बेलवाडी ‘मनरेगा अपहार’ प्रकरण ; सोशल मिडियावर डॉ गणेश ढवळेंची नाहक बदनामी करणाऱ्या पोस्ट ,पोलीस प्रशासनाच्या कारवाई कडे लक्ष

बेलवाडी ग्रामपंचायतमध्ये मनरेगा अंतर्गत कामात ६० लाखांचा अपहार, विभागीय आयुक्त कार्यालय समोर धरणे आंदोलन करणार , सोशल मीडियावर बदनामी केली,पोलीस अधीक्षकांकडे तक्रार , अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार – डॉ गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्र शासनाने रोजगार हमी योजना मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी सुरू करण्यात आली मात्र स्थानिक पुढारी यांनी वरिष्ठांच्या वरदहस्ताने शासकीय आधिकारी, कर्मचारी यांच्याशी संगनमताने बोगस मजुर दाखवून व बनावट दस्तऐवज तयार करुन लाखो रूपयांचा अपहार केल्यामुळे संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत मोक्का लावण्यात यावा अशी मागणी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी रोहयो, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, रोहयो मंत्री, ग्रामविकास मंत्री, विभागीय आयुक्त यांना केली असून संबंधित प्रकरणी कारवाई करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे डॉ गणेश ढवळे यांनी सांगितले आहे.

कामाचे नाव वर्क कोड नंबर रक्कम
१)बांधबंदिस्ती १ते ३९ वर्क कोड नंबर १७६८४३, रक्कम २२ लाख ५७ हजार ९९८ रूपये
२) बांधबंदिस्ती ५५ ते १४० वर्क कोड नंबर १७६८४२, रक्कम २२ लाख, ४९ हजार, ७७३ रूपये
३) बांधबंदिस्ती नविन वर्क कोड नंबर १२३४८३७१०५, रक्कम ७ लाख रुपये ६७ हजार १४४ रूपये
४) वृक्षसंगोपन बेलवाडी कोड नंबर १२३४८३७१०५ रक्कम ३ लाख ३५ हजार ५५० रूपये
५) वृक्षसंगोपन वर्क कोड नंबर १२३४८३७१०६ रक्कम २ लाख ३९ हजार ९१५ रूपये
६) शोषखड्डे बेलवाडी वर्क कोड नंबर ४७३४११२३८/४७३४११२३९/४७३४११२४८ रक्कम २ लाख १९ हजार रुपये
७) जलसिंचन विहीर बेलवाडी, वर्क कोड नंबर ४७३४४६९७१ रक्कम १ लाख ८७ हजार रुपये, अशाप्रकारे एकुण ६० लाख ३७ हजार ३८० रुपयांचा अपहार बोगस मजुर व दस्तऐवज दाखवून संगनमताने शासनाची फसवणूक करण्यात आली असल्याचा डॉ गणेश ढवळे यांचा आरोप आहे.

बांधबंदिस्ती एकाच कामाचे एकाच आठवड्यात ४ मस्टर, एकही मजुर उपस्थित नसताना ३८७ बोगस मजुर दाखवले

बेलवाडी गावामध्ये गट क्रमांक १ ते ३९ व गट क्रमांक ५५ ते १४० अशी दोन बोगस कामे कागदोपत्री केल्याचे दाखवले आहे व दोन्ही कामावर दिनांक २६/०४/२०१९ ते ०१/०५/२०१९ या आठवड्यात गट क्रमांक १ते ३९ वरती एकाच कामावर ४ मस्टर काढलेले आहेत.
१) मस्टर क्रमांक २०९९-५० मजुर
२) मस्टर क्रमांक २१००-५० मजुर
३) मस्टर क्रमांक-२१०१-५० मजुर
४) मस्टर क्रमांक-२१०२-४३ मजुर या कालावधीत एकुण १९३ मजुर दाखवले आहेत.

२) बांधबंदिस्ती गट क्रमांक ५५ते १४० या कामावरती दि, २६/०४/२०१९ते ०१/०५/२०१९ या कालावधीत एकाच कामावर ४ मस्टर काढलेले आहेत
१) मस्टर क्रमांक २०९२-५० मजुर
२) मस्टर क्रमांक-२०९३-५० मजुर
३) मस्टर क्रमांक-२०९४-५० मजुर
४) मस्टर क्रमांक-२०९५- ४४ मजुर असे एकूण १९४ मजुर दाखवले असल्याचा डॉ ढवळे यांचा आरोप आहे.
एकाच कामावर व एकाच आठवड्यात ४ मस्टर कसे काय काढले? प्रत्यक्षात एकही मजुर उपस्थित नसताना या आठवड्यात एकुण ३८७ बोगस मजुर दाखवून लाखो रुपये हडप केले आहेत.

२० वर्षापुर्वीची जलसिंचन विहीर नविन खोदल्याचे दाखवून अपहार
२० वर्षापुर्वीची विहीर नविन जलसिंचन विहीर खोदल्याचे दाखवून १ लाख ८७ हजार रूपये निधीचा अपहार करण्यात आला आहे.

मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी – डॉ.गणेश ढवळे

संबंधित प्रकरणात चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन अपहारीत रक्कम शासन दरबारी जमा करण्यात यावी, बोगस मजुरांची नावे यादीत असून बंदिस्त जागेत वैयक्तिक रित्या रोहयो मजुरांचे जवाब नोंदवावेत म्हणजे खाते कोणी उघडले, मजुरांच्या नावावरील पैसे कोणी परस्पर उचलले याचा उलगडा होऊल, याप्रकरणात स्थानिक सरपंच, ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक, आणि पंचायत समिती मधिल गटविकास आधिकारी, विस्तार आधिकारी, इंजिनिअर, एपीओ, डाटा एंट्री ऑपरेटर यांनी संगनमताने अपहार केल्यामुळे संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी

सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी संबंधितांची डॉ गणेश ढवळे पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करणार तसेच अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार

बेलवाडी नरेगाच्या कामातील अपहार प्रकरणात कारवाई करण्यासाठी डॉ गणेश ढवळे यांनी लेखी तक्रार केल्यामुळे सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी सरपंचपती व त्यांच्या सहकाऱ्यां विरोधात पोलीस अधीक्षक यांना लेखी तक्रार केली असून अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहेत.