजना आदी खात्याच्या माध्यमातून लोक कल्याणाच्या अनेक योजना यशस्वीपणे अमलात आणल्या. केवळ राजकारणातच नाही तर सामाजिक कार्यातही तितक्याच धडाडीने काम करणा-या पंकजाताई मुंडे यांनी स्त्री भ्रूण हत्यांच्या घटना विरोधात मोठी जनजागृती केली. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून वंचित पिडित घटकांना वेगवेगळ्या प्रकारची मदत तसेच सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यातून गोरगरिबांचे संसार उभा केले.

आता पक्षाने त्यांना राष्ट्रीय राजकारणात काम करण्याची संधी दिल्याने इथेही त्यांच्या नेतृत्वाची चूणूक दिसल्याशिवाय राहणार नाही. पंकजाताई मुंडे यांच्या नियुक्ती बद्दल महाराष्ट्रातील तमाम भाजप कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला असून बीड जिल्हयात परळीसह ठिक ठिकाणी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.

नेतृत्वाचे मानले आभार

या निवडीबद्दल पंकजाताई मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष, सह सरचिटणीस व्हि. सतीश यांचे आभार मानले आहेत.


महाराष्ट्राला जीएसटी परताव्यापोटी १९ हजार २३३ कोटींचा निधी

नवी दिल्ली दि.२७:आठवडा विशेष टीम― आर्थिक वर्ष २०१९-२० च्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) परताव्याचा महाराष्ट्राच्या वाट्याचा १९ हजार २३३ रुपयांचा निधी आज केंद्र शासनाने जारी केला. केंद्रीय अर्थमंत्रालयाने आज देशातील राज्य व केंद्रशासित प्रदेशांना आर्थिक वर्ष २०१९-२०च्या जीएसटी परताव्याचा १ लाख ६५ हजार ३०२ रूपयांचा निधी जारी केला आहे. याच कालावधीत देशात उपकरापोटी ९५ … Read more

#मोठी बातमी…पंकजा मुंडेंची केंद्रीय कार्यकारिणीत वर्णी लागणार ?

दिल्ली/वृत्तसंस्था:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्रातील विधानसभेचे सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या भारताची राजधानी असलेल्या दिल्लीत आहेत. शुक्रवारी दिल्लीत दाखल झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मंत्र्यांच्या भेटी घेतल्या असल्याचे सूत्रांकडून समजते. दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये पंकजा मुंडे ,विनोद तावडे या दिग्गज नेत्यांसह शेलार व निलंगेकर यांना देखील स्थान मिळण्याचं निश्चित झाले आहे. याबाबत सूत्रांकडून विशेष माहिती मिळत आहे. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत आज देवेंद्र फडणवीस यांची भेट होणार असल्याची देखील चर्चा आहे.

दरम्यान , एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता या नेत्यांना कार्यकारणीत फक्त विशेष निमंत्रित म्हणून स्थान देण्यात आले आहे. तर महाराष्ट्र राज्याच्या रणरागिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंकजा गोपिनाथ मुंडे यांना केंद्रात संधी मिळणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. त्यानंतर आता पंकजाताई मुंडे यांची भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत निवड होत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

विकास दुबे चा एन्काऊंटर ,पोलिसांच्या चकमकीत कुख्यात गुंड राजकारणी दुबे ठार

कानपूर /वृत्तसंस्था दि.१०:आठवडा विशेष टीम कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड विकास दुबे चकमकीत मारला गेला असल्याचे वृत्त आहे. त्याला उत्तर प्रदेश UP Police पोलिस कानपूरला घेऊन आले. मात्र कानपूरमध्ये येताच पोलिसांची गाडी पलटी झाली. यावेळी विकास दुबेने एका पोलिसाची बंदूक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि कुख्यात गुन्हेगार विकास दुबेदरम्यान चकमक झाली. या चकमकीत विकास दुबेचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. कानपूरमधील भौती परिसरात ही घटना घडली. पोलिसांच्या फायरिंगमध्ये गंभीर जखमी झाला होता. सूत्रांच्या माहितीनुसार कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेच्या कमरेत गोळी लागली होती. एक पोलिस देखील जखमी झाला होता. दोघांनाही जवळच्या हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी दुबेला मृत घोषित केले असल्याचे वृत्त सध्या आहे.

