परळी शहर काँग्रेसचे आंदोलन धुमधडाक्यात यशस्वी― बाबुभाई नंबरदार

परळी दि.३०:आठवडा विशेष टीम पेट्रोल डिझेल इंधन दरवाढीच्या निषेधार्थ परळी तहसील कार्यालय समोर शहर काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली केंद्र सरकारने इंधन दरवाढ पेट्रोल-डिझेलची केल्यामुळे गोरगरीब जनतेचे कंबरडे मोडले आहे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक ताण वाढला असून पेट्रोल डिझेल दरवाढ रद्द करण्याची मागणी काँग्रेस नेते वसंतराव मुंडे यांनी धरणे आंदोलनात केली आहे.

तसेच महाराष्ट्रामध्ये सोयाबीन बी बियाणे खते औषधी खूप मोठ्या प्रमाणावर राज आश्रयाने अनेक कंपन्यांनी महाराष्ट्रात वितरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले आहेत ते निकृष्ट असून बियाणे उगवले नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

महाराष्ट्र सरकार कोरोना रोगाच्या लॉक डाउन मध्ये स्वस्त धान्य दुकान दारांना मोफत धान्य वाटप गोरगरीब जनतेला करण्यासाठी शासनाकडून दिले परंतु ते नियमाप्रमाणे जनतेपर्यंत पोहोचले नाही. याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली तसे निवेदन मा तहसीलदार परळी वैजनाथ जिल्हा बीड मार्फत मा राष्ट्रपती भारत सरकार नवी दिल्ली यांना देण्यात आले आहे.

याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणपत अप्पा कोरे जीएस सौंदळे तसेच काँग्रेसचे शहराध्यक्ष बाबू नंबरदार कार्याध्यक्ष विश्वनाथ गायकवाड सरचिटणीस सय्यद अल्ताफ तालुका अध्यक्ष महिला सुनिता मुंडे शहराध्यक्ष महिला आशा कोरे तालुका अध्यक्ष अल्पसंख्यांक जावेद भाई शहर अध्यक्ष अल्पसंख्यांक शेख सिकंदर किसान काँग्रेस लहू दास तांदळे शेख जावेद युवक काँग्रेस शेख जहीर उपाध्यक्ष सुदाम लोखंडे गुलाब देवकर बाबुराव इंदुरकर गोपीनाथ जाधव शेख आसिफ गुड्डू राम घाटे सुदाम लोखंडे पांडुरंग सदरे सय्यद जाफर जब्बर शेठ शेख शारीरिक महादेव रोडे शेख सिकंदर महादेव तर कसे प्रकाश मुंडे अमर देशमुख सूर्यवंशी सुधाकर गोविंद मस्के दगडोबा कराड भागवत ढाकणे बाबुराव इंदुरकर रामलिंग नावंदे राहुल भोकरे फारुख भाई मोबीन अन्सारी मोसिन खान पठाण अमोल चिगरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ गायकवाड तर आभार प्रदर्शन सय्यद आलताप यांनी केले.

निसर्गरम्य परिसरातील अंधारेश्वर मंदिराचे रूप पालटले ; पंकजा मुंडे यांनी मंजूर केलेल्या तीर्थक्षेत्र विकास निधीतून झाले काम

परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम―
परळी पासून जवळच डोंगरांच्या कुशीमध्ये असलेल्या निसर्गरम्य अशा अंधारेश्वर मंदिराच्या समोरील सभागृहाचे काम, सुशोभीकरण, रंगरंगोटी आदी पूर्ण झाले असून तत्कालीन पालकमंत्री नामदार पंकजा मुंडे यांनी मंजूर करून दिलेल्या तीर्थक्षेत्र विकास निधीतून हे काम करण्यात आले आहे. यामुळे अंधारेश्वर मंदिराचे रूप पालटून गेले आहे.
तालुक्यातील मालेवाडी दत्तवाडी ग्रामपंचायत अंतर्गत जाज्वल्य असे अंधारेश्वराचे जुने पुरातन मंदिर निसर्गाच्या सान्निध्यात व डोंगराच्या एकदम कुशी मध्ये आहे. परळीपासून अगदी जवळच असलेले हे ठिकाण अतिशय रम्य असून अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अंधारेश्वराच्या दर्शनासाठी परळी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या प्रमाणावर जातात. अंधारेश्वर मंदिर परिसर हा अतिशय निसर्गरम्य असून चांगला पर्यटनाचा आनंद या ठिकाणी मिळतो. त्याचबरोबर भाविकांना अंधारेश्वराच्या दर्शनाचाही लाभ होतो. मालेवाडी व दत्तवाडी या दोन गावांच्या काही अंतरावर मधोमध एकांतात असलेले हे ठिकाण अनेक भाविकांसाठी श्रद्धेचा विषय आहे. याठिकाणी तत्कालीन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सन अठरा-एकोणीस मध्ये तीर्थक्षेत्र विकास निधी मंजूर करून दिला होता. या निधीतून मंदिर व सामाजिक सभागृहाच्या कामाला प्रारंभ झाला. हे काम आता पूर्ण झाले असून रंगरंगोटी ही झालेली आहे. त्यामुळे या मंदिराला नवे देखणे रूप मिळाले आहे. अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे तीर्थक्षेत्र निधीतून साकारलेले मंदिर अधिकच आकर्षक बनले आहे. या मंदिरासाठी तीर्थक्षेत्र विकास निधीतून निधी मंजूर करून दिल्याबद्दल मालेवाडी चे सरपंच सौ.वैशाली भुराज बदने, मालेवाडी दत्तवाडी येथील गावकरी व भाविकांनी आभार व्यक्त केले आहेत.


#CoronaVirus बीड: जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या ऊसतोड कामगारांची व्यवस्था करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे शासकीय यंत्रणांना आदेश

