बीड: कोविड-१९ लढ्यात रुग्णालयातील खरेदीसाठी खर्चीत १५ कोटींची व रुग्णांची हेळसांड – डॉ गणेश ढवळे

अनागोंदी कारभार प्रकरणाची चौकशी स्वतंत्र कमिटी गठीत करून करण्याची मागणी

लिंबागणेश/बीड:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रूग्णांच्या उपचारासाठी व रोग निवारणासाठी कोट्यावधी रूपये खर्च केले जात आहेत. केवळ बीड जिल्हा शासकीय रूग्णालय व स्वाराती अंतर्गत इतर ठिकाणी रूग्णांच्या उपचारासाठी रूग्णालयाच्या परिसरात 30 कोटी पेक्षा जास्त निधी खर्च करण्यासाठी दिला आहे.विशेष म्हणजे औषधी खरेदी,कोरोना प्रादुर्भावावरील साहित्य, कोविड रूग्णालय सुरू करणे, वैद्यकीय साहित्य,साधन,यंत्र सामुग्री त्याचबरोबर पॉझिटिव्ह रूग्णांना श्‍वास घेण्यासाठी ऑक्सीजन प्लँट व पाईपलाईन. त्याचबरोबर विद्युतीकरण व इतर गोष्टीसाठी अंदाजे 15 कोटीच्याजवळ खर्च केला आहे. मात्र एवढा खर्च होऊनही लाईट गेली, व्हेन्टीलेटर बंद पडले आणि तडफडून रूग्णाचा मृत्यू झाला.यावर राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर दुपारी उठून जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.अशोक थोरात यांनी पत्रकबाजी केली.एवढेच नव्हे तर जिल्हा रूग्णालयात काय खरेदी केली,काय सुविधा पुरविल्या हे उघडपणे सांगण्यात डॉ.अशोक थोरात कमी का पडत आहेत. त्यामुळे जिल्हा रूग्णालयात कोट्यावधी रूपयांचा खर्च कशावर झाला? केवळ कागदोपत्री दाखविल्या का? या सर्व गोष्टीची माहिती घेण्यासाठी व चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी वैद्यकीय कमिटी स्थापन करून जिल्हा रूग्णालयाची पाहणी करून खर्च झालेल्या ठिकाणची पाहणी करावी अशी मागणी करत असताना राजकीय पुढार्‍यांनाही आवाहन केले आहे की पुढार्‍यांनो कोरोनाबाधित रूग्णांच्या संवेदना ओळखा डॉ.अशोक थोरातांना पाठीशी घालू नका अशी भावनात्मक हाक जिल्ह्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी दिली आहे.

जिल्हा शासकीय रूग्णालयात कोरोनाबाधित रूग्णावर उपचारासाठी अथवा या आजारावर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन,लोकप्रतिनिधी व शासनाकडून करोडो रूपयांचा निधी देण्यात आला. हा निधी कशावर किती खर्च झाला याची माहिती पाहिली तर आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. जणू काही जिल्हा रूग्णालय बांधल्यापासून विद्युतीकरण झाले नाही असे भासवून विद्युतीकरणावर 52 लाख 81 हजार रूपये, ऑक्सीजन प्लँट,पाईनलाईन 5 कोटी 18 लाख 47 हजार रूपये,कोरोना वार्डातील अधिकारी,कर्मचारी निवारणीसाठी इमारतीचे विद्युतीकरण 3 लाख 19 हजार,प्रयोगशाळेची सुधारणा 28 लाख,जिल्हा शासकीय रूग्णालयातील अनेक वार्डचे कोविड कक्षात रूपांतरावर लाखो रूपयांचा खर्च केला आहे.त्यामुळे एकंदरीत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरातांनी चालवलेला हा सावळा गोंधळ आणि रूग्णांची हेळसांड झालेली पाहता सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी चौकशीची मागणी केली आहे.कोट्यावधी रूपये खर्च करून पॉझिटिव्ह रूग्णांची हेळसांड होतेय कशी? विद्युतीकरणावर लाखो रूपये खर्च करून लाईट जाते कशी? रूग्णाचा तडफडून मृत्यू होतो कसा? ही जिल्ह्यासाठी आणि डॉ.अशोक थोरातांना पाठीशी घालणार्‍या राजकीय पुढार्‍यासह इतर जणांना रूग्णांची हेळसांड, रूग्णांचा मृत्यू यांच्या संवेदना दिसून येत नाहीत का? त्यामुळे अशोक थोरातांनी कोरोना संदर्भात जो खर्च दाखविला आहे त्या सर्व खर्चाची विभागीय आयुक्त मा.सुनिल केंद्रेकर यांनी चौकशी करावी आणि ज्या ठिकाणी ऑक्सीजन प्लँट,पाईपलाईन, विद्युतीकरण यासह ज्या ठिकाणी खर्च दाखविला आहे त्याची चौकशी,तपासणी करण्यासाठी औरंगाबाद या ठिकाणाहून एक कमिटी पाठवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी मा.सुनिल केंद्रेकर विभागीय आयुक्तांना मा.राहुलजी रेखावार, जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत केलेल्या ईमेलद्वारे केली आहे.

