औरंगाबाद: घोसला ता.सोयगाव येथे शेतकऱ्याची आत्महत्या ,कर्जाचा डोंगर असह्य झाल्याने शेतातच घेतले विष

जरंडी दि.१३:ज्ञानेश्वर धोंडू पाटील
कर्जाचा डोक्यावरील असह्य झालेला डोंगर,त्यातच
खरिपाच्या हंगामात पावसाची दडी व आजाराने त्रस्त असलेल्या
तरुण शेतकऱ्याने रविवारी शेतातच विष प्रश्न केल्याची घटना रविवारी घोसला ता.सोयगाव येथे सायंकाळी घडली.या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला आहे.याप्रकरणी पाचोरा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यातआली आहे.तालुक्यात सलग हि तिसऱ्या शेतकर्याची आत्महत्या असून ४८ तासातच घोसला येथील शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले असल्याची दुर्दैवी घटना घडली.
सोपान संपत बोरसे(रा.घोसला ता.सोयगाव वय ४३) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.त्याचे नावावर घोसला शिवारात १ हेक्टर जमीन असून त्याचेकडे तब्बल पाच लाखाचे कर्ज असून त्याला गंभीर आजारानेही छळले असल्याने या शेतकऱ्याने कर्ज फेडावे कि उपचार करावे तसेच खरिपाच्या हंगामाची चिंताजनक असलेली स्थिती पाहून शेतातच विष प्राशन करून कर्जाच्या चिंतेने आत्महत्या केली.तातडीने उपचारासाठी या शेतकऱ्याला पाचोरा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता,उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.दरम्यान एकीकडे सोयगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरु झालेले असतांना प्रशासनाचे मात्र शेतकऱ्यांच्या समस्यांवर दुर्लक्ष झाल्याचे आढळून येत आहे.तब्बल ४८ तासात ३ अल्पभूधारक शेतकऱ्यांनी मृत्यूला मिठी मारली आहे.मृत शेतकऱ्याच्या पश्चात आई,पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.

औरंगाबाद: गलवाडा ता.सोयगाव गावात महावितरणच्या पथकाची वाॅशआउट मोहीम ,वीजचोरीच्या साहित्याची होळी

जरंडी,ता.२८:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
येथून जवळच असलेल्या गलवाडा(ता.सोयगाव) गावात महावितरणच्या पथकाने रविवारी वाॅशआउट मोहीम राबवीत गावातील वीज पुरवठ्याचे सर्व अडचणी सोडवून गावाला खंडित वीज पुरवठ्यापासून मुक्त करण्यावर जोर देत गावातील तब्बल ७० वीज चोरांचे वीज चोरीचे आकोडे व साहित्य काढून घेत जनजागृती करून अख्ख्या गावाला वीज चोरी करण्यापासून परावृत्त करत या साहित्याची ग्रामपंचायत कार्यालयासमोर महावितरणच्या पथकाने होळी केली.

गलवाडा(ता.सोयगाव)गावात वीज पुरवठ्याचे मोठ्या अडचणीचा डोंगर निर्माण झाला होता.या अडचणी दूर करण्यासाठी महावितरणचे सहायक अभियंता अभिजित गौर यांच्यासह पथकाने रविवारी गलवाडा गाव गाठून या गावातील रोहित्रे जळणे,वीज तार तुटणे,फेज कट होणे आदि अडचणींवर दुरुस्ती मोहीम हाती घेतली असता वीज चोरीचे प्रकार समोर आल्याने महावितरणच्या पथकाने हे वीज चोरीचे साहित्य जप्त करून ग्रामस्थांची जनजागृती करून या साहित्याची ग्रामपंचायतीसमोर होळी केली,गावातील वीज पुरवठ्याच्या अडचणी तूर्तास दूर करण्यासाठी सहायक अभियंता अभिजित गौर,पप्पू पाटील,विष्णू लाड,जनार्दन जोहरे,आदींच्या पथकाने वीज चोरीच्या साहित्याची होळी केली यावेळी सरपंच सुरेखा तायडे,भारत तायडे,ईश्वर इंगळे आदींनी याकामी पुढाकार घेतला होता.

