ग्रामिण रस्ते ग्रामस्थांसाठी की आधिकारी-ठेकेदार पोसण्यासाठी ? ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन – डाॅ.गणेश ढवळे

बीड(आठवडा विशेष प्रतिनिधी): बीड जिल्ह्य़ातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत महाराष्ट्र ग्रामिण रस्ते विकास संस्था बीड तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग बीड येथील प्रशासकीय आधिकारी यांनी संगनमतानेच ठेकेदार यांच्याशी निकृष्ट दर्जाचे रस्ते, गौणखनिज चोरी, रस्त्याची कामे वेळेत पुर्ण न करणे, दंड आकारणीचे आदेश असुन सुद्धा दंड न भरणे आदि प्रकरणात शासनाची दिशाभूल करून शासनाचा महसुल बुडवून कोट्यावधी रूपयांचे नुकसान व ग्रामस्थांची अडचण आदि प्रकरणात संबधितांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी ठेकेदार यांच्या कंपन्या काळ्या यादीत टाकण्यात येऊन संबधित आधिकारी व त्यांच्या नातेवाईकांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी आदि मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२१ मार्च २०२२ सोमवार रोजी जिल्हाधिकारी बीड कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येत असून आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ.संजय तांदळे ,मोहम्मद मोईज्जोदीन बीडकर, शेख मुबीन, किस्किंदा पांचाळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे,पांचाळ प्रमोद, आरूण खेमाडे, गायकवाड जे.एन.,यल्लु रजपुत सहभागी असून निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, महसुल मंत्री, पालकमंत्री, विभागीय आयुक्त औरंगाबाद,लाचलुचपत प्रतिबंधक विभागीय औरंगाबाद यांना निवेदन देण्यात आले.
बीड जिल्ह्य़ातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत महाराष्ट्र ग्रामिण रस्ते विकास संस्था बीड यांच्यामार्फत करण्यात आलेले निकृष्ट रस्त्याप्रकरणात कार्यकारी अभियंता यांच्या व नातेवाईकांच्या संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी तसेच वेळेत काम पुर्ण न करणे व अतिशय निकृष्ट रस्त्याप्रकरणात गुणनियंत्रक विभागामार्फत तपासणी व ठेकेदार यांच्या कंपन्या काळ्या यादीत टाकुन गौणखनिज चोरी प्रकरणात आर्थिक दंड आकारण्यात यावा.

बीड जिल्ह्य़ातील निकृष्ट रस्ता कामे
_____
अ) बीड तालुक्यातील
१)बीड तालुक्यातील मौजे मुळुकवाडी ते मसेवाडी रस्ता सुधारणा लांबी २:८०० किमी अंदाजे किंमत १ कोटी २६ लाख मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत महाराष्ट्र ग्रामिण रस्ते विकास संस्था बीड
१) बीड तालुक्यातील पालवण भाळवणी- बेलेश्वर- लिंबागणेश १३ कोटी रूपये
२)बीड तालुक्यातील पिंपरनई ते बांगरवाडा रस्ता, अडीच कोटी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत
२)बीड तालुक्यातील लिंबागणेश-अंजनवती-घारगाव मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत
३)बीड तालुक्यातील उमरद-नागापुर-ब-हाणपुर ४ कोटी ग्रामिण रस्ते विकास संस्था
४)म्हाळसजवळा ते चौसाळा रस्ता, सार्वजनिक बांधकाम विभाग
५)बीड तालुक्यातील मन्यारवाडी-आंबेसावळी,ढेकणमोहा,ब-हाणपुर ,-नागपुर ते उंबरी फाटा
६)बीड तालुक्यातील मौजे पाटोदा (बेलखंडी)ग्रांमपंचायत अंतर्गत पाटोदा (बेलखंडी)ते हनुमानवस्ति
७)बीड तालुक्यातील इजिमा ११४ ते मौजे धुमाळवाडी रस्ता सुधारणा
८)बीड तालुक्यातील मौजे पिंपळगाव ते मानेवाडी मार्गे तेलपवस्ती रस्ता जुन्या रस्त्यासह पुलाची डागडुजी, नोंद मात्र नव्या कामाची

