डॉ.बाबासाहेब आंबेडकर निवासी आश्रमशाळेचे सामाजिक भान ; संपूर्ण पाथरा गावास वाटले मास्क

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― कोरोना साथरोगाच्या संकटकाळी आपली जबाबदारी ओळखून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम समाजात काही मोजके लोक,संस्था,संघटना, आस्थापना करीत आहेत.आपल्याकडे काही नसताना ही इतरांना मदत व सहकार्य करण्याचा दातृत्वपणाचा गुण फार कमी लोकांमध्ये पहावयास मिळतो.असेच लोकहिताचे काम सातत्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर निवासी आश्रमशाळा करीत आहे.सामाजिक भान व बांधिलकी जोपासत या शाळेने संपूर्ण पाथरा गावास मास्क दिले … Read more

भाजीमंडीतील विक्रेत्यांना मिळेना फळे व भाजीपाला विक्रीची परवानगी ;शेतकरी व विक्रेत्यांचे लाखो रूपयांचे नुकसान

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― कोरोना संसर्गजन्य साथरोगाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधी वाढविण्यात आला.3 एप्रिल पासून अंबाजोगाईत भाजीमंडी बंद आहे.यामुळे छोटे शेतकरी,होलसेल विक्रेते आणि भाजीपाला व फळे विक्री करणारे 450 हातगाडीवाले यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.भाजीपाला व फळे हे नाशवंत आहेत.नुकसान झाले तर विमा संरक्षण नाही.त्यामुळे या लाखो रूपयांच्या नुकसानीची भरपाई कशी होणार हाच मोठा प्रश्न आहे.म्हणून … Read more

गरीब माणूस उपाशी झोपणार नाही,याची काळजी घेणार–जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख ; अंबाजोगाईत शिवभोजन केंद्राची सुरूवात

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चव्हाण चौक परिसरात शासकीय शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले असुन त्याचे उदघाटन बीड जिल्हा परिषद सदस्य राजेसाहेब देशमुख यांचे हस्ते करण्यात आले.उद्घाटक म्हणून बोलताना आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून अंबाजोगाई तालुक्यातील गरीब व गरजू माणसांपर्यंत शासकीय योजना आणि यंञणा प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न करीत आहोत.शक्य तिथे गरजूंना वैयक्तिकरीत्या ही मदत करीत आहे.गरीब माणूस उपाशी झोपणार नाही याची काळजी घेणार असल्याचे जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख यांनी सांगितले.

शहरातील यशवंतराव चव्हाण चौक परिसरात शनिवार,दिनांक 18 एप्रिल रोजी शासकीय शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले असुन त्याचे उदघाटन बीड जिल्हा परिषद सदस्य राजेसाहेब देशमुख यांचे हस्ते करण्यात आले.याप्रसंगी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,अंबाजोगाई कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदराव देशमुख,तहसिलदार संतोष रूईकर,मुख्याधिकारी डॉ.सुधाकर जगताप,उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे,सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव सिरसाट,अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन हणमंतराव मोरे,यशवंतराव चव्हाण चौक येथील शिवभोजन केंद्राचे संचालक काकासाहेब जामदार आणि योगेश देशमुख यांची उपस्थिती होती.यावेळी बोलताना राजेसाहेब देशमुख म्हणाले की,कोरोनाच्या संकट काळात गरजुंना शासकीय शिवभोजन केंद्र सुरू झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांच्या महाविकास आघाडीची महात्वाकांक्षी शिवभोजन योजना यापुर्वी फक्त जिल्हा स्तरांवर होती.मात्र कोरोनाच्या या संकटात गोरगरीब व गरजूंना दिलासा देण्यासाठी तालुका स्तरांवर ही योजना आता राबविण्यात येत आहे.त्यानुसार तहसिलदार, मुख्याधिकारी व गटविकास अधिकारी यांची समिती स्थापन करण्यात आली होती.या समितीने शहरात यशवंतराव चव्हाण चौक,सदर बाजार चौक व रिलायन्स पेट्रोल पंपासमोर शिवभोजन केंद्र नियुक्त केले आहेत.त्यापैकी यशवंतराव चव्हाण चौक येथील काकासाहेब जामदार आणि योगेश देशमुख यांना केंद्र सुरू करण्यास परवानगी मिळाली.या केंद्राचे आज उद्घाटन झाले आहे.लॉकडाऊन काळात परस्थितीने गांजून गेलेले लोक,हातावर पोट असलेले विविध समाज घटक यांना मोफत भोजन वितरण करण्यात येत आहे.या भोजन व्यवस्थेवर व्यक्तीश: लक्ष ठेवून आहोत.काहीही कमी पडणार नाही याची काळजी घेऊत.अंबाजोगाईत शिवभोजन मोफत योजना हा उपक्रम अतिशय चांगला व प्रभावीपणे राबविण्यात येत आहे असे सांगून शहरात शिवभोजन केंद्र सुरू झाल्याने अनेक गरजुंना आधार मिळणार असून जनसामान्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे अशी माहिती राजेसाहेब देशमुख यांनी दिली आहे.

