लिंबागणेश ग्रामपंचायतने केला अंगणवाडीच्या नावाने ५ लाखांचा भ्रष्टाचार ,अंगणवाडी सेविकांना पत्ताच नाही, ग्रामस्थांची लेखी तक्रार―डॉ गणेश ढवळे

बीड दि.०४:आठवडा विशेष टीम― लिंबागणेश ग्रामपंचायतीने अंगणवाडी सेविकांना अंधारात ठेवून ५ लाख रुपयांचा अपहार केला असुन अंगणवाडीला आहार आणि साहित्य पुरवले असे कागदोपत्री दाखवून निधि उचलला आहे, मात्र असा कुठलाही आहार अथवा साहित्य अंगणवाडी सेविकांना मिळाले नाही अशी कबुली अंगणवाडी सेविकांनी डॉ.गणेश ढवळे यांच्याशी संवाद साधताना स्पष्ट केले आहे.

अंगणवाडी सेविका (अंगणवाडी क्र.१ आणि क्र.२): गणवेश, वाटर प्युरीफायर, कुकर , कपाट , आहार मिळाला नाही

सन २०१७-१८

——————–
मध्ये १४ व्या.वित्त आयोगाच्या निधीतून १ लाख ५४ हजार २३४ रु.जो खर्च दाखवला आहे, त्यामध्ये आम्हाला प्रत्येक अंगणवाडीला केवळ लहान मुलांना ३० खुर्च्या व १ प्लास्टीकची घसरगुंडी मिळाली आहे. आम्हाला गणवेश वाटप करण्यात आला नाही, असे अंगणवाडी सेविका क्र.१ व.क्र.२ ने सांगितले

सन २०१८-१९

——————-
मध्ये १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून जो ८८ हजार ४२१ जो खर्च दाखवला आहे, त्यामध्ये अंगणवाडी क्र.१ आणि क्र २ लाख केवळ गस मिळाला आहे, कपाट, वाटर प्युरीफायर , कुकर असे काहीही मिळाले नाही, आम्हाला कपाट प्राथमिक आरोग्य केंद्र येथिल कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्र मार्फत मिळाले आहे.

सन २०१९-२०

———————
ग्रांमपंचायतने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून अंगणवाडीसाठी आवश्यक साहित्य व पाणीपुरवठा म्हणुन जो २ लाख ४१ हजार ८५ रु.खर्च केल्याचे कागदोपत्री दाखवले आहे,तसे कुठलेही साहित्य आम्हाला मिळाले नाही. पाणीपुरवठा सुद्धा नाही, शौचालयाचे दार नोव्हेंबर मध्ये खालच्या बाजूस फुटले आहे,ते वारंवार सांगूनही ग्रांमपंचायतने बदलले नाही.

अंगणवाडी क्र.३ अंगणवाडी सेविका:

”आमच्या अंगणवाडीला फक्त मुलांसाठी ३० खुर्च्या आणि गस मिळाला आहे, बाकी गणवेश , कपाट, वाटर प्युरीफायर, कुकर काही सुद्धा मिळाले नाही. आमच्या अंगणवाडीतील मुलांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही, नसीब शौचालय आहे ,पण पाणी नाही.”

डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते बीड :

तत्कालीन महिला व बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री बीड ना.पंकजाताई मुंडे यांच्या कालावधीत सत्तेचा दुरूपयोग करून अंगणवाडी सेविकांना अंधारात ठेवून ४ लाख ८३ हजार ७४० रु.चा १४ व्या.वित्त आयोगाच्या निधीतून खर्च केल्याचे दाखवून शासनाची तसेच अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थांचीही फसवणूक केली आहे. अंगणवाडी क्र.१,२,व ३ लाख पिण्याच्या पाण्याची सोय नाही ,त्यांना वाटर प्युरीफायर , गणवेश, कपाट तसेच कुठलेही आवश्यक साहित्य दिले नाही.एवढेच नाही तर अंगणवाडी क्र.१ व क्र.२ चे शौचालयाचे दार वारंवार सांगुनही बदलले नाही म्हणुन त्याचा वापर ६ महिन्यांपासून बंद आहे. याप्रकरणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जिल्हा आरोग्य अधिकारी, अध्यक्ष जिल्हा परिषद बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, महिला व बालकल्याण मंत्री, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, आरोग्य मंत्री, ग्रामविकास मंत्री, शालेय शिक्षण मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड, विभागीय आयुक्त यांना लेखी निवेदन ई-मेलद्वारे पाठवले आहे.


महाराष्ट्रातील झालेली सत्ता स्थापना म्हणजे राज्याच्या राजकारणाची अधोगती―भारतीय कम्युनिस्ट पक्ष अशा राजकारणाचा तीव्र निषेध करीत आहे

मुंबई:आठवडा विशेष टीम―विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेचा सुरू झालेला घोळ राज्याच्या राजकारणाला अधोगतीला नेऊन संपावलेला दिसत आहे.काल रात्री १० वाजेपर्यंतच्या महाराष्ट्रातील महाशिवआघाडीच्या बातम्या लक्षात घेता आज सकाळी ५.४७ वाजता महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट संपुष्टात येते काय? आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस व अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सकाळी ८ वाजता होतो हे सर्व अनाकलनीय तर आहेच; परंतु सत्ता … Read more

बीड: राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या विद्यार्थी संवाद दौऱ्यास जिल्हाभरात उदंड प्रतिसाद

बीड:आठवडा विशेष टीम―राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अंजिक्यराणा पाटील यांच्या उपस्थितीत विद्यार्थी काँग्रेसने जिल्हा भरात विद्यार्थी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेच्या माध्यमातून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, स्नेहभोजन व खाऊ वाटप तसेच जागोजागी वृक्षारोपण इत्यादी उपक्रम राबविण्यात आले.

या यात्रेस शाळा-महाविद्यालयांमधून उत्तम प्रतिसाद मिळत असून, अजिंक्य राणा पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे जागोजागी जंगी स्वागत करण्यात आले.

त्यांनी गेवराई येथील मुकबधीर शाळेला भेट देऊन शालेय साहित्याचे वाटप केले. त्यानंतर गढी येथील जय भवानी महाविद्यालय, बीड येथील बलभीम महाविद्यालयाला भेट देऊन शैक्षणिक विषयावर विद्यार्थांशी संवाद साधला. त्यानंतर म्हसोबा फाटा येथील संस्कूती शाळा,शिरूर कासार येथील जि.प.शाळेला भेट देऊन वृष लागवड व विद्यार्थांना शालेय साहित्यांचे वाटप केले.

यावेळी त्यांचे विवीध ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अर्जुन क्षीरसागर, युवा नेते रणवीरसिंंह पंडीत,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकज बाहेगव्हाणकर, नगरसेवक भैय्यासाहेब मोरे, नगरसेवक रणजित बनसोडे, नगरसेवक गणेश तांदळे, नगरसेवक विशाल घाडगे, अमोल गायकवाड, आकाश कंडेरे, अनिकेत जाधव, जिवन मकर, अंजिक्य आनेराव, ज्ञानेश कुलकर्णी, रोहिदास भांबे, अभिजित तपसे, सोहेल शेख, अशोक नाडे, बाळा वकटे, प्रदिप जाधव, आकाश मडावी, नितीन साळवी, मयुर बडे, दिपक जाधव, अक्षय तिडके, शरद वाघ, केशव तांदळे, गणेश शिंदे,साळाप्पा रामेश्वर, आप्पा इंदुरे, करण भालशंकर, सुशेन आमटे,अनिकेत सुतार, लहु गायकवाड, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी व महाविद्यालयातील प्रार्चांय,प्राध्यापक, जि.प.चे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थीं उपस्थित होते.

डॉ.अमोल कोल्हे हे शिवरायांचे भक्त आहेत,त्यांची जात काय काढता―धनंजय मुंडे यांनी आढळरावांना सुनावले

शिरूर मतदारसंघात चार सभांचा झंझावात

शिरूर दि.२४: डॉ. अमोल कोल्हे यांचा इमान छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभू महाराजांशी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना अठरापगड जातीतील लोकांना घेऊन केली आहे. डॉ. अमोल कोल्हेंची जात काढणाऱ्या शिवसेनेच्या उमेदवारांनी विसरू नये की डॉ. कोल्हे शिवरायांचे भक्त आहेत अशा शब्दात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेना उमेदवार आढळराव पाटील यांना सुनावले.

