बीड जिल्ह्यात आज २ महिला कोरोना पॉझिटिव्ह ; धारूर तालुक्यातील आंबेवडगाव येथील रुग्ण

बीड दि.६:आठवडा विशेष टीम― जिल्ह्यातून आज शनिवारी पाठवण्यात आलेल्या ५३ स्वॅबपैकी २ पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. धारूर तालुक्यातील आंबेवडगाव येथील आणि मुंबई वरून आलेल्या असलेल्या दोघांचा त्यात समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. ३२ व २५ वर्षे दोन्ही महिला- रा.आंबेवडगाव ता.धारूर – मुंबईहून आलेले अशी आजच्या कोरोनाग्रस्थाची माहीती आहे.

५३ पैकी २ पॉझिटिव्ह तर ४७ निगेटिव्ह आले असून उर्वरित ४ अनिर्णित असल्याचे प्रशासनाने सांगितले. यापूर्वीही आंबेवडगाव येथे १ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला होता.सर्वांनी सोशल डिस्टन्स ,साबणाने हात धुणे ,मास्क लावून बाहेर पडणे इत्यादीचे कोरोनापासून बचावासाठी पालन करणे गरजेचे आहे.

राज्यातील ९० टक्के ऊसतोड मजुर परतीच्या वाटेवर ; बीड जिल्ह्यात १८ हजार ऊसतोड मजूर आतापर्यंत गावी पोहचले !

उर्वरित मजूर येत्या दोन दिवसात आपापल्या गावी पोचतील – धनंजय मुंडे

बीड दि.२२:आठवडा विशेष टीम― राज्यात लागू असलेल्या संचारबंदीच्या काळातही सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सतत पाठपुरावा करून ऊसतोड मजुरांना स्वगृही परतण्याची परवानगी मिळवून दिली. आज (दि.२२) सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत प्राप्त आकडेवारी नुसार, राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या ऊसतोड मजुरांपैकी जवळपास ९०% मजूर आपापल्या गावी परतण्यासाठी मार्गस्थ झाले असून, बीड जिल्ह्यातील १८ हजार मजूर आपापल्या गावी पोचले आहेत.

उर्वरित सर्व ऊसतोड मजूर बांधव येत्या दोन दिवसात आपापल्या गावी पोचतील अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

बीड जिल्हा सीमा प्रवेशाच्या चेकपोस्टवर अधिकृत नोंद झालेले १८ हजार ऊसतोड मजूर आपापल्या गावी परतले असून उदयगिरी शुगर्स बामणी जि. सांगली येथून परळीत आलेल्या १८ पैकी दोन व्यक्तींना ताप व घशात खवखव असे लक्षण आढळून आले. त्यांना तात्काळ आंबेजोगाई येथे कोरोना चाचणी (स्वॅब टेस्ट) साठी पाठवले असून उर्वरित व्यक्तींना परळी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह येथे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.

राज्यात विभागनिहाय पश्चिम महाराष्ट्र १ लाख २४ हजार, नागपूर विभाग ५ हजार, तर मराठवाड्यात जवळपास दोन हजार असे एकूण १ लाख ३१ हजार ऊसतोड मजूर अडकलेले असून, काहीजण परतीच्या प्रवासात अडकलेले होते. त्यांपैकी आतापर्यंत १८,०६७ मजुर गावी परतले आहेत, त्यांना धान्यासह विविध सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत स्थानिक प्रशासनाला दिल्या असून, स्थानिक प्रशासनासह ना. मुंडे स्वतः व त्यांचे कार्यालय तसेच पदाधिकारी या बाबींवर बारीक लक्ष ठेऊन आहेत.

दरम्यान बाहेरून परतलेल्या ऊसतोड मजुरांना गावकरी व प्रशासनातील स्थानिक कर्मचाऱ्यांनी सन्मानाची वागणूक द्यावी. ऊसतोड मजूर बांधवांनी आपल्या कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्ती व लहान मुले यांच्याशी जवळचा संपर्क टाळावा, तसेच स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले आहे.