ब) पाटोदा तालुक्यातील
१)मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मौजे ढाळेवाडी ते पाटोदा ६ किमी अंदाजे किंमत ३ कोटी २२ लाख
२)पाटोदा तालुक्यातील मांजरसुंभा पाटोदा ते सौंदाणा १:७ किलोमीटर अंदाजे किंमत ८२ लाख रूपये

क) आष्टी तालुक्यातील
१)आष्टी शहरापासुन आयटीआय काॅलेज रस्ता-शिंदेवाडी फाट्यापर्यंत डांबरीकरण व मजबुतीकरण
२) आष्टी तालुक्यातील आष्टी ते शेकापुर-देसुर बांधकाम विभाग मार्फत रस्ता अडीच कोटी किंमत
३)आष्टी तालुक्यातील धानोरा ते घोंगडेवाडी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत महाराष्ट्र ग्रामिण रस्ते विकास

ड) गेवराई तालुक्यातील
१) उमापूर ग्रामपंचायत अंतर्गत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मारूतीची वाडी येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत.
२)गेवराई तालुक्यातील मौजे टाकरवन ते टाकरवन फाटा रस्ता

कार्यकारी अभियंता बेद्रे यांची व नातेवाईकांच्या संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करा

महाराष्ट्र ग्रामिण रस्ते विकास संस्था, कार्यकारी अभियंता, ए.एम. बेद्रे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नोटीस बजावली गौणखनिज कंत्राटदाराने कोठुन आणले?याची तपासणी न करताच देयके, कंत्राटदाराने गौणखनिज पावत्या आणि माहीती दिली नसतानाच देयके अदा केले, शासनाच्या महसुलाचे नुकसान होण्याची शक्यता असुन शासकीय कामात जाणुनबुजुन निष्काळजीपणा केल्याचे नोटीसीत म्हटले आहे, जोगदंड यांच्या डी. बी. कन्स्ट्रक्शन यांच्यावर कारवाई करण्यात यावी, कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे. तसेच तत्कालीन कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र ग्रामिण रस्ते विकास संस्था ए.एम.बेद्रे यांची व त्यांच्या नातेवाईकांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्यात यावी.

डी. बी. कन्स्ट्रक्शन दंड आकारणीचे आदेश, वसुली मात्र नाही

-डाॅ.बाबु जोगदंड यांच्या डी .बी कन्स्ट्रक्शने रस्त्याची कामे वेळेत पुर्ण केली नाहीत म्हणून ग्रामिण रस्ते विकास संस्थेने ठेकेदार जोगदंडच्या डीबी कन्स्ट्रक्शनला १ ऑक्टोबर २०१९ पासुन प्रतिदिवस १००० रूपये दंड ठोठावला, त्या दंडाची रक्कम १९ डिसेंबर २०१९ पर्यंत ४ लाख ४४ हजार रूपये होती, मात्र वसुलीच करण्यात आली नाही संबधित प्रकरणात दंड वसुल करण्यात यावा.

गौणखनिज चोरी प्रकरणात दंडात्मक कारवाई करण्यात यावी

________
बीड जिल्ह्य़ातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत महाराष्ट्र ग्रामिण रस्ते विकास संस्था बीड तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग बीड यांच्या आधिकारी व ठेकेदार यांनी संगनमतानेच गौणखनिज चोरी करून रस्ते कामासाठी वापर केला असून संबधित प्रकरणात चौकशी करून दोषींवर आर्थिक दंडात्मक कारवाई करण्यात यावी तसेच शासनाची दिशाभूल व कोट्यावधी रुपयांचा महसुल बुडवून आर्थिक नुकसान केल्याबद्दल आवश्यक कारवाई करण्यात यावी.


