बीड जिल्हयातील बंद असलेली शासकीय कापूस खरेदी तात्काळ सुरू करावी―पंकजा मुंडे

थकीत रक्कमही बँक खात्यात जमा करण्याची केली मागणी

बीड:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडून बीड जिल्हयात सुरू असलेली शासकीय कापूस खरेदी केंद्रे गेल्या दहा दिवसापासून बंद असल्याने कापूस उत्पादक शेतक-यांना मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे, ही खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावी तसेच कापूस खरेदीचे पैसे त्यांच्या बँक खात्यावर तात्काळ वर्ग करावेत अशी मागणी करत पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे एका निवेदनाद्वारे जिल्हयातील शेतक-यांच्या व्यथा मांडल्या आहेत.

मराठवाड्यात मान्सूनच्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे खरीप हंगामातील पिके शेतकर्‍यांच्या हातून गेली आहेत. त्यात महाराष्ट्रासह मराठवाड्यात झालेल्या परतीच्या पावसाने कापसाची प्रत घसरली असून उताराही घटल्याने खाजगी बाजारात कापसाचे दर कमी झाले आहेत. शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणूक व नुकसान होवू नये म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने २७ नोव्हेंबर पासून शासकीय कापूस खरेदी केंद्रे सुरु केली होती. बीड जिल्ह्यात साधारण २४ कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आली तथापि ती सर्वच खरेदी केंद्र २० जानेवारी पासून बंद झाली आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना कमी भावाने खाजगी व्यापार्‍यांना कापूस विकावा लागत आहे, परिणामी शेतकर्‍याचे आर्थिक नुकसान होत आहे. बीड जिल्ह्यात शासकीय कापूस खरेदी केंद्रात विक्री केलेल्या साधारण ३१ हजार शेतकर्‍यांपैकी १० हजार शेतकर्‍यांना त्यांचा मोबदला अद्यापही मिळालेला नाही. पाऊस नसल्याने अगोदरच दुष्काळी परिस्थिती आणि त्यातच खरेदी केंद्र बंद झाल्याने शेतकरी अधिकच आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान व पिळवणूक थांबविण्यासाठी शासकीय कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू होणे आवश्यक आहेत, कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरु करावीत व प्रलंबित शेतकर्‍यांच्या कापूस खरेदीचा मोबदला लगेचच त्यांच्या बँक खात्यात जमा करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा असे पंकजाताई मुंडे यांनी निवेदनात नमुद केले आहे.


भाजपासाठी 12 वर्षांपासून दिवसरात्र मेहनत करणारे नेते धनराज गुट्टे यांना भाजप ओबीसी मोर्चा किंवा भटके विमुक्त आघाडी राज्याध्यक्ष पदावर नियुक्त करून न्याय द्यावा

भारतीय जनता पक्षासाठी व वंजारी समाजासाठी गेल्या 12 वर्षांपासून दिवसरात्र मेहनत करणारे युवक नेते श्री धनराज विक्रम गुट्टे याना पक्षाने व माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी भाजप ओबीसी मोर्चा महाराष्ट्र किंवा भाजप भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदावर नियुक्त करून न्याय द्यावा औरंगाबाद:आठवडा विशेष टीम― लातूर जिल्ह्यतील अहमदपूर तालुक्यातील येलदरवाडी गावचे सुपुत्र उच्च शिक्षित … Read more

#Breaking: पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या ‘स्त्री जन्माच्या’ आवाहनाला प्रतिसाद

भगवान भक्तीगडावर झाले लेकीच्या जन्माचे स्वागत ; खा.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते मिसाळ दांम्पत्यानी बांधला कन्येला धागा बीड.दि.०२:आठवडा विशेष टीम―समाजात स्त्री जन्माविषयी वेगवेगळ्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करणा-या भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांनी सावरगांवच्या भगवान भक्तीगडावरून केलेल्या आवाहनाला जन माणसातूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा प्रत्यय नुकताच आला. पाटोद्याच्या मिसाळ दाम्पत्यांने पोटी जन्मलेल्या लेकीला खासदार डाॅ प्रितमताई … Read more

परळीतून राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांना १८ हजार मतांची आघाडी

परळी: आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघातुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे ११ व्या फेरीत तब्बल १८,२०६ मतांनी आघाडीवर आहेत. परळी मतदारसंघातून भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे विरुद्ध राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे अशी लढत आहे.राज्यातील मुख्य लक्षवेधी मतदारसंघ असलेल्या परळी मतदारसंघातील या निकालाची उत्सुकता लागली असून कोण विजयी होणार याकडे राज्याचे लक्ष लागून … Read more

सावरगाव (घाट) येथे होणाऱ्या अभूतपूर्व दसरा मेळाव्यास लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा―ऋषिकेश विघ्ने

बीड:आठवडा विशेष टीम― दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या जन्मस्थळ असलेल्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव-घाट येथे होणाऱ्या भव्य दसरा मेळाव्यास यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित (भाई) शहा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याने या मेळाव्याकडे देशाचे लक्ष लागले आहे. तर परळी येथील गोपीनाथ गड येथून भव्य रॅली निघणार आहे.
मंगळवारी ८ ऑक्टोबर दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी रॅली गोपीनाथ गड येथून सुरू होऊन तेलगाव ,बीड ,नायगाव ,सिरसाळा ,वडवणी,वंजारवाडी,तांबा राजुरी मार्गे भगवानभक्ती गड सावरगाव घाट ता.पाटोदा जि.बीड येथे दहा वाजण्याचा सुमारास पोहोचणार आहे.व त्यानंतर अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दसरा मेळावा हा संपन्न होणार आहे.तरी बीड जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांनी या अभूतपूर्व दसरा मेळाव्यास येण्याचे आवाहन पाटोदा भाजपाचे युवा नेते ऋषिकेश विघ्ने यांनी केले आह.

पंकजाताई मुंडे उद्या गुरूवारी भरणार उमेदवारी अर्ज ; भाजपा महायुतीचे भव्य शक्तीप्रदर्शन

शिवाजी चौकातून निघणार भव्य रॅली तर टाॅवरला होणार विराट सभा परळी:आठवडा विशेष टीम―परळी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा – शिवसेना – रिपाइं – रासप – रयत क्रांती महायुतीच्या उमेदवार, राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बालकल्याण मंत्री तथा बीडच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे हया आपला उमेदवारी अर्ज उद्या गुरुवारी (ता.०३) भव्य शक्तीप्रदर्शनाने दाखल करणार आहेत. शहरातुन भव्य … Read more

बारा बलुतेदार समाज बांधवांची संपूर्ण ताकद पंकजा मुंडेंच्या पाठीशी ;सन्मानपूर्वक विजयासाठी समाज बांधव एकवटले

यशःश्री निवासस्थानी भेटून मानले आभार

परळी दि.२२:आठवडा विशेष टीम―राज्याच्या ग्रामविकास व महिला बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी बारा बलुतेदार समाजाला विकासाचा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मागणी पेक्षा जास्त निधी देऊन समाजाचा सन्मान राखला आहे.ना.पंकजाताई मुंडे यांच्या वंचित घटकांना न्याय देण्याच्या कटिबद्धतेमुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना सन्मानाचा विजय मिळवून देण्याचा निर्धार बारा बलुतेदार समाजाने व्यक्त केला.

बारा बलुतेदार समाजाने पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांची परळी येथील यश:श्री निवासस्थानी भेट घेतली. गेल्या आठवड्यात खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या खासदार निधी अंतर्गत सुतार समाजासाठी वैद्यनाथ मंदिर परिसरात सभागृहासाठी दहा लक्ष रुपये, दशनाम गोसावी समाजासाठी वैजनाथ मंदिर परिसरात सभागृहासाठी दहा लक्ष रुपये ,गाढे पिंपळगाव येथे सुतार समाजासाठी पाच लक्ष रुपये निधी मंजूर केल्या बद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.

याप्रसंगी बारा बलुतेदार समाजाच्या शिष्टमंडळाने ना.पंकजाताई मुंडे यांचा सत्कार करताना “कायम दुर्लक्षित राहिलेल्या बारा बलुतेदार समाजाला विकासाचा परीसस्पर्श देऊन पंकजाताईंनी समाज धारेच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेतले असून पंकजाताईंच्या कटिबद्धतेची उतराई होण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत पंकजाताईंच्या विजयात एकजुटीने परिश्रम घेऊ अशी भावना व्यक्त केली.याप्रसंगी बारा बलुतेदार समाजातील कुंभार,गोसावी,सुतार,माळी समाजासह सर्व बारा बलुतेदार समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.


