पुलवामात शहिद झालेल्या भारतीय जवानांना मुस्लिम युथचे अभिवादन

अंबजोगाई मुस्लीम युथने काढला कँन्डल मार्च अंबाजोगाई (प्रतिनिधी) शहरातील मुस्लिम युथच्या वतीने पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना कँन्डल मार्च काढून अभिवादन करण्यात आले.या कँन्डल मार्चमध्ये सहभागी होवून अंबाजोगाई शहरातील सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रामधील सर्वपक्ष व संघटना यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. अंबाजोगाईतील अलफलाह ग्रुप, एस.के.ग्रुप,किरमाणी ग्रुप,अशियाना ग्रुप, मुस्लिम महासंघ,ह्युमन राईट्स संघटना,असरा … Read more

मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद ; विविध कर्मचारी संघटनांकडून पुलवामा शहीदांच्या कुटुंबियांसाठी मदत

ग्रामसेवक संघटनेकडून 2 लाख रुपयांचा तर लिपिक वर्गीय संघटनेकडून 11 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द

मुंबई, दि. २० : काश्मिरमधील पुलवामा येथील शहीदांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला – बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील विविध कर्मचारी संघटनांनी आज मंत्रालयात मदतीचे धनादेश मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे सुपूर्द केले.

भारताच्या शूरवीरांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी स्वेच्छेने आर्थिक योगदान देण्याचे आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी समाज माध्यमांद्वारे केले होते. त्यास प्रतिसाद देत पहिल्याच दिवशी मंत्रालयातील ग्रामविकास, महिला बालविकास विभागासह मंत्री कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एक लाख रुपयांपेक्षा जास्त मदतीचे धनादेश जमा केले. आज राज्यातील विविध कर्मचारी संघटनांनी मंत्री पंकजा मुंडे यांची मंत्रालयात भेट घेऊन मदतीचे धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केले.

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्यावतीने 2 लाख रुपयांच्या रक्कमेचा धनादेश संघटनेच्या प्रतिनिधींनी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे सुपूर्द केला. तसेच या संघटनेसह जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गाच्या संघटनांची भेट घेऊन सर्व कर्मचाऱ्यांकडून किमान 100 रुपयांचे योगदान स्वेच्छेने देणार असल्याचे संघटनेच्या माध्यमातून सांगितले. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटनेच्या प्रतिनिधींनी यावेळी 11 हजार रुपयांच्या मदतीचे योगदान दिले. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कृषीवर्गीय राजपत्रित संघटनेच्या प्रतिनिधींनी सर्व अधिकारी किमान 100 रुपयांचे योगदान स्वेच्छेने देणार असल्याचे संघटनेच्या माध्यमातून सांगितले.

मंत्री कार्यालयातील कर्मचारी अजय डहाके यांच्या पत्नी अंजली डहाके यांनीही आज १ हजार १ रुपये रकमेचा धनादेश दिला.

खाली दिलेल्या बँक अकाउंटमध्ये Bharat Ke Veer या नावाने बँक ट्रान्सफर किंवा धनादेश किंवा रोख रक्कम भरुन ह्या सत्कार्यामध्ये हातभार लावावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Account Name:- Bharat Ke Veer.
State Bank of India:- New Delhi Main Branch (0691).

Account Number:-36724508925

IFSC Code:- SBIN0000691

जरंडी ता.सोयगावला प्रतीकात्मक दहशतवाद्यांच्या पुतळ्याचे दहन,हिंदू मुस्लीम एकात्मतेचे दर्शन

सोयगाव,ता.१७(ज्ञानेश्वर धोंडू पाटील):जरंडी ता.सोयगावला पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या कृत्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी जरंडी भाजपा कार्यालयाजवळील बसस्थानक परिसरात हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकात्मतेचे दर्शन घडवीत दहशतवाद्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून जाळपोळ केली. पाकिस्तानातून दहशतवाद्यांनी भारतीय सेनादलाच्या ४२ जवानांना ठार मारल्याच्या कृत्याचा जरंडीला तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला होता.यावेळी हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकत्रित येत या घटनेचा निषेध व्यक्त करून तासभर घोषणा … Read more

पॉलीहाॅऊस-शेडनेटधारक शेतकऱ्यांची २० फेब्रुवारीला नगरमध्ये राज्यपरिषद

आठवडा विशेष | प्रतिनिधी

अकोले – राज्यातील पॉलीहाॅऊस-शेडनेटधारक शेतकऱ्यांची महत्वपूर्ण बैठक सोमवारी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे शेतकरी नेते डॉ.अजित नवले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत पॉलीहाॅऊस-शेडनेटधारक शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी २० फेब्रुवारी रोजी अहमदनगर येथे राज्यव्यापी परिषद घेण्याचा तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या तीन-चार वर्षात वेगवेगळ्या कारणांमुळे खर्चाच्या तुलनेत उत्पन्न फारच कमी येत असल्याने पॉलिहॉऊस-शेडनेटची शेती तोट्यात गेली आहे. परिणामी पॉलिहॉऊस-शेडनेटधारक शेतकरी कर्जाच्या खाईत सापडले. आर्थिक संकटामुळे बँक कर्ज हप्ते भरणे अशक्य झाल्यामुळे त्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार दिवसागणिक वाढत आहे. बँक कर्जखाते एनपीए झाल्याचे कारण देत एन.एच.बी. या सरकारी मंडळाने अनेकांना आधी देऊ केलेले प्रोत्साहनपर पन्नास टक्के अनुदान देण्यासदेखील नकार दिला आहे. त्यामुळे पॉलिहॉऊस-शेडनेटधारक शेतकऱ्यांची सर्वच बाजुने कोंडी झाली असून ते प्रचंड आर्थिक तणावात सापडले आहेत.
पॉलिहॉऊस-शेडनेटधारक शेतकऱ्यांचे हे दुखणे शासनदरबारी प्रभावीपणे मांडण्यासाठी पॉलिहॉऊस-शेडनेटधारकांची नुकतीच एक राज्यव्यापी संघटना स्थापन करण्यात आली. या संघटनेच्या प्रतिनिधींच्या सोमवारी पार पडलेल्या बैठकीत पॉलिहॉऊस-शेडनेटधारकांच्या विविध समस्यांवर सखोल चर्चा करुन त्या सोडविण्यासाठी आगामी काळात कशा पध्दतीचा लढा उभारावा यासंबधी रुपरेषा ठरविण्यात आली.
शेतमालाला अत्यल्प भाव मिळाल्याने पॉलिहॉऊस-शेडनेटची शेती तोट्यात गेली. त्यात शेतकऱ्यांचा काही दोष नाही. महागडे रोपे,खते,औषधे,मजुरी असा दैनंदिन खर्च पेलवणे या शेतकऱ्यांना अवघड जात असतांना वादळ,गारपीट या सारख्या कारणांमुळे पॉलिहॉऊसचा महागडा पेपर फाटणे आणि शेडनेटची जाळी खराब होणे ही नित्याची बाब झाली आहे. परिणामी उत्पादन खर्च भरमसाठ वाढला असतांना त्या तुलनेत हातात उत्पन्न येत नाही. त्यामुळे या प्रकारची शेती तोट्यात असली तरी त्या माध्यमातून ग्रामीण मजुरांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होत आहे ही बाबही महत्वाची आहे. तेव्हा सर्व अंगाने सारासार विचार करुन पॉलिहॉऊस-शेडनेटधारकांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी असा आग्रह बैठकीत धरण्यात आला. तसेच कर्जखाते एनपीए झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान नाकारणे हे चुकीचे व अन्यायकारक धोरण असल्याने ते बदलण्यात यावे,शासनाने पॉलिहॉऊस-शेडनेट शेतीला अनुकूल धोरण आखावे आदी मागण्या बैठकीत करण्यात आल्या.
या मागण्यांची तड लावण्यासाठी पॉलिहॉऊस-शेडनेटधारक शेतकऱ्यांची २० फेब्रुवारी रोजी अहमदनगर येथे राज्यव्यापी परिषद घेण्याचे ठरविण्यात आले. ही परिषद संपल्यानंतर नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून हे शेतकरी आपले गाऱ्हाणी मांडणार आहेत. याशिवाय राज्य संघटनेतर्फे याप्रश्नी न्यायालयीन लढा देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या परिषदेनंतर विविध पातळीवरुन मुंबई तसेच दिल्ली येथे लढा देण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. त्यासाठी राज्यातील सर्व कर्ज थकबाकीदार पॉलिहॉऊस-शेडनेटधारक शेतकऱ्यांच्या तालुकावार याद्या संकलित करण्याचेही बैठकीत ठरविण्यात आले.
राज्यव्यापी परिषद तसेच हा लढा यशस्वी करण्यासाठी एक समन्वय समिती गठित करण्यात आली आहे. समितीत अरविंद कापसे,किरण अरगडे
बाळासाहेब गडाख,बाळासाहेब दरंदले,महेश शेटे, सुजाता थेटे(नगर),प्रल्हाद बोरसे,शिवाजी तळेकर,(नाशिक),मनोज आहेर,अण्णा सुंब(औरंगाबाद),अनिरुध्द रेडेकर,शिवाजी नाईक(कोल्हापूर),संजय तळेकर,नामदेव जाधव(सोलापूर),विकास वाघ,भालचंद्र दौंडकर(पुणे) यांचा समावेश आहे.