सोयगाव: पावसाचा खंड ,खरिपाच्या पिकांवर ताण ;खते व फवारणीच्या कामांना वेग

जरंडी:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
जरंडीसह परिसरात पावसाचा मोठा खंड पडल्याने खरिपाच्या पिकांवर ताण पडला आहे.यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खते आणि फवारणीच्या मात्रा देवून पिकांना जगविण्याची धडपड सुरु केली आहे.पावसाचा मोठा खंड पिकांना तारणारा नसून मारणारा असल्याची प्रतिक्रिया शेतकरी ज्ञानेश्वर वाघ यांनी दिली आहे.
जरंडी परिसरातील मंडळ महसुली गावांमध्ये पावसाचा मोठा खंड पडला असून त्यामुळे खरिपाच्या हंगामावर पावसाअभावी ताण पडला असल्याने खरीपाची आंतर मशागतीचे कामे रखडली आहे.पिकांना पुन्हा डोलदार करण्यासाठी जरंडी,घोसला परिसरात खतांच्या मात्रा आणि फवारणीच्या कामांनी वेग घेतला असून कपाशी पिकांवर तूर्तास मित्र किडींचा मोठा प्रादुर्भाव असल्याने कपाशी पिके धोक्याच्या बाहेर आहे.परंतु पावसाचा मोठा ताण कपाशी आणि मका पिकांवर पडलेला असल्याने मक्याची कोवळी पिके माना टाकत असल्याचे शिवारातील चित्र आहे.मक्यासह सोयाबीन,ज्वारी,बाजरी आदी पिकांनाही पावसाचा मोठा फटका बसला असून कपाशी पिकांना मात्र ठिबक सिंचनच्या मात्रा वर जगविले जात आहे.त्यामुळे खरिपाच्या हंगामातील मक्यास,सोयाबीन,ज्वारी,बाजरी आदी पिके मात्र संकटात सापडली आहे.

ढगाळ वातावरणाचा परिणाम-

जरंडीसह परिसरात आठवडाभरापासून पावूसाचा पत्ता नसून मात्र दिवसभर ढगाळ वातावरण तयार होत असल्याने या बदलत्या वातावरणाचा खरिपाच्या पिकांवर मोठा परिणाम जाणवत असून पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसल्याने खरिपाच्या मका,सोयाबीन,ज्वारी,बाजरी आदी पिकांची वाढ खुंटली आहे.वाढ खुंटल्याने पिकांना योग्य प्रमाणात उभारी मिळत नाही त्यामुळे सूर्यप्रकाशाअभावी आणि पावसाअभावी खरीपाची सर्वच पिके अडचणीत सापडली आहे.यावर मात्र कृषी विभागाच्या कोणतेही मार्गदर्शन मिळत नसून शेतकरी पावसाची दडी आणि बदलत्या वातावरणाच्या विळख्यात अडकला आहे.


टोळधाडीचे शेतकऱ्यांवरील आसमानी संकट नियंत्रणात आणण्यासाठी ड्रोनद्वारे फवारणी करणार

टोळधाडीचे संकट नियंत्रणात आणण्यासाठी ड्रोनद्वारे फवारणी करणार : कृषीमंत्री

मुंबई/सोयगाव दि ३०:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
राज्यात एकीकडे कोरोनाचे संकट सर्वांसमोर उभे असताना दुसरीकडे शेतकऱ्यांसमोर सध्या टोळधाडीचे संकट आले आहे. या संकटांशी सामना करण्याच्या दृष्टिकोनातून कृषी विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. आतापर्यंत टोळधाड किड्याचा नायनाट करण्यात ५० टक्के यश आले आहे. ज्या भागात हे संकट उभे राहील त्या भागात अग्निशमन बंब आणि ड्रोनच्या माध्यमातून कीटकनाशक फवारणी करून हे संकट दूर करण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वाधिक नुकसान कृषी विभागाचे झाले आहे. त्यामुळे लॉकडाऊनची आणखी आवश्यकता भासल्यास त्यातून कृषी क्षेत्र वगळले जाणार असल्याचे म्हटले आहे. तसेच कृषी विभागाने यापूर्वीच शेतकऱ्यांना सूट दिलेली आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना आणखी सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.

संपूर्ण राज्यात, देशात कोरोनाचा शेती व्यवसायाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फटका बसलेला असताना शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडण्याची शक्यता कृषी विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांवर टोळ धाडीच हे संकट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सुरक्षेचे उपाय राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मध्यप्रदेशकडून महाराष्ट्र – मध्यप्रदेशाच्या सीमेलगत असलेल्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर परिसरातील शेतकऱ्यांना टोळ धाडीची भीती वर्तवण्यात आली आहे.

सोयगाव: कोविड-१९ चा ग्रामीण भागात प्रसार होवू नये यासाठी प्रशासन सज्ज ,उपविभागीय अधिकारी ब्रजेश पाटील सोयगाव तालुक्यात ठाण मांडून

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
तालुक्यांच्या ग्रामीण भागात कोविड-१९ चा शिरकाव होवू नये यासाठी जिल्हा प्रशासन शुक्रवारपासून सज्ज झाले असून सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी ब्रजेश पाटील यांनी सोयगाव तालुक्याच्या कोविड-१९चं उपाय योजनांची शुक्रवारी फेरतपासणी करून आढावा घेतला.यामध्ये सोयगाव तालुक्यात संक्रमण वाढण्याची चिन्हे दिसताच तालुका प्रशासनाची पूर्वतयारीनिशी सज्ज असल्याची माहिती त्यांनी दिली.
वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीसाठी सोयगावसाठी अजिंठा(ता.सिल्लोड)येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड हेल्थ सेंटरमध्ये सोयगाव तालुक्यासाठी २५ बेड राखीव करण्यात आल्याची माहिती ब्रजेश पाटील यांनी दिली असून तातडीने सोयगाव ग्रामीण रुग्णालयात २५ नवीन बेडचा पुरवठा करण्यात आला आहे.उपविभागीय अधिकारी ब्रजेश पाटील यांनी शुक्रवारी फर्दापूर,सोयगाव,जरंडी आदी भागातील विलीगीकरण केंद्रांचं पूर्वतयारीची पाहणी करून या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे अशा सूचना दिल्या आहे.तहसीलदार प्रवीण पांडे,गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे आदींचे पथक मात्र शुक्रवारी तालुक्यात सतर्क झाले होते.

जरंडीच्या विलीगीकरण केंद्रात तातडीने मुलभूत सोयी पुरवा-

जरंडी ता.सोयगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीत विलीगीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.परंतु संबंधित ठेकेदाराने इमारतीच्या कामाच्या पूर्वी आय ठिकाणी वीज पुरवठा जोडणी न केल्याने हे केंद्र अंधारातच असल्याने या ठिकाणी येत्या दोन दिवसात वीज पुरवठा जोडणी करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्या आहे.