मंत्री, आमदारांप्रमाणेच सरपंचही घेणार आता पद आणि गोपनियतेची शपथ!―ग्रामविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी दिली प्रस्तावास मान्यता

मुंबई दि.१६:आठवडा विशेष टीम― मंत्री,आमदारांप्रमाणेच थेट जनतेतून निवडून आलेला सरपंचही आता पद आणि गोपनियतेची शपथ घेणार आहे, राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी नुकतीच या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. थेट जनतेतून निवडून आलेला सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची ग्रामपंचायत बाबत असलेली बांधिलकी आणि गावाच्या विकासाच्या दृष्टीने असलेली जबाबदारी याबाबत गावातील जनतेमध्ये तसेच … Read more

बीड: प्रीतमताई मुंडे 1 लाख 77 हजार 829 मतांनी विजयी

आठवडा विशेष टीम― खा.प्रीतम गोपीनाथ मुंडे १ लाख ७७ हजार ८२९ मतांनी विजयी झाल्या आहेत परंतु आणखी पोस्टल मतदान बाकी आहे.भाजपच्या बीड लोकसभा निवडणूक २०१९ साथीच्या उमेदवार डॉ प्रितम गोपीनाथ मुंडे यांना आष्टी विधानसभा मतदारसंघातुन ७०,०४४ एवढे मताधिक्य मिळाले आहे.आणि परळी – १८,९१९ ,माजलगाव – १९,७१६, केज – २८,०००, गेवराई – ३४,८८८,बीड – ६,२६२ अश्या … Read more

बीडमधून डाॅ.प्रितम मुंडे यांचा विजय निश्चित ; मुंडे भगिनींची राष्ट्रवादी काँग्रेसला धोबीपछाड

१६ व्या फेरी अखेर ७० हजार मतांनी आघाडीवर

परळीत ‘यशश्री’ निवासस्थानाबाहेर भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष

बीड दि. २३:आठवडा विशेष टीम लोकसभेच्या निवडणुकांची आज मतमोजणी सुरु असून देशभरात भाजप अभूतपूर्व आघाडीवर आहे. बीड जिल्ह्यातही खा. प्रीतामताई मुंडे या १६ व्या फेरीअखेर ७० हजार मतांनी आघाडीवर होत्या. मतमोजणीचा ट्रेंड पाहता खा. प्रीतमताई यांच्या विजयाच्या घोषणेची केवळ औपचारिकता बाकी असल्याने कार्यकर्त्यांचा ‘यशश्री निवासस्थानी प्रचंड जल्लोष सुरु आहे. पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे आणि खा. प्रीतमताई मुंडे यांनी देखील कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांचा आनंद द्विगुणीत केला आणि जिल्ह्यातील सर्व जनतेचे आभार मानले.

बीडची निवडणूकीबाबत राज्यभरात प्रचंड उत्सुकता होती. खा. प्रीतमताई मुंडे या स्वकर्तुत्वावर प्रथमच निवडणुकीला सामोरे गेल्या. प्रत्येक सभातून त्यांनी पाच वर्षात केलेल्या विकासकामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडतानाच भविष्यातील विकासकामांचा आराखडा देखील जनतेसमोर ठेऊन आश्वासित केले. ना. पंकजाताईंनी विरोधकांच्या जातीपातीच्या राजकारणाचे वाभाडे काढत त्यांची पोलखोल केली. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसने विकासाबाबत कुठलेही भाष्य न करता केवळ मुंडे भगिनींना दुषणे देण्यात धन्यता मांडली अतिशय खालची पातळीवर जाऊन मुंडे भगिनीं टीका करण्यात आली. याची चीड जनतेच्या मनात होती, तीच मतदानातून दिसून आली. मुंडे भगिनींनी विरोधकांच्या टोळीला जबरदस्त धोबीपछाड दिली असून १६ व्या फेरीपर्यंतच खा. प्रीतमताई ७० हजाराची आघाडी घेऊन विजयाच्या नजीक गेल्या आहेत.सकाळपासून निकालाकडे लक्ष लावून बसलेल्या कार्यकर्त्यांना ताईंच्या विजय जवळ आल्याचा अंदाज येताच त्यांनी यशश्री निवासस्थनाकडे धाव घेतली. कार्यकर्त्यांचे जत्थेच्या जत्थे वाजत गाजत आणि फटक्यांची आतिषबाजी करत यशश्री निवासस्थानाकडे येत आहेत. कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि उत्साह पाहून मुंडे भगिनींनी त्यांची भेट घेऊन त्यांचा आनंद द्विगुणीत केला. दरम्यान, खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांना आघाडी मिळताच त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे यांनी पंकजाताई व प्रीतमताई यांचे पेढा भरवून अभिनंदन केले. यावेळी मुंडे साहेबांच्या आठवणीने त्यांना गहिवरून आले.