शिरूर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी धनंजय मुंडे यांनी आज तळेगाव ढमढेरे,मांढवगण खराटा ( तालुका शिरूर ) येथे जाहीर सभा घेतल्या त्यावेळी ते बोलत होते. डॉ.कोल्हे आणि माझी मैत्री ही जुनी आहे. कोल्हे यांनी प्रसंगी घरदार विकून छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे यांचा इतिहास मांडला. मला अभिमान आहे की मी या सच्चा मावळ्यासाठी तुमचे आशीर्वाद मागतोय असे मुंडे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची या मतदारसंघात 2 दिवसांपूर्वी सभा झाली. त्याला गर्दी किती? तर जेमतेम. तीही २०० रुपये देऊन आणलेली.यावरून हवेचा रोख ओळखा असे मुंडे म्हणाले.डॉ.अमोल कोल्हे हा छत्रपतींचा मावळा आहे. या मावळ्याच्या गर्जनेने विरोधकांची पळता भुई थोडी झाली आहे. दिल्ली हदरवून सोडण्यासाठी या मावळ्याला लोकसभेत प्रचंड बहुमत द्या असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार अशोकबापू पवार, दिलीपराव ढमढेरे, पोपटराव गावडे, प्रदीपदादा कंद आदीसह पदाधिकारी उपस्थीत होते.

दुष्काळात सापडलेल्या शेतकर्‍यांना सरकारने अक्षरशः वार्‍यावर सोडले―धनंजय मुंडे

शेतकर्‍यांचा रोष मतपेटीतून व्यक्त होणार बीड दि.०९: राज्यात भिषण दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चार्‍याचा आणि पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. मात्र दुष्काळात सापडलेल्या शेतकर्‍यांना सरकारने अक्षरशः वार्‍यावर सोडुन ते निवडणुक प्रचारात दंग झाले असल्याची टिका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आतापर्यंत राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये फिरताना अतिशय भिषण … Read more

बीडची राष्ट्रवादी नेस्तनाबूत ; आमच्या भावाचा पायगुणच तसा―ना. पंकजा मुंडे

मयत शेतकऱ्यांच्या नावच्या जमिनी लाटणाऱ्यांनी ‘वैद्यनाथ’ च्या अन्नात माती कालविणे दुर्दैवी – ना. पंकजाताई मुंडे

येळंबघाट येथील तुफानी गर्दीच्या सभेने राष्ट्रवादीच्या पायाखालची जमीन सरकली

बीड दि. ०६: मयत शेतकऱ्यांच्या नावच्या जमिनीही जगमित्र या न झालेल्या कारखान्याच्या नावाखाली लाटणा-यांनी वैद्यनाथच्या अन्नात माती कालविण्याचा प्रकार दुर्दैवी आहे असा घणाघात राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी केला.जयदत्त क्षीरसागर यांच्या भूमिकेने जिल्हयातील उरली सुरली राष्ट्रवादीही नेस्तनाबूत झाली आहे, आमच्या भावाचा पायगुणच तसा आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला.

भाजपा महायुतीच्या उमेदवार डाॅ प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ येळंबघाट येथे झालेल्या तुफान गर्दीच्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत आ. सुरेश धस, रमेश आडसकर, रमेश पोकळे, आ. संगीता ठोंबरे आदी उपस्थित होते.

आपल्या भाषणात राष्ट्रवादीचा खरपूस समाचार घेताना पंकजाताई म्हणाल्या की, सर्व सिंचन प्रकल्प आपल्याच भागात नेऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बीड जिल्हा कायम कोरडा ठेवला. निधी देण्याऐवजी त्यांनी नेहमीच जिल्ह्यातील घरे फोडण्यावर भर दिला. आमच्याही घरात तेच केले. आमच्या भावाने जेंव्हा नगरपालिका फोडली त्यावेळेस गोपीनाथराव मुंडे यांनी झोपेत धोंडा घातल्याची खंत व्यक्त केली होती. मात्र, अनेकदा संधी येऊनही कोणाचेही फोडण्याचे पाप मी केले नाही. कोण आपले. कोण परके हे न पाहता जिल्ह्यात भरघोस निधी देऊन सर्वांगीण विकास केला. आमची सत्ता येण्यापूर्वी उपेक्षित बीड जिल्ह्यात रस्त्यांची अवस्था देखील प्रचंड वाईट होती. रस्त्याने जाताना दातात चणे ठेवले त्याचा भुगा व्हायचा. खड्ड्यामुळे अपघात होऊन अनेक लोक दगावले. मात्र आम्ही येताच रस्ते सुधारण्यावर भर दिला. आज जिल्ह्यात सर्वत्र महामार्गांचे जाळे आहे. अंतर्गत रस्तेही मोठ्या प्रमाणत झाली. एकट्या पाली गटात १६४ किमीचे रस्ते केलेत तर जिल्ह्यातील ६० गटात एकूण किती रस्ते झाले असतील याचा हिशोब तुम्हीच करा असे म्हणत त्यांनी सप्रमाण विकासकामांची यादी सांगितली. आज तुमच्याकडे मत मागण्यासाठी आले नसून केलेल्या विकास कामांच्या जोरावर हक्क मागत आहे, तुमची लेक आणि बहिण या नात्याने तुम्ही तो देणारच आहात अशी साद त्यांनी जनसमुदायाला घातली. राणा डोईफोडे यांनी प्रास्ताविकात मुंडे यांच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांची माहिती दिली.

