मोर्चे क्रांती आणि प्रबोधन करण्यास असमर्थ ठरले ?

सत्य हे सत्यच असते ते काही काल लपवून,झाखुन ठेवले जाते. किंवा दहशत खाली भिती पोटी पोटात दडलेले असते, ते जास्त काल बंद करून ठेवले म्हणजे ते असत्य होत नाही, म्हणुन सविस्तर वाचण्या अगोदर वाचकाची आणि मराठा,बौध्द समाजाची जाहिर माफी मांगतो,कारण काहीना सत्य वाचणे ऐकणे जमत नाही, त्यांचा रक्तदाब लगेच वाढतो मग ते शिवीगाल, हातपाय तोडण्याची भाषा करतात,म्हणुन सत्य समजून घ्या आणि चूक असल्यास चर्चा करुण दुरुस्त करण्यास तयार रहा,ही नम्र विनंती!.
   एक मराठा लाख मराठा,मराठा क्रांती मोर्चा,बहुजन क्रांती मोर्चा सांविधान सन्मान मोर्चा यांनी आपण खुप जागृत आहोत हे दाखवून दिले,आता पुढे काय?.त्यांने समाजात प्रबोधन करून काय परिवर्तन घडविलेे?. खरच हे सर्व आपल्या विचारधारेशी प्रामाणिक आहेत काय?.2024 च्या लोकसभा निवडणुकित सर्व मोर्चाकरी कोणाच्या बाजूने गेेले हा निकाल जाहीर झाल्यावर माहीत झालेच.

  खैरलांजी हत्याकांड झाल्यानंतर जास्त लोक रस्त्यावरती उतरले.तेच सेना,मनसे, भाजपा,कॉंग्रेस आणि रॉका ह्या पक्षाला मतदान करत होती?.पाथर्डी च्या वेळेस सुद्धा तेच आणि ऑटोसिटीच्या समर्थानासाठी तेच होत आहे.दलाल,भडवे आणि चमचे सर्वात पुढे असतात.जे मनुवादी,हिंदुत्ववादी विचारधारा असलेल्या पक्षाच्या तिकीटावर निवडणुक लढतात आणि तोंडावर आपटतात. त्यांनांच जातीचा जास्त पुळका येतो.या पेक्षा अशा लोकांनी एकच काम करावे मोर्चे बिर्चे काही काढायचे नाही.फक्त आंबेडकरी पक्षात निस्वार्थी काम करायचे,जर मोर्च्याची येवढीच खुमखुमी असेल तर त्यांनी एक काम जरुर करावे आंबेडकरी पक्षाला मतदान करा म्हणुन मोर्चे काढावे आणि आपली खरी ताकत मतपेटीत दाखवावी. हे जर जमत नसेल तर शेळी होऊन शंभर दिवस जगा!.उगाच वाघ,सिंह असल्याचा दिखाऊ पणा करू नका,त्याला कोणीच घाबरत नाही. सरकार तर बिलकुल नाही, पण समाजा समाजात तिरस्कार निर्माण होणारे काम करू नका.मोर्चा आंदोलनात ज्या प्रमाणे सर्व मतभेद विचारभेद विसरून संघटित शक्ती दाखविली जाते,त्याच प्रमाणे मतदान पेटीत खरी संघशक्ति दाखविली असती तर काय झाले असते?. 

   जनांआंदोलनात बहुसंख्येने कार्यकर्ते आणि नेते दलाली,चमकेगिरी मोठया प्रमाणात करतात. जनआंदोलनातील चमकेगिरी बंद झाली पाहिजे.सर्व ठिकाणी ती फालतुगिरी दिसते. संविधान सन्मान मोर्चा मध्ये आलेल्या अनेक स्वयंघोषित नेत्याना वारंवार संयोजक सांगत होते की स्टेज तुटण्याच्या मार्गावर आहे.कृपया खाली उतरा पण चमकुगिरी करणारे आणि स्वताला मोठे स्वयंघोषित नेते समजणारे स्टेज वरुन खाली उतरत नव्हते,अशी पोस्ट सोशल मिडियावर त्यावेळी फिरली,संविधान सन्माना करीत मोर्चे काढणारे राजशिष्टाचार मानत नसतील तर?.हिच शिस्त आपल्या लोकांना अगोदर पासून नाही, त्यामुळे जोपर्यंत पोस्टर वरील नावे आणि स्टेज वरील गर्दी कमी होणार नाही तोपर्यंत आपण आपला उद्देश् सफल करु शकणार नाही.हे ही समाजाने लक्षात ठेवले पाहिजे.चमकोगिरी करणाराना समाजाने धडा शिकवला पाहिजे.काम करणाऱ्याना स्टेज ची गरज नसते.हे लक्षात घेतलेले बरे तुमच्या कामातुन तुमचे कार्य कळत असते. स्टेज वर उभे राहुन नाही.स्टेज वर कमितकमी शंभर लोक नेते म्हणुन उभे होते.स्टेज तुटला असता तर? सर्व मीडियानी त्यांची दाखल घेतली असती ज्यांना कोणती ही शिस्त नाही.ते देशात संविधानाचा सन्मान कसा करतील?.म्हणून मोर्चे क्रांती आणि प्रबोधन करण्यास असमर्थ ठरले ?.

  आंबेडकरी पक्षाचा कार्यकर्ता कसा असावा?.ज्याला भारतीय संविधानातील प्रत्येक कलम,पोट कलम तोंड पाठ असले पाहिजे.त्यांनी त्यांचे काटेकोर पणे पालन केले पाहिजे.रिडल्स ते आंबेडकर भवन आम्ही लाखोंच्या संख्येने एक दिवस संघटित होऊन रोडवर मैदानात एकत्र आलो.पुढे काय झाले?.आंबेडकर भवनाच्या वेळी सर्वांनी ऍड बाळासाहेब आंबेडकरांचे नेतृत्वाखाली मोर्चा काढला कायदेशीर मार्गाने काढलेला होता की भावनिक मार्गाने काढला होता?.
  मुंबई ही भारताची नव्हे जगाची औधोगिक जागतिक कीर्तीची महानगरपालिका आहे. सर्व मतभेद विसरून लाखोंचे मोर्चे काढणारे मराठे आणि बहुजन,बौद्ध कसे समोरे गेेले?. शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक कीर्तीचे स्मारक बनविन्या करीता पालिकेवर कोणाचे लोक प्रतिनिधी जास्त गेले पाहिजे होते?.कोणत्या विचारधारेची माणसं तिथे पाहिजे होती?.यांचे उत्तर विकाऊ समाजाच्या दिखाऊ मोर्चे करांनी दिले पाहिजे.हेच खरे समाज परिवर्तन होते काय?. त्या बाबतचे नियोजन कोणते?.
एक मराठा लाख मराठा म्हणणारा मराठ क्रांती मोर्चा हा विकाऊ समाजाचाच होता. कारण त्यांना त्यांच्या जातीतील साखर सम्राट,शिक्षण सम्राट यांनी सरकारी कायदे कानुन मोडून कसे साम्रराज्य उभे करून शेतकऱ्याची आणि विद्यार्थी पालकाची कशी लूटमार केली हे सत्य का दिसत नाही.कारण प्रत्येक निवडणूकीत यांनी त्यांना फुकट मतदान केले नाही.मताचा योग्य मोबदला घेऊनच त्यांनी मतदान केले. म्हणुन नवद टक्के मार्क भेटून ऍडमिशन का भेटले नाही?.कोणत्या कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळाले नाही.त्याविरोधात तेव्हा का संघटित झाले नाही.हे त्या शिक्षण सम्राटांना विचारले पाहिजे होते.त्याला आरक्षण घेणारे कसे काय जबाबदार होते,आहेत.शिक्षण संस्था मराठ्याची,शिक्षण संचालक मराठे,शिक्षक मराठे,शिक्षण मंत्री मराठे आणि विद्यार्थी पालक मराठे तरी न्याय मिळाला नाही?. खरेच या देशात संविधानाची अंमलबजावणी होते काय?. त्यांची प्रामाणिक पणे अंमलबजावणी झाल्यास कोणीच शिक्षण आणि रोजगारा पासुन वंचित राहणार नाही.म्हणुन विकाऊ आणि दिखाऊ पणा सोडा आणि टिकाऊ पणा स्विकारा त्यात सर्वच समाजाचे भले होईल.
  आंबेडकरी समाजाने बहुजन समाजाचे नेतृत्व स्विकारण्या लायक बनावे.तर इतर बहुजन समाज तुमच्या जवळ येईल.कारण रिपब्लिकन पक्षाचा कोणता ही गट असो. अथवा बसपा तुम्हांला तुमच्या पक्षाच्या नावाने नाही तर बाबासाहेबांच्या नावाने सर्वजन ओळखतात. कारण पक्षाचे अध्यक्ष वारले तरी पक्षाचा मृत्यु कधीच होत नाही. अध्यक्षामुळे पक्षाची ओळख नसून बुद्ध फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीवर आधारित पक्षाची ओळख आहे.म्हणून सर्व पक्ष एकमेकांचे भाऊ भाऊ असावे. वडिलांची संपत्ती सर्व आपसात वाटून घेतात.नंतर एक मेकांना मदत करतात.जर आपला भाऊ कुठे कमी पडत असेल तर सर्व भावांनी त्याला मदत करायला हवी!. दुश्मनी नको कारण तो व्यक्ति कसाही असो पन तो त्याच्या भागातील लोकांना मदत करत आहे.आणि राहिला प्रश्न आपल्या भावाच्या विरोधात राहून आपला पक्ष त्या भागात नव्याने स्थापना करण्याचा तर नवीन पक्ष स्थापन करुन तो मजबूत करायला दहा वर्ष लागतील म्हणून अगोदरच जो पक्ष त्या ठिकाणी मजबूत आहे त्याला मदत करा.दहा वर्ष उगीचच कशाला वाया घालवायची आणि इतर पक्षानां या फुटीचा फायदा घेऊ द्यायचा,जरी तो व्यक्ति आंबेडकरी विचारांचा दुसऱ्या पक्षाचा असेल.तो वैचारिक गुलाम असेल अशोक चव्हाण आणि नरेंद्र मोदी सारखा असेल.
   आपला पक्ष बाबासाहेबांच्या विचारसरणीवर आधारित आहे. राजकारणात आपण अशी तोडजोड करु तर आपले राजकारण ठिक आहे अन्यथा एकमेकांना विरोध करत प्रत्येक पंचवार्षीक निवडणूकीत आपले अपयश समाजाला अन्याय अत्याचार सहन करण्यास भाग पडेल.आपला विकास आणि कल्याण करण्यासाठी इतर पक्षाच्या कोणत्या प्रलोभनाला बळी पडू नका.आणि याचा फायदा इतर पक्षाला होईल असे वागू नका.सर्वच समाजाने विकाऊ आणि दिखाऊ पणा सोडून विचारधारेवर चालणारा समाज, संस्था,संघटना आणि पक्ष निर्माण करण्यासाठी वाचन बंद्ध व्हा.तरच पुढील इतिहास विकाऊ समाजाचा दिखाऊ मोर्चा नव्हता तर सामाजिक,राजकीय क्रांती, परिवर्तन घडविणारा मोर्चा होता.असे मराठा क्रांती मोर्चा,बहुजन क्रांती मोर्चा आणि संविधान सन्मान मोर्चा बाबत लिहल्या जाईल.मराठा,बहुजन आणि बौद्ध समाजातील सर्वच कार्यकर्ते नेते नालायक नाहीत.काही प्रामाणिक आहेत.त्यांना सर्व समाजाने योग्य साथ द्यावी.विभागा विभागात लोकशाही पद्धतीने निवडणूका घेऊन कार्यकर्ते नेते निवडा.आणि आम्ही खरेच संविधान प्रेमी आहोत.संविधाना चा सन्मान करणारे आहोत हे सिद्ध होईल.आणि मोर्चे क्रांती आणि प्रबोधन करण्यास असमर्थ ठरले ?.हे मान्य करा 

