जय महेश कारखान्याने विषसदृष्य पाणी पाटबंधारे विभागाच्या चारीत सोडल्याने पाणी विहरीत पाझरून आडगावकरांचे आरोग्य धोक्यात – डाॅ.गणेश ढवळे

बीड दि.१६:प्रतिनिधी– माजलगाव तालुक्यातील पवारवाडी स्थित जय महेश साखर कारखान्याने विषसदृष्य पाणी पाटबधारे विभागाच्या चारीमधुन सोडल्यामुळे आडगाव खरात परिसरातील दुषित पाणी झिरपल्यमुळे विहीरीचे पाणी दुषित झाले असून त्यामुळेच आडगावकरांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांना त्वचेचे विकार जडले असून संबधित प्रकरणात जबाबदार जय महेश साखर कारखान्याचे व्यावस्थापक तसेच पाटबंधारे विभागाचे संबधित जबाबदार आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येऊन ग्रामस्थांना औषधोपचारासाठी नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, जलसंधारण मंत्री, सहकार मंत्री, विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना केली आहे.

आडगाव खरात सरपंच, ग्रामसेवकांची तक्रार परंतु दखल नाही

आडगाव खरात ग्रांमपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांनी १५ मार्च २०२२ रोजी व्यावस्थापकीय संचालक जय महेश साखर कारखाना यांना लेखी तक्रारीद्वारे कारखान्याच्या दुषित सांडपाण्यामुळे आडगाव खरात ग्रामपंचायतचे पाणी दुषित झाले असून सांडपाण्याची विल्हेवाट लावावी असे म्हटले आहे परंतु अद्याप याविषयी कोणतीही सुधारणा झालेली नसुन दुषित पाणी पाटबंधारे विभागाच्या चारीवाटे सोडण्याचे थांबलेले नाही.

स्वखर्चाने टॅकर सुरू करण्याचा जय महेश साखर कारखान्याला पुळका का?

जय महेश साखर कारखान्याने पाटबंधारे विभागाच्या चारीतुन विषसदृष्य पाणी सोडलेले असुन ते पाणी विहरीत मुरल्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांच्या जिवीताला धोका निर्माण होऊ शकतो हे गांभीर्य लक्षात घेऊन स्वखर्चाने टॅकर सुरू केले असून ग्रामस्थांना पर्याय नसल्यामुळेच टॅकरचे पाणी वापरावे लागते.

पाटबंधारे विभागाच्या आधिका-यांवर कारवाई करण्यात यावी : डाॅ.गणेश ढवळे

पाटबंधारे विभागाच्या चारीतुन विषसदृष्य पाणी सोडण्यात येत असताना याविषयी ग्रामपंचायत मार्फत ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याचे सांगून सुद्धा पाटबंधारे विभागाचे आधिकारी कोणतीही कारवाई करत नसुन जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असुन जबाबदार आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येऊन औषधोपचार करण्यासाठी नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात एक लक्ष 45 हजार 928 कोरोनामुक्त, 61 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 10: औरंगाबाद जिल्ह्यात आज 12 जणांना (मनपा 05, ग्रामीण 07) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 45 हजार 928 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 03 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 49 हजार 636 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 647 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 61 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (02)

अन्य 2

ग्रामीण (01)

पैठण 1

मृत्यू (01)

घाटी (01)

1.68 स्त्री, शेवता, ता.पैठण

औरंगाबाद जिल्ह्यात एक लक्ष 45 हजार 916 कोरोनामुक्त, 71 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दि.०९: औरंगाबाद जिल्ह्यात आज 08 जणांना (मनपा 06, ग्रामीण 02) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 45 हजार 916 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 06 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 49 हजार 633 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 646 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 71 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (06)

बुढ्ढी लाइन 1, बीड बायपास 1, अन्य 4

मुतखडा (किडनी स्टोन) झालाय ? मग हा उपाय करा

आठवडा विशेष (हेल्थलाईन टीम)― तुम्हाला मुतखडा झाला असेल तसे निदान झाले असेल किंवा तुम्हाला पोटात कंबरेच्या वरच्या साईड ला दुखत असेल तर मग तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे कारण तुम्हाला मुतखडा असण्याची संभाव्यता आहे ?

कसा ओळखायचा मुतखड्याचा आजार ?

ह्या आजारात तुम्हाला पाठीमागे उजव्या किंवा डाव्या साईडला दुखेल ते दुखणं तुमच्या मूत्रपिंडा च्या साईडला देखील जाऊ शकतं.लगवी करताना जळजळ होऊ शकते. तर मग तुम्हाला या आजाराची संभाव्यता नाकारता येत नाही.त्याचसोबत कधी कधी लगवीतून रक्त देखील येऊ शकते त्यामुळे घाबरून न जाता आधी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असते.

का होऊ शकतो मुतखडा ?

अगदी सहज आणि सोप्या भाषेत सांगायचे म्हणले तर तुम्हाला बऱ्याच दिवस पाणी कमी पिल्यामुळे किंवा तुम्हाला याआधी झालेला किडनी स्टोन यामुळे देखील पुन्हा मुतखडा (किडनी स्टोन) होण्याचा धोका असतो.तसेच उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनाही मुतखडा होऊ शकतो ? तसेच आहारात कॅल्शियम,सोडियम चे प्रमाण वाढले तर देखील मूतखडा होण्याचा धोका आहे. बोरवेल चे क्षारयुक्त पाणी पिणे इत्यादी टाळावे.ह्या आजाराचे निदान होण्यासाठी ह्या काही चाचण्या देखील मदत करतात -१. लगवीची तपासणी२.रक्ताची तपासणी३.सोनोग्राफी४. सिटी स्कॅन

काय आहेत मुतखडा झाल्यानंतरचे उपाय ?

महत्त्वाचा उपाय म्हणजे भरपूर प्रमाणात पाणी प्यावे.डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नये.रोज सकाळी तुळसीची पाने खावीत त्यामुळे देखील खडा पडण्यास मदत होते.- मुतखड्याचा आकार मोठा असल्यास शस्त्रक्रिया मार्फत देखील खडा काढता येतो.- ESWL उपचार पद्धती

पशुसंवर्धन पदविका धारकांना शासनाने नोंदणीकृत करून स्वतंत्र पशुवैद्यकीय व्यवसायास परवानगी द्यावी !

बीड दि.०४ ऑगस्ट २०२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत करून त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून वाड्या-वस्त्यांवर पशुसेवा अगदी कमी वेळात पोहचेल व गाई-म्हशीचे प्राण वाचेल.शासन दुधाचा महापूर आणण्यासाठी प्रयत्न करते योजना आखते परंतु त्यात मोलाचा वाटा असणारे पशुसंवर्धन पदविकाधारकांच्या नोंदणीच्या वेळी मात्र काणाडोळा करते.असे न करता शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून प्रथमतः पशुसंवर्धन पदविका धारकांना कायदेशीर पशुवैद्यक म्हणून घोषित करावे व त्यांची नोंदणी करून त्यांना नोंदणीक्रमांक द्यावा अशी मागणी जोर धरून आहे. १९८४ च्या कायद्यात बदल करावा, पशुसंवर्धन पदवीकाधारकांना व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे मात्र शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसून कृषीप्रधान देशातच पशूंकडे शासनाचे लक्ष नसल्याचे समोर येत आहे.

पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ कलमाअंतर्गत व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीमधून पशुसंवर्धन पदवीधारकांच्या राज्यव्यापी परिषदेची नियुक्ती करून स्वतंत्ररीत्या औषधे बाळगणे व नोंदणीकृत व्यवसाय परवाना उपलब्ध करून द्यावा.राज्यातील रिक्त पशुधन पर्यवेक्षक पदांची तत्काळ भरती करण्यात यावी.खासगीरीत्या असंघटित क्षेत्रात भारतीय पशुचिकित्सक परिषद कायद्यान्वये किरकोळ व प्राथमिक स्वरूपाच्या पशुवैद्यकीय उपचार सेवा पदवीधारक डॉक्‍टरच्या सुपरव्हिजन व माध्यमांचा वापर करून आपले कार्य पार पाडतात अशा सर्व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीप्रमाणपत्र व ओळखपत्र देऊन पशुसेवेचे कार्य सुरू ठेवण्यासाठी बळ द्यावे.

औरंगाबाद जिल्ह्यात आज १ हजार ६१ जण कोरोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यात 108524 कोरोनामुक्त, 11933 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 29: औरंगाबाद जिल्ह्यात आज 1373 जणांना (मनपा 702 , ग्रामीण 671) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 108524 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1061 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 122941 झाली आहे. आजपर्यंत एकूण 2484 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 11933 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (456)―
घाटी परिसर (1), भावसिंगपूरा (1),पडेगाव (1),उस्मानपूरा (1),साई नगर (1),बीड बायपास (5),सातारा परिसर (5), देवळाली (2),लक्ष्मी कॉलनी (1),शितल नगर (1),दर्शन विहार (1), सोनिया नगर (3), हर्सुल (11),एन-1 (3),एन-6 (4), एन-7 (6), एन-8 (5),एन-9 (3),एन-11 (8),एन-12 (3), एन-5(2), एन-4 (1), मयुर पार्क (8),जाधववाडी (7), सारावैभव जटवडा रोड (1),पुडंलिक नगर (2),न्यू हनुमान नगर (2), आनंद नगर (3), अदित्य नगर (2), गुलमोहर कॉलनी (2), बालाजी नगर (1), अल्का सोसायटी (1),अलंकार सोसायटी (1),गारखेडा(5), भानुदास नगर (1),देशमुख नगर(1), रेणुका नगर (3),सिंधी कॉलनी (1),विशाल नगर (4),जय विश्वभारती कॉलनी (1), आलमगिर कॉलनी (1), अल्तमश कॉलनी बायजीपूरा (1), म्होसाबा नगर (4),साई मेडिसिटी हॉस्पीटल (1), छत्रपती नगर (1),एस.आर.पी.एफ. कॅम्प (3),कॅम्ब्रीज शाळेजवळ अभिजित हॉटेल (1),देवानगरी (1), जय मल्हार नगर (3), कासलीवाल गार्डन मुंकदवाडी (2), मुंकदवाडी रेल्वे स्टेशन (3), राजीव गांधी नगर (3), विमानतळ जवळ (1), न्यू गणेश नगर (1), ब्लयू बेल हाऊसिंग सोसायटी एम.आय.डी.सी. (1),कासलीवाल पूर्व (1), जय भवाणी नगर (1), पियुष विहार अयोध्या नगर (1), मनाली रेसीडेंन्सी सिडको (1), राज नगर गादिया विहार (1), दर्गा परिसर (1), सुधाकर नगर (1),आकाशवाणी (1),देवळाई परिसर (1),संजय नगर (1),शिवाजी नगर (3), संग्राम नगर जवळ रेणुका माता परिसर (2), हाय कोर्ट कॉलनी (1), केशव नगर (2), गजानन नगर (2), मयुर बन कॉलनी (1), जय भवाणी नगर (6),श्रेय नगर (1),देवानगरी (1),शंभु नगर (1), उल्का नगर (4), विश्व भारती कॉलनी (1), शिवशंकर कॉलनी (1),मिसारवाडी (1),बुढ्ढीलाइन (1), मिल कॉर्नर (1), मोहनलाल नगर (1), न्यु कुतुबपुरा (1), टि.व्ही सेंटर (1), टाऊन हॉल (1), संघर्ष नगर (1), देशमुख नगर (1), करोल (1), म्हाडा कॉलनी (2), विठ्ठल नगर (2), देवगिरी कॉलनी (1), विश्रांती नगर (2), उत्तार नगरी (1), राम नगर (1), दुध डेअरी (1), नायक नगर (1),खडकेश्वर (1), अन्य 256

ग्रामीण (605)

चिकलठाणा (6),वैजापूर (2),उपळी (1),निमगाव(1), फुलंब्री(1), जामखेड (1),पिसादेवी (2), मस्नतपूर (1), कन्नड (1),सिल्लोड (1), आपतगाव (2), लाडगाव शेंद्रा एम.आय.डी.सी. (2), शिरेगाव लासूर स्टेशन (1),अंधारी (1), माळीवाड (3), साई मंदीर बजाज नगर (10), साजापूर (1), गणेश नगर रामगिरी रोड वाळूंज (2),वडगाव (2),सिडको महानगर (3),फुलशिवरा गंगापूर (1), नक्षत्रवाडी (3), कांचनवाडी (1), झाल्टा (1), पैठन (1), अन्य 504

मृत्यू (20)
घाटी (16)
1. पुरूष, 45, रांजणगाव शेनपुंजी
2. स्त्री, 55 कन्नड
3. स्त्री, 65, सिउको महानगर वाळुज
4. पुरूष, 65, जावेडा खुरडा, औरंगाबाद
5. स्त्री, 85, विशाल नगर, गारखेडा
6. स्त्री, 45, चिंचोली लिंबाजी कन्नड
7. स्त्री, 55, गोलटगाव
8. पुरूष, 62, सातारा परिसर
9. स्त्री, 69, जोगेश्वरी औरंगाबाद
10. पुरूष 71, कबाडीपुरा औरंगाबाद
11. पुरूष 60, आठेगाव कन्नड
12. स्त्री, 70 मिल कॉर्नर औरंगाबाद
13. पुरूष 68, नुतन कॉलनी औरंगाबाद
14. स्त्री 60 कन्नड
15. पुरूष 93 खाराकुंवा, औरंगाबाद
16. पुरूष 50 रामचंद्र नगर औरंगाबाद
जिल्हा सामान्य रुग्णालय (2)
1. पुरूष 58 भारत नगर औरंगाबाद
2. स्त्री, 75, वारेगाव ता फुलंब्री
खासगी रुग्णालय (2)
1. स्त्री 78 एन 5 सिडको औरंगाबाद
2. पुरूष 55 अंभाई, ता सिल्लोड


