जादूच्या कांडीने दिला आ.विनायक मेटे यांना जबर धक्का ; शिवसंग्रामचे जि.प. गटनेते अशोक लोढा, विजयकांत मुंडे भाजपात

पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत बीडमध्ये केला प्रवेश

बीड दि. २३: लोकसभा निवडणुकीत जिल्हयात भाजपच्या विरोधात उघड भूमिका घेणा-या आ. विनायक मेटे यांना जबर धक्का बसला. मेटे यांचे कट्टर समर्थक असलेले शिवसंग्रामचे जिल्हा परिषदेतील गटनेते अशोक लोढा व जि. प. सदस्य विजयकांत मुंडे यांनी आज राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करून एकच खळबळ उडवून दिली.

राज्यात भाजपा सोबत पण जिल्हयात मात्र पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या विरोधात प्रचार करणार असल्याची उघड भूमिका आ. विनायक मेटे यांनी नुकतीच घेतली होती. त्यांच्या या दुटप्पी भूमिकेवर त्यांचे समर्थकच नाराज झाले होते. अनेकांना ही भूमिका रूचली नाही, पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांना विनाकारण टोकाचा विरोध करण्याच्या त्यांच्या हट्टामुळे शिवसंग्रामच्या अनेकांनी त्यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला, त्याचाच परिणाम म्हणून आज दोन्ही जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी भाजपात प्रवेश केला.

बीडमध्ये येताच ना. पंकजाताईंनी दिला हादरा

भाजपा महायुतीच्या उमेदवार खा. डाॅ प्रितमताई मुंडे यांचा उमेदवारी अर्ज येत्या सोमवारी भरण्यात येणार आहे, त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांचे आज संध्याकाळी बीडमध्ये आगमन झाले. शहरात येताच विनायक मेटे यांना त्यांनी जबरदस्त धक्का दिला. मेटेंच्या कार्यपध्दतीवर नाराज असलेले राजेंद्र मस्के यापूर्वीच भाजपात आले होते आता जि. प. गटनेते अशोक लोढा व जि प सदस्य विजयकांत मुंडे यांनीही भाजपात प्रवेश केला. जिल्हा परिषदेत शिवसंग्रामच्या चार सदस्यांपैकी तीन सदस्य आता भाजपात आल्याने मेंटेंच्या विरोधाचा दांडा मोडून गेला आहे. लोढा व मुंडे यांच्या प्रवेशाचे ना. पंकजाताई मुंडे यांनी स्वागत केले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, विजय गोल्हार, राजाभाऊ मुंडे, समाजकल्याण सभापती संतोष हंगे, सर्जेराव तांदळे, स्वप्नील गलधर, मुन्ना फड, आदी उपस्थित होते. दरम्यान, शिवसंग्रामच्या या दोन दिग्गज कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेशाने मेटे पुरते हादरल्याचे समजते.


माझ्या घरात विरोधी पक्षनेते पद आले, त्याचवेळी पुढच्या पाच वर्षात काय होणार हे मला कळून चुकले होते―पंकजा मुंडे

ना. पंकजाताई मुंडे यांची बीबीसी मराठी वाहिनीवर धुवांधार बॅटींग मुंबई दि. १९(वृत्तसंस्था): माझ्या घरात ज्यादिवशी विरोधी पक्षनेते पद दिले गेले त्याचवेळी पुढच्या पाच वर्षात काय होणार हे मला कळून चुकले होते, याचाच परिणाम म्हणून सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये वारंवार जे अमृत मंथन व्हायचे त्यातील आरोपांचे हलाहल (विष) प्राशन करण्याचे काम माझ्या वाट्याला आले, माझ्या विषाची … Read more

लोकसभा 2019: बीड मध्ये प्रितमताई मुंडे विरुद्ध राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे

बीड :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभेसाठीच्या उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. यामध्ये बीड लोकसभा मतदार संघातून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे. तर लोकसभा निवडणुकीमध्ये डॉ. प्रितमताई मुंडे याच निवडणूक लढवणार असल्याचे भाजपने घोषीत केले आहे. त्यामुळे आता प्रितमताई मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे यांच्यात जोरदार लढत होणार आहे. मंत्री पंकजा मुंडे यांनी चार वर्षांत विकासकामांसाठी … Read more

…तर मग खा.प्रितमताईंना बिनविरोधच का नाही?

