राज्यासह देशातील विविध नोकरी विषयक जाहिराती – पोलीस भरती ,स्टाफ सलेक्शन सह इतर – पहा आजच्या नोकरी विशेष वर – २५ ऑगस्ट २०२२

[3d-flip-book mode=”fullscreen” id=”28945″ ][/3d-flip-book]

Police Bharti 2022: Uttar Pradesh Police 26210 Constable posts 2022 Apply Online uppbpb.gov.in -Age and Eligibility Criteria, Application fee, Salary ,Posts Details

Police Bharti 2022 – Uttar Pradesh Police Recruitment & Promotion Board (UPPRPB) released the Police Bharti 2022 Tender Notice on 7th Jan 2022 for 26210 Constable Posts recruitment and 172 Fireman Posts recruitment. The online form filling and submission process is going to begin shortly at UP Police bharti official website uppbpb.gov.in Interested candidates can … Read more

परळी-पनवेल, काकीनाडा-शिर्डी रेल्वे तीन तास लेट ; घाटनांदूर स्टेशन मास्तरचा र्‍हदयविकाराने मृत्यू

बीड:आठवडा विशेष टीम– अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर रेल्वे मास्तरने सलग २४ तास ड्युटी केली. मध्यरात्री ड्युटीवर असतानाच त्यांना र्‍हदयविकाराचा तिव्र झटका आला. बसल्या ठिकाणीच खुर्चीवर त्यांचा मृत्यू झाला. यामुळे सिग्नल न मिळाल्याने दोन रेल्वे सुमारे तीन तास परळी आणि पानगावच्या रेल्वे स्थानकातच अडकून पडल्या होत्या. हि घटना आज सोमवार दि.२८ रोजी पहाटेच्या सुमारास घडली. मुसाफिरसिंह (वय … Read more

पशुसंवर्धन पदविका धारकांना शासनाने नोंदणीकृत करून स्वतंत्र पशुवैद्यकीय व्यवसायास परवानगी द्यावी !

बीड दि.०४ ऑगस्ट २०२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत करून त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून वाड्या-वस्त्यांवर पशुसेवा अगदी कमी वेळात पोहचेल व गाई-म्हशीचे प्राण वाचेल.शासन दुधाचा महापूर आणण्यासाठी प्रयत्न करते योजना आखते परंतु त्यात मोलाचा वाटा असणारे पशुसंवर्धन पदविकाधारकांच्या नोंदणीच्या वेळी मात्र काणाडोळा करते.असे न करता शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून प्रथमतः पशुसंवर्धन पदविका धारकांना कायदेशीर पशुवैद्यक म्हणून घोषित करावे व त्यांची नोंदणी करून त्यांना नोंदणीक्रमांक द्यावा अशी मागणी जोर धरून आहे. १९८४ च्या कायद्यात बदल करावा, पशुसंवर्धन पदवीकाधारकांना व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे मात्र शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसून कृषीप्रधान देशातच पशूंकडे शासनाचे लक्ष नसल्याचे समोर येत आहे.

पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ कलमाअंतर्गत व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीमधून पशुसंवर्धन पदवीधारकांच्या राज्यव्यापी परिषदेची नियुक्ती करून स्वतंत्ररीत्या औषधे बाळगणे व नोंदणीकृत व्यवसाय परवाना उपलब्ध करून द्यावा.राज्यातील रिक्त पशुधन पर्यवेक्षक पदांची तत्काळ भरती करण्यात यावी.खासगीरीत्या असंघटित क्षेत्रात भारतीय पशुचिकित्सक परिषद कायद्यान्वये किरकोळ व प्राथमिक स्वरूपाच्या पशुवैद्यकीय उपचार सेवा पदवीधारक डॉक्‍टरच्या सुपरव्हिजन व माध्यमांचा वापर करून आपले कार्य पार पाडतात अशा सर्व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीप्रमाणपत्र व ओळखपत्र देऊन पशुसेवेचे कार्य सुरू ठेवण्यासाठी बळ द्यावे.