आमच्या भावाचा पायगुणच तसा

आमचे भाऊ राजकरणात आले तेंव्हापासून आमची सत्ता गेली, अनेक अडचणी आल्या. जिल्ह्यात मी एकटी भाजपची आमदार तर इतर राष्ट्रवादीचे होते. त्यानंतर आमचे भाऊ राष्ट्रवादीत गेले आणि त्यांच्या पायगुणामुळे त्यांची सत्ता गेली. सर्व मातब्बर नेते पक्षाबाहेर पडले. आता जिल्ह्यात सर्व भाजपचे आमदार असून राष्ट्रवादीचे एकमेव आमदार जयदत्त क्षीरसागर हे देखील बाजूला झाले आहेत. आमच्या भावाचा पायगुणच तसा असल्याचा टोला पंकजाताई मुंडे यांनी लगावला.

आमचे राजकारण जातीचे नाही तर मातीचे

सभेदरम्यान पंकजा मुंडे यांनी विविध गावांच्या सरपंचांना सर्वांसमक्ष बोलावून त्यांच्या ग्राम पंचायतींना किती निधी आला यांची जाहीर माहित देण्यास सांगितले. त्यात हादगावला १ कोटी २० लाखांचा निधी, भंडारवाडीला ७ कोटी ५० लाख आणि कळसांबर ७ कोटीचा निधी आल्याचे सरपंचांनी सांगितले. यापैकी भंडारवाडी शिवसंग्रामच्या ताब्यात आहे तर तिन्ही गावे मराठा बहुल लोकसंख्येची आहेत. हा धागा पकडून पंकजा मुंडे म्हणाल्या कि, आम्ही जातपात, पक्ष याच्या पलीकडे जाऊन विकास करतो, आम्ही जातीचे नाही तर मातीचे राजकारण करतो.

राष्ट्रवादीचे उमेदवार ‘बिचारे’

अमरसिंह पंडित यांना दगा देऊन ऐनवेळी प्रीतम मुंडे यांच्या विरोधात ‘बिचाऱ्या’ बजरंग सोनवणे यांना बळीचा बकरा बनविण्यात आले आहे. त्यांनी आजवर उसाच्या मापात काटा मारून जेवढे कमविले आहे तेवढे सगळे या निवडणुकीत गमविणार अशी खोचक टीका त्यांनी यांनी सोनवणे यांच्यावर केली.

वाघिणीचे रहस्य उलगडले

ना. पंकजाताई मुंडे यांचा उल्लेख त्यांचे समर्थक नेहमीच ‘वाघीण’ असा करतात. नुकतेच प्रीतम मुंडे यांच्या प्रचाराच्या सभेत पंकजाताई मुंडे यांचे ‘वाघिणीची शिकार गुलेलने करायंची नसते’ अशा शब्दांत राष्ट्रवादीला सुनावले होते. यावर सभेत बोलताना त्यांनी वाघीण शब्दाचे रहस्य उलगडले. संघर्ष यात्रे दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील चांदा येथील सभेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीच आपल्याला वाघीण ही उपाधी दिल्याचे त्यांनी सागितले. बीडची वाघीण चंद्रपुरात येऊन सभा घेत आहे असे कौतुक त्यावेळी मुनगंटीवार यांनी केले होते.


बजरंग सोनवणे आठ कोटी रुपयांच्या रस्त्याचे अर्धवट काम पूर्ण करा―भिमराव धोंडे

आपले ठेवायचे झाकून लोकांचे पहायचे वाकून हे थांबवा

धानोरा-फुंडी-पिंपळगाव दाणी-विहीरा-घोंगडेवाडी रस्त्याचे काम कोणाचे पाप?