लोकसभा निवडणुका जाहिर झाल्या, आचारसंहिता लागली. १८ एप्रिलला बीडचं मतदान आहे. हे सुद्धा निवडणुक आयोगाने जाहिर केलं. आता केवळ ३४ दिवस बाकी आहेत. एवढं असताना शेवटच्या क्षणापर्यंत या मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाला उमेदवाराचा शोध लागत नाही. हे राजकीय दुर्दैव असुन दुसर्‍या बाजुने विद्यमान खा.डॉ.प्रितमताई गोपीनाथ मुंडे यांना बिनविरोधच निवडुन विरोधक का देत नाहीत?हा सवाल आता मतदार … Read more

राष्ट्रवादीने बारा किलोमीटरचा तरी रस्ता केला का? – ना. पंकजाताई मुंडे

भाजप सरकारमुळेच बीड जिल्हा विकासाच्या महामार्गावर येडशी-औरंगाबाद महामार्गाचे गेवराईत झाले थाटात लोकार्पण महामार्गामुळे मराठवाडयाच्या विकासाला गती – ना. नितीन गडकरींनी व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे साधला संवाद गेवराई दि. ०९ : बीड जिल्हा हा लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा जिल्हा आहे, ही जाण केंद्र व राज्यातील भाजप सरकारला असल्यामुळेच कधी नव्हे तो कोट्यवधी रुपयांचा विकास निधी या जिल्हयात आला, … Read more

मंत्री पंकजा मुंडे यांनी सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या कुटूंबियांची केली काळजी ; आजी-माजी सैनिकांच्या शिक्षक पत्नींच्या आंतरजिल्हा बदलीचा मार्ग केला मोकळा

जागतिक महिला दिनी घेतला ऐतिहासिक निर्णय

मुंबई दि. ०८: राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी देशाच्या सीमेवर प्राणपणाने लढणा-या कुटूंबियांची काळजी घेत आज एक ऐतिहासिक निर्णय घेतला. जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या आजी-माजी सैनिकांच्या शिक्षक पत्नींना आता या निर्णयामुळे आंतरजिल्हा बदलीने त्यांच्या मुळ जिल्हयात जाता येणार आहे. बदलीचा हा मार्ग सहज सोपा करून त्यांनी जवानांच्या कुटूंबियांना मोठा दिलासा दिला आहे.

जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या सध्या संगणकीय प्रणालीद्वारे केल्या जातात. बदल्यांची ही प्रक्रिया चार टप्प्यात केली जात असली तरी दुस-या टप्प्यात विशेष संवर्ग भाग १ मध्ये गंभीर आजाराने त्रस्त असलेले कर्मचारी, अपंग कर्मचारी, आजी-माजी सैनिक व अर्ध सैनिक जवानांच्या पत्नी/ विधवा यांचा समावेश आहे. आपले सैनिक देशाच्या सीमेवर प्राणपणाने लढत प्रतिकुल परिस्थितीत देशाचे संरक्षण करत असतात, मात्र त्यांचे कुटूंब त्यांच्या मुळ गांवी असतेच असे नाही, ब-याच वेळा अशा सैनिकांच्या पत्नी जिल्हा परिषदेत शिक्षिका म्हणून कार्यरत असतात. मुळ गावांपासून त्या दूर ठिकाणी कार्यरत असल्यास अशा वेळी त्यांना अनेक कौटूंबिक अडचणींना सामोरे जावे लागते.