सोयगाव: लॉकडाऊनच्या झोन बाबत ग्रामीण भागात संभ्रम ,नागरिकांची वर्दळ अचानक वाढली

सोयगाव,दि.४ :ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
रेड झोनमध्ये असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील; ग्रामीण भागात शासनाने झोननिहाय दिलेल्या सूट बाबत सोयगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात संभ्रम निर्माण झाल्याने सोमवारी पहाटेपासून ग्रामीण भागात अचानक वर्दळ वाढली होती.त्यामुळे लॉकडाऊनच्या नियमांचे सोयगाव तालुक्यात उल्लंघन झाले,मात्र दुपारी उशिरा झोन बाबत संभ्रम दूर झाल्यावर परिस्थिती पूर्वपदावर आली होती.
रेड,ऑरेंज,आणि ग्रीन या तीन झोन मध्ये जिल्हानिहाय विभागणी करून तिसऱ्या लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी सोमवारी शासनाने काही प्रमाणात सूट दिली होती,परंतु रेड झोन मध्ये असलेल्या सोयगाव तालुक्याला कोणतीही सूट लागू नसल्याने सोमवारी तालुक्याच्या ग्रामीण भागात नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याने अचानक गर्दी वाढली होती,या गर्दीमुळे कोरोनापासून सुटकारा मिळाला कि काय अशी स्थिती सोयगाव तालुक्यात अकरा वाजे पर्यंत निर्माण झाली होती.परंतु संबंधित ग्राम पंचायतींनी याबाबत पुन्हा जनजागृती करून नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केल्याने मोठा गोंधळ उडाला होता.अखेरीस ग्रामपंचायतींनी मध्यस्थी करून नागरिकांना पुन्हा जनजागृती केल्यावर परिस्थिती पूर्वपदावर आली होती मात्र तालुक्यात सोमवारी सात ते आठ तास लॉकडाऊनचे उल्लंघन झाले होते काही भागात दुकाने सर्रास उघडी करण्यात आली होती.तालुका प्रशासनाने मात्र या नागरिकांच्या वागण्यापुढे हात टेकले होते.

सोयगाव: सावळदबारा येथे मध्यवर्ती बँकेत सोशल डिस्टनचा फज्जा

सावळदबारा:सुनील माकोडे―
जगभरामध्ये कोरोनाव्हायरस ने थैमान घातले असून औरंगाबाद जिल्हा हा रेड झोन मध्ये असून औरंगाबाद मध्ये कोरोना पॉझिटिव ची संख्या 291 असून सोयगाव तालुक्यातील सावळदबारा या सर्कलमध्ये चौदा पंधरा खेडे गावे असून तीन जिल्ह्याची सीमा असून येथे मध्यवर्ती बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँक मध्ये मध्यवर्ती बँकेमध्ये निराधार व श्रावण बाळ योजना अंतर्गत पेन्शन धारकाला व महाराष्ट्र ग्रामीण बँक मध्ये जनधन खातेधारकांना पाचशे रुपये सातशे ते आठशे लोकांचे बँक मध्ये लोकांनी गर्दी करताना दिसत आहे गावातील पोलीस प्रशासन कोतवाल व पोलीस पाटील आणि तलाठी गांभीर्य घेताना दिसत नाहीत.
पोलीस प्रशासन व महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे तरी एपीआय बहुरे व सोयगाव येथील तालुका दंडाधिकारी प्रवीण पांडे यांचे कर्मचाऱ्यांवर दुर्लक्ष आढळून असे दिसून येत आहे.
तात्काळ जिल्हाधिकारी उदय चौधरी व ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील शेवटचे टोकावरती बसलेले 14 ,15 गावाकडे लक्ष देण्यात यावे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

सोयगाव : तहसील कार्यालयात कोरोना संसर्गाबाबत आढावा बैठक संपन्न

सोयगाव,दि.३:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
कोरोना संसर्गाचा उपाय योजनांचा आढावा आणि विशेष सूचना देण्यासाठी रविवारी अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी तहसील कार्यालयात आढावा घेवून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.यावेळी तहसीलदार प्रवीण पांडे यांनी प्राथमिक आढावा सादर करून तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास डोंवाने यांनी उपाय योजनांचा आढावा गावनिहाय दिला.
अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी सोयगाव तहसील कार्यालयात कोरोना संसर्गाच्या उपाय योजनांचा आढावा घेवून परराज्यातील आलेले मजूर आणि परजिल्ह्यातून आलेल्या मजुरांची तपासणी करण्याबाबत माहिती घेत लॉकडाऊन काळात वाटप केलेल्या धान्य वितरणाबाबत माहिती घेतली यावेळी तहसीलदार प्रवीण पांडे,गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे,नायब तहसीलदार शेख मकसूद आदींची यावेळी उपस्थिती होती.आढावा बैठकीनंतर अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी फर्दापूर ता.सोयगाव येथील कोविड काळजी केंद्र ची पाहणी करून योग्य त्या सूचना दिल्या.