सोयगाव: जरंडी कोविड केंद्र कर्मचाऱ्याविना ,दुसऱ्या लाटेचा तालुक्याला धसका ,प्रशासनाचे दुर्लक्ष

सोयगाव दि.२५:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― औरंगाबाद जिल्ह्यात कोविड-१९ च्या संसर्गाचा दुसऱ्या लाटेचा शक्यता वर्तविण्यात आली असतांना मात्र सोयगाव तालुक्यासाठी एकमेव असलेल्या जरंडी कोविड केंद्र मात्र कर्मचाऱ्यां विना रिकामे झाले असून येथील कोविड अधिकाऱ्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांचे बंधपत्र संपल्याने कोविड केंद्राचा पदभार या कर्मचाऱ्यांनी सोडला आहे.त्यामुळे कर्मचाऱ्यां विना असलेल्या कोविड केंद्रात उपचाराची चिंता भेडसावत आहे.

सोयगाव तालुक्यासाठी एकमेव जरंडीचे कोविड केंद्र आहे,परंतु या कोविड केंद्रातील कोविड अधिकारी डॉ.आनंद भाले यांचेसह सात आरोग्य कर्मचाऱ्यांचे बंधपत्र संपून महिना उलटला तरीही जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने या कर्मचाऱ्यांना नियमित केलेले नसल्याने ऐन धास्तीत जरंडी कोविड केंद्र कर्मचाऱ्यां विना ओस पडले आहे.या कोविड केंद्राची सफाई कर्मचाऱ्यांअभावी सफाई झालेली नाही.त्यामुळे दिवाळी नंतर हे कोविड केंद्र सफाईविना झाले आहे.एकीकडे दुसऱ्या लाटेला संघर्ष करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असतांना दुसरीकडे मात्र या कोविड केंद्राची दुरवस्था झाली आहे.अधिकारी आणि कर्मचारी नसल्याने ऐनवेळी आलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपाय योजना शासनाकडे नाही.बंधपत्र संपलेल्या कर्मचाऱ्यांनी कोविड केंद्र सोडले आहे.या कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात आलेले नसल्याने कोविडची जबाबदारी कोण घेईल असा प्रश्न तालुकुयात उपस्थित झाला आहे.

डॉ राधाकिसन पवार यांची सूडबुद्धीने कारवाई ; कोविड कक्ष स्थापन करण्याचे लेखी आदेश दिले त्याच दवाखान्याला अनधिकृत म्हणून चौकशी – डॉ ढवळे

डॉ राधाकिसन पवार यांची सूडबुद्धीने कारवाई, कोविड कक्ष स्थापन करण्याचे लेखी आदेश दिले त्याच दवाखान्याला अनधिकृत म्हणून चौकशी, मुख्यमंत्री आरोग्यमंत्री आयुक्तांना लेखी तक्रार ― डॉ. गणेश ढवळे

बीड दि.१०:आठवडा विशेष टीम― डॉ.राधाकिसन पवार जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी ज्या क्लिनिक मध्ये कोविड-१९ संभाव्य रूग्ण तपासणी कक्ष स्थापन करणायाचे लेखी पत्रक आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत दिले होते त्याच दवाखान्याची अनधिकृतपणे चालवत असल्याबद्दल पोलीस यंत्रणा व वैद्यकीय यंत्रणेमार्फत चौकशी करून बदनामीचे षडयंत्र डॉ.अशोक थोरात (जिल्हा शल्य चिकित्सक) , डॉ. राधाकिसन पवार (जिल्हा आरोग्य अधिकारी) व डॉ.प्रतिभा रकटे (वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र लिंबागणेश) यांनी रचले असल्याचे डॉ गणेश ढवळे यांनी म्हटले आहे.

आरोग्य यंत्रणेतील या अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधातील तक्रार मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आयुक्त आरोग्य सेवा संचनालय मुंबई यांना केल्यामुळे षड्यंत्र सूडबुद्धीने रचले याविषयी चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ लातूर यांच्या मार्फत मुख्यमंत्री आरोग्यमंत्री आयुक्त आरोग्य सेवा संचनालय मुंबई यांना डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, दि. ०८/०९/२०२० रोजी डॉ. प्रतिभा रकटे (वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र लिंबागणेश) यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिसन पवार यांनी डॉ.कासट एन.डी. यांना जा क्र/जिआअकाबी/आस्था/९५७/२०२० जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय बीड दिनांक ०८/०९/२०२० रोजीच्या पत्रावरून डॉ. गणेश ढवळे अनाधिकृत दवाखाना चालवत असल्याबद्दल तात्काळ चौकशी करून कार्यवाही करणेबाबत सांगितले होते. त्यामध्ये डॉ.गणेश ढवळे यांच्या नर्सिंग होम मध्ये अनाधिकृत औषधसाठा आहे व अनाधिकृत दवाखाना चालवत असल्याचे म्हटले आहे.

दवाखाना अनधिकृत असेल तर कोविड कक्ष स्थापन करण्यासाठी लेखी पत्रक दिले कसे?

सर्वात प्रथम डॉ.गणेश ढवळे यांचे “दिपक क्लिनिक” आहे.नर्सिंग होम नाही दुसरी गोष्ट जर डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांचे क्लिनिक अनाधिकृत असेल तर डॉ.राधाकिसन पवार जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी स्वतः च्या सहीनिशी कोविड कक्ष स्थापन करण्यात यावे असे लेखी पत्रक प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी यांना डॉ.गणेश ढवळे यांच्या क्लिनिक मध्ये का पाठवले? असा प्रश्न निर्माण होतो.

डॉ.गणेश ढवळे यांच्या दिपक क्लिनिक मध्ये अनाधिकृत औषधीसाठा असेल तर औषध निरीक्षक रामेश्वर डोईफोडे यांनी जप्त करून गुन्हा दाखल का केला नाही???

डॉ.गणेश ढवळे यांची पदवी बी.ए.एम.एस. (Bachelor of Ayurveda, Medicine, and Surgery) असुन रजिस्ट्रेशन नं I-36149-A-1 आहे. त्यांच्या रजिस्ट्रेशन दिनांक ०६/०५/२०२४ पर्यंत आहे.दिनांक ०२/०९/२०२० पासुन १५/०९/२०२० पर्यंत लिंबागणेश संपूर्ण गावात संचारबंदी होती.त्यामुळे बीडवरून आवक-जावक करणारे लिंबागणेश येथिल औषध दुकानदार व खाजगी डॉक्टर यांचे येण्या-जाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे व स्वतः डॉ ढवळे स्थानिक असल्याने आवश्यक औषधीसाठा ठेवला होता.ज्यामध्ये आक्षेपार्ह गर्भपातासारखी कुठलीही औषधे नव्हती. त्यामुळे रामेश्वर डोईफोडे यांनी कोणतेही औषध जप्त न करता गुन्हा दाखल करण्यात आला नाही.खाजगी डॉक्टर रूग्ण तपासण्यात कुचराई करत असताना डॉ गणेश ढवळे यांनी रुग्णसेवा देत कर्तव्य बजावले आहे.