बीड: लाच मागणारा पाटोदा चा फौजदार एसीबीच्या जाळ्यात

बीड़ (नानासाहेब डिडूळ): तक्रारदाराच्या गुन्हात जप्त केलेला मोबाईल तसेच आरोपीला अटकपुर्व जामिनासाठी सहकार्य करण्यासाठी पाटोदा उपनिरीक्षकाने 50 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती . तड़जोड़ीअंती 40 हजार रूपयांची स्विकारण्याचे पंचसमक्ष मान्य केले या प्रकरणी उपनिरीक्षकावर पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .ही कारवाई शुक्रवार (दि.11) रोजी बीड एसीबीने केली.
अफरोज तैमीरखाॅ पठाण हे पाटोदा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते.त्यांनी तक्रारदाराकड़े गुन्हातील मोबाईल परत देण्यासाठी व तक्रारदाराच्या भावास अटकपुर्व जामीन मंजुर झालेली रद्द न करण्यासाठी जप्त गाड़ी व पिस्टल सोड़वण्यासाठी अहवाल चांगला देण्यासाठी 50 हजार रूपये लाचेची मागणी केली व तड़जोड़ीअंती 40 हजार रूपये स्वीकारण्याचे पंचासमक्ष व साक्षीदारांच्या समक्ष मान्य केले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक राहुल खाड़े ,अप्पर पोलीस अधिक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड़चे उपअधिक्षक शंकर शिंदे ,सुरेश सांगळे ,हनुमान गोरे , संतोष यांनी कारवाई केली.

सक्तीची विजबिल वसुली, अतिवृष्टीग्रस्त मांजरसुंभा मंडळांच्या अनुदानासाठी शेतक-यांचे बैलगाडीसहीत चक्काजाम आंदोलन – डाॅ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्र शासनाने रझाकारी पद्धतीने कृषिपंपाची विजतोडणी करून कोरोना कालावधीत आर्थिक संकटात सापडलेल्या शेतक-यांना वेठीस धरल्याच्या निषेधार्थ व तात्काळ विजजोडणी करण्यात यावी तसेच मांजरसुंभा महसुल मंडळातील २३ गावे खरीप हंगामातील अतिवृष्टीग्रस्त अनुदानापासुन वगळण्यात आली असून त्या गावातील शेतक-यांना अनुदान मिळावे या मागण्यांसाठी सामाजिक संघटना व सर्वपक्षीय मांजरसुंभा येथील राधिका हाॅटेल समोर धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बैलगाड्यांसह चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असून सर्व शेतकरी बांधवांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, , प्रदेशउपाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा रमेशभाऊ पोकळे,भाजपा तालुकाध्यक्ष बीड स्वप्निल गलधर, तालुकाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा बीड बाळासाहेब मोरे,भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष बीड, सौ. वैशालीताई चौरे,उपसरपंच कोळवाडी तुळशीदास महाराज शिंदे, युवा नेते मसु जाधव, सरपंच पालसिंगन विक्रम खंडागळे,सरपंच हिंगणी अंकुश गोरे,उपसरपंच चाकरवाडी, हनुमान चाळक, चेअरमन सेवा सोसायटी सात्रा पोपटराव हावळे, सरपंच बोरखेड बाळासाहेब गावडे, अशोक घोडके, दत्ता जगदाळे, माजी सरपंच शहाजी आण्णा घोडके, बाळासाहेब ढास,नाना चव्हाण, काशिनाथ मांडवे,संभाजी कदम, महादेव नाईकवाडे,विष्णु सुरवसे महाराज, आजिनाथ घरत, दादासाहेब वाघमारे,राहुल खोसे,कल्याण कागदे, आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष बीड माजी सैनिक अशोक येडे, भाजपा युवा नेते अशोकदादा रसाळ,शिवबा संघटना जिल्हाध्यक्ष हनुमान मुळीक, ऑल इंडीया पॅथर मराठवाडा उपाध्यक्ष नितिन सोनावणे,सामाजिक कार्यकर्ते डाॅ.संजय तांदळे, वंचित बहुजन आघाडीचे सहसचिव शेख युनुस च-हाटकर, वंचित नेते संदिप जाधव,आदिंनी आवाहन केले आहे.

जिल्हाप्रशासनाने शब्द न पाळल्यामुळे चक्काजाम आंदोलन
____
३० नोव्हेंबर रोजी बिंदुसरा तलावातील जलसमाधी आंदोलनानंतर महावितरणचे कार्यकारी अभियंता निकम, व उपअभियंता ग्रामिण गुंजाळ यांनी फोनवरून अधिक्षक अभियंता महावितरण कोलप यांच्याशी फोनवरून संपर्क साधुन प्रति रोहीत्र २५,००० रू भरून विजजोडणी करण्यात येईल या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते परंतु महावितरणच्या आधिका-यांनी दिलेला शब्द न पाळल्यामुळे दि.६ डिसेंबर रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार होते परंतु ६ डिसेंबर रोजी महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिन व” हाय अलर्ट “मुळे पोलीस प्रशासनावर अतिरिक्त ताण वाढु नये व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे या भुमिकेतुन तूर्तास स्थगित करून दि.९ डिसेंबर गुरूवार रोजी सकाळी ११:३० वाजता मांजरसुंभा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असून महावितरण व महसुल प्रशासनातील आधिका-यांच्या लेखी आश्वासनानंतरच चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात येईल असे निवेदन महावितरण, महसुल व पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे.