भाजप सत्तेत आल्यास नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद नक्की!

मुंबई :- काँग्रेस पक्षाशी फारकत घेत स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन करून भाजपच्या गोटात सामील झालेले खासदार नारायण राणे लवकरच काँग्रेसमध्ये परत येतील, असे संकेत काँग्रेसच्या नेत्यांकडून मिळाले होते. मात्र अशातच नारायण राणे यांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाली. आणि राणे यांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले असून, लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचे सरकार सत्तेत आल्यावर नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद दिले जाण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नारायण राणे गेल्या काही दिवसांपासून भाजपवर नाराज आहेत आणि ते काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे, अशा बातम्या येत असतानाच झालेल्या या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीसाठी नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाने तीन जागांची मागणी केली आहे. यामध्ये रत्नागिरी-सिंधुदूर्ग, माढा आणि औरंगाबाद या तीन मतदारसंघांचा समावेश आहे. नारायण राणे यांचे ज्येष्ठ सुपूत्र नीलेश राणे यांच्यासाठी रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघाची मागणी करण्यात आली आहे. याच मतदारसंघाचे त्यांनी याआधी प्रतिनिधित्व केले आहे. रत्नागिरी-सिंधुदूर्ग हा लोकसभा मतदारसंघ सध्या शिवसेनेकडे आहे. तर औरंगाबादमध्येही शिवसेनेचेच चंद्रकांत खैरे खासदार आहेत. आता शिवसेना-भाजप युती झाली तर या मतदारसंघाचे काय होणार, ते राणे यांच्या पक्षासाठी सोडायला शिवसेना तयार होणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

ही बातमी पण वाचा : राणेंना पुन्हा कॉंग्रेसमध्ये थारा देऊ नका’

नारायण राणे हे जरी भाजपसोबत निवडणूक लढविणार असले, तरी ते भाजपचे चिन्ह घेऊन निवडणूक लढविणार नाहीत. ते त्यांच्या पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढविणार असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे भाजपसोबत असले तरी नारायण राणे स्वतःचा वेगळा झेंडा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

दरम्यान, नारायण राणे काँग्रेसमध्ये होते तेव्हा काँग्रेस नेत्यांनीच दिल्लीपासून गल्लीपर्यंत नारायण राणे भाजपमध्ये चालले, अशी बोंब केली. आता काँग्रेस नेतेच नारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये येणार, अशी बोंब करतात. आमची दिशा ठरली आहे, असे सूचक टि्वट राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी केले आहे.

गोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून झाल्याचा अमेरिकास्थित सायबर एक्स्पर्ट ‘सय्यद शुजा’चा दावा

स्व.गोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून झाल्याचा खळबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित सायबर एक्सपर्टनं केला आहे. त्यानं लाइव्ह प्रेस कॉन्फरन्स घेतली असून अनेक खळबळजनक दावे केले आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुका या आधीच फिक्स केल्या होत्या असा आरोप त्यानं केला आहे. गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू नवी दिल्लीमध्ये कार अपघातात झाला होता. परंतु शुजा … Read more

मुंबईत बुधवारपासून ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शन; देशभरातील बचतगटांची उत्पादने खरेदीची मुंबईकरांना संधी- मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती

आठवडा विशेष|प्रतिनिधी

मुंबई, दि. २१ : ग्रामीण भागातील बचतगटांच्या तसेच ग्रामीण कारागीरांच्या उत्पादनांच्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे येत्या बुधवारपासून (२३ जानेवारी) ४ फेब्रुवारीपर्यंत मुंबईत आयोजन करण्यात आले आहे. यंदा प्रदर्शनात राज्याच्या तसेच देशाच्या विविध भागातील बचतगट सहभागी झाले असून ५११ स्टॉलच्या माध्यमातून ते उत्पादनांची विक्री करणार आहेत. याशिवाय खाद्यपदार्थांचे ७० स्टॉल असून त्यातून मुंबईकरांना वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतींचा आस्वाद घेता येणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

वांद्रे कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदान क्रमांक १, ४, ५ व ६ येथे हे प्रदर्शन होणार आहे. बुधवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. मुंबईकरांनी प्रदर्शनास भेट देऊन ग्रामीण महिला बचतगट आणि कारागिरांना प्रोत्साहन द्यावे, तसेच त्यांच्या नानाविध अशा कलाकुसरी, उत्पादनांची खरेदी करावी, असे आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

मंत्रालयात आज यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यावेळी उपस्थित होत्या.

