बीड:नानासाहेब डिडुळ― अभिनेत्री करीना कपूरने ख्रिश्चन धर्मियांच्या पवित्र ग्रंथ बायबलचे नाव ‘प्रेग्नसी बायबल’ या पुस्तकात वापरले आहे. यामुळे ख्रिश्चन धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे याप्रकरणी बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करीना कपूर विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अभिनेत्री करीना कपूर विरोधात अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष आशिष शिंदे, जिल्हाध्यक्ष मॅथ्यू जोसेफ, नितीन शिंदे, ब्रदर अरूण गायकवाड, मरियन रेड्डी व किशोर पाटील यांनी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली होती. तसेच या संदर्भात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलीक व अल्पसंख्यांक आयोगाकडे तक्रार केलेली आहे.