200 लोकांच्या मोफत भोजनाचे दिले पैसे

कोरोना संकटकाळात लॉकडाऊन कालावधी वाढवल्याने समाजातील वंचित,गरीब,गरजूंना किमान मोफत भोजन मिळावे या विधायक भूमिकेतून बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्याताई सिरसाट व जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख यांनी प्रत्येकी 100 लोकांचे असे एकूण 200 शिवभोजन थाळीचे पैसे देवून शिवभोजन मोफत भोजन उपक्रमास माणुसकीच्या नात्याने मदत केली.


#CoronaVirus बीड: जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या ऊसतोड कामगारांची व्यवस्था करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे शासकीय यंत्रणांना आदेश

बीड,दि.१८:आठवडा विशेष टीम―जिल्ह्यातील मुळ रहिवाशी असलेले बहुतांशी ऊसतोड कामगार बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये व राज्यांमध्ये लॉकडाऊन मुळे अडकलेले आहेत. लाॅकडाऊन कालावधीमध्ये अडकलेल्या ऊसतोड कामगार हे आल्यांनतर या ऊसतोड कामगारांची आवश्यक व्यवस्था करण्यासाठी राहुल रेखावार, अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी, बीड यांनी संबधित शासकीय यंत्रणांना कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.
शासनाच्या 17 एप्रिल 2020 च्या सुचनांप्रमाणे लॉकडाऊन मध्ये जिल्हा बाहेर अडकलेल्या ऊसतोड कामगार आल्यांनतर शासनाचे निर्देशानुसार आवश्यक ती व्यवस्था करण्यासाठी आज हे आदेश दिले आहेत. यानुसार जबाबदारी देण्यात आलेले शासकीय प्रमुख व करावयाचे कामे, कर्मचारी यांचे तपशीलवार विभागणी केली आहे
या आदेशानूसार ऊसतोड कामगार आलेल्या मूळ संबधित गांवाचे सरपंच यांनी आपल्या गावामध्ये बाहेरच्या जिल्हयामधून येणारे ऊसतोड कामगारांना ओळख पटवून प्रवेश देणे. इतर गावातील कोणत्याही व्यक्तीला प्रवेश न देणे. अशा संभाव्य मजूरांची संख्या विचारात घेता त्यांना त्यांच्या स्वत:च्या किंवा इतरांच्या शेतावर राहण्यासाठी पाठविणे. अशी व्यवस्था होऊ न शकल्यास गावातील शाळेमध्ये राहू देणे, परंतु कोणत्याही परिस्थितीत त्यांना त्यांच्या घरात, गावठाणामध्ये राहू न देणे. सदर कामगार गावी पोहचल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावयाचे असून सदर कामगार गावात आल्यानंतर त्यांच्या परिवारामार्फत भोजन व्यवस्था करुन द्यायची आहे.
संबधित गावांचे ग्रामसेवक यांनी सदर मजूरांच्या निवासाच्या ठिकाणी शुध्द पिण्याचे पाणी पुरवठा, विदुयत पुरवठा, शौचालय, स्वच्छता इतर आवश्यक सोईसुविधा पुरविणे. तसेच किराणा सामान,भाजीपाला त्यांच्या पर्यंत पोहचविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे.
संबंधित गावचे तलाठी यांनी ग्राामसेवक, ग्रामपंचायत व गावपातळीवरील इतर कर्मचारी यांचेशी समन्वय साधून ऊस तोड कामगारांना दयावयाचे सर्व सुविधांची खात्री करणे. सदर मजूरांना अनुज्ञेय धान्य पुरवठा स्वस्त धान्य दुकानदारामार्फत करणे.
संबधित गावांची अंगणवाडी सेविका यांनी आपल्या गावामध्ये इतर जिल्हयातून ऊसतोड कामगार हे गावात आल्यानंतर त्यांना कोवीड-19 च्या अनुषंगाने समुउपदेशन व माहिती करुन देणे व अंगणवाडीच्या सर्व सेवा पुरविणे.
