नवी दिल्ली : भारताच्या केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स (डीएल) तयार करण्याचे नियम आणखी सुकर केले आहेत. येत्या ५ महिन्यात म्हणजेच १ ऑक्टोबर २०१९ नंतर पूर्ण देशात ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) एकसारखेच होणार आहेत.
त्यामुळे आता प्रत्येक राज्यात डीएल आणि आरसी बुकचा कलर एकसमानच असणार आहे आणि त्यातील माहितीही जवळपास सारखीच राहणार आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने सूचना (नोटिफिकेशन) जारी केली आहे. देशभरात दररोज ३२ हजार चालक परवाने(डिएल) दिले जातात किंवा त्यांचे रिनिव्हल करण्यात येते. अशा प्रकारे जवळपास दररोज ४३ हजार गाड्यांची नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली जाते. या नव्या डीएल किंवा आरसीमध्ये फक्त १५ ते २० रुपयांचा खर्च येणार आहे. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या बदललेल्या नियमामुळे ट्रॅफिकच्या कामातूनही आम्हाला वेळ मिळणार आहे.