सागर रामभाऊ तायडे,भांडुप मुंबई,9920403859,

लोककल्याणकारी राज्यकर्ते – राजर्षी शाहू महाराज

ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली, तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना “राजर्षी” ही पदवी त्यांच्या राज्यभिषेकाच्या वेळी त्यांना त्याच्या क्षात्र गुरुने दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास “फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र” असे म्हणतात. राजघराण्यातील ब्राह्मण पुरोहितांनी वैदिक स्तोत्रानुसार ब्राह्मणेतरांचे संस्कार करण्यास नकार दिल्याने शाहूंनी आर्य समाज आणि सत्यशोधक समाजाला पाठिंबा देण्याबरोबरच मराठा समाजाच्या हक्कांसाठी प्रचार केला. त्यांनी पुजाऱ्यांना हटवून क्षात्रजगद्गुरू (क्षत्रियांचे विश्व गुरू) ही पदवी देऊन एका तरुण मराठाची ब्राह्मणेतरांचे धर्मगुरू म्हणून नियुक्ती करण्याचे धाडसी पाऊल उचलले. याला वेदोक्त वाद म्हणून ओळखले जाते. ते लवकरच ब्राह्मणेतर चळवळीचे नेते बनले आणि मराठ्यांना त्यांच्या झेंड्याखाली एकत्र केले

 

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 1894 मध्ये संस्थानचा राज्यकारभार स्वीकारला. राज्यभर फिरून लोकांची परिस्थिती, गरजा व त्यांची दुःखे जाणून घेतली. सामान्य जनतेच्या भावना ओळखून त्यांचे दुःख निवारण करण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले. अज्ञान, अंधश्रद्धा नि अस्पृश्यता या तीन व्याधी निपटून काढल्याखेरीज आपल्या प्रजेच्या विकासाच्या वाटा खुल्या होणार नाहीत, याची खूणगाठ बांधून महाराजांनी कामाला सुरुवात केली. गावोगावी शाळा काढल्या, प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले, पुरोहित शाळा सुरू केल्या. त्याकाळी अस्पृश्यांना विद्येचा अधिकार तर नव्हताच; पण देवालये, चावड्या, सार्वजनिक पाणवठे आदी ठिकाणीही प्रवेश करण्यास त्यांना मनाई होती. महाराजांनी अस्पृश्यता दूर करण्याचा प्रयत्न स्वतःपासून केला. अस्पृश्य तरुणांना मोटार ड्रायव्हिंगच्या कोर्सला पाठवून आपल्या, महाराणी साहेबांच्या, चिरंजीव आक्कासाहेब व युवराज यांच्या गाडीवर नेमले. पट्टेवाले, शिपाई, डगलेवाले पोलीस, स्वतःचे शरीर-रक्षक अस्पृश्य नेमले. थोडेसे शिक्षण झालेल्यांना त्या मानाने कारकून, रजिस्ट्रारच्या जागा दिल्या. महात्मा फुले यांचा अस्पृश्योद्धाराचा विचार शाहू महाराजांनी प्रत्यक्षात उतरविला.

 

 

खुद्द महाराजांच्या राजवाड्यातही ही सुधारणा अप्रिय वाटत होती. आपल्या राजवाड्यातील खासगी देवालयातील ब्राह्मण पुजाऱ्यास महाराजांनी काढून टाकले. पूजा-अर्चा, धार्मिक विधी प्रत्येक ठिकाणी मराठा पुरोहितांकडून चालू केले. राजवाड्यातही सर्वांना मराठा पुरोहितांकडून विधी करवून घ्यावेत, अशी सूचना केली. दुष्काळी कामे, तगाईवाटप, स्वस्त धान्यदुकाने, निराधार आश्रमाची स्थापना हे कार्य पाहता ‘असा राजा होणे नाही’ असेच प्रजेला वाटते.शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.

 

 

राजर्षी शाहूंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांना ‘राजर्षी’ ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली. स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात ‘महाराजांचे महाराज’ असा गौरव होतो. रयत प्रजा व उपेक्षित समाजाला त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहूंनी केले आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये त्यांनी समाजातील बहुजन समाजाला त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकाराचा पूर्णपणे वापर केला म्हणूनच ते लोककल्याणकारी राज्यकर्ते ठरले. त्यांच्या कार्याचा गौरव समकालीन लेखकांनी व इतिहासकारांनी केलेला आहे.

 

अस्पृश्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांनी अस्पृश्यांना स्वावलंबी बनवण्याचे ठरवले. त्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले, दुकाने हॉटेल्स काढण्यासाठी प्रोत्साहन दिले, तसेच आर्थिक मदत देखील देऊ केली. अस्पृश्यांना शिवण यंत्रे देऊन स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले राजवाड्यातील कपडे त्यांच्याकडून शिवून घेण्यास सुरुवात केली गंगाधर कांबळे या व्यक्तीला कोल्हापुरात मध्य वस्तीत चहाचे दुकान काढून दिले अस्पृश्यांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी महार पैलवानांना पैलवान चांभार यांना सरदार अभंग यांना पंडित अशा पदव्या दिल्या अस्पृश्य सुशिक्षित तरुणांची तलाठी म्हणून नेमणूक केली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत 1919 मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालवणारा राजा म्हणून आपली ओळख निर्माण केली. सामाजिक बंधुभाव, समता, दलित व उपेक्षित बांधवांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रीडा व आरोग्य इत्यादी महत्त्वपूर्ण क्षेत्रामध्ये अद्वितीय स्वरूपाचे कार्य केले.

 

त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांसाठी नोकरीमध्ये राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. 1917 साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी 1916 साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. तत्कालीन परिस्थितीमध्ये जातिव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती त्या काळात चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण, सत्ता व संपत्तीचा अधिकार नाकारला, त्यामुळे त्यांचे जीवन नैराश्यमय झाले. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी चोऱ्या, दरोड्यांचा मार्ग अवलंबला. त्यामुळे ब्रिटिश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांना रोज गावकामगाराकडे हजेरी लावावी लागत असे. शाहू राजांना या लोकांविषयी कणव होती. कारण ते खऱ्या अर्थाने वंचितांचे राजे होते. त्यामुळे शाहूंनी हजेरी पद्धत बंद केली. या जाती जमातींच्या लोकांना एकत्रित करून गुन्हेगारीपासून त्यांना परावृत्त केले. त्यांना संस्थानात नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार, रथाचे सारथी निर्माण केले. त्यांना घरे बांधून दिली. वणवण भटकणाऱ्या लोकांच्या राहण्याची सोय झाली. पोटापाण्याची सोय झाली. त्यामुळे गुन्हेगार म्हणून शिक्का बसलेल्या लोकांना माणूस म्हणून समाजात सन्मानाने वावरता येऊ लागले. 

 

गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल. मात्र त्यांना प्रेमाने, मायेने आपलेसे करून समाजात सामाजिक दर्जा देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळाच. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले. कोल्हापूर संस्थानांमध्ये सत्यशोधक चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याचे ही महत्त्वाची जबाबदारी राजर्षी शाहू महाराजांनी पार पडली त्यांच्या नेतृत्वाखालीच संपूर्ण कोल्हापूर संस्थानांमध्ये सत्यशोधक चळवळ उभी राहिली आणि ती नेटाने पुढे नेण्याची कामगिरी देखील पार पाडली गेली. पुढे या चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याची महत्त्वाची जबाबदारी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पार पाडली यासाठी त्यांनी शिक्षणातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हे सूत्र अंगिकारले. दलित पीडित उपेक्षित समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला यामागे खरी प्रेरणा ही राजर्षी शाहू, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची होते. बाबासाहेब आंबेडकरांना माणगावच्या परिषदेमध्ये “दलितांचा नेता” व “भारतीय अग्रणी नेता”म्हणून घोषित केले. यापुढील काळामध्ये बाबासाहेबांनी दलित उपेक्षित समाजाचे नेतृत्व करावं असे आवाहनही महाराजांनी केले. शाहू यांनी सर्व उपेक्षित समाजातील व अस्पृश्य वर्गातील लोकांना आपल्या संस्थानामध्ये आरक्षणाद्वारे नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केला यादृष्टीने संपूर्ण भारतामध्ये आरक्षणाचे जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो. सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन शाहूराजांनी सामाजिक समतेसाठी प्रयत्न केले.

 

कुशाग्र बुध्दिमत्ता, प्रभावित करणारं व्यक्तिमत्व, कलेविषयी अगाध प्रेम, थोर समाज सुधारक, बहुजन समाजाचा उध्दारकर्ता, कुशल प्रशासक, स्वच्छ प्रतिमा असलेला राज्यकर्ता म्हणुन कोल्हापूर संस्थानांचे राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांनी दैदिप्यमान राज्य कारभार केला. ज्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कर्तृत्वाची नोंद घेवूनच देशभर त्यांची 150 वी जयंती साजरी होत आहे, त्या निमित्त त्यांना विनम्र अभिवादन !

— प्रविण बागडे, नागपूर

पशुसंवर्धन पदविका धारकांना शासनाने नोंदणीकृत करून स्वतंत्र पशुवैद्यकीय व्यवसायास परवानगी द्यावी !

बीड दि.०४ ऑगस्ट २०२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत करून त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून वाड्या-वस्त्यांवर पशुसेवा अगदी कमी वेळात पोहचेल व गाई-म्हशीचे प्राण वाचेल.शासन दुधाचा महापूर आणण्यासाठी प्रयत्न करते योजना आखते परंतु त्यात मोलाचा वाटा असणारे पशुसंवर्धन पदविकाधारकांच्या नोंदणीच्या वेळी मात्र काणाडोळा करते.असे न करता शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून प्रथमतः पशुसंवर्धन पदविका धारकांना कायदेशीर पशुवैद्यक म्हणून घोषित करावे व त्यांची नोंदणी करून त्यांना नोंदणीक्रमांक द्यावा अशी मागणी जोर धरून आहे. १९८४ च्या कायद्यात बदल करावा, पशुसंवर्धन पदवीकाधारकांना व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे मात्र शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसून कृषीप्रधान देशातच पशूंकडे शासनाचे लक्ष नसल्याचे समोर येत आहे.

पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ कलमाअंतर्गत व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीमधून पशुसंवर्धन पदवीधारकांच्या राज्यव्यापी परिषदेची नियुक्ती करून स्वतंत्ररीत्या औषधे बाळगणे व नोंदणीकृत व्यवसाय परवाना उपलब्ध करून द्यावा.राज्यातील रिक्त पशुधन पर्यवेक्षक पदांची तत्काळ भरती करण्यात यावी.खासगीरीत्या असंघटित क्षेत्रात भारतीय पशुचिकित्सक परिषद कायद्यान्वये किरकोळ व प्राथमिक स्वरूपाच्या पशुवैद्यकीय उपचार सेवा पदवीधारक डॉक्‍टरच्या सुपरव्हिजन व माध्यमांचा वापर करून आपले कार्य पार पाडतात अशा सर्व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीप्रमाणपत्र व ओळखपत्र देऊन पशुसेवेचे कार्य सुरू ठेवण्यासाठी बळ द्यावे.

लोकहितवादी : संत गाडगे महाराज

अनेक वर्षांपासुन समाजात ढोंगाचे, पाखंडांचे,कर्मकांडाचे, भोंदुगिरीचे, व्यसनाधिनतेचे, अंधश्रध्देचे, विषमतेचे काळे कुट्ट मेघ दाटुन येतात तेव्हा हा अंधकार दूर करण्यासाठी तथागत बुध्दांपासून संत कबीरांपर्यंत,संत कबीरांपासून संत नामदेव महाराजांपर्यंत, संत नामदेव महाराजांपासून संत तुकाराम महाराजांपर्यत तसेच संत तुकाराम महारांजापासून संत गाडगे महाराज,संत तुकडोजी महाराज,संत भगवानबाबांपर्यंत अनेक संतांनी, विचारवंतानी समाज प्रबोधनाचे कार्य केले त्यांच्या कार्या पुढे नतमस्तक होतो.