पशुसंवर्धन पदविका धारकांना शासनाने नोंदणीकृत करून स्वतंत्र पशुवैद्यकीय व्यवसायास परवानगी द्यावी !

बीड दि.०४ ऑगस्ट २०२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत करून त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून वाड्या-वस्त्यांवर पशुसेवा अगदी कमी वेळात पोहचेल व गाई-म्हशीचे प्राण वाचेल.शासन दुधाचा महापूर आणण्यासाठी प्रयत्न करते योजना आखते परंतु त्यात मोलाचा वाटा असणारे पशुसंवर्धन पदविकाधारकांच्या नोंदणीच्या वेळी मात्र काणाडोळा करते.असे न करता शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून प्रथमतः पशुसंवर्धन पदविका धारकांना कायदेशीर पशुवैद्यक म्हणून घोषित करावे व त्यांची नोंदणी करून त्यांना नोंदणीक्रमांक द्यावा अशी मागणी जोर धरून आहे. १९८४ च्या कायद्यात बदल करावा, पशुसंवर्धन पदवीकाधारकांना व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे मात्र शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसून कृषीप्रधान देशातच पशूंकडे शासनाचे लक्ष नसल्याचे समोर येत आहे.

पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ कलमाअंतर्गत व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीमधून पशुसंवर्धन पदवीधारकांच्या राज्यव्यापी परिषदेची नियुक्ती करून स्वतंत्ररीत्या औषधे बाळगणे व नोंदणीकृत व्यवसाय परवाना उपलब्ध करून द्यावा.राज्यातील रिक्त पशुधन पर्यवेक्षक पदांची तत्काळ भरती करण्यात यावी.खासगीरीत्या असंघटित क्षेत्रात भारतीय पशुचिकित्सक परिषद कायद्यान्वये किरकोळ व प्राथमिक स्वरूपाच्या पशुवैद्यकीय उपचार सेवा पदवीधारक डॉक्‍टरच्या सुपरव्हिजन व माध्यमांचा वापर करून आपले कार्य पार पाडतात अशा सर्व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीप्रमाणपत्र व ओळखपत्र देऊन पशुसेवेचे कार्य सुरू ठेवण्यासाठी बळ द्यावे.

पावसाने उघडीप देताच कपाशीवर मावा,तुडतुड्यांचा प्रादुर्भाव ,१५ हजार ५३३ हेक्टर क्षत्र बाधित

सोयगाव,दि.२४:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगावसह तालुक्यात ४३ हजार ९९८ लागवडी योग्य क्षेत्रापैकी तब्बल ३० हजार हेक्टरवर कपाशी पिकांची लागवड करण्यात आली असून पावसाच्या उघडिपी आणि ढगाळ वातावरणाने तब्बल १५ हजार ५३३ हेक्टरवरील कपाशी पिकांना मावा,तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे.यामुळे खरिपाच्या जोमात असलेल्या कपाशीची पिके संकटात सापडली असून शेतकऱ्यांना फवारणीची चिंता पडली आहे.

सोयगाव तालुक्यात यंदाच्या खरिपाच्या हंगामात कपाशीचा विक्रमी पेरा वाढलेला आहे,कपाशी पाठोपाठ मक्याचाही पेरा वाढला असून मात्र ऐन जोमात आलेल्या कपाशीवर माव्याचा अटॅक आलेला असून यामुळे फवारणीची चिंता वाढलेली आहे.माव्याच्या फवारणीसाठी महागडी कीटकनाशक वापरावी लागत आहे,परंतु तालुका कृषी विभागाकडून यावर उपाय योजनांबाबत कोणतेही मार्गदर्शन होत नसल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहे.माव्याचा प्रादुर्भाव अचानक वाढला असून प्रत्येक कपाशीच्या झाडावर माव्याचे प्रमाण अधिक आढळून आले आहे.माव्यामुळे जोमात असलेली कपाशीचे शेंडे व पाने आकसून जात असल्याने कपाशीच्या वाढीसाठी ताण पडत असल्याचे बाधित शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

