शरद पवार उद्या बीडच्या दुष्काळी दौऱ्यावर ; जळालेल्या फळबागांची पाहणी करणार

बीड : आठवडा विशेष टीम― राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार हे उद्या सोमवारी बीड जिल्ह्याच्या दौर्‍यावर येणार आहेत. या दौर्‍यात ते बीड जिल्ह्यात दुष्काळामुळे निर्माण झालेल्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी, दुष्काळी जनतेशी संवाद साधणार आहेत. तसेच जनावरांच्या छावण्यांना भेट आणि जळालेल्या फळबागांची पहाणीही करणार आहेत. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी यावेळी त्यांच्या समवेत … Read more

दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी राज्यातील आदर्श आचारसंहिता शिथिल ; मुख्यमंत्र्यांची मागणी मान्य

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मुख्यमंत्र्यांची मागणी मान्य मुंबई : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात लागू असलेली आदर्श आचारसंहिता शिथिल करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मागणी भारत निवडणूक आयोगाने मान्य केली आहे. राज्यातील अनेक भागांत दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून प्रशासनाकडून यासंदर्भात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, राज्यात … Read more

देशातल्या गद्दारांनो तुमच्या अंगातल्या कडक स्टार्च केलेल्या शुभ्रखादीवर न दिसणारे असंख्य डाग आहेत त्याच कापसाच्या शेतात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या रक्ताचे – चांगदेव गिते

कृषीप्रधान देशातल्या गद्दारांनो
तुमच्या अंगातल्या कडक स्टार्च केलेल्या शुभ्र खादीवर न दिसणारे असंख्य डाग आहेत त्याच कापसाच्या शेतात आत्म हत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या रक्ताचे ..,

वाईट वाटतंय की साहेब थुकले तरी किती छान थुकतात म्हणून झेलत बसणारे तमाम बगलबच्चे, लाचारी पत्करून झालेले निष्ठावंत, कट्टर कार्यकर्ते, टक्केवारीतले ,
जाऊ द्या ना आपल्या काय करायचंय म्हणून साडी-माडी-गाडी करत मजा मारत वावरणारी थोर भोंदू, गांडू-जमात,

कायम पब-हब च्या धुंदीत असणारे उच्चभ्रू, मेंदू नसल्यागत बापाच्याच मारेकऱ्यांचे झेंडे घेऊन फिरणाऱ्या शेतकऱ्यांच्या काही अवलादी,
मंदिर-मस्जिद वर भांडत बसलेल्या अगणित रिकामचोटांनो ..,

व्यवस्थेने केलेल्या या लाखो हत्येचा जाब कधी व्यवस्थेला विचारणार आहेत की नाही ?

की हे असंच चालणार वर्षानुवर्षे ..,
गोर-गरिबांच्या मृतदेहाचे लचके तोडून माजलेल्या गिधाडांना, कष्टकऱ्यांचे रक्त पिऊन फुगलेल्या रक्तपिपासू गोचिडांना ठेचनार आहात की नाही तुम्ही ?

की त्यांचीच हुजरेगिरी करत हे असंच चालू ठेवणार कांद्याच्या ढिगांऱ्याप्रमाणे मृतदेहाचे ढिगारे पडेपर्यंत

कधी तरी जेवतानाचा घास नाकाजवळ घेऊन बघा,,
तुम्ही खाता त्या प्रत्येक घासाला राबणाऱ्या-मरणाऱ्याच्या घामाचा मातीचा गंध येईल !!

तुमचं हिमोग्लोबिन कमी होऊ नये म्हणून कित्येकांनी त्यांचं रक्त सांडलेलं असतं ..,
हयात नसलेल्यांचे पुतळे बांधायचे अन जित्या-जागत्यांचे मुडदे पाडायचे,
हे कोणत्याच महापुरुषाला पटलं नसतं ..,

कधी विचार केलाय का कापसाच्या अन त्याच कापसाच्या कपड्यांच्या किंमतीत जमीन अस्मानाचा फरक आढळतो ते,
आमचं सोयाबीन तीन हजारात १०० किलो घेता तुम्ही पण तुमचं बियाणं- मात्र ८०० रुपयाला १ किलो विकता ?

आमचा माल कच्च्याचा पक्का करून किती दिवस तुमच्या तुंबड्या भरणार तुम्ही ?
तुमच्या मालाचा किंमती अव्वाच्या-सव्वा तुम्ही स्वतःच ठरवता पण आमच्या सोयाबीन कांद्याचा भाव सरकार ठरवतं.
आमचं दूध 20 रुपयाने अन तुमची आईस-क्रीम 400 रुपयाने !
साधं पाणी सुद्धा 20 रुपयाने विकतय,
त्यावर अशी कोणती प्रक्रिया करता तुम्ही ?

मुळात आम्हाला शिकवलंच चुकीचं जातंय की
”दाणे दाणे पे लिखा है खाणे वाले का नाम”
लेकिन
असल में तो ‘दाणे-दाणे पे लिखा होता है उसके लिय मरणेवाले का नाम !
कुठं तरी थांबायला हवं यार हे ..,

– लेखक चांगदेव गिते (सुशिक्षित बेरोजगार आंदोलक)