वाघिरा:आठवडा विशेष टीम― स्वातंत्र्यानंतर ७२ वर्षे होऊनही बीड जिल्ह्यातील रस्ता न पाहिलेले मेंगडेंवाडी हे एकमेव गाव असेल, वारंवार लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला वारंवार लेखी निवेदन देऊनही कायम दुर्लक्ष करणा-या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या निषेधार्थ आज दि, २५ ऑक्टोबर रोजी दस-यादिवशी या संवेदनाहीन लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या निषेधार्थ वाघिरा साठवण तलावात लक्षवेधी आंदोलन करण्यात येऊन मागणी मान्य न झाल्यास विभागीय आयुक्त कार्यालय समोर आंदोलनाचा इशारा डॉ.गणेश ढवळे , सरपंच ज्ञानोबा जगदाळे, बाबासाहेब शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.
पाटोदा तालुक्यातील मौजे वाघिरा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत वाघिरा ते मेंगडेंवाडी रस्ता दुरावस्थेत असुन मेंगडेंवाडी येथील शेतकरी, शाळकरी मुले, दुधधारक, भाजीपाला वितरक यांना पावसाळ्यात गुडघाभर वाघिरा साठवण तलावातील पाण्यातुन आवक जावक करावी लागते, रस्ता नसल्याने मोटार सायकल, चारचाकी वाहनांना तलावाच्या भिंतीवरून ये-जा करावी लागते, मोठ्या प्रमाणावर चिखल असल्यामुळे अपघाताचे प्रमाणात वाढ झाली आहे, बाळंतीण, साप चावलेले रुग्ण यांना दवाखान्यात नेताना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते ,शाळकरी मुलांना शाळा बुडवावी लागते त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते आहे,या प्रकरणी माजी आमदार साहेबराव दरेकर, माजी आमदार भिमराव धोंडे,माजी राज्यमंत्री व सध्याचे विधानपरिषद सदस्य आहेत, सुरेश आण्णा धस, आ.बाळासाहेब आजबे , माजी ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री बीड पंकजाताई गोपिनाथरावजी मुंडे आणि दि, १७/०२/२०२० रोजी मुंबईत जाऊन धनंजय मुंडे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी निवेदन ग्रामस्थांनी दिलेले आहे. तरीही वारंवार लोकप्रतिनिधी व जिल्हा व तालुका स्तरावर तहसील प्रशासनाला वारंवार निवेदनाद्वारे मागणी करून सुद्धा प्रश्न न सुटल्याने डॉ, गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली दि, २५/१०/२०२० रोजी वाघिरा साठवण तलावात उतरून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. मंडळ अधिकारी राख यांना निवेदन देण्यात आले.यावेळी प्रशांत कदम, राजेभाऊ कदम, भिमराव बांगर, सुरेश शिंदे, दिलीप जाधव, श्रीहरी आरगुडे, हनुमान शिंदे, विनोद बोबडे, अमोल मेंगडे, शहादेव जगदाळे, चंद्रसेन कळसुले, माधव रांजवण, जगन्नाथ बोबडे, लक्ष्मण जाधव, अमोल मेंगडे आदी उपस्थित होते.
पंकजाताई मुंडे व धनंजय मुंडे दोन्ही पालकमंत्र्यांनी न्याय दिलाच नाही, बोगस रस्ते कामासाठी कोट्यावधींचा निधी मात्र मेंगडेंवाडी साठी निधी नाही –डॉ.गणेश ढवळे
पंकजाताई मुंडे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री बीड असताना ब्रम्हगाव ते मुगगाव ते सावरगाव घाट (भक्तीगड) या ८ किमी रस्त्याच्या दुरूस्तीसाठी ४ कोटी ४३लाख रू निधी मंजूर करून उपलब्ध करून दिला, २महिन्यातच या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाचे पितळ उघडे पडले, खडी उघडी पडली, साईडपट्ट्या मुरूमाऐवजी काळ्या मातीने भरलेल्या आहेत, खडी उघडी पडल्याने वाहने घसरून अपघाताचे प्रमाणात वाढ झाली आहे, याविषयी लेखी तक्रार करूनही प्रशासन कारवाई करत नाही याचवेळी मेंगडेंवाडी सारख्या गावात रस्ता देण्यासाठी निधीचा अभाव असल्याची कारणे दिली जातात, सध्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड ना, धनंजय मुंडे यांना मेंगडेंवाडी ग्रामस्थांनी मुंबईत मंत्रालयात जाऊन लेखी निवेदन दिले परंतु अद्याप न्याय मिळालाच नाही.