बीड: लाच मागणारा पाटोदा चा फौजदार एसीबीच्या जाळ्यात

बीड़ (नानासाहेब डिडूळ): तक्रारदाराच्या गुन्हात जप्त केलेला मोबाईल तसेच आरोपीला अटकपुर्व जामिनासाठी सहकार्य करण्यासाठी पाटोदा उपनिरीक्षकाने 50 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती . तड़जोड़ीअंती 40 हजार रूपयांची स्विकारण्याचे पंचसमक्ष मान्य केले या प्रकरणी उपनिरीक्षकावर पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .ही कारवाई शुक्रवार (दि.11) रोजी बीड एसीबीने केली.
अफरोज तैमीरखाॅ पठाण हे पाटोदा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते.त्यांनी तक्रारदाराकड़े गुन्हातील मोबाईल परत देण्यासाठी व तक्रारदाराच्या भावास अटकपुर्व जामीन मंजुर झालेली रद्द न करण्यासाठी जप्त गाड़ी व पिस्टल सोड़वण्यासाठी अहवाल चांगला देण्यासाठी 50 हजार रूपये लाचेची मागणी केली व तड़जोड़ीअंती 40 हजार रूपये स्वीकारण्याचे पंचासमक्ष व साक्षीदारांच्या समक्ष मान्य केले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक राहुल खाड़े ,अप्पर पोलीस अधिक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड़चे उपअधिक्षक शंकर शिंदे ,सुरेश सांगळे ,हनुमान गोरे , संतोष यांनी कारवाई केली.

बीड जिल्ह्यात आज 113 जण कोरोना पॉझिटिव्ह ,पहा कुठले आहेत रुग्ण

बीड दि.७ ऑगस्ट:आठवडा विशेष टीम―आज आलेल्या अहवालात बीड जिल्ह्यात ११३ जण कोविड-१९ पॉझिटिव्ह निघाले आहेत.रुग्ण बीड अंबाजोगाई ,परळी ,केज ,गेवराई ,आष्टी ,माजलगाव ,धारूर व शिरूर कासार या तालुक्यातील आहेत.आजच्या अहवालात पाटोदा तालुक्यातील एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही.सहवासित रुग्णाची संख्या जास्त आहे.त्यामुळे सोशल डिस्टन्स ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.शक्यतो घराबाहेर पडूच नका.

Mahapolice Bharti Form : पोलीस भरती चा फॉर्म कसा भरावा ? पहा

पोलीस भरती साठीचा फॉर्म कसा भराल? (Maharashtra Police bharti online form 2019)

या संकेतस्थळावर गेल्यानंतर उमेदवाराला स्वतःचे अकाऊंट तयार करावे लागेल. अगोदरच अकाऊंट असल्यास युजरनेम आणि पासवर्ड वापरुन लॉग इन करता येईल. नवीन नोंदणी करण्यासाठी register या पर्यायावर क्लिक करा, त्यानंतर स्वतःचे युजरनेम टाका, त्यानंतर ई-मेल आयडी टाकून पासवर्ड पडताळणी करा. नोंदणी केल्यानंतर Register यावर पुन्हा क्लिक करा.Register वर क्लिक केल्यानंतर ईमेल वर व्हॅरिफिकेशन लिंक जाईल.तिच्यावर क्लिक करा.

तुमचे अकाऊंट तयार होईल. पुन्हा तुम्ही होम पेजवर जा. तुम्ही तयार केलेले युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.यानंतर डीक्लेरेशन फॉर्म येईल तिथे ‘टिक’ करा.नंतर Ok वर क्लिक करा.यानंतर Create Your Profile बटन वर क्लिक करा.

यानंतर पुढील सांगितलेली प्रक्रिया पूर्ण करा. तांत्रिक अडचण येऊ नये यासाठी तुमचे युजरनेम आणि पासवर्ड सुरक्षित लिहून ठेवा. शिवाय माहिती भरतानाही वाचून खात्री करा आणि मगच माहिती भरा.

बीड : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पोलीस चौकीत गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न

बीड – टीम आठवडा विशेष: आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील पोलीस चौकीत एका महिला कर्मचाऱ्याने वरीष्ठासोबत झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर चौकीत गळफास घेऊन आत्महत्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.या घटनेने शहरात खळबळ उडाली असल्याची माहिती विशेष सूत्रांनी दिली आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाणे अंतर्गत असणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयात बंदोबस्तासाठी पोलीस चौकी उभारण्यात आलेली आहे. वेळोवेळी सांगूनही एकाच जागेवर ड्युटी देण्यात येत आहे.नेहमी प्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ड्युटी सुरू असताना वरिष्ठांनी चौकीत न बसता बाहेर खुर्चीवर बसण्यास सांगितले. यावरूनच महिला कर्मचारी व वरिष्ठांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. राग अनावर झाल्याने सदर महिला कर्मचाऱ्याने चक्क चौकीत जाऊन पंख्याला गळफास घेण्याचा प्रयत्न केला. चौकीच्या आवारातील नागरिकांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सदर चौकीचा दरवाजा दगडाने दरवाजा तोडत सदर महिला कर्मचाऱ्याचा जीव वाचवला. घटनेची माहिती मिळताच ठाणे प्रमुख व कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयात येत सदर महिलेची समजूत काढली.या प्रकरणाने पोलीस खात्यातील अनागोंदी उघड्यावर आली आहे.

हजेरी मेजरकडून सातत्याने दिली जात होती एकाच ठिकाणी ड्युटी

आज जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल महिला पोलीस कर्मचाऱ्याकडून उचलण्यास हजेरी मेजर जबाबदार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सदर महिलेने हजेरी मेजरकडे याबाबत तक्रार केली होती. मात्र त्यांना ड्युटी बदलून देण्यात आली नाही. आज झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर या महिला पोलीस कर्मचाऱ्याने हे पाऊल उचलले असल्याचे कळते आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यावर काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.