विकास दुबे हा खतरनाक, कुख्यात गुन्हेगार आहे. दुबेच्या विरोधात अनेक गुन्ह्यांच्या नोंदी आहेत. त्यात खुन, अपहरण, खंडणी सारखी प्रकरनाचा देखील समावेश आहे. विकास दुबे याने २००१ मध्ये एका पोलीस स्टेशनमध्ये घुसून तत्कालिक राज्यमंत्री शुक्ला यांची गोळी मारुन हत्या केली होती.

धोकेबाज राष्ट्र असलेल्या चीनच्या निषेधार्थ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाने केले राज्यभर निषेध आंदोलन

मुंबई दि.२०:आठवडा विशेष टीम― चीन ने लडाख येथील गलवान खोऱ्यात भारतीय जवानांवर पूर्व नियोजितपणे कट करून हल्ला केला. त्या हल्ल्याचा प्रतिकार भारतीय सैनिकांनी केला त्यात 20 भारतीय जवान शहीद झाले. त्या शूर वीर भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करून आज रिपब्लिकन पक्षातर्फे राज्यभर धोकेबाज राष्ट्र चीनच्या निषेधार्थ तीव्र निदर्शने करीत निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात चीन चे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या प्रतिमेचे आणि चिनी ध्वजाचे दहन तसेच चीन मुर्दाबादच्या घोषणा फलक घेऊन आंदोलन करण्यात आले.
मुंबईत बांद्रा येथे ना रामदास आठवले यांच्या बंगल्याच्या बाहेर ना रामदास आठवले यांच्या पत्नी सौ सीमाताईं आठवले यांनी चीन चा निषेध करणारे फलक हाती घेऊन आंदोलनात सहभाग घेतला. बांद्रा येथील जिल्हा अधिकारी कार्यलयाबाहेर रिपाइं चे सिद्धार्थ कासारे। विवेक पवार; अमित तांबे यांनी निदर्शने करीत चीन चा निषेध केला. मुलुंड येथे योगेश शिलवंत; ताडदेव येथे सोना कांबळे ; दहिसर येथे दिलीप व्हावळे ; गोरेगाव येथे रामेश पाईकराव यांनी चीन विरुद्ध निषेध आंदोलन केले.
तसेच राज्यात सोलापूर येथे रिपाइं चे राज्य सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांच्या नेतृत्वात चीनच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. कल्याण मध्ये रिपाइं चे दयाळ बहादुरे ; अण्णा रोकडे; अरुण पाठारे ; मीनाताई साळवी आदींनी चीन विरुद्ध आंदोलन केले.
तसेच उद्या रविवारी दुपारी 2 वाजता मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे; ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गरुड यांच्या नेतृत्वात घाटकोपर पश्चिम सर्वोदय सिग्नल येथे चीन च्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.


चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी चिनी ऍप टीकटॉक वर भारतात बंदी आणावी―रामदास आठवले

महाराष्ट्र्र सरकार ने चीनी कंपन्यांशी केलेला करार रद्द करण्याची आठवलेंची मागणी

चीन विरोधात रिपाइंचे उद्या शनिवारी दि.20 जून रोजी राज्यभर आंदोलन

मुंबई दि.१९:आठवडा विशेष टीम― चीन ची आर्थिक कोंडी करण्यासाठी सर्व मार्गांचा वापर भारताने केला पाहिजे. भारतात 15 करोड लोक वापरत असलेल्या टिकटॉक या चिनी व्हिडीओ ऍप मुळे चीन ला कोट्यावधींचा फायदा होतो. ते रोखण्यासाठी आणि चीनची आर्थिकदृष्ट्या कंबर मोडण्यासाठी चीन च्या मालावर जशी बंदी घालणे आवश्यक आहे तसेच चिनी व्हिडीओ ऍप टिकटॉक वर भारतात बंदी घालावी; माझी सर्व भारतीयांना नम्र विनंती आहे की त्यांनी चिनी व्हिडियो ऍप टिकटॉक चा बहिष्कार करावा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले आहे.

चीन ने लडाख च्या गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांवर नियोजनबद्ध भ्याड हल्ला केला. त्या हल्ल्याला भारतीय सैनिकांनी चोख उत्तर दिले त्यात 20 भारतीय शूर जवान शहीद झाले.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध आम्ही करीत असून उद्या धोकेबाज राष्ट्र असणाऱ्या चीन च्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षातर्फे राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. सुरक्षित अंतर ठेवून मास्क घालून रिपाइं चे कार्यकर्ते चीन च्या राष्ट्रध्वज जाळून चीन चा राज्यात सर्वत्र निषेध करणार आहेत.अशी घोषणा ना रामदास आठवले यांनी केली.