इंडियन कोस्ट गार्डमध्ये असिस्टंट कमांडंट जनरल पदांची भरती

आठवडा विशेष टीम― पदाचे नाव – असिस्टंट कमांडंट जनरल (पुरूष) एकूण जागा – २५ (अनुसूचित जाती -०५, अनुसूचित जमाती – १४, इतर मागासवर्ग – ०६) वयोमर्यादा – जन्म १ जुलै १९९६ ते ३ जून २००० दरम्यान असावा. ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचा कालावधी – २१ ते २७ डिसेंबर २०२० शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६० टक्के … Read more

एयर इंडिया एक्सप्रेसमध्ये विविध पदांची भरती – Air India Recruitment 2020

आठवडा विशेष टीम― पदाचे नाव : चीफ मेडिकल ऑफिसर, ग्रेड-एम-५ (मुंबई) – १ शैक्षणिक पात्रता : इंडियन मेडिकल कौन्सिल मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठातून एमबीबीएसची पदवी आणि अनुभव वयोमर्यादा : दि. १ जुलै २०२० रोजी कमाल वय ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. पदाचे नाव : सिनियर असिस्टंट मेडिकल, ग्रेड-एस-३ (मुंबई) – १ शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कुठल्याही … Read more

रक्षा मंत्रालयामध्ये विविध पदांची भरती

पदाचे नाव : इलेक्‍ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियरिंग : ३७ शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आणि गेट परिक्षेत उत्तीर्ण पदाचे नाव : मेकॅनिकल इंजिनियरिंग : ३५ शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आणि गेट परिक्षेत उत्तीर्ण पदाचे नाव : कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनियरिंग : ३१ शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी … Read more

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समुपदेशक पदाची भरती ; ४० जागा

आठवडा विशेष टीम― पदाचे नाव : समुपदेशक : ४० जागा शैक्षणिक पात्रता : एम.एस.डब्ल्यू. पदव्युत्तर पदवी अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ जुलै २०२० अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2X3WusI अर्ज पाठवण्यासाठी ईमेल आणि पत्ता : [email protected] वैद्यकीय मुख्य कार्यालय, २ रा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी ४११०१८

२४ अभिनव स्टार्टअप्स कल्पनांना मिळणार शासनाच्या विविध विभागातील कामे

मुंबई दि.२८:आठवडा विशेष टीम― तरुणांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना वाव देण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत स्टार्टअप योजना राबविण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे आयोजित केलेल्या स्पर्धेत देशभरातील १ हजार ६०० स्टार्टअप्सनी सहभाग घेतला. त्यातील उत्कृष्ट १०० स्टार्टअप्सची घोषणा कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी केली. तरुणांनी वैशिष्ट्यपूर्ण कल्पकता दाखवत कृषी, शिक्षण, कौशल्य विकास, आरोग्य, स्वच्छ ऊर्जा, … Read more

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्कल बेस ऑफिसर पदाची भरती ; ३८५० जागा

आठवडा विशेष टीम― एकूण जागा – ३८५० महाराष्ट्रात पदांची संख्या – ५१७ (मुंबई वगळून) पदाचे नाव : सर्कल बेस ऑफिसर शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेचा पदवीधर आणि बँकिंग क्षेत्रातील अनुभव वयोमर्यादा : ०१/०८/२०२० रोजी वय वर्षे ३० पेक्षा जास्त नसावे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत) अर्ज करण्याची अंतिम तारीख : १६ ऑगस्ट २०२० अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3f4Sn5Y … Read more

कोरोना संकटकाळात १७ हजार ७१५ बेरोजगारांना रोजगार

१ लाख ७२ हजार बेरोजगारांची रोजगारासाठी नोंदणी-कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती मुंबई, दि. २६ : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीचीही समस्या निर्माण झाली आहे. पण असे असतानाही मागील ३ महिन्यात कौशल्य विकास विभागाने जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे आणि महास्वयम वेबपोर्टलमार्फत तब्बल १७ हजार ७१५ बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला आहे. मागील ३ महिन्यात कौशल्य … Read more

Maharashtra Police Bharti – महाराष्ट्र पोलीस भरती होणार १० हजार जागांची ,लवकरच भरती होण्याचे संकेत ?

