पाटोदा |प्रतिनिधी :
छञपती शिवाजी महाराज जन्म उत्सव सोहळा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पाटोद्यात मोठ्या उत्साहात साजरी होणार असुन गुरुवार दिनांक 17/1/2019 रोजी विठ्ठल रुक्माणी संस्थान पाटोदा येते ह.भ.प सतिष महाराज उरणकर यांच्या अध्यक्षतेखाली व नगरसेवक राजु जाधव,उमर चाऊस,सुमित हुले,गणेश कवडे,विशाल जाधव, नितीन बामदळे,पञकार गणेश शेवाळे यांच्या उपस्थित झाली यावर्षीच्या सार्वजनिक शिवजयंती उत्सव सोहळ्याच्या अध्यक्ष पदी तुळशीराम ढेरे तर उपध्यक्ष पदी सुनिल चौरे व सोमनाथ लवुळ यांची एकमताने निवड झाली यावेळी दत्ता जाधव, युवराज जाधव,राहुल बामदळे,गोविंद बामदळे, सचिन भोसले,अक्षय जाधव,बाबा तिपटे,भाकरे रामदास,असुळ अक्षय, नाईकनवरे आभिलाश, जाधव मोन्या,लहु घरत, बप्पा हुले,यांच्या सह शेकडो शिवभक्त उपस्थित होते