संत गाडगे महाराजांचे कार्य-

कार्यकाल सन 1908 ते 1956 या काळात महान कार्य केले.संत गाडगे महाराजांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्हयातील शेवगाव या गावी झाला.संत तुकाराम महाराजांपर्यत आलेली ज्ञान,विज्ञान आणि विचारांची चळवळ संत गाडगे महाराजांनी मोठया नेटाने, कष्टाने समाज प्रबोधनाच्या माध्यमातून पुढे नेली.
संत गाडगे महाराजांनी कष्टाने उभारलेली चळवळ,धर्मशाळा व इतर सर्व ठिकाणची आजची अवस्था पाहिल्यावर प्रचिती येते. गुरु शिष्य परंपरा नाकारणाऱ्या गाडगे महाराजांचे शिष्य म्हणून अनेकजण मिरवतात.त्यांच्या संपत्तीचे वाटेकरी झाले आहेत. त्यांच्या प्रबोधनाचा वारसा चालविण्याची मात्र तयारी नाही.
संत गाडगे महाराजांच्या नावे स्वच्छता अभियान राबवताना प्रथम हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी माणसाच्या मस्तकातील हागणदारी दूर करण्याची गरज आहे. शिवराज्यानंतर लोक कार्याच्या माध्यमातून स्वातंत्र्यानंतर कित्येक पंचवार्षिक योजनामध्ये झाली नाही.त्यापेक्षा अधिन ज्ञान व समाज परिवर्तनाचे कार्य संत गाडगे महाराजांनी केले. संत गाडगे महाराजांनी, गाडगे, झाडू व गोधडी एवढया साधनाद्वारे हिमलयाएवढे कार्य केले.या माध्यमातून देव, देऊळ,कर्मकांड यांची चिरफाड करुन मानवतेचा प्रकाश टाकला,देव धर्माच्या नावाखाली कर्मकाडांच्या, अंधश्रध्देच्या माध्यमांतून सर्वसामन्यांची प्रचंड लूट होत होती.ती रोखण्याचे कार्य समाज प्रबोधनाच्या माध्यमातून संत गाडगे महाराजांनी केले.
सत्यनारायण कथा, अंगात येणारे देव, जादुटोणा आणि चमत्कार यांसारख्या अनेक गोष्टींच्या माध्यमातून समाजाचे मोठया प्रमाणावर शोषण चालू होते. आपल्या किर्तनाच्या आणि प्रवचनाच्या माध्यमातून समाजातील अज्ञान,अंधश्रध्दा, कर्मकांड आणि व्यसनाधिनता यावर मोठया प्रमाणात आसूढ ओढले.संत कबीर,संत नामदेव आणि संत तुकाराम यांच्या अभंगांच्या माध्यमातून लोक प्रबोधन केले.

“तिर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी ।”
“डोईला गाडगे हातामध्ये झाडू। स्वच्छतेने झाडू अंधश्रध्दा”
“देव दगडाचा केला । गवंडी त्याचा बा झाला
देव सोन्याचा केला । सोनार त्याचा बा झाला
देव मातीचा केला । कुंभार त्याचा बा झाला.”
“ऐतखाऊ । भिकेचा भाऊ । येसनांचा डेरा ।
सटवाईचा फेरा”
“प्रपंच करावा नेटका । असू नये फाटका ।”
“जोडीनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी”
“नवसे कन्यापुत्र होती । तरी का करणे लागे पती ।।”
“म्हणती देव मोठे मोठे । पुजताती दगडगोटे।।”
“जत्रा में फत्रा बिठाया । तीरथ बनाया पाणी ।।
दुनिया भई दिवानी । पैसे की धुळधाणी ।।”

यासारख्या अनेक अभंगांच्या,काव्यांच्या माध्यमातून
संत गाडगे महाराजांनी लोकप्रबोधन केले. त्यांच्या किर्तनात ना बुका,ना माळ,ना गळा भेटी तरीसुध्दा ते
किर्तनात मोठया प्रभावीपणे लोकभाषेत प्रबोधन करत.किर्तन संपल्यावर अनेक लोक दर्शन घेण्यासाठी यायचे
परंतु ते कोणालाही दर्शन घेवू देत नसत. मानवतेपेक्षा कोणाताही देव,धर्म,मोठा नाही. सत्यनारायण्या सारख्या चा सारखा कथा करु नका यामध्ये सामान्यांची लूट होते. चमत्काराने काही होत नाही,कोणतीही देव, देवता तुम्हाला त्रास देत नाहीत.जनसेवा हीच ईश्र्वरसेवा आहे. सटवाई,म्हसोबा यासारख्या देवांना कोंबडे, बकरे कापू नका.कोणताही देव कोणाच्याही अंगात येत नाही.हे सगळे थोतांड आहे हे बंद करा आणि आपल्या जीवनाचा उपयोग इतरांना झाला पाहिजे,कष्ट करा आणि आपण आपला परिसर स्वच्छ ठेवा, मनावर मानवतेचे संस्कार करुन घ्या,माणसा-माणसात कोणताही भेद करु नका,कमीत कमी खर्चात लग्ना सारखे कार्य करा,माणूस मेल्यानंतर काही कर्मकांड करु नका, माणूस जिवंत असताना त्याची सेवा करा, उपाशी रहा पंरतू कोणत्याही सावकाराचे कर्ज काढू नका. अशा प्रकारचे प्रबोधन अनेक भागांतून केले.तथागत गौतमबुध्द,संत नामदेव, संत कबीर,संत तुकाराम हे गाडगे महाराजांनी अनेकांच्या मस्तकांत रुजवले.आज आपल्या देशात देवधर्माच्या नावाखाली स्वंयघोषीत बुवा,बापु आणि कापूंच्या माध्यमातुन अनेक स्त्री पुरुषांचे मानसिक, शारिरीक आणि आर्थिक शोषण केले जाते.समाज प्रचंड प्रमाणात लुटला जात आहे हे रोखण्यासाठी संत गाडगे महाराजांचे कार्य महत्वाचे आहे.
*शेतकरी आत्महत्या*-
आज शेतकऱ्याची आत्महत्या रोखण्यासाठी संत गाडगे महाराजांचे विचार प्रभावी वाटतात. शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा हत्या कराव्यात. परंतू माणसाची हत्या करुन जगातला कोणतीही प्रश्न सुटला नाही. शेतकऱ्यांनी अज्ञान, कर्मकांड,आळस आणि व्यसनांची हत्या केली तर शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणार नाही.संत गाडगे महाराजांच्या समाज प्रबोधनातून आणि अनेकांच्या सहकाऱ्यांतून अनेक ठिकाणी नदींना घाट बांधले,अनेक ठिकाणी लोकांसाठी धर्मशाळा बांधल्या, अनेकांच्या निवाऱ्याची सोय केली. अशी अनेक कार्य गाडगे महाराजाच्या माध्यातून केली गेली.
—————————-
समारोप-
संत गाडगे महाराज यांचा वसा आणि वारसा पुढे आपापला चालवत असताना शिक्षणाला महत्व दयावे लागेल.देव देवतांच्या मंदीरांपेक्षा ज्ञानमंदीरे विकसीत करावी लागतील,गाव हागणदारी मुक्त करताना डोके वैचारिकदृष्टया हागणदारी मुक्त करावे लागेल.आत्महत्या मुक्त शेतकरी,दंगलमुक्त देश, व्यसनमुक्त तरुन ही अभियाने देश पातळीवर राबवावी लागतील.हे कार्य वसा आणि वारसा म्हणून करावे लागेल. संत गाडगे महाराज ज्ञान,विज्ञान,विचार आणि सामाजिक उत्तुंग कार्याला विन्रम अभिवादन !
जय जिजाऊ ! जय शिवराय !
जय ज्योती ! जय भिमराय !
जय संत गाडगे महाराज !

-रामकिसन गुंडिबा मस्के (सर)

(लेखक हे अंबाजोगाई येथील नेताजी सुभाषचंद्र (मा.) विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.)

”बहुजननायक योद्‌धा अण्णा भाऊ साठे” ; जात पात खोटी, माणुसकी मोठी, सांगितल्या गोष्टी आयुष्याच्या..!

”जात पात खोटी, माणुसकी मोठी,
सांगितल्या गोष्टी आयुष्याच्या..!

”मला चीड येत नाही
हाच माझा गुन्हा
दोष देऊ कुणा
सांगा दोष देऊ कुणा”
कष्टाचे सागर उपसुन दौलतीचे डोंगर रचणारा दलित कष्टकरी समाजासाठी स्वत:चे आयुष्य खर्ची घालून बदल घडवून आणणारा,अज्ञान-अंधश्रध्दा-दारिद्रय निर्मूलनासाठी विज्ञानवादी विचार मांडणारा,अवघ्या आयुष्यात अगदी दिड दिवस शाळा वाट्याला येऊन सुध्दा,एक महान साहित्यिक,कलावंत, विचारवंत,लेखक,कवी म्हणून पिढयान्‌पिढया आपला प्रेरणादायी आवाज लेखणीच्या व जबानीच्या माध्यमातून जिवंत ठेवणारा,अन्यायाविरुध्द बंड करुन उठणारा शिव-फुले-शाहु-आंबेडकरी विचारांना पुढे घेऊन चालणारा बहूजनांचा नायक,हरघडी झुंजणारा योध्दा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना विनम्र अभिवादन…! वाचकांच्या माहितीस्तव अण्णा भाऊंच्या आदर्श कार्याची महती सांगणारा शिवव्याख्याते रामकिसन मस्के (अंबाजोगाई,जि.बीड) यांचा प्रबोधनपर लेख…