चीन विरोधात देशात संतापाची लाट उसळली असताना चीनच्या मालावर बहिष्कार टाकण्याचा विचार पुढे येत असताना महाराष्ट्र्र राज्य सरकार ने चीन मधील ग्रेट वॉल मोटर्स या कंपनीशी पुण्यातील तळेगाव येथे स्पोर्ट कार बनविण्याचा प्रकल्प उभा करण्यासाठी 7 हजार 600 कोटींचा करार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच केला आहे. हा करार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्वरित रद्द करावा आणि चीन ची आर्थिक कोंडी करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले आहे.


बीड: भारतीय सैन्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पाटोदयात चिनचा पुतळा जाळून चिनीमालावर बहिष्कार आंदोलन

पाटोदा:गणेश शेवाळे― भारतीय लष्करावर भ्याड हल्ला करणाऱ्या चीनला धडा शिकवण्यासाठी आमदार सुरेश धस मिञ मंडळाच्या वतिने चिनी वस्तूवर बहिष्कार आंदोलन करुन चिनी वस्तु खरेदी करुन नये म्हणून पुतळा जाळुन निषेध करण्यात आला याबाबत कि. भारतीय लष्करावर भ्याड हल्ला चीनने केला असुन यामध्ये भारतीय जवान शहिद झाले असुन या निषेर्धाथ पाटोदा नगरपंचायतसमोर या शहिदाना श्रद्धाजंली वाहण्यात आली तसेच यापुढे चिनी वस्तू वापरायच्या नाहीत त्याचप्रमाणे यावेळी चिनी वस्तुचा पुतळा करुन जाळण्यात आला.व निषेध करण्यात आला यावेळी प्रथम नगराध्यक्षपती बळीराम पोटे,माझी उपनगराध्यक्ष नय्युम पठाण,नगरसेवक संदीप जाधव,सभापती आसिफ सौदागर,सभापती राजु जाधव,बापु नवले सह आदीजण होते.

ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारवर सर्व समाज घटकांचा अतूट विश्वास ―रामदास आठवले

मुंबई दि.३०:आठवडा विशेष टीम― सबका साथ सबका विकास ही घोषणा देत पहिला 5 वर्षांचा कार्यकाळ यशस्वी केल्यानंतर दुसऱ्यंदा अभूतपूर्व बहुमताने पुन्हा मोदी सरकार निवडून आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास मिळवून काम करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार मोदी सरकारने दुसऱ्या टर्मच्या पहिल्याच वर्षात विविध निर्णय घेत ऐतिहासिक कामगिरी करीत सर्व समाज घटकांचा अतूट विश्वास जिंकण्यात यश मिळविले आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले आहे.

स्वातंत्र्यानंतर च्या काळात कोरोना महामारी ही देशातील सर्वात मोठे संकट ठरले आहे. या संकटाविरुद्ध लढण्यासाठी भारत सरकार ने योग्य वेळी लॉकडाऊन चा निर्णय घेऊन कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवल्याबद्दल संपूर्ण जगात भारत सरकारचा गौरव होत आहे आहे या अभिमानास्पद कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आपण अभिनंदन करीत असल्याचे ना. रामदास आठवले म्हणाले. कोरोना महामारीचा फटका संपूर्ण जगाला पडला असून आर्थिक औद्योगिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यातून उभे राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व प्रथम गरीब मजुरांसाठी 1लाख 72 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले त्यानंतर 20 लाख कोटींचे आत्मनिर्भर भारत अभियान चे महापॅकेज जाहीर करून देशवासियांना मोठा आधार दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या
नेतृत्वातील एनडीए सरकारने आपल्या दुसर्‍या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षात दलित, मागासवर्गीय , अल्पसंख्यांक, गरीब, शेतकरी, कामगार, महिला या सर्व घटकांच्या कल्याणासाठी ऐतिहासिक कामे केली आहेत.