शिरुर दि.०२: लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पालकमंत्र्यावर आरोप करताना विचार करावा.आष्टी तालुक्यातील ज्या आठ कोटी रुपयांचे टेंडर बजरंग सोनवणे यांना मिळाले होते त्या रस्त्याची अवस्था पहा.रस्त्याचे काम अर्धवट ठेवून बोगस बिले उचलण्याचे काम केले आहे.त्यांना सत्ताधारी लोकांबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे सांगत आपले ठेवायचे झाकून आणि लोकांचे पहायचे वाकून असा टोला आमदार भिमराव धोंडे यांनी मानूर येथील कॉर्नर बैठकीत लगावला आहे.पुढे बोलताना ते म्हणाले की,बजरंग सोनवणे ज्या कारखान्याच्या विषयावर बोलून पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या वर निशाणा साधत आहे,ते पूर्ण चुकीचे आहे.सोनवणे यांचा कारखाना नवीन असल्यामुळे शासनाकडून मोठ्या प्रमाणावर त्याला सवलती मिळत आहेत.ज्या कारखान्याला अजून दहा वर्षे पूर्ण झाली नाही तो कारखाना चालविणारांनी ऊसतोड मजुरांचे प्रश्न सोडविणाऱ्यांवर बेताल आरोप करू नयेत.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बजरंग सोनवणे यांनी आष्टी तालुक्यातील ज्या सात-आठ गावांना रस्ता करण्याचे टेंडर घेतले होते.ते काम जाऊन पहा म्हणजे लक्षात येईल.अजूनही या रस्त्याचे काम पूर्ण झाले नसून बजरंग सोनवणे यांचे आरोप म्हणजे आपले ठेवायचे झाकून आणि लोकांचे पहायचे वाकून असला प्रकार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आणि जिल्ह्याच्या सुंस्कृत आणि अभ्यासू खासदार प्रितमताई यांना त्यांच्या संकल्पनेतील भविष्यात होणारे विमानतळ पूर्ण करण्यासाठी मत द्यायचे असल्याचे त्यांनी आवाहन केले.रामकृष्ण बांगर यांच्या विषयी बोलताना ते म्हणाले की,दुसऱ्याला खोटे ठरविणारे हे स्वताच खोटे बोलत असून अगोदर त्यांनी स्वताच्या पाटोद्यात काय विकास केला ते सांगावे. तालुक्यातील अनेक गावांत भिमराव धोंडे यांनी भाजपा उमेदवार प्रितम मुंडे यांच्या प्रचारानिमित्त कॉर्नर बैठका आणि नागरिकांना भेटून त्यांनी प्रत्यक्ष संवाद साधला.

जयदत्त आण्णा शुक्रवारी घेणार का ‘या’ पक्ष प्रवेशाचा निर्णय ?

बीड : ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर बीड मध्ये राजकीय भूकंप होईल का ?,’ते’ भाजपा प्रवेशाच्या तयारीत आहेत का? असा प्रश्न जिल्ह्यातील मतदार जनतेला पडला आहे. मागील काही वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीपासून दुरावलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे येत्या शुक्रवारी आपली राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत. ५ एप्रिल रोजी क्षीरसागरांनी समर्थकांची व्यापक बैठक आयोजित केली असून या बैठकीत त्यांची यापुढील राजकीय वाटचाल निश्चित होणार आहे. क्षीरसागर यांच्या भूमिकेकडे बीड जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागुन आहे.