क्षणोक्षणी झुंजत असताना अण्णा भाऊंनी इतिहास घडवला.अण्णा भाऊ साठे इतिहासात एकमेव असे आहेत ज्यांचे नांव वडिलांच्या नांवासहित घेतले जाते.त्यांचे नांव अण्णा व त्यांच्या वडिलांचे नांव भाऊ.पुढे हेच अण्णा भाऊ साठे या नावाने ओळखले जाऊ लागले.अण्णा भाऊंची प्रसिध्द कादंबरी “फकिरा” त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी समर्पित केली.शिव-फुले-शाहु-आंबेडकरी विचारांवर त्यांची प्रगाढ श्रध्दा होती.त्या विचारांचा त्यांच्या मनात प्रचंड आदर होता,हे त्यांच्या साहित्यातून वेळोवेळी प्रकट होते.ज्यांनी सातासमुद्रापार रशिया मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांगितले,तमाशाला नवे जनजागृतीचे स्वरूप आणले ते हेच ते अण्णा भाऊ.अण्णा भाऊंच्या ग्रंथालयात महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, मार्क्स,शाहुजी महाराज, आगरकर,वि.रा.शिंदे, भाऊराव पाटील,संत गाडगे महाराज यांच्या ग्रंथाचा समावेश होता. त्यांना दलित व उपेक्षित, शेतकरी,शेतमजुर,यांचा विकास व आदर्श जातिविरहीत समाजव्यवस्था मान्य होती.परंतु,आजही देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे होऊन हा घटक सुधारणेपासून दूर आहे.भारतीय समाज अंधश्रध्देच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी अण्णा भाऊंनी अनेक कथा-कांदबऱ्या लिहिल्या.त्यापैकी मरीआईला गाडा, स्मशानातील सोनं, थडग्यातील हाडे इ.काही कथांच बरचसं वाचन झालेलं आहे.आज अण्णा भाऊंची जयंती.अंगावर गुलाल टाकून,वाजत-गाजत-नाचत मिरवणुक काढणे म्हणजे जयंती नव्हे तर गावपातळीवर विचारांचा जागर करुन व्यसनमुक्त,दंगलमुक्त, आत्महत्या मुक्त आदर्श गाव आदर्श महाराष्ट्र व पर्यायाने आदर्श भारत निर्माण होणे महत्वाचे आहे.अण्णा भाऊ हे सच्चे समाजसुधारक. त्यांनी जे अनुभवलं भोगलं व साहिलं त्याचा त्यांनी अंत:र्मुख होऊन विचार केला व तेच साहित्यात उतरवलं.सामान्य माणसं जीवन कसं जगतात,ती तशी का वागतात,सदोदित परिस्थितीशी झुंज का देतात याचसोबत त्यांच्या जीवनात झुंज कोणी निर्माण केली.याचा शोध अण्णा भाऊंच्या साहित्यात आहे.पृथ्वी ही कोण्या शेषनागाच्या मस्तकावर उभी नसून शेतकरी,श्रमिकांच्या कष्टावर उभी आहे,असा विज्ञानवादी विचार त्यांनी दिला तसेच जगण्यासाठी रडू नका,तर लढा असा संदेशही त्यांनी दिला.अण्णा भाऊंच्या साहित्याचे 17 विदेशी भाषांमध्ये भाषांतर झाले आहे.अण्णा भाऊंना शोषणाचा अंत करणारी संघशक्ती अभिप्रेत होती.समग्र जीवन बदलवून टाकणारी दृष्टी अभिप्रेत होती.अण्णा भाऊ म्हणतात.”माझी जीवनावर फार निष्ठा आहे,मला माणसं फार आवडतात,त्यांची श्रमशक्ती महान आहे,ती जगतात आणि जगाला जगवतात यावर माझा विश्वास आहे.” डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या शोकसभेला अभिवादन करताना अण्णा भाऊ म्हणतात,
”जग बदल घालुनी घाव
सांगून गेले मज भीमराव”
पुढे अण्णा भाऊंनी उभा केलेला संघर्षाचा लढा ज्याची इतिहास विशेष दखल घेतो तो मानवमुक्तीचा,नवसमाज रचनेचा,जुलूम,अन्याय,अत्याचारावर प्रहार करणारा लढा आहे.अण्णा भाऊंनी अनेक भाषणातून नाटकांतून शाहिरी पोवडयांतून,वगनाट्यातून तसेच कलापथकाच्या माध्यमातुन अख्खा महाराष्ट्र पिंजून काढून जनजागरण केले.शेतकरी,कष्टकरी समाजासाठी ते म्हणतात,
”तू मराठमोळा शेतकरी,
असे घोंगडी शिरी,
जुनी ती काठी जुनी लंगोटी,
बदल ही दुनिया सारी,
रे बदल ही दुनिया सारी,”
साठे म्हणायचे की,माझा गाव,माझी माणसं,माझे राष्ट्र व माझा देश सुसंपन्न, सुसंस्कृत,सुसभ्य, सुशिक्षित,सधन,समृध्द व्हावा अशी स्वप्ने मला रोज पडतात.अण्णा भाऊंचे हे स्वप्न सत्यात उतरवणं ही आज आपली सर्वांची जबाबदारी व काळाची गरज आहे.छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज तसेच महात्मा फुले,छत्रपती शाहूजी महाराजांनी मनुस्मृती झुगारली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली,त्याचप्रमाणे अण्णा भाऊ साठे यांनीही या विषमतावादी समाजव्यवस्थेच्या विरूध्द आपला लढा अधिक तीव्र केला.अण्णा भाऊंचा लढा मानवमुक्तीचा,सामाजिक सलोखा निर्माण करणारा,नवसमाज रचनेचा,मानवतेचे जीवन बहाल करणारा,जुलूमाविरूध्द सामान्य माणसाला लढण्याला बळ देणारा होता.अण्णा भाऊंनी सांगितले,’तू जगाचा धनी आहेस,तू जगाचा पालनकर्ता आहेस,तू संपत्तीचा निर्माता आहेस,तू जगतोस,कष्ट करतोस आणि समाजाला जगवितोस व जागवितोस.तू गुलाम नाहीस तुच खरा मालक आहेस.तू स्वाभिमानी हो,तु जागा हो,तू क्रांतीकारी हो,तू जग बदलविण्यास सज्ज हो.“उठ माणसा जागा हो! संघर्षाचा धागा हो.” असा प्रचंड आत्मविश्वास त्यांनी सामान्यांमध्ये निर्माण केला.त्यासाठी सामान्य माणसाला जागं करण्यासाठी ते म्हणतात,
”यारे हातात गोफण घेऊ
रान राखाया एकीनं जाऊ
ऐतखाऊंना हाकलून देऊ !”
चित्राची पुजा करण्यापेक्षा अण्णा भाऊंच्या विचारांची पुजा करावी.आज गरज आहे ती आत्मपरीक्षणाची, स्वत:ला तपासा ओळखा आणि सज्ज करा एका कवीने सांगितलेच आहे की,
”शोधून पाहिले मी,
माझेच गांव नाही,
यादीत माणसांच्या
माझेच नांव नाही.”
अशी आपली अवस्था होता कामा नये.15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि 16 ऑगस्ट 1947 ला अण्णा भाऊ साठे म्हणाले,
”यह आझादी झुठी है
इस देश की जनता भूखी है !”
स्वातंत्र्य मिळुन आज 70 वर्षानंतर सुध्दा सामान्यांच्या प्रश्नांचे गांभीर्य कमी झालेले नाही.यासाठी अण्णा भाऊ साठेंच्या विचारांच्या माध्यमातुन आपल्याला स्वातंञ्याची दुसरी लढाई सुरु करावयची आहे.आजही अनेकांच्या हाताला काम,जगण्याला प्रतिष्ठा व पोटाला भाकर मिळत नाही.आजही तेल,दूध दगडावर ओततात.पण,सामान्यांपर्यंत ते पोहचत नाही.लग्नासारख्या समारंभात अन्नाची नासाडी होते.तसेच अक्षतांच्या माध्यमातून लाखो टन तांदूळ वाया घालवला जातो.आणि आजही अन्नान्न करुन मरणारे आमच्याकडे कमी नाहीत याचा कधी विचार होणार की नाही ? आज आपल्या देशातील बांधवांचे चित्र विदारक आहे.नको त्याच्या नावाखाली सामान्यांची लूट चालू आहे.धर्माचा ठेका घेतलेले काही लोक समाजात सांस्कृतिक दहशतवाद पेरीत आहेत.काही कथीत रक्षकांनी तर ठराविक जातीच्या लोकांना लक्ष्य करून माणसांनाच सोलून काढणे चालू केले आहे.यावर सुप्रसिध्द कवी प्रा.फ.मुं.शिंदे म्हणतात,
”परिवर्तनाच्या चळवळी चालतात,
धर्म-धर्मांशी बोलतात,
जाती-पोटजातीला टोलतात,
कार्यकर्ते एकमेकांना ढोरासारखेच सोलतात,नेते मात्र त्यांनाही स्वार्थानचं तोलतात.”
यामुळे सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे.तरुण व्यसनांच्या गर्तेत लोटला जात आहे.शेतकरी व शेतीला वाईट दिवस आले आहेत त्यामुळं शेतक-यांच्या आत्महत्या वाढत आहेत.ज्या अण्णा भाऊंनी मराठी भाषेला साहित्याच्या माध्यमातून वेगळं महत्त्व प्राप्त करवून दिलं,त्यांचा जयंतीदिन म्हणजेच 1 ऑगस्ट हा मराठी भाषा दिन म्हणुन साजरा व्हावा,अशी आपली सर्वांची मागणी आहे.सर्वांच्या सुखाच्या दिवसासाठी अण्णा भाऊंनी लढा उभा केलेला.हा लढा आता आपल्याला लढावा लागेल.आणि “दंगलमुक्त भारत”, “आत्महत्यामुक्त शेतकरी” व “व्यसनमुक्त तरुण” ही अभियाने देशपातळीवर उभी करावी लागतील.त्यासाठी आज अण्णा भाऊ साठे जयंतीच्या सर्व समाज बांधवांना हार्दिक आणि उदंड शुभेच्छा..!

जय जिजाऊ !
जय शिवराय !
जय ज्योती !
जय भिमराय !
जय अण्णा भाऊ !