सूडबुद्धीने कारवाई करण्याचे कारण ‘वरीष्ठांना केलेली लेखी तक्रार’ ―डॉ.गणेश ढवळे

‘डॉ.रकटे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र लिंबागणेश या लिंबागणेश येथील आरोग्य केंद्रात वारंवार गैरहजर असतात, परिचारिका कडून रूग्णांना उपचार घ्यावे लागतात’ याविषयी डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी दि, १८/०३/२०२० रोजी मुख्यमंत्री ,आरोग्यमंत्री ,आयुक्त यांना जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत लेखी तक्रार केली होती. त्यावरून जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जिल्हा परिषद बीड जाक्रजिपबी/आदि/आस्था/-१/कावि-/ ६७९/१९ पत्रक दि. २०/०३/२०२० अन्वये दि. २०/०३/२०२० रोजी मुख्यालयी राहात नसल्याबद्दल महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ चे नियम ३(१) (दोन) चा भंग केला आहे म्हणून आपणाविरूद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ नुसार प्रशासकीय कारवाई का करण्यात येऊ नये या बाबत ७ दिवसाच्या आत खुलासा मागवला होता.त्यामुळे सूडबुद्धीने सर्व कागदपत्रे असताना केवळ मनस्ताप व दबाव आणण्यासाठी खोटी तक्रार नेकनूर पोलीस ठाण्यात केली गेली असल्याचे डॉ ढवळे यांनी म्हटले आहे.


डॉ. राधाकिसन पवार जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांची तक्रार–

दि, ३०/०९/२०२० रोजी डॉ. राधाकिसन पवार जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत जिल्हाधिकारी बीड यांनी गावातील ३२७ लोकांची संभाव्य कोरोना संशयितांची यादी तयार केली होती. त्यामध्ये बोगस लोकांची नावे दाखल करण्यात आली असून या गैरकारभारास डॉ. राधाकिसन पवार मुख्य सुत्रधार असल्याची लेखी तक्रार पंतप्रधान, केंद्रीय आरोग्य मंत्री, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री ,आयुक्त आरोग्य सेवा संचनालय मुंबई यांना केली होती या गोष्टीचा राग मनात धरून कारवाई केली गेली असल्याचे डॉ ढवळे यांनी म्हटले आहे.


१२ घंटे कोरोना रूग्ण ताटकळत असल्याची तक्रार जिव्हारी लागली

———————————————-
आरोग्य विभागाचा ग्रामिण भागातील ढिसाळ कारभार, त्यातच दि ०५/०९/२०२० रोजी लिंबागणेश येथील ५ कोरोना बाधित रुग्णांना नेण्यासाठी रूग्णवाहिका न आल्यामुळे रात्रभर १२ घंटे रुग्णांची हेळसांड केल्याप्रकरणी विविध दैनिकात, ईलेक्ट्रॉनिक मिडीयावर पोलखोल केल्यामुळे मनामध्ये राग होता, तो सूडबुद्धीने खोटी कारवाई करुन काढण्यात आला याविषयी मुख्यमंत्री ,आरोग्यमंत्री, आयुक्त आरोग्य सेवा संचनालय मुंबई यांना जिल्हाधिकारी बीड, उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ लातूर यांच्या मार्फत लेखी तक्रार डॉ गणेश ढवळे यांनी केली आहे.


कोरोना संकटकाळात डॉ.अविनाश मुंडे यांची अविरत रूग्णसेवा ,मॅक्स हॉस्पिटलचा गरजू रूग्णांना दिलासा..!

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
कोरोना संकट हे मानवाच्या मुळावर उठले आहे.प्रत्येक जीवाला याची भिती.मात्र वर्तमान काळात डॉक्टर अगदी देवदूताच्या भुमिकेत आहेत.डॉक्टरांना पण, याचा धोका आहे.मात्र ज्या कामासाठी आपला जन्म झाला ते कर्तव्य निभावत आहेत.डॉक्टरांना सुद्धा आपले दवाखाने चालवावीत का नाही.? असा प्रश्न आहे.मात्र सामाजिक जाणिव ठेवून धारूरचे भुमीपूत्र डॉ.अविनाश ज्ञानोबा मुंडे हे मॅक्स हॉस्पिटलच्या माध्यमातून 24 तास रूग्णांची सेवा करीत आहेत.हे विशेष होय.