माव्यासोबतच चिकटा रोग-

कोरडवाहू क्षेत्रावर लागवड करण्यात आलेल्या कपाशी पिकांवर चिकटा रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला असून माव्यासोबातच चिकटा वाढल्याने दुहेरी संकटात कपाशी उत्पादक शेतकरी सापडले असून मावा आणि चीकट्यावर उपाय योजनांसाठी व फवारणीच्या औषधांसाठी शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे.

तालुका कृषी विभाग बदल्यांमध्ये व्यस्त-

एकीकडे शेतकरी संकटात सापडला असतांना दुसरीकडे मात्र तालुका कृषी विभाग मात्र जिल्हा आणि आंतर बदल्यांच्या प्रक्रियेत व्यस्त असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीवर तोडगा काढण्यासाठी कृषी विभागाकडे वेळ नसल्याचे आढळून येत आहे.

फुलपात्यावर आलेली कपाशी वर ऐन जोमात मावा आणि चीकट्याचा प[रादुर्भाव झालेला असल्याने कपाशी पिकांची फुलगळ वाढण्याचा धोका निर्माण झालेला असून फुलगळ मुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ऊसतोड कामगारांना सन्मानजनक वाढ द्या, अन्यथा कोयता चालणार नाही ―पंकजाताई मुंडे यांची साखर संघाच्या बैठकीत आग्रही मागणी

विमा कवच, कोरोना सुरक्षा यावरही केल्या सूचना

मुंबई दि.२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील ऊसतोड कामगारांना मजूरीच्या दरात सन्मानजनक वाढ मिळावी यासाठी ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी आज साखर कारखाना संघाच्या बैठकीत आग्रही भूमिका मांडली. मजूरांना वाढ न दिल्यास कोयता चालणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या संचालक मंडळाची बैठक आज साखर भवनात पार पडली. पंकजाताई मुंडे यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सिंग द्वारे या बैठकीत सहभाग घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक कामगारांच्या संघटनांकडून मागणी संदर्भातील आलेल्या निवेदनांवर यावेळी बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

राज्यातील तमाम ऊसतोड मजूरांची मजूरीच्या दरात वाढ मिळावी आणि ही वाढ सन्मानजनकच मिळाली पाहिजे अशी आमची भूमिका असल्याचे पंकजाताई म्हणाल्या. त्यासाठीचा करार हा तीन वर्षाचाच होईल. तथापि, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजूरांना विमा कवच द्यावे, त्याची जवाबदारी राज्य सरकार व कारखान्यांनी घ्यावी. सरकारी पातळीवर असलेल्या विषयावर चर्चा करण्यासाठी एक समिती आणि भाववाढ व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केले जाणारे सुरक्षेचे उपाय यावर चर्चा करणारी दुसरी समिती अशा दोन समित्या साखर संघाने स्थापन कराव्यात व त्या दोन्ही समितीचे अध्यक्ष साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर असावेत. या दोन्ही समितीने त्यांचे म्हणणे लवादा समोर मांडावे व चर्चा करावी. या विषयाबाबत अत्यंत अनुभवी सन्माननीय खासदार शरद पवार साहेब यांचे मार्गदर्शन घ्यावे अशी सूचना त्यांनी केली.

संप हा मजुरांच्या हक्कासाठी आहे, कोणाचीही राजकीय पोळी भाजण्यासाठी नाही. माझे ऊसतोड कामगार हे राजकीय प्यादे नाहीत असे या संपात विनाकारण हस्तक्षेप करणाऱ्यांसाठी
पंकजाताई मुंडे म्हणाल्या.

ऊसतोड कामगार महामंडळा कडे असणारे विषय हाताळण्यासाठी कमिटीने धनंजय मुंडेंनाही बैठकीला बोलवावे व जवाबदारी निश्चित करावी. सरकार पातळीवर असलेले आणखी मंत्री महोदय उदाहरणार्थ आरोग्य मंत्री राजेश टोपे, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनाही आमंत्रित करावे व अंतिम निर्णय लवादाने घ्यावा अशा सूचना साखर संघाच्या बैठकीत पंकजाताई मुंडेंनी केल्या असल्याचे समजते. ऊसतोड कामगारांच्या मजूरीत वाढ न झाल्यास कोयता चालणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.