सोयगाव: चक्क विहिरीत आढळले गावठी दारूचे रसायन ; घोसला शिवारातील घटना ,पोलिसांचा छापा

सोयगाव,दि.२:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
घोसला ता.सोयगाव शिवारातील एका कोरड्याठाक विहिरीत तब्बल २५ कॅन गावठी दारू गाळपचे रसायन शनिवारी दुपारी सोयगाव पोलिसांनी लॉकडाऊनचं गस्तीत जप्त करून नष्ट केले आहे.या घटनेमुळे सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली असून अद्याप रसायनाची किंमत हाती आली नाही.
लॉकडाऊनची गस्तीत असलेल्या पोलिसांच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार घोसला शिवारात एका कोरड्या विहिरीत हजारो रु किमतीचे गावठी दारू गाळप करण्याचे रसायन लपवून ठेवल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी घटनास्थळावर छापा घातला असता,त्या कोरड्याठाक असलेल्या विहिरीत तब्बल २५ कॅन गावठी दारू गाळपचे रसायन शनिवारी हस्तगत करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे.तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष किशोर पाटील व प्रकाश पाटील सरपंच,निमखेडी पोलीस पाटील भगवान शिंदे यांच्या समक्ष हे रसायन नष्ट करण्यात आले आहे.लॉकडाऊनच्या काळात छुप्या मार्गाने गावठी दारू गाळप करून विक्री करण्याच्या उद्देशाने अज्ञातांनी हे रसायन लपवून ठेवल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ,जमादार संतोष पाईकराव,दिलीप तडवी,विनोद कोळी आदींच्या पथकाने हि कारवाई केली आहे.

मुख्याधिकार्‍यांच्या निवासस्थानी ओली पार्टी ,आरोग्य निरीक्षक निलंबीत ; तिघांनाही अटक

पाचोरा दि.२३:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― लॉकडाऊन असल्यामुळे जिल्ह्यात मद्य विक्रीला बंदी आहे. मात्र अशाही परिस्थीतीत मद्य आणून ते चक्क नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या शासकीय निवासस्थानी नगरपरिषदेच्या आरोग्य निरीक्षकासह दोघांनी बुधवारी ओली पार्टी केली. यावेळी अचानक पाचोरा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर ह्या त्यांच्या निवासस्थानी आल्या असत्या त्यांनी या तिघांना पार्टी करतांना रंगेहाथ पकडले. दरम्यान याप्रकरणी आरोग्य निरीक्षकास निलंबीत … Read more

नाशिकहुन उत्तर प्रदेश जाणाऱ्या कामगाराना पाचोरा येथे प्रशासनाने केले क्वारंनटाईन

पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―पाचोरा येथे उत्तर प्रदेश बॉर्डर जवळील सतना येथे जाणारे नाशिक येथील औद्योगिक वसाहतीत विविध ठिकाणी काम करणारे ५० कामगार प्रवास करतांना आढळल्याने त्यांना दि १८ एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी पाचोरा यांच्या आदेशाने भडगाव रोड वरील शक्तीधाम हॉल येथे क्वारंटाईन(आयसोलेशन कक्षात) करण्यात आले आहे. त्यांची राहण्याची सर्व व्यवस्था गादी, सतरंजी,पांघरूण,पिण्याच्या पाण्याचे जार आदींची व्यवस्था … Read more

सोयगाव: ३७ गावात पोहचला मोफत तांदूळ ,सोयगाव तहसील कार्यालयाची मोफत धान्य वितरण मोहीम

सोयगाव,दि.१७:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य आणि मजुरांची उपासमार टाळावी यासाठी तहसीलच्या पुरवठा विभागाकडून तातडीने अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या ३७ गावातील लाभार्थ्यांना तातडीने २८० मेट्रिक टन मोफत धान्य प्रधानमंत्री गरीब कल्यान योजनेतून पुरवठा केल्याची माहिती तहसीलदार प्रवीण पांडे यांनी दिली आहे.यामध्ये सध्य स्थितीत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतीलच लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत … Read more

