National Medical Commission Server Down : राष्ट्रीय आयुर्विज्ञान अयोगाचे संकेतस्थळाचे सकाळपासून सर्वर डाउन

नवी दिल्ली(प्रतिनिधी) दि.३१: राष्ट्रीय आयुर्विज्ञान अयोगाचे संकेतस्थळ सकाळपासून बंद पडल्यामुळे (Server Down/Database error) अनेक प्रदेशात शिकणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना पात्रता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळावर फॉर्म उपलब्ध आहे परंतु सर्वर डाउन मुळे त्यांना अडचणी येत आहेत.आज दि.३१ मार्च २०२२ रोजी पात्रता प्रमाणपत्रासाठी करावयाच्या अर्जाची शेवटची तारीख आहे.

कशासाठी लागते एनएमसी पात्रता प्रमाणपत्र ?

एनएमसी पात्रता प्रमाणपत्र हे परदेशात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी व शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतात प्रॅक्टिस करण्यासाठी द्यावयाच्या NExT /FMGE परीक्षेसाठी लागते.

पशुसंवर्धन पदविका धारकांना शासनाने नोंदणीकृत करून स्वतंत्र पशुवैद्यकीय व्यवसायास परवानगी द्यावी !

बीड दि.०४ ऑगस्ट २०२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत करून त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून वाड्या-वस्त्यांवर पशुसेवा अगदी कमी वेळात पोहचेल व गाई-म्हशीचे प्राण वाचेल.शासन दुधाचा महापूर आणण्यासाठी प्रयत्न करते योजना आखते परंतु त्यात मोलाचा वाटा असणारे पशुसंवर्धन पदविकाधारकांच्या नोंदणीच्या वेळी मात्र काणाडोळा करते.असे न करता शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून प्रथमतः पशुसंवर्धन पदविका धारकांना कायदेशीर पशुवैद्यक म्हणून घोषित करावे व त्यांची नोंदणी करून त्यांना नोंदणीक्रमांक द्यावा अशी मागणी जोर धरून आहे. १९८४ च्या कायद्यात बदल करावा, पशुसंवर्धन पदवीकाधारकांना व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे मात्र शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसून कृषीप्रधान देशातच पशूंकडे शासनाचे लक्ष नसल्याचे समोर येत आहे.

पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ कलमाअंतर्गत व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीमधून पशुसंवर्धन पदवीधारकांच्या राज्यव्यापी परिषदेची नियुक्ती करून स्वतंत्ररीत्या औषधे बाळगणे व नोंदणीकृत व्यवसाय परवाना उपलब्ध करून द्यावा.राज्यातील रिक्त पशुधन पर्यवेक्षक पदांची तत्काळ भरती करण्यात यावी.खासगीरीत्या असंघटित क्षेत्रात भारतीय पशुचिकित्सक परिषद कायद्यान्वये किरकोळ व प्राथमिक स्वरूपाच्या पशुवैद्यकीय उपचार सेवा पदवीधारक डॉक्‍टरच्या सुपरव्हिजन व माध्यमांचा वापर करून आपले कार्य पार पाडतात अशा सर्व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीप्रमाणपत्र व ओळखपत्र देऊन पशुसेवेचे कार्य सुरू ठेवण्यासाठी बळ द्यावे.

परदेशातून एमबीबीएस/एमडी डिग्री शिक्षण पूर्ण करून आलेल्या डॉक्टरांना कोविड काळात सेवा देण्याची संधी द्यावी

मुंबई:आठवडा विशेष टीम― परदेशातुन जसे की फिलिपिन्स ,रशिया , युरोप ,बांगलादेश,चीन व इतर देशातून एमबीबीएस/एमडी(डॉक्टर ऑफ मेडिसिन) ची डिग्री शिक्षण पूर्ण करून आलेले मात्र एफएमजीई परिक्षा पास/नापास विध्यार्थ्यांना विना इंटरशीप सरळ कोविड विरोधातल्या लढ्यात सेवा देण्याची संधी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ,महाराष्ट्र शासनाने द्यावी जेणेकरून कोविड काळात डॉक्टरांची कमी भासणार नाही.फिलिपिन्स सारख्या देशात अमेरिकन पद्धतीचे शिक्षण (एमडी) घेऊन विध्यार्थी भारतात येतात त्यांना इकडे येऊन पुन्हा स्वतःच्या देशातील परीक्षेला सामोरे जावे लागते.आपल्या देशात डॉक्टरांचा आजही तुटवडा भासत आहे.त्यामुळे परदेशात मेडिसिन चे शिक्षण घेतलेल्या प्रत्येकाला भारतात विनाअट सेवा देण्याची संधी सरकाने द्यावी व त्यांची कायमस्वरूपी नोंदणी एमसीआय/एमएमसी कडे करून घ्यावी.