लेखक-रामकिसन गुंडिबा मस्के
मो.9422930017

…मानसिक ताण आणि व्यसनांचे वाढते प्रमाण

प्रा.संजय काळे /औरंगाबाद
माणसाच्या आयुष्यातील अनेक अङचणी असतात त्याला कोणत्याही प्रकारचे व्यसन करणे हा उपाय असू शकत नाहीत ,माञ अनेक जण ताणतणावात आपल्याला व्यसन करतांना दिसत आहेत .
माणूस जीवन जगतांना अनेक समस्यांचा सामना करीत असतो.त्यात सुख आणि दुःखाचा समावेश असतो.परंतु अतिशयोक्तीपणाने निराशेचे प्रमाण जर वाढले तर माणूस व्यसन करतो, असे अनेकदा आपल्याला बघायला मिळते माञ, तो पर्याय नाही .
भारतीय राज्य घटनेच्या अनूसार आपण आपल्या देशात स्वातंत्र्य अनुभवतो.फक्त ठराविक तारखेला आणि दिनाला,…पण जर खरं सामाजिक आणि नैतिक स्वातंत्र्याच्या रूपात अनुभव घेण्यासाठी शासनाच्या मनात व्यसनधिनता रोखता आली पाहिजे तरच भल …….
मानवाला जीवनावश्यक गरजा मिळवून घेण्यासाठी राबराब मरमर करावी लागते. मानवी जीवनातील मुख्य बाबींचा विचार करत असतानाच अन्न, वस्त्र आणि निवारा या करीता सतत धङपङ करावी लागते आहे.
मानवी जीवनाची एकंदर स्थितीचाआढावा घेतला आर्थिक नियोजनबद्धता योग्यपणे न असल्याने अनेक ताणतणाव उद्भवत आहेत. जसे- लहानपणी असणाऱ्या सवयी, मिञाची संगत सोबत गुण,सामाजिक जबजबाबदारी विसर, सुशिक्षित आणि सुशिक्षित बेरोजगारी, कौटुंबिक हिंसाचार, मानसिक तणाव, मानवी जीवनात न आधारपण, जीवनावश्यक वस्तूंच्या करीता असलेली धङपङ, सामाजिक आणि सांस्कृतिकता यांच्या संबंधित नसलेली जाणीव, वाममार्गाला लागलेल्या फळीत कायम असलेली वागणूक आदी सवयीमुळे माणसाला व्यसनाधीनता आपल्या जीवनाचा एक भाग वाटतो आणि अशा व्यसनाच्या विळख्यात सापडलेले मानवाला मुक्त करण्यासाठी
भारतीय केंद्रीय नियोजन व्यवस्था (कायदेशीरपणे) राज्य शासन याच्या एकमूखीपणाने अमलबजावणी जर करता आली तर व्यसनधारकांस आपल्याला सहज रोखता येईलच, दुर्दैवाने आपल्याला हे धोरण बजावता येणे काळाची गरज आहे. परंतु याकाळापासून सगळ्यांना फायदा होईल असे कुणालाही काहीही वाटत नाही. पर्यायाने देशातील आणि राज्यातील लोकसंख्येचा आढावा घेऊन जर विचारविनिमय केला तर अनेक कुटुंबाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती अगदी सहजपणे सुधारणा करता येऊ शकेल परंतु इथे काहीही संबंध नाही अशा प्रकारे ‘व्यसन’ करणार्‍याकङे बघितले जात आहे .
भारतीय लोकशाहीचा एक भाग म्हणून जनमत घेऊन लोक अनेक राज्याच्या विविध ठिकाणी व्यवस्था चालविण्यात यशाचे पाढे वाचताना दिसतात, माञ व्यसन मुक्तीसाठी शासकीय धोरणाची भूमिका कुणीही ठामपणे मांडत नाही हे आपल्या मान्य करावे लागते. व्यसन असणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराचा विचार केला तर व्यसनधारकांमुळे त्याच्या कुटुंबीयांना जीवनात सतत दुखापतीला सामोरे जावे लागते आहे. म्हणून व्यसन मुक्तीकरीता शासकीय धोरणाची भूमिका ठामपणे राबली गेली पाहिजे पण ते आपल्याला साध्य करता येत नाही.माणूस हा समाजशील प्राणी आहे .माणूस आपल्या स्वतःच्या विकासासाठी सतत आणि सतत धङपङत असतो.
माणूस जन्माला येण्यापूर्वी पासून ते आयुष्याच्या अखेरीस सतत सुख आणि दुःखाचे अनेक संगम रंगविताना मनाच्या पटलावर जो आलेख तयार होतो.तोच खरयां अर्थाने मनोविकारांची ती अल्पकालीन जन्मवस्या असते.वयाची टप्प्यावर जसे जसे अनुभव येत जातात तसे तसे मनोविकार आकार घेऊ पाहते अन् कालांतराने मनोविकार रोखून ठेवण्यासाठी माणूस एका वेगवेगळ्या वळणावर येती.मगच व्यसनाला सुरूवात होते.
उदा- ङोक जङ होऊ लागते , चक्कर येतात ,ङोळयासमोर अंधाऱ्या येतात, फिरायला सारखे वाटते, पोटात तोङल्या वाणी वाटतय, मळमळ लागते , भयभीत वाटते , अशा अनेक मानसिक आजारपण घालविणे हा माणसाच्या मनात असताना मग सुरूवातीला चहा पिणे, चहाच्या नंतर गोङपणा घालविण्यासाठी सोफ खिणे,सोफ्यावर न भागता सुपारी खाणे, सुपारीत मिऋ युक्त पदार्थ खाणे,नंतर गुटखा खाणे, मावा खाणे, बार खाणे, सुपारीचे पदार्थाच्या कंटाळून जावून तंबाखू जन्य पदार्थाचे सेवन करणे, सिगारेट , बिङी, दारू, चरस, गाजा, आफीम, चिलम, हुकका यांच्यातील अतिसेवनाने मनोविकार इतका वाढतो की, तो व्यसनाचा एक भाग बनून जातो.आयुष्य हे सुखाचा आणि दुःखाचा सुरेल संगम आहे .आयुष्यातील अनेकविध टप्प्यावर जीवन रेखांकन केलेले आहे .मानशास्त्रीय दृष्टिकोनातून बाल्यवस्या, किशोरवस्या, तारूण्यवस्या, वृद्धावस्या या प्रमुख चार टप्प्यात एकदंर जीवन अवलंबून आहे .
आपल्या देशाच्या एका नामवंत विचारवंताने एका ठिकाणी म्हटले आहे,’ उच्च राहणीमान आणि विचार’ माञ, त्या विचारवंतांनी युवकांचयां आयुष्यातील मोलाची कामगिरीवर देश महासत्ता होण्यास मदत होईल, असा उद्दात हेतू त्यामागे होता. जगण्यावर प्रत्येकाने प्रेम करणे आवश्यक आहे .एकविसावे शतक हे वैज्ञानिक युग आहे .
यात जगत असताना आपल्याकडे वेगवेगळ्या विचार,आचार,संचार, प्रचार,करणारी मंडळी आहे .आपल्या राष्ट्रांच्या एकूण संपत्तीच्या बाबतीत विचार करायचा झाला तर युवाशक्ती ही सगळ्यात मोठी संपती आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही .परंतु जीवनातील अनेकविध टप्प्यावर आपल्याला मिळणाऱ्या संबंधातील रूपांतर हे व्यसनात घट्ट केले जाते.
या व्यसनाचयां रूपांतर हे हाय प्रोफाईल जगणं जीवनाचा एक भाग होऊन बसलेला आहे .
उदा-शाळा ,काँलेज,महाविद्यालय,उच्च महाविद्यालय, विदयापीठ, शासकीय कार्यालय, छोट्या – मोठ्या सामाजिक संघटना,कामगार संघटना,हातगाडी कामगार संघटना,विट भटटी कामगार संघटना, मिस्ञी,पेंटरांचे समूह, रिक्षा चालक समूह,छोटे वाहन धारक समूह,बाल कामगार संघटना, राजकीय कृत संघटना,अनेक मिञ मंङळ, वेगवेगळे क्लब, गरीबीची झळ सहन न करू पाहणाऱ्या वस्तयां,झोपङपटटी समूह, बेकारीत पङणारे गट,
अशासारख्या माध्यमातून आपल्याला व्यसनाचे जाळे विणलेले दिसत आहेत .
विश्व आरोग्य संघटनेच्या माध्यमातून असे लक्षात येते.आजच्या युवा शक्तीच्या बाबतीत अनेक व्यसन असल्याने मृत्यूदरातही वाढ झालेल्याचे समजते आहे. एखादी व्यक्ती आपला फोन उचलत नसेल तर त्या व्यक्तीला दोन वेळेच्यावरती परत फोन करू नका , कदाचित त्या व्यक्तीला त्यावेळेस तुमच्या फोनपेक्षा महत्त्वाचे काम असेल.तुम्ही एखाद्याकडून उधार घेतलेले पैसे त्याने परत मागण्याअगोदर परत करा , तीच गोष्ट छत्री आणि पेनबाबत.एखादा तुम्हाला हॉटेलमध्ये जेवायला नेतो तेव्हा मेनूतील महागडा पदार्थ ऑर्डर करू नका , शक्य असल्यास देणाऱ्यालाच ऑर्डर करायला सांगा.तुझ अजून लग्न झालं नाही … तू अजून घर बांधलं नाहीस ..असले समोरच्याला अडचणीत टाकणारे प्रश्न विचारू नका कारण ती तुमची अडचण नाही. नेहमी आपल्यापाठुन येणाऱ्या व्यक्तीसाठी दरवाजा उघडा मग ती व्यक्ती स्त्री असो वा पुरूष कारण कुणाला चांगली वागणूक दिल्याने तुमचा कमीपणा होत . तुम्ही मित्राबरोबर टॅक्सी शेअर केलीत आणि त्याच भाडे त्याने दिले तर पुढच्या वेळेस तुम्ही भाडे दया.सगळ्या राजकीय मतांचा आदर करा. कधीच कोणाच संभाषण मध्येच खंडीत करू नका. जर तुम्ही कोणाची
मस्करी करत असाल आणि त्या व्यक्तीला त्याचा त्रास होत असल्यास ती मस्करी ताबडतोब थांबवा.जो मदत करतो त्याला धन्यवाद द्या. एखाद्याची स्तुती सगळ्यांसमोर करा पण त्याचे दोष त्यालाच सांगा. कोणाच्या वजनावर भाष्य कराण्याची काही आवश्यकता नसते. फक्त म्हणा तु छान दिसतोस किंवा दिसतेस , जर त्यांना वजन कमी करायचं असेल तर ते तुमच्याशी बोलतील.जेव्हा एखादा त्याच्या मोबाईल मधील फोटो तुम्हाला दाखवतो तेव्हा डावी उजवीकडे स्क्रोल करू नका , कारण तुम्हाला कल्पना नसते पुढे काय दिसेल. जेव्हा आपला सहकारी डॉक्टरकडे जातो आहे असं म्हणाला तर, कशासाठी का असे प्रश्र्न विचारू नका फक्त तु ठिक आहेस अशी आशा करतो एवढच म्हणा.त्याला सांगायचं असल्यास तो सांगेल , तुम्ही त्याला खाजगी स्वरुपाच्या आजाराबाबत विचारून खजील करू नका.जेवढा मान साहेबाला द्याल तेवढाच शिपायाला दर्या. आपल्या हाताखालच्या माणसांना तुम्ही कीतीही आदराची वागणूक देता यावर तुमच्या व्यक्तिमत्वाची उंची ठरवली जाते,एखादा माणूस आपल्याशी समोरासमोर बोलत असल्यास सतत मोबाईल मध्ये लक्ष देणे ही अक्षम्य चूक ठरते.जो पर्यंत सल्ला मागितला जात नाही तोपर्यंत देऊ नका.जेव्हा एखाद्याशी बऱ्याच वर्षांनी भेटत असाल तेव्हा जोपर्यंत विषय निघत नाही तोपर्यंत त्याचे उत्पन्न व वय याबाबत विचारू नका. जोपर्यंत एखाद्या विषयात तुम्हाला समाविष्ट केले जात नाही तोपर्यंत त्या विषयापासून लांब रहाणे योग्य रस्त्यात कोणाची भेट झाल्यास गॉगल काढून संभाषण सुरू करा , ह्यातून आदर प्रतित होतो तसेच साफ संभाषणाच्या दृष्टीने डोळ्यांचा संपर्क आवश्यक असतो .या अशा वेगवेगळ्या व्यक्तीमत्वात आजच्या युवा शक्तीने वेगवेगळ्या अंगाने आपल्याला व्यसनापासून दुर ठेवून आपले घर,समाज, गाव, तालुका, जिल्हा, प्रदेश, राज्य,देश कार्यात मोलाचा वाटा उचलून देशातील सिमेवर लढाईत शहिद होणाऱ्याची संख्या कमी आहे, माञ युवक – युवतीनां व्यसनातून मृत्यू होणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.हि चिंतेची बाब ठरत आहे.एक विसाव्या शतकाच्या बळावर युवा शक्तीने बौद्धिक, मानसिक, शारीरिक, बळाचा वापर देश हितासाठी लावले तरच जीवन जगण्यासाठीचा आनंद घेतला असे म्हणता येईल.जीवनातील अनेकांना सुख आणि दुःखाचा सामना करावा लागत असतो.आयुष्यातील टप्प्यावर माणसाला नवेनवे आयाम पार पाङावयाचे असताना समस्यांचा एक टप्पा आला की,माणसाच्या जीवनात तणावाची पातळी तयार होऊ लागते .अतिरिक्त दुःख आणि दुःखाचा करून घेतलेला बाऊ
बेकारीतीला समस्यां आणि उच्च शिक्षणाची पाञता असतांना आलेले वैफल्यकंपनी,शासकीय,प्रशासकीय तबाव,खाजगीकरणाचा फटका,मोलमजूरी करणारा वर्ग,
कौटुंबिक अनेकविध समस्या,
शैक्षणिकखर्च ,मुलांच्यालग्न,नोकऱ्या समस्या,नातेवाईक आणि इतरांच्या बाबतीत आपण किती तुलनात्मक स्थिर नसल्यामुळे तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल,कौटुंबिक समस्यांचा सोङविण्यासाठी समाजाच्या वतीने मिळणाऱ्या अपमानाच्या वागणूकीमुळे तणाव वाढतो.सामाजिक मोठयापणाचे आव आणल्यामुळे देखील तणाव वाढतो.भौतिक आणि अभौतिक गरजांच्या समस्यांचा ङोंगर असल्यामुळे तणाव वाढतो.विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी याच्यावर अभ्यासक्रम, परीक्षा, बदलेले नवे परीक्षा धोरण, शैक्षणिक फिसचा बोजा,शासकीय आणि निम शासकीय गटातील असणाऱ्या स्पर्धा आणि स्पर्धेच्या तुलनात्मक विचाराने तणाव वाढत जातो.युवक – युवती प्रेम प्रकरणे, मनासारख किंवा मनाच्या विरूद्ध अशावेळी देखील तणाव निर्माण होत असतो.सामाजिक अलिप्तपणा असल्यामुळे तणाव वाढत असतो
अतिशयोक्ती विचार आणि लवकरच लवकर मोठे होण्याची स्वप्न उराशी बाळगून ठेवणारा गटाच्या बाबतीतही तणाव दिसून येतो.सार्वजनिक आणि इतर खाजगीकरणामुळे तणाव येतो,तसेच नोकरी बदलत्या धोरणाचा तणावात रूपांतर बघतांना मिळते आहे ,त्यासह खाजगी रोजच्या रोज कमाई करणाऱ्या गटातील बदलणाऱ्या धोरणे आणि घटना इत्यादींच्यामूळे देखील आपल्याला तणाव वाढलेल्या घटना समजते आहे .शासकीय समुपदेशन न मिळालेल्यामुळेही तणाव येतो.
मिञ,मैत्रीण,पती, पत्नी,भाऊ, बहीण,आई,वङील,मुलगा,मुलगी,काका,काकु,मेहुणा,मेहुणी यासह माणसिक दृष्टीने ठरविण्यात आलेल्या नातेवाईक याच्यापासून मिळणाऱ्या वागणूकमूळे तणाव येतो.अतिशयोक्ती ताणतणावाने व्यसनाचे प्रमाण वाढलेल्या घटना आपण विविध प्रसार माध्यमातून बघत,वाचत आणि पाहत असतो.परंतु शासकीय स्तरावरील असा कोणत्याही प्रकारच्या अभ्यासक्रम किंवा कार्यशाळा राबविले जात नाहीत .मूळात आपल्याला मनाचा विचार हाच महत्त्वाचा भाग आपण समजून घेतला पाहिजे .तरच व्यसनाचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकेल यांत शंका नाही .वरीलप्रमाणे लेखनातून एकच बाबींचा विचार मांङावयाचा आहे की, सदय परिस्थितीत आपल्या व्यसन मुक्ती करण्यासाठी आपण शासकीय धोरणाचा अंवलब कसा करता येईल यांची जबाबदारी घेणाऱ्यानी काळजी घ्यावी आणि माणूसकीचा आधारवङ सांभाळून घ्यावा.

चीनचे भारतीयांशी होणारं आर्थिक युद्ध…?

(इकोनॉमिक वॉर…मोबाईल अँप,इलेक्ट्रॉनिक उत्पादने)

भारत आणि चीन यांच्यातही आर्थिक आघाडीवर सुरू असलेल्या गतिरोधकामुळे केंद्र सरकारने मेक इन इंडिया आणि स्वावलंबी भारत अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी नियमांमध्ये काही बदल करण्याची अपेक्षा केली जात आहे, जेणेकरुन चिनी उत्पादने आणि इतर सेवा यासाठी देशात अधिक कठीण परिस्थिती उद्भवू शकतात. गेल्या आठवड्यात लडाखमधील हिंसाचारानंतर व्यापाऱ्यांच्या समुदायासह नागरिकांनी चिनी वस्तू व सेवांवर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे. या हिंसाचारात २० सैनिक ठार आणि ७० हून अधिक जखमी झाले.