बीड,दि.१८:आठवडा विशेष टीम―जिल्ह्यातील मुळ रहिवाशी असलेले बहुतांशी ऊसतोड कामगार बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये व राज्यांमध्ये लॉकडाऊन मुळे अडकलेले आहेत. लाॅकडाऊन कालावधीमध्ये अडकलेल्या ऊसतोड कामगार हे आल्यांनतर या ऊसतोड कामगारांची आवश्यक व्यवस्था करण्यासाठी राहुल रेखावार, अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी, बीड यांनी संबधित शासकीय यंत्रणांना कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.
शासनाच्या 17 एप्रिल 2020 च्या सुचनांप्रमाणे लॉकडाऊन मध्ये जिल्हा बाहेर अडकलेल्या ऊसतोड कामगार आल्यांनतर शासनाचे निर्देशानुसार आवश्यक ती व्यवस्था करण्यासाठी आज हे आदेश दिले आहेत. यानुसार जबाबदारी देण्यात आलेले शासकीय प्रमुख व करावयाचे कामे, कर्मचारी यांचे तपशीलवार विभागणी केली आहे
या आदेशानूसार ऊसतोड कामगार आलेल्या मूळ संबधित गांवाचे सरपंच यांनी आपल्या गावामध्ये बाहेरच्या जिल्हयामधून येणारे ऊसतोड कामगारांना ओळख पटवून प्रवेश देणे. इतर गावातील कोणत्याही व्यक्तीला प्रवेश न देणे. अशा संभाव्य मजूरांची संख्या विचारात घेता त्यांना त्यांच्या स्वत:च्या किंवा इतरांच्या शेतावर राहण्यासाठी पाठविणे. अशी व्यवस्था होऊ न शकल्यास गावातील शाळेमध्ये राहू देणे, परंतु कोणत्याही परिस्थितीत त्यांना त्यांच्या घरात, गावठाणामध्ये राहू न देणे. सदर कामगार गावी पोहचल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावयाचे असून सदर कामगार गावात आल्यानंतर त्यांच्या परिवारामार्फत भोजन व्यवस्था करुन द्यायची आहे.
संबधित गावांचे ग्रामसेवक यांनी सदर मजूरांच्या निवासाच्या ठिकाणी शुध्द पिण्याचे पाणी पुरवठा, विदुयत पुरवठा, शौचालय, स्वच्छता इतर आवश्यक सोईसुविधा पुरविणे. तसेच किराणा सामान,भाजीपाला त्यांच्या पर्यंत पोहचविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे.
संबंधित गावचे तलाठी यांनी ग्राामसेवक, ग्रामपंचायत व गावपातळीवरील इतर कर्मचारी यांचेशी समन्वय साधून ऊस तोड कामगारांना दयावयाचे सर्व सुविधांची खात्री करणे. सदर मजूरांना अनुज्ञेय धान्य पुरवठा स्वस्त धान्य दुकानदारामार्फत करणे.
संबधित गावांची अंगणवाडी सेविका यांनी आपल्या गावामध्ये इतर जिल्हयातून ऊसतोड कामगार हे गावात आल्यानंतर त्यांना कोवीड-19 च्या अनुषंगाने समुउपदेशन व माहिती करुन देणे व अंगणवाडीच्या सर्व सेवा पुरविणे.
तसेच आशा सेविका व आरोग्य सेवक यांनी गावातील प्रत्येक सर्व अशा मजूरांची रोज एकदा तपासणी प्रत्यक्षपणे करुन सदर मजूरांमध्ये ताप, सर्दी,खोकला, श्वसनाचा त्रास व न्यूमोनियासारखे लक्षणे आढळून येणाऱ्या व्यक्तीची प्राथमिक माहिती घेवून तात्काळ संबंधित वैदकीय अधिकारी यांना कळविणे. सदर मजूरांपैकी महिला, गरोदर महिला, लहान मुले यांची आरोग्य विषयक विशेष काळजी
घेणे. कोवीड-19 च्या अनुषंगाने समुपदेशन करायचे आहे
संबधित गावाचे पोलीस पाटील व पोलीस कर्मचारी यांनी सदर ऊसतोड कामगार आपल्या गावामध्ये आल्यानंतर क्वारंटाईन कालावधी संपेपर्यत रहिवासाच्या ठिकाणाहून इतरत्र जाणार नाहीत व इतर लोकांच्या संपर्कात ते कोणत्याही परिस्थितीत किंवा कोणत्याही कारणाने येणार नाहीत याची खात्री करणे. याकामासाठी सरपंच,ग्रामसेवक,तलाठी व गावातील सर्व कर्मचारी आणि व्यक्तींनी सहकार्य करणे बंधनकारक आहे.
संबंधित गावातील कृषी सेवक, मंडळ कृषी अधिकारी यासह संबंधित इतर सर्व विभागाचे अधिकारी |यांनी ऊसतोड कामगार हे गांवात आल्यानंतर विहित कालावधीसाठी क्वारंटाईन असल्याने त्यांच्याशी स्वत:हून संपर्क साधून शासनाच्या विभागांमार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची अंमलबजावणी करुन लाभ उपलब्ध करुन दयावेत.
सदरील मजूरांना ज्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे, त्या ठिकाणी आवश्यक साहित्य उदा.( किराणा,भाजीपाला इ.) उपलब्ध होईल अशी सुविधा करण्यात द्यावी,
कोवीड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन जसे मास्कचा वापर, वारवार हात धुणे, सामाजिक अंतराचे पालन, एकच वस्तू अनेक व्यक्ती हाताळत असल्यास हात धुणे इ. उपाययोजनाचा व शासनाचे निर्देशांचे पालन करावे. तसेच सदर मजूरांना अन्य ठिकाणाहून जेवणांचा डबा येत असल्यास सदरचा डबा स्वच्छ धवन उन्हामध्ये वाळवून तदनंतरच परत घेवून जाणाऱ्या व्यक्तींना देण्यात यावा, या व्यक्तींनी हाताळलेल्या वस्तू (उदा. कपडे,भांडी, इ.) इतर व्यक्तींनी हाताळू नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
विस्तार अधिकारी यांचे मार्फत उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे। गाव पातळीवर व ग्रामविकास विभागाचा कामावर नियंत्रण राहणार आहे संबधित गावांचे तलाठी यांनी याबाबत दैनंदिन कार्यवाहीवर नायब तहसिलदार महसूल यांचे मार्फत उपजिल्हाधिकारी रोहयो नियंत्रण ठेवणार आहेत.
यासह जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व आदेश, सुधारणा आदेश, नियमावलली तरतुदीनुसार गर्दी टाळण्यासाठी तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(1) (3) अन्वये मनाई आदेशाचे उल्लंघन होव नये यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. या आदेशांची अवाज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने भारतीय दंडसंहिता 1860 (45) याच्या कलम 188 शिक्षेसपात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल असे निर्देशीत केले आहे.