तसेच आशा सेविका व आरोग्य सेवक यांनी गावातील प्रत्येक सर्व अशा मजूरांची रोज एकदा तपासणी प्रत्यक्षपणे करुन सदर मजूरांमध्ये ताप, सर्दी,खोकला, श्वसनाचा त्रास व न्यूमोनियासारखे लक्षणे आढळून येणाऱ्या व्यक्तीची प्राथमिक माहिती घेवून तात्काळ संबंधित वैदकीय अधिकारी यांना कळविणे. सदर मजूरांपैकी महिला, गरोदर महिला, लहान मुले यांची आरोग्य विषयक विशेष काळजी
घेणे. कोवीड-19 च्या अनुषंगाने समुपदेशन करायचे आहे
संबधित गावाचे पोलीस पाटील व पोलीस कर्मचारी यांनी सदर ऊसतोड कामगार आपल्या गावामध्ये आल्यानंतर क्वारंटाईन कालावधी संपेपर्यत रहिवासाच्या ठिकाणाहून इतरत्र जाणार नाहीत व इतर लोकांच्या संपर्कात ते कोणत्याही परिस्थितीत किंवा कोणत्याही कारणाने येणार नाहीत याची खात्री करणे. याकामासाठी सरपंच,ग्रामसेवक,तलाठी व गावातील सर्व कर्मचारी आणि व्यक्तींनी सहकार्य करणे बंधनकारक आहे.
संबंधित गावातील कृषी सेवक, मंडळ कृषी अधिकारी यासह संबंधित इतर सर्व विभागाचे अधिकारी |यांनी ऊसतोड कामगार हे गांवात आल्यानंतर विहित कालावधीसाठी क्वारंटाईन असल्याने त्यांच्याशी स्वत:हून संपर्क साधून शासनाच्या विभागांमार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची अंमलबजावणी करुन लाभ उपलब्ध करुन दयावेत.
सदरील मजूरांना ज्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे, त्या ठिकाणी आवश्यक साहित्य उदा.( किराणा,भाजीपाला इ.) उपलब्ध होईल अशी सुविधा करण्यात द्यावी,
कोवीड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन जसे मास्कचा वापर, वारवार हात धुणे, सामाजिक अंतराचे पालन, एकच वस्तू अनेक व्यक्ती हाताळत असल्यास हात धुणे इ. उपाययोजनाचा व शासनाचे निर्देशांचे पालन करावे. तसेच सदर मजूरांना अन्य ठिकाणाहून जेवणांचा डबा येत असल्यास सदरचा डबा स्वच्छ धवन उन्हामध्ये वाळवून तदनंतरच परत घेवून जाणाऱ्या व्यक्तींना देण्यात यावा, या व्यक्तींनी हाताळलेल्या वस्तू (उदा. कपडे,भांडी, इ.) इतर व्यक्तींनी हाताळू नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
विस्तार अधिकारी यांचे मार्फत उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे। गाव पातळीवर व ग्रामविकास विभागाचा कामावर नियंत्रण राहणार आहे संबधित गावांचे तलाठी यांनी याबाबत दैनंदिन कार्यवाहीवर नायब तहसिलदार महसूल यांचे मार्फत उपजिल्हाधिकारी रोहयो नियंत्रण ठेवणार आहेत.
यासह जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व आदेश, सुधारणा आदेश, नियमावलली तरतुदीनुसार गर्दी टाळण्यासाठी तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(1) (3) अन्वये मनाई आदेशाचे उल्लंघन होव नये यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. या आदेशांची अवाज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने भारतीय दंडसंहिता 1860 (45) याच्या कलम 188 शिक्षेसपात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल असे निर्देशीत केले आहे.