ना. पंकजाताई मुंडेंचा ऐतिहासिक निर्णय

आजी-माजी सैनिकांच्या शिक्षक असलेल्या पत्नींच्या आंतरजिल्हा बदली ना. पंकजाताई मुंडे यांनी आज जागतिक महिला दिनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाने सोपी झाली आहे. जवानांच्या शिक्षक पत्नींना त्यांच्या मुळ जिल्हया ऐवजी अन्य जिल्हयात कार्यरत असल्यास आणि त्यांना आंतरजिल्हा बदलीने मुळ जिल्हा परिषदेत जायचे असल्यास त्यांची त्या ठिकाणी तात्काळ बदली करण्याचे आदेश ना. पंकजाताई मुंडे यांनी दिले आहेत. संबंधित जिल्हा परिषदेने त्यांना हजर करून घेताना प्रवर्ग बिंदूनुसार त्यांचे समायोजन करावे, तथापि संबंधित शिक्षकाच्या निवडीच्या प्रवर्गाचा बिंदू नसल्यास त्याला रिक्त पदांवर रूजू करावे आणि त्याच्या प्रवर्गाचा बिंदू ज्यावेळी रिक्त होईल त्यावेळी त्या बिंदुवर त्याचे समायोजन करावे असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.


महिला दिनी ‘अस्मिता बाजार’ योजनेचा मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ

महिला बचतगट आता करणार ‘ऑनलाईन रिटेलिंग’

मुंबई, दि. ८ : ग्रामीण भागातील महिला बचतगटांना त्यांच्या उत्पादनांची आता ‘अस्मिता’ ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन विक्री करता येणार आहे. याशिवाय खाद्यपदार्थ, लहान मुलांना लागणाऱ्या आवश्यक वस्तू, सौंदर्य प्रसाधने, घरगुती उपयोगी वस्तू, पशू खाद्य आदी साहित्याचीही या ॲपच्या सहाय्याने बचतगटांना रिटेलर म्हणून विक्री करता येणार आहे. आज जागतिक महिला दिनी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला-बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते यासंदर्भातील ‘अस्मिता बाजार’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला. प्ले स्टोअरवर यासाठीचे ‘अस्मिता ॲप’ उपलब्ध असून त्या माध्यमातून महिला बचतगटांना ई-कॉमर्सची संधी मिळाली आहे.

सॅनिटरी नॅपकीनसाठी ‘अस्मिता प्लस’ योजनेचा शुभारंभ

येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामीण जीवनोन्नती अभियान विभागामार्फत आयोजित या कार्यक्रमात महिलांना दर्जेदार सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करुन देणाऱ्या ‘अस्मिता प्लस’ योजनेचा शुभारंभही मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. अस्मिता प्लस हे फोल्डींग नसलेले, लिकप्रुफ टेक्नॉलॉजी असलेले व अधिक लांबीचे (२८० एमएम) सॅनिटरी नॅपकीन आहे. या सॅनेटरी नॅपकीनमुळे शरीरावर कोणत्याही प्रकारचे रॅशेस येणार नाहीत व वापर कालावधीत ओलसरपणा जाणवणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. फक्त ५ रुपयांमध्ये ग्रामीण भागातील मुलींना हे सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध होणार आहेत.