डॉ.अविनाश ज्ञानोबा मुंडे हे कोरोना बाधीत नसलेल्या इतर रूग्णांसाठी अविरत उपलब्ध राहून देत असलेली आरोग्य सेवा ही आज मोठा दिलासा म्हणावा लागेल.कोरोना वाढता प्रादूर्भाव लक्षात घेवून कोरोना बाधीत रूग्णांची सेवा करण्यासाठी कोविड रूग्णालय सुरू करण्याचा आपला विचार असल्याचे त्यांनी सांगितले.डॉ.अविनाश मुंडे हे मूळचे धारूर (जि.बीड) येथील रहिवासी आहेत.प्रसिद्ध डॉ.ज्ञानोबा मुंडे यांचे सुपुत्र आहेत.औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात शिक्षण पूर्ण केल्यानंतर एम.डी.पर्यंत शिक्षण एमजीएम रूग्णालयात पूर्ण केलं.शांत आणि मनमिळावू स्वभाव असलेल्या डॉ.अविनाश यांनी अल्पावधीतच सर्वसामान्य रूग्णांची सेवा करत अनेकांची मने जिंकली आहेत.कोरोना सारखं मोठं संकट मानवी जीवावर उठले आहे.त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.या संकटात वास्तविक पाहता डॉक्टरांची भूमिका ही देव-देवता सारखीच आहे.ज्यामध्ये खाजगी डॉक्टर रूग्णांची सेवा करतात.मात्र अनेक ठिकाणावरून तक्रार आणि संभ्रम निर्माण होताना दिसत आहे.अशाही परिस्थितीत नवतरूण ज्यांना सामाजिक जाणीव आणि वर्तमान काळाचे गांभीर्य आहे.अशा डॉ.अविनाश मुंडे सारख्या तरूण डॉक्टरने अंबाजोगाई शहरात दीनदयाळ नागरी सहकारी बँकेसमोर,परळी रोड या ठिकाणी मॅक्स हॉस्पिटल आहे.जिथे सर्व प्रकारच्या अत्याधुनिक रूग्णसेवा दिल्या जातात.टु डी इको स्ट्रेस टेस्ट,अतिदक्षता विभाग रूग्णांना आवश्यक सोयी आहेत.शिवाय सोबत त्यांच्या पत्नी डॉ.सौ.प्रगतीताई मुंडे यांची स्त्रीरोग, प्रसूती व वंध्यत्व निवारण सेवा सुरू आहे. गर्भवती महिलांची सोनोग्राफी व इतर शस्त्रक्रिया देखील केल्या जात आहेत. अत्याधुनिक साधन सामग्री असल्याने रूग्णालयात आलेले सर्व प्रकारचे रूग्ण यांना सेवा दिली जाते.डॉ.अविनाश मुंडे होतकरू तरूण असून कोरोना सारख्या संकटात लोकांना ते मदत करत असल्याने त्यांचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे.सर्व प्रतिबंधक उपाय रूग्णालयात पाळले जात आहेत.एकिकडे इतर शहरांत अनेक खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद केलेले असताना दुसरीकडे मात्र अंबाजोगाईत अनेक डॉक्टर बांधवांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आपली आरोग्य सेवा सुरू ठेवली आहे.लवकरच आपल्या दवाखान्यात कोविड रूग्णालयातील उपचार सुविधा सुरू करण्याचा विचार असल्याचे डॉ.मुंडे यांनी सांगितले.सर्वसामान्य रूग्णांची सेवा करणे हिच ख-या अर्थाने ईश्वराची सेवा आणि आपल्या वडीलांकडुन वारसा मिळाल्याचे ते म्हणाले.धन्वंतरीच्या दरबारात वैद्यकीय दूत म्हणून काम करणा-या तरूण डॉ.अविनाश मुंडे यांच्या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे.येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालयातील मेडिसीन विभागप्रमुख डॉ.सिद्धेश्वर बिराजदार हे त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील गुरू आहेत.डॉ.बिराजदार हे सामाजिक दायित्व आणि गरीबांचा देव म्हणून वैद्यकीय क्षेत्रात ओळखले जातात.शिक्षण घेत असल्यापासून त्यांचे मार्गदर्शन आणि आशिर्वाद तसेच डॉ.नितीन चाटे यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे डॉ.अविनाश मुंडे यांनी सांगितले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 24286 कोरोनामुक्त तर आज 317 जण पॉझिटिव्ह

औरंगाबाद:आठवडा विशेष टीम― औरंगाबाद जिल्ह्यात आज 301 जणांना (मनपा 121, ग्रामीण 180) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 24286 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 317 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 31085 झाली आहे. आजपर्यंत एकूण 879 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 5920 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 66, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 143 आणि ग्रामीण भागात 46 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण (77)―

खुलताबाद (1), रोटेगाव, वैजापूर (2),मोंढा मार्केट, वैजापूर (1),मर्चंट कॉलनी, वैजापूर (1), आनंद नगर, वैजापूर (1), लक्ष्मी , नारायण नगर (1), देवगाव रंगारी (1), लासून स्टेशन (5) शिक्षक कॉलनी, लासूर स्टेशन, (2), सुलतानाबाद (1), पाटील गल्ली, गंगापूर(1), डोमेगाव, गंगापूर (1), जामगाव (1), औरंगाबाद (19), फुलंब्री (3), गंगापूर (7), कन्नड (13), वैजापूर (3), पैठण (2), साळवे वस्ती, माळेगाव (1) आँचलगाव लोणी (1), तलवाडा लोणी (1), भाजी मार्केट पैठण (1), माधव नगर, पैठण (1), सिडको कार्यालयाजवळ, सिडको महानगर (1) जुने बजाज हॉस्पीटल परिसर (2), विटावा (1), बजाज नगर (1), शिवाजी नगर, कन्नड (1)

मनपा (31)
एन चार सिडको (1), हनुमान नगर (1), संडे बाजार, गांधी नगर (7),जवाहर कॉलनी (1), लोकमत नगर (1), साई मेडिसटी रुग्णालय परिसर (1), गारखेडा (1), जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर (2), एनएच हॉस्टेल (1), हर्सूल (1), औषधी भवन परिसर (1), सहकार नगर (1), समर्थ नगर (1), एन नऊ हडको (1), बीड बायपास सातारा परिसर (5), नविन पोलीस कॉलनी मिल कॉर्नर (1), मोची गल्ली, पद्मपुरा (1), छावणी परिसर (2), घाटी परिसर (1),

सिटी एंट्री पॉइंट (66)
प्रकाश नगर (1), श्रीकृष्ण नगर (1), इटखेडा (2), बजाज नगर (4), जालान नगर (1), रांजणगाव (2), सिडको महानगर (4), सिडको एन नऊ (4), जाधववाडी (1), हर्सुल (1), एन अकरा टीव्ही सेंटर (1), कटकट गेट (1), शिवाजी नगर (2), बायजीपुरा (1), कांचनवाडी (1),
राम नगर (4), सुंदरवाडी (2), उल्कानगरी (1), देवळाई (2), राजेश नगर, बीड बायपास (1), सिडको एन सात (1), त्रिमूर्ती चौक (1),केंब्रीज चौक (1), रेल्वे स्टेशन (1), जय विश्वभारती कॉलनी (1), कांचनवाडी (2), बालानगर, पैठण (2), गंगापूर (2), वाळूज (2), गोलवाडी (4), किराडपुरा (1), पडलसा गंगापूर (1), मारोती नगर (2), पवन नगर (2), शिवेश्वर कॉलनी (4), एकता नगर (1), एन बारा (1)

तेरा कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत मिसरवाडीतील 80 वर्षीय पुरूष, चित्तेगाव, नेहरू नगरातील 60 वर्षीय पुरूष, मुकुंदवाडीतील 77 वर्षीय स्त्री, पिसादेवी हर्सुल येथील 50 वर्षीय स्त्री, एन अकरा हडकोतील 38 वर्षीय पुरूष, इंदिरा नगरातील 50 वर्षीय पुरूष, आदर्श कॉलनी, करमाड येथील 75 वर्षीय स्त्री, चिकलठाणा येथील 71 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयांमध्ये शिवाजी नगर, जैन मंदिराजवळील 63 वर्षीय पुरूष, दिग्विसजय प्लाजा, देवानगरी येथील 66 वर्षीय स्त्री, जामगाव गंगापुरातील 60 वर्षीय पुरूष आणि 57 वर्षीय स्त्री, शहरातील शरीफ कॉलनीतील 81 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


सोयगाव तालुक्यात शनिवारी व रविवारी दोन दिवसात ६३ चाचण्या १५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

सोयगाव दि.२१:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― आठवडाभरापासून साखळी तुटलेल्या सोयगाव तालुक्यात शनिवारी व रविवारी दोन दिवसात झालेल्या ६३ चाचण्यात १५ रुग्ण सकारात्मक आढळून आले त्यामुळे आरोग्य विभागाची अचानक सापडलेल्या रुग्णांमुळे धावपळ उडाली होती.त्यामुळे जरंडी कोविड केंदाची संख्या एकवरून आता १८ वर पोहचली आहे.त्यापैकी एक महिला रुग्णाचा कोरोनामुक्त झाल्याने सुटका करण्यात आली आहे.

