‘थॅक्यू, बाबा’ म्हणत पंकजा मुंडे, डाॅ.प्रितम मुंडे लोकनेत्याच्या समाधीवर नतमस्तक

प्रभू वैद्यनाथाचेही घेतले दर्शन ; अभूतपूर्व विजयाबद्दल जिल्हयात साजरी झाली दिवाळी

परळी दि. २३: ‘थॅक्यू, बाबा’ म्हणत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे आणि खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी आज सायंकाळी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीवर नतमस्तक होत लोकसभा निवडणुकीतील विजय त्यांना समर्पित केला. दरम्यान, विजयाचे प्रमाणपत्र स्विकारण्यासाठी बीडकडे जाताना रस्त्यात ठिक ठिकाणी ग्रामस्थांनी ना. पंकजाताई व खा.डाॅ. प्रीतमताई मुंडे यांचे जंगी स्वागत केले, त्यांच्या अभूतपूर्व विजयाबद्दल आज जिल्हयात अक्षरशः दिवाळी साजरी करण्यात आली.

पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये भाजपा महायुतीच्या उमेदवार डाॅ प्रितमताई मुंडे यांनी विक्रमी मताधिक्य घेऊन ऐतिहासिक विजय प्राप्त केला. सायंकाळी विजयाचे प्रमाणपत्र स्विकारण्यासाठी डाॅ प्रितमताई हया ना. पंकजाताई मुंडे यांच्यासह बीडकडे रवाना झाल्या. बीडला जाण्यापूर्वी त्यांनी डाॅ अमित पालवे, गौरव खाडे यांच्यासह परळीत प्रभू वैद्यनाथाचे तसेच दक्षिणमुखी गणपतीचे दर्शन घेतले.

गोपीनाथ गडावर नतमस्तक

ना. पंकजाताई व खा डाॅ प्रितमताई मुंडे यांनी नंतर गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. ‘थॅक्यू, बाबा’ म्हणत त्यांनी हा ऐतिहासिक विजय त्यांना समर्पित केला व त्यांचे आभार मानले. ‘संडे टू मंडे, गोपीनाथ मुंडे,’ ‘मुंडे साहेब अमर रहे’ अशा घोषणांनी गडाचा परिसर यावेळी दणाणून गेला होता.

गुलालांची उधळण अन् फटाक्यांची आतिषबाजी

ना. पंकजाताई व खा डाॅ प्रितमताई मुंडे यांच्या वाहनांचा ताफा बीडकडे जाताना रस्त्यात ठिक ठिकाणी ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी गुलालांची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत त्यांचे जल्लोषात स्वागत केले. कांही ठिकाणी उत्साही कार्यकर्त्यांनी जेसीबी मशिनने गुलाल उधळला तर कांहीनी स्वागतासाठी भले मोठे पुष्पहार आणले होते, प्रत्येक गावांत व चौका चौकात त्यांचे जंगी स्वागत झाले, जिल्हयात यानिमित्ताने अक्षरशः दिवाळी साजरी करण्यात आली.


बीड: प्रीतमताई मुंडे 1 लाख 77 हजार 829 मतांनी विजयी

आठवडा विशेष टीम― खा.प्रीतम गोपीनाथ मुंडे १ लाख ७७ हजार ८२९ मतांनी विजयी झाल्या आहेत परंतु आणखी पोस्टल मतदान बाकी आहे.भाजपच्या बीड लोकसभा निवडणूक २०१९ साथीच्या उमेदवार डॉ प्रितम गोपीनाथ मुंडे यांना आष्टी विधानसभा मतदारसंघातुन ७०,०४४ एवढे मताधिक्य मिळाले आहे.आणि परळी – १८,९१९ ,माजलगाव – १९,७१६, केज – २८,०००, गेवराई – ३४,८८८,बीड – ६,२६२ अश्या … Read more

डॉ प्रितम मुंडे बीड लोकसभा मतदारसंघातुन १ लाख ४४०३१ मतांच्या आघाडीवर

आठवडा विशेष टीम― लोकसभा निवडणुक २०१९चा निकाल आज जाहीर होत आहे.बीड लोकसभा च्या जागेवर डॉ प्रितम गोपीनाथ मुंडे १ लाख ४४,०३१ मतांच्या आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे. बजरंग सोनवणे यांना पिछाडीवर टाकत प्रितमताई मुंडे यांची लोकसभा निवडणुकीच्या निकालात विजयाकडे वाटचाल.तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा.विष्णू जाधव हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. डॉ.प्रितम मुंडे – ५,७५,२२८ … Read more

बीडमधून डाॅ.प्रितम मुंडे यांचा विजय निश्चित ; मुंडे भगिनींची राष्ट्रवादी काँग्रेसला धोबीपछाड

१६ व्या फेरी अखेर ७० हजार मतांनी आघाडीवर

परळीत ‘यशश्री’ निवासस्थानाबाहेर भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष

बीड दि. २३:आठवडा विशेष टीम लोकसभेच्या निवडणुकांची आज मतमोजणी सुरु असून देशभरात भाजप अभूतपूर्व आघाडीवर आहे. बीड जिल्ह्यातही खा. प्रीतामताई मुंडे या १६ व्या फेरीअखेर ७० हजार मतांनी आघाडीवर होत्या. मतमोजणीचा ट्रेंड पाहता खा. प्रीतमताई यांच्या विजयाच्या घोषणेची केवळ औपचारिकता बाकी असल्याने कार्यकर्त्यांचा ‘यशश्री निवासस्थानी प्रचंड जल्लोष सुरु आहे. पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे आणि खा. प्रीतमताई मुंडे यांनी देखील कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांचा आनंद द्विगुणीत केला आणि जिल्ह्यातील सर्व जनतेचे आभार मानले.

बीडची निवडणूकीबाबत राज्यभरात प्रचंड उत्सुकता होती. खा. प्रीतमताई मुंडे या स्वकर्तुत्वावर प्रथमच निवडणुकीला सामोरे गेल्या. प्रत्येक सभातून त्यांनी पाच वर्षात केलेल्या विकासकामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडतानाच भविष्यातील विकासकामांचा आराखडा देखील जनतेसमोर ठेऊन आश्वासित केले. ना. पंकजाताईंनी विरोधकांच्या जातीपातीच्या राजकारणाचे वाभाडे काढत त्यांची पोलखोल केली. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसने विकासाबाबत कुठलेही भाष्य न करता केवळ मुंडे भगिनींना दुषणे देण्यात धन्यता मांडली अतिशय खालची पातळीवर जाऊन मुंडे भगिनीं टीका करण्यात आली. याची चीड जनतेच्या मनात होती, तीच मतदानातून दिसून आली. मुंडे भगिनींनी विरोधकांच्या टोळीला जबरदस्त धोबीपछाड दिली असून १६ व्या फेरीपर्यंतच खा. प्रीतमताई ७० हजाराची आघाडी घेऊन विजयाच्या नजीक गेल्या आहेत.सकाळपासून निकालाकडे लक्ष लावून बसलेल्या कार्यकर्त्यांना ताईंच्या विजय जवळ आल्याचा अंदाज येताच त्यांनी यशश्री निवासस्थनाकडे धाव घेतली. कार्यकर्त्यांचे जत्थेच्या जत्थे वाजत गाजत आणि फटक्यांची आतिषबाजी करत यशश्री निवासस्थानाकडे येत आहेत. कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि उत्साह पाहून मुंडे भगिनींनी त्यांची भेट घेऊन त्यांचा आनंद द्विगुणीत केला. दरम्यान, खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांना आघाडी मिळताच त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे यांनी पंकजाताई व प्रीतमताई यांचे पेढा भरवून अभिनंदन केले. यावेळी मुंडे साहेबांच्या आठवणीने त्यांना गहिवरून आले.

मुंडे साहेबांचा आशीर्वाद व कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे यश

यावेळी माध्यमांसमोर बोलताना पंकजाताईंनी जिल्ह्यातील सर्व जनतेचे आभार मानले. स्व. गोपीनाथराव मुंडे यांचा विकासाचा वारसा भविष्यातही चालू ठेऊ अशी ग्वाही त्यांनी दिली. जिल्ह्यातील जनतेने जातीपातीच्या राजकारणाला थारा न देता विकासाची कास धरली. खा. प्रीतमताई मुंडे यांच्या विकास कामांना जनतेने कौल दिला. त्यांच्या विश्वासाला कदापीही तडा जाऊ देणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणीने पंकजाताई भावूक

आज विजयाच्या वाटेवर असताना ना. पंकजाताई मुंडे साहेबांच्या आठवणीने भावूक झाल्या. सकाळी त्यांनी स्वतःचा व प्रितमताई यांचा बालपणीचा मुंडे साहेबांना फोनवर बोलतानाचा फोटो ट्विट केला होता. माझे बाबा तथा माझे नेते मुंडे साहेब यांची याप्रसंगी खूप आठवण येत असल्याचे त्यांनी सांगितले. हे यश त्यांचेशी शेअर करता येत नाही पण आज त्यांना आमचे नक्कीच कौतुक वाटले असते आणि त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला असता अशी भावनिक प्रतिक्रिया पंकजाताईंनी दिली.


दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी राज्यातील आदर्श आचारसंहिता शिथिल ; मुख्यमंत्र्यांची मागणी मान्य

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मुख्यमंत्र्यांची मागणी मान्य मुंबई : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात लागू असलेली आदर्श आचारसंहिता शिथिल करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मागणी भारत निवडणूक आयोगाने मान्य केली आहे. राज्यातील अनेक भागांत दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून प्रशासनाकडून यासंदर्भात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, राज्यात … Read more

राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखेर विरोधीपक्षनेते पदाचा राजीनामा दिला ; राहुल गांधींनी राजीनामा स्वीकारल्याची माहिती

अहमदनगर: काँग्रेस(आय) चे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखेर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा स्वीकारला असल्याचे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. शिर्डीमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला मोठा धक्का बसला असून आता विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेस कुणाची वर्णी लावणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात टीकास्त्र सोडल्यानंतर विखे पाटील यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केले होते.त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा चालू आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राधाकृष्ण विखे पाटील भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार असल्याचे राजकीय सुत्रांमार्फत समजते आहे.

कन्हैया कुमार निवडणूकीच्या रिंगणात उतरल्यापासून भाजपाला पराभव दिसू लागला आहे का ?

मुंबई: देशात भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यापासून सरकारने बेरोजगारी,शेतकऱ्यांच्या प्रश्नांना कायम बाजूला ठेवल्याचे औचित्य साधून,बेरोजगारीच्या प्रश्नावर आवाज उठवत जेएनयु चे माजी विद्यार्थी नेते कन्हैया कुमार आता बेगूसराय लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.कन्हैया यांचे प्रतिस्पर्धी गिरीराज सिंह भारतीय जनता पार्टी तर्फे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. कायमच चर्चेत असलेले कन्हैया कुमार भारतीय जनता पार्टी च्या उमेदवाराचा पराभव … Read more

आचारसंहिता पथकांची सोयगावात संशयास्पद कारवाई ; रात्री भरारी पथक फिरकत नसल्याचा मतदारांचा आरोप

सोयगाव दि.१७(ज्ञानेश्वर धोंडू पाटील):औरंगाबाद आणि जालना लोकसभा मतदार संघाला जोडलेल्या सोयगाव तालुक्यातील १०३ मतदान केंद्रांसाठी आचारसंहितेचे सहा पथके तैनात करण्यात आली असून २४ तास या पथकांना सतर्क राहण्याच्या सूचना असल्याने आठ तासाच्या तीन शिफ्टमध्ये ही पथके तालुक्यात सक्रीय झाली आहे.परंतु या पथकांच्या सलग पंधरा दिवसांच्या कारवाईमध्ये अहवाल निरंकच असल्याने आचारसंहिता पथकांच्या कारवाईवर संशयाचे जाळे निर्माण … Read more

जातीपातीचे राजकारण हे दुर्देव ; बीड जिल्ह्यात मी डॉ.प्रितमताई मुंडे यांना शुभेच्छा देण्यासाठी परळीत आलो―खा.छत्रपती संभाजीराजे भोसले

परळी दि.१६: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना अठरा पगड जाती धर्माच्या, बारा बलुतेदार लोकांना सोबत घेवून स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शाहु, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजनांना एकत्रित करून न्याय मिळवून दिला. तोच आदर्श माझ्या डोळ्यासमोर आहे. राजकारणात मला जातपात मान्य नसून लोकसभा निवडणूकीत बीड जिल्ह्यात हे घडतं हे दुर्देव आहे. स्व. गोपीनाथराव मुंडे घराण्याचे … Read more

कुणाला दाबून आयुर्वेद कॉलेजवर अतिक्रमण केले?―डॉ सुजय विखेंचे जगताप यांच्यावर टीकास्त्र

अहमदनगर: कोणत्या वैचारिकतेचा खासदार लोकसभेत पाठवयचा, त्याचा अभ्यास पाणी प्रश्‍नावर किती? खासदाराने काय काम केले पाहिजे? दोन उमेदवारांपैकी कोण कामाला येऊ शकतो, याची चर्चा निवडणुकीत व्हायला पाहिजे. माझ्यावर अतिक्रमणाचे आरोप केले जात आहेत. मात्र, दमदाटीने बळकावण्याला अतिक्रमण म्हणतात. तुम्ही चालवलेल्या आयुर्वेद कॉलेजवर कुणाला दाबून अतिक्रमण केले? याचे उत्तर तुम्ही लोकांना दिले पाहिजे, अशा शब्दांत डॉ. सुजय विखे पाटील यांनी विरोधी उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्यावर नामोल्लेख टाळून टीका केली आहे.

अहमदनगर तालुक्याच्या प्रचारदौर्‍यावर असलेल्या विखे पाटील यांनी सोनेवाडी, चास, कामरगावनंतर अकोळनेर, भोरवाडी, सारोळा कासार आदी गावात मतदारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. सुजय विखे पाटील पुढे म्हणाले की, तुम्ही ठामपणे सांगा की हे कॉलेज आमच्या आजोबांनी, वडिलांनी उभे केले. ते कुणाचे होते? कुणी उभे केले? संस्था कुणी सुरू केली? संस्था सुरू होत असतांना तुम्ही कसे त्यात अतिक्रमण केले? अतिक्रमण केल्यावर कसा त्यावर संपूर्ण ताबा मिळवला? असे सवाल त्यांनी उपस्थित करत माझ्यावर अतिक्रमणाचे आरोप करण्याआधी जनतेला याची उत्तरे तुम्ही दिली पाहिजेत, असे ते म्हणाले.
कॉलेज वाढविण्याऐवजी फक्त पक्षाचे कार्यालय म्हणून चालवले. हे पाप आम्ही केले नाही. स्वतःच्या कर्तुत्वावर स्व.बाळासाहेब विखे पाटील, ना. राधाकृष्ण विखे पाटील, आम्ही स्वतः संस्था सुरू करुन जागा खरेदी केल्या. कॉलेजेस उभे केले. मुलांना शिकवले. कुणाच्या जागा आम्ही बळकावल्या नाहीत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
समोरचे उमेदवार बाहेरचा व घरचा यातच अडखळलेत. मात्र घरचा आणि बाहेरचा हा विषयच नाही. समोरचा उमेदवार २४ तास उपलब्ध असला तरी तुम्ही जाऊ शकता का? याचा विचार करा. तसेच नुसते उपलब्ध राहून काही होत नाही. कामे करता आली पाहिजेत. तुमची कामे झाली पाहिजेत. जनसेवेच्या माध्यमातून, आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून जनतेसाठीची माझी सेवा सुरूच राहणार आहे. दुष्काळी भागातील, जिरायत भागातील जनतेला न्याय देण्याचे काम आम्ही करत आहोत. शेतकर्‍यांचे प्रश्‍न, मुद्दे महत्वाचे आहेत. मात्र, ते लोकसभेत मांडले गेले पाहिजेत. हे सर्व प्रश्‍न मांडण्यासाठी अभ्यासू, बोलता येणारा खासदार पाठवला पाहिजे. समोरचा उमेदवार विधानसभेत चार वर्षात फक्त चारच मिनिटे बोललाय, असे सांगत या सर्वांचा विचार करुनच जनतेने निर्णय घ्यावा, असे आवाहन डॉ. विखे पाटील यांनी केले आहे. यावेळी बाळासाहेब हराळ, संदेश कार्ले, बाळासाहेब पोटघन आदी उपस्थित होते.


धनगर समाजाला आरक्षण देण्याची भाषा राष्ट्रवादी कधीच करत नाही―डॉ विकास महात्मे

ना.पंकजाताई मुंडेंच नेतृत्व बळकट करा; डॉ. प्रितमताई यांना पुन्हा दिल्ली पाठवा बीड दि.१५: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राजकारणासाठी धनगर समाजाचा उपयोग करून घेतला मात्र आरक्षण देण्याची भाषा कधीच करत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाच्या कल्याणासाठी अनेक सवलती सुरू केल्या असुन भाजप-सेना युतीचे सरकारच आरक्षण मिळवुन देईल. बीड जिल्ह्याच्या भाग्यासाठी ना.पंकजाताई मुंडे यांचे नेतृत्व फायद्याचे असुन … Read more

७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा करणारांनी तुमच्या भागात एक तरी बंधारा दिला का?―पंकजा मुंडे

डोळ्यात बिब्बा पडल्याने राष्ट्रवादीला बीड जिल्हयाचा विकास दिसत नाही

कड्यातील अभूतपूर्व ऐतिहासिक प्रचार सभेस लोटला जनसागर ; पवारांच्या सभेपेक्षाही झाली मोठी सभा

आष्टी दि.१५: राष्ट्रवादीच्या डोळ्यात बिब्बा पडला असल्याने त्यांना आम्ही केलेला विकास दिसत नाही. त्यामुळे ते आमच्यावर बेछूट आरोप करत असून या पक्षाचे नाव आता ‘बुद्धी भ्रष्टवादी’ असे ठेवण्याची वेळ आली आहे. एकत्र घराचा दाखला देणाऱ्या शरद पवारांनी कॉंग्रेस फोडून राष्ट्रवादी निर्माण केली. पण आमच्या भावाच्या पायगुणामुळे त्या पक्षाची वाट लागली असून हा पक्ष जन्मात सत्तेवर येणार नाही. हे केवळ घरे फोडण्यात तरबेज आहेत अशी जोरदार टीका ना. पंकजाताई मुंडे यांनी कडा येथील सभेत केली.

शरद पवारांच्या रविवारच्या आष्टीतील सभेनंतर कडा येथे आज भाजपा महायुतीच्या उमेदवार डाॅ प्रितमताई मुंडेच्या प्रचारार्थ ना. पंकजाताई मुंडे यांची अभूतपूर्व अशी सभा झाली. या सभेत अपेक्षेप्रमाणे जोरदार फटकेबाजी करत त्यांनी राष्ट्रवादीवर तुफान फटकेबाजी केली. सभेस मोठा जनसागर उसळला होता. अतिभव्य झालेल्या सभेस मंत्री महादेव जानकर, आ. सुरेश धस, आ. भीमराव धोंडे, जि.प. अध्यक्ष सविता गोल्हार, माजी आ. दरेकर नाना , विजय गोल्हार, हनुमंत थोरवे, दिलीप हंबर्डे, विष्णू वायबसे अशोक साठे, जालिंदर वणवे आदी उपस्थित होते.

पंकजाताई म्हणाल्या की, मुंडे साहेबांनी बीड जिल्ह्याची नाडी ओळखली होती. त्यानंतर ती कला माझ्याकडे आली आहे. केंव्हा आणि कुठे कोणते औषध द्यावे लागते ते मला बरोबर कळते. माझ्या उपचारांमुळे आ. सुरेश धस, मोहन जगताप आणि आता जयदत्त क्षीरसागर ही मातब्बर मंडळी आज आपल्या बाजूने आहेत. पण या उपचारांनी भाजप धष्टपुष्ट झाली, पण राष्ट्रवादी मात्र मरगळली. त्यांच्यात लढण्याची शक्तीच राहिली नसल्याने जातीपातीचे टॉनिक घेऊन निवडणुकीत जान आणण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. पण जिल्ह्यातील जनता सुजाण आहे, ती जात आंधळ्यांना त्यांची जागा दाखवून देईल. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या आमच्या भावाने तर मयत व्यक्तींच्या सुद्धा जमिनी लाटल्या. स्वतःवरून जग ओळखत असल्याने त्यांना सर्वजण ‘खातात’ असे त्यांना वाटतात. पण ‘खाण्यात’ तर त्यांची पीएचडी आहे असा टोलाही त्यांनी लगावला.

एक तरी बंधारा बांधला का?

७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा करणारांनी तुमच्या भागात एकतरी बंधारा दिला का? आम्ही जलयुक्तच्या माध्यमातून सर्वत्र बंधारे दिले, पाणी अडवून जिरवण्याचे काम केले. ही तर सुरुवात आहे, भविष्यात कृष्णेचे पाणी आणून बीड जिल्हा सुजलाम सुफलाम करू. तुमच्या भागासह जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायतींना कुठलाही भेदभाव न ठेवता कोट्यावधींचा निधी दिला. शहरी भागासह खेड्यापाड्यातील प्रत्येक व्यक्तीचा सर्वांगीण विकास करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. माणसांसोबत आम्ही जनावरांचीही काळजी घेतली. मागील वर्षी बीड जिल्ह्यात ८१ छावण्या होत्या, आज साडेआठशे छावण्या आहेत. जनावरांना मतदानाचा अधिकार असता तर प्रीतमताईला प्रचाराची गरजच नव्हती, त्या असेच निवडून आल्या असत्या असे प्रतिपादन पंकजाताईंनी केले.

ऊसतोड मजूरांसाठी तुम्ही काय केलं

ऊसतोड महामंडळावरून माझ्यावर टीका करणारे आमचे भाऊ थापा मारतात. ते सांगतात त्याप्रमाणे मी कशावरही सही केली नाही, याऊलट मुंडे साहेबांच्या नावाने ऊसतोड कामगारांसाठी योजना सुरू करून शंभर कोटीची तरतूद करून घेतली, त्यांच्या मजूरीतही वाढ करून दिली. कामगारांच्या पुढची पिढीवर ऊस तोडण्याची वेळ येऊ नये यासाठी आम्ही वातावरण तयार करत आहोत. ऊसतोड कामगारांवर आता बेगडी प्रेम दाखविणा-यांनी सत्ता होती त्यावेळी काय त्यांच्यासाठी काय केले असा सवाल त्यांनी केला.

आष्टीतील थ्री ‘डी’ ची मेहनत

धस, धोंडे, दरेकर हे तीन ‘डी’ (थ्री-डी) आता आमच्याकडे आहेत. प्रचंड जनाधार असलेले हे तिन्ही नेते प्रीतमताईंना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ताईंचा विजय निश्चित आहे. या तीन ‘डी’ चा ‘थ्री-डी’ सिनेमा आपल्यालाही पहायचा आहे आणि विरोधकांनाही दाखवायचा आहे असे पंकजाताई म्हणाल्या.

पाटोदा विजयी सभेसाठी राखीव

पाटोद्यात आम्ही सभा घेतली नाही याचे भांडवल केले जात आहे. वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत. परंतु, पाटोद्यावर आमचे विशेष प्रेम आहे. त्यामुळे आम्ही पाटोदा विजयी सभेसाठी राखीव ठेवले आहे. निकाल लागल्यानंतर प्रीतमताईंची विजयी सभा पाटोद्यात घेण्यात येईल असे आश्वासन ना. पंकजाताई मुंडे यांनी दिले.

बीड जिल्हयातील गोर गरीबांच्या आरोग्याला ‘नव संजीवनी’ देणाऱ्या डाॅक्टर प्रितमताई

महाआरोग्य शिबिरातून लाखो रुग्णांवर उपचार तर ‘स्वाराती’ रुग्णालयासाठी कोट्यावधींचा निधी

बीड दि.१५: बालघाटच्या डोंगररांगात असलेल्या बीड जिल्ह्यातील शेकडो वाडी तांडे डोंगरदऱ्यात वसलेले आहेत. या भागातील गरीब आणि गरजू रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांपर्यंत पोहोचणे सहज शक्य नसते. शस्त्रक्रीया किंवा औषधोपचाराचा खर्चदेखील मोठा असल्याने बऱ्याचदा आजार अंगावर काढला जातो आणि रुग्णाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या खा. प्रीतमताई मुंडेंच्या लक्षात ही बाब आली नसती तर नवलच.. त्यामुळेच सत्तेत आल्यानंतर त्यांनी दुर्गम भागातील लोकांच्या आरोग्याकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे धोरण आखले. यातूनच मागील साडेचार वर्षांच्या काळात त्यांनी बीड जिल्ह्यात अनेकदा महाआरोग्य शिबिरे घेतली. या आरोग्य शिबिरांचा जिल्ह्यातील लाखो रुग्णांना फायदा झाला. स्वतः एम.डी. असलेल्या खा.डॉ. प्रीतमताई मुंडे यांनी अनेक रुग्णांची तपासणी केली. या लाखो गरीब रुग्णांच्या आशीर्वादाच्या जोरावर प्रीतमताईंचा विजय सुकर झालेला आहे.

खा.डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त सहकार्याने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय, परळी तालुक्यात गोपीनाथगड येथे ही महा शिबिरे घेण्यात आली. दुर्गम भागातील लोकांना शिबीर स्थळापर्यंत आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था देखील करण्यात आली होती. एकही रुग्ण शिबिरापासून वंचित राहू नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले. शिबिरात रूग्णांसाठीच्या विविध स्टाॅल्समधून कॅन्सर, किडनी यासह ५० हून अधिक रोगांच्या तपासण्या डाॅक्टरांनी केल्या. सोनोग्राफी, इसीजी, रक्त, लघवी तपासणी, औषधी वाटप याबरोबरच शेतक-यांना आत्महत्ये पासून परावृत्त करण्याबाबत मार्गदर्शन तसेच तंबाखू व्यसनमुक्ती नियंत्रण, एड्स, मलेरिया, क्षयरोग याविषयी जनजागृती, किशोरवयीन मुला मुलींना मार्गदर्शन, महात्मा फुले जीवनदायी योजना व पंतप्रधान जनआरोग्य योजनेविषयी रूग्णांना मार्गदर्शन करण्यात आले. एवढेच नव्हे तर जयपूर फुट व अपंगाना विविध साहित्याचे वितरणही शिबिरातून करण्यात आले. रूग्णांसाठीच्या विविध स्टाॅल्समधून कॅन्सर, किडनी यासह ५० हून अधिक रोगांच्या तपासण्या डाॅक्टरांनी केल्या. सोनोग्राफी, इसीजी, रक्त, लघवी तपासणी, औषधी वाटप याबरोबरच शेतक-यांना आत्महत्ये पासून परावृत्त करण्याबाबत मार्गदर्शन तसेच तंबाखू व्यसनमुक्ती नियंत्रण, एड्स, मलेरिया, क्षयरोग याविषयी जनजागृती, किशोरवयीन मुला मुलींना मार्गदर्शन, महात्मा फुले जीवनदायी योजना व पंतप्रधान जनआरोग्य योजनेविषयी रूग्णांना मार्गदर्शन करण्यात आले. रोगनिदाना सोबतच मोठ्या शहरातील नामांकित तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांवर तातडीचे शस्त्रक्रियादेखील पूर्णपणे मोफत करण्यात आल्या. जनरल सर्जरी, मोतीबिंदु, स्त्रीरोग आदी विविध एकूण २५ हजार शस्त्रक्रिया या आरोग्य यज्ञात करण्यात आल्या. या मोठ्या शिबिरांव्यतिरिक्त दरमहा नियमितपणे होत असलेल्या छोट्या शिबिरातून गरीब रुग्णांवर पुणे आणि मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. खा. प्रीतमताई मुंडे यांनी सुरू केलेल्या आरोग्य यज्ञाचा दुष्काळात सापडलेल्या गोरगरीब रूग्णांना ख-या अर्थाने फायदा झाला. आर्थिक परिस्थिती अभावी अनेकांना आजारांवर उपचार घेणे शक्य नव्हते ते या शिबीरामुळे शक्य झाले. शिबीरात रूग्णांची केवळ तपासणीच नव्हे तर औषधोपचार आणि शस्त्रक्रियाही मोफत उपलब्ध झाल्याने गोरगरीब रूग्णांचे आशीर्वाद खा. प्रीतमताई यांच्या पाठीशी आहेत.

खा.डाॅ.प्रितमताई मुंडेंनी स्वतः तपासले रुग्ण

खासदार डाॅ प्रितमताई मुंडे हया स्वतः त्वचारोग तज्ज्ञ आहेत. त्यामुळे त्यांनी खासदार म्हणून या शिबीराचे उत्कृष्ट नियोजन तर केलेच शिवाय डाॅक्टर म्हणून स्वतः दोन्ही दिवस इतर डाॅक्टरांच्या बरोबरीने शिबीरात बसून रूग्णांच्या तपासण्या केल्या. डाॅक्टर व खासदार अशा दोन्ही भुमिका अगदी सहजपणे पार पाडत अत्यांनी रुग्नानांची मने जिंकली होती.

स्वाराती रुग्णालयास कोट्यवधींचा निधी

अंबाजोगाईचे स्वाराती रुग्णालय हे बीडसह आजूबाजूंच्या जिल्ह्याची प्रमुख जीवनवाहिनी आहे. दररोज किमान २ हजार रुग्ण उपचारासाठी या रुग्णालयात येतात. या रुग्णालयातून गरीब रुग्णांना अद्यावत उपचार देण्यासाठी प्रीतमताईंनी अक्षरशः निधीचा पाऊस पाडला आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्राने दिलेला एमआरआय मशीनसाठी साडेनऊ कोटींचा निधी राज्याकडे जमा झाला आहे. ३३ कोटींचा बह्य्रुग्ना विभाग आणि २२ कोटींच्या मुलांच्या वसतिगृहाचे काम प्रगतीपथावर आहे. ११ कोटींचे मुलींचे वसतिगृह निविदास्तरावर आहे. मणक्याच्या शस्त्रक्रिया, युरोसर्जरी, सीव्हीटीएस या सारख्या शस्त्रक्रिया देखील आता इथेच पार पडत आहेत. स्तनांच्या कर्करोगाचे अचूक निदान करण्यासाठी दिड कोटी रुपयांची डिजिटल मेमोग्राफी मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. अत्याधुनिक आणि परिपूर्ण शवगृहासाठी ६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गोव्याच्या धर्तीवर हे शवगृह उभारण्यात येणार आहे. रुग्णांच्या नातेवाईकासाठी निवारा कक्षही तयार करण्यात आला आहे. या रुग्णालयात कॅथल्याब आणण्यासाठीही तसेच वर्ग ३ आणि वर्ग ४ कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. स्वतः डॉक्टर असलेल्या प्रीतमताई या सर्वात मोठ्या ग्रामीण रुग्णालयाच्या कामकाजावर नियमितपणे लक्ष ठेऊन असतात. त्यांच्या पाठपुराव्यामुळे या वैद्यकीय महाविद्यालयात अनेक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यात आले. नुकतेच या महाविद्यालयाच्या १०० जागा कमी करण्याच्या निर्णय देखील प्रीतमताईंनी आरोग्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करून मागे घ्यायला लावला. प्रीतमताईंनी त्यांच्या काळात स्वारातीचा चेहरामोहरा बदलण्यात दिलेल्या योगदानाचे दूरगामी सकारात्मक परिणाम गरीब रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्य सेवेवर पडणार आहेत. एखादे उच्चशिक्षित नेतृत्व समाजाच्या किती फायद्याचे ठरू शकते याचे प्रीतमताई एक योग्य उदाहरण आहेत.


विनायक मेटेंच्या शिवसंग्रामला परळीत धक्का, एकमेव सरपंचही कार्यकर्त्यांसह भाजपात

ना.पंकजाताई मुंडे यांनी केले स्वागत, खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांना मताधिक्य देण्याचा निर्धार

परळी वैजनाथ दि.१२: आ.विनायक मेटेंच्या शिवसंग्रामला परळी तालुक्यात मोठ्ठा धक्का बसला आहे. त्यांच्या पक्षाचा एकमेव सरपंच धुराजी साबळे यांनी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह भाजपात दाखल झाले आहेत. पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी त्यांचे स्वागत केले. खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांना मिरवटमधुन सर्वाधिक मताधिक्य देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
आ. विनायक मेटे यांनी वेगळी भूमिका घेतल्याने परळी तालुक्यातील मिरवट येथील सरपंच धुराजी साबळे हे नाराज झाले. ना. पंकजाताई मुंडे यांच्यामुळे वैभव होते असे सांगत त्यांना मोठे करणार्‍यांनाच धोका देत असतील कार्यकर्त्यांचे काय असा सवाल करून ना. पंकजाताई यांच्यासोबत राहिल्यानेच गावचा विकास होणार आहे. त्या सर्व जातीधर्माला सोबत घेऊन जाणार्‍या नेत्या असल्याने आपण भाजपात प्रवेश करीत असल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांना मिरवट व परिसरातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देणार असल्याची ग्वाही सरपंच साबळे यांनी दिली. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष शिवाजी गुट्टे, युवानेते राजेश गीते यांच्यासह अनेक नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

पालघर लोकसभा मतदार संघात 31 अर्ज वैध ; सचिन शिंगडा यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला

पालघर दि.१०: पालघर लोकसभा मतदारसंघात दाखल झालेल्या ३२ अर्जांची आज छाननी करण्यात येऊन त्यापैकी ३१ अर्ज वैध ठरवण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे.

सचिन दामोदर शिंगडा यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने दाखल केलेला उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


भाजपा सेना महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्यावरील आक्षेप फेटाळला

पालघर लोकसभेतील भाजपा-सेना महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत शासकीय निवासस्थानांची थकबाकी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र जोडले नसल्याचे कारण देऊन अपक्ष उमेदवार सचिन शिंगडा यांनी बुधवारी छाननी दरम्यान आक्षेप नोंदवला होता. मात्र हा आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला.
दरम्यान या आक्षेपाबाबतचा निर्णय बुधवारी उशिरा जाहीर करण्यात आला.

परळीच्या वेशीत जातीधर्माचे किळसवाणे राजकारण चालणार नाही―पंकजा मुंडे

बर्दापूर, घाटनांदूर, उजनी पाटी येथे ना. पंकजाताई मुंडेंच्या झंझावाती सभा

खा.प्रीतमताई मुंडे यांनाच प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे केले आवाहन

बीड दि. १०: खा.प्रीतमताई मुंडे यांनी त्यांच्या साडेचार वर्षाच्या कार्यकाळात जिल्ह्यात हजारो कोटींचे राष्ट्री महामार्ग आणले, रेल्वे बीडच्या वेशीत आली आहे. बीड जिल्ह्यात आलेली विकासाची गंगा पाहून सैरभैर झालेल्या विरोधकांकडे आता मुद्देच उरले नाहीत त्यामुळे ते जाती-धर्माची ढाल पुढे करत आहेत. परंतु, परळीच्या वेशीत हे जातीपातीचे राजकारण चालणार नसल्याचा इशारा ना. पंकजाताई मुंडे यांनी दिला. परळी मतदार संघातील बर्दापूर, घाटनांदूर, उजनी पाटी येथे आज झालेल्या त्यांच्या झंझावाती सभांना मोठा प्रतिसाद मिळाला. जिल्हा सुदृढ करण्यासाठी खा. प्रीतमताई मुंडे यांनाच प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

बुधवारी सायंकाळी ही प्रचारसभा पार पडली. जिल्हाभरात ना. पंकजाताई मुंडेंच्या सभांना मिळणारा उदंड प्रतिसादाचा शिरस्ता बर्दापूर, घाटनांदूर व उजनी पाटी येथेही पहावयास मिळाला. सभेला ग्रामस्थांनी विशेषतः महिलांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी बोलताना पंकाजाताई म्हणाल्या कि, स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांचा राजकीय उदय रेणापूर मतदार संघातून झाला. त्यावेळी बर्दापूर त्या मतदार संघात होते. मुंडे साहेबांनी या भागातील जनतेची ४० वर्षे सेवा केली. त्यांना तसेच प्रेम इथल्या जनतेनेही दिले. आजवर बर्दापूरमधील एकही मतदान केंद्र आम्हाला मायनस (वजा) झालेले नाही. त्यांच्यानंतर प्रीतमताई मुंडे या खासदार झाल्या. पहिल्याच टर्ममध्ये त्यांनी बीड जिल्ह्यात हजारो कोटींची विकासकामे खेचून आणली. राष्ट्रीय महामार्ग तर जवळपास पूर्ण होत आलेच आहे, तर नगर बीड परळी रेल्वेसाठी आतापर्यंत २,८०० कोटींचा निधी आला आहे. ग्रामविकास खाते माझ्याकडेच आहे आणि परळी मतदार संघही माझा आहे. त्यामुळे साहजिकच आमच्या काळात या भागावर विविध अनुदान आणि योजनांचा वर्षाव झाला आहे. एकट्या बर्दापूर ग्राम पंचायतला सहा कोटींचा निधी मिळाला आहे, एवढा तर मागच्या ४० वर्षात एकत्रितरित्या देखील मिळाला नसेल. घरोघर शौचालये झाली, चुलीसमोर बसणाऱ्या महिला आता गॅससमोर बसू लागल्या आहेत.

त्यांना जातीशिवाय कांहीच आठवत नाही

जिल्ह्यात विकासाची गंगा खळखळून वाहत असताना विरोधातील कुठले मुद्देच शिल्लक नसल्याने विरोधक आता बिथरले आहेत. शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी आता जातीपातीचे घाणेरडे राजकारण खेळण्यास सुरुवात केली. आहे. परंतु, याठिकाणी सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात त्यामुळे परळीच्या वेशीत जातीपातीचे किळसवाणे राजकारण चालणार नाही असे त्यांनी सुनावले. ‘ते’ लोक पाहुण्यारावळ्याचे संबंध शोधात तुमच्यापर्यंत येतील. पण विकासाच्या बाबतीत आम्ही जातपात पाहणार नाही असे त्यांना ठणकावून सांगा आणि चहापाणी करून वाटे लावा असा सल्लाही पंकजाताईंनी दिला. माझी बहिण खा. प्रीतमताई मुंडे ही उच्च शिक्षीत आहे, समंजस आहे. कुठलाही बडेजाव करत नाही. सर्वसामान्यात मिसळते. तिच्याकडे विकासाची दृष्टी आहे. तिच्या माध्यमातून होणारी विकासकामे अखंडितपणे सुरु ठेवण्यासाठी तिला भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन ना. पंकाजाताई मुंडे यांनी केले.

बचत गटांमुळे महिला सक्षम

बचत गटांच्या माध्यमातून मतदारसंघातील महिला सक्षम झाल्या आहेत, परिणामी आर्थिक कारणांमुळे आत्महत्या होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. बचतगटे अधिक सशक्त करण्यासाठी बर्दापूर परिसरातील जवळपास ३० बचतगटांना आतापर्यंत प्रत्येकी एक लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. भविष्यातही बचत गटांना योग्य ते सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. बचत गटाच्या माध्यमातून हातात खेळणारा पैसा महिलांनी योग्य ठिकाणी लावावा, नवऱ्याच्या हाती पैसे देऊ नयेत असा मिश्कील सल्लाही पंकजाताईंनी दिला.

हमारे अंगने में तुम्हारा क्या काम है?

आजवर कधीही इकडे न आलेले राष्ट्रवादीचे उमेदवार आता फक्त मत मागण्यासाठी इकडे येतील. ते आले कि त्यांना विचारा, ‘हमारे अंगने में तुम्हारा क्या काम है? इकडे तुमचे काहीच नाही. आम्ही फक्त विकासालाच मत देणार असे त्यांना निक्षून सांगा असे आवाहन पंकजाताईंनी केले.

ही तर चांडाळ चौकडी – मुळूक

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक राष्ट्रवादीच्या बीड जिल्ह्यातील टीमचा उल्लेख अलिबाबा चाळीस चोर असा केला. हाच धागा पकडून पंकजाताई म्हणाल्या, चाळीस कुठे हो? ही तर चांडाळ चौकडी आहे. यांच्या कुरापतींना कंटाळून राष्ट्रवादीचे अनेक नेते आमच्यासोबत येत विकासाची कास धरत आहेत असे त्यांनी सांगितले.

या सभेस माजी आमदार गोविंदराव केंद्रे, प्रवीण घुगे, रमेश आडसकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन मुळूक, गयाताई कराड, हाबूबाई, अविनाश मोरे, संजय गिराम, विशाल मोरे, शामराव आपेट, बाबू पटेल, कुरेशी, गणेश कराड, प्रदीप गंगणे आदींसह असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.