बीड: लाच मागणारा पाटोदा चा फौजदार एसीबीच्या जाळ्यात

बीड़ (नानासाहेब डिडूळ): तक्रारदाराच्या गुन्हात जप्त केलेला मोबाईल तसेच आरोपीला अटकपुर्व जामिनासाठी सहकार्य करण्यासाठी पाटोदा उपनिरीक्षकाने 50 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती . तड़जोड़ीअंती 40 हजार रूपयांची स्विकारण्याचे पंचसमक्ष मान्य केले या प्रकरणी उपनिरीक्षकावर पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .ही कारवाई शुक्रवार (दि.11) रोजी बीड एसीबीने केली.
अफरोज तैमीरखाॅ पठाण हे पाटोदा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते.त्यांनी तक्रारदाराकड़े गुन्हातील मोबाईल परत देण्यासाठी व तक्रारदाराच्या भावास अटकपुर्व जामीन मंजुर झालेली रद्द न करण्यासाठी जप्त गाड़ी व पिस्टल सोड़वण्यासाठी अहवाल चांगला देण्यासाठी 50 हजार रूपये लाचेची मागणी केली व तड़जोड़ीअंती 40 हजार रूपये स्वीकारण्याचे पंचासमक्ष व साक्षीदारांच्या समक्ष मान्य केले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक राहुल खाड़े ,अप्पर पोलीस अधिक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड़चे उपअधिक्षक शंकर शिंदे ,सुरेश सांगळे ,हनुमान गोरे , संतोष यांनी कारवाई केली.

पाटोदा: चुंबळीफाटा येथे अपघाताचे सत्र चालूच

बीड़:नानासाहेब डिडुळ― पाटोदा तालुक्यातील चुंभळी फाटा येथील चौकाचे भिजत घोंगड़ किती दिवस राहील याचा नागरीकांना थांगपत्ता लागेना पैठण-पंढरपुर तसेच अहमदनगर -बीड़ रोड़ रस्याचे काम काही ठिकाणी वगळता पुर्णत्वा कडे गेले आहे.परंतु रस्ता चांगला झाल्या कारणाने ड़्रायव्हर यांना गाडीच्या वेगावर मर्यादा ठेवणे कठिण होऊन बसले आहे. राञी च्या वेळी रस्ता लांब सरळ आहे काय असे पाटोदा कड़ून चुंभळी फाटा कडे येताना दिसते.परंतु गाडीचा वेग कमी होईपर्यंत तर गाडी सरळ खड़्यात गाड़ेकर यांच्या शेतात जाऊन पडते. सहा महीन्यापासुन येथे खुप अपघात झाले आहेत जालन्याच्या नागरीकाला आपला जिव गमवावा लागला आहे.शुक्रवार पहाटे आज गंगाखेड़ येथील कुटुंब बालंबाल बचावले आहे.अजुन काही जिव गेल्यानंतर प्रशासन व गुत्तेदार यांना जाग येनार काय असा सवाल येथे उपस्थित होत आहे.

पाटोद्या कड़ून चुंभळी फाटा कड़े येताना अपघाताचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे संबंधित गुत्तेदार व पोलीस प्रशासनाने 100 मीटर वर आपले बॅरीकेट नागमोडी आकारात लावले तरच अपघात टळतील

बाबासाहेब ढेकळे (रहीवाशी चुंभळी फाटा)

बीड: आष्टी तालुक्यातील मंगरूळ गावातील माय-लेकरावर बिबट्याचा हल्ला

आष्टी:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मंगरूळ येथे तूर काढत असताना माय-लेकावर बिबट्याने हल्ला चढवला. यात दोघेही जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी (दि.२८ नोव्हेंबर) सायंकाळी ५.३०च्या सुमारास घडली.

शिलावती बाबा दिंडे (वय ४२) व अभिषेक बाबा दिंडे (वय १२) अशी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत. दोघेही माय-लेक आष्टीपासून जवळच असलेल्या मंगरूळ शिवारात तुरीचे पीक काढत होते. त्याचवेळी बिबट्याने हल्ला चढवला. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत त्यांची बिबट्याच्या हल्ल्यातून सुटका केली व जखमींना आष्टीच्या सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर डॉ.मोराळे हे उपचार करत आहेत.

दरम्यान, शुक्रवारी बिबट्याने पंचायत समिती सदस्य पतीचा बळी घेतला. त्यानंतर शिरूर तालुक्यातील महिलेवर हल्ला केला. यात महिला जखमी झाली, त्यानंतर आष्टी तालुक्यात 10 वर्षीय बालकाचा बळी तर वनविभागाच्या कर्मचार्‍यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. त्यापाठोपाठ माय-लेकरावर हल्ल्याची ही घटना असल्याचे समोर आल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.