बीड जिल्ह्यातील राजकारणात कायमच आपला दबदबा ठेऊन असलेले जयदत्त क्षीरसागर म्हणजे राज्यातील ओबीसी समाजाचे मोठे नेतृत्व आहे. अखिल भारतीय तैलिक महासभेच्या माध्यमातून ते देशभरातील तेली समाजाचे नेते म्हणून पुढे आलेले आहेत. जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात राजकीय भूकंप घडविण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणारा बीड जिल्ह्यात सर्व जागांवर भाजपने झेंडा फडकवला, मात्र एकमेव जयदत्त क्षीरसागर हे आपला गड राखण्यात यशस्वी ठरले होते. त्यानंतर दोन वर्षांनीच एकेकाळी राष्ट्रवादीतील वजनदार नेते असणारे जयदत्त क्षीरसागर अंतर्गत गटबाजीमुळे पक्षापासून दुरावले. त्यांच्या नाराजीची उघडपणे चर्चा होऊ लागली. मात्र, मागील वर्षाच्या अखेरीस बीड येथे शरद पवारांच्या सभेत त्यांनी हजेरी लावल्यामुळे त्यांची नाराजी दूर झाली असावी असा अंदाज बांधण्यात येऊ लागला होता परंतु, त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात परळी येथे राष्ट्रवादीच्या निर्धार यात्रेच्या समारोपाकडे त्यांनी पूर्णपणे पाठ फिरवली होती. त्यावेळेस पासूनच क्षीरसागर वेगळी राजकीय भूमिका घेणार अशी चर्चा होऊ लागली. सध्या देशभरात सर्वत्र लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना क्षीरसागर मात्र अद्यापपर्यंत शांत असल्यामुळे त्यांच्या समर्थकांतही अस्वस्थतेचे वातावरण होते. त्यामुळे त्यांनी राजकीय भूमिका स्पष्ट करावी असा आग्रह समर्थकांनी धरला होता. अखेर कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन आ.जयदत्त क्षीरसागर आणि बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी ५ एप्रिल रोजी आशीर्वाद लॉन्स येथे जिल्हाभरातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजीत केला आहे. या मेळाव्यात आ.जयदत्त क्षीरसागर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत व याच वेळी आपली भूमिका मांडणार आहेत.आ.जयदत्त क्षीरसागर कोणामागे आपली राजकीय ताकद लावणार आहेत याबद्दल जिल्ह्यात उत्सुकता लागली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडीया मराठवाडा सरचिटणीसपदी रवीकिरण देशमुख यांची निवड

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना. धनंजयजी मुंडे यांच्या हस्ते दिले नियुक्तीपत्र

अंबाजोगाई (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडीया मराठवाडा सरचिटणीसपदी रवीकिरण देशमुख यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीचे पत्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते त्यांना रविवार,दि.३१ मार्च रोजी देण्यात आले.

नियुक्तीपत्रात महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मराठवाडा विभागाचे सोशल मिडीया प्रदेश उपाध्यक्ष डॉ.कपिल झोटींग यांनी म्हटले आहे की,रवीकिरण आबासाहेब देशमुख यांची मराठवाडा सरचिटणीसपदी निवड करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेब,प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संघटन बांधण्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल पक्ष बळकटीसाठी व मजबुत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोंचविण्यासाठी आपले सहकार्य राहिल असा विश्वास व्यक्त करून निवडीबद्दल रवीकिरण देशमुख यांचे डॉ.कपिल झोटींग यांनी अभिनंदन केले आहे.
नियुक्तपत्र देताना जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पाटील, जि.प.सदस्य शिवाजी सिरसाट,अंबाजोगाई तालुकाध्यक्ष रणजित लोमटे,डिघोळअंबा गावचे सरपंच बाळसाहेब सोनवणे, अ‍ॅड.कवडे,प्रविण देशमुख आदींसहीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
रवीकिरण देशमुख हे हेमंत राजेमाने बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत.माजलगाव, धारूर,केज,अंबाजोगाई व परळी तालुक्यात त्यांचा मोठा मित्रपरिवार असून त्यांच्या निवडीचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ग्रामिण तसेच शहरी भागात संघटन बांधणीसाठी व पक्ष मजबुतीसाठी होणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडीया मराठवाडा सरचिटणीसपदी रवीकिरण देशमुख यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे
माजी मंञी प्रकाशदादा सोळंके,माजी आ. अमरसिंह पंडीत, राष्ट्रवादी काँग्रेस व मिञ पक्षाचे लोकसभा उमेदवार बजरंगबप्पा सोनवणे,माजी आ.पृथ्विराज साठे, अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदराव देशमुख,राजेभाऊ औताडे,विलासराव सोनवणे,नगरसेवक बबनराव लोमटे आदींनी अभिनंदन केले आहे.


धनंजय मुंडे यांनी साधला बीडमध्ये डॉक्टरांशी संवाद ; निवडणूक विकासावर व्हावी,भावनेवर नाही – धनंजय मुंडे

आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटीबद्ध

बीड दि २३(प्रतिनिधी) : बीड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज बीडमध्ये शहरातील डॉक्टरांशी संवाद साधला.

डॉक्टरांच्या अडचणी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध असून जनतेच्या आरोग्यविषयक समस्यांना आम्ही सर्वाधिक प्राधान्य देऊ अशी ग्वाही त्यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची संवाद साधण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत दिली.

