पशुसंवर्धन पदविका धारकांना शासनाने नोंदणीकृत करून स्वतंत्र पशुवैद्यकीय व्यवसायास परवानगी द्यावी !

बीड दि.०४ ऑगस्ट २०२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत करून त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून वाड्या-वस्त्यांवर पशुसेवा अगदी कमी वेळात पोहचेल व गाई-म्हशीचे प्राण वाचेल.शासन दुधाचा महापूर आणण्यासाठी प्रयत्न करते योजना आखते परंतु त्यात मोलाचा वाटा असणारे पशुसंवर्धन पदविकाधारकांच्या नोंदणीच्या वेळी मात्र काणाडोळा करते.असे न करता शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून प्रथमतः पशुसंवर्धन पदविका धारकांना कायदेशीर पशुवैद्यक म्हणून घोषित करावे व त्यांची नोंदणी करून त्यांना नोंदणीक्रमांक द्यावा अशी मागणी जोर धरून आहे. १९८४ च्या कायद्यात बदल करावा, पशुसंवर्धन पदवीकाधारकांना व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे मात्र शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसून कृषीप्रधान देशातच पशूंकडे शासनाचे लक्ष नसल्याचे समोर येत आहे.

पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ कलमाअंतर्गत व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीमधून पशुसंवर्धन पदवीधारकांच्या राज्यव्यापी परिषदेची नियुक्ती करून स्वतंत्ररीत्या औषधे बाळगणे व नोंदणीकृत व्यवसाय परवाना उपलब्ध करून द्यावा.राज्यातील रिक्त पशुधन पर्यवेक्षक पदांची तत्काळ भरती करण्यात यावी.खासगीरीत्या असंघटित क्षेत्रात भारतीय पशुचिकित्सक परिषद कायद्यान्वये किरकोळ व प्राथमिक स्वरूपाच्या पशुवैद्यकीय उपचार सेवा पदवीधारक डॉक्‍टरच्या सुपरव्हिजन व माध्यमांचा वापर करून आपले कार्य पार पाडतात अशा सर्व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीप्रमाणपत्र व ओळखपत्र देऊन पशुसेवेचे कार्य सुरू ठेवण्यासाठी बळ द्यावे.

ऊसतोड कामगारांना सन्मानजनक वाढ द्या, अन्यथा कोयता चालणार नाही ―पंकजाताई मुंडे यांची साखर संघाच्या बैठकीत आग्रही मागणी

विमा कवच, कोरोना सुरक्षा यावरही केल्या सूचना

मुंबई दि.२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील ऊसतोड कामगारांना मजूरीच्या दरात सन्मानजनक वाढ मिळावी यासाठी ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी आज साखर कारखाना संघाच्या बैठकीत आग्रही भूमिका मांडली. मजूरांना वाढ न दिल्यास कोयता चालणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या संचालक मंडळाची बैठक आज साखर भवनात पार पडली. पंकजाताई मुंडे यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सिंग द्वारे या बैठकीत सहभाग घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक कामगारांच्या संघटनांकडून मागणी संदर्भातील आलेल्या निवेदनांवर यावेळी बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

राज्यातील तमाम ऊसतोड मजूरांची मजूरीच्या दरात वाढ मिळावी आणि ही वाढ सन्मानजनकच मिळाली पाहिजे अशी आमची भूमिका असल्याचे पंकजाताई म्हणाल्या. त्यासाठीचा करार हा तीन वर्षाचाच होईल. तथापि, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजूरांना विमा कवच द्यावे, त्याची जवाबदारी राज्य सरकार व कारखान्यांनी घ्यावी. सरकारी पातळीवर असलेल्या विषयावर चर्चा करण्यासाठी एक समिती आणि भाववाढ व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केले जाणारे सुरक्षेचे उपाय यावर चर्चा करणारी दुसरी समिती अशा दोन समित्या साखर संघाने स्थापन कराव्यात व त्या दोन्ही समितीचे अध्यक्ष साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर असावेत. या दोन्ही समितीने त्यांचे म्हणणे लवादा समोर मांडावे व चर्चा करावी. या विषयाबाबत अत्यंत अनुभवी सन्माननीय खासदार शरद पवार साहेब यांचे मार्गदर्शन घ्यावे अशी सूचना त्यांनी केली.

संप हा मजुरांच्या हक्कासाठी आहे, कोणाचीही राजकीय पोळी भाजण्यासाठी नाही. माझे ऊसतोड कामगार हे राजकीय प्यादे नाहीत असे या संपात विनाकारण हस्तक्षेप करणाऱ्यांसाठी
पंकजाताई मुंडे म्हणाल्या.