मंत्री पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या की, महिला ह्या जोपर्यंत कुटुंबाचा आर्थिक आधार बनत नाहीत तोपर्यंत त्यांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण होणार नाही. यासाठीच ग्रामविकास आणि महिला-बालविकास विभागामार्फत बचतगटांच्या चळवळीला गती देण्यात आली आहे. राज्यात साडेतीन लाख बचतगट स्थापन झाले असून त्या माध्यमातून ४० लाख कुटुंबे उमेद अभियानाशी जोडली गेली आहेत. बचतगटांना फक्त पारंपारीक बाजारपेठेत अडकवून न ठेवता ई-कॉमर्सच्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून दिली जात आहे. यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत (माविम) बचतगटांची काही उत्पादने ॲमेझॉनवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. उमेद अभियानामार्फत ‘सरस महालक्ष्मी’ हे मोबाईल ॲप सुरु करण्यात आले आहे. आज सुरु करण्यात आलेल्या ‘अस्मिता बाजार’ योजनेच्या माध्यमातून बचतगटांची ऑनलाईन व्यापाराची चळवळ अजून गतिमान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता म्हणाले की, मासीक पाळीच्या काळात महिलांनी सॅनिटरी नॅपकीन वापरण्याचे प्रमाण फक्त १७ टक्के इतके आहे. येत्या काही काळात अस्मिता योजनेच्या माध्यमातून हे प्रमाण ८० ते ९० टक्क्यांपर्यंत नेण्याचे आमचे उद्दीष्ट आहे. आज सुरु करण्यात आलेल्या ‘अस्मिता प्लस’ योजनेतून ही चळवळ अधिक गतिमान होईल. ‘अस्मिता बाजार’ योजनेतून महिला बचतगटांना रोजगार मिळण्याबरोबरच ग्रामीण ग्राहकांना विविध वस्तू माफक दरात उपलब्ध होणार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यावेळी म्हणाल्या की, ग्रामीण भागातील महिला आता ऑनलाईन व्यवहार, ई-कॉमर्स आदींमध्ये पारंगत होत आहेत. उमेद अभियानामार्फत यासाठी त्यांना विविध प्रशिक्षणे देण्यात येत आहेत. यासाठीच आज ‘अस्मिता बाजार’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला असून या माध्यमातून बचतगटांच्या उत्पादनांना मोठे ऑनलाईन मार्केट मिळेल. पहिल्या टप्प्यात पालघर, नाशिक, रायगड, पुणे, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास निवृत्त अपर मुख्य सचिव सुधीरकुमार गोयल, उमेद अभियानाचे मुख्य परिचालन अधिकारी रवींद्र शिंदे, उपसंचालक प्रकाश खोपकर, अनिल सोनवणे यांच्यासह बचतगटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


बचतगटांमुळे महिला बनल्या कुटूंबाचा आर्थिक कणा – ना. पंकजा मुंडे

महाशिवरात्री निमित्त परळीत भरले ग्रामीण महिला बचतगटांच्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन ; ना. पंकजाताई मुंडेंच्या हस्ते झाले थाटात उदघाटन

परळी दि. ०४ : महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी व्हाव्यात, समाजात त्यांना सन्मान व प्रतिष्ठा मिळावी हा दृष्टिकोन समोर ठेवून सरकारने बचतगटांची चळवळ प्रभावीपणे राबविल्यामुळे आज महिला कुटूंबाचा आर्थिक कणा बनल्या आहेत, महिलांची ही ताकद आणखी वाढविण्यासाठी मी कटीबध्द आहे असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ग्रामविकास विभाग व जिल्हा ग्रामीण यंत्रणेच्या वतीने महाशिवरात्रीचे औचित्य साधून अमर मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रामीण महिला स्वयं सहायता बचतगटांच्या उत्पादित वस्तूंचे भव्य विक्री व प्रदर्शनाचे उदघाटन ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. आ. संगीता ठोंबरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, राज्य बाल हक्क आयोगाच्या सदस्या डाॅ शालिनी कराड, भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी ग्रामीण बचतगटांच्या महिलांना संबोधित करताना ना.पंकजाताई मुंडे पुढे बोलतांना म्हणाल्या, माझ्या सत्तेच्या कारकिर्दीत आपल्या जिल्ह्यात बचतगटाची चळवळ अधिक गतीमान झाली. महिला व बालविकास विभागाची मंत्री या नात्याने आज बीड जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात महिला बचत गटांची स्थापना झाली असून ही प्रक्रिया आणखी वाढीस लावण्याचा माझा प्रयत्न आहे. आज आमच्या माता भगिनींच्या हातात पैसा येतो आहे, ऊसतोड मजूर म्हणून काम करणा-या महिला स्वतःचा व्यवसाय करत आहेत, महिलांना समाजात सन्मान देणा-या योजना आम्ही राबविल्या, त्यामुळे बचतगटांच्या चळवळीचे यश आज दिसत आहे. परळी तालुक्यातील बचत गटांच्या महिलांनी बाहेर जाऊन आपला व्यवसाय वाढवावा व स्वावलंबी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

