अहमदनगर येथे दलित कुटुंबावर सवर्णांनी केला प्राणघातक हल्ला
चार जन अत्यावस्थ गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी आरोपीना अटक करण्याऐवजी उलट पीडित कुटुंबावरच कलम ३०७ चा खोटा गुन्हा केला दाखल – दयाल बहादूरे ,रिपाई
मुंबई दि.२:आठवडा विशेष टीम―
अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर तालुक्यात असणाऱ्या इमामपूर गावात राहणारे अमित बाळासाहेब साळवे हे दलित कुटुंब राहात असून रविवारी दि.३० ऑगस्ट रोजी गावातील सवर्ण कुटुंबाने प्राणघातक हल्ला करून बेदम मारहाण करण्यात आला आहे.त्यामुळे आरोपींच्या विरोधात एमआयडीसी अहमदनगर पोलीस स्टेशन मध्ये कलम ३०७,४४१,१४३,१४७,१४८,१४९,५०४,५०६ व ऍट्रॉसिटी कायदा ३(१)(r),३(१)(s),३(२)(v)-A नुसार दि.३०ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर दलित कुटुंबावर झालेल्या हल्ला प्रकरणातील आरोपीना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अखिलेश कुमार सिंग यांचेकडे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सचिव दयाल बहादुरे यांनी फोन करून केली आहे.
या प्रकरणाची सविस्तर हकीकत अशी आहे की,अमित बाळासाहेब साळवे वय २९ वर्ष हा एम एस डब्लू पर्यंत शिक्षण घेतलेला दलित तरुण आपल्या आई-वडील कुटुंबासोबत इमामपूर गावात राहात होता.त्याच्या कुटुंबाने १९९९ मध्ये गावालगत असलेली ६९ गुंठे शेतजमीन खरेदी केली होती.यांच्या शेतजमिनी ला लागून आबा काशीनाथ मोकाटे या मराठा समाजाच्या सवर्णांची शेत जमीन असल्यामुळे साळवे कुटुंबाला शेतात जाण्यासाठी वहिवाटीचा रस्ता देण्यास तयार नव्हता त्यामुळे वर्ष २०१० पासून दोन्ही कुटुंबात वाद होता. या विरुद्ध साळवे कुटुंब कोर्टात जावून रस्ता देण्याची ऑर्डर मिळवून आणली व रस्ता तयार केला असता दि.30 ऑगस्ट २०२० रोजी आबा काशीनाथ मोकाटे कुटुंबाने रस्त्यावर बाभळीचे मोठे लाकूड आणून ठेवले आणि रस्ता पूर्णपणे बळजबरीने बंद केला आणि साळवे कुटुंबाच्या शेतात ट्रॅक्टर चालवून पिकाची नासधूस केली याबाबत साळवे कुटुंबांनी जाब विचारला असता साळवे कुटुंबाला जातीवरून अश्लील शिवीगाळ करीत काठ्या ,
दांडके, व विळ्यानी प्राणघातक हल्ला चढवून बेदम मारहाण केली आहे.
या हल्ल्यामध्ये साळवे कुटुंबातील १)बाळासाहेब रामभाऊ साळवे वय ५५ वर्ष, २)विलास रामभाऊ साळवे वय ६५ वर्ष ३) प्रकाश विलास साळवे वय
३५ वर्ष, ४)अमित बाळासाहेब साळवे वय २९ वर्ष हे चौघे जन जखमी झाले असून बाळासाहेब साळवे व विलास साळवे यां वृद्ध व्यक्तींच्या डोक्याला मारहाणीच्या मोठ्या जखमा झाल्यामुळे हे दोघे अत्यावस्थ अवस्थेत अहमदनगरच्या क्रीशटल हॉस्पिटल मध्ये दाखल केले आहेत.
एमआयडीसी अहमदनगर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी १)आबा काशीनाथ मोकाटे, २) अमर काशीनाथ मोकाटे, ३)आनंद काशीनाथ मोकाटे, ४)गोरख शिवाजी आवारे, ५)नवनाथ शिवाजी आवारे, ६) शोभा आबा मोकाटे, ७)अर्चना नवनाथ आवारे या सात आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न करण्याचा व ऍट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीना पोलिसांकडून अद्यापही अटक करण्यात आलेली नाही या बाबत पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंग व विभागीय पोलीस अधिकारी अजीत पाटील याना दयाल बहादुरे यांनी विचारले असता आरोपीनी सुद्धा स्वतःला पाटील हॉस्पिटल मध्ये भरती करून घेतले असून त्यांनी सुद्धा साळवे कुटुंबाच्या विरोधात तक्रार दिली असल्यामुळे पीडित दलित साळवे कुटुंबातील १)विलास रामभाऊ साळवे २)बाळासाहेब रामभाऊ साळवे ३)अमित बालसाहेब साळवे ४) मोजेस बाळासाहेब साळवे ५) प्रकाश विलास साळवे ६) प्रभाकर विलास साळवे ७) निर्मला विलास साळवे ८) सुनीता बाळासाहेब साळवे ९) पुष्पा प्रभाकर साळवे या नऊ पीडित व्यक्ती च्या विरुद्ध पोलिसांनी कलम ३०७ , १४३, १४७, १४८, १४९, १८८, ५०४, ५०६ इत्यादी कलमाखाली खोटा गुन्हा माझ्या परिवाराच्या विरोधात नोंदवण्यात आलेला आहे असे अमित साळवे या अन्यायग्रस्त पिडितांचे म्हणने आहे. आरोपीना अटक कधी करणार असे पोलिसांना विचारले असता आरोपीना आता अटक करता येत नाही हॉस्पिटल मधून सुट्टी झाल्यावर अटक करण्यात येईल असे सांगितले आहे.
आमच्यावर अन्याय करण्यात आला आहे .आम्हालाच मारहाण करून आमच्याच विरोधात ३०७ चा खोटा गुन्हा पोलिसांनी आरोपींच्या दबावाखाली दाखल केला आहे.अशी तक्रार अमित साळवे यांनी रिपब्लिकन पक्षा कडे केली आहे .पोलीस सवर्ण आरोपीना हेतुपुरस्सर पणे पाठीशी घालत असल्यामुळे पीडित दलित कुटुंबावर अन्याय करण्यात येत आहे. पोलिसांच्या या दुट्टपी पणाच्या भूमिकेची तक्रार गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कडे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात येणार असून साळवे कुटुंबावर झालेला अन्याय दूर करून न्याय मिळवून दिला जाईल असे दयाल बहादुरे यांनी सांगितले.