Breaking News – सोयगाव: परिवहनच्या लालपरीचे एका दिवसात ९०० रु उत्पन्न ,३०० लिटर इंधनवाया

सोयगाव,दि.२३:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
कोविड-१९ च्या संसार्गात अडकलेल्या परिवहनच्या एस.टी बसेस शुक्रवारपासून सुरु करण्याचे आदेश विभागीय नियंत्रक यांचेकडून प्राप्त होताच,सोयगाव आगाराला सिल्लोड,नागद आणि गोळेगाव या मार्गावर आठ बसेफेऱ्या सुरु करण्यात आल्या त्या आठ बसेसचे एका दिवसाचे निव्वळ उत्पन्न केवळ ९०० रु इतके शासनाच्या खात्यात जमा झाले असल्याची माहिती आगार प्रमुख हिरालाल ठाकरे यांनी दिली आहे.
सोयगाव आगाराच्या तब्बल ६२ दिवसापासून बंद अवस्थेत असलेल्या बसेस पूर्ववत करण्यासाठी पहिल्या टप्प्यात जिल्हाअंतर्गत सिल्लोड आणि कन्नड तालुक्यातील नागद पर्यंत सोडण्यात आल्या आठ फेऱ्या सोयगाव आगराकडून सुरु करण्यात आल्या असता,त्या आठही बसेसचे पहिल्या दिवसाचे उत्पन्न ९०० रु हाती आले आहे.त्यामुळे तूर्तास तरी परिवहनच्या बसेस ना नफा,ना तोटा या तत्वावर सुरु आहे.३०० लिटर इंधन लागलेल्या या बसेसला ९०० कि.मी च्या पल्ल्यावर हातात ९०० रु आले आहे.

प्रवाशांची भीती कायम-

कोविड-१९ च्या छायेत असलेल्या सोयगाव तालुक्यातील प्रवाशांची भीती कायम राहिली असल्याने बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या तोकडी झाल्याने परिवहन विभागाला हा तोटा सहन करावा लागणार आहे.बस मध्ये विना मास्क प्रवास करण्यासाठी परवानगी नसून सोयगाव तालुक्यातील प्रवाशांना प्रवास करण्याची गरज असूनही मास्क अभावी प्रवास करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.