मुंडे साहेबांचा आशीर्वाद व कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे यश

यावेळी माध्यमांसमोर बोलताना पंकजाताईंनी जिल्ह्यातील सर्व जनतेचे आभार मानले. स्व. गोपीनाथराव मुंडे यांचा विकासाचा वारसा भविष्यातही चालू ठेऊ अशी ग्वाही त्यांनी दिली. जिल्ह्यातील जनतेने जातीपातीच्या राजकारणाला थारा न देता विकासाची कास धरली. खा. प्रीतमताई मुंडे यांच्या विकास कामांना जनतेने कौल दिला. त्यांच्या विश्वासाला कदापीही तडा जाऊ देणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणीने पंकजाताई भावूक

आज विजयाच्या वाटेवर असताना ना. पंकजाताई मुंडे साहेबांच्या आठवणीने भावूक झाल्या. सकाळी त्यांनी स्वतःचा व प्रितमताई यांचा बालपणीचा मुंडे साहेबांना फोनवर बोलतानाचा फोटो ट्विट केला होता. माझे बाबा तथा माझे नेते मुंडे साहेब यांची याप्रसंगी खूप आठवण येत असल्याचे त्यांनी सांगितले. हे यश त्यांचेशी शेअर करता येत नाही पण आज त्यांना आमचे नक्कीच कौतुक वाटले असते आणि त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला असता अशी भावनिक प्रतिक्रिया पंकजाताईंनी दिली.


दुष्काळग्रस्त मराठवाड्याला राज्याच्या अन्य धरणांतून पाणी देण्याची पंकजा मुंडे यांची मागणी

सिंचन अनुशेष अन् पाण्याची तुट भरून काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांना दिले पत्र

मुंबई दि.०२: सिंचन अनुशेष आणि पाण्याची तुट भरून काढण्यासाठी मराठवाडा विभागाला राज्यातील इतर धरणांतून पाणी उपलब्ध करून द्यावे तसेच गेल्या काही वर्षापासून या भागाला देय असलेले अनुशेष अनुदान तातडीने देऊन दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका पत्राद्वारे केली आहे.

मराठवाड्यात सध्या दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. विभागातील ७६ तालुक्यांपैकी ५३ तालुके अवर्षण प्रवण क्षेत्रात आहेत. नवीन प्रकल्पासाठी मराठवाड्यात पाणी शिल्लक नाही. येत्या दहा वर्षाच्या काळात महाराष्ट्रातील सिंचन सरासरी बरोबर येण्यास, मराठवाड्याला १५०.१८५ टीएमसी पाणी इतर खोऱ्यातून स्थलांतरीत करणे आवश्यक आहे असे ना. पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे.

