#CoronaVirus औरंगाबाद जिल्ह्यात २ जूनला ‘६२’ जण कोरोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यात 1085 कोरोनामुक्त, 480 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद दि.०२:आठवडा विशेष टीम― औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1085 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 480 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 62 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यात 1649 कोरोनाबाधित आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. शहा बाजार (1), किराडपुरा (2), चंपा चौक (1), कटकट गेट (1), नारळीबाग (1), गणेश कॉलनी (1), जवाहर नगर (3), भीम नगर (2), हमालवाडी (1), शिवशंकर कॉलनी (2), नाथ नगर (2), ज्योती नगर (1), फजलपुरा परिसर (1), मिल कॉर्नर (1), एन-3 सिडको (1), एमजीएम परिसर (1), रोशन गेट (1) , विशाल नगर, गारखेडा परिसर (1), एन-सहा संभाजी कॉलनी (7), समता नगर (6), अंहिसा नगर (1), मुकुंदवाडी (1), विद्या निकेतन कॉलनी (1), न्याय नगर (1), बायजीपुरा (2), संजय नगर, मुकुंदवाडी (4), विजय नगर (2), चंपा चौक, म्हाडा कॉलनी (1), नेहरु नगर (1), जुना मोंढा नाका परिसर (1), सिडको वाळूज महानगर (1), तक्षशील नगर (1), रेहमानिया कॉलनी (1), राजा बजार (1), कोतवाल पुरा (1), भाग्य नगर (1), अन्य (3) आणि यशवंत नगर, पैठण (1) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 27 महिला आणि 35 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

आतापर्यंत 1085 जण कोरोनामुक्त

औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (घाटी) 02, जिल्हा सामान्य रुग्णालयातून (मिनी घाटी) 06 रुग्ण आज बरे होऊन घरी परतले आहेत. मनपाच्या कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये, मिनी घाटी, घाटी येथून आतापर्यंत एकूण 1085 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत.

घाटीत पाच, खासगीत एका कोरोनाबाधितांचा मृत्यू

शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) पाच कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये 02 जून रोजी मध्यरात्री एक वाजता शहागंज येथील 54 वर्षीय पुरूष, पहाटे चार वाजता पिसादेवी रोड, गौतम नगर येथील 69 वर्षीय स्त्री, सकाळी 7 वाजता कैलास नगर येथील 56 वर्षीय पुरूष, दुपारी 2.30 वाजता गणेश कॉलनीतील 61 वर्षीय पुरूष, दुपारी 3.30 वाजता बायजीपुरा येथील 55 वर्षीय महिला या कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये खिवंसरा पार्क, गारखेडा परिसरातील कोरोनबाधित असलेल्या 64 वर्षीय पुरूष रुग्णाचा 1 जून रोजी रात्री 11.30 वा. उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत 68, तीन खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 15, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 84 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले.


#CoronaVirus अहमदनगर: जिल्ह्यातील २३ पैकी २० अहवाल निगेटीव

अहमदनगर, दि.०५:आठवडा विशेष टीम― जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या २३ अहवालापैकी २० अहवाल निगेटीव आले आहेत. आज पुन्हा १३ व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, नेवासा येथील एका कोरोना बाधित रुग्णाचा २१ दिवसानंतरचा पहिला अहवाल निगेटिव आला आहे तर जामखेड येथील ०४ तर संगमनेर येथील ०३ कोरोना बाधित व्यक्तींचा १४ दिवसांनंतरचा पहिला अहवाल निगेटीव आला आहे. आज या व्यक्तींचा दुसरा अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
नेवासा येथील एका कोरोना बाधित रुग्णाचा १४ दिवसानंतरचा पहिला अहवाल निगेटीव तर दुसरा अहवाल पॉझिटीव आला होता. त्यानंतर सात दिवसांनी पुन्हा त्याचा अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. तो अहवाल निगेटीव आला आहे. आता आज त्याचा दुसरा अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आला असून तो निगेटीव आल्यास त्याला डिस्चार्ज मिळेल. तसेच संगमनेर येथील ०३ आणि जामखेड येथील ०४ जणांचा पहिला अहवाल निगेटी आला आहे. त्यांचे घशातील स्त्राव पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयाने आतापर्यत १६२८ व्यक्तींचे स्त्राव तपासणी केली असून त्यापैकी १५३५ जणांचे अहवाल निगेटीव आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४४ असून त्यापैकी २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दोन व्यक्तींचा दुर्दैवी मुत्यू झाला. सध्या एकूण १७ जण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


#Coronavirus ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’मध्ये अहमदनगर जिल्ह्याचे काम चांगले ―आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासन आणि प्रशासन सज्ज अहमदनगर, दि, २६ :आठवडा विशेष टीम― कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासन आणि प्रशासन सज्ज आहे. अहमदनगर जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि पोलिस विभागाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कौतुकास्पद आहे. त्यामुळे आपण रुग्णांपर्यंत पोहोचू शकलो, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. औरंगाबादहून मुंबईकडे जाताना श्री टोपे … Read more