मुंबई:वृत्तसंस्था/आठवडा विशेष टीम― महाराष्ट्र राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस ( Maharashtra Police ) दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील पोलीस शिपाई संवर्गात १० हजार (10 thousands) तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याचा फायदा शहरी तसेच ग्रामीण युवकांना होईल, त्यांना पोलीस दलात Maharashtra Police सेवेची संधी मिळेल, अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार Ajit Pawar यांनी दिली आहे. नागपूरमधील काटोल येथे राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला बटालियनची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्री अजित दादांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात महत्त्वाची बैठक झालेली असल्याचे वृत्त आहे. बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, महसुल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. श्रीनिवास, SRPF एसआरपीएफच्या अपर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पोलीस भरती Police Bharti प्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश

बैठकीत गृह विभागाकडून पोलीस शिपाई Police Shipayi Bharti पदाच्या ८ हजार जागा भरण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यात आणखी २ हजार जागा वाढवून एकूण १० हजार पोलीस शिपाई भरती करण्याचे व ही Police Bharti भरतीप्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर ही भरतीप्रक्रिया विनाअडथळा यशस्वीपणे कशी राबवता येईल, याचा विचार करुन सर्वंकष प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत तातडीने मांडण्याचे निर्देशही अजित पवार यांनी दिले आहेत. मंत्रिमंडळ मंजुरीनंतर भरतीप्रक्रियेची कार्यवाही वेग घेईल, असा विश्वासही अजित दादा पवार यांनी व्यक्त केला असल्याचे वृत्त आहे.

राज्य राखीव पोलीस दलाची महिला बटालियन

महाराष्ट्र राज्यात १० हजार पोलीस शिपायांची Police Shipayi भरती करण्याबरोबरच नागपूरच्या काटोल येथे राज्य राखीव पोलीस दलाची महिला बटालियन स्थापन करण्याच्या निर्णयावरही उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. या बटालियनसाठी १ हजार ३८४ पदे निर्माण करण्यात येणार असून प्रत्येक टप्प्यात ४६१ प्रमाणे तीन टप्प्यात ही पदे भरण्यात येणार आहेत. यातूनही शहरी व ग्रामीण युवतींना पोलीस सेवेची संधी मिळणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते.

कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी ही महिला बटालियन स्थापन करण्यात येणार असल्याचेदेखील वृत्त आहे. उपराजधानी नागपूरची भौगोलिक स्थिती, रेल्वे, विमान व दळणवळणाच्या साधनांची उपलब्धता लक्षात घेवून एसआरपीएफच्या SRPF या केंद्रासाठी नागपूर ची शिफारस करण्यात आली होती. त्याअनुषंगाने काटोल गावच्या हद्दीत शासकीय जमिन उपलब्ध असल्याने त्याठिकाणी ही बटालियन स्थापन करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.या निर्णयांमुळे राज्यातील युवक, युवतींना पोलीस सेवेत दाखल होण्याची मोठी संधी मिळेणार आहे. त्याचबरोबर पोलिसांवरील ताण कमी होण्यास, कायदा-सुव्यवस्था अधिक भक्कम होण्यास मदत होईल असाही विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला होता.

ऑनलाईन पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

अकोला, दि.13:आठवडा विशेष टीम― जागतिक कौशल्य दिनाचे औचित्य साधून अकोला जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत ऑनलाईन पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन दि.१५ ते १९ जुलै या कालावधीत करण्यात आलेले आहे.

या मेळाव्यामध्ये नामांकित खाजगी उद्योजक, कंपनी, त्यांचे प्रतिनिधी एकुण १५० पेक्षा अधिक पदासाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबविण्यार आहे. या पदाकरीता पात्र पुरुष व महिला उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतील व पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल. कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नांव नोंदणी केलेल्या दहावी, बारावी, पदवी, पदवीका, आयटीआय पास व पदवीत्तर पुरुष व महिला उमेदवारांनी आपले सेवायोजन कार्डचा आयडी व पासवर्डचा वापर करून आपले लॉगइनमधुन ऑनलाईन अर्ज करून सहभागी व्हावे. यामधून रोजगार प्राप्त करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कार्यालयात येण्याची गरज नाही. उमेदवार जेथे असतील त्या ठिकाणावरून रोजगार मेळाव्यात ऑनलाईन पद्धतीने सहभागी होऊ शकतात.

पात्र असलेल्या पुरुष व महिला उमेदवारांनी आपल्या शैक्षणीक पात्रतेच्या आधारे एका पेक्षा जास्त पदांकरीता सुध्दा ऑनलाईन अर्ज करु शकतात तरी त्वरीत आपल्या सेवायोजन कार्डच्या आयडी आणि पासवर्डचा वापर करुन आपले लॉगइनमधुन ऑनलाईन अर्ज करावे तसेच ऑनलाईन अर्ज करतांना काही अडचण आल्यास या कार्यालयाच्या दुरध्वानी क्रमांकावर ०७२४-२४३३८४९ संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.