कोकण विभागातील दमनगंगा, नारपार, पिंजाळ व वैतरणा खोऱ्यात २६४ टीएमसी  पाणी उपलब्ध असून त्यातून ११५ टीएमसी पाणी अप्पर वैतरणा धरणामार्फत गोदावरी खोऱ्यात स्थलांतरीत करता येते. जायकवाडी धरण, वॉटर ग्रीडसाठी ३५ टीएमसी  पाणी वापरुन ८० टीएमसी पाणी औरंगाबाद, जालना,बीड आदी जिल्हयात वापरता येईल. कृष्णा खोऱ्यातील ५८५ टीएमसी पाणी महाराष्ट्रात वापरण्याची परवानगी लवाद क्रमांक १ नुसार शासनास मिळाली आहे.  मराठवाड्याचा ८.४ टक्के भाग कृष्णा खो-यात येत असल्यामुळे  उस्मानाबाद  व  बीड जिल्हयात ४९.१ टीएमसी पाणी  वापरण्याचा  हक्क मराठवाडयाला पोहचतो परंतु, आजपर्यंत फक्त २५.४ टीएमसी  पाणी मिळाले असून २३.७ टीएमसी पाणी मिळणे बाकी आहे. यावरुन कृष्णा मराठवाडा प्रकल्पास (केएमपी) लागणारे मुळे नियोजनानुसार २३.६६ टीएमसी पाणी (७ टीएमसी ऐवजी) वापरुन कृष्णा मराठवाडा प्रकल्प लवकर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात नमुद केले आहे.

इतर धरणांतून पाणी द्यावे

सन १९८० च्या लवादानुसार गोदावरी खो-यातून पोलावरम प्रकल्पाकरीता कृष्णा खोऱ्यात ८० टीएमसी पाणी देताना महाराष्ट्राच्या वाट्याचे १४ टीएमसी आणि कर्नाटकाचे २१ टीएमसी असे एकूण ३५ टीएमसी पाणी देण्याची तरतूद गोदावरी लवादात आहे. शिवाय हे पाणी नागार्जुन सागर धरणाच्या वरील भागातून महाराष्ट्राने परत घ्यावयाचे आहे, त्यामुळे लवाद तरतुदीनुसार हे १४ टीएमसी पाणी कृय्णा खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यात लातूर, बीड, उस्मानाबाद या अवर्षण प्रवण जिल्हयात मिळणे आवश्यक आहे. हे पाणी कृष्णा खोऱ्यात वापरण्याचे त्यांना हक्क पोहचत नाही.मराठवाड्यातील काही पूर्व भागास विदर्भातून पाणी स्थलांतरीत करणे सोईचे आहे. त्यामुळे विपुल पाणी असणाऱ्या वर्धा, वैणगंगा, इंद्रावती इत्यादी उप खोत्यातून अंदाजे ३० टीएमसी पाणी मराठवाड्यास मिळणे आवश्यक आहे. हे पाणी नांदेड जिल्हयातील अप्पर पैनगंगा धरणात व परभणी जिल्हयातील येलदरी धरणात स्थलांतरीत करता येते. कारण ह्या धरणांच्या वरील बाजूस विदर्भात बरीच धरणे बांधल्यामुळे या धरणात सध्या पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होत नाही. त्यामुळे विदर्भातील पाणी या धरणांसाठी वापरणे संयुक्तीक ठरेल असेही त्यांनी म्हटले आहे.

अनुशेष अनुदान देण्याची गरज

अमरावती विभागास सन २०१० पासून दरवर्षी अनुशेष अनुदान मिळते.आज पर्यंत ६८९८ रुपये कोटी त्यांना मिळाले आहेत, त्यानुसार मराठवाडा विभागास कमीत कमी रूपये ५०० कोटी अधिक मागील नऊ वर्षाचा वाटा असे अनुशेष अनुदान मिळणे आवश्यक आहे.
मराठवाड्याला महाराष्ट्राच्या सरासरी विकासाबरोबर आणावयाचे असल्यास सिंचन वाढविण्यासाठी १५० टीएमसी पाणी इतर खोऱ्यातून स्थलांतरीत करण्यासाठी निर्णय घेणे तसेच जायकवाडीच्या वर ११५.५ टीएमसी क्षमतेचे धरण बांधणे आवश्यक असताना १६१ टीएमसी ची म्हणजेच जास्तीची (४५ टीएमसी) धरणे बांधली, तेवढे पाणी (कमीत कमी ३५ टीएमसी) कोकण विभागातून वैतरणा धरणामार्फत मराठवाड्यास उपलब्ध करणे आवश्यक आहे. मराठवाड्यातील सिंचन अनुशेष आणि पाण्याची तुट भरुन काढण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी, अशी विनंती ना. पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

शेख तौसिफ यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही – पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या शोकभावना

बीड दि. ०२: नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या शेख तौसिफ या आपल्या भूमीपुत्राचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, त्यांच्या कुटूंबियांवर कोसळलेल्या दुःखात मी सहभागी आहे अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

गडचिरोली जिल्हयात नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात पाटोदा येथील शेख तौसिफ शेख आरेफ हा जवान शहीद झाला, या घटनेबद्दल पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. शेख तौसिफ यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. शेख तौसिफ यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे, हा जिल्हा त्यांचे बलिदान व शौर्य कदापि विसरणार नाही अशा शब्दांत ना. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

‘वैद्यनाथ’ ने ऊस उत्पादकांना दिली एफआरपी ची रक्कम ; राहिलेले ६०० रूपयेही बॅकेत वर्ग

सिरसाळ्याच्या सभेत शेतकऱ्यांनी मानले पंकजा मुंडे यांचे आभार

परळी दि.१४: वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतक-यांना एफआरपी प्रमाणे रक्कम अदा केली असून राहिलेले ६०० रूपये देखील बॅकेत वर्ग केले आहेत, सोमवारी सर्व शेतक-यांना ही रक्कम मिळणार आहे. दरम्यान, काल सिरसाळा येथे झालेल्या सभेत ऊस उत्पादक शेतक-यांनी कारखान्याच्या अध्यक्षा तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांचे याबद्दल आभार मानले आहेत.

सन २०१८ – १९ या गळीत हंगामात ४ लाख ३५ हजार मे.टन ऊसाचे गाळप झाले होते. गाळप झालेल्या ऊस उत्पादकांना वैद्यनाथ कारखान्याने प्रति टन एक हजार ४०० रूपयांचा पहिला हप्ता त्यांच्या बॅक खात्यात नुकताच जमा केला होता. एफआरपी नुसार आणखी सहाशे रूपये म्हणजे एकूण दोन हजार रूपये शेतक-यांना द्यायचे होते. काल ना पंकजाताई मुंडे यांनी याबाबत निर्णय घेऊन राहिलेली प्रति टन ६०० रूपयाची रक्कमही शेतक-यांच्या बॅक खात्यात जमा केली. उद्या सोमवारी संबंधित शेतक-यांना त्यांच्या खात्यातून ही रक्कम काढता येणार आहे.

एक रूपयाही कपात न करता एफआरपी दिली ; शेतक-यांनी मानले आभार

मागील तीन वर्षात एका मागोमाग एक नैसर्गिक संकटं कारखान्यावर आली होती त्यामुळे कारखान्याला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले होते. असे असले तरी ना. पंकजाताई मुंडे हया ऊस उत्पादकांच्या पाठिशी नेहमीच खंबीरपणे उभा राहील्या. दुष्काळामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस पुर्णपणे वाळून गेला होता, ना. पंकजाताई मुंडे यांनी नफा तोटा न बघता शेतक-यांचा संपूर्ण ऊस गाळप केला शिवाय एक रूपयाही कपात न करता एफआरपी ची रक्कम दिली, त्यामुळे आनंदित झालेल्या सिरसाळा, पांगरी, गाढे पिंपळगांव परिसरातील शेतक-यांनी सिरसाळा येथे सुरू असलेल्या प्रचार सभेत जाऊन पंकजाताई मुंडे यांचा सत्कार केला व त्यांचे आभार मानले.


राष्ट्रवादीची अवस्था बिना वऱ्हाडीच्या वरातीसारखी ―ना.पंकजा मुंडे

परळीच्या सभेत ना. पंकजाताई मुंडेंची जोरदार फटकेबाजी परळी दि. ०९: लग्नघटिका जवळ आलीय, बॅण्डबाजा वाजतोय, राष्ट्रवादीचा नवरदेव सजून घोडीवर बसलाय. वरात निघालीय. घोडीवाला घोडी बळेच ओढतोय, पण वऱ्हाडी आहेत कुठं? समोर नाचायलाही कोणीच नाही आणि मागेही कोणीच नाही. त्यांच्या सगळे वऱ्हाडी तर आमच्या वरातीत सामील झाले आहेत असे म्हणत शेलक्या शब्दात राज्याच्या ग्रामविकास आणि महिला … Read more

