मुख्यमंत्र्यांनी जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, उपाययोजना यांचा कॉन्फरन्स कॉलच्या माध्यमातून आढावा घेतला

आठवडा विशेष | ज्ञानेश्वर धोंडू पाटील औरंगाबाद: महाराष्ट्र राज्यात भीषण दुष्काळाचे संकट उभे राहिले आहे. सर्वाधिक दुष्काळाच्या झळा मराठवाड्याला सोसाव्या लागत आहेत. राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी बैठक आयोजित केली होती. फडणवीस यांनी जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, उपाययोजना यांचा कॉन्फरन्स कॉलच्या माध्यमातून आढावा घेतला. यावेळी दुष्काळाशी संबंधित … Read more

विनायक मेटे आता खरच होतील का मंत्री ?

राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष

बीड दि.११: नुकताच आज लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या मदतीने विधानपरिषदेवर आमदार म्हणून घेतलेले विनायक मेटे यांनी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना आपला पाठिंबा जाहीर केला.त्यांच्या ह्या पाठिंब्यामागे नेमके काय राजकारण आहे? मेटे आता मंत्री तरी होतील का ? असे प्रश्न सामान्य जनतेच्या समोर येत आहे.विनायक मेटे यांनी ऐन निवडणूकीच्या काळात दिलेला पाठिंबा खरच सोनवणे यांना विजयापर्यंत घेऊन जाईल का ? असे कित्येक प्रश्न आज बीड जिल्ह्यातील जनतेच्या मनात निर्माण झाले आहेत.

विनायक मेटे आणि पंकजा मुंडे यांचे राजकीय वैर जगजाहीर आहे.मेटे यांनी याआधीही बऱ्याच वेळेस पंकजा मुंडे यांना वेगवेगळ्या राजकीय मार्गानी विरोध दर्शविला होता.पण त्याचे राजकिय परिणामही त्यांना तसेच भोगावे लागले आहेत हे देखील सर्वांच्या समोरच आहे.आजच्या पाठिंब्यामुळे भविष्यात जर भाजपाची सत्ता आली तर मेटेच्या मंत्री पदावर शिक्का मोर्तब होईल,का भाजप त्यांना धक्का देत त्यांच्या आमदारकीवर प्रश्नचिन्ह आणेल?

बीड लोकसभा मतदारसंघात बीड तालुक्यापुरत पाहिलं तर पंकजा मुंडे गटापेक्षा मेटे यांच्याकडे राजकीय पावर कमीच आहे.त्यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी चे उमेदवार निवडून येतील याची खात्री आज कोणीही देऊ शकत नाही.नुकताच राष्ट्रवादीचे आमदार असलेले जयदत्त क्षिरसागर यांनी आपली सर्व ताकद पंकजा मुंडे गटाच्या उमेदवार डॉ प्रितम मुंडे यांच्या विजयासाठी पणाला लावली आहे.त्यामुळे निवडणूक अधिकच रंगतदार झाली आहे. मुख्यमंत्री मेटेंच्या निर्णयाला गांभीर्याने घेतील का याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.

दरम्यान,२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मेटेंचा बीड विधानसभा मतदारसंघातून जयदत्त क्षीरसागर यांनी पराभव केला होता. यानंतर भाजपने मेटेंचे राजकीय पुनर्वसन करत त्यांना विधानपरिषदेवर नेलेलं होतं. पण आपल्याला मंत्रीपद मिळायलाच हवं यावर विनायक मेटे ठाम होते.परंतु ते त्यांना मिळवणे शक्य झाले नाही.

लोकसभा २०१९: ईशान्य मुंबईत भाजपा तर्फे मनोज कोटक, विद्यमान खासदार किरीट सोमय्यांचे तिकीट कापले

मुंबई : १७ व्या लोकसभेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल काही दिवस झाले असतानाच आणि काही जागेवर तर प्रचार देखील जोरात सुरू असताना केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेला सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पार्टीचे ईशान्य मुंबईतील विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचा पत्ता कट करण्यात आला असल्याची माहिती राजकिय सूत्रांकडून समजते आहे.

भारतीय जनता पार्टीने मनोज कोटक यांना ईशान्य मुंबईतून उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेनेवरील टीका सोमय्यांना भोवल्याचे चित्र समोर येत आहे.
मुंबई भाजपचे मुलुंड मधील विद्यमान नगरसेवक मनोज कोटक यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना भारतीय जनता पक्षाने दिल्या होत्या. त्यामुळे किरीट सोमय्या यांची संधी हुकणार असल्याचे जवळपास निश्चित मानल जात होत. मुंबई महापालिका निवडणुकाच्या वेळी खासदार किरीट सोमय्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर केलेली टीका त्यांना भोवल्याचे म्हटले जात आहे.

मनोज कोटक दोन दिवसापासून ईशान्य मुंबईतील भाजप कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांच्या भेटी गाठी घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तर कोटक यांच्याशिवाय ईशान्य मुंबईतून भाजपातर्फे पराग शाह, प्रकाश मेहता आणि प्रविण छेडा यांची नावे देखील चर्चेत होती.

आदिवासी समाजाला लागू असलेल्या सर्व योजनांचे लाभ धनगर समाजाला देणार – देवेंद्र फडणवीस

प्रत्येक विभागात विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह मॅट्रिकपूर्व आणि मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, नामांकित शाळांमध्ये प्रवेश सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे नाव उद्योजकता विकासासाठी महामंडळ सक्षम करणार, दहा हजार घरेही बांधणार मुंबई दि.०२ आठवडा विशेष टीम: धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात ‘टीस’ टाटा सामाजिक विज्ञान संस्था या संस्थेने दिलेल्या अहवालावर पुढील कार्यवाही गतिमान करण्यासाठी तसेच केंद्र सरकारकडे करावयाची शिफारस यासाठी हा … Read more