Maharashtra Police Bharti – महाराष्ट्र पोलीस भरती होणार १० हजार जागांची ,लवकरच भरती होण्याचे संकेत ?

मुंबई:वृत्तसंस्था/आठवडा विशेष टीम― महाराष्ट्र राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस ( Maharashtra Police ) दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील पोलीस शिपाई संवर्गात १० हजार (10 thousands) तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याचा फायदा शहरी तसेच ग्रामीण युवकांना होईल, त्यांना पोलीस दलात Maharashtra Police सेवेची संधी मिळेल, अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार Ajit Pawar यांनी दिली आहे. नागपूरमधील काटोल येथे राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला बटालियनची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्री अजित दादांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात महत्त्वाची बैठक झालेली असल्याचे वृत्त आहे. बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, महसुल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. श्रीनिवास, SRPF एसआरपीएफच्या अपर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पोलीस भरती Police Bharti प्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश

बैठकीत गृह विभागाकडून पोलीस शिपाई Police Shipayi Bharti पदाच्या ८ हजार जागा भरण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यात आणखी २ हजार जागा वाढवून एकूण १० हजार पोलीस शिपाई भरती करण्याचे व ही Police Bharti भरतीप्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर ही भरतीप्रक्रिया विनाअडथळा यशस्वीपणे कशी राबवता येईल, याचा विचार करुन सर्वंकष प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत तातडीने मांडण्याचे निर्देशही अजित पवार यांनी दिले आहेत. मंत्रिमंडळ मंजुरीनंतर भरतीप्रक्रियेची कार्यवाही वेग घेईल, असा विश्वासही अजित दादा पवार यांनी व्यक्त केला असल्याचे वृत्त आहे.

राज्य राखीव पोलीस दलाची महिला बटालियन

महाराष्ट्र राज्यात १० हजार पोलीस शिपायांची Police Shipayi भरती करण्याबरोबरच नागपूरच्या काटोल येथे राज्य राखीव पोलीस दलाची महिला बटालियन स्थापन करण्याच्या निर्णयावरही उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. या बटालियनसाठी १ हजार ३८४ पदे निर्माण करण्यात येणार असून प्रत्येक टप्प्यात ४६१ प्रमाणे तीन टप्प्यात ही पदे भरण्यात येणार आहेत. यातूनही शहरी व ग्रामीण युवतींना पोलीस सेवेची संधी मिळणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते.

कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी ही महिला बटालियन स्थापन करण्यात येणार असल्याचेदेखील वृत्त आहे. उपराजधानी नागपूरची भौगोलिक स्थिती, रेल्वे, विमान व दळणवळणाच्या साधनांची उपलब्धता लक्षात घेवून एसआरपीएफच्या SRPF या केंद्रासाठी नागपूर ची शिफारस करण्यात आली होती. त्याअनुषंगाने काटोल गावच्या हद्दीत शासकीय जमिन उपलब्ध असल्याने त्याठिकाणी ही बटालियन स्थापन करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.या निर्णयांमुळे राज्यातील युवक, युवतींना पोलीस सेवेत दाखल होण्याची मोठी संधी मिळेणार आहे. त्याचबरोबर पोलिसांवरील ताण कमी होण्यास, कायदा-सुव्यवस्था अधिक भक्कम होण्यास मदत होईल असाही विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला होता.

Mahapolice Bharti Form : पोलीस भरती चा फॉर्म कसा भरावा ? पहा

पोलीस भरती साठीचा फॉर्म कसा भराल? (Maharashtra Police bharti online form 2019)

या संकेतस्थळावर गेल्यानंतर उमेदवाराला स्वतःचे अकाऊंट तयार करावे लागेल. अगोदरच अकाऊंट असल्यास युजरनेम आणि पासवर्ड वापरुन लॉग इन करता येईल. नवीन नोंदणी करण्यासाठी register या पर्यायावर क्लिक करा, त्यानंतर स्वतःचे युजरनेम टाका, त्यानंतर ई-मेल आयडी टाकून पासवर्ड पडताळणी करा. नोंदणी केल्यानंतर Register यावर पुन्हा क्लिक करा.Register वर क्लिक केल्यानंतर ईमेल वर व्हॅरिफिकेशन लिंक जाईल.तिच्यावर क्लिक करा.

तुमचे अकाऊंट तयार होईल. पुन्हा तुम्ही होम पेजवर जा. तुम्ही तयार केलेले युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.यानंतर डीक्लेरेशन फॉर्म येईल तिथे ‘टिक’ करा.नंतर Ok वर क्लिक करा.यानंतर Create Your Profile बटन वर क्लिक करा.

यानंतर पुढील सांगितलेली प्रक्रिया पूर्ण करा. तांत्रिक अडचण येऊ नये यासाठी तुमचे युजरनेम आणि पासवर्ड सुरक्षित लिहून ठेवा. शिवाय माहिती भरतानाही वाचून खात्री करा आणि मगच माहिती भरा.