राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखेर विरोधीपक्षनेते पदाचा राजीनामा दिला ; राहुल गांधींनी राजीनामा स्वीकारल्याची माहिती

अहमदनगर: काँग्रेस(आय) चे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखेर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा स्वीकारला असल्याचे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. शिर्डीमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला मोठा धक्का बसला असून आता विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेस कुणाची वर्णी लावणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात टीकास्त्र सोडल्यानंतर विखे पाटील यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केले होते.त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा चालू आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राधाकृष्ण विखे पाटील भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार असल्याचे राजकीय सुत्रांमार्फत समजते आहे.

पालघर लोकसभा मतदार संघात 31 अर्ज वैध ; सचिन शिंगडा यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला

पालघर दि.१०: पालघर लोकसभा मतदारसंघात दाखल झालेल्या ३२ अर्जांची आज छाननी करण्यात येऊन त्यापैकी ३१ अर्ज वैध ठरवण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे.

सचिन दामोदर शिंगडा यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने दाखल केलेला उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


भाजपा सेना महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्यावरील आक्षेप फेटाळला

पालघर लोकसभेतील भाजपा-सेना महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत शासकीय निवासस्थानांची थकबाकी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र जोडले नसल्याचे कारण देऊन अपक्ष उमेदवार सचिन शिंगडा यांनी बुधवारी छाननी दरम्यान आक्षेप नोंदवला होता. मात्र हा आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला.
दरम्यान या आक्षेपाबाबतचा निर्णय बुधवारी उशिरा जाहीर करण्यात आला.

अशोक चव्हाण राजीनामा देणार का ? ; क्लिप व्हायरल

मुंबई (वृत्तसंस्था) : स्वतः काँग्रेस(आय)चे महाराष्ट्रराज्य प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहेत. पक्षात कोणि ऐकत नसल्याने चव्हाण राजीनाम्याच्या मनस्थितीत असल्याचं सांगण्यात येत आहे. अशोक चव्हाण यांची चंद्रपुरातल्या कार्यकर्त्यांसोबतची ऑडिओ क्लिप वायरल झाली आहे. त्यावरुन अशोक चव्हाण अंतर्गत गटबाजीमुळे वैतागल्याचे दिसून येत आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे खा. अशोक चव्हाण हे नाराज असून ते राजीनाम्याच्या … Read more