मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित ; भारताचा सर्वात मोठा विजय

आठवडा विशेष टीम: भारतातील अनेक हल्ल्याचा मागचा मास्टरमाइंड आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्यात भारताला सर्वात मोठे यश आले आहे. संयुक्त राष्ट्रां-च्या(युनायटेड नेशन) सुरक्षा परिषदेने (दि.१) बुधवारी मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून यादीत टाकले आहे.

संयुक्त राष्ट्रातील(यू.एन) भारताचे राजदूत सईद अकबरुद्दीन यांनी यासंदर्भात ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परीषदेच्या मंजूर यादीमध्ये मसूद अझहरचा आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून समावेश करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. युएनएससीत ज्यांनी भारताला साथ दिली त्या सर्वांचे त्यांनी आभारही मानले आहेत.