ऊसतोड कामगार महामंडळा कडे असणारे विषय हाताळण्यासाठी कमिटीने धनंजय मुंडेंनाही बैठकीला बोलवावे व जवाबदारी निश्चित करावी. सरकार पातळीवर असलेले आणखी मंत्री महोदय उदाहरणार्थ आरोग्य मंत्री राजेश टोपे, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनाही आमंत्रित करावे व अंतिम निर्णय लवादाने घ्यावा अशा सूचना साखर संघाच्या बैठकीत पंकजाताई मुंडेंनी केल्या असल्याचे समजते. ऊसतोड कामगारांच्या मजूरीत वाढ न झाल्यास कोयता चालणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील जनतेसाठी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केलेल्या कार्याचा आढावा

बीड:आठवडा विशेष टीम―

कोरोनाच्या काळात बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ प्रितमताई गोपीनाथरावजी मुंडे यांनी केलेल्या कार्याचा आढावा पुढीलप्रमाणे आहे.

१) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा कंपनीची नियुक्ती

२) खरीप हंगामातील कर्ज वाटपसाठी जिल्ह्यातील सर्व बँके अधिकारी यांच्या सोबत व्हिडिओ कॉन्फरसिंग द्वारे संवाद साधून प्रश्न सोडवला,

३) दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर दहा रुपये अनुदान व दुधाची भुकटी साठी पन्नास रुपये अनुदान राज्य सरकार विरोध आंदोलन

४) कोरोनाच्या काळात वाढीव वीज बिल व कृषीपंपाचे वीज बिल माफ करण्यासाठी आंदोलन,

५) प्रधानमंत्री सहाय्यता निधीतून बीड जिल्ह्यातील रूग्णालयाला 74 वेंटिलेटर दिले

६) श्री क्षेत्र गहीनाथगडच्या पादुका आषाढी वारीसाठी पंढरपूरला हेलिकॉप्टर पाठवण्यासाठी पाठपुरावा केला,

७) बीड जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे रिक्त पदे भरण्यासाठी आरोग्य मंत्री यांच्या कडे पाठपुरावा केला

८) जिल्ह्यातील कापूस हारभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध समस्या तसेच फळबागाचे प्रलंबित अनुदान साठी कृषी मंत्र्यांकडे यांच्या कडे पाठपुरावा

९) वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीना येणाऱ्या शैक्षणिक आडचणीची स्वतः डॉ आसल्याने विद्यार्थीनी सोबत व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून माहिती घेतली ,

१०) कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बीड जिल्हा आरोग्य विभागाची आढावा बैठक घेऊन सद्यस्थितीची माहिती घेतली व काही महत्वाच्या सूचना केल्या.

११) बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.या पार्श्वभूमीवर आज बीड शहर व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला.

१२) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यातील बांधकाम मजुरांसाठी २४३ कोटी रुपये व कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीसाठी उपलब्ध करून दिला ४७३ कोटी रुपयांचा निधी मिळाला या साठी पाठपुरावा केला होता

१३) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील वयोवृद्ध,विधवा व दिव्यांग निराधारांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत केंद्र सरकारने दिला ५८ कोटींचा निधी या साठी पाठपुरावा

१४) केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे.राज्यातील प्रधानमंत्री जनधन योजनेच्या लाभार्थ्यांना कोरोना महामारीच्या संकट काळात मदत करण्याकरिता केंद्र सरकारने ६४७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला पाठपुरावा केला

१५) मा.पंकजाताई मुंडे आदेशवर गोर गरिबी जनतेला कोरोनाच्या काळात घरगुती किराणा किटचे वाटप ,

१६ ) जिल्ह्यातील विविध ठिकाणी रक्त दान शिबीराचे आयोजन

१७) बीड जिल्ह्यात रेशन दुकानातून मोफत तांदूळ व सर्व रेशन माल वाटप बाबत कार्यकर्ते द्वारे लक्ष व त्याचा अधिकारी कडून वेळोवेळी आढावा घेतला

१८) बीड भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष प्रमुख कार्यकर्ते यांनी व आरोग्य विभाग मार्फत 1 लाख लोकांची थर्मल स्कॅनिंग व ऑक्सिमेटर द्वारे तपासणी केली आहे

बीड जिल्ह्यात खा.डॉ .प्रितमताई मुंडे यांच्या या पाच महिन्यात कोरोनाच्या महामारीत बीड जिल्ह्यात विविध समस्यासाठी संबंधित खात्याच्या मंत्री मोहदय यांच्या कडे पाठपुरावा केलेला आहे .

वरील योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक घरा पर्यत व घरातील व्यक्तींना कुठल्या न कुठल्या योजना लाभ मिळालेला आहे.

(शब्दांकण ― धनंजय घोळवे)

बीड: कोविड-१९ लढ्यात रुग्णालयातील खरेदीसाठी खर्चीत १५ कोटींची व रुग्णांची हेळसांड – डॉ गणेश ढवळे