भारत चीन सीमेवर झालेल्या हल्ल्यामुळे देशभरात पुन्हा तेच जुने पण नव्याने वाद सुरू झाला की,चीनी वस्तू वापरू नका,चीनी अँप, इलेक्ट्रॉनिक,इलेक्ट्रीकल वस्तू,चैनीच्या गोष्टी, सौंदर्य प्रसाधने अश्या अन्य अत्यावश्यक गोष्टी वापरण्यास थेट नकार दिला,काहींनी चीनच्या विरोधात पडसाद उमटले लोकांनी घरातील टीव्ही फोडले कुणी मोबाईल फोडले तर कुणी चीनला सेकंदाला कोटी रुपयांची उलाढाल करून देणारे tik tok अँप डिलिट केले व आम्ही देशभक्त कट्टर स्वदेशी असल्याचा आव सर्वत्र आणला,पण काही दिवस जातात तेव्हा सर्व परिस्थिती जैसे थे होती.

या सर्व प्रकारावर नजर टाकताना अनेक गोष्टी लक्षात येतात, की जेव्हा चीनसारख्या देशाने जीवनातील प्रत्येक गोष्टीला पर्याय उपलब्ध करून तो जागतिक बाजारपेठेत जागतिक दाराच्या किमतीपेक्षा माफक दरात त्यांची उत्पादने बाजारपेठेत आणली, यामुळे सर्वांना एक पर्याय मिळाला की ज्या गोष्टीसाठी अमाप रक्कम मोजावी लागते आहे तीच गोष्ट जर अत्यल्प दारात मिळत असेल तर मग देशप्रेम, स्वदेशी या संज्ञा कुठेतरी खिदपद पडतात हे नेहमीच नागरिकांनी सिद्द केले आहे.

भारत देश स्वतंत्र होऊन काही दिवसांनंतर १९६६-६७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी चीनला धडा शिकविला ज्याच्या जखमा अजूनही हिरव्या आहेत. इंदिरा गांधी सरकारने दिलेल्या रणनीतिक आणि सशस्त्र पावसाचा चीन विसरला नाही. सुमारे ५३ वर्षांपूर्वी भूतानचे संरक्षण करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी चीनच्या निशाण्याखाली आल्या. तेव्हा चीनी सैनिक डोकलाममध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत होते. १९६६ मध्ये चीनने भूतानच्या बाजूने असल्याची कठोर टीका केली. पण भूतान हा अतिशय जवळचा आणि मैत्रीपूर्ण देश असल्याची भारताची वचनबद्धता आहे.

दि.१७ जून रोजी भारत चीनचा सीमावाद यामुळे हल्ला झाला व त्यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले, त्याच्या दुसऱ्या दिवशी चीनचे ४८ जवान मारले गेल्याच्या बातम्या सकाळी सकाळी व्हायरल झाला व नंतर सायंकाळी तीच बातमी ते जवान शहीद नाही तर जखमी झाले ह्या बातम्या सर्वत्र पसरल्या मग आज भारत स्वातंत्र्यच्या ७३ व्या वर्षांत पदार्पण करत असताना जर ,ज्या मीडियामुळे, माध्यमांनमुळे आज भारत स्थिर आहे,त्या भारत देशाला हीच मीडिया जर चुकीचा संदेश देत असेल तर ही या भारत देशाची शोकांतिका म्हणावे लागेल..!

१९६६-६७ ला भारत चीनमध्ये जे युद्ध झाले त्या धर्तीवर एक इंडियन आर्मी नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता, तो चित्रपट जरी काल्पनिक असला तरी या चित्रपटात दाखवलेले चित्र आज भारतीयांशी मिळते जुळते आहे,कारण भविष्यात जेव्हा कधी भारत चीनचे युद्ध होईल त्यामध्ये कुणाची हार जित होणार नाही तर यासाठी प्रत्येक राष्ट्राची सुरक्षा व्यवस्था (आर्मी) स्ट्राँग असते पण जि आर्मी स्ट्राँग करण्यासाठी प्रत्येक देशातील गरीब जनता उपाशीपोटी राहते,ज्या पैशातून आपण अन्न खरेदी करतो त्याच पैशातून आपण युद्धाचे साहित्य दारुगोळा खरेदी करतो ही परिस्थिती आहे, राजकीय चौकटीतील काही बोटावर मोजण्याइतके लोक आपल्या भारत देशाची हाताळणी करत आहे,

यापुढे जर भारत चीन मध्ये युद्ध झाले तर ती हत्यार युद्धाने नाही तर इकॉनमिक वॉर ने होईल यामध्ये जन्मलेल्या बाळापासून मारणाऱ्या माणसांपर्यत चीनच्या उत्पादनाची गरज चीनने भारतीयांना लावलेली आहे यामुळे आपण एक सुई जरी खरेदी केली तर त्याचा सरळ फायदा थेट चीनला होईल याचे उदाहरण आज सर्वांच्या डोळ्यासमोर आहे,ते म्हणजे चिनी अँप टीक-टॉक हे ६७ एम.बी.चे हे व्हिडिओ एडिटिंग व पब्लिसिटी अँप आहे,आज भारतीय घरामध्ये ७ सदस्य असतील तर त्यांपैकी ४ सदस्य हे या tik tok ऑपच्या अधीन गेले आहेत व यांच्या दिवसातील २४ तासांपैकी ४-५ तास प्रत्येकजण या अँपसाठी देत आहे व वस्तुस्थिती आहे, यामागचे इकॉनॉमिक वॉर कसे आहे पहा,एक सेकंदाला एक भारतीयाने हे अँप इन्स्टॉल केले तर ६७ MB डेटा जातो, तर एक तासाला किती लोक आहे अँप घेत असतील त्याचा आलेख नाही,हे अँप वापरताना मोबाईलमध्ये सर्वात जास्त इंटरनेट डेटा व पॉवर वापरणारे हे अँप आहे,यामध्ये ३० सेकंदाचा व्हिडीओ अपलोड होतो जर एका सेकंदाला १ कोट व्हिडिओ अपलोड झाले तर त्याचा थेट फायदा चीनच्या इकॉनॉमिला होतो हे आहे चीनच्या पोटातील भारतीयांसाठी इ-वॉर…

म्हणूनच येणाऱ्या व चालू काळात हे युद्ध सुरू आहे,त्यामुळे या युद्धात देश किती संकटात व आर्थिक संकटात जाईल तेव्हा या देशाचा प्रत्येक नागरिक यासाठी जबाबदार असेल हे डावलता येणार नाही.

―संक्षिप्त―
इंजि.दत्ता हुले (बीड)
मो.9960135634

छत्रपती राजर्षी शाहूजी महाराज ”वसा आणि वारसा”

लेखक -शिवश्री रामकिसन गुंडीबा मस्के (सर)―

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा वारसा पुढे चालवणारे, धर्मसुधारणा, अंधश्रध्दा विरोध, जातिनिर्मुलन, राजकीय सत्तेत समान वाटा, राखीव जागा, शेतीसुधारणा व अधिकारासाठी संघर्ष हे सत्यशोधक विचार स्वीकारुन आचरणात आणणारे, परिवर्तनवादी विचारवाहक, आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहूजी महाराज यांना विनम्र अभिवादन….!
वर्तमानाचे भान ठेवून असतात तेच इतिहास घडवतात, भविष्याचे वेध ज्यांना लागलेले असतात आणि परिवर्तनासाठी जे झपाटून गेलेले असतात तेच इतिहास घडवतात याचे आदर्श उदाहरण म्हणजे छत्रपती राजर्षी शाहूजी महाराज ज्यांनी स्वत:च्या संबंध आयुष्यात जातीधर्मातील भेदाला कधीच थारा दिला नाही ते छत्रपती राजर्षी शाहुजी महाराज आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या विचारांची विशालता लक्षात घेतली तर त्यांचे वारस असावेत कसे तर ते असावेत सरकारी निमसरकारी नोकऱ्यामध्ये राखीव जागा ठेवल्यास समर्थन देणारे, सर्व जाती-जमातींना त्यांच्या शिक्षण, संख्येप्रमाणे शासकीय निमशासकीय नोकरीत तसेच राजकीय प्रतिनिधीत्व मिळाले पाहिजे याचे समर्थन करणारे जातनिहाय जनगणना व्हावी याचे समर्थन करणारे चातुरवर्ण्य व्यवस्था,सतीप्रथा,उच-नीचता म्हणजेच मनुस्मृती नाकारणारे या विचारांचे 26 जुलै 1902 रोजी छत्रपती राजर्षी शाहुजी महाराजांनी आपल्या संस्थानात 50% जागा राखीव ठेवून आरक्षणाची संकल्पना अमलात आणली व ते आरक्षणाचे जनक ठरले. समाजात नोकऱ्या न मिळाल्यामुळे अनेक तरुण वाईट मार्ग स्वीकारतात अशा या तरुणांना अंगरक्षक, पहारेकरी,रथावर वाहक तसेच जमिनी देऊन प्रतिष्ठेचे जीवन जगण्यास प्रोत्साहित केले.मणभर विचारांपेक्षा कणभर आचरण श्रेष्ठ या उक्तीप्रमाणे कृतींवर भर देणारे ते एक कार्यकर्ते राजे ठरले.त्यांच्या काळातील स्त्रियांची स्थिती विदारक होती.स्त्रियांसाठी त्यांनी स्त्रीशिक्षणास चालना देऊन विधवा विवाह आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देऊन स्त्रियांना माणुसकीचे सर्व हक्क प्रदान करण्याचे मोलाचे कार्य छत्रपती राजर्षी शाहुजी महाराजांनी केले.
शिक्षण हा राष्ट्रोन्नतीचा सर्वात महत्वाचा भाग. छत्रपती राजर्षी शाहुजी महाराजांनी शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन शिक्षण सक्तीचे केले. जर मुलगा शाळेत आला नाही तर पालकांना दंड केला. अनेक जाती-जमातींसाठी त्यातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची व्यवस्था केली.त्याकाळी कोल्हापुरात वसतिगृहांची पहिली स्थापना झाली म्हणुन आज कोल्हापुराला वस्तीगृहाची जननी म्हणुन ओळखले जाते.शाळेत स्पृश्य-अस्पृश्य भावना मोडीत काढाली.सर्व जाती-जमातीच्या मुलांना समानतेची वागणुक देण्यासाठी कायदा केला. दीन-दलित, गोर-गरीब, शेतकरी-कष्टकरी यांच्या मुलामुलींना शिक्षणांच्या सोई उपलब्ध करवून दिल्या.दीनदलितांना जवळ केले.स्वातंत्र्यलढयासाठी छत्रपती राजर्षी शाहुजी महाराजांची भुमिका स्पष्ट होती. मुठभर लोकांच्या हातात स्वराज्य जाता कामा नये. त्यासाठी आपण पात्र झाले पाहिजे म्हणजेच शिक्षण घेतले पाहिजे. जातीभेद गाडले गेले पाहिजेत,राजकीय आणि सामाजिक सुधारणा बरोबर झाल्या पाहिजेत यासाठी त्यांनी कार्य केले.आज ज्या लोकशाही पद्धतीवर आपला देश चालतो आहे त्या लोकशाही राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्याकाळी मोलाचे सर्व सहकार्य देण्यात सिंहाचा वाटा असलेले हेच ते छत्रपती राजर्षी शाहुजी महाराज ज्यांच्या प्रतिमेवरच प्रेम मर्यादित न ठेवता विचारांचा जयजयकार करुन चित्राची पुजा न करता चारित्राची पुजा करणे, उत्सवाच्या गदारोळात विचारांची होरपळ होणार नाही याची दक्षता घेणे महत्वाचे आहे.
आज छत्रपती राजर्षी शाहुजी महाराजांचे स्मरण करताना त्यांचा वसा आणि वारसा कोणता हे आपणास पाहावे लागेल. जयजयकार करणारे कोण खरे आणि कोण खोटे हे तपासावे लागतील. त्यांचा हेतु तपासावा लागेल जातिपरिषदा असाव्यात परंतु जातीच घट्ट होणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागेल. जाति परिषदा भरवून माणसांची मने ही शिक्षणाने सुसंस्करित, उच्च दर्जाची, मानवजातीचे कल्याण करणारे होतील याचा जागर करावा. आणि विशेष म्हणजे जाति परिषदांच्या माध्यमातून जातिअंताचा लढा उभा करावा.आज बहुजनातील मोठा भाऊ “कुणबी मराठा आरक्षण” हा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना फक्त आरक्षण मिळालेच पाहिजे असे न म्हणता इतर सर्व समाज बांधवांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल यावर विचारविनिमय होऊन प्रश्न मार्गी लावणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. छत्रपती शाहुजी महाराजांनी त्यांच्या काळात शेतकऱ्यांसाठी शेतात केलेली सिंचन व्यवस्था ज्यामुळे आज कोल्हापुरातील राधानगरीसारख्या धरणामुळे भाग सुजलाम सुफलाम आहे.त्यांची हीच दृष्टी आजच्या राजकीय वर्गामध्ये येणे गरजेचे आहे.जेणेकरुन शेतकऱ्यांच्या जमिनिला भरपूर प्रमाणात पाणीपुरवठा होऊन,शिवार जलसंपन्न झाल्यामुळे मुबलक प्रमाणात उत्पादन निघेल व उत्पादन खर्चावर शेतीमालाला बाजारात हमीभाव मिळेल तरच शेतीला आणि शेतकऱ्याला चांगले दिवस येतील. छत्रपती शाहुजी राजांच्या काळात शेतकरी आत्महत्यामुक्त होता ही बाब लक्षात घेऊन आजघडीला आत्महत्यामुक्त शेतकरी होण्यासाठी शासकीय व राजकीय पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे.शेतकरी कष्टकऱ्यांच्या लेकरांच्या लेखणीला धार आणि त्याला व्यावसायिक शिक्षणाची जोड मिळाली तर उद्या राष्ट्राची प्रगती निश्चित आहे.यासाठी शैक्षणिक क्षेत्रात आर्थिक सवलती देऊन शेतकऱ्यांच्या लेकरांना शिक्षण आणि नोकरी देणे महत्वाचे आहे.व्यसनाने तरुणवर्ग बरबाद होत चाललेला असताना व्यसनमुक्त तरुण होण्यासाठी प्रबोधन होणे गरजेचे आहे. जातिजातीमध्ये होणाऱ्या दंगली या समाजाच्या विनाशास कारणीभुत आहेत म्हणून आपला महाराष्ट्र दंगलमुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी प्रयत्नात्मक पावलं उचलणं गरजेचे आहे.छत्रपती राजर्षी शाहुजी महाराजांनी घेतलेला कार्याचा वसा आणि त्यांचा वारसा पुढे चालु ठेवण्यासाठी आजपासून आपण सर्वजण सज्ज होऊयात यासाठी सर्वांना हार्दिक आणि उदंड शुभेच्छा..!

