सक्तीची विजबिल वसुली, अतिवृष्टीग्रस्त मांजरसुंभा मंडळांच्या अनुदानासाठी शेतक-यांचे बैलगाडीसहीत चक्काजाम आंदोलन – डाॅ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्र शासनाने रझाकारी पद्धतीने कृषिपंपाची विजतोडणी करून कोरोना कालावधीत आर्थिक संकटात सापडलेल्या शेतक-यांना वेठीस धरल्याच्या निषेधार्थ व तात्काळ विजजोडणी करण्यात यावी तसेच मांजरसुंभा महसुल मंडळातील २३ गावे खरीप हंगामातील अतिवृष्टीग्रस्त अनुदानापासुन वगळण्यात आली असून त्या गावातील शेतक-यांना अनुदान मिळावे या मागण्यांसाठी सामाजिक संघटना व सर्वपक्षीय मांजरसुंभा येथील राधिका हाॅटेल समोर धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बैलगाड्यांसह चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असून सर्व शेतकरी बांधवांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, , प्रदेशउपाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा रमेशभाऊ पोकळे,भाजपा तालुकाध्यक्ष बीड स्वप्निल गलधर, तालुकाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा बीड बाळासाहेब मोरे,भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष बीड, सौ. वैशालीताई चौरे,उपसरपंच कोळवाडी तुळशीदास महाराज शिंदे, युवा नेते मसु जाधव, सरपंच पालसिंगन विक्रम खंडागळे,सरपंच हिंगणी अंकुश गोरे,उपसरपंच चाकरवाडी, हनुमान चाळक, चेअरमन सेवा सोसायटी सात्रा पोपटराव हावळे, सरपंच बोरखेड बाळासाहेब गावडे, अशोक घोडके, दत्ता जगदाळे, माजी सरपंच शहाजी आण्णा घोडके, बाळासाहेब ढास,नाना चव्हाण, काशिनाथ मांडवे,संभाजी कदम, महादेव नाईकवाडे,विष्णु सुरवसे महाराज, आजिनाथ घरत, दादासाहेब वाघमारे,राहुल खोसे,कल्याण कागदे, आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष बीड माजी सैनिक अशोक येडे, भाजपा युवा नेते अशोकदादा रसाळ,शिवबा संघटना जिल्हाध्यक्ष हनुमान मुळीक, ऑल इंडीया पॅथर मराठवाडा उपाध्यक्ष नितिन सोनावणे,सामाजिक कार्यकर्ते डाॅ.संजय तांदळे, वंचित बहुजन आघाडीचे सहसचिव शेख युनुस च-हाटकर, वंचित नेते संदिप जाधव,आदिंनी आवाहन केले आहे.

जिल्हाप्रशासनाने शब्द न पाळल्यामुळे चक्काजाम आंदोलन
____
३० नोव्हेंबर रोजी बिंदुसरा तलावातील जलसमाधी आंदोलनानंतर महावितरणचे कार्यकारी अभियंता निकम, व उपअभियंता ग्रामिण गुंजाळ यांनी फोनवरून अधिक्षक अभियंता महावितरण कोलप यांच्याशी फोनवरून संपर्क साधुन प्रति रोहीत्र २५,००० रू भरून विजजोडणी करण्यात येईल या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते परंतु महावितरणच्या आधिका-यांनी दिलेला शब्द न पाळल्यामुळे दि.६ डिसेंबर रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार होते परंतु ६ डिसेंबर रोजी महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिन व” हाय अलर्ट “मुळे पोलीस प्रशासनावर अतिरिक्त ताण वाढु नये व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे या भुमिकेतुन तूर्तास स्थगित करून दि.९ डिसेंबर गुरूवार रोजी सकाळी ११:३० वाजता मांजरसुंभा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असून महावितरण व महसुल प्रशासनातील आधिका-यांच्या लेखी आश्वासनानंतरच चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात येईल असे निवेदन महावितरण, महसुल व पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे.

पशुसंवर्धन पदविका धारकांना शासनाने नोंदणीकृत करून स्वतंत्र पशुवैद्यकीय व्यवसायास परवानगी द्यावी !

