महाविकास आघाडी सरकारवर नाराज, किमान समान कार्यक्रमावर काम नाही: राजु शेट्टी

नागपूर:आठवडा विशेष टीम― सेना ,काँग्रेस राष्ट्रवादी च्या महाविकास आघाडी सरकारने ठरविलेल्या किमान समान कार्यक्रमाच्या संदर्भात काम केलेले नाही. महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडेही दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर नाराज असल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट मत व्यक्त केले आहे. दरम्यान, जरी स्वा. शेतकरी संघटनेने महाविकास आघाडी सोडली तरी आम्ही भाजपकडे लगेच जाणार असं होऊ शकत नाही. भाजपाने जर चांगले काम केलं असत तर त्यांच्यापासून दूर झालोच नसतो अस राजू शेट्टी म्हणाले.

काय आहेत राजू शेट्टी यांच्या नाराजीचे मुद्दे ?
केंद्र सरकारने भूसंपादनाच्या 5 पट मोबदल्याचा कायदा 2 पटीवर आणला. कर्जमाफी पिकविमा, दिवसा वीज हे महाविकास आघाडीला दिलेला पाठिंबा काढण्यासाठी कारणीभूत ठरु शकतात. तसंच ऊस उत्पादकांच्या एफ-आर-पीचेही राज्य सरकारने तुकडे केले असंही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मत आहे.

पशुसंवर्धन पदविका धारकांना शासनाने नोंदणीकृत करून स्वतंत्र पशुवैद्यकीय व्यवसायास परवानगी द्यावी !

बीड दि.०४ ऑगस्ट २०२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत करून त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून वाड्या-वस्त्यांवर पशुसेवा अगदी कमी वेळात पोहचेल व गाई-म्हशीचे प्राण वाचेल.शासन दुधाचा महापूर आणण्यासाठी प्रयत्न करते योजना आखते परंतु त्यात मोलाचा वाटा असणारे पशुसंवर्धन पदविकाधारकांच्या नोंदणीच्या वेळी मात्र काणाडोळा करते.असे न करता शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून प्रथमतः पशुसंवर्धन पदविका धारकांना कायदेशीर पशुवैद्यक म्हणून घोषित करावे व त्यांची नोंदणी करून त्यांना नोंदणीक्रमांक द्यावा अशी मागणी जोर धरून आहे. १९८४ च्या कायद्यात बदल करावा, पशुसंवर्धन पदवीकाधारकांना व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे मात्र शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसून कृषीप्रधान देशातच पशूंकडे शासनाचे लक्ष नसल्याचे समोर येत आहे.

पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ कलमाअंतर्गत व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीमधून पशुसंवर्धन पदवीधारकांच्या राज्यव्यापी परिषदेची नियुक्ती करून स्वतंत्ररीत्या औषधे बाळगणे व नोंदणीकृत व्यवसाय परवाना उपलब्ध करून द्यावा.राज्यातील रिक्त पशुधन पर्यवेक्षक पदांची तत्काळ भरती करण्यात यावी.खासगीरीत्या असंघटित क्षेत्रात भारतीय पशुचिकित्सक परिषद कायद्यान्वये किरकोळ व प्राथमिक स्वरूपाच्या पशुवैद्यकीय उपचार सेवा पदवीधारक डॉक्‍टरच्या सुपरव्हिजन व माध्यमांचा वापर करून आपले कार्य पार पाडतात अशा सर्व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीप्रमाणपत्र व ओळखपत्र देऊन पशुसेवेचे कार्य सुरू ठेवण्यासाठी बळ द्यावे.

बालाघाटावरील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ स्थळपंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी – डॉ.गणेश ढवळे

बीड/लिंबागणेश:आठवडा विशेष टीम― बीड तालुक्यातील बालाघाटावरील अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ तहसिल प्रशासनाने स्थळपंचनामे करावेत व नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणी बरोबरच ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, कृषीमंत्री, ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड, विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे

बीड तालुक्यातील बालाघाटावरील मौजे लिंबागणेश या गावासह पंचक्रोशीतील ईतर गावांमध्ये अतिवृष्टी मुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे, सोयाबीन, मका, बाजरी, कोबी फळभाज्या, आदि, पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे, परंतु जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊन सुद्धा तहसिल प्रशासन स्थलपंचनामे करण्याबाबत उदासीन दिसुन येते, त्यामुळे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी.

ओला दुष्काळ जाहीर करावा, मुख्यमंत्री , कृषीमंत्री , ग्रामविकास मंत्री, पालकमंत्री बीड, विभागीय आयुक्तांना निवेदन

अतिवृष्टी मुळे झालेले नुकसान पाहता, ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, कृषीमंत्री, ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड, विभागीय आयुक्त यांना करण्यात आली असल्याचे डॉ.गणेश ढवळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.


आष्टी: कृषी यांत्रीकरण योजना सुरु मात्र पोर्टल बंद

आष्टी:अशोक गर्जे―
कृषी यांत्रीकरण योजना सुरु होऊन पंधरा दिवस उलटून गेले तरी शेतकऱ्यांच्या अर्जाची नोंदणी
होईना कृषी विभागाचे आहवन ठरतंय पोकळ, कृषी विभागाकडून कुठल्याही प्रकारच गांभीर्य नसल्याचे समजते. कधी पोर्टल सुरू होणार असा प्रश्न शेतकरी बांधवाना पडला आहे. तरी लवकर पोर्टल चालू करण्याची मागणी शेतकरी वर्गका कडून होत आहे.

मजुरीत वाढ करा,नाहीतर कोयता घरीच बसणार ,या भाजपच्या नेत्यानी सरकारला दिला इशारा

उसतोड कामगारांचा प्रश्नावर परदेशातून सौ.पंकजाताईची कडवी नजर

कामगारांचा संप हक्कासाठी , राजकिय दुकाने चालवण्यासाठी नाही

मुंबई:आठवडा विशेष टीम― भाजपा नेत्या तथा उसतोड कामगाराच्या कैवारी माजी मंत्री पंकजाताई गोपीनाथराव मुंडे ह्या सध्यस्थितीत मुलाच्या अॅडमिशन साठी परदेशात आहेत . तरीसुध्दा जो उसतोडणी कामगार त्यांचा आत्मा आहे . त्या कामगारांच्या प्रश्नावर त्यांची परदेशातून किती कटाक्ष नजर आहे हे काल दिशून आले , भारतिय वेळेनुसार पहाटे पाच वाजता उठून त्यांनी राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या संचालक बैठकित व्हिडिओ कॉन्फरंन्स द्वारे हजेरी लावून कामगारांच्या प्रश्नावर ठोस भुमीका मांडली . माझ्या कामगारांना सन्मान जनक मजुरी वाढवून इतर प्रश्न सोडवा . अन्यथा कोयता उसाच्या फडात जाणार नाही असा खणखणीत इशारा परदेशातून दिला

राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या संचालक मंडळाची बैठक आज साखर भवनात पार पडली. पंकजाताई मुंडे यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सिंग द्वारे या बैठकीत सहभाग घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक कामगारांच्या संघटनांकडून मागणी संदर्भातील आलेल्या निवेदनांवर यावेळी बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

राज्यातील तमाम ऊसतोड मजूरांची मजूरीच्या दरात वाढ मिळावी आणि ही वाढ सन्मानजनकच मिळाली पाहिजे अशी आमची भूमिका असल्याचे पंकजाताई म्हणाल्या. त्यासाठीचा करार हा तीन वर्षाचाच होईल. तथापि, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजूरांना विमा कवच द्यावे, त्याची जवाबदारी राज्य सरकार व कारखान्यांनी घ्यावी. सरकारी पातळीवर असलेल्या विषयावर चर्चा करण्यासाठी एक समिती आणि भाववाढ व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केले जाणारे सुरक्षेचे उपाय यावर चर्चा करणारी दुसरी समिती अशा दोन समित्या साखर संघाने स्थापन कराव्यात व त्या दोन्ही समितीचे अध्यक्ष साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर असावेत. या दोन्ही समितीने त्यांचे म्हणणे लवादा समोर मांडावे व चर्चा करावी. या विषयाबाबत अत्यंत अनुभवी सन्माननीय खासदार शरद पवार साहेब यांचे मार्गदर्शन घ्यावे अशी सूचना त्यांनी केली.

संप हा मजुरांच्या हक्कासाठी आहे, कोणाचीही राजकीय पोळी भाजण्यासाठी नाही तथा राजकारणाचे दुकाना चालवण्यासाठी नाही तो माझा आत्मा आहे हे त्यांनी ठणकावून सांगितलं माझे ऊसतोड कामगार हे राजकीय प्यादे नाहीत असे या संपात विनाकारण हस्तक्षेप करणाऱ्यांसाठी
पंकजाताई मुंडे म्हणाल्या.

ऊसतोड कामगार महामंडळा कडे असणारे विषय हाताळण्यासाठी कमिटीने धनंजय मुंडेंनाही बैठकीला बोलवावे व जवाबदारी निश्चित करावी. सरकार पातळीवर असलेले आणखी मंत्री महोदय उदाहरणार्थ आरोग्य मंत्री राजेश टोपे, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनाही आमंत्रित करावे व अंतिम निर्णय लवादाने घ्यावा अशा सूचना साखर संघाच्या बैठकीत पंकजाताई मुंडेंनी केल्या असल्याचे समजते. ऊसतोड कामगारांच्या मजूरीत वाढ न झाल्यास कोयता चालणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

मनी ध्यानी एकच ध्यास

उसतोड कामगाराच कल्याण

गोपीनाथरावजी मुंडे यांनी संपूर्ण आयुष्य ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी घालवल. तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून पंकजाताई कामगारांच्या कल्याणासाठी ध्यानी मनी एकच ध्यास ,ऊस तोड कामगारांचे कल्याण ,याप्रमाणे त्यांची भूमिका? जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो, तरी ऊसतोड कामगार हेच आपले दैवत. त्यासाठी त्यांनी परदेशातून साखर संघाच्या बैठकीत घेतलेली ठोस भूमिका, आणि मांडलेले प्रश्न बरच काही सांगून जाते. येथे पाहिजे जातीचे, येरा गबाळ्याचे काम नव्हे, असं म्हटलं तरी चालेल.

ऊसतोड कामगारांना सन्मानजनक वाढ द्या, अन्यथा कोयता चालणार नाही ―पंकजाताई मुंडे यांची साखर संघाच्या बैठकीत आग्रही मागणी

विमा कवच, कोरोना सुरक्षा यावरही केल्या सूचना

मुंबई दि.२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील ऊसतोड कामगारांना मजूरीच्या दरात सन्मानजनक वाढ मिळावी यासाठी ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी आज साखर कारखाना संघाच्या बैठकीत आग्रही भूमिका मांडली. मजूरांना वाढ न दिल्यास कोयता चालणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या संचालक मंडळाची बैठक आज साखर भवनात पार पडली. पंकजाताई मुंडे यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सिंग द्वारे या बैठकीत सहभाग घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक कामगारांच्या संघटनांकडून मागणी संदर्भातील आलेल्या निवेदनांवर यावेळी बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

राज्यातील तमाम ऊसतोड मजूरांची मजूरीच्या दरात वाढ मिळावी आणि ही वाढ सन्मानजनकच मिळाली पाहिजे अशी आमची भूमिका असल्याचे पंकजाताई म्हणाल्या. त्यासाठीचा करार हा तीन वर्षाचाच होईल. तथापि, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजूरांना विमा कवच द्यावे, त्याची जवाबदारी राज्य सरकार व कारखान्यांनी घ्यावी. सरकारी पातळीवर असलेल्या विषयावर चर्चा करण्यासाठी एक समिती आणि भाववाढ व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केले जाणारे सुरक्षेचे उपाय यावर चर्चा करणारी दुसरी समिती अशा दोन समित्या साखर संघाने स्थापन कराव्यात व त्या दोन्ही समितीचे अध्यक्ष साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर असावेत. या दोन्ही समितीने त्यांचे म्हणणे लवादा समोर मांडावे व चर्चा करावी. या विषयाबाबत अत्यंत अनुभवी सन्माननीय खासदार शरद पवार साहेब यांचे मार्गदर्शन घ्यावे अशी सूचना त्यांनी केली.

संप हा मजुरांच्या हक्कासाठी आहे, कोणाचीही राजकीय पोळी भाजण्यासाठी नाही. माझे ऊसतोड कामगार हे राजकीय प्यादे नाहीत असे या संपात विनाकारण हस्तक्षेप करणाऱ्यांसाठी
पंकजाताई मुंडे म्हणाल्या.

ऊसतोड कामगार महामंडळा कडे असणारे विषय हाताळण्यासाठी कमिटीने धनंजय मुंडेंनाही बैठकीला बोलवावे व जवाबदारी निश्चित करावी. सरकार पातळीवर असलेले आणखी मंत्री महोदय उदाहरणार्थ आरोग्य मंत्री राजेश टोपे, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनाही आमंत्रित करावे व अंतिम निर्णय लवादाने घ्यावा अशा सूचना साखर संघाच्या बैठकीत पंकजाताई मुंडेंनी केल्या असल्याचे समजते. ऊसतोड कामगारांच्या मजूरीत वाढ न झाल्यास कोयता चालणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.


पिंपळनेर जि.प गटातील शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळेना ,मंगळवारी बँकेच्या दारात घंटानाद आंदोलन ― रामदास बडे

शिरूर:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यातील शिरूरकासार तालुक्यातील पिंपळनेर जि. प च्या अनेक गावांमध्ये भारतीय स्टेट बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँक या दोन शिरूरच्या शाखेंनी शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ केल्याने शेतकरी राजा
संतापला असुन कर्ज मिळण्यासाठी दि.15सप्टेंबर मंगळवार रोजी दोन्ही बँकेच्या दारात घंटानाद आंदोलन होणार असल्याची माहिती जि प सदस्य
रामदास बडे यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिली आहे.

या बाबत मिळालेली माहिती अशी की,शिरूरकासार तालुक्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये बँकेचे अधिकारी कर्जाबाबतीत हिटलर सारखे वागत आहेत.कर्जाची मागणी केली तर कुत्र्यासारखे धावतात त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीला शेतकरी वैतागला आहे. पिंपळनेर जिल्हा परिषद गटातील अनेक गावांमध्ये शिरूरकासार च्या स्टेट बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँक या दोन्ही शाखेच्या कर्मचारी यांनी अनेक कर्ज मागणीसाठी शेतकरी गेले असता हकलुच लावले त्यामुळे शेतकरी राजा संतापला असुन कर्जासाठी नाविलाजास्तव घंटानाद आंदोलन करित आहे. दि.१५ सप्टेंबर, मंगळवार रोजी दोन्ही बँकेच्या दारात घंटानाद आंदोलन होणार असून
तिव्र स्वरूपाचे असणार असल्याचेही पिंपळनेर जि प गटाचे सदस्य तथा पंकजाताई समर्थक रामदास बडे यांनी तहसीलदार श्रीराम बेंडे यांच्या कडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

कोयता म्यान ठेवा ; ऊसतोड मजूर माझ्यासाठी राजकारणाचा नाही तर जिव्हाळ्याचा विषय – पंकजाताई मुंडे

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर पंकजाताई मुंडे – साखर संघ दरम्यान बैठक

कामगारांच्या मजूरीत वाढ करण्यासह अन्य मागण्यांबाबत बैठकीत झाली चर्चा !

