रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई योगेश्वरीच्या वतीने गुणीजनांचा सन्मान

अंबाजोगाई (प्रतिनिधी)दि.१४: येथील रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई योगेश्वरीच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे,पुरस्कार प्राप्त मान्यवर तसेच नगर परिषद अंबाजोगाई यांचा सन्मान करण्यात आला.

येथील नगर परिषदेच्या मिटींग हॉल मध्ये सोमवार,दि.11 मार्च रोजी आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ.पृथ्वीराज साठे तर प्रमुख पाहुणे व सत्कारमुर्ती बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, पं.उद्धवबापु आपेगावकर, शिवाजीराव खोगरे, अ‍ॅड.व्यंकटराव मोरे, अ‍ॅड.कल्याण लोमटे, अ‍ॅड.संतोष पवार, अ‍ॅड.राजेभाऊ लोमटे, अ‍ॅड.बी.डी.अंबाड, ज्योती शिंदे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.या प्रसंगी पाच राज्यातून नाविण्यपुर्व उपक्रम उत्कृष्ठ रित्या राबविल्याबद्दल नगर परिषदेला प्रथम क्रमांक प्राप्त झाला.या करिता राजकिशोर मोदी यांचा तसेच उद्धवबापु आपेगावकर यांना “स्वाती तिरोनाल” हा पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल शिवाजीराव खोगरे व नवनियुक्त नोटरी म्हणुन नियुक्ती झाल्याबद्दल अ‍ॅड.व्यंकटराव मोरे, अ‍ॅड.कल्याण लोमटे, अ‍ॅड.संतोष पवार, अ‍ॅड.राजेभाऊ लोमटे, अ‍ॅड.बी.डी.अंबाड यांचा तसेच उत्कृष्ठ सुत्रसंचालन व शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल ज्योती शिंदे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी राजकिशोर मोदी यांनी यावेळी आपल्या मनोगतात योगेश्वरी रोटरी क्लबला अडचण येईल तेथे मदत करण्याचे आश्वासन दिले.तर यावेळी सत्काराला अ‍ॅड.संतोष पवार,उद्धव बापु आपेगावकर,पद्माकर सेलमुकर यांनी उत्तर दिल.तर अध्यक्षीय समारोप करताना माजी आ.पृथ्वीराज साठे यांनी सांगितले की, रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई योगेश्वरी हा सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे.विधायक कार्य करून या क्लबने समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाईचे अध्यक्ष पांडुरंग पाखरे यांनी केले.तर बहारदार सुत्रसंचालन ज्योती शिंदे यांनी करून उपस्थितांचे आभार माजी अध्यक्ष श्रीरंग चौधरी यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष पांडुरंग पाखरे, सौ.यमुनाबाई पाखरे, धनराज मोरे,श्रीरंगआबा चौधरी,एस.बी.सय्यद, अनंतराव चाटे, अ‍ॅड.अनंतराव जगतकर,सुर्यकांत बन, पुरूषोत्तम वाघ, धैर्यशील गायकवाड, भागवत कांबळे,डॉ. दामोधर थोरात,मनोहर कदम, बी.व्ही.चव्हाण, पद्माकर सेलमुकर, वामनराव जोशी,अनंत निकते,अनंतराव पाखरे, परमेश्वर करपे, विठ्ठलराव कदम आदींनी पुढाकार घेतला.


राष्ट्रीय परिषदेत खोलेश्वर महाविद्यालयाने पटकावले भित्तीपत्रक स्पर्धेचे पारितोषिक

अंबाजोगाई (प्रतिनिधी)दि.१३: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,उपकेंद्र उस्मानाबाद येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने सोमवार,दि.11 व मंगळवार,दि.12 मार्च 2019 रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते सदर राष्ट्रीय परिषदेचा विषय “Recent Trends in Microbial Technology” असा होता ह्या राष्ट्रीय परिषदेसाठी खोलेश्वर महाविद्यालयातील ओंकार जोशी,ममता परिहार,योगीता देशमुख,संदीप वायगावकर,कोमल बन,पल्लवी कापरे, शुभम गिरी,ऋषिकेश जाधव या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग … Read more

यशवंतराव चव्हाण हे सुसंस्कृत राजकारणी होते―दगडू लोमटे

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात व्याख्यान अंबाजोगाई (प्रतिनिधी)दि.१३: आजच्या राजकीय परिस्थितीचा वेध घेताना यशवंतराव चव्हाण यांचे नैतिक,स्वच्छ राजकारण हे उठून दिसते त्यांच्या ठायी असणारा सुसंस्कृतपणा, अभ्यासुवृत्ती, व्यासंगीपणा,साहित्य, संगीत,क्रीडा आदींसहीत विविध क्षेञाची माहीती व आवड.तसेच या क्षेत्राला सातत्याने पाठबळ देण्याची त्यांची भूमिका यामुळे त्यांचे व्यक्तीमत्व हे संवेदनशील व त्यांचे नेतृत्व हे परिपक्व होण्यास मदत झाली असे प्रतिपादन सामाजिक … Read more

१९ मार्च रोजी रा. स्व.संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या हस्ते अंबाजोगाईत ‘माणिक-मोती’ ग्रंथाचे प्रकाशन-माजी प्राचार्य डॉ.अ.द.पत्की व बिपीन क्षीरसागर यांची माहिती

अंबाजोगाई (प्रतिनिधी) दि.10: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा.सरकार्यवाह भय्याजी जोशी हे मंगळवार,दि.19 मार्च रोजी अंबाजोगाईत येत असून त्यांच्या हस्ते स्व. मा.मा.क्षीरसागर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणा-या ‘माणिक-मोती’ या स्मृतीग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. अशी माहिती माजी प्राचार्य डॉ.अ.द.पत्की व बिपीन क्षीरसागर यांनी दिली आहे. या प्रसंगी पद्मभुषण आदरणीय डॉ.अ.ल. कुकडे (पुर्व संघचालक, पश्चिम क्षेत्र),मधुकरराव जाधव (प्रांतसंघचालक, देवगिरी प्रांत) … Read more

बेघरांना घरे, मजुरांना काम,जॉब कार्ड व अन्नसुरक्षा द्या―कॉ.बब्रुवाहन पोटभरे

उपविभागीय कार्यालयासमोर शेकडो बेघर मजुरांचे बेमुदत धरणे आंदोलन अंबाजोगाई (प्रतिनिधी) :शहर व परिसरात राहणारा शिकलकरी समाज व वंचित घटकातील गोर-गरीब लोक यांना अंबाजेागाई येथील सरकारी जमिनीवर स्थलांतरीत करून कायमचे घर देण्यात यावे,जॉब कार्ड,मजुरांना काम द्यावे व अन्न सुरक्षा देण्यात यावी या व इतर मागण्यांसाठी जातीअंत संघर्ष समिती, अंबाजोगाई प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. विविध निवेदने,अर्ज, … Read more