MahaJobs :‘महाजॉब्स’ पोर्टलवर अवघ्या चार तासात १३ हजार नोकरी इच्छुकांची तर १४७ उद्योगांचीही नोंदणी | Maharashtra Government Job Portal

मुंबई दि.०६:आठवडा विशेष टीम― मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लोकार्पण केलेल्या “महाजॉब्स” या संकेतस्थळावर अवघ्या चार तासातच सुमारे १३ हजार ३०० पेक्षा अधिक नोकरी इच्छुकांनी तर १४७ उद्योजकांनी नोकरभरतीसाठी आपली नोंदणी केली.
राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी आणि त्याचबरोबर उद्योजकांनाही कुशल आणि अकुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. याला लोकार्पणाच्या पहिल्याच चार तासात मिळालेला प्रतिसाद प्रचंड आहे. संकेतस्थळाचा रोजगार उपलब्ध करून देण्याचा मुख्य उद्देश पूर्ण करण्याबरोबच राज्यातील उद्योगांची चाके पुन्हा त्याच गतीने धावण्यास मदत होणार आहे. http://mahajobs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तरूणांना आणि उद्योजकांना नोंदणी करता येणार आहे.

कोरोना महामारीमुळे राज्यात लागू झालेली टाळेबंदी टप्प्याटप्प्याने उठविली जात असून ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत अनेक सवलती देण्यात येत आहेत. राज्यातील उद्योग सुरू व्हावेत यासाठी परवानग्या देण्यात आल्या असून हजारो उद्योग सुरू झाले आहे. एका बाजूला तरूणांना काम नाही आणि दुसऱ्या बाजूला उद्योजकांना मनुष्यबळ नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य शासनाच्या उद्योग विभागाच्यावतीने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून त्याचा फायदा हजारो तरूणांना आणि उद्योजकांना होणार आहे.

महाजॉब्स पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शकपणे रोजगार उपलब्ध व्हावेत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे | http://mahajobs.maharashtra.gov.in

मुंबई, दि.०६:आठवडा विशेष टीम― देशातील सर्वात मोठे प्लाझ्मा सेंटर असो की आणखी काही, महाराष्ट्राने नेहमीच देशाला पथदर्शी आणि भव्यदिव्य स्वरूपाचे काम करून दाखविले असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लोकार्पण केलेले “महाजॉब्स” हे संकेतस्थळ महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा असल्याचे नमूद केले तसेच काळाची गरज ओळखून सुरु करण्यात आलेल्या या पोर्टलच्या माध्यमातून भूमिपुत्रांना पारदर्शकपणे रोजगार किंवा नोकरी उपलब्ध करून दिली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील युवकांसाठी मोबाईलवर “महाजॉब्स” नावाचे ॲप उपलब्ध करून देण्याची सुचनाही उद्योग विभागाला दिली.

राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या http://mahajobs.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचे मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, उद्योग राज्यमंत्री श्रीमती आदिती तटकरे यांच्यासह उद्योग विभागाचे प्रधान सचिव बी वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, उद्योग विकास आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे, राज्याच्या प्रत्येक भागातील उद्योजक आणि रोजगार संधीच्या शोधात असलेले भूमिपुत्र या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

बेरोजगार युवकांना काम उपलब्ध करून देणारे पोर्टल व्हावे
मुख्यमंत्र्यांनी महाजॉब्स या पोर्टलचे लोकार्पण करतांना हे पोर्टल अधिक सोपे आणि सुटसुटीत असावे अशी अपेक्षा व्यक्त केली ते म्हणाले की, पूर्वी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज च्या माध्यमातून फक्त बेरोजगारांची माहिती कळायची. पण किती लोकांना रोजगार मिळाला हे कळायचेच नाही. तसे या पोर्टलच्या बाबतीत अजिबात होऊ नये. या पोर्टलचा नोकरी, रोजगार देण्यासाठी किती उपयोग होतो याचा नियमित आढावा घेतला जावा. अडचणींची दखल घेऊन पोर्टलच्या माध्यमातून किती रोजगार उपलब्ध करून दिले गेले हे ही सांगितले जावे. यात उद्योजक आणि राज्यातील युवकांना काही अडचणी येत असतील तर त्याचाही अभ्यास केला जावा. हे पोर्टल बेरोजगाराची नोंदणी करणारे नाही तर बेरोजगारांना काम उपलब्ध करून देणारे पोर्टल व्हावे असेही ते म्हणाले.