मुंबई दि.१०:आठवडा विशेष टीम― ऊसतोड कामगारांना मी न्याय मिळवून देणारच आहे, तोपर्यंत कोयता म्यान ठेवावा. माझ्यासाठी ऊसतोड मजूर हा जिव्हाळ्याचा विषय आहे, राजकारणाचा नाही असे स्पष्ट करत
कामगारांना वेठीस धरून राजकारण करण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही असा इशारा पंकजाताई मुंडे यांनी दिला आहे.

राज्यातील ऊसतोड कामगारांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी ऊसतोड कामगार लवादाच्या नेत्या पंकजाताई मुंडे आणि राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या दरम्यान आज साखर भवन येथे एक बैठक पार पडली. ऊसतोड कामगारांच्या मजूरीत न्याय्य वाढ करण्यासह अन्य महत्त्वाच्या विषयावर या बैठकीत चर्चा झाली. साखर संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे आबासाहेब पाटील, व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, केशवराव आंधळे, श्रीमंत जायभाये व विविध संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पंकजाताई मुंडे म्हणाल्या, ऊसतोड मजूरांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी जो लवाद आहे, त्यावर मी आणि कारखानदारांचे प्रतिनिधी म्हणून ना. जयंत पाटील आहेत. या विषयावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, खासदार शरद पवार यांच्याशी चर्चा करू. कामगारांना न्याय दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, तोपर्यंत कोयते म्यान ठेवा. मजूरांचा विषय माझ्यासाठी जिव्हाळ्याचा आहे, राजकारणाचा नाही. कामगारांचे मुद्दे मांडताना ते आक्रमकपणे मांडले जावेत, आक्रस्ताळेपणे नाही. तथापि, मजूरांना वेठीस धरून कुणी राजकीय हस्तक्षेप करत असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही असे सांगून ऊसतोड कामगार महामंडळाचा विषय जसा हवा तसा हाताळता आला नाही याबद्दल खंत वाटते असेही त्या यावेळी म्हणाल्या.

पंकजाताईंनी केले सुशीला मोराळे यांचे कौतुक !

या बैठकीला बीडमधून सुशीलाताई मोराळे हया एकट्या महिला उपस्थित होत्या. पंकजाताई मुंडे यांनी यावेळी बोलतांना त्यांच्या उपस्थितीची दखल घेऊन कौतुक केले.

या मागण्यांवर झाली चर्चा
—————————
राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक कामगारांच्या संघटनाकडून प्राप्त झालेल्या निवेदनावर बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली. ऊसतोड कामगारांच्या मजूरीत वाढ करावी यासह ऊस वाहतूक दरात वाढ करणे,मुकादमांच्या कमिशनमध्ये वाढ करणे,ऊसतोडणी मजूरांना पाच लाखाचे विमा कवच दयावे व त्याचा विमा हप्ता ऊसतोड कामगार महामंडळाच्या माध्यमातून किंवा कामगार खात्यामार्फत भरणा करावा, यात कोविडचा ही समावेश व्हावा, ऊसतोड मजूरांच्या बैलांसाठी कारखाना परिसरात पशुवैदयकीय दवाखान्याची व्यवस्था करावी, कारखान्यावर स्वस्त धान्य दुकानाची व्यवस्था करणे, कारखाना परिसरात पक्के घरकुल व शौचालये पुरविणे, मजूरांच्या मुलांकरिता प्रत्येक तालुक्यात निवासी शाळा व वस्तिगृहाची व्यवस्था करणे, मजूरांसाठी उन्नती योजनेची राज्यात सर्वत्र अंमलबजावणी करणे, मजूरांना ६० वर्षे वयानंतर पेन्शन योजना सुरु करणे, ऊसतोड कामगारांच्या मुलींचे विवाह लहान वयात होतात,हे आढळून आलेले आहे, त्यामुळे त्या मुलींचे लग्न वय वर्षे 18 झाल्यानंतर व्हावे त्याला शासनाने कन्यादान अशी खास योजना करावी आणि ऊसतोड कामगारांचा दर तीन वर्षांनी करार करावा अशा मागण्यांबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली.


कोयत्याला मिळेल न्याय ; कामगारांनी विश्वास ठेवावा ,ऊसतोड कामगारांच्या हक्कासाठी लवादात आग्रही चर्चा करणार – पंकजाताई मुंडे

मुंबई दि.०६:आठवडा विशेष टीम― राज्यातील ऊसतोड कामगार आणि मुकादम यांच्या मजूरीत दरवाढ करण्यासंदर्भात लवकरच लवादाच्या बैठकीत आग्रही चर्चा करणार आहे, कोयत्याला नक्कीच न्याय मिळेल कामगारांनी विश्वास ठेवावा असा शब्द पंकजाताई मुंडे यांनी दिला आहे.

ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, ऊसतोड कामगार व साखर कारखानदार यांच्यातील लवादाचे कारखानदारांचे प्रतिनिधी जयंत पाटील, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासमवेत आपली चर्चा झाली असून बैठकीतून मार्ग निघेल असे त्या म्हणाल्या.