सोयगाव तालुक्यात आठवडाभरापासून कोरोना संसर्गाची साखळी तुटली होती,परंतु वाढत्या संसर्गाची चिन्हे आता दिसू लागली असून शनिवारी व रविवारी या दोन दिवसात सोयगाव,जरंडी,किन्ही,धनवट, कंकराळा आणि तिखी या गावांमध्ये १५ रुग्णात वाढ झाली असून जरंडी कोविड केंद्रात एक रुग्ण संख्या असतांना तब्बल १८ रुग्णसंख्या पोहचली आहे.तालुका आरोग्य विभागाकडून योग्य खबरदारी घेत कोरोना संसार्गावर नियंत्रण मिळविण्यात यश प्राप्त झाले असतांना अचानक शनिवारी व रविवारी झालेल्या अंटीजन चाचण्यात पुन्हा कोरोना संसर्गाने डोकेवर काढल्याने १८ रुग्ण आढळले,जरंडी कोविड केंद्रात कोविड अधिकारी डॉआनंद भाले,अतुल नवले,प्रिया रावूत,सुप्रिया मेश्राम,वर्षा शेळके,आदी पथक तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करत आहे.

बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अशोक थोरात यांची व त्यांच्या नातेवाईकांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी

लिंबागणेश दि.१८:आठवडा विशेष टीम

अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रूग्णालय बीड हे 20 वर्षापासून बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सक्रीय सहभागी असून स्व.विमलताई मुंदडा आरोग्यमंत्री असताना ते विशेष अधिकारी म्हणून त्यांचे काम पाहत होते. त्यादरम्यान त्यांनी आरोग्य विभागातील कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संपत्ती जमा केली होती. त्यानंतर त्यांनी ना.पंकजाताई मुंडे, ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री बीड यांच्या कार्यकाळात केज उप रूग्णालय वैद्यकीय अधिक्षक कार्यकारी पदी असताना शासनाची फसवणूक करून मुख्य सचिव यांना त्यांच्यावरील अवैध गर्भपात प्रकरणी उच्च न्यायलय व सर्वोच्च न्यायालयात आरोप कायम केलेले आहेत, हि गोष्ट लपवून पंकजाताई मुंडे यांची दिशाभुल करून बीड जिल्हा शल्यचिकित्सक पद मिळवलेले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे यांनी पोलीस उपअधिक्षक ,लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, जिल्हा बीड यांच्या मार्फत पोलीस अधीक्षक ,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कार्यालय, औरंगाबाद यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

तसेच तत्कालीन विरोधी पक्षनेते असताना व आजचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड ना.धनंजय मुंडे यांनी दि.27/02/2019 रोजी मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य व मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांना पुराव्यानिशी लेखी तक्रार करताना डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रूग्णालय बीड हे राजकारणात सक्रीय, अवैध गर्भपात प्रकरणातील आरोपी, फौजदारी खटला, त्यांना अटक झाली असून त्यांच्यावर उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयामध्ये आरोप कायम स्वरूप प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. तसेच शासकीय पदावर असताना केज तालुक्यातील तांबवा जि.प.गटातून निवडणूक लढवलेली होती. तसेच सत्ताधारी पक्षाचे शासकीय सेवेत असताना सक्रीय काम करत असून त्यांची तात्काळ जिल्ह्याबाहेर बदली करण्यात येवून त्यांच्यावर प्रशासकीय व फौजदारी कार्यवाही करण्यात यावी अशी तक्रार धनंजय मुंडे यांनी देखील केली होती.

बीड जिल्हा आरोग्य विभागाला मिळालेल्या 33 कोटी रूपयांच्या खरेदी व गुंतवणूक प्रकरणी मोठ्या प्रमाणावर अपहार झाला असून याप्रकरणी प्रमुख संशयित डॉ.अशोक थोरात असून त्यांनी या निधीचा स्वतः वर कार्यवाही होवू नये तसेच उपसंचालक पद मिळावे यासाठी गैर-व्यवहार करण्यात आल्याचा आरोग्य विभागातील तज्ञांचा संशय असून संबंधीत प्रकरणी डॉ.अशोक थोरात यांनी मोठ्या प्रमाणावर कमाई केली असून ती त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर सुध्दा केल्याचा संशय असून याप्रकरणी डॉ.अशोक थोरात व त्यांच्या नातेवाईकांच्या संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी व संबंधीत दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी तसेच चौकशी न झाल्यास लोकशाही मार्गाने जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील सामाजिक कार्यकर्ते तथा किसान सभा बीड तालुकाध्यक्ष तथा दिव्यांग संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य चे बीड तालुकाध्यक्ष तसेच दक्ष नागरिक जनकल्याण समिती बीड चे सदस्य असलेले डॉ.गणेश ढवळे यांनी दिला आहे.


अंबाजोगाईत कोरोना काळात वृध्द,मधुमेह रूग्णांना घरपोहोच सेवा ;पद्मावती क्लिनिक लॅबची बांधिलकी

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय क्षेत्रात वेगवेगळे आव्हान उभे राहिलेले असताना.एवढेच नाही तर एकिकडे काही खाजगी डॉक्टर यांच्या सेवेबाबत उलट सुलट चर्चा असताना ? दुसरीकडे अंबाजोगाई शहरात मात्र सचिन गौरशेटे यांनी पद्मावती क्लिनिक (रक्त तपासणी प्रयोगशाळा) गेल्या अनेक महिन्यांपासून 24 तास सेवा सुरू ठेवली आहे.सर्वसामान्य रूग्णांना रक्त तपासणीसाठी फार मोठा दिलासा मिळत आहे.