‘भारत के वीर’ उपक्रमाला हातभार

पुलवामा हल्ल्यातील भारतमातेच्या वीर शहीद सुपुत्रांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी ना.पंकजाताई मुंडे यांनी ‘भारत के वीर’ हा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील विविध भागांतील लोकांकडून या उपक्रमाला प्रतिसाद मिळत असून विविध प्रशासकीय विभागांच्या कर्मचाऱ्यां सोबत ग्रामीण भागातील महिला देखील यात सहभाग नोंदवत मोठा आर्थिक निधी देत आहेत. आजच्या कार्यक्रमात तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील प्रभात ग्रामसंघाच्या वतीने ५१ हजार रुपयांचा धनादेश ना.पंकजाताई मुंडे यांच्याकडे यावेळी सुपूर्द करण्यात आला. या प्रदर्शनात ग्रामीण भागातील बचतगटांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे ३० स्टाॅल्स उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. ग्रामीण बचतगटांच्या महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याला प्रारंभ; थाटात पार पडले बौध्द, मुस्लिम दाम्पत्यांचे विवाह

ना. पंकजाताई मुंडे, खा.डाॅ. प्रीतमताई मुंडे यांनी दिले नव दाम्पत्यांना शुभाशिर्वाद

परळी दि. २२ : गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात आज सकाळी मुस्लिम व बौध्द धर्मातील वधू – वरांचे शुभविवाह मोठ्या थाटात पार पडले. जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे व खा डाॅ प्रितमताई मुंडे यांनी यावेळी नव दाम्पत्यांना शुभाशिर्वाद दिले.

दुष्काळग्रस्त भागातील पालकांना आधार देण्यासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील तोतला मैदानावर सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आज सकाळी मुस्लिम समाजातील तीन तर दुपारी बौध्द धर्मातील वीस वधू वरांचे विवाह त्या त्या धर्मातील रिती रिवाजानुसार उत्साहात पार पडले. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे व खा डाॅ प्रितमताई मुंडे यांनी नव वधू वरांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सायंकाळी मुख्यमंत्री येणार

सामुदायिक विवाह सोहळ्याचा मुख्य समारंभ सायंकाळी ६.०५ वा. होणार असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चित्रपट अभिनेता अक्षयकुमार हे या सोहळ्याचे खास आकर्षण असणार आहेत. सायंकाळी ५ वा. त्यांचे शहरात आगमन होणार आहे. दरम्यान, दुपारी व-हाडींच्या लक्ष भोजनास सुरवात झाली आहे. अतिशय शिस्तबद्ध वातावरणात हा सोहळा संपन्न करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत. सायंकाळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.


ना. पंकजाताई मुंडे यांची सावरगांवच्या भगवान भक्ती गडाला भेट

राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या स्मारकाच्या कामाची केली पाहणी पाटोदा दि. १७ : संत मीराबाई संस्थानच्या नियोजित कार्यक्रमानिमित्त महासांगवी येथे आलेल्या राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज सावरगांव घाट येथे धावती भेट देऊन भगवान भक्ती गडावरील राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या स्मारकाच्या सुरु असलेल्या कामांची पाहणी केली व ग्रामस्थांशी संवाद साधला. … Read more

मातोरी येथे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामाचे भूमिपूजन संपन्न

बीड (प्रतिनिधी) दि.४ :-राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते शिरूर तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या ५६ कोटी ३६ लक्ष रुपयाच्या १८ रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शिरूर तालुक्यातील मातोरी येथे संपन्न झाले. या कार्यक्रमास आमदार भीमराव धोंडे, आमदार सुरेश धस, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती संतेाष हंगे, रमेश पोकळे, … Read more

…तर होतील पंकजाताई महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री ?