बीड: शेतकऱ्याच्या मुलाची पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी ; रवी मुंडे यांची मंडल कृषी अधिकारी पदासाठी निवड

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― तालुक्यातील मौजे अंबलटेक येथील शेतकरी कुटुंबातील रवि विष्णु मुंडे या तरूणाने पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत यश संपादन केले.मंडल कृषी अधिकारी म्हणुन ते गुरूवारी गेवराई येथे रूजू झाले आहेत. महाराष्ट्राच्या लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या मंडल कृषी अधिकारी पदासाठीच्या परिक्षेत रवि विष्णु मुंडे हे पात्र ठरले.त्यांना बीड जिल्ह्यातील गेवराई … Read more

#Breaking: पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या ‘स्त्री जन्माच्या’ आवाहनाला प्रतिसाद

भगवान भक्तीगडावर झाले लेकीच्या जन्माचे स्वागत ; खा.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते मिसाळ दांम्पत्यानी बांधला कन्येला धागा बीड.दि.०२:आठवडा विशेष टीम―समाजात स्त्री जन्माविषयी वेगवेगळ्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करणा-या भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांनी सावरगांवच्या भगवान भक्तीगडावरून केलेल्या आवाहनाला जन माणसातूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा प्रत्यय नुकताच आला. पाटोद्याच्या मिसाळ दाम्पत्यांने पोटी जन्मलेल्या लेकीला खासदार डाॅ प्रितमताई … Read more

अंबाजोगाई: स्व.प्रमोदजी महाजन आधार व मदत केंद्राद्वारे समाजातील गरजुंना मदत

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― तालुक्यातील कोळकानडी येथे स्व.प्रमोदजी महाजनसाहेब आधार व मदत केंद्राद्वारे सामाजिक कार्यकर्ते सुनिल बापु धिमधिमे हे समाजातील गरजू लोकांना मदत करीत आहेत. समाजातील निराधार,विधवा, परिक्त्यक्ता,महिलांना मदत व सहकार्य करून समाजासमोर चांगला पायंडा धिमधिमे यांनी पाडला आहे.त्यांच्या वतीने करण्यात येणार्‍या कामाच्या माहिती पत्रकाचे विमोचन प्रसंगी बोलताना बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब … Read more

सत्तेच्या माध्यमातून तुमची सेवा केली, पुढेही मीच सेवा करणार―पंकजा मुंडे ;११ कोटी ७६ लाख रूपयांच्या पेयजल योजनेचे थाटात लोकार्पण

राष्ट्रवादीला भविष्य नाही, त्यांच्या मागे जाऊन मत वाया घालवू नका हाळम येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेचे थाटात लोकार्पण; ११ कोटी ७६ लाख रूपयांच्या कामाचे भूमिपूजन परळी:आठवडा विशेष टीम―गेल्या पांच वर्षात मंत्री म्हणून काम करत असताना भरभरून विकास निधी देण्याबरोबरच विवाह सोहळा, महा आरोग्य शिबीर, बचतगटांच्या माध्यमातून मी तुमची सेवा केली, भविष्यातही मीच मंत्री म्हणून तुमची सेवा … Read more

पंकजाताई मुंडे यांनी राजकारणात यशाची उत्तुंग शिखरे गाठावीत ; लोकनेत्याच्या वर्ग मित्रांनीही दिले लेकीला आशीर्वाद !

परळी दि. १६:आठवडा विशेष टीम― राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बालकल्याण मंत्री तथा बीडच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या वडिलांप्रमाणेच राजकारणात यशाची उत्तुंग शिखरे गाठावीत अशी अशी सदिच्छा दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या वर्गमित्रांनी ना. पंकजाताई मुंडे यांना दिली. परळीत आयोजित केलेल्या गेट-टुगेदर कार्यक्रमासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे वर्गमित्र १४ व १५ ऑगस्ट … Read more

धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातुन परळी शहरासाठी 1357 घरकुल मंजुर ; सर्वाधिक 304 घरकुल प्रभाग क्र.5 मध्ये मंजुर

परळी वैजनाथ (प्रतिनिधी):पंतप्रधान आवास योजने अंतर्गत परळी शहरासाठी 1357 घरकुलांना मंजुर मिळाली असुन सहा महिन्यापुर्वी शहरात करण्यात आलेल्या सर्व्हे मधुन ही मंजुर मिळाली असुन यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या विशेष प्रयत्नाने या घरकुलांना मंजुरी मिळाली असुन प्रभाग निहाय मंजुरी मध्ये प्रभाग क्र.5 मध्ये सर्वाधिक 304 तेर त्या खालोखाल प्रभाग क्र.1 मधील नागरिकांना 109 घरकुलांची मंजुरी मिळाली आहे.
पंतप्रधान आवास योजने अंतर्गत 6 महिन्यापुर्वी ए.एफ.सी. इंडिया लि.मुंबई या कंपनीने पात्र लाभार्थ्यांचा सर्व्हे करुन 1423 घरकुलांचा पात्रतेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्यापैकी 558 घरकुलांना तर नवनिर्माण महिला बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या 4000 पेक्षा अधिक नागरिकांच्या सर्व्हे मधुन 799 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. या योजनेत मंजुर झालेल्या प्रत्येक लाभार्थ्यांस आडीच लाख रुपये घरकुलासाठी अनुदान मिळणार आहे. हे अनुदान तीन टप्पयांत वितरीत करण्यात येणार आहे. या योजनेतील घरकुलांच्या माध्यमातुन परळीशहरात 33 कोटी 92 लाख 50 हजार रु. वितरीत होणार आहेत. 1357 घरकुला पैकी प्रभाग क्र. 5 मध्ये 304 तर प्रभाग क्र. 1 मध्ये 109 घरकुलांचा समावेश आहे.

पात्र नागरिकांनी सतर्कता बाळगावी-गोपाळ आंधळे

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातुन परळी शहरात मंजुर झालेल्या घरकुला पैकी सर्वाधिक घरकुल प्रभाग क्र.5 मध्ये मंजुर झाले असुन यात एकुण 304 घरकुलांच्या माध्यमातुन 7 कोटी 60 लाख रु.चा निधी प्रभागात उपलब्ध झाला आहे. घरकुल मंजुर झालेल्या नागरिकांनी कुठल्याही अफवावर विश्‍वास न ठेवता कांही तोतया एजंट मंजुर झाल्यानंतर पैशाची मागणी करतांना दिसत आहेत. या भुलथापांना घरातील महिला बळी पडत असल्याचे दिसत आहे. तरी नागरिकांनी सदरील घरकुलासाठी आवश्यक असणारी कागदांची पुर्तता व अधिक माहितीसाठी आपआपल्या प्रभागातील नगरसेवकांशी संपर्क साधावा किंवा नगर परिषद कार्यालय अधिकार्‍यांशी खातर जमा करावी असे आवाहन प्रभाग क्र.5 चे नगरसेवक तथा माजी सभापती गोपाळ आंधळे यांनी केले आहे.