पोर्टलच्या माध्यमातून उद्योगांच्या मनुष्यबळाच्या गरजा भागवाव्यात
महाजॉब्सच्या माध्यमातून राज्यातील उद्योजक, भूमिपुत्र यांच्या दोघांच्याही गरजा भागवल्या जाव्यात, उद्योगांना अपेक्षित मनुष्यबळ मिळावे तर युवकांना रोजगार. या समन्वयातून राज्याचा गतिमान पद्धतीने विकास होतांना घराघरात समाधान नांदावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

कोरोनाने आत्मनिर्भर व्हायला शिकवले
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, कोरोनाने आपल्यापुढे संकट निर्माण केले असले तरी काही गोष्टी निश्चित शिकवल्या आहेत. त्यामध्ये घराकडे आरोग्याकडे पाहण्याची शिकवण जशी कोरोनाने दिली तशीच आत्मनिर्भर होण्याचीही दिली आहे.

कामगार कपात करू नये
काल हॉटेल व्यावसायिकांची आणि कामगारांसंबंधीची बैठक घेतल्याचे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसारख्या औद्योगिक पट्टयापुढे अजूनही कोरोनाचे संकट आहे. एकीकडे ही परिस्थिती असतांना आपण राज्यात नवीन गुंतवणूकीला निमंत्रण देत आहोत, त्यांच्यासमवेत सामंजस्य करार करतांना त्यांना अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहोत. कोरोनामुळे परराज्यातील अनेक कामगार त्यांच्या राज्यात निघून गेले आहेत. त्यामुळे राज्यात नोकऱ्या उपलब्ध होत आहेत पण कामगार नाहीत अशी स्थिती एकीकडे आहे तर दुसरीकडे काही उद्योग कामगार कपात करत आहेत. हे अजिबात योग्य नाही. उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासन तत्पर आहे. अशावेळी कामगार कपात करणे योग्य नाही. उद्योग विभागाने या सर्व उद्योजकांशी बोलून त्यांच्या अडचणी सोडवण्याबाबत आश्वस्त करावे असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

बेरोजगारी संपवण्याची संधी – सुभाष देसाई
उद्योग विभागाने केलेल्या पाहणीत राज्यातील उद्योगांत ५० हजार रोजगार उपलब्ध असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे या पोर्टलद्वारे नोकरी मागणारे आणि देणारे यांच्यात शासनाने समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे. या महाजॉब्स पोर्टलद्वारे अभियांत्रिकी, लॉजिस्टिक, केमिकल आदी १७ क्षेत्राची निवड करण्यात आली आहे. त्यातील ९५० व्यवसायांसाठी इच्छुक उमेदवार निवड करू शकतात. स्थानिक भूमिपुत्रांनांच नोकरीची संधी मिळावी यासाठी अधिवास (डोमेसाईल) प्रमाणपत्राची अट यामध्ये आहे. याद्वारे राज्यातील बेरोजगारी संपवण्यासाठी मदत होईल.

महाराष्ट्र प्रगतीकडे झेप घेईल- दिलीप वळसे पाटील
उद्योग, कामगार आणि कौशल्य विकास एकत्रित आल्याने महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्यास मदत होईल. या पोर्टलमधून नवे-जुने, कुशल-अकुशल कामगारांना कायमस्वरुपी नोकरी मिळेल, असे कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

नवीन उद्योगांत सुसूत्रता येईल- नवाब मालिक
नवीन उद्योगांत सुसूत्रता येण्यासाठी हे पोर्टल उपयुक्त ठरेल. नवीन उद्योगांसाठी नवीन संधी निर्माण होत आहे. महास्वयं व महापोर्टलमध्ये होणाऱ्या नोंदणीची माहिती ऑनलाइन रोजगार मेळाव्यासाठी फायद्याची ठरेल.

राज्यातील युवक-युवतींना या पोर्टलद्वारे नोकरीसाठी नक्कीच फायदा होईल, असे उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

यावेळी विको लॅबरोटरीज तसेच दीपक फर्टिलायझरने तत्काळ कर्मचाऱ्यांची गरज असल्याचे नमूद केले.

राज्यातील उद्योजक व तरुणांनी या पोर्टलचे स्वागत केले आहे. वेबपोर्टलचे अनावरण झाल्यानंतर काही तरुणांनी नोकरीसाठी नोंदणी सुरू केली आहे.