#Covid19 जामखेडमधून कोरोना बाधिताच्या संपर्कातील एका नगरसेवकासह २५ जणांचा रिपोर्ट निगेटीव्ह

जामखेड:आठवडा विशेष टीम―जामखेड येथील वध्द व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूनंतर केलेल्या कोरोना तपासणीत ती व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संपर्कातील ९ व्यक्तींच्या तपासणीतून मृत व्यक्तीच्या कुटुंबातील दोन जण कोरोना बाधित असल्याचे पुण्याच्या सैनिकी महाविद्यालयाच्या अहवालात दि २० रोजी स्पष्ट झाले. तर एका डॉक्टरासह चार जणांचे रिपोर्ट निगेटीव आले आहेत. प्रशासनाने त्या दोन जणांच्या संपर्कात … Read more

लॉकडाऊन काळात काही उद्योग आणि आस्थापना सुरू करण्याबाबत आदेश जारी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अटी आणि शर्तीचे पालन करणे बंधनकारक जिल्हा नियंत्रण कक्ष, परिवहन विभाग आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यावर नियंत्रणाची जबाबदारी अहमदनगर, दि.२०:आठवडा विशेष टीम― राज्य शासनाने लॉकडाऊन काळात काही उद्योग आणि आस्थापना सुरु करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील महानगरपालीका आणि नगरपालीका क्षेत्राच्‍या बाहेरील ग्रामीण भागात असलेले उदयोग तसेच उत्पादन व इतर औद्योगिक आस्‍थापना ज्यामध्ये विशेष … Read more

अंबाजोगाई: भगवंत भवनच्या अन्नछञाद्वारे 2500 हुन अधिक गरजू लोकांपर्यंत पोहचले ‘आपुलकीचे जेवण’

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये हातावर पोट असणारे कामगार,स्वच्छता कर्मचारी,परिचारिका,ज्येष्ठ नागरीक,बाहेरगावाचे विद्यार्थी,प्रवासी यांना जेवण मिळावे या हेतूने 1 एप्रिल पासून शहराच्या विविध भागांतील लोकांना मोफत भोजन व फूड पॅकेटचे वाटप केले जात आहे.भगवंत भवनच्या अन्नछञाद्वारे राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमातून आजपर्यंत 2500 हून अधिक गरजूंना ‘आपुलकीचे जेवण’ देण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत कोणताही नागरिक … Read more

मस्जिदमधील ते २४ जण दोन महिन्यांपासून बीडमध्येच , दिल्लीतील कार्यक्रमाशी संबंध नाही

बीड:आठवडा विशेष टीम― शहरातील दोन मस्जिदमधुन जमातच्या २४ व्यक्ती तपासणीसाठी काल स्वत:हून पुढे आल्या होत्या. तपासणीनंतर त्यांना मस्जिदमध्ये पाठवण्यात आले आहे. गेल्या दोन महिन्यांपासुन या २४ व्यक्ती बीडमध्येच असुन त्यांचा दिल्लीतील मरकजमधील धार्मिक कार्यक्रमाशी संबंध नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सदरील व्यक्तींची पेठ बीड पोलिस ठाण्यात नोंदही आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये, अफवांवर … Read more

बीड: कोरोना बाधित रुग्णांसाठी पत्रकार संघाची रुग्णवाहिका जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द

बीड:आठवडा विशेष टीम― जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे.बीड जिल्ह्यात परदेशातून व इतर जिल्ह्यातून आप – आपल्या गावात शेकडो प्रवासी आलेले आहेत.भविष्यात कोरोना व्हायरस संशयित रुग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन सर्व उपाय करत आहे. भविष्यात कोरोना बाधित रूण्ण वाढले तर प्रशासनाच्या मदतीसाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची रूण्णवाहीका जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे विनामूल्य 24 … Read more

COVID-19: कोरोना व्हायरसवर औषध ,न्यूयॉर्कच्या Pfizer कंपनीने केला दावा; अँटिव्हायरल कंपाउंड सापडल्याचा दावा

न्यूयॉर्क:आठवडा विशेष टीम― नॉवेल कोरोना व्हायरस जगभरात पसरत आहे.त्यावर उपचार शोधण्यासाठी सर्व शास्त्रज्ञ दिवसरात्र मेहनत करत आहेत.कोरोना व्हायरसला मारक अशा औषधांचा शोध सुरू युद्धपातळीवर सुरू आहे. त्यात शास्त्रज्ञांना एक असा कंपाउंड(घटक) सापडला ज्याने करोना व्हायरस आजाराचा उपचार होऊ शकतो असा दावा एका फार्माकंपनीने केला आहे. आम्ही असा अँटिव्हायरल कंपाउंड तयार केला आहे, ज्यामुळे कोरोनाव्हायरसचा उपचार … Read more