“थांबवूया त्यांची लूट,
ज्यांची चाढयावर मूठ.
करुया नेहमीकरीता दूर,
घरातील त्यांच्या तिमिर.
घेऊन शाहुजींचे विचार,
उद्धार बळीराजाचा करुया. पिढ्यान्‌-पिढ्या छळले ज्यांनी,
पुरुनि त्यांना उरुया.”उरुयाजय जिजाऊ,जय शिवराय
जय ज्योति,जय भिमराय
जय शाहुजी …

आस्थेचा विजय…

बिंबिसार शहारे―
कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे देशातील यात्रा, जत्रा, बाजार बंद करण्यात आले होते. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून अजूनही काही मंदिरे बंद आहेत. परंपरा पाळायच्या, की मानवी जीवनाला महत्त्व द्यायचे, हा ज्याचा त्याचा प्रश्न. श्रद्धेचा विषय असल्याने सरकार आणि न्यायालयांनाही ब-याचदा आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा लागतो. सर्वोच्च न्यायालयावरही आता तीच वेळ आली आहे.
रथयात्रेला परवानगी दिली, तर भगवान जगन्नाथ आपल्याला कदापि माफ करणार नाही, अशी भाषा करणारे न्यायपीठ अवघ्या एकाच आठवड्यात आपला निकाल बदलते, याचा अर्थ काय काढायचा? महाराष्ट्रात जशी वारीची परंपरा खंडीत होऊ नये, म्हणून मोजक्याच वारक-यांना पंढरपूरला जाऊ देण्याची परवानगी राज्य् सरकारने दिली, तशीच परवानगी आता भाविकांशिवाय जगन्नाथाची रथयात्रा काढण्यास दिली आहे. जगन्नाथाच्या यात्रेची तयारी करणा-यांना त्यामुळे आता हुरुप आला आहे.
ओडिशाच्या पुरी येथे काही निर्बंधांसह रथयात्रा काढण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. आरोग्याबाबत कोणतीही तडजोड न करता मंदिर समिती, राज्य आणि केंद्र सरकारच्या समन्वयाने पुरी रथयात्रा आयोजित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय खंडपीठात ही सुनावणी झाली. या तीन सदस्यांच्या खंडपीठामध्ये बोबडे यांच्यासह न्यायमूर्ती ए.एस. बोपन्ना, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांचा समावेश होता.
पुरीचे जिल्हाधिकारी बलवंत सिंह यांनी रथ यात्रेसाठी श्रीक्षेत्र धाम सज्ज असून न्यायालयाच्या सूचनांचे पालन केले जाईल, अशी हमी दिली. पुरी नगरपालिकेने दुकानदारांना त्वरित दुकाने हटवण्यास सांगितले आहे. महाप्रभू जगन्नाथांचे नंदी घोष, बालभद्रजींचे तलाध्वज रथ आणि सुभद्राजी देवी देवलन या तिन्ही रथांची एका समितीने लगेच तपासणी केली. गृहमंत्री अमित शाह यांनी पुरी येथील गजपती महाराज दिव्यसिंहदेव यांच्याशी चर्चा केली. ओडिशा सरकारच्या वतीने निवासी आयुक्त संजीव मिश्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे न्यायालयाचे कामकाजही सोपे झाले.
राज्य सरकारने भाविकांविना पुरी येथे रथयात्रा करण्याची तयारी दाखविली होती. शतकानुशतके चालू असलेली परंपरा थांबू नये. नियमांनुसार, मर्यादित पद्धतीने भगवान जगन्नाथांच्या सेवेत गुंतलेले आणि ज्यांची कोरोना चाचणी नकारात्मक आहे, अशा पुजा-यांना रथयात्रेची परवानगी देण्यात यावी. हा लोकांच्या आस्थेचा प्रश्न आहे, अशी बाजू केंद्र सरकारने मांडली होती. गजपती महाराजांच्या प्रस्तावावर ओडिशा सरकारनंतर आता केंद्र सरकारने धामपुरी येथील भाविकांविना रथयात्रेला परवानगी दिली आहे. मंदिरात घंटा वाजवत मंदिर सेवकाने तिन्ही रथांवर पुष्पहार अर्पण केले.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पथ्थ्य कसोशीने पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे 18 जून रोजी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयामध्ये म्हटले होते, की महाप्रभू जगन्नाथजी यांची जगप्रसिद्ध रथयात्रा या वर्षी होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने रथयात्रेला परवानगी दिली तर भगवान जगन्नाथ आम्हाला क्षमा करणार नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. अखेर आस्थेचा विषय मार्गी लागला असून आता रथयात्रा निघणार आहे.

अटलजी-मुंडे-महाजनांच्या विचारधारेत घडलेल्या परिपक्व मास लिडर – पंकजाताई गोपीनाथ मुंडे !

पैठण दि.३१:आदित्य✍ढाकणे
खरंतर एक परिपक्व व्यक्ती कधीच कोणत्या गोष्टीसाठी भुकेलेला नसतो.समाजातील परिपक्व व्यक्ती कुणीही असू शकतो. घरातील कर्ता व्यक्ती जसा स्वत:च्या आशा आकांक्षा बाजूला सारून आपल्या कुटुंबासाठी जीवनपटलावर झगडत असतो, त्यांचा सुखासाठी , आनंदी जीवनासाठी संघर्ष करत असतो . तो कुटुंब प्रमुख परीस्थितीनुसार घरात असो वा नसो ,त्याचं व्हिजन क्लिअर असतं. तसंच काहीसं असतं काही परिपक्व राजकीय नेत्यांचं !
आजकाल नेता म्हटलं की फक्त सत्तेसाठी आसुसलेलं व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. पण खरंच सगळेच नेते सत्तेसाठी आसुसलेले असतात का ? खरंतर सत्तेत नसताना सुद्धा जो राजकीय नेता आपल्या जनतेचे मायबाप होऊन त्यांचा भल्याबुर्या काळात त्यांना कायम एक आधारवड म्हणून जगतो तोच खरा सत्ताधीश असेल, हे माझं व्यैयक्तिक मत ! सत्ता वा कसलंही पद नसताना कोरोनासारख्या महामारीत सुद्धा जनतेच्या मदतीसाठी त्यांचा मायबाप होऊन जमेल तसं स्वत:ला झोकून देताना मी पाहिलंय रणरागिणी ला . होय , तीच रणरागिणी आपल्या लाडक्या ताईसाहेब , पंकजाताई गोपीनाथ मुंडे !
कोरोनामुळे राज्यातच काय तर संपूर्ण जगामध्ये अंधकारमय वातावरण पसरलंय . महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधी याचं राजकारण करायला लागलेत ( काही मोठ्या पदावर असणार्या मोजक्या व्यक्ती).अशा स्थितीत ताईसाहेबांसारख्या नेतृत्वाने असल्या राजकीय खेळींपासून दुर राहत कोरोनाच्या अंधारात गुरफटलेल्या मायबाप जनतेला शक्य तेवढी मदत करण्यात स्वत:ला बिझी करण्यातंच धन्यता मानलीय.मग ते ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसाठी ताईसाहेब जाणिवतेने लढताना आपण अनुभवलंय . तेही सत्ता नसताना, शक्य तसं कामगारांशी संपर्कात राहून अडचणी समजून घेणं ,‌राज्य सरकारला जाब विचारून तात्काळ निर्णय घ्यायला भाग पाडणारं हे नेतृत्व. एवढंच नाही तर आज घेतलेली मराठवाडा पाणी परिषद ताईसाहेबांची दुरदृष्टी दाखवते.
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान च्या मार्फत ‘उत्थान’ अंतर्गत पंकजाताईंनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत‌ संबंध महाराष्ट्रामध्ये मुंडेजीच्या संघर्ष योध्यांनी कोरोनाच्या काळात जनतेसाठी जे मदतकार्य राबवलं ते एका प्रतिष्ठानसाठी दैदिप्यमान आणि उल्लेखणीयंच ! सत्तेच्या खेळीपासून दुर राहून आदरणीय मोदींजीच्या आवाहनाला सज्ज राहत व मुख्यमंत्र्यांच्या योग्य निर्णयांचं स्वागत करत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान मार्फत ताईसाहेब जनतेसाठी मदतकार्यात किंचीतही कमी पडत नाहीत ‌, मदतकार्य सुरूच आहे. शेवटी लोकनेत्याच्या लेकीने कुठल्याही परिस्थितीत संघर्ष करण्याचा वसा घेतलेला आहे .
चाणक्य म्हणतात ‘ कोई भी व्यक्ती अपने कार्यो से महान होता है, जन्म से नही ‘ हेच मला पंकजाताईंबद्दल नक्की म्हणावं वाटतंय कारण साहेबांची लेक म्हणून जरी जन्म घेतला असला तरी एक मंत्री या नात्याने ताईसाहेबांनी जणू एक विकासगंगाच मराठवाड्यात आणलीय ,रस्ते महामार्ग,जलयुक्त शिवार, हक्काचा पिकविमा, ग्रामविकास च्या माध्यमातून केलेली कामे कितीतरी आहेत , त्यानुसार मला २०१४ च्या आधीचा मराठवाडा आणि आत्ताचा मराठवाडा ,फरक स्पष्ट जाणवतोय .
पण दुर्दैवाने २०१९ च्या विधानसभेत काही अनपेक्षीत कारणांमुळे पराभव स्विकारावा लागला आणि ‌तेव्हापासून पक्षातीलच मोजक्या लोकांनी ताईसाबांविरोधात नीच पातळीचं राजकारण सुरू केलंय. एक महिला नेतृत्व असल्याचा फायदा तर ही राजकीय मंडळी पुरेपूर घेतीय .
अशा नीच लोकांना एवढंच सांगेल की, आदरणीय प्रमोदजी आणि मुंडेसाहेबांच्या विचारांतून वाढलेलं हे ‘पंकजा’ नावाचं फूल भाजपच्या मोजक्या मंडळींनी बनलेल्या चिखलातून ऊमलणार सुर्य किरणांच्या साक्षीने. आणि राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत सुध्दा पोहोचेल ! तेव्हा मुंडेत्वात वाढलेल्या प्रत्येक संघर्ष योध्याच्या संघर्षाचं चीज झालेलं असेल !


पंकजा मुंडे समर्थ आहेत महाराष्ट्र भाजपाच नेतृत्व करायला…!