महालक्ष्मी सरस प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला बचतगटांना त्यांनी तयार केलेल्या वस्तू, उत्पादने, साहित्य, नाविन्यपूर्ण कला व खाद्यपदार्थ शहरी नागरिकांपर्यंत पोहोचविता येतात. मागील दीड दशकात या प्रदर्शनातून सुमारे ७ हजार ५०० बचतगटांनी मुंबईकरांना सेवा दिली आहे. प्रदर्शनात पाहिल्यावर्षी ५० लाख रुपयांची आर्थिक उलाढाल झाली होती. ती मागील वर्षी जवळपास १० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली,
अशी माहितीही मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी दिली.

दररोज अंदाजे २० हजार ग्राहक प्रदर्शनास भेट देतात. जळगावचे भरीत, खानदेशचे मांडे, कोकणातील मच्छी, तांदळाची भाकरी, कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा, सोलापुरी चटणी, राज्यातील विविध भागातील मसाले, हातसडीचा तांदुळ आदी खाद्य पदार्थांबरोबरच कोल्हापुरी चप्पल, सोलापुरी चादरी, वारली चित्रकला, हस्तकला, हातमागाच्या वस्तू, कलाकुसरीच्या वस्तू आदी विविध उत्पादने प्रदर्शनात यंदाही उपलब्ध होणार आहेत.

दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. २३ जानेवारी रोजी शशांक कल्याणकर, २५ जानेवारी रोजी हरिहरन, २७ जानेवारी रोजी अशोक हांडे, २८ जानेवारी रोजी साधना सरगम, २९ जानेवारी रोजी अनुप जलोटा तर २ फेब्रुवारी रोजी उदित नारायण यांच्या कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे.

ग्रामीण भागात आता ‘यलो रिव्होल्यूशन’

राज्यात ज्याप्रमाणे सहकारी दूध संस्थांमार्फत शेतकऱ्यांचे दूध संकलन करुन त्याला शहरी बाजारपेठ उपलब्ध करुन दिली जाते त्याच धर्तीवर ग्रामीण भागात कुक्कुटपालन करणाऱ्या महिला बचतगटांकडून उत्पादीत होणाऱ्या अंड्यांचे संकलन करुन त्यांना आता शहरी बाजारपेठ उपलब्ध करुन दिली जाणार आहे. हरित क्रांती, धवल क्रांतीसारखी ही पिवळी क्रांती (यलो रिव्होल्यूशन) असेल. यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकेल. पहिल्या टप्प्यात पालघर आणि धुळे जिल्ह्यात यासंदर्भातील पथदर्शी प्रकल्प (pilot project) सुरु करण्यात येत आहे, अशी घोषणाही मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी केली.

बचतगटांची उत्पादने अॅमेझॉननंतर आता ‘ई-सरस’वर

महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळामार्फत राज्यातील बचतगटांची उत्पादने अॅमेझॉन या संकेतस्थळावर उपलब्ध करुन त्यांना ई-कॉमर्सच्या परिघात आणण्यात आले आहे. आता उमेद अभियानाच्या माध्यमातून ई-सरसचे ऑनलाईन व्यासपीठ बचतगटांच्या उत्पादनांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे, अशी माहितीही मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी दिली. राज्यातील ग्रामीण महिला बचतगटांची उत्पादने ई-सरसच्या माध्यमातून देश-विदेशातील ग्राहकांपर्यंत पोहोचतील. यातून ग्रामीण महिलांच्या अर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.


कन्हैया कुमारवरील आरोपपत्रावर न्यायालयाचा मोठा निर्णय

टीम आठवडा विशेष|नवी दिल्ली – कन्हैया कुमार विरोधात दाखल केलेलं आरोपपत्र पटियाला हाऊस काेर्टानं फेटाळलं आहे. दिल्ली पोलिसांनी सोमवारी आरोपपत्र दाखल केलं होतं. कन्हैया कुमार विरोधात आरोपपत्र दाखल करताना राज्य सरकारच्या कायदा विभागाची परवानगी का घेण्यात आली नाही, असा सवाल न्यायालयानं पोलिसांना विचारला आहे. जेएनयुमध्ये कथित देशविरोधी घोषणा दिल्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी देशद्रोहाच्या गुन्ह्यात कन्हैया … Read more