बीड दि.०४ ऑगस्ट २०२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत करून त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून वाड्या-वस्त्यांवर पशुसेवा अगदी कमी वेळात पोहचेल व गाई-म्हशीचे प्राण वाचेल.शासन दुधाचा महापूर आणण्यासाठी प्रयत्न करते योजना आखते परंतु त्यात मोलाचा वाटा असणारे पशुसंवर्धन पदविकाधारकांच्या नोंदणीच्या वेळी मात्र काणाडोळा करते.असे न करता शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून प्रथमतः पशुसंवर्धन पदविका धारकांना कायदेशीर पशुवैद्यक म्हणून घोषित करावे व त्यांची नोंदणी करून त्यांना नोंदणीक्रमांक द्यावा अशी मागणी जोर धरून आहे. १९८४ च्या कायद्यात बदल करावा, पशुसंवर्धन पदवीकाधारकांना व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे मात्र शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसून कृषीप्रधान देशातच पशूंकडे शासनाचे लक्ष नसल्याचे समोर येत आहे.

पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ कलमाअंतर्गत व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीमधून पशुसंवर्धन पदवीधारकांच्या राज्यव्यापी परिषदेची नियुक्ती करून स्वतंत्ररीत्या औषधे बाळगणे व नोंदणीकृत व्यवसाय परवाना उपलब्ध करून द्यावा.राज्यातील रिक्त पशुधन पर्यवेक्षक पदांची तत्काळ भरती करण्यात यावी.खासगीरीत्या असंघटित क्षेत्रात भारतीय पशुचिकित्सक परिषद कायद्यान्वये किरकोळ व प्राथमिक स्वरूपाच्या पशुवैद्यकीय उपचार सेवा पदवीधारक डॉक्‍टरच्या सुपरव्हिजन व माध्यमांचा वापर करून आपले कार्य पार पाडतात अशा सर्व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीप्रमाणपत्र व ओळखपत्र देऊन पशुसेवेचे कार्य सुरू ठेवण्यासाठी बळ द्यावे.

धान खरेदी केंद्राचा शेतकऱ्यांना होणार फायदा – विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ

आठवडा विशेष टीम― नाशिक, दि. 20 : आधारभूत हमीभाव योजनेंतर्गत धान खरेदीचा शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे. शेतकऱ्यांना या केंद्राजवळ लागणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा देखील लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले.   पेठ तालुक्यातील करंजळी येथे आधारभूत हमीभाव योजनेंतर्गत धान खरेदी केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी विधानसभा उपाध्यक्ष श्री. झिरवळ बोलत … Read more

बेलवाडी ‘मनरेगा अपहार’ प्रकरण ; सोशल मिडियावर डॉ गणेश ढवळेंची नाहक बदनामी करणाऱ्या पोस्ट ,पोलीस प्रशासनाच्या कारवाई कडे लक्ष

बेलवाडी ग्रामपंचायतमध्ये मनरेगा अंतर्गत कामात ६० लाखांचा अपहार, विभागीय आयुक्त कार्यालय समोर धरणे आंदोलन करणार , सोशल मीडियावर बदनामी केली,पोलीस अधीक्षकांकडे तक्रार , अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार – डॉ गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्र शासनाने रोजगार हमी योजना मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी सुरू करण्यात आली मात्र स्थानिक पुढारी यांनी वरिष्ठांच्या वरदहस्ताने शासकीय आधिकारी, कर्मचारी यांच्याशी संगनमताने बोगस मजुर दाखवून व बनावट दस्तऐवज तयार करुन लाखो रूपयांचा अपहार केल्यामुळे संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत मोक्का लावण्यात यावा अशी मागणी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी रोहयो, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, रोहयो मंत्री, ग्रामविकास मंत्री, विभागीय आयुक्त यांना केली असून संबंधित प्रकरणी कारवाई करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे डॉ गणेश ढवळे यांनी सांगितले आहे.