विक्रमी वसुली करणार्‍या परळी महावितरण विभागात साहित्याचा तुटवडा ; बॉक्स उघडे,ना फ्यूज ना तारा

साहित्य नसल्याने अनेक ट्रान्सफार्मर बॉक्स उघडे, ना फ्युज, ना तारा नागरिकांच्या जीवतास धोका साहित्य तात्काळ उपब्ध करुन द्यावे-वसंत मुंडे परळी वैजनाथ (प्रतिनिधी): महावितरणच्या परळी उपविभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी प्रचंड मेहनत घेत विक्रमी वसुली केली. परंतु महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडुन या विभागात ट्रानसफार्मर साठी आवश्यक असणार्‍या साहित्याचा पुरवठा होत नसल्याने बहुतांश ठिकाणचे ट्रान्सफार्मर बॉक्स उघडे असुन … Read more

बीड: परळी तालुक्यातील सिरसाळ्यात जमिनीतून बाहेर येतोय लाव्हारस सदृश्य पदार्थ ; व्हिडीओ व्हायरल

परळी : परळी तालुक्यातील सिरसाळा येथे एका मोकळ्या मैदानात जमिनीखालून लाव्हासदृश्य पदार्थ बाहेर पडतो आहे. त्यामुळे या परिसरासह जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण पसरले आहे. बीडमधील परळी तालुक्यातील सिरसाळा गावाच्या येथील एका मोकळ्या मैदानावर असा प्रकार पहायला मिळत आहे. यासंदर्भातले व्हिडीओ देखील व्हाट्सअप्पसह सोशल माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा सगळा प्रकार नक्की काय आहे … Read more

मंत्री पंकजा मुंडे यांच्या संकल्पनेतून हायमास्ट दिव्यांनी उजळली १४६ गावे

परळी मतदारसंघात २९२ हायमास्ट दिव्यांसाठी २५१५ मधून दिला ४ कोटी ३८ लाखाचा निधी परळी दि. २५ : परळी मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांची संकल्पना असलेल्या ‘अंधारातून प्रकाशाकडे’ या योजनेतंर्गत १४६ गांवे हायमास्ट दिव्यांनी उजळली आहेत, यासाठी २९२ हायमास्ट दिव्यांसाठी त्यांनी मुलभूत विकास निधीतून ४ कोटी ३८ … Read more

सी.एम.चषक चित्रकला स्पर्धेचे सहभाग पारितोषीक वितरण संपन्न

आठवडा विशेष | प्रतिनिधी
परळी वैजनाथ, दि.२१:महाराष्ट्राच्या ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे व विक्रमादित्य खासदार प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळीत झालेल्या सीएम चषक चित्रकला स्पर्धेचे सहभागींना प्रोत्साहनपर बक्षिण आज वैद्यनाथ विद्यालय, भेल सेकंडरी स्कूल, वैद्यनाथ कॉलेज येथे येथे वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते दत्ताप्पा इटके गुरुजी, वैजनाथ बँकेचे माजी चेअरमन विकासराव डुबे, वैद्यनाथ कॉलेज चे प्राचार्य इप्पर सर, वैद्यनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक मोदी सर,भेल स्कुलचे प्राचार्य एस.आर. राव, उपप्राचार्य व्ही.डी.कुलकर्णी, भाजपा शहर उपाध्यक्ष महादेव ईटके, राजेश कोलवार, अभिजीत देशमुख, अश्विन मोगरकर, सुशील हरंगुळे, आदींसह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते