लिंबागणेश ग्रामपंचायतने केला अंगणवाडीच्या नावाने ५ लाखांचा भ्रष्टाचार ,अंगणवाडी सेविकांना पत्ताच नाही, ग्रामस्थांची लेखी तक्रार―डॉ गणेश ढवळे

बीड दि.०४:आठवडा विशेष टीम― लिंबागणेश ग्रामपंचायतीने अंगणवाडी सेविकांना अंधारात ठेवून ५ लाख रुपयांचा अपहार केला असुन अंगणवाडीला आहार आणि साहित्य पुरवले असे कागदोपत्री दाखवून निधि उचलला आहे, मात्र असा कुठलाही आहार अथवा साहित्य अंगणवाडी सेविकांना मिळाले नाही अशी कबुली अंगणवाडी सेविकांनी डॉ.गणेश ढवळे यांच्याशी संवाद साधताना स्पष्ट केले आहे.

अंगणवाडी सेविका (अंगणवाडी क्र.१ आणि क्र.२): गणवेश, वाटर प्युरीफायर, कुकर , कपाट , आहार मिळाला नाही

सन २०१७-१८

——————–
मध्ये १४ व्या.वित्त आयोगाच्या निधीतून १ लाख ५४ हजार २३४ रु.जो खर्च दाखवला आहे, त्यामध्ये आम्हाला प्रत्येक अंगणवाडीला केवळ लहान मुलांना ३० खुर्च्या व १ प्लास्टीकची घसरगुंडी मिळाली आहे. आम्हाला गणवेश वाटप करण्यात आला नाही, असे अंगणवाडी सेविका क्र.१ व.क्र.२ ने सांगितले

सन २०१८-१९

——————-
मध्ये १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून जो ८८ हजार ४२१ जो खर्च दाखवला आहे, त्यामध्ये अंगणवाडी क्र.१ आणि क्र २ लाख केवळ गस मिळाला आहे, कपाट, वाटर प्युरीफायर , कुकर असे काहीही मिळाले नाही, आम्हाला कपाट प्राथमिक आरोग्य केंद्र येथिल कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्र मार्फत मिळाले आहे.

सन २०१९-२०

———————
ग्रांमपंचायतने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून अंगणवाडीसाठी आवश्यक साहित्य व पाणीपुरवठा म्हणुन जो २ लाख ४१ हजार ८५ रु.खर्च केल्याचे कागदोपत्री दाखवले आहे,तसे कुठलेही साहित्य आम्हाला मिळाले नाही. पाणीपुरवठा सुद्धा नाही, शौचालयाचे दार नोव्हेंबर मध्ये खालच्या बाजूस फुटले आहे,ते वारंवार सांगूनही ग्रांमपंचायतने बदलले नाही.

अंगणवाडी क्र.३ अंगणवाडी सेविका:

”आमच्या अंगणवाडीला फक्त मुलांसाठी ३० खुर्च्या आणि गस मिळाला आहे, बाकी गणवेश , कपाट, वाटर प्युरीफायर, कुकर काही सुद्धा मिळाले नाही. आमच्या अंगणवाडीतील मुलांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही, नसीब शौचालय आहे ,पण पाणी नाही.”

डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते बीड :

तत्कालीन महिला व बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री बीड ना.पंकजाताई मुंडे यांच्या कालावधीत सत्तेचा दुरूपयोग करून अंगणवाडी सेविकांना अंधारात ठेवून ४ लाख ८३ हजार ७४० रु.चा १४ व्या.वित्त आयोगाच्या निधीतून खर्च केल्याचे दाखवून शासनाची तसेच अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थांचीही फसवणूक केली आहे. अंगणवाडी क्र.१,२,व ३ लाख पिण्याच्या पाण्याची सोय नाही ,त्यांना वाटर प्युरीफायर , गणवेश, कपाट तसेच कुठलेही आवश्यक साहित्य दिले नाही.एवढेच नाही तर अंगणवाडी क्र.१ व क्र.२ चे शौचालयाचे दार वारंवार सांगुनही बदलले नाही म्हणुन त्याचा वापर ६ महिन्यांपासून बंद आहे. याप्रकरणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जिल्हा आरोग्य अधिकारी, अध्यक्ष जिल्हा परिषद बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, महिला व बालकल्याण मंत्री, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, आरोग्य मंत्री, ग्रामविकास मंत्री, शालेय शिक्षण मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड, विभागीय आयुक्त यांना लेखी निवेदन ई-मेलद्वारे पाठवले आहे.