अंबाजोगाई: भगवंत भवनच्या अन्नछञाद्वारे 2500 हुन अधिक गरजू लोकांपर्यंत पोहचले ‘आपुलकीचे जेवण’

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये हातावर पोट असणारे कामगार,स्वच्छता कर्मचारी,परिचारिका,ज्येष्ठ नागरीक,बाहेरगावाचे विद्यार्थी,प्रवासी यांना जेवण मिळावे या हेतूने 1 एप्रिल पासून शहराच्या विविध भागांतील लोकांना मोफत भोजन व फूड पॅकेटचे वाटप केले जात आहे.भगवंत भवनच्या अन्नछञाद्वारे राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमातून आजपर्यंत 2500 हून अधिक गरजूंना ‘आपुलकीचे जेवण’ देण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत कोणताही नागरिक … Read more

राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्काराने विद्याधर पंडीत सन्मानित

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ,पुणे यांच्या वतीने दिला जाणारा “राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्कार” अंबाजोगाई येथील विद्याधर पंडीत यांना नुकताच प्रदान करण्यात आला.सदरील पुरस्कार मिळाल्याबद्दल चिञकार विद्याधर पंडित यांचे सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे. कोकणातील सिंधुदुर्ग येथे महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ,पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्हा कलाध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच 41 वी राज्य … Read more

बीड: शेतकऱ्याच्या मुलाची पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी ; रवी मुंडे यांची मंडल कृषी अधिकारी पदासाठी निवड

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― तालुक्यातील मौजे अंबलटेक येथील शेतकरी कुटुंबातील रवि विष्णु मुंडे या तरूणाने पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत यश संपादन केले.मंडल कृषी अधिकारी म्हणुन ते गुरूवारी गेवराई येथे रूजू झाले आहेत. महाराष्ट्राच्या लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या मंडल कृषी अधिकारी पदासाठीच्या परिक्षेत रवि विष्णु मुंडे हे पात्र ठरले.त्यांना बीड जिल्ह्यातील गेवराई … Read more

#Breaking: पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या ‘स्त्री जन्माच्या’ आवाहनाला प्रतिसाद

भगवान भक्तीगडावर झाले लेकीच्या जन्माचे स्वागत ; खा.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते मिसाळ दांम्पत्यानी बांधला कन्येला धागा बीड.दि.०२:आठवडा विशेष टीम―समाजात स्त्री जन्माविषयी वेगवेगळ्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करणा-या भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांनी सावरगांवच्या भगवान भक्तीगडावरून केलेल्या आवाहनाला जन माणसातूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा प्रत्यय नुकताच आला. पाटोद्याच्या मिसाळ दाम्पत्यांने पोटी जन्मलेल्या लेकीला खासदार डाॅ प्रितमताई … Read more

अंबाजोगाई: स्व.प्रमोदजी महाजन आधार व मदत केंद्राद्वारे समाजातील गरजुंना मदत

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― तालुक्यातील कोळकानडी येथे स्व.प्रमोदजी महाजनसाहेब आधार व मदत केंद्राद्वारे सामाजिक कार्यकर्ते सुनिल बापु धिमधिमे हे समाजातील गरजू लोकांना मदत करीत आहेत. समाजातील निराधार,विधवा, परिक्त्यक्ता,महिलांना मदत व सहकार्य करून समाजासमोर चांगला पायंडा धिमधिमे यांनी पाडला आहे.त्यांच्या वतीने करण्यात येणार्‍या कामाच्या माहिती पत्रकाचे विमोचन प्रसंगी बोलताना बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब … Read more

गोरक्षण शाळा वरवटी व जनमित्र सेवा संघ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ; 11 मे शनिवार रोजी आरोग्य कल्प संस्कार शिबिराचे आयोजन