ऊसतोड कामगार व मुकादम यांच्या हक्कासाठी लवकरच लवादाच्या बैठक होणार असून त्यात आपण आग्रही चर्चा करणार असल्याचे पंकजाताई मुंडे म्हणाल्या. ऊसतोड कामगारांना त्यांच्या मजूरीच्या दरात न्याय वाढ मिळावी यासाठी वर्षानुवर्षे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी लढा दिला होता. त्यावेळी मुंडे साहेब व शरद पवार यांचा लवाद होता आणि आता त्या लवादावर जयंत पाटील व मी आहे. ऊसतोड कामगारांनी फार मोठ्या विश्वासाने ही जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत आपण २०१५ मध्ये व पुन्हा २०१८ मध्ये अंतरिम वाढ मिळवून दिली होती. याशिवाय कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर मध्यंतरी ऊसतोड कामगारांना कोरोना बाधित वेगवेगळ्या भागातून आपापल्या घरी पोहोचविण्यासाठी सुद्धा सन्माननीय नेत्यांनी तेव्हा चर्चेसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला होता, यासंदर्भात झालेल्या निर्णयामध्ये त्यावेळी त्यांनी तत्परता दाखवल्यामुळे ऊसतोड कामगारांना सहकार्य मिळालं होतं. आतासुद्धा ते ऊसतोड कामगारांना सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे, आपण सर्वांनी विश्वास ठेवावा. आपल्या कोयत्याला सन्मान नक्कीच मिळेल तथापि, कोयत्याची धार आणि सन्मान सांभाळण्याची जबाबदारी ऊसतोड कामगार आणि मुकादमांवर आपण देत आहोत असे पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे.


पंकजाताई मुंडे यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम.. त्या, घेतील तो निर्णय मान्य ; ऊसतोड मजूरांचा निर्धार ,दरवाढीसाठी राज्यातील ऊसतोड कामगार एकवटले

बीड, नगर जिल्हयात विविध ठिकाणी मजूरांच्या बैठका

बीड दि. ०५:आठवडा विशेष टीम― साखर कारखान्यांनी मजुरीत दरवाढ करावी या मागणीसाठी राज्यातील ऊसतोड कामगार एकवटला आहे. कामगारांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढणा-या ऊसतोड मजूरांच्या नेत्या पंकजाताई मुंडे हया आमच्यासाठी खंबीर आहेत, याबाबत त्या घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल असा एकमुखी निर्धार कामगारांनी विविध बैठकांमधून केला.

ऊसतोड कामगारांना दरवाढ करावी या व अन्य मागण्यांवर चर्चा करण्यासाठी बीड, केज, मांजरसुंबा व अहमदनगर जिल्हयात ऊसतोड कामगार ठिक ठिकाणी बैठका घेत आहेत. नगर जिल्ह्यात आ. मोनिकाताई राजळे, बीड जिल्हयात माजी आमदार केशवराव आंधळे, श्रीमंतराव जायभाये, गोरक्ष रसाळ, अक्षय मुंदडा, सर्जेराव डोईफोडे, दत्तोबा भांगे, सर्जेराव वाघमोडे, महादेव बडे, महादेव तोंडे, देविदास तोंडे, सुखदेव सानप, चेमटे मामा, कृष्णा तिडके, माणिक खेडकर, अशोक खरमाटे, पिराजी किर्तने तसेच अन्य मजूर व मुकदमांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

या बैठकांमध्ये ऊसतोड कामगार आपल्या भावना व्यक्त करतांना म्हणाले की, लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जाण्यानंतर पंकजाताई मुंडे यांनी ऊसतोड मजूरांची जबाबदारी व नेतृत्व स्विकारून ऐन दुष्काळाची परिस्थिती असताना सुध्दा आम्हाला वाढ मिळवून दिली होती आणि एवढंच नाही तर परत मागच्या वर्षी अत्यंत कठीण परिस्थिती असतानाही अंतरिम वाढ मिळवून दिली.

पंकजाताईंचा आदेश अंतिम

यावर्षी देखील दरवाढीची आमची मागणी आहे, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढी संदर्भात पंकजाताई घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल.
दुसरा कोणीही आमच्यासाठी कांही करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पंकजाताई आमच्यासाठी खंबीर आहेत आणि त्यांचा निर्णय आम्हाला अंतिम आहे. त्यांच्यासाठी ऊस तोड कामगार हा राजकारणाचा विषय नाही तर जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यामुळे त्या
न्याय्य भूमिका घेतील असा आम्हाला विश्वास आहे. पंकजाताई मुंडे यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम आहे अशा भावना कामगारांनी व्यक्त केल्या. या बैठकीत ऊसतोड कामगारांची पंकजाताई मुंडे यांच्या पाठिमागे असलेली एकजूटीने दिसून आली.


औरंगाबाद: घोसला ता.सोयगाव येथे शेतकऱ्याची आत्महत्या ; पिकांना बाधा झाल्याने शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगाव तालुक्यात सततचा पडलेला पावूस आणि ढगाळ वातावरणाने पिकांची झालेली बिकट स्थिती पाहून घोसला ता.सोयगाव येथील शेतकऱ्याने या पिकांचे पंचनामे होत नसल्याचे ऐकून धसका घेतल्याने शेतातच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी सायंकाळी घडला यामध्ये उपचारादरम्यान त्याचा जळगावचं सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