#CoronaVirus आष्टीतील ‘त्या’ रुग्णावर अहमदनगरमध्ये उपचार सुरु ,दुसऱ्या रिपोर्टकडे लक्ष ; उद्या संध्याकाळपर्यंत रिपोर्ट येण्याची शक्यता

बीड:आठवडा विशेष टीम― राज्यात सर्वत्र कोरोनाचे रूग्ण वाढत असले तरी जिल्ह्यात मात्र अजुनपर्यंत एकही नविन कोरोना रूग्ण आढळलेला नाही. तसे पाहिले तर मुळ जिल्ह्यामध्ये कोरोना झिरोच आहे. एक रूग्ण सापडला तोही नगरमध्येच आणि त्याच्यावर उपचारही त्याचठिकाणी सुरू आहेत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या जिल्ह्यात एक रूग्ण असला तरी प्रत्यक्षात मात्र एकही रूग्ण नाही. दरम्यान आष्टीतील ‘त्या’ रूग्णावर नगरमध्येच … Read more

#Covid19 जामखेडमधून कोरोना बाधिताच्या संपर्कातील एका नगरसेवकासह २५ जणांचा रिपोर्ट निगेटीव्ह

जामखेड:आठवडा विशेष टीम―जामखेड येथील वध्द व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूनंतर केलेल्या कोरोना तपासणीत ती व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संपर्कातील ९ व्यक्तींच्या तपासणीतून मृत व्यक्तीच्या कुटुंबातील दोन जण कोरोना बाधित असल्याचे पुण्याच्या सैनिकी महाविद्यालयाच्या अहवालात दि २० रोजी स्पष्ट झाले. तर एका डॉक्टरासह चार जणांचे रिपोर्ट निगेटीव आले आहेत. प्रशासनाने त्या दोन जणांच्या संपर्कात … Read more

बीड: कोरोनाच्या भीषण संकटात पाटोदाकरांना तालुकाध्यक्ष गणेश कवडे यांच्या रुपाने राष्ट्रीय काँग्रेसचा मदतीचा हात

पाटोदा:गणेश शेवाळे― कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉक डॉऊन मुळे गोरगरीब जनतेला उपासमारीची वेळ आलेली असून यामुळे अनेक लोक संकटात सापडले असताना आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून मदत नव्हे कर्तव्य म्हणून पाटोदा राष्ट्रीय कॉग्रेस तालुकाध्यक्ष गणेश कवडे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब कुटुंबाना तुम्ही संकटात एकटे नाही राष्ट्रीय कॉग्रेस तुमच्या सोबत असून कोरोनाच्या भीषण संकटात … Read more

लॉकडाऊन काळात काही उद्योग आणि आस्थापना सुरू करण्याबाबत आदेश जारी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अटी आणि शर्तीचे पालन करणे बंधनकारक जिल्हा नियंत्रण कक्ष, परिवहन विभाग आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यावर नियंत्रणाची जबाबदारी अहमदनगर, दि.२०:आठवडा विशेष टीम― राज्य शासनाने लॉकडाऊन काळात काही उद्योग आणि आस्थापना सुरु करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील महानगरपालीका आणि नगरपालीका क्षेत्राच्‍या बाहेरील ग्रामीण भागात असलेले उदयोग तसेच उत्पादन व इतर औद्योगिक आस्‍थापना ज्यामध्ये विशेष … Read more

अंबाजोगाई: भगवंत भवनच्या अन्नछञाद्वारे 2500 हुन अधिक गरजू लोकांपर्यंत पोहचले ‘आपुलकीचे जेवण’

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये हातावर पोट असणारे कामगार,स्वच्छता कर्मचारी,परिचारिका,ज्येष्ठ नागरीक,बाहेरगावाचे विद्यार्थी,प्रवासी यांना जेवण मिळावे या हेतूने 1 एप्रिल पासून शहराच्या विविध भागांतील लोकांना मोफत भोजन व फूड पॅकेटचे वाटप केले जात आहे.भगवंत भवनच्या अन्नछञाद्वारे राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमातून आजपर्यंत 2500 हून अधिक गरजूंना ‘आपुलकीचे जेवण’ देण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत कोणताही नागरिक … Read more