अंबाजोगाई (प्रतिनिधी): आपल्या मुलांना आयुर्वेदिक विधीने निरोगी व सशक्त बनवण्यासाठी तसेच आजची लहान बालके ही देशाचे भविष्य आहेत म्हणून त्यांना शारीरीक,मानसिक, बौद्धिक रुपाने सुदृढ बनवण्यासाठी व त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी श्री.संत भगवान बाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित गोरक्षण शाळा वरवटी व जनमित्र सेवा संघ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार,दि.11 मे रोजी आरोग्य कल्प संस्कार शिबिराचे … Read more

सत्ता प्राप्तीसाठी बहुजन समाजाकडे हवी राजकीय साक्षरता―प्रा.डॉ.यशपाल भिंगे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जाहिर व्याख्यान अंबाजोगाई (प्रतिनिधी):अंबाजोगाई हे चळवळींचे माहेर घर आहे.या शहराने चळवळींना दिशा देण्याचे काम व नेतृत्व घडविण्याचे सातत्याने प्रयत्न केले आहेत. प्रस्थापित व्यवस्थेने बहुजन समाजात जो न्युनगंड निर्माण केला आहे.की,राजकारण हे चांगल्या व्यक्तींचे क्षेत्र नाही.तो सर्वार्थाने चुकीचा समज आहे. सत्ता प्राप्तीसाठी बहुजन समाजाकडे राजकीय साक्षरता हवी,सक्षम वैचारिक वारसा असलेले लोक यापुढे … Read more

अंबाजोगाईच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाची धारावती तांडा येथे मोठी कारवाई ; 70 हजार रुपयांची दारू केली नष्ट

अंबाजोगाई दि.०७ (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यात परळी तालुक्यातील धारावती तांडा परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या हातभट्टी केंद्रांवर रविवार,दि.7 एप्रिल रोजी राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभाग निरीक्षकांच्या पथकाने धाड टाकून तब्बल 70 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो जागेवरच नष्ट केला असल्याची माहीती प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली.

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे.त्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी अवैध हातभट्टी केंद्रांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गेल्या दोन महिन्यांपासून वतीने धाडी टाकण्यात येत आहेत.आता पर्यंत सात ते आठ लाख रूपयांचा
मुद्देमाल जप्त करून तो जागेवरच नष्ट केला. तसेच अनेकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले.याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचे सुचनेनुसार व राज्य उत्पादन शुल्क बीडचे अधिक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली परळी (वै.) तालुक्यातील धारावती तांडा व परिसरात हातभट्टी दारू केंद्रांवर गोपनीय माहितीच्या आधारे धाड टाकण्यात आली.यात दारू तयार करण्याचे 3 हजार लिटर रसायन,80 लिटर हातभट्टी दारू,15 बॅरल यासह एकुण मिळून सुमारे 70 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो तात्काळ जागेवरच नष्ट करण्यात आला.या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभागाचे प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड,दुय्यम निरीक्षक ए.एन.पिकले, कॉन्स्टेबल बी.के.पाटील, आर ए. जारवाल व वाहनचालक के.एन.डुकरे यांनी सहभाग घेतला.


अंबाजोगाई पिपल्स बँकेकडे मार्च 2019 अखेर 345 कोटींच्या ठेवी आणि 2 कोटींचा नफा―चेअरमन राजकिशोर मोदी यांची माहिती

अंबाजोगाई (प्रतिनिधी) दि.०७: मराठवाड्यातील सहकार क्षेत्रात वेगाने प्रगतीकडे झेपावणा-या अंबाजोगाई पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेकडे 31 मार्च 2019 अखेर सुमारे 345 कोटी 92 लाख रूपयांच्या ठेवी आणि बँकेस 2 कोटी 5 लाख रूपयांचा निव्वळ नफा झाला आहे. बँकेच्या मुख्य कार्यालयासह 16 शाखा व व दोन विस्तारीत कक्ष असा विस्तार झाला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी यांनी … Read more

“पाणी,आरोग्य आणि स्वच्छता” या विषयीची जाणीव बालवयापासुनच होणे गरजेचे-सौ.मंगलाताई सोळंके

समाजासमोरील मुलभूत समस्या संपल्याशिवाय विकास अशक्य-संदीप बर्वे

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र

अंबाजोगाई (प्रतिनिधी): पाण्याचे दुर्भिक्ष्य यामुळे ग्रामिण भागात महिलांची फरफट होते पाणी फाऊंडेशन सारख्या संस्थांमुळे गेल्या काही वर्षात जनजागृती होत आहे.तरी परंतु पाणी, आरोग्य आणि स्वच्छता या विषयीची जाणीव बालवयापासुन निर्माण होणे गरजेचे आहे. शासकीय योजना ग्रामिण भागापर्यंत पोहोंचवताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे त्या हव्या तशा जनतेपर्यंत वेगाने पोहोंचत नाहीत. परिणामी योजनांचा लाभ जनतेला मिळत नाही असे प्रतिपादन सौ.मंगलाताई प्रकाशराव सोळंके यांनी केले.तर यावेळी बोलताना संदीप बर्वे यांनी स्त्री ही गुलाम आहे असे मनुस्मृतीने वेळोवेळी सांगितले आहे.महिलेला स्वातंत्र्य मिळू नये अशी व्यवस्था निर्माण करण्यात आली. त्यामुळे भारतीय समाजाने महिलेला दुय्यमत्व दिले असल्याचे सांगुन ज्या देशाने स्त्रीयांना समान हक्क दिले ते देश आजप्रगती करीत आहेत.जोपर्यंत महिला परिवर्तनाच्या चळवळींचे नेतृत्व करीत नाहीत तोपर्यंत अमुलाग्र बदल होणार नाही असे प्रतिपादन बर्वे यांनी केले.यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात दोन्ही मान्यवर बोलत होते.

येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात “स्त्रियांसमोरील पाणी, आरोग्य आणि स्वच्छता विषयक आव्हाने व शासकीय योजना” या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन मंगळवार,दि. 26 मार्च रोजी करण्यात आले होते.चर्चासत्राचे उद्घाटन सौ.मंगलाताई प्रकाशराव सोळंके यांच्या हस्ते करण्यात आले.या चर्चासत्रात 200 पेक्षा अधिक महिलांनी तसेच सदरील विषयाचे अभ्यासक, संशोधक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.अशोक मोहेकर हे होते.यावेळी प्रास्ताविक करताना “पाणी,आरोग्य आणि स्वच्छता” या संबंधी समाज व इतर घटकांमध्ये जागृती झाली पाहिजे असा या चर्चासत्राचा विधायक उद्देश असल्याचे प्राचार्या डॉ. वनमाला रेड्डी यांनी सांगितले व भूमिका विषद केली.या चर्चासत्रात सामाजिक कार्यकर्त्या मनिषाताई तोकले (बीड),संदीप बर्वे(पुणे),डॉ.शुभदाताई लोहिया (अंबाजोगाई), अ‍ॅड.शोभाताई लोमटे, प्राचार्य डॉ.सविताताई शेटे,प्राचार्य डॉ.अण्णासाहेब जाधव,अभियंता बडे,
सामाजिक कार्यकर्ते अनिकेत लोहिया आदी मान्यवरांनी सहभाग नोंदवला.
प्रारंभी लोकनेते यशवंतराव चव्हाण व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.संतोष शिंदे या विद्यार्थ्याने स्वागतगीत सादर केले. या प्रसंगी महाविद्यालय विकास समितीच्या सदस्य श्रीमती प्रतिभा देशमुख, उपप्राचार्य प्रा.कांतराव गाडे,उपप्राचार्य प्रा.भगवान शिंद चर्चासत्र संयोजक डॉ.अहिल्या बरूरे यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटन सत्राचे सुत्रसंचालन प्रा.शैलेश जाधव यांनी करून उपस्थितांचे आभार चर्चासत्र संयोजिका डॉ.अहिल्या बरूरे यांनी मानले.चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी डॉ.डी.बी.तांदुळजेकर, डॉ.मुकुंद राजपंखे, डॉ.दिलीप भिसे, डॉ.अरविंद घोडके, प्रा.इंद्रजीत भगत, प्रा.केशव हंडीबाग, प्रा.पी.के.जाधव, प्रा.सुजाता पाटील, प्रा.रोहिणी खंदारे, प्रा.मनोरमा पवार, प्रा.हिरा नाडे, प्रा.चव्हाण मॅडम, प्रा.देशपांडे मॅडम, प्रा.सोळंके मॅडम, अधिक्षक लक्ष्मण वाघमारे यांच्यासह महाविद्यालयातील संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांनी सहकार्य केले.


अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कै.आण्णासाहेब पाटील यांना बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन

अंबाजोगाई (प्रतिनिधी): अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष,माथाडी कामगारांचे आराध्य दैवत व मराठा आरक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलीदान देणारे कै.आ.अण्णासाहेब पाटील यांना त्यांच्या 37 व्या पुण्यतिथीनिमित्त बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.

अंबाजोगाई शहरातील आण्णसाहेब पाटील चौकातील नामफलकाला पुष्पहार अर्पण करून बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी विनम्र अभिवादन केले.या प्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष राणा चव्हाण,नगरसेवक अमोल लोमटे, नगरसेवक सुनिल व्यवहारे,नगरसेवक धम्मा सरवदे,योगेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन माणिकराव वडवणकर, सुधाकर टेकाळे, जावेद गवळी,महेबुब गवळी,दिनेश घोडके, भारत जोगदंड,शेख मुक्तार,अशोक देवकर,
शिवाजी कांबळे,बापू कदम,सोशल मीडियाचे शरद मोरे आदींसहीत कार्यकर्ते व पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.

कै.अण्णासाहेब पाटलांनी माथाडी कामगारांसाठी आयुष्य समर्पित केले -राजकिशोर मोदी

अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा मराठा आरक्षण लढ्याचे जनक म्हणुन ओळखले जाणारे कै.आ. आण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांसाठी आपले आयुष्य समर्पित केले. त्यांचे कार्य महाराष्ट्र कदापिही विसरणार नाही.आरक्षणासाठी व माथाडी कामगारांसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे आग्रणी नेते म्हणुन त्यांच्याकडे पाहिले जाते.त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.


‘छत्रपती शिवाजीराजे राष्ट्रीय क्रिडा सन्मान’ पुरस्काराने प्रा.राहुल चव्हाण सन्मानित

अंबाजोगाई (प्रतिनिधी)दि.14: येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर महाविद्यालयातील क्रिडा विभागप्रमुख प्रा.राहुल मोहन चव्हाण यांना नांदेड येथील विकली जनअध्ययन संस्थेच्या वतीने सन 2019 चा ‘छत्रपती शिवाजीराजे राष्ट्रीय क्रिडा सन्मान पुरस्कार‘ प्रदान करण्यात आला.

प्रा.राहूल चव्हाण हे क्रिडा क्षेत्रात करीत असलेले उत्कृष्ट कार्य तसेच क्रिडा क्षेत्रात त्यांनी सातत्याने नवनवे खेळाडू तयार केले.हे खेळाडू आज संस्थेचे व अंबाजोगाईचे नांव उज्ज्वल करीत आहेत. त्यामुळे चव्हाण देत असलेल्या अमुल्य व विशेष योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना 3 फेब्रुवारी 2019 रोजी जाहीर झाला होता. सोमवार,दि.11 मार्च रोजी विशेष सोहळ्यात सदरील पुरस्कार प्रा.राहुल चव्हाण यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल गुरूवार, दि.14 मार्च 2019 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांच्या हस्ते व उपप्राचार्य डॉ.मुकुंद देवर्षी,डॉ.बी.व्ही.मुंडे, प्रा.अजय चौधरी, प्रा.सुहास डबीर, पर्यवेक्षक प्रा.डॉ.रविंद्र कुंबेफळकर,प्रा.प्रल्हाद तावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राध्यापक कक्षात त्यांचा सत्कार करण्यात आला.
सदरील पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा.राहूल चव्हाण यांचे भा.शि.प्र. संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलुरकर,कार्यवाह नितीन शेटे,कोषाध्यक्ष विनायकराव पोखरीकर, स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.किशोर गिरवलकर, कार्यवाह बिपीन क्षीरसागर, महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष राम कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे आदींनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.