बीड:आठवडा विशेष टीम―रोहयो योजने अंतर्गत लिंबागणेश ते पोखरी रस्ता,भाळवणी शिव ते लिंबागणेश रोड वृक्ष संगोपन अंदाजे २५ लक्ष रुपये.झाडे न लावताच अपहार केल्याप्रकरणी संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करून अपहार केलेली रक्कम शासन तिजोरीत जमा करावी यासाठी दि.१० मार्च २०२० सोमवारी डॉ गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली लिंबागणेश बस स्थानक येथे सकाळी ११ वाजता रास्ता रोको करण्यात असल्याचे निवेदन व तक्रार डॉ गणेश ढवळे यांनी जिल्ह्याधिकारी कार्यालयाला ईमेलद्वारे केली आहे.
सविस्तर वृत्त असे की,रोजगार हमी योजना अंतर्गत लिंबागणेश ते पोखरी रस्ता प्रस्थवीत रक्कम १९.५६ लक्ष व अपहरित रक्कम ५.४१०४५ लक्ष २.भाळवणी शिव ते लिंबागणेश रोड वृक्ष संगोपन भाग १ प्रस्थावीत रक्कम २२ लक्ष रुपये अपहरित रक्कम ८.८९१७१३ भाळवणी शिव ते लिंबागणेश रस्ता भाग २ प्रस्थवीत रक्कम २२ लक्ष व अपहरित रक्कम १२.२३१८२ अशी अंदाजे एकूण २५ लक्ष रुपये रक्कमेचा अपहार झाला असून शासनाची फसवणूक करण्यात आली आहे.तरी संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करून अपहार केलेली रक्कम शासन तिजोरीत जमा करावी यासाठी दि.१० मार्च २०२० वार सोमवार रोजी डॉ गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली लिंबागणेश बस स्थानक ता.जि.बीड येथे सकाळी ११ वाजता रास्ता रोको करण्यात येणार आहे.