गोपीनाथ मुंडे नाव घेतलं की शरद पवार व त्यांची राष्ट्रवादी समोर आलीच अस एक समिकरण आजवर आपण पाहिलं आहे आणि आज पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे सरकार असून मुख्यमंत्री मात्र संघर्ष यात्रेत पंकजाताई मुंडे यांच्या सोबत असणारे देवेंद्र फडणवीस. यावर विचार केला तर जनतेच्या मनात होतच पंकजाताई मुख्यमंत्री होतील…म्हणून जनतेने आपल्या मतांचा कौल भाजपाच्या दिशेने वळवला.मात्र पंकजा मुंडे काय मुख्यमंत्री झाल्या नाही…त्यांची कॅबिनेट मंत्रीमंडळात निवड करण्यात आली.मुख्यमंत्री मात्र फडणवीस झाले.मराठवाडा मुख्यत्वे बीड आणि नगर जिल्ह्यातील गोपीनाथराव मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या वर्गाला मात्र वाटायचे मुख्यमंत्री ताईच होणार मात्र भाजपने वेगळंच केलं कारणाने पंकजा मुंडे समर्थक गट मात्र चिडला बऱ्याच दिवस सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले म्हणणे समर्थक सोशल मिडियावर मांडत राहिले.
परंतु जर २०१९ च्या निवडणुकित विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित केले ?तर मात्र भाजपा पंकजाताई मुंडे यांच्या नावाचा मुख्यमंत्री पदासाठी विचार करेल ?आणि बीड जिल्ह्यातील जनतेचे राहिलेलं अधुर स्वप्न पूर्ण होईल.आणि महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून मा.ना.पंकजाताई मुंडे यांचे नाव कोरले जाईल.
भारतीय जनता पार्टी गाव-तांड्या पर्यंत नेण्याचे कार्य स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांनी पूर्ण केल होत.ज्या भाजपाला बीड जिल्ह्यात पूर्वी कोणी ओळखत नव्हते त्या भाजपाचे बीड जिल्ह्यात आज पाच आमदार हे स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या आशीर्वादाने निवडून आले.एवढे महान कार्य करणारा नेता बीड जिल्ह्याला लाभला ही जिल्ह्यातील जनतेसाठी आनंदाची गोष्ट आहे.

बहुचर्चित असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला एकीकडे उमेदवार मिळत नाही तर दुसरीकडे पंकजाताईंचे प्रत्येक मतदारसंघात जनता जल्लोषात स्वागत करत आहे त्यामुळे महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी मध्ये सर्वात जास्त लोकप्रियता असणारा मंत्री पाहिला तर ना.पंकजाताई मुंडे यांच्याकडे पाहिले जाते.जनतेच्या मनातील मुख्यमंत्री खरोखरच महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री होतील यात काही शंका नाही.बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारून पंकजाताईंनी जिल्ह्यात केलेल्या सर्वांगीण विकासकामांचे थाटात लोकार्पण सोहळे पार पडत आहेत जिल्ह्यातील जनता संपूर्ण ताकतीने पंकजाताई मुंडे यांच्या सह भाजपाच्या पाठीशी राहील.
परळीच नव्हे तर इकडे आष्टी आणि गेवराई पर्यंत पंकजाताई गोपीनाथराव मुंडे जनतेच्या मनात आहेत.
ताईंचे नेतृत्व एवढ्यावरच मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रात ताईंचे चाहते ताई कधी मुख्यमंत्री होतील याची वाट पाहत आहेत..!