आठवडा विशेष टीम― महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी मध्ये सध्या ओबीसी विरोधी घटना घडत असल्याचे जनतेच्या निदर्शनास आल्यावर जनतेतून एकच आवाज उठत आहे पंकजा मुंडे ह्याच आता भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करू शकतील.भाजपा मध्ये गट बाजी कोणामुळे पडली हे आपल्याला चांगलेच ठाऊक आहे.खडसे ,तावडे आणि त्याचसोबत पंकजा मुंडेंना डावलून ह्यांना काय सिद्ध करायचे होते तेच कळत नाही.? भारतीय जनता पार्टीच्या एका नेता-कार्यकर्त्यांच्या फळीने पंकजाताई मुंडे यांचच नेतृत्व स्वीकारलं असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय स्तरावर सुरू आहे.पंकजा मुंडे यांनी जलयुक्त शिवार सारख्या योजना दुष्काळी भागात आणल्या त्याचा भरमसाठ फायदा देखील शेतकरी वर्गाला झाला ते ओळखून आता शेतकरी देखील पंकजा ताईंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवायला लागला आहे.

आघाडी सरकार कडून शेतकऱ्यांच्या लाभासाठी भारदस्त अशा योजना सुरू केल्या गेल्या नाही.केवळ शेतकऱ्यांची कर्जमाफी करून शेतकरी राजा सुखावत नसतो.ह्याचा मोठा फायदा भारतीय जनता पार्टीला भविष्यात होणार आहे.भाजपाने मोदींच्या नेतृत्वाखाली लोकसभेला एवढ्या जागा जिंकल्या परंतु महाराष्ट्र राज्यात मात्र ते सध्याच्या नेतृत्वाला शक्य झाले नव्हते. मात्र आता हीच वेळ आहे पंकजाताई मुंडे यांचे नेतृत्व स्वीकारून भाजपाला पुन्हा महाराष्ट्र राज्यामध्ये ऊदयास आणण्याची.

#WorldNursesDay जागतिक परिचारिका दिन विशेष लेख

स्वतःच्या आयुष्यातला काळोख विसरून रुग्णांच्या जीवनात आनंदाचा दिवा प्रज्वलित करण्यासाठी धडपड करणाऱ्या रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून रुग्णांची अहोरात्र सेवा करणाऱ्या परिचारिकांच्या व्यवसायिक जीवनातील महत्त्वाचा दिवस म्हणजेच 12 मे जागतिक परिचारिका दिन.
12 मे 1820 रोजी मिस.फ्लॉरेन्स नाईटींगेल यांचा जन्म झाला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने रुग्ण सेवेला सुरुवात झाली.त्यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हातात दिवा घेऊन जखमी सैन्याची सुश्रूषा केली म्हणून त्यांना Lady with the Lamp असे संबोधले जाते कालांतराने त्यांनी 1860 साली लंडनमध्ये नर्सिंग स्कूलची स्थापना केली त्यामुळेच आज संपूर्ण जगभरात अनेक ठिकाणी नर्सिंग स्कूल स्थापन होऊन त्यातून प्रशिक्षित परिचारिका बाहेर पडत असून त्या चांगल्या प्रकारे रुग्णसेवा करत आहे म्हणूनच आज संपूर्ण जगात आरोग्य क्षेत्रात परिचारिकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे सद्यपरिस्थितीत परिचर्या मध्ये झालेला व होत असलेला अमुलाग्र बदल याचा पाया खऱ्या अर्थाने मिस.फ्लॉरेन्स नाईटींगेल यांनी घातला म्हणून त्यांना जागतिक स्तरावर आधुनिक परिचर्येची जननी असे संबोधतात म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ त्यांचा जन्मदिवस हा दरवर्षी जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो परंतु यावर्षी त्यांचा जन्मदिवसास दोनशे वर्षे पूर्ण होत आहेत त्या अनुषंगाने जागतिक आरोग्य संघटनेने 2020 वर्ष परिचारिकांना समर्पित करून परिचारिकांचे वर्ष म्हणून जाहीर केले आहे.
आज आरोग्य क्षेत्रात परिचारिका या आरोग्य व्यवस्थेचा कणा बनलेल्या आहेत एका बाजूला एक प्रशिक्षित परिचारिका म्हणून सामाजिक बांधिलकी व रुग्णांना केंद्रबिंदू मानून त्यांना दिलेल्या समस्येमध्ये सुखी समाधानी आहेत परंतु दुसऱ्या बाजूला सुख-समाधान हून अधिक परिचारिका उपेक्षितच आहेत खर्‍या अर्थाने रुग्णसेवा कोण करते असा प्रश्न असेल तर त्याचे उत्तर निश्चितपणे परिचारिका असायला हवे कारण 24 तास रुग्ण सोबत राहून त्यांची सेवा करून त्यांच्या वेदनांवर फुंकर घालण्याचे काम परिचारिकाच करतात त्यांना तमा नसते वेळेची, न परवा असते स्वतःच्या सुखदुःखाची वैयक्तिक अपेक्षा कडे दुर्लक्ष करत अहोरात्र रुग्णसेवेत गुंतलेले असतात.
बदलत्या काळानुसार गेल्या काही वर्षात सामाजिक व कौटुंबिक बदलामुळे तसेच आजाराचे बदलते स्वरूप व वाढती लोकसंख्या यामुळे रुग्णालयांची व त्याचबरोबर परिचारिकांची गरज फार मोठ्या प्रमाणावर भासू लागली आहे .परिचारिकांची संख्या ही त्यांच्या मागणी पेक्षा खूपच कमी आहे आज आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सार्वजनिक आरोग्य विभाग व महानगर पालिकेचे रुग्णालय येथील रुग्णसेवेचा डोलारा हा अतिशय अल्प प्रमाणात असलेल्या परिचारिकांच्या खांद्यावर आहे त्यामुळे सद्यपरिस्थितीत कामावर असणाऱ्या परिचारिका वरती त्याचा ताण पडत आहे त्यामुळे भारतीय परिचर्या परिषदेने ठरवून दिलेल्या रुग्ण परिचारिका गुणोत्तर कधी पूर्ण होईल हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे त्याचबरोबर खाजगी रुग्णालयात अप्रशिक्षित व अनोंदनीकृत परिचारिकांचा सुळसुळाट आहे आपल्याकडे प्रशिक्षित परिचारिका असतानासुद्धा अशा अप्रशिक्षित व्यक्तींकडून रुग्णसेवा करून घेतली जाते ते कशाप्रकारे रुग्णसेवा करतात हा सुद्धा एक प्रश्नच आहे अशा व्यक्तीमुळे प्रशिक्षित परिचारिकांचा दर्जा समाजापर्यंत पोहोचत नाही ही एक खेदाची बाब आहे त्याच बरोबर या प्रशिक्षित परिचारिका खाजगी रुग्णालयात रुग्णसेवा करतात त्यांना अद्याप किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळत नाही याउलट अप्रशिक्षित व अनोंदणीकृत व्यक्तींना जास्त वेतन दिले जाते हे हे परिचारिकांचे दुर्भाग्य आहे असे मी मानतो. परिचारिकांनी रुग्णसेवा चांगल्याप्रकारे करून सुद्धा आजवर समाजाकडून हवा तसा मानसन्मान त्यांना मिळाला नाही याशिवाय कामाच्या ठिकाणी त्यांना अनेकांकडून मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे . समाजामध्ये शुश्रुषा ला खूप मानाचे स्थान आहे पण इतर ठिकाणी जर आपण पाहिलात मग ते साहित्य नाटक किंवा सिनेमा असेल यामध्ये परिचारिकांची प्रतिमा फारशी चांगली रंगवली जात नाही यासाठी कुठेतरी परिचर्या व्यवसायाबद्दल असा सामाजिक दृष्टिकोन बदलणे अपेक्षित आहे.

आज संपूर्ण जगासमोर कोरोना सारख्या महाभयंकर आजाराचे संकट उभे असताना संपूर्ण जगभरात परिचारिका वैश्विक महामारीच्या युद्धामध्ये आपले घर – संसार ,लहान मुले हे सर्व सोडून कोरोनाला हरवण्यासाठी अगदी योद्ध्यासारखे सारख्या लढत आहेत आणि आपला वेगळा ठसा जगभर उमटविण्याचे काम करत आहेत.
विशेषतः हे वर्ष परिचारिकांचे वर्ष म्हणून जाहीर केलेले आहे आणि या कालावधीमध्ये परिचारिका आणि परिचर्या व्यवसायाला व्यवसायाला जो मान सन्मान मिळत आहे यावरून समाजाची ही बदललेली भावना परिचारिकांना नक्कीच ऊर्जा व बळ देणारी सकारात्मक बाब आहे परंतु ही भावना केवळ या कालावधी पुरतीच न राहता पुढील कालावधीमध्ये सुद्धा सदैव परिचारिका आणि परिचर्या व्यवसायाविषयी समाजाची भावना अशीच सकारात्मक राहील अशी अपेक्षा करतो.
जागतिक परिचारिका दिनानिमित्त सर्व परिचारिकांना हार्दिक शुभेच्छा देतो व आपल्याकडून पुढील काळात उत्कृष्ट कार्याची अपेक्षा करतो.
धन्यवाद.

― श्रीधर भांगे
पाठ्यनिर्देशक
शासकीय नर्सिंग स्कूल, बाभळगाव, लातूर

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणस्पर्शाने पावन झाली मराठवाड्याची माती ; निजाम राजवटीत महामानवाची दोन वेळा मराठवाड्याला भेट

“महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आज 129 वी जयंती आहे.कोरोनाचे संकट आणि लॉकडावून असल्याने आपण यंदा सार्वजनिक स्वरूपात आपण जयंती करू शकत नाही.तरी परंतु, आपण आपल्याच घरात महामानवाला अभिवादन करणे,महामानवाच्या विचारांचा जागर त्यांची ग्रंथसंपदा यांचा अभ्यास व वाचन करून,गरजूंना मदत करून करणे असे चांगले उपक्रम राबवून करू शकतो.लॉकडावून काळात या महामानवा बाबत सहज मागे वळून पाहतांना … Read more

करोना रोगावर अद्यापही उपचार नाही , झुंडीने बाहेरपडून रोग आपल्या दारात आनु नका ; करोनाला स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी ह्यागोष्ठी पाळा

बीड: आठवडा विशेष टीम― जगात थैमान मांडलेल्या करोना विषानुवर आजपर्यंत कसल्याही प्रकारचा उपचार निघाला नाही केवळ सिमटोमॅटीक उपचार केला जात आहे.त्यामुळे कृपया कोणीही घराबाहेर पडून आजाराचे प्रसारमाध्यम बनू नये. डब्लूएचओ च्या नुसार हा आजार एअरबर्णी(Airborne) आहे.त्यामुळे चांगल्या दर्जाचे मास्क घालूनच अतिमहत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे.संपूर्ण महाराष्ट्रात १४४ कलम लागू करण्यात आला आहे. त्यामागचा हेतू … Read more

भाजपासाठी 12 वर्षांपासून दिवसरात्र मेहनत करणारे नेते धनराज गुट्टे यांना भाजप ओबीसी मोर्चा किंवा भटके विमुक्त आघाडी राज्याध्यक्ष पदावर नियुक्त करून न्याय द्यावा

भारतीय जनता पक्षासाठी व वंजारी समाजासाठी गेल्या 12 वर्षांपासून दिवसरात्र मेहनत करणारे युवक नेते श्री धनराज विक्रम गुट्टे याना पक्षाने व माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी भाजप ओबीसी मोर्चा महाराष्ट्र किंवा भाजप भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदावर नियुक्त करून न्याय द्यावा औरंगाबाद:आठवडा विशेष टीम― लातूर जिल्ह्यतील अहमदपूर तालुक्यातील येलदरवाडी गावचे सुपुत्र उच्च शिक्षित … Read more

नामदार बच्चू कडूंना सेल्फी पाँईंट करू नका !

दत्तकुमार खंडागळे- चार वेऴा अपक्ष आमदार म्हणून निवडूण आलेले आणि नुकतेच महाराष्ट्राचे राज्यमंत्री झालेले बच्चू कडू हे खर्या अर्थाने लोकनेते आहेत. महाराष्ट्राच्या मातीत इतक्या मोठ्या प्रमाणात लोकप्रियता लाभलेले काही मोजके नेते आहेत. त्या मोजक्या नेत्यांपैकी बच्चू कडू हे एक आहेत. आज ते लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. ते जिथे जातील तिथे लोकांची झुंबड उडते आहे. त्यांच्या आजूबाजूला … Read more