शरीफ शामत तडवी असे आत्महत्या केलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याचे नाव आहे.घोसला शिवारात त्याची तीन एकर शेती आहे.मंगळवारी पावसाच्या उघडीप मिळताच त्याने शेतावर फेरफटका मारला,परतू सततच्या पावसाने आणि ढगाळ वातावरणाने पिकांची झालेली चिंताजनक स्थिती त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होणार नसल्याचे ऐकून त्याने धसका घेतल्याने शेतातच त्या कर्जबाजारी शेतकऱ्याने कर्ज फेडण्याच्या विवंचनेत आत्महत्या केली आहे.या शेतकऱ्याने खासगी कर्ज काढून खरीपाची पेरणी केली होती.परंतु या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या कपाशी पिकांचे सततच्या पावसाने मोठे नुकसान झाले होते परंतु या उक्सानीचे पंचनामे होणार नाही असे ऐकून आणि कर्जाचा डोंगर हलका करण्याच्या विवंचनेत त्याने शेतातच विषारी औषध प्राशन केले,त्याला तातडीने उपचारासाठी जळगावच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.या प्रकरणी जळगाव जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृतूची नोंद करण्यात आली आहे.

सोयगाव: खरीपावर टोळधाडचे आगमन ;पाने कुरतडण्याचे काम

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगावसह तालुक्यात पावसाच्या संकटांसोबतच बदलत्या वातावरणाने खरिपाच्या हंगामावर नव्याने टोळधाड सदृश नाकतोडे चे आगमन झालेले असल्याने हि टोळके हिरव्यागार कपाशी पिकांच्या पानांना कुरतडत असल्याने शेतकऱ्यांच्या समोर यंदाच्या हंगामात अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.या टोळधाड सदृश नाकतोड्यावर शेतकऱ्यांना उपाय योजनांचा मार्ग मिळत नसल्याने गोंधळ उडाला आहे.
सोयगावसह तालुक्यात आठवडाभरापासून ढगाळ वातावरण आणि पावूस सुरु आहे.या बदलत्या वातावरणाने आणि वाढत्या हिरवळीने डोंगर भागातून नाकतोड्याचे टोळके सोयगाव तालुक्याच्या शेती शिवारात धडकले असून यंदाच्याच वर्षात हि किडीचे टोळके आगमन झाले आहे.या रंगीबेरंगी नाकतोड्याचे थेट टोळकेच शेतात हल्ला चढवितात यामुळे पिकांच्या पानांच्या रस शोषण करण्याचे काम या टोळक्या कडून होत असल्याने डेरेदार झालेली पिके मात्र या नाकतोड्याच्या हल्ल्यात कमकुवत होत आहे.त्यामुळे काही भागात कापस्जी पिकांनी पाने कुरतडल्यावर माना टाकल्या आहे.याबाबत मात्र कृषी विभागाचे मौन असून कृषी विभाग याबाबत काहीही बोलायला तयार नसून शेतकऱ्यांना कोणतेही मार्गदर्शन मिळत नाही.कपाशी,सोयाबीन,ज्वारी आणि मका पिकांवर या टोळक्यांचा मोठा प्रादुर्भाव आढळून येत आहे.तुरयावर असलेल्या मका पिकांना पोखरून काढण्याचे काम या टोळक्यकडून करण्यात येत असल्याने मका पिकांना मोठा फटका बसला आहे.त्यामुळे एकीकडे पावूस आणि दुसरीकडे नाकतोड्याचे आगमन शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरली आहे.

उपाय योजनांसाठी कृषी विभाग ठप्प-

यावर उपाय योजनांसाठी तालुका कृषी विभाग मात्र ठप्प असून याबाबत कोणतीही माहिती नसल्याचा भास कृषी विभाग दाखवीत असून मुकाट्याने शेतकऱ्यांना या नाकतोड्यांचा सामना करावा लागत आहे.

शेत मजुरांवरही हल्ले-

या नाकतोड्याच्या टोळक्यकडून शेतात काम करणाऱ्या शेत मजुरांवर हल्ले चढविण्याच्या घटना अलीकडे उघडकीस आलेल्या आहे.त्यामुळे मुगाची तोडणी लांबणीवर गेली असून मुगाच्या शेंगा पोखरण्याच्या कामात हि टोळके गुंतले आहे.


जरंडी,घोसला शिवारात मुगावर मावा,चीकट्यारोग ;
ऐन उत्पन्नात शेतकरी हवालदिल

सोयगाव ,ता.१४:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
जरंडीसह परिसरात सुरु असलेल्या सततच्या पावूस आणि वाढलेल्या ढगाळ वातावरणाच्या प्रादुर्भावात जरंडी आणि घोसला या शिवारात मुग पिकांवर मावा आणि चीकट्या प्रादुर्भाव वाढल्याने ऐन उत्पन्न हाती येण्याच्या कालावधीत मुगाचे पिके संकटात सापडली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना शेवटच्या क्षणी मुगाचे उत्पन्न हातात करून घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
पोळा सणाचा खरिपाच्या उत्पन्नाचा पहिला हंगाम म्हणून मुगाची ओळख आहे.या मुगाला सध्या चांगला भाव आहे.परंतु शेंगा परिपक्व होत असतांनाच अचानक बदलत्या वातावरणाने मुगावर मावा आणि चीकट्याचा प्रादुर्भाव वाढला आहे.त्यामुळे मुग तोडणी ऐवजी पुन्हा फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.मागील हंगामा पेक्षा यंदाच्या हंगामात मुगाच्या क्षेत्रात वाढ झालेली आहे.परंतु वातावरणाने घात करून अचानक प्रादुर्भाव वाढला आहे.त्यामुळे उत्पन्न घेण्याच्या काळात पुन्हा निसर्गाचे संकट कोसळले आहे.

हिरव्या शेंगा पिवळसर-

काही भागात अति पावसाच्या फटक्यात मुगाच्या हिरव्यागार असलेल्या शेंगा आणि मुगाची झाडे पिवळी पडली असून या पिवळी पडण्याचे रहस्य मात्र उलगडत नाही त्यामुळे पुन्हा अडचणीचा डोंगर शेताकायांपुढे वाढला आहे.

पाटोदा तालुक्यातील ऊसतोड कामगार; सुरक्षा विमा योजनेतून वंचित

“अपघातातील चार महिला सहा पुरुष मदतीपासून दूर”

पाटोदा दि.०७:दत्ता हुले ऑक्टोबर २०१९ मध्ये राज्यातील आठ ते दहा लाख इतक्या संख्येने असंघटित असलेल्या राज्यातील ऊसतोडणी मजुरांच्या कल्याणासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने सामाजिक सुरक्षा योजना महायुतीच्या काळात सुरु करत राज्य शासनाने वीस कोटी रुपयांची भरीव तरतुद केली होती.पाटोदा तालुक्यातून दरवर्षी १ लाखांवर नागरिक हे ऊसतोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकात जातात, त्यांना ऊसतोडणीच्या काळात अनेक संकटांना तोंड द्यावे लागते अशात काही मजुरांना रोडवरील अपघात,विषबाधा विजेचा शॉक,कॅनॉलमध्ये पडून मृत्यू होणे अशा घटना वारंवार घडत असतात, काही वर्षापूर्वी या ऊसतोड कामगारांना विमा संरक्षण देण्यासाठी “विठ्ठलराव विखे पाटील कामगार अपघात विमा योजना”कार्यान्वित होती परंतू काही काळानंतर ती बंद पडली यानंतर बराच काळ मजुरांना विमा देणारी कुठलीही योजना नव्हती, त्यांनतर २०१९ ला राज्य सरकारने स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे कामगार सुरक्षा योजना सुरू करून
या योजनेत आठ लाख ऊसतोड कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान केली जाणार होती मोफत घरकुल, मोफत विमा संरक्षण, पाल्यांसाठी वसतिगृहे, शिष्यवृत्ती , कौशल्य विकास आदी सुविधा प्रदान केल्या जाणार होत्या. ऊसतोडणी मजुरांना व त्यांच्या कुटुंबियांसह बैलजोडीला अनेकदा अपघात व आरोग्यासंबंधी समस्यांना सामोरं जावं लागतं. ऊसतोडणी मजुरांच्या स्थलांतरांमुळे वृद्ध आई वडिल आणि बालकांच्याही शिक्षण, आरोग्य आदी समस्या ऊद्भवतात. त्यांनाही या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती, वसतिगृहे , कौशल्यविकास आदींसाठी या योजनेतुन आर्थिक तरतुद केली जाणार होती,पण तसे झाले नाही.गळीत हंगाम २०१९-२० या काळात पाटोदा तालुक्यातील अनेक गावातील ऊसतोड कामगारांचे साखर कारखान्यावर काम करत असताना अपघात घडले,पण अद्यापही या कामगारांना शासकीय मदत,सुरक्षा विमा अथवा आर्थिक मदत मिळाली नाही, यामध्ये पाटोदा तालुक्यातील ढाळेवाडी गावातील कामगारांचा डिसेंबर महिन्यात विठ्ठराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि. गंगाईनगर ता.माढा जि. सोलापूर येथे अपघात झाला त्यामध्ये सौ. अर्चना लक्ष्मण जगदाळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला व अन्य चार कामगार फ्रॅक्चर व गंभीर जखमी झाले होते, त्यांनतर सोनहीरा साखर कारखाना लि.सोनहीरा ता.केडगाव पलूस जि.सांगली येथे तालुक्यातील गीतेवडी येथील महिला कामगार सौ. महानंदा चंद्रकांत सानप यांच्या मोकळ्या टायर गाडीची पलटी होऊन त्यांच्या कमरेत लोखंडी आंग्ल घुसून त्यांची कंबर फ्रॅक्चर झाली होती, त्यांनतर मार्च महिन्यात गंडाळवाडी येथील ऊसतोडणी कामगार भीमाशंकर साखर कारखाना आंबेगाव ता.जुन्नर जि.पुणे येथे ऊसतोडणी करत असताना कारखाना परिसरात बैलगाडी खाली करण्यासाठी थांबले असता रात्री बैलगाड्या सोडून बाजूला सर्वजण झोपले असताना अचानक झोपेमध्ये असताना भरलेल्या बैलगाडीचे चाक आबासाहेब आरेकर, श्रीहरी पोकळे,कल्याण पवार या तीन कामगारांच्या पायावरून गेल्याने तिघांचे त्यांचे पाय गुडघ्यापासून खाली फ्रॅक्चर झाले होते.या अपघाताच्या घटना घडल्यानंतर संबंधित साखर कारखान्यांनी या घटनेचे पंचनामे करून घेतले होते व दरवर्षी हे साखर कारखाने मजुरांचे विमे भरण्यासाठी यांच्या कामातून ३०० ते ४०० रुपये प्रति कामगार कपात करत असता,अनेक साखर कारखान्याचे गळीत हंगाम २०२०-२१ चे करार सुरू झाले आहेत पण अद्याप या अपघाती मजुरांच्या विम्याबाबत कारखान्यांनी ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तसेच राज्य सरकारच्या स्व. गोपीनाथ मुंडे कामगार सुरक्षा योजनेचा अद्याप आर्थिक तरतूद नसल्याने एकही कामगारांना विमा संरक्षण मिळाले नाही ही खेदाची बाब आहे.तालुक्यातील या तीनही गावातील कामगारांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे,यामुळे या ऊसतोड कामगारांच्या कुटुंबाला प्रशासन, लोकप्रतिनिधी, अथवा सुरक्षा योजनेची मदत मिळणे आवश्यक होते पण या घटनेनंतर वेळोवेळी पाठपुरावा न केल्याने अथवा स्थानिक लोकप्रतिनिधी व कामगार नेत्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे साखर कारखाना पाहिजे तेवड्या दक्षतेने मजुरांचा विमा देण्यासाठी हात पुढे करत नाहीत, त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी तालुक्यातील ऊसतोड कामगारांच्या समस्या व वाढते स्थलांतर व मुलांच्याशिक्षणाची गैरसोय याकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज आहे असे तालुक्यातील ऊसतोड मजुर पुत्र दत्ता हुले याने माध्यमातून खेद व्यक्त करत मजुरांना आर्थिक मदत मिळण्यासाठी सर्वांनी सजग राहण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

भरीव निधीसाठी लवकरच पालकमंत्री मोहदयांची भेट घेऊन पाठवुराव करणार आहे. ― दत्ता हुले (ऊसतोड मजुर पुत्र पाटोदा)

पंतप्रधान पिक विमा योजनेला 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ –वसंत मुंडे

परळी:आठवडा विशेष टीम― देशामध्ये सर्व स्तरावर शेतकरी आपल्या स्वतःच्या पिकाचा पिक विमा सेवा केंद्रावर जाऊन भरत आहे. अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या अडचणी आल्यामुळे केंद्र सरकारकडे पीक विमा भरण्याची मुदत वाढ राज्य सरकारने मागितली होती या सर्व बाबीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मुदतवाढ 5 ऑगस्ट पर्यंत पिक विमा भरण्यासाठी मिळाली याची माहिती काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी दिली आहे . तरीपण अनेक शेतकरी सातबारा ऑनलाइन न झाल्यामुळे व कोरणा लॉक डाऊन मुळे कागदपत्रे मिळत नसल्यामुळे सेवा केंद्रावर विमा भरताना अडचणी निर्माण झाल्यामुळे देशातील सर्वच राज्याने केंद्राकडे पिक विमा शेतकऱ्यांना भरण्यासाठी मुदतवाढ मागितली होती .त्यामुळे केंद्र सरकारने आज दिनांक 31 जुलै 2020 पंतप्रधान पिक विमा योजनेचे भारत देशाचे कृषी विभागाचे सहसचिव डॉ. आशिष कुमार भूतानि यांनी भारत सरकार कडून आदेश पारित केले आहेत.यामध्ये 5ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ पिक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना दिलेली आहे. तरी शेतकरी बांधवांनी सेवा केंद्रावर जाऊन पिक विमा भरावा आसे आव्हान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी केले आहे.

मुलाच्या शिक्षणाच्या विवंचनेत शेतकरी भागवत काळकुटे यांची गळफास लावून आत्महत्या ; जमिन विक्रीस काढली परंतु ग्राहक मिळाले नाही

बीड दि.२७:आठवडा विशेष टीम― बीड तालुक्यातील मौजे ससेवाडी येथिल सध्या स्थाईक शिवाजीनगर ,उदंडवडगांव येथिल ४५ वर्षीय शेतकरी भागवत ऊर्फ बंडु पांडुरंग काळकुटे या शेतक-यांचे सायंकाळी ४ वाजता त्यांच्या मांजरसुंभा येथिल न्यू कन्हैय्या हाटेलच्या मागे स्वत:च्या शेतामध्ये दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.

सहा महिन्यांपूर्वी कर्ज काढून मुलीचे लग्न केले होते

सहा महिन्यांपूर्वी आरती नावाच्या मुलीचे लग्न केलें होतें त्यासाठी धनरत्न महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बीड चे ५०,००० रू चे कर्ज काढलेले होते.

मुलाच्या शिक्षणासाठी जमिन विक्रीला काढली होती, परंतु ग्राहक मिळत नव्हते

त्यांचा मूलगा तुकाराम या वर्षी १२ वी मध्ये बीडमध्ये शिकत असून फिससाठी व ईतर मुलाच्या शैक्षणिक खर्चासाठी जमिन विक्रीस काढली होती परंतु लाकडाऊनमुळे ग्राहक मिळत नव्हते, याच विवंचनेत असायचे असे त्यांची पत्नी वैशाली हिने सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी वैशाली, मुलगा तुकाराम, मूलगी आरती व दोन भाऊ आणि आई वडील आहेत. पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह नेकनुर शासकीय दवाखान्यात ठेवला असुन पुढील तपास लक्ष्मण केंद्रे स.पो.नि. नेकनुर पोलिस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.