बीड जिल्ह्यात आज 308 जण कोरोना पॉझिटिव्ह

बीड दि.२०:आठवडा विशेष टीम―बीड जिल्ह्यात आजच्या कोरोना तपासणी अहवालात एकूण ३०८ जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.आज झालेल्या चाचण्या आरटीपिसीआर चाचणी मध्ये ६० पॉझिटिव्ह व रॅपिड अँटीजन चाचणी मध्ये २४८ पॉझिटिव्ह असा दिवसभराचा ३०८ पॉझिटिव्हचा आकडा कोरोना चाचणी अहवालातून समोर आला आहे.

बीड जिल्ह्यात आज 113 जण कोरोना पॉझिटिव्ह ,पहा कुठले आहेत रुग्ण

बीड दि.७ ऑगस्ट:आठवडा विशेष टीम―आज आलेल्या अहवालात बीड जिल्ह्यात ११३ जण कोविड-१९ पॉझिटिव्ह निघाले आहेत.रुग्ण बीड अंबाजोगाई ,परळी ,केज ,गेवराई ,आष्टी ,माजलगाव ,धारूर व शिरूर कासार या तालुक्यातील आहेत.आजच्या अहवालात पाटोदा तालुक्यातील एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही.सहवासित रुग्णाची संख्या जास्त आहे.त्यामुळे सोशल डिस्टन्स ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.शक्यतो घराबाहेर पडूच नका.

बीड: प्रामाणिकपणे दरवर्षी कर्जफेड केली म्हणुन कर्जमाफीत बसत नाही , ‘काका मुळीक’ यांची कथा आणि व्यथा

लिंबागणेश दि.२८:आठवडा विशेष टीम― बीड तालुक्यातील मौजे पोखरी येथिल ऊसतोड मजुर काका मुळीक ,त्यांना कोरडवाहू ६ एकर जमिन, ऊसतोड मजूर असल्यामुळे ४ महिने ऊस तोडण्यासाठी सिद्धेश्वर कारखाना सोलापूर येथे दरवर्षी नित्यनेमाने जातात.
त्यांना दोन मुले ,मोठा मुलगा दत्ता वय २० वर्षे १२ वी झालेली सध्या पाटोदा पीव्हिपी कालेजमध्ये शिकत आहे. शेतीमध्ये वडिलांना मदत करतो. दुसरा मुलगा विकास वय १८ वर्षे लिंबागणेश येथील भालचंद्र महाविद्यालयात शिकतोय.

काका मुळीक ,दत्ता मुळीक (बापलेक) मो.नं ९०२१२१८८२६―

उडीद १० दिवसांपुर्वी पेरले, ५० टक्के उगवले ५० टक्के उगवले नाही. बि-बियाण्यासाठी उडीद पिशवी १५०० रुपये, खत १ क्विंटल २५०० रुपये , टक्टरने पेरणी १५०० रूपये. बैल बारदाना नाही.दोबार खर्च करण्याची ताकद नाही. म्हणुन बापलेक दुसऱ्यांदा तुट पडलेल्या जागी पेरणी करत आहोत.

डॉ.गणेश ढवळे,सामाजिक कार्यकर्ते:―

सोलापूर येथील सिद्धेश्वर साखर कारखान्यावरुन परतलेल्या काका मुळीक यांच्या कडे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे ८० हजार रुपये कर्ज होते.परंतु नियमित दरवर्षी प्रामाणिकपणे कर्ज फेडले असल्यामुळे त्यांचे कर्ज कर्जमाफीत बसत नसल्याचे बँक मॅनेजरने सांगितले. प्रामाणिकपणे शेतीच्या कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याची ही व्यथा आहे. त्यांनी सोयाबीन लावलेले उगवलेच नाही. जिल्हाधिकारी बीड आणि श्रीकांत निळे, तहसिलदार बीड यांना लेखी निवेदन ई-मेलद्वारे सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी पाठवून तात्काळ स्थळ पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी केली आहे.