ज्येष्ठ नागरिक,मधुमेह रूग्ण यांना या क्लिनिक द्वारे घरपोहोच सेवा मिळत असल्याने.संकटात सामाजिक दायित्व आणि जबाबदारी कशाप्रकारे पार पाडली जाते याचे हे उत्तम उदाहरण आहे.सचिन गौरशेटे हा तरूण ग्रामीण भागातील असून,अनेक वर्षांपासून अंबाजोगाई शहरात त्याची पद्मावती क्लिनिक लॅब आहे.कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय क्षेत्रात वेगवेगळे आव्हान उभे आहेत.संकटाची भीती सर्वस्तरांतील लोकांना असल्याने,खाजगी डॉक्टर सुद्धा अनेक शहरात आपलं क्लिनिक उघडायला तयार नाहीत.अशा परिस्थिती मध्ये सचिन
गौरशेटे या तरूणाने सामाजिक दायित्व आणि परोपकारी सेवाभाव ठेवून आपलं क्लिनिक 24 तास चालू ठेवले आहे.सर्वसामान्य रूग्णांना रक्ताच्या तपासण्या केल्यानंतर सुद्धा अनेकदा मानसिक दिलासा मिळतो.गौरशेटे यांनी शहरातील ज्येष्ठ नागरिक.मधुमेहाचे रूग्ण किंवा इतर आजाराने त्रस्त असणा-या रूग्णांना रक्त तपासणीचे अहवाल घरपोहोच सेवा देण्याचे कार्य गेल्या दोन महिन्यांपासून सुरू ठेवले आहे.लॉकडाऊन काळात सुद्धा गरजेनुसार या क्लिनिक मधून सर्वसामान्य रूग्णांना सेवा मिळत होती.सध्या या क्लिनिक मधून 24 तास सेवा सुरू आहे.मधुमेहाच्या रूग्णांना महिन्याकाठी नियमित साखर तपासणी ही करावी लागते.संकटाच्या पार्श्वभूमीवर भीतीपोटी रूग्ण दवाखान्यात जाण्यासाठी मागे पुढे पाहतात.मात्र काही डॉक्टर केवळ मेसेजवर ट्रिटमेंट देत असल्याने,रक्त तपासणी अहवाल अत्यंत महत्त्वाचा आहे.अशा परिस्थितीत सचिन गौरशेटे हे अंबाजोगाई शहरामध्ये सामाजिक दायित्व ठेवून आपली जबाबदारी पार पाडत असल्याने.सचिन यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.विशेषता: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गौरशेटे यांनी सर्व प्रकारच्या रक्त चाचण्यांचे दर हे माफक ठेवले आहेत.


आज औरंगाबाद जिल्ह्यात 437 जण कोरोना पॉझिटिव्ह

औरंगाबाद, दि.10:आठवडा विशेष टीम― औरंगाबाद जिल्ह्यात आज 250 जणांना (मनपा 140, ग्रामीण 110) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 20704 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 437 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 27289 झाली आहे. आजपर्यंत एकूण 782 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 5803 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 73, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 103 आणि ग्रामीण भागात 47 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

*ग्रामीण (164)*
शिरूडी, फुलंब्री (1), एमआयडीसी, वाळूज (1), कृषी महाविद्यालय, पैठण (1), लासूर, वैजापूर (1), देवळी, कन्नड (1), अंधारी, सिल्लोड (1), बजाज नगर (7), अयोध्या नगर, बजाज नगर (3), जय भवानी नगर, बजाज नगर (1), एमआयडीसी कॉलनी, बजाज नगर (1), वडगाव, बजाज नगर (1), तुर्काबाद (1), पंढरपूर (5), भगतसिंग नगर, वाळूज (1), शिवराई फाटा, वाळूज (1), झेंडा मैदान, वाळूज (2), गणेश नगर, वाळूज (1), शिवराई (1), गणेश चौक, वाळूज (3), माळीवाडा, कन्नड (4), पिशोर नाका, कन्नड (1), शिवनगर, कन्नड (1), पिशोर, कन्नड (1), तपोवन, कन्नड (1), करमाड (3), एमआयडीसी पैठण (1), नाथ गल्ली पैठण (2), नारळा, पैठण (2), राम नगर, पैठण (2), नवीन कावसान, पैठण (1), इंदिरा नगर,पैठण (1) टाकळी अंबड, पैठण (2), मन्सुरी कॉलनी, गंगापूर (2), लासूर स्टेशन, गंगापूर (1), शिक्षक कॉलनी, गंगापूर (4), अखिलेश नगर, गंगापूर (1), लासूर नाका, गंगापूर (1), गंगापूर (5), जाधव गल्ली, गंगापूर (4), शिवप्रताप नगर, वैजापूर (1), फुलेवाडी, वैजापूर (1), डवला, वैजापूर (1), नवजीवन कॉलनी, वैजापूर (1), जीवनगंगा, वैजापूर (4), टाकळी सागज, वैजापूर (1), सुंदर गणपती, वैजापूर (1), अगरसायगाव, वैजापूर (1), हिलालपूर, वैजापूर (1), शिऊर, वैजापूर (3), शिवराई रोड, वैजापूर (1), चंद्रपाल नगर, वैजापूर (1), राजवाडा, शिऊर (3), फुलेवाडी (1), कुंभेफळ, शेंद्रा (1), वाळूज, गंगापूर (1), मुद्देश वडगाव (3), जयसिंग नगर, गंगापूर (2), सखाराम पंत नगर, गंगापूर (4), शास्त्री कॉलनी, सिल्लोड (1), मुंडणगाव, सिल्लोड (1), टिळक नगर, सिल्लोड (1), वैशाली नगर, सिल्लोड (1), तहसील कार्यालय परिसर, सिल्लोड (3), घाटनांद्रा, सिल्लोड (2), रांजणगाव शेणपूजी (2), शेवरी (1), औरंगाबाद (5), फुलंब्री (12), कन्नड (3), सिल्लोड (3), वैजापूर (9), पैठण (12), खुलताबाद (1), दावरवाडी, पैठण (1)

*मनपा (97)*
मयूर पार्क (5), मारोती नगर (3), सिंधी नगर (1), चिकलठाणा (1), मिटमिटा (2), रेणुका नगर (2), संजय नगर, कैलास नगर (2), मातोश्री नगर (2), सप्तशृंगी नगर, पडेगाव (1), विष्णू नगर, बालाजी नगर (1), भानुदास नगर (2), सिंहगड कॉलनी (1), गजानन मंदिर परिसर (4), वेदांत नगर (5), उस्मानपुरा (3), जवाहर कॉलनी (1), हर्सुल (1), द्वारकापुरी (1), सातारा परिसर (3), जय विश्वभारती कॉलनी (1), शंभूमहादेव नगर (2), जालान नगर (2), अन्य (5), पानचक्की (1), शहानूरवाडी (2), पैठण गेट (1), शिवाजी नगर (2), राम नगर (1), एसआरपीएफ ग्रुप, सातारा परिसर (1), अंबिका नगर (1), एन बारा स्वामी विवेकानंद नगर (1), रोहिदास नगर (1), एन नऊ, श्रीकृष्ण नगर (1), कैलाश नगर (1), रायगड नगर (1), एन सहा अविष्कार कॉलनी (1), जाधववाडी (1), संघर्ष नगर, मुकुंदवाडी (1), फुले कॉलनी (1), अयोध्या नगर (1), मिलिट्री हॉस्पीटल (3), नाथ नगर (1), भगतसिंग नगर (1), मोरेश्वर सो., गारखेडा (2), पडेगाव (1), तारांगण (2), विद्यापीठ परिसर (1), मनजित नगर (1), एन सात सिडको (1), अभूषण पार्क (1), पहाडसिंगपुरा (1), इंदिरा नगर, गारखेडा परिसर (1), बन्सीलाल नगर (1), किल्लेअर्क (1), एन सहा, सिडको (1), भावसिंगपुरा (4), राजे संभाजी कॉलनी, हर्सुल (1), सिटी चौक पोलिस स्टेशन परिसर (1), उत्तरानगरी (1), म्हाडा कॉलनी (1)

