आठवडा विशेष टीम―मुंबई-पुणे मार्गावर बोरघाटात बसचा अपघात झाला आहे. या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे तर ४० जण जखमी झाले आहेत.कराड-मुंबई खासगी बसचा अपघात झाला आहे. बसच्या ड्रायव्हरचा बसवरचा ताबा सुटल्यामुळे ही बस दरीत कोसळली.या अपघातात दोन वर्षांचा एक मुलगा, एक युवती, एक पुरुष आणि एक महिला असे चारजण जागीच ठार झाले. या ठिकाणी महामार्ग पोलीस,खोपोली पोलीस यांच्या साथीने बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.
बोरघाटातील गारमाळ पॉईंटजवळ चालकाचा बसवरचा ताबा सुटल्यानंतर हा अपघात झाला. सर्वज्ञा सचिन थोरात (वय ३- रा.कराड), स्नेहा पाटील (१५वर्ष,रा. घाटकोपर), जनार्दन पाटील (४५ वर्ष), संजय शिवाजी राक्षे (५० वर्ष, पवई), आणि एका महिलेची ओळख पटलेली नाही. मात्र या ५ जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती मिळते आहे.