अनागोंदी कारभार प्रकरणाची चौकशी स्वतंत्र कमिटी गठीत करून करण्याची मागणी

लिंबागणेश/बीड:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रूग्णांच्या उपचारासाठी व रोग निवारणासाठी कोट्यावधी रूपये खर्च केले जात आहेत. केवळ बीड जिल्हा शासकीय रूग्णालय व स्वाराती अंतर्गत इतर ठिकाणी रूग्णांच्या उपचारासाठी रूग्णालयाच्या परिसरात 30 कोटी पेक्षा जास्त निधी खर्च करण्यासाठी दिला आहे.विशेष म्हणजे औषधी खरेदी,कोरोना प्रादुर्भावावरील साहित्य, कोविड रूग्णालय सुरू करणे, वैद्यकीय साहित्य,साधन,यंत्र सामुग्री त्याचबरोबर पॉझिटिव्ह रूग्णांना श्‍वास घेण्यासाठी ऑक्सीजन प्लँट व पाईपलाईन. त्याचबरोबर विद्युतीकरण व इतर गोष्टीसाठी अंदाजे 15 कोटीच्याजवळ खर्च केला आहे. मात्र एवढा खर्च होऊनही लाईट गेली, व्हेन्टीलेटर बंद पडले आणि तडफडून रूग्णाचा मृत्यू झाला.यावर राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर दुपारी उठून जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.अशोक थोरात यांनी पत्रकबाजी केली.एवढेच नव्हे तर जिल्हा रूग्णालयात काय खरेदी केली,काय सुविधा पुरविल्या हे उघडपणे सांगण्यात डॉ.अशोक थोरात कमी का पडत आहेत. त्यामुळे जिल्हा रूग्णालयात कोट्यावधी रूपयांचा खर्च कशावर झाला? केवळ कागदोपत्री दाखविल्या का? या सर्व गोष्टीची माहिती घेण्यासाठी व चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी वैद्यकीय कमिटी स्थापन करून जिल्हा रूग्णालयाची पाहणी करून खर्च झालेल्या ठिकाणची पाहणी करावी अशी मागणी करत असताना राजकीय पुढार्‍यांनाही आवाहन केले आहे की पुढार्‍यांनो कोरोनाबाधित रूग्णांच्या संवेदना ओळखा डॉ.अशोक थोरातांना पाठीशी घालू नका अशी भावनात्मक हाक जिल्ह्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी दिली आहे.

जिल्हा शासकीय रूग्णालयात कोरोनाबाधित रूग्णावर उपचारासाठी अथवा या आजारावर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन,लोकप्रतिनिधी व शासनाकडून करोडो रूपयांचा निधी देण्यात आला. हा निधी कशावर किती खर्च झाला याची माहिती पाहिली तर आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. जणू काही जिल्हा रूग्णालय बांधल्यापासून विद्युतीकरण झाले नाही असे भासवून विद्युतीकरणावर 52 लाख 81 हजार रूपये, ऑक्सीजन प्लँट,पाईनलाईन 5 कोटी 18 लाख 47 हजार रूपये,कोरोना वार्डातील अधिकारी,कर्मचारी निवारणीसाठी इमारतीचे विद्युतीकरण 3 लाख 19 हजार,प्रयोगशाळेची सुधारणा 28 लाख,जिल्हा शासकीय रूग्णालयातील अनेक वार्डचे कोविड कक्षात रूपांतरावर लाखो रूपयांचा खर्च केला आहे.त्यामुळे एकंदरीत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरातांनी चालवलेला हा सावळा गोंधळ आणि रूग्णांची हेळसांड झालेली पाहता सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी चौकशीची मागणी केली आहे.कोट्यावधी रूपये खर्च करून पॉझिटिव्ह रूग्णांची हेळसांड होतेय कशी? विद्युतीकरणावर लाखो रूपये खर्च करून लाईट जाते कशी? रूग्णाचा तडफडून मृत्यू होतो कसा? ही जिल्ह्यासाठी आणि डॉ.अशोक थोरातांना पाठीशी घालणार्‍या राजकीय पुढार्‍यासह इतर जणांना रूग्णांची हेळसांड, रूग्णांचा मृत्यू यांच्या संवेदना दिसून येत नाहीत का? त्यामुळे अशोक थोरातांनी कोरोना संदर्भात जो खर्च दाखविला आहे त्या सर्व खर्चाची विभागीय आयुक्त मा.सुनिल केंद्रेकर यांनी चौकशी करावी आणि ज्या ठिकाणी ऑक्सीजन प्लँट,पाईपलाईन, विद्युतीकरण यासह ज्या ठिकाणी खर्च दाखविला आहे त्याची चौकशी,तपासणी करण्यासाठी औरंगाबाद या ठिकाणाहून एक कमिटी पाठवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी मा.सुनिल केंद्रेकर विभागीय आयुक्तांना मा.राहुलजी रेखावार, जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत केलेल्या ईमेलद्वारे केली आहे.

गोपिनाथ मुंडेंची कन्या प्रितमताई मुंडे यांची महाराष्ट्र भाजपा उपाध्यक्ष पदी निवड

बीड दि.०४:आठवडा विशेष टीम स्वर्गीय गोपिनाथरावजी मुंडे साहेबांची कन्या बीड लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ प्रितमताई मुंडे यांची भारतीय जनता पार्टी च्या प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे.भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात नेणाऱ्या स्वर्गीय गोपिनाथराव मुंडे साहेब यांच्या कन्येवर ही प्रमुख जबाबदारी दिल्यामुळे सर्व स्थरावरून अभिनंदन होत आहे.सोशल मीडिया सह इतर माध्यमांवर फक्त डॉ प्रितम मुंडे यांचेच नाव चर्चेत आले आहे.