जिल्हाधिकारी पोलीस अधिक्षक ,सहायक पोलिस निरीक्षक नेकनूर ठाणे यांच्याकडे ईमेल द्वारे तक्रार
लिंबागणेश दि.८:आठवडा विशेष टीम― अधिक्षक अभियंता पाठबंधारे विभाग बीड यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात विविध ठिकाणी लघुसिंचन तलावाची दुरुस्ती,कालवा दुरुस्ती ,ऑफिस दुरुस्ती यासह इतर ठिकाणी विशेष एका संस्थेला हाताशी धरून मोठ्या प्रमाणात अनियमितता करून बोगस कामे केली आहेत व यासंबंधात लेखी तक्रार केल्या असून अधिक्षक अभियंता यांच्या संपत्तीची चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यापासून जिल्हाधिकारी पर्यंत केली आहे. या अनुषंगाने ६ जून २०२० रोजी अज्ञात व्यक्तीने भ्रमणध्वनीवरून सामाजिक कार्यकर्ते व तक्रारदार डॉ गणेश ढवळे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून धमकवण्याचा प्रयत्न केला आहे.या संदर्भात गणेश ढवळे यांनी जिल्हाधिकारी ,पोलिस अधिक्षक ,नेकनूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पो नि. यांच्याकडे लेखी तक्रार ईमेल द्वारे केली आहे.सदरील भ्रमणध्वनीवरून शिवीगाळ व धमकवनाऱ्यावर चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाठबंधारे विभागाचा कार्यकारी अभियंता तथा अधिक्षक अभियंता रघुनाथ करपेच्या काळातील झालेल्या कामाची पोलखोल केली जात आहे.एवढेच नव्हे तर रघुनाथ करपेसह त्यांच्या नातेवाईकांच्या संपत्तिची चौकशी करावी अशी मागणी डॉ गणेश ढवळे यांनी केली आहे.जिल्ह्यामध्ये रघुनाथ करपेनी एका संस्थेला हाताशी धरून बोगस कामे, अनियमितता करून मोठ्या प्रमाणात कोटीच्या घरात भ्रष्टाचार केला आहे.सदरील या भ्रष्ट्राचार आणि संपत्तीच्या चौकशीचा फास आता चांगलाच आवळला जात आहे.सामाजिक कार्य करून डॉ गणेश ढवळे चांगल्या पद्धतीने काम करत असताना एका व्यक्तीने ६ जून रोजी शनिवारी रात्री १०.५५ मिनिटांनी फोन करून अश्लील शिवीगाळ करत धमकवन्याचा प्रयत्न केला आहे.सदरील मोबाईल क्रमांक पोलीस प्रशासनाला देण्यात आला असून यावरून अज्ञात व्यक्तीने बोललेले रेकॉर्डिंग देखील दिले आहे.
“माझ्या जिवाला भिती आहे.माझ्यावर हल्ला होऊ शकतो.मी अनेक सामाजिक कार्यातुन अनेक विभागाचा भ्रष्टाचार बाहेर काढला आहे.त्यामुळे काही जणांना हे पटले नसेल म्हणून हा उपद्रवीपणा केला असावा”
― डॉ गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते बीड