यावेळी युवक नेते संदीप भैया क्षीरसागर, माजी आमदार सय्यद सलीम, असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अनिल बारकुल , सचिव डॉ. विनोद ओस्तवाल , खजिनदार डॉ.अमोल विध्ये, फारूक पटेल, महेबूब शेख, अमर नाईकवाडे, बबनराव गवते, अविनाश नाईकवाडे, प्रशांत चौरे आदी उपस्थित होते.

यावेळी डॉक्टरांच्या वतीने दिलेल्या निवेदनाचा संदर्भ घेत या मागण्या राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात असतील असे आश्वासन त्यांनी दिले. डॉक्टर हा पेशा नाही ही सेवा आहे. आयुष्यमान सारख्या योजना असताना बजेट वाढवलं नाही आम्ही ते वाढवण्याबाबत जाहीरनाम्यात समाविष्ठ करू असे आश्वासन मुंडे यांनी दिले.

वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांच्या मागण्यांवर विधिमंडळात आम्ही सरकारशी भांडलो आहोत. या सेवेत असणाऱ्या लोकांसाठी आमची आत्मीयता आहे असल्याचे त्यांनी सांगितले.

किती दिवस मागासलेपण

किती दिवस बीड जिल्ह्याचा मागासलेपण आपण आपल्या नावासमोर ठेवायचं..? ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ही ओळख कलंक आहे.बीड जिल्ह्यात विकासाच्या मुद्द्यावर राजकारण झालं नाही भावनिक मुद्द्यावर झालं म्हणून हे बीडचं मागासलेपण असल्याचे ते म्हणाले.

विकासाच्या मुद्द्यावर बीडची निवडणूक झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतांना बीड जिल्हयाला विकासाच्या दृष्टीने मोठं करण्यासाठी आपलं पाठबळ हवं अशी अपेक्षा व्यक्त केली.

आपला लोकसभेतला प्रतिनिधी डॉक्टर असूनही आपल्या समस्यांकडे त्यांचे लक्ष नाही. देशभर विक्रमी मतदान घेऊन नाव कमावलेल्या बीडच्या खासदाराचं बीडच्या विकासाच्या दृष्टीन योगदान काय..? तर खालून 5 नंबरला असणाऱ्या खासदाराने बीडच्या जनतेचा अवमान केला असल्याचे ते म्हणाले.

बीड : ‘त्या’ मेळाव्याकडे मुंदडा फिरकलेच नाही

पक्षश्रेष्ठींनी केज मतदार संघाची पूर्णपणे जबाबदारी देण्याचा शब्द पाळला नसल्याने मुंदडा नाराज केज दि.१८ : रविवारी रात्री केज येथील तिरुपती मंगल कार्यालयात बजरंग सोनवणे यांच्या प्रचाराच्या पूर्वतयारीसाठी बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, उषा ठोंबरे, सय्यद सलीम, काँग्रेसचे आदित्य पाटील इत्यादी प्रमुख उपस्थित होते. परंतु, ‘चर्चा झाली ती … Read more

लोकसभा निवडणूक 2019 :राष्ट्रवादीची 12 उमेदवारांची पहिली यादी तयार, यांना मिळणार तिकीट

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत बारामतीमधून सुप्रिया सुळे, साताऱ्यातून उदयनराजे भोसले, रायगडमधून सुनील तटकरे आणि ठाण्यातून आनंद परांजपे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र अद्यापही नगरमधील उमेदवाराच नावं जाहीर करण्यात आलेलं नाही, त्यामुळे या जागेबाबतचा सस्पेन्स कायम आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज १२ जागांवरील … Read more

राष्ट्रवादी काँग्रेस महीला बीड जिल्हा अध्यक्षपदी चंपावती ताई पानसंबळ यांची निवड

पाटोदा (शेख महेशर)दि.१३: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला बीड जिल्हा अध्यक्षपदी चंपावती ताई पानसंबळ यांची निवड करण्यात आल्याचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस महीला अध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिले आहे. चित्रा वाघ यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात नमूद केले आहे की, दि.१२ / ०३ / २०१९ पासून आपली नियुक्ती करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी व मजबुत करण्या … Read more

शेतकऱ्यांचा मावेजा न देता टोलनाका सुरू कराल तर गाठ आमच्याशी आहे.टोलनाका जाळून टाकू ; जि.प सदस्य संदीप क्षिरसागर यांचा सरकारला थेट इशारा