#CoronaVirus अहमदनगर: जिल्ह्यातील २३ पैकी २० अहवाल निगेटीव

अहमदनगर, दि.०५:आठवडा विशेष टीम― जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या २३ अहवालापैकी २० अहवाल निगेटीव आले आहेत. आज पुन्हा १३ व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, नेवासा येथील एका कोरोना बाधित रुग्णाचा २१ दिवसानंतरचा पहिला अहवाल निगेटिव आला आहे तर जामखेड येथील ०४ तर संगमनेर येथील ०३ कोरोना बाधित व्यक्तींचा १४ दिवसांनंतरचा पहिला अहवाल निगेटीव आला आहे. आज या व्यक्तींचा दुसरा अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
नेवासा येथील एका कोरोना बाधित रुग्णाचा १४ दिवसानंतरचा पहिला अहवाल निगेटीव तर दुसरा अहवाल पॉझिटीव आला होता. त्यानंतर सात दिवसांनी पुन्हा त्याचा अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. तो अहवाल निगेटीव आला आहे. आता आज त्याचा दुसरा अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आला असून तो निगेटीव आल्यास त्याला डिस्चार्ज मिळेल. तसेच संगमनेर येथील ०३ आणि जामखेड येथील ०४ जणांचा पहिला अहवाल निगेटी आला आहे. त्यांचे घशातील स्त्राव पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयाने आतापर्यत १६२८ व्यक्तींचे स्त्राव तपासणी केली असून त्यापैकी १५३५ जणांचे अहवाल निगेटीव आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४४ असून त्यापैकी २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दोन व्यक्तींचा दुर्दैवी मुत्यू झाला. सध्या एकूण १७ जण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


#CoronaVirus : लॉकडाऊन कालावधीत कोविड-१९ संदर्भात राज्यात आतापर्यंत ९१ हजार गुन्हे दाखल

मुंबई दि.०३:आठवडा विशेष टीम― लॉकडाऊनच्या काळात दि.२२ मार्च ते २ मे या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ९१ हजार २१७ गुन्हे दाखल झाले असून १८ हजार ४८ व्यक्तींना अटक करण्यात आली. तर या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी २५ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला, अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.

उपरोक्त कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या १०० नंबर वर ८२ हजार ८९४ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे, अशा ६३० व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले.

  • या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १२५५ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ५१ हजार ७१९ वाहने जप्त करण्यात आली.
  • परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.

पोलिसांवर हल्ला प्रकरणे

  • या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या १७३ घटनांची नोंद झाली असून यात ६५९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधिकारी कर्मचारी देखील २४तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्दैवाने ५१ पोलीस अधिकारी व ३१० पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी २३ पोलीस अधिकारी व २६ कर्मचारी कोरोना मुक्त झाले असून उरलेल्या २८पोलीस अधिकारी व २८१ पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुर्दैवाने ३ पोलीस कर्मचाऱ्यांचे दुःखद निधन झाले.


स्वातंत्रसेनानी ,सनदी अधिकाऱ्यांच्या थेरला गावात पाणीटंचाईच्या झळा, जलशुद्धीकरण प्रकल्पच नाही― डॉ.गणेश ढवळे

पाटोदा:आठवडा विशेष टीम―स्वातंत्रसेनानी , सनदी अधिकारी , घरोघरी नोकरदार ,उच्चपदस्थ राजकारणी अशी प्रसिद्धी मिळालेल्या पाटोदा तालुक्यातील मौजे थेरला गावात तिव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे, पिण्याच्या पाण्यासाठी खाजगी मालकीच्या बोअरवेल धारकांच्या मनधरण्या कराव्या लागतात, बोअरवेल अधिग्रहणाचा प्रस्ताव गटविकास अधिकारी पं.स.कडे पाठवल्यचे तसेच जलशुद्धीकरण प्रकल्पाची आवश्यकता असल्याचे उपसरपंच गणेश राख यांनी सांगितले.

विठ्ठल राख :

गावामध्ये एक पाण्याची टाकी आहे परंतु तेवढ्याने भागत नसल्याने ३ कि.मी.अंतरावरील रोहतवाडी तलावावरुन गावात सिमेंट निर्मित टाकीमध्ये पाणी सोडण्यात येते.त्याटाकीतून ग्रामस्थ पाणी शेंदुन आपापल्या प्लास्टीकच्या टाकीमध्ये पाणी साठवून आवश्यकतेनुसार नेण्यात येते.सकाळी मात्र याठिकाणी पाणी शेंदण्यासाठी जत्रा भरते. सांडपाण्याची जरी चिंता मिटली तरी पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते, खाजगी बोअरवेल मालकांची मनधरणी करुन मिळवावे लागते.

गणेश राख ( उपसरपंच ,थेरला (ता.पाटोदा):


दररोज रोहतवाडी तलावावरुन गावातील टाकीत पाणी सोडण्यात येत आहे , परंतु उन्हाळ्याचा भविष्यात विचार करता नागरी वस्ती आणि तलावाच्या खाली बोअरवेल अधिग्रहणाचा प्रस्ताव सादर केला आहे. आणि जिल्हा प्रशासनाकडे जलशुद्धीकरण प्रकल्पाची मागणी करण्यात आली आहे.

डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते लिंबागणेश:

बीड जिल्हयात सर्वांत जास्त स्वातंत्र सैनिक , सनदी अधिकारी , नोकरदार, राजकिय पुढारी असलेल्या गावात जलशुद्धीकरण प्रकल्प नसावा ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सकाळी पाण्याच्या टाकितून पाणी शेंददाना शारीरिक अंतर राखणेच अवघड आहे. शासनाने लवकरात लवकर जलशुद्धीकरण प्रकल्पाची उभारणी करणे अत्यावश्यक झाले आहे. या पाणीटंचाई संदर्भांत मुख्यमंत्री, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, आरोग्य मंत्री , ग्रामविकास मंत्री व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी निवेदन ई-मेलद्वारे पाठवले आहे.

थेरला येथील पाण्याची समस्या

#Coronavirus ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’मध्ये अहमदनगर जिल्ह्याचे काम चांगले ―आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासन आणि प्रशासन सज्ज अहमदनगर, दि, २६ :आठवडा विशेष टीम― कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासन आणि प्रशासन सज्ज आहे. अहमदनगर जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि पोलिस विभागाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कौतुकास्पद आहे. त्यामुळे आपण रुग्णांपर्यंत पोहोचू शकलो, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. औरंगाबादहून मुंबईकडे जाताना श्री टोपे … Read more

लॉकडाऊन काळात काही उद्योग आणि आस्थापना सुरू करण्याबाबत आदेश जारी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अटी आणि शर्तीचे पालन करणे बंधनकारक जिल्हा नियंत्रण कक्ष, परिवहन विभाग आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यावर नियंत्रणाची जबाबदारी अहमदनगर, दि.२०:आठवडा विशेष टीम― राज्य शासनाने लॉकडाऊन काळात काही उद्योग आणि आस्थापना सुरु करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील महानगरपालीका आणि नगरपालीका क्षेत्राच्‍या बाहेरील ग्रामीण भागात असलेले उदयोग तसेच उत्पादन व इतर औद्योगिक आस्‍थापना ज्यामध्ये विशेष … Read more