बीड दि.०४:आठवडा विशेष टीम― स्वर्गीय गोपिनाथरावजी मुंडे साहेबांची कन्या बीड लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ प्रितमताई मुंडे यांची भारतीय जनता पार्टी च्या प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे.भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात नेणाऱ्या स्वर्गीय गोपिनाथराव मुंडे साहेब यांच्या कन्येवर ही प्रमुख जबाबदारी दिल्यामुळे सर्व स्थरावरून अभिनंदन होत आहे.सोशल मीडिया सह इतर माध्यमांवर फक्त डॉ प्रितम मुंडे यांचेच नाव चर्चेत आले आहे.