कामाचे नाव वर्क कोड नंबर रक्कम
१)बांधबंदिस्ती १ते ३९ वर्क कोड नंबर १७६८४३, रक्कम २२ लाख ५७ हजार ९९८ रूपये
२) बांधबंदिस्ती ५५ ते १४० वर्क कोड नंबर १७६८४२, रक्कम २२ लाख, ४९ हजार, ७७३ रूपये
३) बांधबंदिस्ती नविन वर्क कोड नंबर १२३४८३७१०५, रक्कम ७ लाख रुपये ६७ हजार १४४ रूपये
४) वृक्षसंगोपन बेलवाडी कोड नंबर १२३४८३७१०५ रक्कम ३ लाख ३५ हजार ५५० रूपये
५) वृक्षसंगोपन वर्क कोड नंबर १२३४८३७१०६ रक्कम २ लाख ३९ हजार ९१५ रूपये
६) शोषखड्डे बेलवाडी वर्क कोड नंबर ४७३४११२३८/४७३४११२३९/४७३४११२४८ रक्कम २ लाख १९ हजार रुपये
७) जलसिंचन विहीर बेलवाडी, वर्क कोड नंबर ४७३४४६९७१ रक्कम १ लाख ८७ हजार रुपये, अशाप्रकारे एकुण ६० लाख ३७ हजार ३८० रुपयांचा अपहार बोगस मजुर व दस्तऐवज दाखवून संगनमताने शासनाची फसवणूक करण्यात आली असल्याचा डॉ गणेश ढवळे यांचा आरोप आहे.

बांधबंदिस्ती एकाच कामाचे एकाच आठवड्यात ४ मस्टर, एकही मजुर उपस्थित नसताना ३८७ बोगस मजुर दाखवले

बेलवाडी गावामध्ये गट क्रमांक १ ते ३९ व गट क्रमांक ५५ ते १४० अशी दोन बोगस कामे कागदोपत्री केल्याचे दाखवले आहे व दोन्ही कामावर दिनांक २६/०४/२०१९ ते ०१/०५/२०१९ या आठवड्यात गट क्रमांक १ते ३९ वरती एकाच कामावर ४ मस्टर काढलेले आहेत.
१) मस्टर क्रमांक २०९९-५० मजुर
२) मस्टर क्रमांक २१००-५० मजुर
३) मस्टर क्रमांक-२१०१-५० मजुर
४) मस्टर क्रमांक-२१०२-४३ मजुर या कालावधीत एकुण १९३ मजुर दाखवले आहेत.

२) बांधबंदिस्ती गट क्रमांक ५५ते १४० या कामावरती दि, २६/०४/२०१९ते ०१/०५/२०१९ या कालावधीत एकाच कामावर ४ मस्टर काढलेले आहेत
१) मस्टर क्रमांक २०९२-५० मजुर
२) मस्टर क्रमांक-२०९३-५० मजुर
३) मस्टर क्रमांक-२०९४-५० मजुर
४) मस्टर क्रमांक-२०९५- ४४ मजुर असे एकूण १९४ मजुर दाखवले असल्याचा डॉ ढवळे यांचा आरोप आहे.
एकाच कामावर व एकाच आठवड्यात ४ मस्टर कसे काय काढले? प्रत्यक्षात एकही मजुर उपस्थित नसताना या आठवड्यात एकुण ३८७ बोगस मजुर दाखवून लाखो रुपये हडप केले आहेत.

२० वर्षापुर्वीची जलसिंचन विहीर नविन खोदल्याचे दाखवून अपहार
२० वर्षापुर्वीची विहीर नविन जलसिंचन विहीर खोदल्याचे दाखवून १ लाख ८७ हजार रूपये निधीचा अपहार करण्यात आला आहे.

मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी – डॉ.गणेश ढवळे

संबंधित प्रकरणात चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन अपहारीत रक्कम शासन दरबारी जमा करण्यात यावी, बोगस मजुरांची नावे यादीत असून बंदिस्त जागेत वैयक्तिक रित्या रोहयो मजुरांचे जवाब नोंदवावेत म्हणजे खाते कोणी उघडले, मजुरांच्या नावावरील पैसे कोणी परस्पर उचलले याचा उलगडा होऊल, याप्रकरणात स्थानिक सरपंच, ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक, आणि पंचायत समिती मधिल गटविकास आधिकारी, विस्तार आधिकारी, इंजिनिअर, एपीओ, डाटा एंट्री ऑपरेटर यांनी संगनमताने अपहार केल्यामुळे संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी

सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी संबंधितांची डॉ गणेश ढवळे पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करणार तसेच अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार

बेलवाडी नरेगाच्या कामातील अपहार प्रकरणात कारवाई करण्यासाठी डॉ गणेश ढवळे यांनी लेखी तक्रार केल्यामुळे सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी सरपंचपती व त्यांच्या सहकाऱ्यां विरोधात पोलीस अधीक्षक यांना लेखी तक्रार केली असून अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहेत.

बीड जिल्ह्यात आज 113 जण कोरोना पॉझिटिव्ह ,पहा कुठले आहेत रुग्ण

बीड दि.७ ऑगस्ट:आठवडा विशेष टीम―आज आलेल्या अहवालात बीड जिल्ह्यात ११३ जण कोविड-१९ पॉझिटिव्ह निघाले आहेत.रुग्ण बीड अंबाजोगाई ,परळी ,केज ,गेवराई ,आष्टी ,माजलगाव ,धारूर व शिरूर कासार या तालुक्यातील आहेत.आजच्या अहवालात पाटोदा तालुक्यातील एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही.सहवासित रुग्णाची संख्या जास्त आहे.त्यामुळे सोशल डिस्टन्स ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.शक्यतो घराबाहेर पडूच नका.

दि. १२ जुलै ते १८ जुलै २०२० या कालावधितील शासनाचे निर्णय व इतर घडामोडींचा संक्षिप्त आढावा

कोरोना युध्द १२ जुलै २०२० आज ३३४० रुग्णांची घरी रवानगी, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.१५ टक्के, आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेले रुग्ण- १ लाख ४० हजार ३२५. कोरोनाच्या ७८२७ नवीन रुग्णांचे निदान, सध्या १ लाख ३ हजार ५१६ रुग्णांवर उपचार सुरू, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १३ लाख १७ हजार ८९५ नमुन्यांपैकी २ लाख ५४ हजार ४२७ … Read more

कुपोषणमुक्तीसाठी राज्य शासन प्रयत्नरत – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

सव्वा सहा हजार मेट्रीक टन युरिया होणार उपलब्ध

अमरावती, दि. १९:  सॅम्पल रजिस्ट्रेशन सर्वेच्या (एसआरएस) प्रकाशित झालेल्या अहवालात  मातामृत्यू दर कमी असणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र राज्याला देशात दुसरा क्रमांक मिळाला आहे. शासनाकडून मातामृत्यू, तसेच कुपोषण रोखण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न होत आहेत, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री  ॲड  . यशोमती ठाकूर यांनी केले. केंद्रीय नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडून करण्यात आलेल्या सॅम्पल रजिस्ट्रेशन … Read more

८२८८ पोषण परसबाग निर्मितीसह वर्धा जिल्हा राज्यात अव्वल

८२८८ पोषण परसबाग निर्मितीसह वर्धा जिल्हा राज्यात अव्वल

वर्धा, दि. १९ : ग्रामीण भागात गर्भवती, स्तनदा माता, बालक आणि किशोरवयीन मुले यांना आहारातून खनिज, लोह, मूलद्रव्ये, प्रथिने इत्यादी पोषकतत्वे मिळून त्यांचे सुव्यवस्थित पोषण व्हावे म्हणून राज्यभरात ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत उमेदच्या माध्यमातून कृतिसंगम प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत ग्रामीण भागात पोषण परसबाग निर्मिती करण्यात आली असून 8288 परसबागांची निर्मिती करून वर्धा जिल्हा राज्यात … Read more

१७ लाख ६६ हजार ३३३ शिवभोजन थाळ्यांचे वाटप

मुंबई, दि. 19 : राज्यात दि. 1 जुलै ते दि . 18 जुलै पर्यंत 870 शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे 17 लाख 66 हजार 333 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यातआले असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. राज्यात गरीब व गरजूंना एप्रिल महिन्यात 24 लाख 99 हजार 257, … Read more

आतापर्यंत २२ लाख १२ हजार १७० क्विंटल अन्नधान्याचे वाटप

आतापर्यंत २२ लाख १२ हजार १७० क्विंटल अन्नधान्याचे वाटप

मुंबई, दि. 19 :-  राज्यातील 52 हजार 435 स्वस्तधान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे 1 जुलै ते 18 जुलैपर्यंत राज्यातील 1 कोटी 3 लाख 49 हजार 401 शिधापत्रिका धारकांना 22 लाख 12 हजार 170 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. राज्यात … Read more

नांदेड: जिल्हा रुग्णालयाचे प्रस्तावित संकुल सर्व सुविधायुक्त करण्यावर भर – पालकमंत्री अशोक चव्हाण

जिल्हा रुग्णालयाचे प्रस्तावित संकुल सर्व सुविधायुक्त करण्यावर भर - पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड दि. 18 :– कोरोनाची परिस्थिती आजच्या घडिला पूर्ण नियंत्रणात जरी असली तरी भविष्यातील स्थितीचा विचार करुन नांदेड जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिकाधिक चांगल्या पद्धतीने जनतेला कशा उपलब्ध करुन देता येतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यादृष्टिने जिल्हा रुग्णालयाच्या जुन्या मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारती ऐवजी उभारले जाणारे नवीन जिल्हा रुग्णालय हे अधिकाधिक चांगल्या सुविधांसह लवकर उपलब्ध करुन … Read more

सव्वा सहा हजार मेट्रीक टन युरिया होणार उपलब्ध

सव्वा सहा हजार मेट्रीक टन युरिया होणार उपलब्ध

आठवडाभरात होणार सर्वदूर वितरण अमरावती, दि. 18 : जिल्ह्यात युरियाचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी राज्याच्या महिला व बालविकासमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. इफको, आरसीएफ आदी विविध कंपन्यांमार्फत युरिया बडनेरा, धामणगाव रेल्वे येथील रेल्वे रेक पॉईंटवर पोहचला आहे. पुढील आठ दिवसात विविध कंपन्यांच्या सहा हजार 350 मेट्रीक टन … Read more

महाराष्ट्र राज्यात आज कोरोनाच्या ८३४८ नवीन (पॉझिटिव्ह) रुग्णांचे निदान तर ५३०६ रुग्ण बरे होऊन घरी

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासन आणि प्रशासन सज्ज

कोरोनाच्या आतापर्यंत १५ लाखांहून अधिक चाचण्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई, दि.१८ : राज्यात आज ५३०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.५ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ६५ हजार ६६३ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ८३४८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख २३ … Read more

सार्वजनिक उत्सवादरम्यान जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था चोख ठेवा – गृहमंत्री अनिल देशमुख

सार्वजनिक उत्सवादरम्यान जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था चोख ठेवा - गृहमंत्री अनिल देशमुख

विभागीय आयुक्त कार्यालयात घेतला विविध कामांचा आढावा नागपूर दि. 18 : येत्या काळात गणेशोत्सव, बकरी ईद आदी महत्त्वपूर्ण सार्वजनिक उत्सव सुरु होत आहेत. त्यादरम्यान राज्य शासनाने नुकत्याच मार्गदर्शक सूचना निर्देशित केल्या असून, त्यांची अतिशय कडक अंमलबजावणी करताना कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्याचे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संबंधित यंत्रणेला दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात आज कायदा … Read more

दुर्गप्रेमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून इन्स्टाग्रामवरील विजयदुर्गच्या पडझडीच्या पोस्टची दखल, पुरातत्त्व खात्याला निर्देश

दुर्गप्रेमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून इन्स्टाग्रामवरील विजयदुर्गच्या पडझडीच्या पोस्टची दखल, पुरातत्त्व खात्याला निर्देश

विजयदुर्गच्या बुरूजाची पडझड रोखण्यासाठी उपाययोजना करा मुंबई, दि. १८ : दुर्गप्रेमी आणि मुळातच छायाचित्रकाराची शोधक नजर असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विजयदुर्ग किल्ल्याच्या पडझडीचे वृत्त इन्स्टाग्रामवर टिपले, अन् केंद्रातील भारतीय पुरातत्व खात्याला किल्ल्याच्या डागडुजी आणि देखभालीसाठी पावले उचलण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिवांना दिल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रख्यात छायाचित्रकार आहेत. त्यांनी … Read more

लॉकडाऊनचा उपयोग परिस्थिती सुधारण्यासाठी व्हावा

लॉकडाऊनचा उपयोग परिस्थिती सुधारण्यासाठी व्हावा

शहरी भागातील कोरोना ग्रामीण भागात पसरू देऊ नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांनी साधला जिल्हाधिकारी, आयुक्तांसमवेत ऑनलाईन संवाद मुंबई, दि १८ : विविध पालिकांनी त्यांच्या क्षेत्रात लॉकडाऊन केले आहे त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर रुग्ण आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, रुग्णांना उपचारांची सुविधा मिळणे परिणामत: मृत्यू दर लक्षणीयरित्या कमी करणे यासाठी झाला पाहिजे. जिल्ह्यातील सर्व … Read more