बीड जिल्हयातील विविध विकास कामांमुळे येणाऱ्या काळात जिल्हयाचा कायापालट होण्यास मदत होणार – पंकजा मुंडे

बीड, दि.०१ प्रतिनिधी :- जिल्हयात शासनाच्या विविध विभागाच्या माध्यमातून विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला असून या विकास कामामुळे येणाऱ्या काळात जिल्हयासह परळी मतदार संघाचे चित्र बदलण्यास मदत होणार आहे. असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
परळी तालुक्यातील तळेगाव येथील मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेचा शुभारंभ व पांगरी येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमास फुलचंद कराड, नामदेवराव आघाव, शिवाजीराव गुट्टे, श्रीहरी मुंडे, रमेश कराड, संजय मुंडे, ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता विष्णू वाघमोडे, उपअभियंता एस. यु. खंडारे यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, शासनाच्या विविध विभागाच्या माध्यमातून परळी मतदार संघासह जिल्ह्यात विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला असून या विकास कामामुळे जिल्हयासह परळी मतदार संघाचा कायापालट होण्यास मदत होणार आहे. तसेच मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात पाणी पुरवठयाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असून कामे सुरु असलेल्या गावातील नागरिकांचा कायम स्वरूपी पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणारआहे.
जिल्ह्यातील विविध विकास कामांबरोबरच शासकीय कार्यालयाच्या प्रशासकीय इमारत बांधकामासाठी प्राधान्य देण्यात येत असून बीड जिल्हा परिषद इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून या इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. तसेच जिल्ह्यातील पंचायत समितीच्या इमारतीचे बांधकाम, कर्मचारी निवासस्थान बांधकामे सुरू असून ही कामेही लवकरच पूर्ण होणार आहेत. जिल्ह्यात रस्ते विकास, शाळा बांधकाम, दवाखान्याचे बांधकाम, पशुसवंर्धन दवाखाने, आरोग्य केंद्र बांधकाम, अंगणवाडी खोल्या बांधकाम, डिजिटल शाळा, गाव अंतर्गत सिमेंट रस्ते, नाली बांधकाम, सभागृहाचे बांधकाम यासारखी विविध विकास कामेही हाती घेण्यात आली आहेत. महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांना खेळते भांडवलासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरे उपलब्ध देण्यात आले असल्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले
परळी तालुक्यातील तळेगाव येथील मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेसाठी ७६ लक्ष १८ हजार रुपयाचा निधी मंजूर असून ही योजना मार्च आखेर पूर्ण होणार आहे. यामुळे या गावातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे. तसेच तळेगाव येथील सभागृहासाठी खासदार फंडातून १० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यासह गावातील विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली असल्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.पांगरी येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत ८९ लक्ष २३ हजार रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते येथे संपन्न झाले.

यावेळी फुलचंद कराड, शिवाजीराव गुट्टे यांचे समयोचित भाषणे झाली. या कार्यक्रमास तळेगाव व पांगरी येथील भीमराव मुंडे, त्र्यंबक तांबडे, शांताबाई कुंडलिक मुंडे, प्रियंका तांबडे, गयाबाई मुंडे, श्रीहरी घुगे, सुधाकर पौळ, ज्ञानोबा मुंडे, विनायकराव मुंडे, पुष्पा मुंडे,महादेव मुंडे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.


मुंबईत बुधवारपासून ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शन; देशभरातील बचतगटांची उत्पादने खरेदीची मुंबईकरांना संधी- मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती

आठवडा विशेष|प्रतिनिधी

मुंबई, दि. २१ : ग्रामीण भागातील बचतगटांच्या तसेच ग्रामीण कारागीरांच्या उत्पादनांच्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे येत्या बुधवारपासून (२३ जानेवारी) ४ फेब्रुवारीपर्यंत मुंबईत आयोजन करण्यात आले आहे. यंदा प्रदर्शनात राज्याच्या तसेच देशाच्या विविध भागातील बचतगट सहभागी झाले असून ५११ स्टॉलच्या माध्यमातून ते उत्पादनांची विक्री करणार आहेत. याशिवाय खाद्यपदार्थांचे ७० स्टॉल असून त्यातून मुंबईकरांना वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतींचा आस्वाद घेता येणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

वांद्रे कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदान क्रमांक १, ४, ५ व ६ येथे हे प्रदर्शन होणार आहे. बुधवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. मुंबईकरांनी प्रदर्शनास भेट देऊन ग्रामीण महिला बचतगट आणि कारागिरांना प्रोत्साहन द्यावे, तसेच त्यांच्या नानाविध अशा कलाकुसरी, उत्पादनांची खरेदी करावी, असे आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

मंत्रालयात आज यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यावेळी उपस्थित होत्या.

