बीड: पोलीस शिपाई चालक पदाच्या ३६ रिक्त जागासाठी भरती ; २२ डिसेंबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख

बीड:आठवडा विशेष टीम―पोलीस अधीक्षक बीड कार्यालया अंतर्गत पोलीस शिपाई चालक पदाच्या 36 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने 2 डिसेंबर पासून करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2019 आहे.

  • पदाचे नाव – पोलीस शिपाई चालक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार हा 12 वी उत्तीर्ण असावा.
  • फीस – खुला प्रवर्ग – ₹450/-, मागास प्रवर्ग – ₹350/-, अनाथ मुले – ₹350/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन संकेतस्थळावर
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 2 डिसेंबर 2019
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 डिसेंबर 2019

अधिक माहितीसाठी― जाहिरात पिडिएफ PDF

पाटोदा: अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक सरकारी नोकरी फॉर्म भरण्यासापासुन वंचित

पाटोदा तहसिलच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांना मिळेणात विविध प्रमाणपत्र पाटोदा: गणेश शेवाळे― महसूल विभागाकडून दिले जाणारे जात आणि नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, रहिवाशी,उत्पन्न तसेच अनेक प्रमाणपत्र काढण्यासाठी महाआॅनलाईन पद्धत शासनाने सुरुवात केली असून संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत जास्त माहिती नसल्यामुळे पाटोदा तहसिल मध्ये गोंधळ उडाला आहे. सध्या विविध खात्यात नोकर भरतीच्या जागा निघाल्या असून याचे फॉर्म भरण्यासाठी विविध … Read more