जम्मू काश्मीर ची घटना वेगळी असल्याने तिथे अन्य राज्यातील उद्योजकांना उद्योग उभारण्यास परवानगी नव्हती.त्यामुळे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय जम्मू काश्मीर चा विकास होण्यास ऐतिहासिक निर्णय ठरला आहे. मुस्लिम महिलांना न्याय देण्यासाठी तीन तलाक रद्द करणारा कायदा मंजूर केला. 1989 मध्ये मंडल आयोगामुळे राष्ट्रीय ओबीसी आयोगाची स्थापना झाली त्यानंतर 30 वर्षापर्यंत कोणत्याही सरकारने ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिला नव्हता मात्र मोदी सरकारने ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. दिव्यांगजनांना नोकरी मध्ये 4 टक्के आरक्षण आणि शिक्षणामध्ये 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. दिव्यांगजनांसाठी सुगम्य भारत योजना राबवून 15 लाख पेक्षा अधिक दिव्यांगजनांना मोफत सहाय्यक उपकरणे देण्यात आली आहेत. दिव्यांगजन कल्याण महामंडळ दिव्यांगजणांच्या विकासासाठी कार्यरत आहेत.

कोरोना महामारीवर मात करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. लवकरच आपल्या सर्व देशवासियांच्या सहकार्याने कोरोना महामारीला नष्ट करण्यात केंद्र सरकार यशस्वी होईल.असा विश्वास ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

मागील वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने सर्व समाज घटकांच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या आहेत. जन धन योजना, उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना, किसान सन्मान निधी या इतर प्रमुख योजनांच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या रांगेत उभे असलेल्या व्यक्तींचे कल्याण केले गेले आहे. असे ना.रामदास आठवले म्हणाले.

मोदी सरकार च्या दुसऱ्या टर्म च्या पहिल्या वर्षाच्या कार्यकाळात सर्जिकल स्ट्राइकद्वारे दहशतवाद रोखण्यास मोठी मदत झाली आहे, दिव्यांग, दलित व मागासवर्गीयांच्या कल्याणासाठीही विशेष कायदे बनविण्यात आले. सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयामार्फत मागासवर्गीय, दलित आणि दिव्यांग लोकांच्या कल्याणासाठी असलेल्या प्रमुख योजनांसह सर्व पात्रांना 100 टक्के लाभ मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

केंद्र सरकार देशातील जनतेच्या आशा व आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. आगामी काळात देशाला सर्व क्षेत्रात ऐतिहासिक यश मिळेल असे सांगत ना. रामदास आठवले यांनी रिपाइं च्या देशभरातील लाखो कार्यकर्त्यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे.


वंदेभारत मिशन उपक्रमांतर्गत तीन हजारांहून अधिक नागरिक परदेशातुन महाराष्ट्रात

मुंबई दि.३०:आठवडा विशेष टीम― वंदेभारत मिशन उपक्रमांतर्गत महाराष्ट्रात २६ फ्लाईट्सच्या माध्यमातून ३ हजार ४५९ नागरिक परत आले आहेत. यात मुंबईतील प्रवाशांची संख्या ११३७ आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या १५७२ असून इतर राज्यातील प्रवाशांची संख्या ७५० इतकी आहे. दि. ७ जून २०२० पर्यंत साधारणत: आणखी सहा फ्लाईटस येणे अपेक्षित आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात ब्रिटन, सिंगापूर, फिलिपाईन्स, अमेरिका, बांग्लादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया या देशातून प्रवासी आले आहेत.
बृहन्मुंबईतील प्रवाशांना संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा हॉटेल्समध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर इतर जिल्ह्यातील तसेच राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठवण्याची व्यवस्था मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. तिथे गेल्यावर त्यांच्या जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांकडून आलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याची कार्यवाही केली जात आहे.
आलेल्या नागरिकांचे कडक क्वारंटाईन होईल यावर प्रशासनाचे कडक लक्ष असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात असून या नागरिकांचा प्रवासी पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठवले जात आहे. वंदे भारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीपणे पार पाडत आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांची जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षपदी निवड हा संपूर्ण जगाने भारताचा केलेला गौरव― रामदास आठवले

नवी दिल्ली दि.२७:आठवडा विशेष― जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अध्यक्षपदी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन यांची निवड झाल्याबद्दल आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी त्यांचे अभिनंदन केले. जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्षपद भारताकडे येणे हा जगाने भारताचा केलेला गौरव आहे. याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटत आहे असे ना रामदास आठवले म्हणाले.