औरंगाबाद: सोयगाव तालुक्यात उष्णवारे ,कोरोना पेक्षा उष्णतेची चिंता वाढली

सोयगाव,ता.१६:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगावसह तालुक्यात गुरुवारी अचानक उष्णवारे वाहू लागल्याने या उष्णतेच्या लाटेत अक्खा तालुका होरपळला होता त्यामुळे नागरिकांना गुरुवारची उष्णता असह्य झाल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे पहावयास मिळाले. आधीच कोरोना संसर्गाची संचारबंदी आणि टाळेबंद त्यात वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेच्या झळा यामुळे सोयगाव तालुका उष्ण झाल्याचे पहावयास मिळाले.जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सोयगाव तालुक्याला खानदेशच्या तापमानाचा फटका बसला … Read more

खासदार उन्मेश दादा पाटील यांची रेशन धान्य दुकानास प्रत्यक्ष भेट : मोफत तांदूळ लाभार्थ्यांशी साधला संवाद

शिधापत्रिका धारकांची केली विचारपूस : जळगाव लोकसभा मतदार संघातील शिधापत्रिकाधारक २५ लाख जनतेला मोफत प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळ वाटप सुरू : जनतेमध्ये समाधान

जळगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― येथील लक्ष्मी नगर चाळीसगाव परिसरातील रेशन धान्य दुकान क्रमांक आठ व नऊ येथे पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत मोफत तांदुळाचे वाटप आज सकाळी खासदार उन्मेष दादा पाटील यांच्या उपस्थित लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांशी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी संवाद साधला त्यांनी सोशल डीस्टन्स पाळत आपला लाभ घ्यावा.यावेळी लाभार्थ्यांनी केंद्र सरकारच्या पॅकेजमुळे मोफत मिळत असलेला तांदूळ चांगल्या प्रतीचा असून आम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आम्ही आभार मानतो अशी भावना व्यक्त केली. रेशन धान्य दुकानदार एस. सी. साबणे आणि अरुण साबणे यांनी त्यांचे स्वागत केले.

जिल्ह्यातील लाभार्थ्यांमध्ये समाधान
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेज मधील मोफत अन्नधान्याचे रेशन धान्य दुकानदारांकडून वाटप सुरू झाले आहे. अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांतील लाभार्थी शिधापत्रिका धारकांना प्रति व्यक्ती ५ किलो मोफत तांदळाचे वाटप सुरू करण्यात येत आहे.याचा सर्वत्र लाभ घेतला जात असून या संकटाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोरगरीबांना मोफत धान्य मिळवून दिल्या बद्दल जनतेकडून आभार व्यक्त केले जाते आहे.

लोकसभा मतदारसंघात पंचवीस लाख कुटुंबांना लाभ

जळगाव लोकसभा मतदारसंघातील
जळगावात ७ लाख २०हजार ,
एरंडोल १ लाख ५० हजार ,
धरणगाव १ लाख ८०हजार,
पाचोरा २ लाख ९४ हजार,
भडगाव १ लाख ८५ हजार ,
चाळीसगाव ४ लाख २० हजार ,
अमळनेर २ लाख ६६ हजार,
पारोळा १ लाख ९७ हजार या सर्व सुमारे ५ लाख १८ हजार शिधापत्रिका धारकांच्या एकूण २५ लाख कुटुंब सदस्यांना या मोफत अन्नधान्य वाटपाचा थेट लाभ मिळणार आहे. हा लाभ प्रति व्यक्ती ५ किलो मोफत तांदुळाचा लाभ तीन महिने मिळणार आहे. केंद्र सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आपण घाबरू नका, घरातच रहा.प्रशासनास सहकार्य करा. असे आवाहन यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केले आहे.