महालक्ष्मी सरस प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला बचतगटांना त्यांनी तयार केलेल्या वस्तू, उत्पादने, साहित्य, नाविन्यपूर्ण कला व खाद्यपदार्थ शहरी नागरिकांपर्यंत पोहोचविता येतात. मागील दीड दशकात या प्रदर्शनातून सुमारे ७ हजार ५०० बचतगटांनी मुंबईकरांना सेवा दिली आहे. प्रदर्शनात पाहिल्यावर्षी ५० लाख रुपयांची आर्थिक उलाढाल झाली होती. ती मागील वर्षी जवळपास १० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली,
अशी माहितीही मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी दिली.

दररोज अंदाजे २० हजार ग्राहक प्रदर्शनास भेट देतात. जळगावचे भरीत, खानदेशचे मांडे, कोकणातील मच्छी, तांदळाची भाकरी, कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा, सोलापुरी चटणी, राज्यातील विविध भागातील मसाले, हातसडीचा तांदुळ आदी खाद्य पदार्थांबरोबरच कोल्हापुरी चप्पल, सोलापुरी चादरी, वारली चित्रकला, हस्तकला, हातमागाच्या वस्तू, कलाकुसरीच्या वस्तू आदी विविध उत्पादने प्रदर्शनात यंदाही उपलब्ध होणार आहेत.

दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. २३ जानेवारी रोजी शशांक कल्याणकर, २५ जानेवारी रोजी हरिहरन, २७ जानेवारी रोजी अशोक हांडे, २८ जानेवारी रोजी साधना सरगम, २९ जानेवारी रोजी अनुप जलोटा तर २ फेब्रुवारी रोजी उदित नारायण यांच्या कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे.

ग्रामीण भागात आता ‘यलो रिव्होल्यूशन’

राज्यात ज्याप्रमाणे सहकारी दूध संस्थांमार्फत शेतकऱ्यांचे दूध संकलन करुन त्याला शहरी बाजारपेठ उपलब्ध करुन दिली जाते त्याच धर्तीवर ग्रामीण भागात कुक्कुटपालन करणाऱ्या महिला बचतगटांकडून उत्पादीत होणाऱ्या अंड्यांचे संकलन करुन त्यांना आता शहरी बाजारपेठ उपलब्ध करुन दिली जाणार आहे. हरित क्रांती, धवल क्रांतीसारखी ही पिवळी क्रांती (यलो रिव्होल्यूशन) असेल. यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकेल. पहिल्या टप्प्यात पालघर आणि धुळे जिल्ह्यात यासंदर्भातील पथदर्शी प्रकल्प (pilot project) सुरु करण्यात येत आहे, अशी घोषणाही मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी केली.

बचतगटांची उत्पादने अॅमेझॉननंतर आता ‘ई-सरस’वर

महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळामार्फत राज्यातील बचतगटांची उत्पादने अॅमेझॉन या संकेतस्थळावर उपलब्ध करुन त्यांना ई-कॉमर्सच्या परिघात आणण्यात आले आहे. आता उमेद अभियानाच्या माध्यमातून ई-सरसचे ऑनलाईन व्यासपीठ बचतगटांच्या उत्पादनांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे, अशी माहितीही मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी दिली. राज्यातील ग्रामीण महिला बचतगटांची उत्पादने ई-सरसच्या माध्यमातून देश-विदेशातील ग्राहकांपर्यंत पोहोचतील. यातून ग्रामीण महिलांच्या अर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.