बीड दि.०९ (प्रतिनिधी) : बीड मधून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम चार वर्षांपासून चालू आहे.अद्याप संपूर्ण काम झाले नसताना टोल नाका सुरू करण्याचा घाट घातला आहे.एडशी-औरंगाबाद रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग यांच्या माध्यमातून खासगी कंपनी करत आहे.बायपासला सर्व्हिस रोड केला नाही.बायपासची उंची सहा मीटर आठ इंच असल्याने शेतकऱ्यांना,सर्वसामान्य वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

एडशी-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील लोकार्पण सोहळ्याचे आज आयोजन करण्यात आले. गेवराईजवळील टोलनाकाही आज सुरू होणार आहे. तिकडे गेवराईत हा कार्यक्रम सुरू असताना बीडमध्ये मात्र राष्ट्रवादीच्या वतीने रास्ता रोकोचे आयोजन करण्यात आले.राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणातील शेतकऱ्यांचा मावेजा आणि रस्त्यावरील सुविधा उपलब्ध करून न देता टोलनाका सुरू कराल तर याद राखा, टोलनाका जाळून टाकू, असा इशारा राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांनी आंदोलन वेळी दिला. राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शनिवारी रस्ता रोको करत आपला संताप व्यक्त केला.

महालक्ष्मी चौक बायपास जिरेवाडी येथे सर्व्हिस रोड करावे व रोडचे पूर्ण काम झाल्याशिवाय पाडळशिंगी येथील टोलनाका सुरू करू नये या मागणीसाठी संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यारोको आंदोलन संपन्न झाले.यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना संदीप क्षीरसागर म्हणाले, राष्ट्रवादीच्या रस्ता रोकोमुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला दौरा रद्द केला आहे. “शेतकऱ्यांचा मावेजा न देता टोलनाका सुरू कराल तर गाठ आमच्याशी आहे. टोलनाका जाळून टाकू”, असा इशारा संदीप क्षीरसागरांनी दिला आहे.

आज पासून सक्तीच्या टोल वसुलीचे उद्घाटन करण्यात येत असल्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात येत असलेल्या रस्ता रोको अंदोलनात मार्गदर्शन करताना माजी आ.सय्यद सलीम, मा.युवा नेते संदीप (भैय्या) क्षीरसागर,विजयसिंह पंडित, गंगाधर घुमरे,सुभाष राऊत,फारूक पटेल,बबन गवते,अमर नाईकवाडे,जावेद कुरेशी व सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते

बीड बायपासला सर्विस रस्ता न करता, शेतकर्यांना त्यांच्या संपादित केलेल्या जमिनींचा मावेजा न देता, राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण न करता आज पासून सक्तीच्या टोल वसुलीचे उद्घाटन करण्यात येत असल्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात येत असलेल्या रस्ता रोको अंदोलनाला मा.युवा नेते संदीप (भैय्या) क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले.

राष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेल च्या राज्य उपाध्यक्षपदी अॅड.नरसिंह जाधव यांची निवड

पाटोदा (शेख महेशर) दि.०५ :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लीगल सेल च्या प्रदेश उपाध्यक्षपदी अॅड. नरसिंह जाधव यांची नियुक्ति करण्यात आल्याचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलचे राज्य अध्यक्ष अॅड. आशिष देशमुख यांनी दिले आहे. व त्यांच्या कडे मराठवाडा विभागाची विशेष जबाबदारी ही देण्यात आली आहे.अॅड.अशिष देशमुख यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात नमूद केले आहे की, दि.०४/०३/२०१९ पासून नियुक्ती … Read more

राष्ट्रवादीचा शिवसेनेला ‘दे धक्का’ ; उपनेते डॉ. अमोल कोल्हे राष्ट्रवादीत

औरंगाबादचे (बदनापूर) माजी आमदार अरविंद चव्हाण यांचाही प्रवेश मुंबई प्रतिनिधी दि.०१ :शिवसेनेचे उपनेते डॉ.अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. याशिवाय औरंगाबादचे (बदनापूर) माजी आमदार अरविंद चव्हाणही भाजपाला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेमध्ये दाखल झाले. डॉ. अमोल कोल्हे यांचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी स्वागत केले. राजा शिवछत्रपती साकारणारे आणि … Read more