*सिटी एंट्री पॉइंट (73)*
कन्नड (1), दत्त नगर (1), पंढरपूर (1), म्हसोबा नगर (2), मयूर पार्क (1), विश्रांती नगर (1), शिवनेरी कॉलनी (1), राम नगर (4), सुलतानपूर (1), चौधरी कॉलनी, चिकलठाणा (1), इटखेडा (5), कांचन नगर (1), कांचनवाडी (3), बीड बायपास (2), सातारा परिसर (3), गजानन नगर (1), संघर्ष नगर (1), मिटमिटा पडेगाव (5), पिसादेवी (2), जाधववाडी (1), होनाजी नगर (1), समृद्धी महामार्ग कर्मचारी (1), सिटी चौक (1), एन तेरा, गणेश नगर (1), हर्सुल (1), रोशन गेट (1), पुंडलिक नगर (1), भराडी, सिल्लोड (1), गेवराई कुबेर (1), सावंगी (1), चिंचोली लिंबाजी (1), कायगाव (1), वाळूज (1), पवन नगर, एमआयडीसी (1), गारखेडा परिसर (1), बजाज नगर (5), लाडगाव सावंगी (2), बाळापूर (3), भालगाव (1), न्यू हनुमान नगर (4), निपाणी (1), उत्तरानगरी (1), खामगाव (1), चिकलठाणा (1), पैठण रोड (1)

*तेरा कोरोनाबाधितांचा मृत्यू*
घाटीत न्यू हनुमान नगरातील 70 वर्षीय पुरूष, जय भवानी नगर, मुकुंदवाडीतील 50 वर्षीय पुरूष, सिल्लोड येथील 45 वर्षीय स्त्री, एन पाच सिडकोतील 77 वर्षीय पुरूष, बोधवड, सिल्लोड येथील 95 वर्षीय पुरूष, कंकावती नगर, कन्नड येथील 70 वर्षीय स्त्री, पिशोर कन्नड येथील 65 वर्षीय पुरूष, बीड बायपास येथील 60 वर्षीय स्त्री, रेल्वे स्टेशन परिसरातील 65 वर्षीय पुरूष, जिल्हा सामान्य रुग्णालयातील बीड बायपास येथील 82 वर्षीय पुरूष, कन्नड येथील 70 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयात सोयगावातील श्रीराम मंदिराजवळील 74 वर्षीय पुरूष आणि नाथ नगरातील 71 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


बीड: लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत नविन ३ कोरोना पाझिटीव्ह

लिंबागणेश:डॉ गणेश ढवळे― लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत एकुण २९ गावे येतात,त्या अंतर्गत ८ उपकेंद्र आहेत, काल डॉ. रकटे आणि डॉ. राऊत यांनी एकुण ६८ जणांची नावे स्वाब तपासणीसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कासट यांना पाठवले होते.

८ उपकेंद्र पैकी ३ उपकेंद्रात नविन १ रुग्ण कोरोना बाधित

बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथिल प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत एकुण ८ उपकेंद्र आहेत, लिंबागणेश,बोरखेड, बेलखंडी, मोरगाव, खंडाळा, पाली, मंत्री, पिंपळवाडी वरील उपकेंद्र आहेत.
आज दिनांक ०६/०९/२०२० रोजी सायंकाळी ७ वाजता आरोग्य विभागाने दिलेल्या अहवालानुसार ३ उपकेंद्रात नविन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे.१) बोरखेड उपकेंद्र अंतर्गत ६० वर्षीय पुरूष २) बेलखंडी अंतर्गत ३८ वर्षीय पुरूष ३) लिंबागणेश उपकेंद्र अंतर्गत ३२ वर्षीय पुरूष
या विषयी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी संबंधित गावच्या ग्रामसुरक्षा समिती सदस्यांना कळवले असुन पुढील दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.


बीड: कोरोना बाधित रुग्णांच्या तपासणीसाठी 24 तास तपासणी स्वॅब कलेक्शन – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

बीड, दि. ४: कोरोना रुग्णांचा तपासणीसाठी 24 तास स्वॅब कलेक्शन आणि रुग्णांबाबत माहिती मिळाल्यानंतर प्रतिसाद देणारे पथक कार्यान्वित करण्यात येत असून खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी संशयित कोरोना रुग्णांची पुढील तपासणी होण्यासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात कळवणे गरजेचे आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात श्री. रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची बैठक झाली. याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला जागतिक आरोग्य संघटना (WHO) चे अधिकारी डॉ. अमोल गायकवाड , जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार आणि वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटना(आय एम ए )चे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना अमलात आणल्या जात आहेत कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना मानसिक आधार मिळावा यासाठी दूरध्वनीद्वारे आणि व्हिडिओ कॉलद्वारे नातेवाईकांशी संवाद साधण्याची फोन सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्यानंतर संसर्ग सुरक्षेच्या कारणामुळे नातेवाईकांना त्याचा थेट संपर्कात येता ठेवता येत नाही अशा स्थितीत डॉक्टर आणि परिचारिका हेच रुग्णाचे नातेवाईक आहेत, असे ते म्हणाले.

याच बरोबर बैठकीत कोरोना नियंत्रणाच्या दृष्टीने राज्यस्तरावरून समुपदेशन केंद्र स्थापित करून संबंधितास आवश्यक ती माहिती समुपदेशनाद्वारे दिली जात आहे. याच पद्धतीने बीड जिल्ह्यात देखील कार्यवाही सुरू असून याचा उपयोग वैद्यकीय व्यावसायिक आणि कोरोना बाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना देखील होत आहे. यासह विविध माहिती देण्यात आले.

डब्ल्यू एच ओ चे अधिकारी डॉ गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले कोरोना प्रादुर्भावाचा काळात देखील बालकांच्या लसीकरणाचा कार्यक्रम आवश्यक ती काळजी घेऊन शासनाकडून सुरू ठेवण्यात आलेला आहे वैद्यकीय व्यावसायिकांनी देखील बालकांचे लसीकरण वेळापत्रकानुसार होईल याची काळजी घ्यावी यामुळे त्यांच्यामधील रोगप्रतिकारशक्तीचा विकास होईल आणि कोरोना संसर्गाच्या काळात त्यांचा साथीच्या आजारात पासून बचाव होईल.

यावेळी वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटना( आय एम ए )च्या प्रतिनिधींना डब्ल्यू एच ओ च्या वतीने तयार करण्यात आला आलेली लसीकरण कार्यक्रमाबाबत ची विशेष माहिती पुस्तिका जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्या हस्ते देण्यात आली.