कोरोना महामारी च्या संकटाविरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने केलेल्या उत्कृष्ट उपाययोजनांमुळे जगाने भारताचा गौरव करीत जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्षपद भारताला दिले आहे. हा बहुमान भारताचे आरोग्यमंत्री म्हणून डॉ हर्ष वर्धन यांना लाभल्याबद्दल त्यांचे आज आपण मनःपूर्वक अभिनंदन केले असल्याचे ना रामदास आठवले यांनी कळविले आहे.


#Saibaba शिर्डीचे श्री साईबाबा संस्थान देशासाठी सरकारला सोन देण्यास तयार 

मुंबई:आठवडा विशेष टीम― देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जान ताब्यात घ्यावे, अशी सूचना पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. चव्हाण यांच्या या सूचनेला शिर्डीच्या साई बाबा संस्थानने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शिर्डी हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे देवस्थान मानले जाते. संस्थानकडे सध्या सुमारे साडेचारशे किलो सोने आहे. भक्तांनी ते विविध प्रकारे दान म्हणून दिलेले आहे. संस्थानचे वार्षिक उत्पन्न ७०० कोटी असून विविध प्रकारचा वार्षिक खर्च ६०० कोटी रुपये इतका आहे. लॉकडाउनमुळे संस्थानच्या उत्पन्नात लक्षणीय स्वरुपात घट झाली आहे. मात्र, एफडी मोडून कर्मचाऱ्यांचा पगार केला आहे. शिर्डी संस्थानचे अध्यक्ष डॉ. हावरे यांनी संकटकाळात हे सोने देशाच्या उपयोगी येत असेल तर आम्हाला व साई भक्तांनाही आनंदच असल्याचे म्हटले आहे.

देशात कोरोना बाधितांचा आकडा ९६ हजार पार; आतापर्यंत देशात ३०२९ रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली:वृत्तसंस्था― देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु झाला आहेलॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मेपर्यंत लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊननंतरही देशात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. देशात मागील २४ तासात नवे ५२४२ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. जे एका दिवसात आतापर्यंतचे आढळून आलेले सर्वाधिक रुग्ण आहेत. तर मागील २४ तासांमध्ये १५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ९६ हजार १६९ लोकाना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ३०२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ३६ हजार ८२४ लोक कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेतदरम्यान, भारतात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मागील तीन दिवसांमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा दर १३.६ दिवसांवर आला आहे. तर मागील १४ दिवसांत हा दर ११.५ वर होता. देशात रविवारी कोरोना व्हायरसचे जवळपास पाच हजार नवे रुग्ण समोर आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यानी सांगितले की, मृत्यूदरात घट होऊन ३.१ टक्क्यांवर आला आहे. तर कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून हा दर ३७.५ टक्क्यावर पोहोचला आहे.भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या १०६ दिवसांमध्ये ८० हजारावर पोहोचली आहे. तर ब्रिटन, इटलीस्पेन, जर्मनी आणि अमेरिकेला या संख्येवर पोहोचण्यासाठी ४४ ते ६६ दिवस लागले होतेआठ राज्यात आणि केंद्र शासित प्रदेश तसेचअरुणाचल प्रदेश, चंदिगढ, लडाख, मेघालयमिझोरम, पद्दचेरी आणि अंदमान निकोबार द्वीप समूह आणि ददरा आणि नगर हवेलीमध्ये मागील २४ तासांत कोरोनाचा कोणताही रुग्ण समोर आलेला नाही. सिक्किम, नागालँड, दमन आणि दीव, लक्षद्वीपमध्ये आतापर्यंत एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब परराज्यातील १४ दिवस पुर्ण केलेल्या होम क्वारंटाईनांना घरी पाठवा ; त्यांचे नातेवाईक मृत्युमुखी पडलेत ,एकदिवसीय अन्नत्याग सुद्धा केला― डॉ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम―बीड तालुक्यातील मौजे चौसाळा येथे होम क्वारंटाईन केलेले ३२ जणांपैकी ५-६ जणांचे नातेवाईक मृत्युमुखी पडले आहेत, त्यांचा १४ दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी संपुन गेला असून त्यांची मानसिकता घरी तात्काळ जाण्याची असुन एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन सुद्धा केले होते, अशोकजी लोढा यांचा मायेचा आधार आहे परंतु घराची ओढ स्वस्थ बसु देत नाही म्हणुन विशेष बाब … Read more