कन्हैया कुमार निवडणूकीच्या रिंगणात उतरल्यापासून भाजपाला पराभव दिसू लागला आहे का ?

मुंबई: देशात भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यापासून सरकारने बेरोजगारी,शेतकऱ्यांच्या प्रश्नांना कायम बाजूला ठेवल्याचे औचित्य साधून,बेरोजगारीच्या प्रश्नावर आवाज उठवत जेएनयु चे माजी विद्यार्थी नेते कन्हैया कुमार आता बेगूसराय लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.कन्हैया यांचे प्रतिस्पर्धी गिरीराज सिंह भारतीय जनता पार्टी तर्फे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. कायमच चर्चेत असलेले कन्हैया कुमार भारतीय जनता पार्टी च्या उमेदवाराचा पराभव … Read more

कन्हैया कुमार ‘बेगुसराय’ मतदारसंघातून भाकप कडुन निवडणूक लढवणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा (जेएनयू दिल्ली) माजी विद्यार्थी तसेच एआयएसएफ या विध्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार आता निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. कन्हैया कुमार बिहारच्या ‘बेगुसराय’ मधून लोकसभा निवडणूक लढवणार असून, भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून (भाकप-CPI) उमेदवारी देण्यात आली आहे.

बिहारमध्ये महाआघाडी करण्यासाठी मागील काही दिवसांपासून जोरदार हालचाली चालू होत्या. त्यातच कन्हैया कुमारला महाआघाडीकडून उमेदवारी देण्यात आली नव्हती.भारतीय कम्युनिस्ट पक्षाने त्याला उमेदवारी दिली आहे. याबाबतची घोषणा बिहार राज्यचे सचिव सत्यनारायण सिंह यांनी केली. कन्हैया कुमार बेगुसराय लोकसभा मतदारसंघातुन निवडणूक लढविणार असल्याने या मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विशेष म्हणजे,कन्हैया कुमारने जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील निवडणुकांमध्ये यशस्वी राजकीय वाटचाल केली होती.त्यामुळे त्याची तरुणांमध्ये राजकीय युथ आयकॉन म्हणून ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे आता त्याला इतर डाव्या पक्षांचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात असल्याचे सूत्रांकडून कळते.

राष्ट्रीय जनता दलाचे तन्वीर हसन आणि सतत वादग्रस्त वक्तव्य करून नेहमी फोकसला असणारे भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री गिरिराज सिंह यांच्याशी कन्हैया कुमारला सामना करावा लागणार आहे.