ज्यांनी विरोधी पक्ष नेते पदावर बसवले, त्यांनाच उमेदवारी मिळू दिली नाही,म्हणून गेवराई मतदार संघात राष्ट्रवादीच्या सभेला गर्दी जमत नाही- ना.पंकजाताई मुंडे

मादळमोहीच्या सभेत विराट जनसमुदयाचे दर्शन, आता मला चिंता नाही बीड (प्रतिनिधी): लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांना उमेदवार सोबत असतानाही सभेला गर्दी जमत नाही यांचे कारण लोकाच्या मनात उमेदवारी बदलल्याचा राग असून ज्यांनी विरोधी पक्ष नेते पदावर बसवले त्यांच्याच पाठीत खंजिर खुपसण्याचे काम धनंजय मुंडेंनी केले. राजकारणात संधी अली होती पण मित्राला त्यांनी धोका दिला जे लोक … Read more

जयदत्त आण्णा शुक्रवारी घेणार का ‘या’ पक्ष प्रवेशाचा निर्णय ?

बीड : ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर बीड मध्ये राजकीय भूकंप होईल का ?,’ते’ भाजपा प्रवेशाच्या तयारीत आहेत का? असा प्रश्न जिल्ह्यातील मतदार जनतेला पडला आहे. मागील काही वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीपासून दुरावलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे येत्या शुक्रवारी आपली राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत. ५ एप्रिल रोजी क्षीरसागरांनी समर्थकांची व्यापक बैठक आयोजित केली असून या बैठकीत त्यांची यापुढील राजकीय वाटचाल निश्चित होणार आहे. क्षीरसागर यांच्या भूमिकेकडे बीड जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागुन आहे.

बीड जिल्ह्यातील राजकारणात कायमच आपला दबदबा ठेऊन असलेले जयदत्त क्षीरसागर म्हणजे राज्यातील ओबीसी समाजाचे मोठे नेतृत्व आहे. अखिल भारतीय तैलिक महासभेच्या माध्यमातून ते देशभरातील तेली समाजाचे नेते म्हणून पुढे आलेले आहेत. जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात राजकीय भूकंप घडविण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणारा बीड जिल्ह्यात सर्व जागांवर भाजपने झेंडा फडकवला, मात्र एकमेव जयदत्त क्षीरसागर हे आपला गड राखण्यात यशस्वी ठरले होते. त्यानंतर दोन वर्षांनीच एकेकाळी राष्ट्रवादीतील वजनदार नेते असणारे जयदत्त क्षीरसागर अंतर्गत गटबाजीमुळे पक्षापासून दुरावले. त्यांच्या नाराजीची उघडपणे चर्चा होऊ लागली. मात्र, मागील वर्षाच्या अखेरीस बीड येथे शरद पवारांच्या सभेत त्यांनी हजेरी लावल्यामुळे त्यांची नाराजी दूर झाली असावी असा अंदाज बांधण्यात येऊ लागला होता परंतु, त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात परळी येथे राष्ट्रवादीच्या निर्धार यात्रेच्या समारोपाकडे त्यांनी पूर्णपणे पाठ फिरवली होती. त्यावेळेस पासूनच क्षीरसागर वेगळी राजकीय भूमिका घेणार अशी चर्चा होऊ लागली. सध्या देशभरात सर्वत्र लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना क्षीरसागर मात्र अद्यापपर्यंत शांत असल्यामुळे त्यांच्या समर्थकांतही अस्वस्थतेचे वातावरण होते. त्यामुळे त्यांनी राजकीय भूमिका स्पष्ट करावी असा आग्रह समर्थकांनी धरला होता. अखेर कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन आ.जयदत्त क्षीरसागर आणि बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी ५ एप्रिल रोजी आशीर्वाद लॉन्स येथे जिल्हाभरातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजीत केला आहे. या मेळाव्यात आ.जयदत्त क्षीरसागर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत व याच वेळी आपली भूमिका मांडणार आहेत.आ.जयदत्त क्षीरसागर कोणामागे आपली राजकीय ताकद लावणार आहेत याबद्दल जिल्ह्यात उत्सुकता लागली आहे.